Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज विश्‍वकर्मा जयंती

(म्हणे) मुुसलमान असल्यामुळे उमर खालिदला लक्ष्य केले जात आहे !

हिंदु असणार्‍या कन्हैय्यावर कारवाई झालेली 
असतांना फरार देशद्रोही उमरच्या वडिलांचा कांगावा !
     नवी देहली - जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यूत) जिहादी आतंकवादी अफझल याच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करून देशद्रोही घोषणा देणारा उमर खालिद सध्या फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस देशभरात धाडी टाकत आहेत. या संदर्भात उमरचे वडील सय्यद कासिन इलियास यांनी आरोप केला आहे की, उमर मुसलमान असल्याने त्याला लक्ष्य केले जात आहे. उमर उच्चशिक्षित कुटुंबातील असून जेएन्यूमध्ये पीएच्डी करत आहे. उमरची बहीण अमेरिकाला असते. इलियास पुढे म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, न्यायालयाने या आरोपांवर निकाल द्यावा, मीडिया ट्रायल घेऊन सुनावणी करू नये. मी सिमी संघटनेशी संबंधित होतो. वर्ष १९८५ मध्ये सिमी सोडल्यानंतर उमरचा जन्म झाला. सिमीशी संबंधित माझा जो भूतकाळ तो तुम्ही उमर खालिदशी कसा जोडू शकता ? जेएन्यूचे प्रकरण चिघळल्यापासून उमर खालिद फरार आहे. उमर कुठे आहे मला माहिती नाही; पण मी त्याला न्यायालयाला शरण जाण्याचे आवाहन करतो

(म्हणे) महाशिवरात्रीच्या आधी त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश द्या अन्यथा आंदोलन करू !

धर्मद्रोह्यांची धर्मद्रोही कृत्ये दिवसेंदिवस वाढतच चालल्यामुळेच 
आज प्रभावी हिंदूसंघटनाची आवश्यकता निर्माण झाली आहे ! 
नास्तिकवादी भूमाता ब्रिगेडची आणखी एक धर्मद्रोही मागणी
     नाशिक - श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील आंदोलन अयशस्वी झाल्यानंतर नास्तिकवादी भूमाता ब्रिगेडने येथील श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश द्या अन्यथा आंदोलन करू, अशी मागणी केली आहे. त्या आशयाचे पत्र भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिर देवस्थानला पाठवले आहे. त्या पत्रात पुढे म्हटले आहे की, श्री काशी विश्‍वेश्‍वराच्या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जातो, तर मग त्र्यंबकेश्‍वरमध्ये का नाही ? त्यामुळे महाशिवरात्रीच्या आधी याविषयी निर्णय घेण्यात यावा, नाहीतर महिला मंदिरात प्रवेश करतील.

झारखंडमध्ये चार माओवादी ठार

      तैमारा घाटी (रांची) - झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात ९ घंटे चाललेल्या चकमकीत चार माओवादी १९ फेब्रुवारीला सकाळी ठार झाले. यात दोन पोलीस घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अफझलच्या फाशीवर विधाने करणार्‍या पाकला भारताने फटकारले !

     नवी देहली - भारताने पाकला अफझलला दिलेल्या फाशीच्या प्रकरणावरून फटकारले आहे. पाकिस्तानी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते महंमद नफीज सईद झकारीया यांनी जेएन्यू वादाविषयी बोलतांना म्हटले होते की, अफझलला अन्यायकारक पद्धतीने दिलेली फाशी काश्मीरमधील जनतेने कधीही मान्य केलेली नाही. काश्मीर खोर्‍यातील जनतेवर होणार्‍या अत्याचारांविषयी पाकिस्तानने नेहमीच आवाज उठवला आहे. यावर भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पाकला फटकारत म्हटले की, जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. या भागातील प्रत्येक घटना हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. पाकिस्तानने त्याविषयी दिलेले अनाहूत सल्ले आम्हाला कधीही मान्य असणार नाहीत.पठाणकोट आक्रमणाच्या प्रकरणी पाकमध्ये अज्ञातांवर गुन्हा !

पाकने भारताला पुन्हा मूर्ख बनवले !
     इस्लामाबाद - भारतीय वायूदलाच्या पठाणकोट तळावरील आक्रमणाच्या प्रकरणी पाकने अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुळात या आक्रमणाच्या मागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचे पुरावे भारताने दिलेले असतांना या संघटनेचा प्रमुख मौलाना अझहर मसूद, त्याचा भाऊ रौफ यांच्यासह अन्य पाच जणांंच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र पाकने भारताच्या या पुराव्यांना केराची टोपलीच दाखवली आहे.

अपघाताच्या प्रकरणात सलमान खान यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

     नवी देहली - मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या प्रकरणात सबळ पुराव्याअभावी निर्दोेष सुटलेले अभिनेता सलमान खान यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांची सुटका करण्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

हरियाणाच्या रोहतकमध्ये जाट आंदोलनकर्त्यांवरील गोळीबारात एक जण ठार

     चंदीगड - गेल्या ५ दिवसांपासून हरियाणात जाट समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन चालू आहे. (आरक्षण म्हणजे लायकी नसणार्‍याला संधी देणे ! आरक्षणामुळे देशाच्या प्रगतीवर परिणाम झाला आहे. योग्य व्यक्तीपेक्षा लायक नसलेली व्यक्ती पदावर बसल्यामुळे देश अनेक वर्षे मागासच राहिला आहे. - संपादक) त्याला १९ फेब्रुवारीला हिंसक वळण लागले. या वेळी पोलिसांनी रोहतक येथे केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला, तर ९ जण घायाळ झाले. या वेळी संतप्त जाटांनी पोलीस अधीक्षकाची गाडी जाळली. अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्या घरावर आक्रमण करून तोडफोड केली, तसेच त्यांच्या वाहनांना आग लावली. सोनीपत-देहली-अंबाला-चंडीगढ येथील रेल्वे मार्ग बंद करण्यात आले. हरियाणा शासनाने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या जाट समाजाला २० टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, तो त्यांनी अमान्य केला. दुसरीकडे जाटांना आरक्षण देण्याचा खाप पंचायत आणि अन्य समाजाकडून विरोध होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने एका समितीची नियुक्ती केली असून ती ३१ मार्चपर्यंत अहवाल देणार आहे.

वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) मध्ये २ मंदिरांच्या दानपेट्या फोडून पैशांची चोरी

मंदिरांमध्ये होणार्‍या चोर्‍यांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून या घटना 
रोखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, हीच हिंदूंची अपेक्षा !
     संभाजीनगर - वैजापूर शहराचे ग्रामदैवत असलेले संकटमोचन श्री हनुमान मंदिर आणि तालुक्यातील बोर दहेगाव येथील संत जनार्दन महाराज मंदिर या मंदिरांच्या दानपेट्या चोरट्यांनी फोडून पैसे चोरले. या दोन्ही घटना एकाच रात्री घडल्या असून त्या १७ फेब्रुवारी या दिवशी उघडकीस आल्या आहेत. संकटमोचन श्री हनुमान मंदिरातील चोरीचे चित्रीकरण क्लोज्ड सर्किट टीव्हीमध्ये चित्रांकीत झाले आहे. या मंदिरात रात्री २ अज्ञातांनी मंदिराच्या लोखंडी जाळ्या तोडून आत प्रवेश केला आणि दानपेटीतील ६ सहस्र रक्कम चोरली. संत जनार्दन महाराज मंदिराचे लोखंडी प्रवेशद्वार तोडून चोरांनी दानपेटीतील अंदाजे १० सहस्र रुपये चोरले आहेत.

जळगाव आणि सोलापूर येथे सिमीचे मोठे जाळे ! - अटक केलेल्या आतंकवाद्यांची स्वीकृती

आतंकवाद्यांनी पोखरलेला भारत !
     जळगाव - ओडिशातील केंद्रीय अन्वेषण पथकाने राऊरकेला येथे अटक केलेले मेहबूब शेख उर्फ गुड्डू, जाकिर हुसैन उर्फ सादिक, अमजद रेहमान आणि महंमद सलाख या चार आतंकवाद्यांनी जळगाव, मुक्ताईनगर, सोलापूर येथे सिमीचे जाळे खोलवर रूजले असल्याची स्वीकृती दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर जळगाव जिल्ह्यात विविध पोलीस यंत्रणांच्या पथकांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. मध्यप्रदेशातील खंडवा येथील कारागृहामधून हे चौघे फरार झाले होते.

ख्रिस्ती पाद्य्राच्या पुत्राकडून विवाहित महिलेवर बलात्कार !

या घटनेला दिव्याखाली अंधार म्हणायचे कि लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाणचा प्रकार ?
     भाग्यनगर (हैद्राबाद, तेलंगण) - येथील पहाडीशरीफ भागात एका ख्रिस्ती पाद्य्राच्या सॅमुएल नावाच्या पुत्राने २६ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार करण्याची घटना समोर आली आहे. ही घटना ३ आठवड्यांपूर्वी घडली आहे; परंतु पीडित महिलेने १५ फेब्रुवारी या दिवशी पोलिसांत याविषयी तक्रार केली. 
१. २६ जानेवारी या दिवशी सॅमुएलने त्याच्या शेजारी रहाणार्‍या महिलेला एका निर्मनुष्य ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलीस निरिक्षक वी.वी. चलापथी यांनी दिली.
२. पोलिसांनी या प्रकरणात सॅमुएलवर अपराध प्रविष्ट केला आहे.


सासाराम (बिहार) च्या न्यायालयाने समन्स मागे घेतले !

भगवान हनुमानाला बजावलेल्या समन्सचे प्रकरण !
     सासाराम (बिहार) - येथील अनुमंडल दंडाधिकारी पंकज पटेल यांनी १७ फेब्रुवारी या दिवशी नवीन आदेश काढत भगवान हनुमानाच्या ऐवजी मंदिराच्या पुजार्‍याला समन्स बजावले आहे. या वेळी त्यांनी आधी दिलेल्या आदेशाला लिपिकाची चूक असल्याचे सांगितले. देवाला कोणती नोटीस दिली जाऊ शकत नाही आणि न्यायालयात हजर रहाण्याविषयी सांगितले जाऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
१. न्यायालयाने ५ फेब्रुवारी या दिवशी हनुमान मंदिराच्या कथित अतिक्रमणाच्या प्रकरणी हनुमानाला समन्स बजावल्याचा प्रकार घडला होता. 
२. धर्माभिमानी हिंदु जनतेने या समन्सचा विरोध केल्यावर पटेल यांनी दिलेल्या आदेशात पालट केला.

मद्रास उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायाधीश कर्नान् यांना देश सोडून जाण्यासाठी हिंदु मक्कल कत्छी संघटनेने १ लाख रुपयांचा प्रवासी धनादेश पाठवला !

श्री. अर्जुन संपथ
    कोइम्बतूर (तमिळनाडू) - तमिळनाडूच्या मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कर्नान् यांनी भारतात जन्माला येण्याची लाज वाटते, असे विधान करत देश सोडून जाण्याची चेतावणी नुकतीच दिली होती. जातीभेदामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावर येथील हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष) या हिंदुत्ववादी संघटनेने कर्नान् यांना देश सोडून जाण्याचा खर्च म्हणून १ लाख रुपयांचा प्रवासी धनादेश दिला आहे. धनादेशासमवेत या संघटनेचे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी एक पत्रही दिले असून त्यात म्हटले आहे की, त्यांनी कोणत्याही देशाची निवड करावी, त्यांना यासाठी अधिक पैसे लागत असल्यास तेही देण्याची सिद्धता आहे.केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ५ पुंगळ्या आणि एक गोळी घेतली कह्यात !

कॉ. पानसरे हत्या प्रकरण
     कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर २ पिस्तुलांतून गोळीबार झाला होता. त्यामुळे आक्रमणकर्ते दोघे जण होते, हे बॅलेस्टिक अहवालावरून स्पष्ट झाले आहे. १७ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथे झालेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या बैठकीत पिस्तुल आणि गोळ्या समान असल्या, तरी कॉ. पानसरे यांच्यावर गोळ्या झाडणारे आक्रमणकर्ते दोन होते, यावर चर्चा झाली आहे. कॉ. पानसरे यांच्यावरील आक्रमणासाठी वापर झालेल्या आणि विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटीने) घटनास्थळावरून हस्तगत केलेल्या ५ रिकाम्या पुंगळ्या आणि एक गोळी यांचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) १८ फेब्रुवारी या दिवशी ताबा घेतला आहे. 
     कॉ. पानसरे हत्येच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी येथील अन्वेषण करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांशी २ घंट्यांहून अधिक वेळ चर्चा केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे आणि साहित्यिक डॉ.एम्.एम्. कलबुर्गी यांची हत्या एकाच पिस्तुलातून झाल्याचे कर्नाटकातील बॅलिस्टिक अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे.

व्हॅटीकनने अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळाचा आरोप असलेल्या ख्रिस्ती पाद्य्राचे निलंबन मागे घेतले !

  • हिंदु संतांवर खोटे आरोप लावून रान उठवणारी बहुतांश धर्मनिरपेक्ष प्रसारमाध्यमे ख्रिस्ती पाद्य्रांद्वारे मुली, महिला अथवा नन यांचा लैंगिक छळ करण्यात येत असलेल्या बातम्या वरचेवर येत असतांनाही त्यांकडे कानाडोळा करतात, हे लक्षात घ्या !
  • यामुळे अशा प्रसारमाध्यमांना कोणी हिंदुद्रोही अथवा ख्रिस्तीधार्जिणे म्हटले, तर त्यात चूक ते काय ?
     नवी देहली - रोमन कॅथलिक चर्चचे पाद्री आणि तमिळनाडूतील रहिवासी जोसेफ पालानिवेल जयापौल यांनी १० वर्षांपूर्वी अमेरिकेत असतांना एका १४ वर्षे वयाच्या मुलीचा लैंगिक छळ केला होता. या आरोपावरून त्यांना व्हॅटीकनने निलंबित केले होते; मात्र त्यांच्यावरील निलंबन नुकतेच मागे घेण्यात आले आहे, असे तमिळनाडूच्या ख्रिस्ती संस्थेच्या प्रवक्त्याने जाहीर केले.

माजी ख्रिस्ती धर्मगुरु पोप जॉन पॉल (द्वितीय) यांचे विवाहित महिलेशी प्रेमप्रकरण असल्याची प्रेमपत्रे उघड !

     लंडन - बीबीसी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, वर्ष २००५ मध्ये निधन झालेले ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप जॉन पॉल द्वितीय यांचे अमेरिकी विचारवंत अन्ना-टेरेसा ताइमेनिका या विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. या संदर्भातील काही प्रेमपत्रे आणि छायाचित्रे ३० वर्षांनंतर उघड करण्यात आली आहेत. ही प्रेमपत्रे पोलंडच्या राष्ट्रीय ग्रंथालयात लोकांपासून लपवून ठेवण्यात आली होती. पोप यांना २०१४ मध्ये संत घोषित करण्यात आले होते. या प्रेमप्रकरणाच्या वेळी पोप २६ वर्षांचे होते. पत्रांनुसार या दोघांचे संबंध वर्ष १९७३ पासून चालू झाले होते.

मुसलमान राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्राला दान देण्यास नकार

     नवी देहली - जकात आणि उमराच्या रूपाने मुसलमान देशांमध्ये मोठ्या प्रमाणात दानधर्म केल्या जातो. जवळजवळ ५ खर्वांहून (५० लाख कोटी) अधिक डॉलर्सचा हा दानधर्म असतो. त्यातील १० टक्के जरी संयुक्त राष्ट्राला (युनोला) मिळाले, तरी त्यातून मानवजातीचे मोठे कल्याण होईल, असे संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांना वाटते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी धार्मिक दृष्टीने केल्या गेलेल्या या दानातून काही रक्कम युनोला सेवाकार्यासाठी मिळावी, असा प्रस्ताव मुसलमान राष्ट्रांपुढे ठेवला होता; परंतु मुसलमान राष्ट्रांनी हा प्रस्ताव नाकारला आहे. (मुसलमान राष्ट्रांच्या दानावर अवलंबून असलेली संयुक्त राष्ट्रे मुसलमानांच्या कारवायांना पायबंद घालू शकतील का ? - संपादक)

मुसलमान मुलाशी विवाह केल्यामुळे महाविद्यालयाने विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला

     तिरुवनंतपुरम् (केरळ) - कोझिकोड येथील मुस्लिम एज्युुकेशन सोसायटी वुमन कॉलेजमध्ये शिकणार्‍या एका २३ वर्षीय नीरजा मोहंमद रमीज हिने मुसलमान युवकाशी न्यायालयीन विवाह केला. त्यामुळे तिला महाविद्यालयात येण्यास प्रतिबंध केला, तसेच मुसलमान धर्म स्वीकारल्यास महाविद्यालयात प्रवेश न देण्याचा विचार होऊ शकतो, असे महाविद्यालय प्रशासनाने म्हटल्याचा आरोप नीरजाने केला आहे. 
     नीरजा म्हणाली, मी लग्न होऊन आठवड्यानंतर महाविद्यालयात गेले असता महाविद्यालय प्रशासनाने मला महाविद्यालयात प्रवेश नाकारला. आई-वडिलांच्या अनुमतीविना मुसलमान मुलाशी विवाह केल्यामुळे मला महाविद्यालयात शिकण्याची अनुमती देण्यात येणार नाही. मी महाविद्यालयात आले, तर त्याचा इतर विद्यार्थिनींवरही परिणाम होईल, असे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे. महाविद्यालय प्रशासनाने मला सांगितले की, जर मुसलमान धर्म स्वीकारला, तर मला महाविद्यालयात घेण्याविषयी विचार होऊ शकतो, असेही नीरजा म्हणाली. महाविद्यालयाने नीरजाचे आरोप फेटाळले असून ती १० दिवसांपासून महाविद्यालयातून बेपत्ता होती. त्यामुळे तिला आई-वडिलांना घेऊन येण्यास सांगितले होते, असे म्हटले आहे.

(म्हणे) शासन विरोधकांचा आवाज दडपत आहे !

भारतात राष्ट्रवादी विचारसरणीचे शासन सत्तेत असल्यामुळे विदेशी वृत्तपत्रांना पोटशूळ उठला 
असून मोदी शासनाची मानहानी करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत ! 
जेएन्यूमधील देशद्रोह प्रकरण
विदेशी प्रसारमाध्यमांकडून मोदी शासनावर आरोप 
     नवी देहली - अमेरिकेच्या वृत्तपत्रांनी जेएन्यु प्रकरणी मोदी शासन विरोधकांचा आवाज दडपत असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेतून प्रसिद्ध होणारे वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे की, भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नवा वाद चालू झाला आहे. देशात मोदी शासनाच्या विरोधात वातावरण निर्माण होत असून विरोध करणार्‍यांना भिती दाखवण्यत येत आहे. 
     गार्डीयननुसार, जेएन्यु प्रकरण, म्हणजे देशात असहिष्णुता वाढल्याच्या संदर्भात जे मोदी शासनाला विरोध करत आहेत, त्यांची प्रतिक्रिया आहे.

धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !

www.hindujagruti.org

डायघर गावात हिंदूंना सुरक्षित करण्याचा उपस्थित धर्माभिमान्यांचा निर्धार !

  • डायघर (मुंब्रा) येथील हिंदु धर्मजागृती सभेत हिंदुऐक्याची गर्जना !
  • सभेला ३ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती
व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घातल्यावर सभेतील मान्यवर, वक्ते घोषणा देतांना
सभेला उपस्थित हिंदु धर्माभिमानी
     डायघर - मुंब्रा येथे आतापर्यंत सिमी, हिजबुल मुजाहिद्दीन, इसिस आणि लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी पकडण्यात आले आहेत. येथील वाढती वीजचोरी, अनधिकृत बांधकामे, हिंदु महिला आणि अल्पवयीन मुली यांच्यावरील अत्याचार, गुन्हेगारी, दंगली यांसारख्या समस्यांमुळे आजूबाजूच्या परिसरात हिंदूंमध्ये असुरक्षिततेचे वातावरण झाले आहे. या सर्व समस्यांविषयी हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी आणि हिंदूंना सुरक्षित वाटण्यासाठी डायघर (मुंब्रा) येथे १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंतीच्या मुहुर्तावर ग्रामस्थांमध्ये हिंदु तेज जागवले गेले ! निमित्त होते हिंदु धर्मजागृती सभेचे...!

जाधवपूर विद्यापिठात फुटीरतावाद्यांना पाठिंबा देणारी हस्तपत्रके वाटण्यात आली

     कोलकाता - जेएन्युमध्ये देशद्रोही कारवायांवर वाद चालू असतांनाच, बंगालमधील जाधवपूर विद्यापिठात फुटीरतावाद्यांना पाठिंबा देणारी हस्तपत्रके वाटण्याची माहिती समोर आली आहे. १६ फेब्रुवारी या दिवशी या विद्यापिठात महंमद अफझलचा पुरस्कार करणार्‍या आणि कन्हैया कुमारच्या अटकेच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या.
       दुसरीकडे १८ फेब्रुवारी या दिवशी अभाविप आणि भाजपचे कार्यकर्ते विद्यापिठात जाऊन आंदोलन करण्याच्या प्रयत्नात होते; परंतु त्यांना आत येण्यापासून रोखण्यात आले.

राज्यभरात मागासवर्गीय भागात ५०० मंदिरे बांधण्याचा निर्णय !

तिरुमला देवस्थान समिती आणि आंध्रप्रदेश शासनाचा संयुक्त उपक्रम 
     भाग्यनगर (हैद्राबाद) - विविध जातींमध्ये सनातन हिंदु धर्माच्या संवर्धन, संगोपन आणि प्रोत्साहनासाठी तिरुमला देवस्थान समिती आणि आंध्रप्रदेश शासनाच्या धर्मादाय विभागाने राज्यभरात ५०० मंदिरे बनवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (केवळ मंदिरे बांधून नव्हे, तर हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये धर्माभिमान निर्माण करूनच हिंदु धर्माचे खर्‍या अर्थाने संवर्धन आणि संगोपन होऊ शकते. त्यामुळे तिरुमला देवस्थान समिती आणि आंध्रप्रदेश शासनाने हिंदूंना धर्मशिक्षण देण्यावर अधिक भर द्यायला हवा ! भारतभरातील भाजपप्रणित शासनांनीही यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. - संपादक)

आगामी अधिवेशनात योग आणि निसर्गोपचार या प्राचीन शास्त्रांना प्रोत्साहन देणारे विधेयक येणार

योग आणि निसर्गोपचार परिषदेची स्थापना होणार
     मुंबई - योग आणि निसर्गोपचार यांच्या विकासासाठी अधिक संधी निर्माण करण्यासह त्यांचे अध्यापन अन् व्यवसाय यांचे सुसूत्रपणे विनियमन करणे आवश्यक होते. त्यादृष्टीने सिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र योग आणि निसर्गोपचार विधेयक-२०१६ च्या मसुद्यास मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच हे विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत मांडण्याचाही निर्णय घेण्यात आला.
    प्रस्तावित विधेयकानुसार महाराष्ट्र योग आणि निसर्गोपचार परिषद स्थापन करण्यात येणार असून तिची घटना अन् रचना ही सध्या अस्तित्वात असणार्‍या इतर राज्य परिषदांप्रमाणेच असणार आहे. योग आणि निसर्गोपचार या क्षेत्रात नवीन शिक्षण संस्था आणि अभ्यासक्रम चालू करणे, शिक्षण संस्थांना संलग्निकरण प्रदान करणे, संशोधन संस्थांना मान्यता देण्यासह याविषयी राज्य शासनाला मार्गदर्शन करणे, योग अन् निसर्गोपचारामधील मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि संलग्न रुग्णालये यांसह याबाबतच्या केंद्रांची तपासणी करणे, त्यांना अधिस्वीकृती देणे, या क्षेत्रातील व्यवसायी आणि कर्मचार्‍यांच्या नोंदी ठेवणे, त्यांच्यासाठी आचारसंहिता सिद्ध करणे आदी कामे ही परिषद करणार आहे.

कोट्टायम (केरळ) येथे तणावमुक्त परीक्षांसाठी हिंदु जनजागृती समितीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना
कु. प्रणिता सुखटणकर
     कोट्टायम (केरळ) - येथील करिकुलंगरा रहिवासी कल्याण समितीने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना शालेय शिक्षण घेणार्‍या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी एका कार्यक्रमात आमंत्रित केले होते. या कार्यक्रमाला एम्.जी. विद्यापिठाचे संपर्क आणि पत्रकारिता विभागाचे संचालक प्रा. माधवन् पिल्लई, पूर्व सैन्याधिकारी श्री. शैलेश आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कु. प्रणिता सुखटणकर उपस्थित होत्या.

संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद वास्तविकतेपासून लांब गेली आहे ! - भारत

    संयुक्त राष्ट्रे - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे सध्याचे स्वरूप आणि कामकाजाची पद्धत वास्तविकतेपासून लांब असून सध्या ती भूतकाळाचे प्रतिनिधित्व करत आहे. सुरक्षा परिषदेचे स्वत:चे घर व्यवस्थित नसतांना ती जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये लोकशाही आणि कायद्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे, ही मोठी विसंगती आहे, अशी टीका भारताने केली. 
     संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन सुरक्षा परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर शांती आणि सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण तत्त्वाच्या रूपात संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचा सन्मान आणि उद्देश या विषयावरील खुल्या चर्चेत बोलत होते.
      ते म्हणाले, ही परिषद वर्तमान काळाशी सुसंगत असण्यासाठी तिच्यामध्ये पालट करण्याविना दुसरा पर्याय नाही. यासाठी तिला एखाद्या प्रलयकारी संकटाची वाट पहाण्याचीही आवश्यकता नाही.

पाकला साहाय्य करणार्‍या अमेरिकेला तेथील हिंदूंकडून विरोध !

भारतातील किती हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी अमेरिकेच्या निर्णयाचा विरोध केला ?
     वॉशिंग्टन - अमेरिकेने पाकला एफ्-१६ नावाची युद्ध विमाने देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला अमेरिकेतील हिंदूंनी विरोध केला आहे. हिंदू अमेरिकन फाउंडेशन या हिंदूंच्या एका संघटनेने म्हटले आहे की, पाकला अशा प्रकारे साहाय्य करणे म्हणजे पाकच्या वाईट कृत्यांचे समर्थन करणे आणि पुरस्कार देणे होय.

क्षुल्लक कारणामुळे संतप्त होणारे पोप !

     मोरेलिया (मेक्सिको सिटी) - मोरेलिया मैदानात पोपला भेटण्यासाठी आलेला समुदाय अनियंत्रित झाला. त्यामुळे मानसिक संतुलन गमावलेले पोप व्हीलचेअरबसून असलेल्या एका व्यक्तीवर अतिशय संतापले. एका व्यक्तीला फटकारतांना त्यांनी स्पॅनिश भाषेत स्वार्थी बनू नका, स्वार्थी बनू नका, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.

राऊरकेला (ओडिशा) पुस्तक मेळ्यामध्ये सनातन संस्थेचा सहभाग

प्रदर्शनाला भेट देतांना जिज्ञासू
     राऊरकेला, १९ फेब्रुवारी - राऊरकेला येथील आदर्श पाठागार या संस्थेने आयोजित केलेल्या २३ व्या राऊरकेला पुस्तक मेळाव्यात सनातन संस्थेने सहभाग घेतला होता. संस्थेचे अध्यात्म, राष्ट्र तथा आरोग्य विषयक ग्रंथ आणि सात्त्विक वस्तूंचे केंद्र लावण्यात आले होते, तसेच धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स फलकही लावण्यात आले होते. प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या आणि सलग दहा दिवस चालणार्‍या पुस्तक मेळाव्यात १२४ पुस्तक प्रकाशन संस्था, आध्यात्मिक संस्था आणि ग्रंथ विक्रेते इत्यादींनी सहभाग घेतला होता. सनातनच्या प्रदर्शन केंद्राला शेकडो जिज्ञासूंनी भेट दिली. तसेच अनेक धर्माभिमानी, हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी आदींनीही या प्रदर्शनाला भेट देऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या धर्मजागृतीच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

२२०० भ्रष्ट शासकीय अधिकार्‍यांच्या विरोधात सीबीआयाची चौकशी

     नवी देहली - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) २०१५ मध्ये २२०० शासकीय अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला आहे. यात २०१४ च्या तुलनेत ९४ टक्के वाढ झाल्याचे सीबीआयने म्हटले आहे. आतापर्यंत एकूण १०१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा यांनी दिली.

जेएन्यु विद्यापिठात देशद्रोही घोषणा दिल्याचे पडसाद गोव्यातही

(म्हणे) पीडीपीशी युती करणार्‍या भाजपला देशद्रोही विद्यार्थ्यांवर कारवाईचा अधिकार नाही !
     उलट अशा देशद्रोही विद्यार्थ्यांना जवळ करणार्‍या अग्नीवेश यांच्या सारख्यांवरही गुन्हे प्रविष्ट करायला हवेत ! भगवी वस्त्रे परिधान करून देशद्रोही आणि हिंदुद्वेष्टे यांचे समर्थन करणारे अग्नीवेश हे ढोंगी स्वामी भारताला कलंक आहेत !
पीएफ्आयच्या सभेत स्वामी अग्नीवेश यांच्याकडून जेएन्यूतील देशद्रोही विद्यार्थ्यांचे समर्थन
     पणजी - महंमद अफझलला हिरो म्हणणार्‍या युवकांवर कारवाई करण्याचा देशद्रोही पीडीपीशी जम्मू आणि काश्मीरमध्ये हातमिळवणी करणार्‍या भाजपला अधिकार नाही, असे विधान नवी देहली येथील बंधावू मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष स्वामी अग्नीवेश यांनी केले. स्वामी अग्नीवेश यांनी असे विधान करून जवाहरलाल नेहरू विद्यापिठात देशद्रोही घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांचे एकप्रकारे समर्थन केले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने आझाद मैदान, पणजी येथे १७ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या एका जाहीर सभेत स्वामी अग्नीवेश बोलत होते. या वेळी व्यासपिठावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य अनिस अहमद, सामाजिक कार्यकर्ते गोविंद गावडे आदींची उपस्थिती होती. (हिंदूंनो, यांना लक्षात ठेवा. - संपादक)
      स्वामी अग्नीवेश त्यांच्या भाषणात भाजपवर टीका करतांना पुढे म्हणाले,
१. भाजपला गोहत्या रोखायची नाही; मात्र या विषयावरून समाजात फूट पाडायची आहे. अन्यथा आतापर्यंत भाजपने देशभरात गोहत्याबंदी कायदा आणला असता.
२. जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील काही विद्यार्थ्यांवर जो देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे, ही अन्यायकारक गोष्ट आहे. 
३. केंद्रात शासन भाजप नव्हे; तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवत आहे. संघ देशात फूट घालण्याचे काम करत आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात संघाच्या एकही स्वयंसेवकाने कैदेची शिक्षा भोगलेली नाही. (एकातरी मुसलमानाने किंवा तथाकथित साम्यवाद्याने स्वातंत्र्यलढ्यात किमान सहभाग तरी घेतला होता का, हे अग्नीवेश यांनी सांगावे ! - संपादक)
४. स्वामी अग्नीवेश यांनी पुढे बोलतांना आंतरधर्मीय लग्नाचे समर्थन केले. सभेला ६०० हून अधिक मुसलमानांची उपस्थिती होती.
क्षणचित्रे
१. सभेला पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर प्रमुख पाहुणे म्हणून, तर इतिहासतज्ञ प्रजल साखरदांडे विशिष अतिथी म्हणून उपस्थित रहाणार असल्याचे जाहीर केले होते, तरी केरकर आणि साखरदांडे हे दोघेही सभेला अनुपस्थित होते.
२. सभेच्या सभोवताली खासगी वेशातील सुरक्षारक्षकांचा वेढा होता.
३. मुसलमानांना नमाज पढता यावा; यासाठी सभेच्या ठिकाणी बाजूला विशेष सोय करण्यात आली होती.

साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी एकमेकांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील 
जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला ! 
       वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहिले. साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर त्यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या स्वागत पाहिले. आज आपण साधक आणि कुटुंबीय यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

कारवाई होत नसल्यानेच महाविद्यालयात देशद्रोहाचे वाढते प्रकार ! - विठ्ठल नाईक, अभाविप

पणजी येथील अभाविपच्या सभेत जेएन्यूतील देशद्रोहाचा निषेध
     पणजी - महाविद्यालयांत देशद्रोहाचे वाढते प्रकार घडत आहेत. एका महाविद्यालयात प्रथम असा प्रकार घडला, तेव्हाच संबंधितांवर कारवाई झाली असती, तर नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यू) असा प्रकार घडला नसता. १७ फेब्रुवारी या दिवशी कोलकाता येथील एका विद्यापिठात असाच प्रकार घडला, असे विधान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) उत्तर गोवा जिल्हा संयोजक विठ्ठल नाईक यांनी केले. येथील कदंब बसस्थानकाजवळील श्री हनुमान मंदिराजवळ १७ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या एका निषेधसभेत श्री. विठ्ठल नाईक बोलत होते. या वेळी अभाविपचे गोवा संघटक श्री. अमोघ आर्लेकर, राष्ट्रीय सदस्य प्रा. दत्ता नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती. नवी देहली येथील जेएन्यूमध्ये काही विद्यार्थ्यांनी देशद्रोही घोषणा देण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि याविषयी जनजागृती करण्यासाठी अभाविपने या निषेध सभेचे आयोजन केले होते. या वेळी इतरांचीही भाषणे झाली. भारत माता की जय आदी देशप्रेम वाढवणार्‍या घोषणाही या वेळी देण्यात आल्या.मुंबईत रेल्वेच्या धडकेत चार गँगमनचा मृत्यू

     मुंबई - मुंबईत रेल्वेगाडीच्या धडकेत चार कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते विद्याविहार स्थानकांदरम्यान ही घटना घडली. गोकुळ (वय १८ वर्षे), श्रावण (वय १८ वर्षे), नाना (वय २७ वर्षे) आणि काशिनाथ (वय १९ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हे चारही कर्मचारी ट्रॅक दुरुस्ती करणारे कंत्राटी कामगार होते. हे सर्व कर्मचारी रात्रपाळी आटोपून सकाळी ६.१५ ते ६.३० च्या सुमारास घरी निघाले होते; मात्र दोन क्रमांकाच्या ट्रॅकवरून जाणार्‍या कर्जत-सीएस्टी या रेल्वेगाडीने त्यांना धडक दिली.सेवेची आत्यंतिक तळमळ असलेले नागपूर येथील श्री. विनोद काटेकाका यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. विनोद काटे यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव (डावीकडे)
     नागपूर - येथील साधक श्री. विनोद काटे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे, असे पू. नंदकुमार जाधव यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी घोषित केले. श्रीकृष्णाच्या चित्राची चौकट देऊन पू. काकांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी उपस्थित साधकांची भावजागृती झाली. 
प.पू. डॉक्टरांना सूक्ष्मातून समवेत ठेवल्यास संकटांपासून रक्षण होते ! - विनोद काटे 
     मनोगत व्यक्त करतांना श्री. काटे म्हणाले, प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच माझी आज ६१ टक्के पातळी झाली आहे. सर्वांचीच लवकर प्रगती होवो, ही त्यांच्या चरणी प्रार्थना ! मी प्रत्येक कृती करतांना प.पू. डॉक्टरांना सूक्ष्मातून समवेत ठेवले. तसे केल्यास सर्व संकटांपासून आपले रक्षण होते. आपल्याला आनंद मिळवता आला पाहिजे. मी जेवढी सेवा करतो, तेवढा मला आनंद मिळतो.
     बाबांचा नामजप सतत चालू असतो. त्यांना सेवेची पुष्कळ तळमळ आहे, असे काकांची मुलगी गीता मिश्रा हिने सांगितले. भावाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो, असे काकांची बहीण सौ. सुषमा पारपतवार यांनी सांगितले.

धर्मादाय सहआयुक्तांनी सोलापूर येथील धर्मादाय कार्यालयास भेट देऊन उघडकीस आणला भोंगळ कारभार !

धर्मादाय सहआयुक्तांनी सातत्याने पुणे विभागातील कार्यालयांना भेट देऊन सद्यस्थितीत चालू 
असलेली दिरंगाई आणि गैरकारभार दूर करून नागरिकांना स्वच्छ प्रशासन द्यावे, ही अपेक्षा !
       पुणे, १९ फेब्रुवारी - पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त श्री. शिवकुमार डिगे यांनी काही अधिवक्त्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे १७ फेब्रुवारी या दिवशी सोलापूर येथील धर्मादाय कार्यालयाला पक्षकाराच्या वेशात भेट दिली. त्या वेळी त्यांनी तेथील कारभार कसा चालतो, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या भेटीप्रसंगी त्यांना काही चुका निदर्शनास आल्याने त्यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांची झाडाझडती घेतली. (धर्मादाय कार्यालयाच्या कारभाराची पडताळणी करणार्‍या धर्मादाय सहआयुक्त श्री. शिवकुमार डिगे यांचे अभिनंदन ! - संपादक)

(म्हणे) देशापुढे सनातनी आतंकवादाचे मोठे आव्हान !

भाई वैद्य यांचे हिंदुद्वेषी फुत्कार !
     सातारा - देशापुढे सनातनी आतंकवादाचे मोठे आव्हान उभे ठाकले असून ते कधी नव्हे, इतके विकृत आणि विक्राळ झाले आहे, अशी गरळओक समाजवादी विचारवंत आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांनी केली आहे. (हिरव्या आतंकवादानेच हे स्वरूप विक्राळ केले आहे ! - संपादक) राष्ट्र सेवा दलाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 
वैद्य यांची अन्य हिंदुद्वेषी विधाने 
१. देशात हिंदुत्ववाद्यांनी माजवलेल्या आतंकवादामुळे संपूर्ण जगात भारताला स्वत:ची मान खाली घालावी लागत आहे. (देशात आतंकवाद घडवणारे खरे आतंकवादी कोण आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे, हे वैद्य यांनी लक्षात घ्यावे ! - संपादक) जगामध्ये जमातवादानेही आता विकृत, घातक आणि संकुचित रूप धारण केले आहे. 
२. भारतातील सनातनी आतंकवादी हे त्याचेच बोलके उदाहरण आहे.

पुणे महानगरपालिकेला हॉटेल आणि बांंधकाम व्यावसायिक यांच्याकडून पाणीपट्टीची ७०० कोटी थकबाकी

  • पाणीपट्टी थकवणार्‍या सर्वसामान्यांकडील पाणीजोडणी तात्काळ तोडली जाते; मात्र उपाहारगृहे, बांधकाम व्यावसायिक आणि शासकीय कार्यालये यांना वेगळा न्याय का ?
  • पुणे पालिकेच्या प्रशासनाचा गलथान कारभार !
       पुणे, १९ फेब्रुवारी - शहरात बहुचर्चित २४ घंटे पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी २ सहस्र ८०० कोटी रुपयांचा व्यय येणार आहे. ही योजना राबवण्यासाठी पालिकेने पाणीपट्टीत वाढ केली आहे. सामान्य नागरिक पाणीपट्टी भरत आहेत; परंतु शहरातील नामांकित उपहारगृहे, गृहरचना संस्था, शासकीय कार्यालये यांनी पाणीपट्टी भरलेली नाही. (जी शासकीय कार्यालये पाणीपट्टी भरत नाहीत, ते इतर पुरवठादारांचे पैसे देण्याविषयी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) एकूण ९०६ जणांकडे पालिकेची ७०० कोटी रुपयांची पाणीपट्टी थकित आहे. (अजूनपर्यंत ही वसुली का केली नाही, याविषयी संबंधित अधिकारी उत्तर देतील का ? ही वसुली प्रलंबित ठेवणारे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर पालिका आयुक्तांनी कारवाई करावी, ही अपेक्षा ! - संपादक) ही थकबाकी वेळेवर वसूल केली असती, तर २४ घंटे पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीपट्टी वाढवण्याची आवश्यकता भासली नसती, अशी नागरिकांमध्ये चर्चा केली जात आहे.

(म्हणे) अफझल आणि याकूब मुसलमान असल्यामुळेच त्यांना फाशी !

सोशल डेमोक्रेटीक पार्टीचे इम्तियाझ यांचा आतंकवाद्यांच्या फाशीवरून कांगावा मुसलमानांनी 
देशाच्या विरोधात केलेली आक्रमणे समर्थनीय आहेत का ? आतंकवाद्यांचा देशद्रोह 
दुर्लक्षून त्यांच्या फाशीचेही राजकारण करणार्‍यांनाही कठोर शिक्षा व्हायला हवी !
     पणजी - उच्चवर्णियांनी खालच्या जातीतील लोकांची छळवणूक करण्याचे प्रकार देशात शतकोन्शतके चालू आहेत. या अनुषंगाने अनेकांना फाशीची शिक्षा झालेली आहे. महंमद अफझल आणि याकुब मेमन यांना फाशी देण्यात आली. हे दोघेही मुसलमान होते. अशाच प्रकारे एका आदिवासी व्यक्तीला फाशी देण्यात आली. वास्तविक मुसलमान, दलित आणि आदिवासी यांना लक्ष्य करून फाशी ठोठावण्यात येत आहे. उच्चवर्णीय लोकांना कधीही फाशीची शिक्षा ठोठावली जात नाही, असे विधान सोशल डेमोक्रेटीक पार्टीचे गोवा विभागाचे अध्यक्ष सय्यद इम्तियाझ यांनी केले आहे. (अफझल आणि याकूब यांनी केलेला देशद्रोह जगाला ज्ञात आहे ! केवळ मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी अशी वक्तव्ये करून सहानुभूती मिळवणारे राष्ट्रघातकी केवळ भारतातच असतील ! - संपादक) एका वृत्तसंस्थेकडे १७ फेब्रुवारी या दिवशी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सय्यद इम्तियाझ हे सोशल डेमोक्रेटीक पार्टीचे गोवा विभागाचे अध्यक्ष आहेत. सोशल डेमोक्रेटीक पार्टी ही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या राजकीय विभाग म्हणून कार्य करते.

फलक प्रसिद्धीकरता

जिहादी आतंकवादाशी लढण्यास आपण सज्ज आहोत का ?
     सीबीआयद्वारे राऊरकेला (ओडिशा) येथे अटक करण्यात आलेल्या ४ जिहादी आतंकवाद्यांनी महाराष्ट्रातील जळगाव, मुक्ताईनगर आणि सोलापूर येथे सिमीचे जाळे खोलवर रूजले असल्याची स्वीकृती दिली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Maharashtrake 3 nagarome SIMIka majboot jaal biche honeki jaankari Odishame bandi banaye gaye 4 atankiyo ne di.
Atankwadse ladne hetu saksham bane !
जागो ! : महाराष्ट्र के ३ नगरों में सिमी का मजबूत जाल बिछे होने की जानकारी ओडिशा में बंदी बनाए गये ४ आतंकियों ने दी.
आतंकवाद से लडने हेतु सक्षम बने !सांगोल्यात जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात शिवजयंती फेरीने संपूर्ण शहर शिवमय !

२ सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग ! 
      सांगोला (जिल्हा सोलापूर), १९ फेब्रुवारी (वार्ता.) - येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला शिवभक्त अमर टिंगरे यांचे हस्ते अभिषेक करून आणि पुष्पहार घालून फेरीला प्रारंभ झाला. या वेळी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फेरीत भगवे फेटे घालून, मोठे ध्वज, घोडे, वाद्य, दुचाकी यांसह २ सहस्रांहून अधिक हिंदू सहभागी झाले होते. फेरी पुढे नगरपालिका, वज्राबाद पेठ, कचेरी रोड, मिरज रोड, मेन रोड यांसह शहरातील विविध भागांतून जाऊन फेरीची सांगता पुन्हा शिवाजी चौकात झाली. वासुद चौकात सर्वत्र मोठे फ्लेक्स फलक आणि भव्य कमान उभारण्यात आली होती. शहरात सर्वत्र शिवमय वातावरण झाले होते.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाची स्थिती विदारक

  • ३०८ शाळा खाजगी भूमीत 
  • सेमी इंग्रजी माध्यमाचा बोजवारा 
  • निधीअभावी शाळांच्या जागेचे भाडे ४ वर्षे थकले !
     सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील एकूण १ सहस्र ४६७ प्राथमिक शाळांपैकी ४० शाळा भाड्याच्या जागेत चालू आहेत, तर ३०८ शाळा इमारती अद्यापही खाजगी भूमीत आहेत. शासनाकडून निधी प्राप्त झाला नसल्याने चार वर्षे भाडे देण्यात आले नसल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण समिती सभेत उघड झाले. याबाबत तात्काळ शासनाला अहवाल पाठवून निधीची मागणी करावी, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी शिक्षण विभागाला दिले. तसेच जिल्ह्यात चालू करण्यात आलेल्या सेमी इंग्रजीचा तज्ञ शिक्षकांअभावी बोजवारा उडाला असून अनेक ठिकाणी सेमी इंग्रजी माध्यम बंद करण्याची मागणी होत आहे, असेही या सभेत उघड झाले. 
     जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा प्रभुगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै समिती सभागृहात झाली.

तक्रार करणार्‍या राष्ट्राभिमानी नागरिकाला दमदाटी

गोवा पोलिसांचा अजब कारभार !
जे पोलिसांच्या लक्षात येत नाही, ते राष्ट्राभिमानी लक्षात आणून देतात, हे पोलिसांसाठी लज्जास्पद आहे ! असे असूनही उलट तक्रारदारालाच दमदाटी करणार्‍या पोलिसांचा जनतेला कधी आधार वाटेल का ?
     पणजी - फोंडा परिसरात अरबी राष्ट्राप्रमाणे दिसणारा एक झेंडा फडकवलेला असून यासंबंधी तपास करण्याची मागणी एका राष्ट्राभिमानी नागरिकाने १०० या क्रमांकावर केली असता तक्रार करणार्‍या नागरिकाला पोलिसांकडून दमदाटी झाल्याचा कटू अनुभव आला. सविस्तर वृत्त असे की, फोंडा परिसरात अरबी राष्ट्राप्रमाणे दिसणारा एक झेंडा फडवकला जात आहे. त्याची चौकशी करा, अशी मागणी एका राष्ट्राभिमानी नागरिकाने १०० या पोलिसांच्या क्रमांकावर केली. पोलिसांनी यासंबंधी तपास केला असता पोलिसांना तो झेंडा कुठल्याही अरबी राष्ट्राचा नसून तो पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा असल्याचे लक्षात आले. हे लक्षात आल्यावर पोलिसाने संबंधित तक्रारदाराला पुन्हा संपर्क करून तुमचा भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का ?, असे सांगून दमदाटी केली. पुन्हा एकदा अन्य पोलीस ठाण्यातूनही राष्ट्राभिमानी तक्रारदाराला दूरभाष आला आणि त्या वेळी त्याला अशाच प्रकारे दमदाटी करण्यात आली.

सिरीयाच्या विरोधात सौदी अरेबियाचे तीन लाख सुन्नी सैनिक सिद्ध !

तिसर्‍या महायुद्धाची शक्यता !
     रियाध - सीरिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील वाद विकोपाला गेला असून सौदीने सिरीयाविरोधात युद्ध छेडण्याची सिद्धता चालू केली आहे. यासाठी ३ लाख सुन्नी सैनिकांना सिद्ध केले आहे. तसेच २० सहस्र रणगाडे आणि २ सहस्र युद्ध विमाने सिद्ध ठेवण्यात आली आहेत. 
    सिरीयाचे राष्ट्रपती बशर अल असद हे शिया पंथीय असून तेथे सुन्नी शासक सत्तेवर असावा या उद्देशाने सौदी युद्धासाठी सिद्ध होत आहे. सध्या हे सैन्य युद्धाभ्यास करत आहे. सौदीच्या या सिद्धतेवर असद समर्थक रशियाने सौदीला चेतावणी दिली आहे की, त्याने सिरीयावर आक्रमण करण्याची चूक करू नये. असद यांनीही सौदीला अशाच प्रकरणी चेतावणी दिली आहे. 
   सौदीचे संरक्षणमंत्री आदिल अल झुबेर यांनी म्हटले की, जर अमेरिका या युद्धाचे नेतृत्व करील, तर सौदी अरेबियाचे सैनिक सिरीयात घुसण्यासाठी सिद्ध असतील. अनेक संरक्षण विषयक तज्ञांनी चेतावणी दिली आहे की, जर सौदीचे सैन्य सिरीयात घुसले, तर तिसरे महायद्धाला आरंभ होण्याची शक्यता आहे. कारण रशिया आणि अमेरिका हे या युद्धात एकमेकांसमोर उभे ठाकतील.

जालना येथे हिंदु मुलीला पळवून नेणार्‍या धर्मांधास अटक

फूस लावून हिंदु मुलींना लव्ह जिहादमध्ये अडकवणार्‍या धर्मांधांवर 
कठोर कारवाई केल्यास अशा घटना थांबतील !
    जालना - येथील एका प्रतिष्ठित हिंदु व्यावसायिकाच्या मुलीचे फूस लावून अपहरण केल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या जाकीर हुसेन महंमद इंद्रिस (वय४२वर्षे) या विवाहित धर्मांधाला विशेष कृती दलाने नुकतीच पुण्याहून अटक केली. त्यानंतर मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. 
१. एका हॉटेलमध्ये काम करणार्‍या जाकीरने ५ फेब्रुवारी या दिवशी शहरातील एका २२ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले होते.

देशात गोहत्याबंदी कायदा लागू करा !

तमिळनाडूच्या मठाधिपतींची मोदी शासनाकडे मागणी
     कुम्भकोणम् (तमिळनाडू) - संपूर्ण देशात गोहत्याबंदी कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी समस्त मठाधिपतींनी मोदी शासनाकडे केली. कुम्भकोणम् येथे साजरा होणार्‍या महामहम् उत्सवात सहभाग घेण्यासाठी राज्यातील सर्व मठाधिपती आले असता विश्‍व हिंदू परिषदेने त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी गोहत्याबंदी कायदा पारित करण्यासह अनेकही ठराव पारित करण्यात आले. या बैठकीस राज्यातील सर्व माथांचे प्रमुख उपस्थित होते. (केंद्रशासनाने हिंदु धर्माच्या धर्माचार्यांनी केलेली मागणी स्वीकारून त्वरित गोहत्याबंदी कायदा लागू करण्याची कारवाई करावी, अशी हिंदूची अपेक्षा आहे. - संपादक)

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त वैराग (सोलापूर) येथे आज हिंदु धर्मजागृती सभा !

बार्शीतील धर्मजागृती सभेतून प्रेरणा घेऊन केले सभेचे आयोजन !
       बार्शी (जिल्हा सोलापूर), १९ फेब्रुवारी (वार्ता.) - वैराग तालुका बार्शी येथील धर्माभिमानी हिंदूंनी बार्शी येथे मागील वर्षी झालेल्या आणि ७ फेब्रुवारी २०१६ या दिवशी भगवंत मैदानावर झालेल्या धर्मजागृती सभेतून प्रेरणा घेऊन २० फेब्रुवारी २०१६ या दिवशी सायंकाळी ५ वाजता येथील नानासाहेब सोपल मंगल कार्यालय, वाणी गल्ली येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. शिवजन्मोत्सव २०१६ या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या हिंदु धर्मजागृती सभेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि सनातन संस्थेच्या वतीने अधिवक्ता नीलेश सांगोलकर हे वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा यशस्वी होण्यासाठी श्री. राजेंद्र मलमे(सर) मित्र परिवार आणि जय हनुमान बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने धर्माभिमानी हिंदूंकडून मोठ्या प्रमाणात प्रसार-प्रचार करण्यात आला आहे.

खटला अन्यत्र वर्ग करण्याचा समीर गायकवाड यांचा अर्ज मागे

      मुंबई - कॉ. पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी आणि सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांनी खटला कोल्हापूर सत्र न्यायालयातून अन्य ठिकाणी वर्ग करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात केलेला अर्ज १८ फेब्रुवारीला मागे घेतला. उच्च न्यायालयानेही अर्ज मागे घेण्यास अनुमती दिली. श्री. समीर गायकवाड यांनी कोल्हापूरचे सत्र न्यायालय आणि कोल्हापूर बार असोसिएशन यांच्याविरुद्ध तक्रार करत हा खटला कोल्हापूर न्यायालयातून अन्य न्यायालयात वर्ग करण्यात यावी, अशी विनंती अर्जाद्वारे उच्च न्यायालयाला केली होती.

बारावी आणि दहावीच्या परीक्षा कालावधीत एस्.टी. गाड्या वेळेत आणि नियमित सोडा ! - दिवाकर रावते

      मुंबई - राज्यातील इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गाड्यांची सेवा वेळेत आणि नियमित पुरवावी, असा निर्देश देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याची तक्रार आल्यास संबंधित आगार प्रमुख आणि स्थानकप्रमुख यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक निर्गमित करण्यात आल्याचे सांगत रावते म्हणाले, परीक्षा कालावधीत गाड्यांच्या सर्व फेर्‍या विशेषत: शालेय विद्यार्थ्यांसाठी असणार्‍या फेर्‍या विलंबाने धावणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना, विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत.

चतुर महाराष्ट्र पोलीस आणि दाभोलकर-पानसरे हत्येचा तपास

श्री. भाऊ तोरसेकर
वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रे म्हणजे केवळ गोंगाट !
     गेले अनेक दिवस मित्र पुन्हा पुन्हा एक प्रश्‍न विचारत आहेत. मी वाहिन्यांवरील चर्चेत का दिसत नाही ? मला मुद्दाम तिथे बोलवत नाहीत काय ? पूर्वी मला कोणी बोलवत नसे, पण ब्लॉगच्या लोकप्रियतेमुळे मला अगत्याने अशा चर्चेची आमंत्रणे मिळू लागली; पण वर्षभर त्यात सहभागी झाल्यावर त्यातील निरर्थकता लक्षात आली. नुसता ओरडाआरडा किंवा गदारोळ या पलीकडे त्यातून काहीही साधले जात नाही. अधिक दोन-तीन तास वाया जातात. आपल्या बोलण्यातून वा चर्चेतून प्रेक्षकाच्या ज्ञानात कुठली भर पडत नाही, हे लक्षात आले. अधिक काही प्रसंगी तर अशा चर्चेत सहभागी होऊन आपल्याही बुद्धीला गंज चढण्याची भीती वाटू लागल्याने, त्यातून अंग काढून घेण्याचा निर्णय मीच घेतला.

फसव्या पदव्या !

    पुणे शहरातील सावित्रीबाई फुले विद्यापिठाने पीएच्.डी. म्हणजे विद्यावाचस्पती या पदवीचे वाटप करतांना विद्यापीठ अनुदान आयोगाने घालून दिलेले नियम धाब्यावर बसवून या महत्त्वपूर्ण पदवीचे खिरापतीप्रमाणे वाटप केल्याचे प्रकरण नुकतेच उजेडात आले ! संशोधनाचा दर्जा सर्वोत्तम रहावा, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने वर्ष २००९ मध्ये एम्.फिल. आणि पीएच्.डी. करण्यासाठी नवी नियमावली लागू केली; मात्र त्यानंतर म्हणजे वर्ष २००९ पासून आतापर्यंत विद्यापिठाने दहा विद्याशाखांमधील ३ सहस्र ७० विद्यार्थ्यांना पीएच्.डी. पदवी दिली; मात्र यांतील केवळ २९० पदव्याच आयोगाच्या निकषानुसार असल्याचे समोर आले आहे. विद्येचे माहेरघर म्हणवणार्‍या शहरातील विद्यापिठाची ही स्थिती असेल, तर अन्य ठिकाणी या पदवीदानाच्या संदर्भात काय आनंदीआनंद असेल, याचा विचारच न केलेला बरा !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

रामनाथी आश्रमात पार पडलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय शिबिरातून धर्माभिमान्यांच्या आध्यात्मिक वाटचालीला मिळालेली दिशा !

      हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि समितीशी संलग्न असलेले धर्माभिमानी यांच्यासाठी जून २०१५ मध्ये रामनाथी आश्रमामध्ये राष्ट्रीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला उपस्थित राहिलेल्या धर्माभिमान्यांना स्वतःत जाणवलेले पालट त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊया.
१. मनोबल वाढल्याचे जाणवणे
        रामनाथी आश्रमात झालेल्या शिबिरानंतर स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया कशी राबवायची, ते मी शिकून घेतले. त्यानंतर आता माझ्या विविध अडचणी दूर होऊन मनोबल वाढल्याचे जाणवत आहे. - श्री. अमित जोशी, पुणे

धर्माभिमान्यांच्या सत्संगात सहभागी होणार्‍या धर्मप्रेमींचे वैशिष्ट्य !

श्री. प्रथमेश पीरापूर
१. काळानुसार आवश्यक असलेल्या 
राष्ट्र-धर्म कार्यात झोकून देऊन सेवा करण्याची 
तळमळ असलेले विजयपूर येथील श्री. प्रथमेश !
        विजयपूर (कर्नाटक) येथील श्री. प्रथमेश पीरापूर दीड वर्षापासून समितीच्या संपर्कात आहेत. रामनाथी आश्रमात झालेल्या शिबिरालाही ते उपस्थित राहिले होते. आश्रमातील चैतन्यदायी वातावरणामुळे त्यांना आश्रमातच रहावे, असे वाटत होते. तेव्हा त्यांनी समाजात जाऊन सर्वांना राष्ट्र-धर्म कार्यासाठी कृतीशील करणे, हे काळानुसार आवश्यक आहे आणि ती आपली साधना आहे, असा विचार करून ते विजयपूरला परतले.

जिज्ञासू वृत्तीचा आणि परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अन् ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. पार्थ सुनील घनवट (वय ८ वर्षे) !

१. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
कु. पार्थ घनवट
१ अ. जिज्ञासू वृत्ती : पार्थ एखाद्या गोष्टीविषयी खोलवर विचारत असतो, उदा. स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरण कसे आले ? त्यांनी भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी काय कार्य केले ? इंग्रज आपल्यावर राज्य का करत होते ? आपण धर्मजागृती सभा का घेतो ? भारताचे राष्ट्रपती, असे का म्हणतात ? त्यांचे काम काय आहे ?
१ आ. चांगली स्मरणशक्ती : पार्थची एकाग्रता पुष्कळ चांगली आहे. मी त्याला अनेक सूत्रांची आठवण करून द्यायला सांगते. त्या वेळी तो लगेच त्या-त्या वेळी ती सूत्रे आठवणीने सांगतो, उदा. गाडीचे पी.यू.सी. काढायचा दिनांक. गाडी रिझर्व्हला आली की, तो सांगतो, आई पेट्रोल भर, हवा तपासून घे. प.पू. डॉक्टरांनी सांगितले आहे की, गाडी हळू चालवा, असेही तो सांगतो.

सत्संगातील चैतन्यामुळे स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंचे यांचे निरीक्षण होऊन त्यांच्या निर्मूलनाची प्रकिया राबवू लागल्याने धर्माभिमान्यांना जाणवू लागलेला अंतरंगातील पालट !

    बरेच धर्माभिमानी साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडे विचारणा करत आहेत. त्यामुळे धर्माभिमान्यांना साधना, तसेच धर्मकार्य यांविषयीचे पुढील मार्गदर्शन करण्यासाठी समितीच्या वतीने साप्ताहिक सत्संग घेतला जातो. सत्संगातील सर्व विषय धर्माभिमानी जिज्ञासूपणे जाणून घेतात. स्वतःकडून झालेल्या चुकांचे अंतर्मुखतेने चिंतन करून त्या टाळण्यासाठी प्रयत्न करतात. धर्मकार्य परिपूर्ण होण्यासाठी काय करायला हवे ? या ध्यासाने ते सेवेतील नवीन बारकावे अभ्यासतात. सत्संगात आल्यामुळे अंतरंगात होत असलेल्या पालटांविषयी त्यांनी मांडलेले विचार पुढे देत आहे.

पू. जयराम जोशी (आबा) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. स्वावलंबी
पू. जयराम जोशी
   या वयातही पू. आबा त्यांची सर्व कामे स्वतःच करतात.
२. सतत सेवारत असणे
      पू. आबांना कधी बरे नसले, तरीही ते सेवा करतात. त्याविषयी त्यांना थोडासुद्धा अहं नसतो.
३. गुरुधनाचा अपव्यय होऊ नये, यासाठी प्रत्येक क्षणी सतर्क असणे
३ अ. प्रत्येक सेवा व्यवस्थित आणि अल्प व्ययात होण्याकडे लक्ष देणे : आश्रमातील धान्याला कीड लागू नये; म्हणून धान्यात बोरिक पावडरच्या पुड्या घालायच्या होत्या. या पुड्या पुष्कळ महाग होत्या. हे समजल्यावर एकदम डबा आणल्यामुळे पावडर स्वस्त पडते; म्हणून पू. आबांनी बोरिक पावडरचा डबा आणायला सांगितला आणि आपण त्याच्या पुड्या करूया, असे सांगितले. त्यांच्याकडे या सेवेचे दायित्व नव्हते, तरीही प्रत्येक सेवा व्यवस्थित आणि अल्प व्ययात होण्याकडे पू. आबा लक्ष देतात.

नामजप करण्याच्या प्रक्रियेत एखाद्या साधकाकडून अन्य देवतेचा नामजप आपोआप चालू होत असेल, तर त्याने तोच नामजप चालू ठेवावा !

साधकांना सूचना
     दैनिक सनातन प्रभातमधून सर्वांसाठी नेहमी करायचा किंवा काळानुसार आवश्यक नामजप प्रसिद्ध केला जातो; मात्र कधी कधी एखाद्या साधकाकडून तो नामजप न होता, अन्य कोणत्यातरी देवतेचा नामजप आपोआप होत असतो. अनेकातून एकात जाणे या नियमाप्रमाणे असा आपोआप होणारा नामजप त्या साधकासाठी योग्य आणि लाभदायक असतो. त्यामुळे जर कुणा साधकाचा अशा प्रकारे आपोआप नामजप होत असेल, तर तोच त्याने चालू ठेवावा. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.२.२०१६)

सर्व साधकांना सर्वतोपरी साहाय्य करणारे पू. जयराम जोशीआजोबा !

१. जवळीक साधणे आणि आधार देणे
        मी मिरज आश्रमात स्वागत कक्षात सेवा करत असतांना पू. आबाही स्वागतकक्षात सेवा करायचे. पू. आबा मला सोडण्यासाठी यायचे. त्या निमित्ताने माझी त्यांच्याशी पुष्कळ जवळीक झाली. मी त्यांना मला होत असलेला त्रास, आलेल्या अनुभूती आदी सर्वच सांगायचे. पू. आबांनी माझा त्रास जवळून पाहिला. त्यामुळे ते माझी पुष्कळ काळजी घ्यायचे. मलाही त्यांचा आधार वाटायचा. ते मला तुझा त्रास न्यून व्हावा; म्हणून मी देवाला प्रार्थना करतो, असे सांगून आधार द्यायचे. प.पू. डॉक्टरच त्यांच्या माध्यमातून माझी काळजी घेत आहेत, असे मला वाटायचे. त्यामुळे मला लढायला बळ मिळायचे.

साधकांनो, नियमितपणे प्रगतीची सूचना देऊन स्वतःविषयीची नकारात्मकता दूर लोटा आणि साधनेतील निखळ आनंद अनुभवा !

     काही साधकांमध्ये नकारात्मकता, निराशा, न्यूनगंड, स्वतःला न्यून लेखणे आदी अहंचे पैलू तीव्र स्वरूपात असतात. त्यामुळे ते योग्य प्रकारे साधनेचे प्रयत्न करत असूनही तिच्यातील आनंद घेऊ शकत नाहीत. अशा साधकांनी प्रामुख्याने पुढील प्रयत्न करावा.
१. प्रगती होत असल्यासंदर्भात सूचना दिल्याने स्वतःविषयीची 
सकारात्मकता आणि आत्मविश्‍वास वाढणे 
     साधकांनी नियमितपणे प्रगती होत असल्यासंदर्भात सूचना दिल्यास त्यांच्यातील सकारात्मकता आणि आत्मविश्‍वास वाढतो अन् पुढील प्रयत्न करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळते. निराशेचे प्रमाण अधिक असल्यास प्रगती होत असल्यासंदर्भात सूचना दिवसातून ५ वेळा, तर प्रमाण अल्प असल्यास केवळ एकदाच द्यावी. प्रत्येक वेळी केवळ एकदाच सूचना म्हणणे अपेक्षित आहे.
२. प्रगतीच्या सूचनेत समाविष्ट करावयाची सूत्रे 
खालीलपैकी जी जी सूत्रे स्वतःला लागू पडतात, त्यांचा प्रगतीच्या सूचनेत समावेश असावा.
अ. आतापर्यंत जे स्वभावदोष आणि अहं यांच्या संदर्भात प्रयत्न केले नाहीत,

श्रीकृष्णाने मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगणे

       आमच्या खोलीत श्रीकृष्णाचे मोठे चित्र आहे. ३.१०.२०१५ या दिवशी पहाटे ५ वाजता मी ताप असल्याने पहुडलो होतो. तेव्हा मला श्रीकृष्णाच्या चित्रामधून तो चालत माझ्यासमोर आल्याचे जाणवले. श्रीकृष्ण पिवळ्या रंगाचे पितांबर नेसला होता आणि त्याला चित्रात आहेत तशाच घड्याही होत्या. श्रीकृष्णाच्या चरणांजवळ अर्धगोलाकारात पांढरी आणि जांभळी फुले होती. पिवळा लख्ख प्रकाश पडला होता. तो मला म्हणाला मी तुझ्यासाठी दिवस-रात्र जागा आहे. तू काळजी करू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व व्यवस्थित होईल. त्या वेळी माझी भावजागृती झाली.
- श्री. लीलाधर भानुदास वाघुळदे, जळगाव. (१५.१०.२०१५)

पू. जयराम जोशी (आबा) संत होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर सुचलेल्या कविता आणि आलेल्या अनुभूती !

पू. जोशीआजोबा संत होण्यापूर्वी
उत्साहाचे भांडार जोशीआजोबा !
मिरज आश्रमाचा भक्कम आधार ।
अखंड असेे इतरांचा विचार ।
गुरुसेवेची तळमळ फार ।
तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहाचे भांडार ॥ १ ॥
जागृत असते विवेकाची धार ।
घालवतात साधकांचे नकारात्मक विचार ।
समष्टीवर प्रीती असे अपार ॥ २ ॥

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - माघ शुक्ल पक्ष चतुर्दशी (२१.२.२०१६) रात्री १०.३४ वाजता
समाप्ती - माघ पौर्णिमा (२२.२.२०१६) रात्री ११.५० वाजता
दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.

नांद्रा, जळगाव येथील सौ. विमल चौधरी यांना नामजप करतांना सुचलेले विचार

१. प.पू. दास महाराज म्हणजे हनुमंत आणि त्यांची जपमाळ म्हणजे हनुमंताची शक्ती अन् सगळे साधक म्हणजे वानर.
२. हनुमंत आणि वानर यांनी मिळून सेतू सिद्ध केला, तसा प.पू. दास महाराज आणि सर्व साधक मिळून नामजपाचा सेतू थोड्या कालावधीत सिद्ध करतील.
३. हनुमंतरायांनी ज्याप्रमाणे लंका दहन केली, तशी प.पू. दास महाराज जपमाळेच्या शक्तीने वाईट शक्तीचे निर्मूलन करत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हिंदु राष्ट्र आणि ईश्‍वरी राज्याची पहाट होईल.
       पू. गुरुमाऊलीच्या चरणी कोटी कोटी शरणागत भावाने प्रार्थना !
- सौ. विमल चौधरी, नांद्रा, जळगाव (१५.१०.२०१५)

श्री. प्रथमेश पीरापूर यांचा पू. (सौ.) बिंदाताईंच्या प्रती असणारा अनन्यसाधारण कृतज्ञताभाव !

        विजयपूर (कर्नाटक) येथील श्री. प्रथमेश पीरापूर हे मागील पावणे २ वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात असून ते धर्माभिमान्यांच्या सत्संगात उपस्थित असतात. एका सत्संगात कृतज्ञताभावाच्या संदर्भात सांगतांना ते म्हणाले, दैनिकात येत असलेल्या विविध विषयांवरील चौकटी वाचून संत आपल्याला साधनेत किती साहाय्य करतात, या विचाराने कृतज्ञताभाव वाढतो. आई-वडिलांपेक्षाही जास्त कृतज्ञता संतांच्या संदर्भात वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी जिजामातेचे संस्कार होते. त्यांनीच महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरणा अन् शक्ती दिली. पू. बिंदाताई आमच्यासाठी जिजामातेप्रमाणेच आहेत. त्या आम्हाला मार्गदर्शन करून साधनेत पुढे घेऊन जातात.
- कु. सई कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०१६)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
खरे समजून घेणे 
सुनो सोचो समझो । सुनो समझो सोचो ।
भावार्थ : सुनो म्हणजे ऐका, सोचो म्हणजे विचार करा आणि समझो म्हणजे समजून घ्या. पहिल्या ओळीत सुनो सोचो समझो आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर मन आणि बुद्धी यांद्वारेे विचार करून काय ते समजून घ्या. यातील समजून घेणे मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून असल्याने ते मायेच्या संदर्भात आहे. अभिमन्यूला केवळ हीच ओळ ठाऊक होती, म्हणून तो चक्रव्यूहात अडकला. याउलट दुसर्‍या ओळीत सुनो समझो सोचो आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर जिवाने ती गोष्ट समजून जाणे, त्याची अनुभूती घेणे आणि नंतर त्याविषयी विचार करणे. हे ब्रह्माच्या संदर्भात आहे. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     म्हातारपणी मुले लक्ष देत नाहीत, असे म्हणणार्‍या वृद्धांनो, तुम्ही मुलांवर साधनेचे संस्कार केले नाहीत, याचे ते फळ आहे. याला मुलांसमवेत तुम्हीही उत्तरदायी आहात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

यशप्राप्ती
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
       सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय कशाचीही प्राप्ती होत नाही. यश हे नेहमी प्रयत्नांनाच चिकटून रहाते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

देशद्रोही तितुके...जेएन्यु !

संपादकीय
    नावात काय आहे, अशी म्हण प्रचलित आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या संदर्भात नेहरूंचे नाव घेतल्यावर जो जो देशविघातक आणि राष्ट्रभक्तांच्या थोर परंपरेला लज्जा आणणारा आलेख उभा रहातो, त्याचेच किंबहुना त्याच्या पुढचे रूप म्हणजे त्यांच्या नावाचे हे विद्यापीठ आहे. तथाकथित उच्चभ्रू साम्यवादी डावे याच विद्यापिठातून बाहेर पडलेले आहेत. जेएन्यू विद्यापिठाचा काळाकुट्ट इतिहास आणि वर्तमान आता देशासमोर येत आहे. देशात होतात अगदी त्याच स्वरूपाच्या विद्यार्थ्यांच्या निवडणुका होतात. येथे विद्यार्थी नेत्यांची (?) कडवी भाषणे होतात, शह-काटशह होतात; ओघानेच देशातील निवडणुकांमध्ये होणारे सर्व अपप्रकार येथे होत असणार, हे सांगण्यासाठी वेगळा पुरावा नको. केंद्रीयमंत्री सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी मागील वर्षी सप्टेंबरमध्येच या विद्यापिठात अमली पदार्थांचे सेवन चालते आणि विद्यापिठातील विद्यार्थ्यांचा नक्षली चळवळीशी संबंध आहे, असे सांगितले होते. सध्या सर्वत्र दिसत असलेल्या देशद्रोह्यांच्या चलचित्रीकरणात काही मुसलमान मुली नाच करतांना सर्वांना दिसत आहेत. भारत तोडणार्‍या या फुटीरतावाद्यांमध्ये उच्चशिक्षित मुसलमान मुलींचा कसा मोठा सहभाग आहे, हेही यातून पुढे आले आहे. विद्यापिठात गेल्या वर्षी २५ मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या. या मुलींनी त्या विरोधात एकत्र येऊन घोषणा दिलेल्या नाहीत, हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn