Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या (दिनांकानुसार) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !


कोटी कोटी प्रणाम !


ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची आज जयंती

भाजपचे आमदार कैलाश चौधरी म्हणतात, राष्ट्रद्रोही राहुल गांधींना गोळ्या घाला !

     जयपूर (राजस्थान) - जेएन्यूतील (जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील) विद्यार्थ्यांचे समर्थन करणारे राहुल गांधी देशद्रोही आहेत, त्यांना फासावर लटकवा आणि गोळ्या घाला, असे वक्तव्य भाजपचे येथील आमदार कैलाश चौधरी यांनी केले आहे. राहुल गांधींनी क्षमा मागावी आणि काँग्रेस उपाध्यक्ष पदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणीही चौधरी यांनी केली आहे. चौधरी येथे एका शेतकरी मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले, काही लोकांनी महंमद अफझलच्या समर्थनार्थ पाकिस्तान झिंदाबाद आणि भारत तोडोच्या घोषणा देऊनही राहुल गांधी त्या विद्यार्थ्यांची बाजू घेऊन त्यांचे समर्थन करत असतील, तर हा देशद्रोह आहे. मी देशभक्त आहे आणि जर कुणी आपल्या देशावर बोट उचलत असेल, तर मी ते सहन करणार नाही. कैलाश चौधरी यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
राष्ट्रद्रोह आणि त्यास समर्थन देणे, हा आध्यात्मिकदृष्ट्या अपराधच ! 
- योगऋषी रामदेवबाबा 
     राष्ट्रद्रोह्यांशी केलेली मैत्री ही देखील गद्दारीच असते, अशा शब्दांत योगऋषी रामदेवबाबा यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

कन्हैया कुमारच्या समर्थकांकडून बिहारमध्ये भाजपच्या कार्यालयावर आक्रमण

जेएन्यूमध्ये देशद्रोही घोषणा दिल्याचे प्रकरण !
भाजपच्या कार्यकर्त्यांसह काही पत्रकार घायाळ
     पाटलीपुत्र (पाटणा) - जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील (जेएन्यूमधील) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारच्या अटकेच्या विरोधात ए.आय.एस्.एफ्. संघटनेच्या विद्यार्थ्यांनी लाठ्याकाठ्यांसह येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर आक्रमण केले. या आक्रमणात भाजपच्या कार्यकर्त्यांसह काही पत्रकारही घायाळ झाले. जिहादी आतंकवादी अफझलच्या समर्थनार्थ देशद्रोही घोषणाबाजी करणार्‍या कन्हैयाच्या समर्थनार्थ पाटण्यातील ए.आय.एस्.एफ्.च्या विद्यार्थ्यांनी येथील भाजपच्या कार्यालयाजवळ गोंधळ घातला. या वेळी विद्यार्थ्यांनी दगडफेक केली, तसेच लाठ्या, दगड आणि काचेच्या बाटल्या यांसह भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण केले. या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे कार्यकर्तेही लाठीकाठी घेऊन कार्यालयाच्या बाहेर पडले.

देहली पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात जेएन्यूच्या देशद्रोही कृत्यांचा वाचण्यात आला पाढा !

अहवालावर काँग्रेस आणि डाव्या पक्षाचे नेते आता गप्प का ? 
गेल्या काही वर्षांपासून देशाच्या राजधानीत अशी कृत्ये कशी काय होत आहेत ?
     देहली - जेएन्यू प्रकरणावर देहली पोलिसांनी सादर केलेल्या अहवालातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. यामुळे जेएन्यूमध्ये राष्ट्रद्रोही हालचाली होत आहेत, याला आता पोलिसांनीही दुजोरा दिला आहे.
१. गेल्या दोन वर्षांपासून देहली पोलिसांची विशेष शाखा जेएन्यूतील विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि विद्यापिठात वर्चस्व असणार्‍या व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती आणि यासंदर्भातील अहवाल आधीही शासनाकडे सुपुर्द केला असल्याची माहिती, या अहवालाद्वारे उघड झाली आहे. 
२. पोलिसांनी विद्यापीठ प्रशासनाकडे विद्यापिठात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणीही केली होती.
३. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात विद्यापिठाचे उपकुलगुरु एस्.के. सोपोरी यांनाही कल्पना होती.
४. ऑक्टोबर २०१५ मध्ये विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आणि उपकुलगुरु यांची या संदर्भात बैठकही झाली असल्याची माहिती या अहवालात स्पष्ट करण्यात आली आहे

देशातील केंद्रीय विद्यापिठांमध्ये तिरंगा लावण्याचे आदेश !

     नवी देहली - केंद्रशासनाने देशातील सर्व केंद्रीय विद्यापिठांमध्ये कायमस्वरूपी राष्ट्र्रध्वज लावण्याचा आदेश जारी केला आहे. विशेष म्हणजे या आदेशाची अंमलबजावणी जेएनयूपासून करण्यात येणार आहे. झेंड्यासाठी २०७ फूट उंच खांब असावा, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

मालदा (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची हत्या

बंगालमधील अराजक
     मालदा - येथील तृणमूल काँग्रेसचे नेते साहिदुल इस्लाम (वय २८ वर्षे) यांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणी इस्लाम यांच्या कुटुंबियांनी ३ घंट्यांनंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. इस्लाम हे गायेशबारी प्रभागाचे नेते होते आणि त्यांना पुन्हा अध्यक्षपद हवे होते. यास तृणमूल काँग्रेसच्या दुसर्‍या नेत्याचा विरोध होता, अशीही माहिती इस्लाम यांच्या परिवाराने दिली.

देहलीत शाहरूख खान यांच्या विरोधात अभाविपच्या कार्यकर्त्यांची निदर्शने !

     नवी देहली - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी देहली विद्यापिठाच्या हंसराज महाविद्यालयाबाहेर शाहरूख खान यांच्या विरोधात निदर्शने केली. ते येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. १० हून अधिक विद्यार्थ्यांनी शाहरूख यांना परत पाठवण्याची मागणी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटवल्यावर ते निघून गेले.

धुळे येथील मुसलमानबहुल शाळेतील हिंदु विद्यार्थ्यांकडून कुराण पठण करवून घेतले जाते !

     हिंदूंनो, तुमच्या धर्मांतराचे षड्यंत्र जाणा ! मुसलमान एकीकडे हरियाणा आणि मध्यप्रदेश या राज्यांतील शाळांत गीता शिकवण्यास तीव्र विरोध करतात, तर दुसरीकडे मात्र मुसलमान शाळांत हिंदु विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर कुराणची शिकवण बिंबवतात, हे लक्षात घ्या !
     धुुळे - येथील यंग बॉईज एज्यूकेशनल अ‍ॅण्ड इंडस्ट्रीयल सर्कल्स इंग्लिश मिडियम इस्लामिक डे स्कूल शाळेत प्रतिदिन सकाळी १० मिनिटे सर्व मुस्लीम विद्यार्थ्यांसह हिंदु विद्यार्थ्यांकडूनही कुराणचे पठण करवून घेण्यात येत आहे. अनुराग भगवान पाटील आणि हर्शल पाटील अशी त्यांची नावे असून ती मुले तिसर्‍या इयत्तेतच शिकत आहेत. ही शाळा अनुदानित नसून ती विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क आणि समाजातील अर्पण निधी यांवर चालते. शाळा गावापासून दूर असल्याने त्या भागात रहाणार्‍या हिंदूंना जवळचा पर्याय म्हणून त्यांच्या पाल्यांना या शाळेतच प्रवेश घेणे सोयीचे जाते. या शाळेतील मासिक शिक्षण शुल्क २५० ते ३०० असल्याने ते परवडण्यासारखे आहे.

समीर गायकवाड यांना अंडासेलमधून बाहेर काढण्यास कळंबा कारागृहाची असमर्थता !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण 
     कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी आणि सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अंडासेलमधून बाहेर काढण्यास कळंबा कारागृह प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे. २ दिवसांपूर्वी न्यायालयाकडून या संदर्भात कारागृहाला पत्र आले होते. 
     सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याने त्यांना अंडासेलमधून बाहेर काढावे, अशी मागणी श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्याकडे केली हेती. त्यावर कारागृह अधीक्षकांकडे विचारणा करून निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार न्यायालयाचे पत्र २ दिवसांपूर्वी कारागृह प्रशासनाला मिळाले.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई श्री क्षेत्र शनिशिंगणापूरच्या ग्रामस्थांशी चर्चा करणार !

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश 
मिळण्यासाठी धर्मद्रोही तृप्ती देसाई यांची नवी क्लृप्ती !
     नगर - श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी भूमाता ब्रिगेडकडून २६ जानेवारी या दिवशी आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन अयशस्वी झाल्यानंतरही त्यांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळण्यासाठी त्यांचा हट्ट कायम ठेवला होता. या प्रश्‍नी जिल्हा प्रशासन आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनीही श्री शनैश्‍वर देवस्थान विश्‍वस्त, ग्रामस्थ आणि तृप्ती देसाई यांच्यासमवेत बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. तरीदेखील देसाई यांनी त्यांचा हेका कायम ठेवून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्यासाठी प्रयत्न केले होते. आता या प्रकरणी तृप्ती देसाई यांनी संवादाचा मार्ग निवडल्याची माहिती मिळाली आहे. संघटनेच्या पदाधिकारी लवकरच श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करणार असल्याच्या शक्यतेला तृप्ती देसाई यांनी दुजोरा दिला आहे. यासंबंधी अंतिम दिवस अद्याप निश्‍चित व्हायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

जेएन्यु प्रकरण : अभाविपच्या ३ पदाधिकार्‍यांचे त्यागपत्र

      नवी देहली - जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्युमध्ये) नुकतीच झालेली राष्ट्रद्रोही घोषणाबाजी आणि भाग्यनगर (हैद्राबाद) येथील रोहित वेमुलाप्रकरण यांसंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेतलेली भूमिका आणि तिचे विचार यांच्याशी आमचे विचार पूर्णत: विसंगत आहेत, असे सांगून या विद्यार्थी संघटनेच्या ३ पदाधिकार्‍यांनी तडकाफडकी त्यागपत्र दिले आहे. यामध्ये विद्यापिठातील एस्एस्एस् एबीव्हीपी युनिटचे अध्यक्ष राहुल यादव, सहसचिव प्रदीप नरवाल आणि सचिव अंकित हंस यांचा समावेश आहे. (ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी काँग्रेसच्या फोडा आणि राज्य करा या जुन्या नीतीचे हे तिघे जण बळी असल्याचे कुणाला वाटल्यास त्यात नवल ते काय ? - संपादक)

आज मुंब्याजवळील डायघर गावात ग्रामस्थांच्या वतीने ऐतिहासिक हिंदु धर्मजागृती सभा !

ग्रामस्थांच्या वतीने लावलेला सभेची माहिती देणारा फलक
       ठाणे, १८ फेब्रुवारी (वार्ता) - नुकताच मुंब्रा येथे इसिसचा भारतातील प्रमुख मुदब्बीर मुश्ताक शेख पकडला गेला. या आधी मुंब्रा येथे सिमी, हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी पकडले होते. संसदेवर आक्रमण करण्याच्या गुन्ह्यांतर्गत अबू हमजा याला मुंब्रा येथूनच अटक झाली होती. मुंब्रा येथील वाढती वीजचोरी, अनधिकृत बांधकामे, हिंदु महिला आणि अल्पवयीन मुली यांवरील अत्याचार पहाता आज हिंदूंमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदूंमध्ये सुरक्षितता, जागृती आणि संघटन निर्माण करण्यासाठी मुंब्याजवळील डायघर भागात डायघर ग्रामस्थांच्या वतीने ऐतिहासिक हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुसलमानबहुल मुंब्रा गावाजवळ पहिल्यांदाच अशा प्रकारची सभा होत असल्याने या सभेची चर्चा गावागावांतून होत आहे. तसेच सभेच्या कार्यात संपूर्ण डायघर गाव आणि आजूबाजूच्या गावातील हिंदुत्ववादी पुढे आले आहेत. यामध्ये सभेसाठी निधी गोळा करणे, फ्लेक्स लावणे, भित्तीपत्रक लावणे, गावागावांत बैठका घेणे, रिक्षातून घोषणा करणे अशा प्रकारची जय्यत सिद्धता गावातील धर्माभिमानी हिंदूंनी केली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेविषयी रेल्वे प्रशासन गंभीर नाही !

मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला फटकारले
रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दायित्वाची
जाणीव न्यायालयाला करून द्यावी लागणे, हे दुर्दैव !
     मुंबई - प्रवासी देवाकडे हात जोडून रेल्वे प्रवास करतात. ८० टक्के प्रवाशांना दुसरा पर्यायच नसल्याने त्यांनी रेल्वे प्रवासाचा मार्ग निवडला आहे; मात्र रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेकडे कानाडोळा करत, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला फटकारले आहे.
     वर्ष २००६ मध्ये रेल्वेमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्यावर दुसर्‍याच दिवशी प्रवाशांनी रेल्वे प्रवास केला; कारण त्यांच्याकडे पर्याय नव्हता. वेळेवर उपचार न मिळाल्याने प्रतिदिन १० रेल्वे प्रवाशांचा मृत्यू होतो. तरीही प्रवाशांच्या सुरक्षेविषयी रेल्वे गंभीर नाही, असे मतही न्यायमूर्ती व्ही.एम्. कानडे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपिठाने व्यक्त केले. रेल्वे अपघातातील जखमींना तात्काळ उपचार मिळावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.

लष्कराच्या दूध उत्पादक केंद्र (डेअरी फार्म) घोटाळाप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून पुण्यात धाड

अपहार करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
     पिंपरी (पुणे) - लष्कराच्या पिंपरी येथील दूध उत्पादक केंद्रामध्ये झालेल्या २ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पुण्यासह अन्य ३ शहरांतील लष्करी अधिकार्‍यांच्या घरांवर १३ फेब्रुवारी या दिवशी धाड टाकली. कर्नल पी.के. बहुगुणा, लेफ्टनंट कर्नल जे.के. जोसेफ आणि लेफ्टनंट कर्नल अजितसिंग भदोरिया यांच्यावर अपव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. हे तीनही अधिकारी सध्या अन्य ठिकाणी नियुक्तीस आहेत.
     पिंपरी येथील दूध उत्पादक केंद्रामधून लष्कराच्या सैनिकांसाठी दूध उत्पादन घेतले जाते. जानेवारी २००९ ते डिसेंबर २०१२ या कालावधीत उपरोक्त ३ अधिकारी हे केंद्रामध्ये नियुक्तीस होते. त्यांनी खाजगी संस्थांशी संगनमत करून अपव्यवहार केला होता, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

(म्हणे) शासनाकडे सामान्यांच्या हिताचा विचार नाही !

हाती सत्ता होती, त्या वेळी जनतेच्या हितासाठी 
काही न करणारे शरद पवार यांचे फुकाचे बोल !
       मिरज, १८ फेब्रुवारी (वार्ता.) - शासनाकडे सामान्यांच्या हिताचा विचार होतांना दिसत नाही. या स्थितीत तरुण पिढीच देशाचे आशास्थान बनेल. सध्या ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे चांगले विचार आहेत, असे वाटत नाही. चुकीच्या मार्गावर जाणार्‍या तरुणांना रोखायचे असेल, तर त्यासाठी शिक्षणच उपयोगी ठरेल. देशातील परिस्थिती वेगाने पालटत आहे. देशातील तरुण चुकीच्या मार्गावर जात असतील, तर ते चुकीच्या मार्गावर का जात आहेत, ते तपासले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि खासदार शरद पवार यांनी केले. ते येथील अरबी-उर्दू मराठी शिक्षण संस्थेच्या प्रयोगशाळेच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी आमदार जयंत पाटील, हसन मुश्रीफ, विलासराव शिंदे, तसेच अन्य उपस्थित होते. (या देशात जे तरुण चुकीच्या मार्गावर जात आहेत, त्यात विशिष्ट समाजातीलच युवक का आहेत, याचेही उत्तर शरद पवार यांनी द्यावे ! अल्पसंख्यांकांच्या नावाने राजकारण करत असल्यानेच जनतेने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास सत्तेतून पायउतार केले आहे, हे पवार यांनी जाणावे ! - संपादक)

हेरगिरीच्या आरोपाखाली भारताच्या हमीदला पाकिस्तानात अटक

कुठे प्रेयसीला भेटायला गेलेल्या भारतीय युवकाला कारागृहात डांबणारा पाकिस्तान, 
तर कुठे शत्रूदेश पाकच्या कलाकारांचा आदर करणारा भारत ! 
प्रेयसीसाठी भेटायला गेलेला हमीद ३ वर्षांपासून पाकच्या कारागृहात
     इस्लामाबाद - पाकिस्तानमधील प्रेयसीसाठी भेटायला गेलेल्या हमीद नेहाल अन्सारी या भारतीय अभियंत्यावर पाक सैन्याच्या न्यायालयाने हेरगिरीचा गुन्हा दाखल केला असून त्याला ३ वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. 
      सध्या हमीदचे कुटुंबीय त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. फेसबूक या सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून हमीदचा पाकिस्तानमधील युवतीशी परिचय झाला. तो तिला भेटण्यासाठी नोव्हेंबर २०१२ मध्ये अफगणिस्तानमधून पाकिस्तानमध्ये गेला. तेथे त्याने एका हॉटेलमध्ये वास्तव्य केले. 
    त्याच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवून पोलिसांनी त्याला पाक सैन्याच्या कह्यात दिले होते. गेल्या ३ वर्षांपासून तो पेशावरच्या कारागृहात खितपत पडला आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

साधक कारागृहातून सुटून आल्यावर त्यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेले भव्य स्वागत !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील 
जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला ! 
मडगाव स्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या साधकांचे जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।
आणि हर हर महादेवच्या जयघोषात स्वागत करतांना आश्रमातील साधक
 
       वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आज आपण साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर त्यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या स्वागताविषयी पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

आवश्यकता आहे तिथे चारा छावण्या चालू होणार ! - कृषीमंत्री एकनाथ खडसे

     मुंबई - जिथे चार्‍याची आवश्यकता आहे, तिथे चारा छावण्या चालू करण्यात येतील, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत, अशी माहिती कृषीमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी दिली आहे. एबीपी माझाच्या माझा विशेष या कार्यक्रमात ते बोलत होते. १५ फेब्रुवारी या दिवशी लातूर, बीड आणि धाराशीव येथील चारा छावण्या बंद करण्याचे आदेश महसूल खात्याने दिले होते. सध्या पुढचे तीन महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे, त्यामुळे चारा छावण्यांची आवश्यकता नसल्याचे खडसेंनी म्हटले होते. 
      मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये योग्य त्या प्रमाणात चारा उपलब्ध असल्याचा दावा करत शासनाने चारा छावण्या बंद केल्या होत्या. त्यानंतर आता एकनाथ खडसेंनी पुन्हा चारा छावण्या चालू करणार असल्याचे घोषित केले आहे.

गोरेगाव, मुंबई येथे बजरंग दलाकडून नेहरू विद्यापिठातील देशद्रोही घोषणाबाजीच्या विरोधात आंदोलन

आंदोलनात सहभागी कार्यकर्ते 
     मुंबई - नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात देशद्रोह्यांनी दिलेल्या घोषणांच्या विरोधात ओशिवरा येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोरेगाव स्थानकाच्या समोर १६ फेब्रुवारी या दिवशी १ घंटा आंदोलन केले. यात अनेक लोक सहभागी झाले होते. या वेळी हिंदु का जो खुन न खोले, खून नहीं वो पानी है, जो देश के काम न आए वो बेकार जवानी हैं । अशी घोषणा दिली जात होती. 

गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करणे, हीच छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना ! - राज ठाकरे

     पुणे - अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांचे उंच स्मारक बांधण्याचे प्रयत्न चालू आहेत. असे करण्यापेक्षा त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी बांधलेल्या गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करणे, हीच खर्‍या अर्थी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना ठरेल. आजही आपण ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तू पाहून समाधान मानतो; मात्र इतिहासाचे संवर्धन करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. 
     सिंहगड इन्स्टिट्यूटच्या काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित दृश्य या प्रदर्शन आणि कार्यशाळेचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. देशद्रोह्यांचे समर्थन करणार्‍या राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा नोंद करा ! - भाजयुमोची संतप्त निदर्शने

राजवाडा चौक येथे निदर्शने करतांना भाजप युवा मोर्च्याचे कार्यकर्ते !
      सांगली, १८ फेब्रुवारी (वार्ता.) - देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे काही देशद्रोही विद्यार्थी संघटनांनी संसदेवरील आक्रमणातील प्रमुख आरोपी अफझल याच्या फाशीच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात पाकिस्तान जिंदाबाद, तसेच अन्य देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. यात आतंकवादी आणि नक्षलवादी संघटना सहभागी आहेत, असे गृहमंत्रालयाने घोषित केले आहे. अशा देशद्रोही कृत्यास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि आपचे अरविंद केजरीवाल यांनी समर्थन घोषित केले आहे. त्यामुळे देशद्रोह्यांचे समर्थन करणारे राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा नोंद करा, अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी राजवाडा चौक येथे १८ फेब्रुवारी या दिवशी संतप्त निदर्शने केली. निदर्शनानंतर मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

देशद्रोह्यांचे समर्थन कसे काय होऊ शकते ? - संस्कार भारती

      मुंबई - देशद्रोह्यांचे समर्थन कसे काय होऊ शकते ? भारत हा एकमेव देश असा असेल, जिथे देशद्रोह्यांचे नेहमी समर्थन होत असते. देशद्रोह हा केवळ गुन्हा नसून ते एक महापाप आहे. नेहरू विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी उद्या जर विद्यार्थ्यांनी महाभयानक कृत्य केले, तर त्याचे दायित्व त्यांची बाजू घेणारे राहुल गांधी घेतील का, असा प्रश्‍न संस्कार भारतीच्या मुंबई विभागाचे विद्यालयीन प्रमुख जयेश मेस्त्री यांनी केला आहे.
     मेस्त्री म्हणाले की, वर्ष २०१० मध्ये छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांच्या आक्रमणामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे ७५ जवान मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेवर विद्यापिठातील नक्षलवादी समर्थक विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव व्यक्त केला. देशद्रोही अफझलचे समर्थन करणारे विद्यार्थी देशद्रोहीच आहेत. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर बुद्धीने अतिरेकी असलेले हे विद्यार्थी उद्या इसिससारख्या आतंकवादी संघटनेचा भाग होऊ शकतात.

कारगील युद्ध म्हणजे भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे होते !

१६ वर्षांनंतर नवाज शरीफ यांची स्वीकृती !
     इस्लामाबाद - भारत-पाकिस्तान एकच आहे, फक्त मध्ये एक सीमा आहे. आपण एकाच भूमीवरील सदस्य आहोत. वाजपेयी साहेबांनीसुद्धा हे मान्य केले आहे. कारगील युद्ध करून पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. वाजपेयी साहेबांच्या जागेवर मी असतो, तरीसुद्धा हेच बोललो असतो. खंजीर कोणी खुपसला हे सर्वांनाच माहीत आहे; परंतु नाव कोणाचे घेऊ, अशी स्वीकृती पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली. (माजी सैन्यदल प्रमुख परवेझ मुशर्रफ यांनीच कारगिल युद्ध घडवले, हे जगजाहीर आहे; मात्र शरीफ त्यांचे नावही घेण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत. यावरून ते भारताच्या विरोधात होणारे प्रत्येक आक्रमण रोखू शकत नाहीत, हे लक्षात येते. अशा नवाज शरीफ यांच्याशी केंद्रशासन मैत्रीचे संबंध निर्माण करत आहेत. वाजपेयी यांनीही हाच प्रयत्न केला आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. आताच्या शासनाच्या संदर्भातही तेच होत आहे, हे पठाणकोटच्या आक्रमणातून दिसून आले. तरीही मैत्री करण्याचा मूर्खपणा केला जात आहे, याचेच जनतेला आश्‍चर्य वाटत आहे. - संपादक)

पोलीस ठाण्यात तक्रार देणार्‍या महिला प्राध्यापकाला पोलीस उपअधीक्षकांकडून मारहाण

महिलेवर हात उगारणार्‍या अशा पोलिसांना निलंबितच करायला हवे ! 
     संभाजीनगर - येथील प्रा. सुलभा बब्रुवान सोळंके यांच्यावर गावगुंडांनी केलेले आक्रमण आणि अतिप्रसंग यांच्या संदर्भात तक्रार देण्यासाठी गेल्यावर त्यांच्या समवेत त्यांचे चुलते केशव जनार्दन सोळंके यांना पोलीस उपअधीक्षक नीलेश मोरे यांनी मारहाण केली. तसेच त्यांची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी आरोपींना विरुद्ध तक्रार देण्यास भाग पाडले. या प्रकरणी प्रा. सुलभा सोळंके यांनी थेट पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडेच दाद मागितली आहे. (अशा पोलिसांवर पोलीस प्रशासन कोणती कठोर कारवाई करणार आहे ? - संपादक)

आगामी काळात राज्यात परीक्षेसाठी खुले पुस्तक (ओपन बुक) पद्धतीचा वापर चालू करणार - विनोद तावडे

अशा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची घोकंपट्टी बंद होईल; पण विद्यार्थी 
चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्राभिमानी होतील का ? तशा प्रकारचे 
विद्यार्थी सिद्ध होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, ही अपेक्षा ! 
     नगर - शिक्षणमंत्री पदाच्या माध्यमातून राज्यात शैक्षणिक क्षेत्रात परिणामकारक छोटे पालट करण्यास प्राधान्य दिले आहे. आगामी काळात पाठांतर पद्धती बंद करून परीक्षेसाठी खुले पुस्तक (ओपन बुक) पद्धतीचा वापर चालू करणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. येथील विळद घाट परिसरातील विखे पाटील फाउंडेशनच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन १६ फेब्रुवारी या दिवशी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
    ते पुढे म्हणाले की, घोकंपट्टी, पाठांतर पद्धती आता बंद झाली पाहिजे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्ञान दिले जाते कि माहिती हेच समजत नाही.
     धुळे - येथील माधवपुर्‍यात धर्मांध लमान खान निसारखान पठाण (वय २५ वर्षे) याने अश्‍लील हावभाव करत १४ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने आरडाओरड केल्याने तिच्या कुटुंबियांनी त्याला पोलिसांच्या कह्यात दिले. या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. धर्मांध सलमान सकाळी ५.३० वाजता त्या मुलीच्या घरात शिरून ती झोपलेली असतांना विनयभंग करण्याच्या प्रयत्नात होता.

(म्हणे) खर्‍या सूत्रधारांवर कारवाई करण्याची शासनाची इच्छाशक्ती आहे का ?

स्वत:च्या शासनाच्या काळात झालेल्या डॉ. दाभोलकर यांच्या 
हत्येप्रकरणी गुन्हेगारांना पकडू न शकणार्‍या अजित पवार यांचे फुकाचे बोल !
       कागल (जिल्हा कोल्हापूर), १८ फेब्रुवारी (वार्ता.) - डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येच्या खर्‍या सूत्रधारावर कारवाई होते कि नाही, याविषयी साशंकता असून शासनाची खरोखरच इच्छाशक्ती आहे काय, याविषयी धागेदोरे मिळायला हवे. या तिघांच्या हत्येविषयी केवळ शासनाकडून अन्वेषण चालू असल्याचे सांगितले जात आहे; मात्र अन्वेषणाविषयी साशंकता आहे. काही जणांना पकडले; म्हणून सांगितले, तर त्यांच्यावर कारवाई केली कि नाही, या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे, असे फुकाचे बोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे घेतलेल्या पत्रकार बैठकीत काढले.

१० वीच्या हिंदी भाषेच्या उत्तरपत्रिका पडताळण्यावर बहिष्कार !

राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचा निर्णय 
      पुणे - हिंदी राष्ट्रभाषा असतांनाही महाराष्ट्रात मात्र शालेय अभ्यासक्रमातून हिंदी भाषा बंद करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. भाषेला दिला जाणारा दुजाभाव आणि अन्याय लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाने १० वीच्या हिंदी भाषेच्या उत्तरपत्रिका पडताळण्यावर बहिष्कार घातला आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. (अशा प्रकारचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांची हानी करू पहाणारे शिक्षक महामंडळ ! - संपादक)

(म्हणे) आतंकवादी संघटनांच्या प्रभावाखाली तरुण येऊ नयेत; म्हणून समुपदेशनाची कारवाई !

पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा भाबडा आशावाद 
      संभाजीनगर, १८ फेब्रुवारी - जगातील प्रत्येक देशाला इसिसचा धोका असून भारतही त्याला अपवाद नाही. अगदी मुंब्रा (ठाणे) आणि संभाजीनगर येथेही संशयित तरुणांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. आतंकवादी संघटनांच्या प्रभावाखाली तरुण येऊ नयेत; म्हणून पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर समुपदेशनाची कारवाई करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालये, मदरसा अशा ठिकाणी पोलीस अधिकारी चर्चा करून तरुणांना अशा प्रवृत्तींपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. (पोलीस प्रशासनाचा हा निर्णय आत्मघातकी ठरल्यास आश्‍चर्य वाटायला नको. - संपादक) या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून मालेगाव, भिवंडी, धाराशिव, कोकण, संभाजीनगर या भागात प्रभावीपणे काम चालू आहे. हा धोका टाळण्यासाठी देशातील तरुणांमध्ये आत्मविश्‍वास आणि त्यांना हा समाज आपला वाटावा, असे वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केली. सध्या ते मराठवाडा विभागामध्ये दौर्‍यावर आहेत. त्या वेळी पोलिसांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

जे.एन.यु विद्यापीठ बंद करण्याची भाजप खासदारांची मागणी चुकीची ! - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

देशद्रोह्यांचे उघड समर्थन करणार्‍या काँग्रेस पक्षावरच बंदी घाला ! 
     सांगली - आताच्या शासनामधील नेत्यांना अनुभव नाही. परदेशी आस्थापनांसमवेत केवळ छायाचित्रे काढून प्रसिद्धी केली म्हणजे परदेशी आस्थापने राज्यात येत नसतात. आम्ही काढलेल्या कर्जातील एक रुपया जरी आताच्या शासनाने अल्प करून दाखवला, तरी आम्ही राजकारण सोडून देतो. जे.एन.यु विद्यापीठ बंद करण्याची भाजप खासदारांची मागणी चुकीची आहे, असे मत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते नेमीनाथनगर येथील मैदानावर आयोजित काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. 
* माजी मुख्यमंत्र्यांची अन्य काही वक्तव्ये...
१. डाळीच्या साठ्यावरील निर्यात बंदी उठवण्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लपवली. त्याविषयी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार !
२. शासन टिकेल कि नाही, यावर प्रश्‍नचिन्ह आहे. स्मार्ट सिटी योजना चुकीची आहे

स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या क्रांतीकारकांचा स्वातंत्र्यानंतर उचित सन्मान नाही ! - गिरीश प्रभुणे यांची खंत

पुरस्कार वितरण करतांना डावीकडून दुसरे श्री. काकासाहेब चितळे 
आणि पुरस्कार घेतांना श्री. गिरीश प्रभुणे आणि अन्य....
     सांगली - मी ज्या चिंचवडमध्ये रहातो, तेथे क्रांतीकारक चापेकर यांचा वाडा मला अथक परिश्रम करून शोधावा लागला. या वाड्यात जुगार-मटका चालत असे, इतकी त्याची वाईट अवस्था होती. चापेकरांचे शिल्प उभारण्यासाठी मला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. या शिल्पाच्या मागे अखंड भारताचे चित्र लावण्यास मला प्रशासनाकडून विरोध झाला. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या क्रांतीकारकांना स्वातंत्र्यानंतर उचित सन्मान मिळाला नाही, अशी खंत पुणे येथील श्री. गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केली. नगर वाचनालय आणि देशभक्त नागरिक श्री. शरद फडके यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेल्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके पुरस्कार मिळाल्यानंतर सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.

काश्मीरमध्ये सैन्याला विशेषाधिकार देणारा कायदा मागे घेण्यास केंद्रशासनाचा नकार

     नवी देहली - काश्मीरमध्ये आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अ‍ॅक्ट (अफस्पा) हा सैन्याला विशेषाधिकार देणारा कायदा मागे घेण्यास केंद्रशासनाने स्पष्ट नकार दिला आहे. काश्मीरमध्ये सत्तास्थापनेसाठी प्रयत्नशील असलेले पीडीपी आणि भाजप या पक्षांचे नेते अनुक्रमे मेहबुबा मुफ्ती आणि राम माधव यांच्यातील चर्चेनंतर हा कायदा हटवण्याची चर्चा येथे चालू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम माधव यांनी १७ फेब्रुवारी या दिवशी मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेतली. या वेळी मुफ्ती यांनी काश्मीरमधून प्रायोगिक तत्त्वावर अफस्पा हा कायदा हटवण्याची मागणी केली. (मेहबुबा मुफ्ती यांची देशविघातक मागणी ! - संपादक) यानंतर केंद्रशासनाने काश्मीरमध्ये होणारी घुसखोरी पहाता हा कायदा हटवणे चुकीचे होईल, असे सांगत मुफ्ती यांची मागणी फेटाळून लावली. काश्मीरमध्ये सत्तास्थापनेसाठी पीडीपीने भाजपसमोर अफस्पा कायदा रहित करणे, कलम ३७० अबाधित ठेवणे आदी अटी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

संभाजीनगर येथील वक्फ बोर्डात ८६ लक्ष रुपयांचा साहित्य खरेदी घोटाळा

वक्फ बोर्डाला शासनाकडून देण्यात येणारा 
निधी थांबवण्याचा विचार शासन आतातरी करेल का ?
       संभाजीनगर, १८ फेब्रुवारी - येथील वक्फ बोर्डाच्या कार्यालयात ८६ लक्ष रुपयांच्या साहित्य खरेदीचा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एन्.डी. पठाण, निलंबित लिपिक इफतेकार उल्लाह बेग, लेखाधिकारी मुज्जफफर सिद्दिकी यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात यावा, अशी मागणी काही जागरूक नागरिकांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली आहे. (राज्य शासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि सर्व पैसा सव्याज वसूल करावा. - संपादक)

दुचाकीवर भगवा ध्वज लावल्याच्या कारणावरून गुरसाळेत (पंढरपूर) एकास जिवे मारण्याचा प्रयत्न !

शिवजयंतीला भगवा ध्वज लावला म्हणून मारहाण होणे, 
हे मोगल राजवटीची आठवण करून देणारे आहे ! 
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १८ फेब्रुवारी दुचाकीवर भगवा ध्वज लावला म्हणून एकास जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना गुरसाळे येथे १६ फेब्रुवारी या दिवशी घडली. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार श्री. धनाजी गायकवाड हे दुचाकीवरून घराकडे जात असतांना आरोपी पंकज कोळेकर आणि त्यांच्या साथीदारांनी श्री. गायकवाड यांना अडवून दुचाकीस भगवा ध्वज का लावला, असे विचारले. तेव्हा धनाजी यांनी शिवजयंती असल्यामुळे भगवा ध्वज लावला असल्याचे सांगितले. त्या वेळी श्री. पंकज कोळेकर आणि त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. (भगव्याचा द्वेष करणारे निश्‍चितच हिंदु धर्म विरोधक आहेत, हे लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींना कठोर शासन करण्याची अपेक्षा ! - संपादक) याविषयी तालुका पोलीस ठाण्यात श्री. धनाजी गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गोंदे करत आहेत.

कुर्डूवाडीत (जिल्हा सोलापूर) नऊ गोवंश पकडले, दोघांविरुद्ध गुन्हा नोंद

गोवंशहत्या बंदी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची आवश्यकता !
     कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर), १८ फेब्रुवारी - येथील पोलिसांनी पशुवधगृहाकडे जाणारे नऊ गोवंश पकडले. त्यांना माढा तालुका सेवक आणि जीवनरक्षा समितीच्या सहकार्याने नवकार गोशाळेत पाठवण्यात आले. या प्रकरणी गब्बार सौदागार आणि मुदस्सीर गफार सौदागार यांच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. संशयित हे अकलूज येथून टेंपो क्रमांक ०४ सीए ९५३८ मधून हे गोवंश घेऊन निघाले असतांना टेंभुर्णी रस्त्यावर टेंपो पकडण्यात आला. फौजदार पी.पी. निकम यांनी तक्रार दिली.

बेळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त बैठकीचे आयोजन

उपस्थितांशी संवाद साधतांना डावीकडून श्री. राजेंद्र
पाटील,  श्री. सुधीर हेरेकर आणि आधुनिक विद्या
सौ. शिल्पा कोठावळे
       बेळगाव - येथे १३ मार्चला आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त १६ फेब्रुवारीला अनसूरकार गल्ली येथील छत्रे वाड्यात हिंदु धर्माभिमान्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवप्रतिष्ठान, श्रीराम सेना, योग वेदांत सेवा समिती, हमारा देश संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी संघटनांचे, तसेच इतर असे ३२ हिंदू धर्माभिमानी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. नियोजित सभेनिमित्त विभागवार दायित्व घेऊन मोठ्या संख्येत हिंदूंना एकत्र करायचे, असा संकल्प उपस्थितांनी केला. या वेळी सभेची पार्श्‍वभूमी आणि तिचे स्वरूप समजण्यासाठी चित्रफीत दाखवण्यात आली. सनातनच्या आधुनिक विद्या सौ. शिल्पा कोठावळे, सिंधुदुर्ग येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील आणि बेळगाव येथील समितीचे श्री. सुधीर हेरेकर यांनीही उपस्थितांशी संवाद साधला.

पोलिसाकडून लाच मागणार्‍या पोलीस निरीक्षकास अटक !

     सांगली - तीन सहस्र रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक सोपान देवरे यांना अटक करण्यात आली आहे. प्रतिनियुक्तीवर असलेल्या एका पोलीस कर्मचार्‍यास स्थानांतरासाठी देवरे यांनी ही लाच मागितली होती. या प्रकरणी तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देवरे यांना मुख्यालयातून अटक केली आहे. (ज्यांना समाजासाठी काहीतरी करणे अपेक्षित आहे, अशा पोलीस प्रशासनातील अधिकार्‍यांपासून कर्मचार्‍यांपर्यंतची व्यक्ती प्रत्येक आठवड्याला लाच घेतांना सापडणे, याचा अर्थ व्यवस्था किती सडली आहे, हे पुढे येते ! मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकरणांमध्ये तातडीने लक्ष घालावे ! - संपादक)फलक प्रसिद्धीकरता

अशा राष्ट्र आणि धर्म द्रोही विद्यार्थी संघटनांवर कारवाई करा !
     जेएन्यूमधील डीएस्यू आणि डीएस्एफ् या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी नक्षलवाद्यांनी केलेल्या सैनिकांच्या हत्येची घटना विद्यापिठात साजरी करणे, हिंदु देवतांची विवस्त्र चित्रे विद्यापिठातील भिंतींवर लावणे, गोमांसाची मागणी करणे इत्यादी कुकृत्ये केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : JNUke vaam sanghatanone sainikoki hatya ko manana, devtayonke vivastra chitra JNUki diwaropar lagana jaise krutya kiye. 
Kya yah Rashtradroh nahi ?

जागो ! : जेएन्यू के वाम संगठनों ने सैनिकों की हत्या को मनाना, देवताआें के विवस्त्र चित्र जेएन्यू की दीवारों पर लगाना जैसे कृत्य किए.
क्या यह राष्ट्रद्रोह नहीं ?

काँग्रेस पुरोगाम्यांच्या केंद्रस्थानी असल्यामुळे डाव्या संघटनांना बळ येते - डॉ. सदानंद मोरे

सनातन प्रभात सांगत असलेले पुरोगाम्यांच्या मागे काँग्रेस 
आहे, हे सत्य जाणून विद्रोही काँग्रेसला भारतातून हद्दपार करा !
      पुणे, १८ फेब्रुवारी - पुरोगाम्यांच्या गटांमध्ये खरे पुरोगामी कोण, यावर अंतर्गत स्पर्धा चालू होऊन त्यातील वाद विकोपाला गेले आहेत. त्यामुळे संघर्ष निर्माण होत आहेत. काँग्रेस पुरोगाम्यांच्या केंद्रस्थानी आहे. रोहित वेमुला प्रकरणातही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सहभागी झाल्यावर सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. अशा अनेक प्रकरणांत काँग्रेस पक्ष केंद्रस्थानी असतो आणि डावे अवतीभोवती असतात. काँग्रेसच्याच पाठिंब्याने सर्व डाव्या संघटनांना बळ येते, असे टीकात्मक प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले. शिक्षक हितकारिणी संघ आणि लोकवाङ्मयगृह संस्थेच्या वतीने राकेश वानखेडे यांच्या पुरोगामी कादंबरीवर आयोजित परिसंवादात डॉ. मोरे बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, साहित्यिक राजन खान, प्रकाश पवार यांनीही आपली मते मांडली.

आजच्या हिंदु तरुण पिढीने आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा आदर्श घ्यायला हवा ! - रॉकी (राकेश) हिंदुस्थानी, हिंदु महासभा

     ठाणे - स्वराज्य आणि स्वधर्म रक्षणार्थ वासुदेव बळवंत फडके यांनी श्रीशिवप्रभूंच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वराज्य उभारणी केली. त्याचप्रमाणे आपल्यालाही सुराज्यासाठी संघटितपणे हिंदुहिताचे कृतीशील राजकारण केले पाहिजे. आज देशातील काही लोक अफझल, कसाब, याकूब, दाऊद यांना आदर्श मानून देशविरोधी कारवाया करत आहेत. त्यांचा बीमोड करायचा असेल, तर आजच्या हिंदु तरुण पिढीने आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा आदर्श घ्यायला हवा. जन्मभूमीसाठी क्रांतिवीरांनी केलेल्या त्यागाचे स्मरण करून कारावास भोगण्याची सिद्धता ठेवल्यास स्मृतीदिनाचे सार्थक होईल, असे प्रतिपादन हिंदु महासभेचे श्री. रॉकी (राकेश) हिंदुस्थानी यांनी केले. हिंदु महासभा आणि आद्यक्रांतीकारक प्रतिष्ठान आयोजित आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके स्मृतीदिनानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहात १७ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आतंकवाद्यांची बाजू घेणार्‍यांची गय केली जाणार नाही - राजीव प्रताप रुडी

जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या आंदोलनाचे प्रकरण 
     पुणे, १८ फेब्रुवारी - आतंकवादी अफजल गुरू याच्याविषयी जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांना उमाळा दाटून आला आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, साम्यवादी पक्षाचे सीताराम येचुुरी यांनी विद्यार्थ्यांविषयी सहानुभूती दाखवली. आतंकवाद्यांची बाजू घेणार्‍यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी विद्यापिठाच्या आंदोलनाविषयी भाष्य केले. येथील सिम्बायोसिस विद्यापिठामध्ये एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. 
      ते पुढे म्हणाले, संसदेवरील आक्रमणातील दोषी अफजल आणि इतर आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने फाशी सुनावली. यानंतरही त्या निकालाचा अवमान करण्याइतपत बळावलेली मानसिकता गंभीर आहे. देशाच्या विरोधात बोलणार्‍यांना क्षमा कशी करायची, तसे झाल्यास बॉम्बस्फोटात हुतात्मा झालेल्या सैनिकांचा अवमान होईल.

पुणे येथे भूमीगत वाहिन्यांच्या ठावठिकाणाअभावी यंत्रणा अनेकदा खंडित

     पुणे, १८ फेब्रुवारी - दूरसंचार क्षेत्रातील शासकीय आणि खाजगी आस्थापने, वीज वितरण आस्थापन, गॅस पुरवण्याची यंत्रणा आदींच्या भूमीगत वाहिन्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे. यातील शासकीय यंत्रणांना त्यांच्या भूमीगत वाहिन्यांच्या ठिकाणाचा ठावठिकाणाच नाही. त्यामुळे संपूर्ण शहरात खोदकामात कोणत्या ना कोणत्या वाहिन्या तुटल्याने संबंधित यंत्रणांची सेवा खंडित होते आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतो. (भूमीगत वाहिन्यांविषयी शासकीय स्तरावर असलेली अनभिज्ञता आणि सर्वच स्तरावरचा प्रशासकीय भोंगळ कारभार यातून दिसून येतो. - संपादक) यामुळे महानगरपालिकेच्या पातळीवर ठोस धोरण निश्‍चित करण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (अशा प्रकारचे धोरण अजून ठरलेले नसणे, हेही सर्वपक्षीय शासनाला लज्जास्पदच आहे. - संपादक)

प्रशासन, महाविद्यालय येथे १५ निवेदने, तर २ सहस्त्र २०० प्रबोधन पत्रकांचे वाटप

सोलापूर जिल्ह्यात व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात प्रबोधन मोहीम
विषय समजून घेतांना महाविद्यालयातील विद्यार्थी 
    सोलापूर, १८ फेब्रुवारी (वार्ता.) - सोलापूर जिल्ह्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने व्हॅलेंटाईन डे च्या विरोधात प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, शिक्षणाधिकारी यांसह महाविद्यालयांत १५ निवेदने देण्यात आली. या उपक्रमात सोलापूर, बार्शी, अकलुज, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा यांचा समावेश आहे. सोलापुरात ३ महाविद्यालयांत सनातनच्या महिला साधिकांनी प्रबोधन केले. याचा ५७० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. अकलुज येथे एका संप्रदायामध्ये सनातन संस्थेच्या वतीने प्रबोधन करण्यात आले. याचा १०० जिज्ञासूंनी लाभ घेतला. या वेळी जिल्हयात एकूण २,२०० प्रबोधन पत्रकांचे वाटप करण्यात आले. यामध्ये १२ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना पाश्‍च्यात्त्यांच्या या विकृतीविषयी प्रबोधन करण्यात आले. या प्रबोधनाचा सहस्रो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. व्हॅलेंटाईन डे विषयी सामान्य नागरिकांचे प्रबोधन व्हावे, यासाठी वर्तमानपत्रात लेख पाठवण्यात आले होते. ३ दैनिकांनी या लेखास प्रसिद्धी दिली. यामुळे लक्षावधी नागरिकांपर्यंत विषय पोहोचण्यास साहाय्य झाले.

क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा सांगलीत पुतळा उभारा !

माजी आमदार आणि मनसेचे नेते श्री. नितीन शिंदे यांची मागणी
क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना
आदरांजली वाहतांना मान्यवर !
    सांगली, १८ फेब्रुवारी (वार्ता.) - क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे स्वातंत्र्यासाठी योगदान महान आहे. अशा क्रांतीकारकांची पुढील पिढीला ओळख होण्यासाठी सांगलीत त्यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी माजी आमदार आणि मनसेचे नेते श्री. नितीन शिंदे यांनी केली. फडके स्नेह मंडळाच्या वतीने क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १३४ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना महापालिकेसमोर कोना स्टोअर्स येथे आदरांजली वाहण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. सुप्रसिद्ध श्री. बाबूराव गाडगीळ (सराफ) यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमेचे पूजन करून मनोगत व्यक्त केले. 
     या वेळी डॉ. विश्‍वास फडके, सर्वश्री सचिन साठे, स्वरूप वाटवे, संदीप थोरात, सचिन गायकवाड, शंकरराव काळे, सदाभाऊ माळी, डॉ. लताताई देशपांडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय रेठरेकर यांसह अन्य उपस्थित होते. या वेळी जिजामाता बालमंदिरच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमाचे आयोजन फडके स्नेह मंडळाचे श्री. शरद फडके यांनी केले होते.

केवळ २५१ रुपयांचा फ्रीडम २५१ हा स्मार्टफोन संशयाच्या भोवर्‍यात

      नवी देहली - जगातील सर्वांत स्वस्त असा गाजावाजा करण्यात आलेला रिंगिंग बेल्स आस्थापनाचा फ्रीडम २५१ हा स्मार्टफोन (भ्रमणभाष संच) संशयाच्या भोवर्‍यात अडकला आहे. ४ ते ५ सहस्त्र रुपयांत मिळणारा फोन अवघ्या २५१ रुपयांत विकला जात होता. स्मार्टफोन इतका स्वस्त कसा विकला जाऊ शकतो ? या प्रकरणाचा तपास व्हायला हवा, अशी मागणी इंडियन सेल्युलर असोसिएशन्चे अध्यक्ष पंकज महेंदू यांनी केली. दुसरीकडे नफ्यापेक्षा भ्रमणभाषच्या बाजारपेठेत स्थान मिळवणे, हा आमचा हेतू आहे, असे स्पष्टीकरण रिंगिंग बेल्सचे अध्यक्ष अशोक चड्डा यांनी दिले. नोएडाच्या रिंगिंग बेल्स या आस्थापनाने ३ जी सुविधा असलेला फ्रीडम-२५१ हा सर्वांत स्वस्त स्मार्टफोन १७ फेब्रुवारी या दिवशी बाजारात आणला. या भ्रमणभाष संचाच्या ऑनलाईन खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाल्याने त्याचे संकेतस्थळ पहिल्या दिवशीच क्रॅश झाले. त्यामुळे संकेतस्थळ २४ घंट्यांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर व्यक्त करण्यात आलेला संशय अधिकच वाढला आहे.

अफझलखानवध - एक मंत्रयुद्ध

१९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्ताने...
    अफझलखानाचा वध ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत जोखमीची आणि तितकीच रोमहर्षक कामगिरी. ती करतांना राजांनी केलेली सिद्धता कौटिल्याने अर्थशास्त्रात सांगितलेल्या सूत्रांप्रमाणेच आहे.
१. फितूर चंद्ररावाला ठार करून जावळी 
कह्यात घेणारे शिवराय !
     जावळी शिवरायांच्या आयुष्यातील भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्याही एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण ! एका बाजूला सह्याद्री, तर दुसर्‍या बाजूला महाबळेश्‍वरचा डोंगर अशा खाचेत वसलेल्या जावळीला घनदाट जंगलाचे चिलखत होतेच. कृष्णाजी बाजीच्या चंद्रराव पदाला पाठिंबा देऊन राजांनी १६४७ मध्ये जावळीच्या राजकारणात प्रवेश केला होता. राजांच्या राज्यविस्ताराची लालसा जाणून आदिलशहाने वाईवर १६४९ ला अफझलखानाची वाईचा सुभेदार म्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर अनेक राजकारणे होऊन आदिलशहाने १६५५ मध्ये अफझलखानाला वाईतून बोलावून कर्नाटकच्या मोहिमेवर पाठवले. पुढे १६५६ च्या आसपास कृष्णाजी उपाख्य चंद्रराव मोरे राजांचे उपकार विसरला. राजांच्या मुलखात मस्ती करू लागला. राजांनी समजावण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ ठरला. १५ जानेवारी १६५६ या दिवशी राजांनी जावळीवर स्वारी करून हा नैसर्गिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध प्रदेश राज्याला जोडला. पुढे फितुरी करणार्‍या चंद्ररावाला ऑगस्ट मासात ठार केले आणि खर्‍या अर्थाने जावळी राजांची झाली.

इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉपी !

मॅकॉलेप्रणीत परीक्षार्थी बनवणारी शिक्षणपद्धती 
तसेच कर्तव्यचुकार अन् भ्रष्ट यंत्रणा यांची फळे !
       पुणे, १८ फेब्रुवारी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी १२ वीची लेखी परीक्षा १८ फेब्रुवारीपासून चालू झाली. काही परीक्षाकेंद्रांवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कॉपी करत असलेले आढळून आले. नंदुरबार येथे पोलीस आणि पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी साहाय्य करत होते, अशी दृश्ये काही वाहिन्यांनी टिपली आहेत. राज्यातील २ सहस्र ५८१ परीक्षा केंद्रांवर १८ फेब्रुवारी ते २८ मार्च या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला राज्यातून १३ लक्ष ८८ सहस्र विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून बसले आहेत. जुलैमध्ये प्रथमत: १२ वीची आणि त्यानंतर १० वीचीही फेरपरीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.

पोलीस यंत्रणा सर्वसामान्यांसाठी आहे का ?

       उत्तरप्रदेशातील श्यामली येथे ८ फेब्रुवारीला गाव निवडणूक जिंकल्याच्या आनंदात आणि शक्ती प्रदर्शनास्तव समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. त्या विजयास्तव मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी हवेत बंदुकीने अर्धा घंटा गोळीबार केला. या प्रसंगी झालेल्या गोळीबारात बघ्या नागरिकांपैकी ३ जण घायाळ झाले आणि एका ८ वर्षाच्या मुलाचा गोळी लागून तत्क्षणी मृत्यू झाला. इतका रक्तपात झाल्यावरही मिरवणुकीच्या कोलाहलात किंचतही फरक नव्हता. सगळे कार्यकर्ते आणि विजयी उमेदवार आपल्याच धुंदीत मग्न होते. या धक्कादायक घटनेच्या वेळी जनेतेचे रक्षक (?) पोलीसदेखील पूर्ण ताफ्यासह उपस्थित होते. ही घटना घडली त्या वेळी आणि नंतरही ते त्याचे मूक साक्षीदार होऊनही त्या रक्तरंजित अशा विजयाची शोभा वाढवत होते.

देशद्रोही तितुके कुत्ते, मारोनी घालावे परते !

      सध्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या देशद्रोहाचे प्रकरण बरेच गाजत आहे. काँग्रेसवाले, डावे आदींनी देशद्रोही विद्यार्थ्यांना पाठीशी घालून अत्यंत घृणास्पद आणि राष्ट्रघातकी राजकारण चालू केले आहे. कन्हैया कुमार या देशद्रोही विद्यार्थ्यांच्या म्होरक्याला देहली पोलिसांनी अटक केली असली, तरी आता ५ देशद्रोही फरार झाले आहेत. शासनाने या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे बरेच मनावर घेतले आहे. कदाचित येत्या काळात या विद्यार्थ्यांवर कारवाई होईलही; मात्र देशभरातून त्यांच्या समर्थनार्थ ज्यांनी कायदा-सुव्यवस्थेला आव्हान दिले, त्यांचे काय ?, हा प्रश्‍न अनुत्तरीत रहातो. १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती आहे. त्या निमित्ताने आज छत्रपती असते, तर त्यांनी जेएन्यूचे प्रकरण कसे हाताळले असते, हा विचार बराच वेळ मनात घोळत राहिला. त्यानंतर शिवचरित्रातील पुढील काही प्रसंग डोळ्यांसमोर तरळले.

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे अवैधपणे वाहतूक करण्यात येणार्‍या ११ गोवंशांची सुटका

शासन आणि पोलीस प्रशासन यांनी गोवंशहत्या बंदी 
कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी, ही अपेक्षा !
       श्रीरामपूर, १८ फेब्रुवारी (वार्ता.) - येथे एका मालवाहू वाहनामधून ९ गायी आणि २ वासरे यांना अवैधपणे घेऊन जाण्यात येत होते. ही माहिती स्थानिक गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या वाहनाला अडवले आणि गोवंशांची सुटका केली; परंतु या वेळी वाहनचालक पसार झाला आहे. (गोवंशांचे प्राण वाचवणार्‍या गोरक्षकांचे अभिनंदन ! - संपादक) गोरक्षकांनी ही माहिती पोलिसांना कळवली आणि नंतर त्यांनी एकूण ११ गोवंशियांना शासनाधीन केले. या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

देशप्रेमी शिवराय !

     इसिसने वर्ष २०२० पर्यंत भारतापासून युरोपपर्यंतचा भाग इस्लाममय करायचा मनोदय घोषित केला आहे. काही शतकांपूर्वी आलेल्या इस्लामी लाटेला हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे वेसण घातली होती आणि त्यानंतर थोरले बाजीराव प्रभूतींनी ती परतवून लावली होती. मातृभूमीचे रक्षण करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. सध्याचे हिंदू मात्र त्यावर काही करतांना दिसत नाहीत आणि पुन्हा छत्रपती यावेत अन् आपले रक्षण करावे, असे त्यांना वाटते काय ?
        नुकतेच छत्रपती शिवरायांचे एक पत्र सापडले आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी ते औरंगजेबाच्या सरदारास काय लिहिताहेत, ते वाचा...

जनता जनार्दन राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणेदारपणा !

     आजही काही गोष्टींचे तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. जगात खोबर्‍याचा व्यापार होत असे. त्यात राजापूरच्या खोबर्‍याला विशेष महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारपेठेतील वस्तूंची सूची पाहिल्यास त्यामध्ये खोबर्‍याच्या प्रकाराच्या यादीत राजापुरी खोबरे असे स्वतंत्र नाव नमूद केलेले असते. म्हणजेच राजापुरी खोबर्‍याला विशेष गुण असल्याविना आज इतकी वर्षे या खोबर्‍याला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र दर्जा मिळाला नाही. ब्रिटीश व्यापार्‍यांची राजापूरला वखार होती. त्यांनी तेथील व्यापार्‍यांना हातीशी धरून पैसे चारले आणि आपल्या शेतकरी बांधवांकडून ते अत्यंत पडेल भावाने हे खोबरे विकत घेतले.

मराठी भाषेला सिंहासनाधिष्ठित करून स्वराज्याचा संपूर्ण राज्यकारभार मराठीतूनच चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज !

१. पेशवा, सुरनीस, सरनौबत, मुजुमदार अशा असंख्य परकीय शब्दांऐवजी पंतप्रधान, सचिव, सेनापती, अमात्य असे आपले शब्द रूढ होत गेले.
२. मातृभाषा हा राष्ट्राचा प्राण आहे. भाषा म्हणजे राष्ट्राची संजीवनीच !
३. मराठीत प्रचलित झालेले परकीय शब्द : संत ज्ञानेश्‍वर महाराज समाधीस्त झाले आणि यादव रामराज्य बुडाले, तेव्हापासून मराठी भाषेवर यवनांचे आक्रमण होऊ लागले. इतकेच नव्हे, तर आम्हाला या परकीय नावारूपांचा अभिमान वाटू लागला. 
अ. पुढे पुढे आमची नावे आणि आडनावेही पुसली जाऊ लागली. सुलतानराव, रुस्तमराव, हैबतराव, बाजीराव, शहाजी, पिराजी अशी नावे आली. 
आ. वैदिक शास्त्री म्हणवून घेणार्‍यांनीही सुलतानभट, होशिंगभट अशी नावे स्वीकारली.

छत्रपतींची सहिष्णुता !

शिवछत्रपतींच्या काळात आजचे पुरोगामी, डावे, समाजवादी आणि धर्मनिरपेक्षतावाले
नव्हते, हे बरेच झाले ! अन्यथा तेव्हाही असहिष्णूतेचा कांगावा झाला असता !
    छ. शिवाजी महाराजांनी जिचे बिजारोपण केले, ती काफरशाहीसारखी वाढतच गेली. तिने देहलीच्या मोगलाला खेळण्यातला राजा केला. ही काफरशाही अटकेचे पाणी पिऊन तृप्त आणि पुष्ट झाली. या काफरशाहीचे मूळ संस्थापक छ. शिवाजी महाराजांनी काफरसारखे अपशब्द वापरून मुसलमानांची हेटाळणी आणि छळवणूक कधी केली नाही; कारण ते सहिष्णू होते. त्यांची परंपरा उदार आणि सहिष्णू होती; परंतु येथे हेही ध्यानात ठेवले पाहिजे की, आत्मघात आणि मूर्खता यांच्या परमसीमा गाठणारी त्यांची सहिष्णुता नव्हती.

छत्रपती शिवरायांचे राज्य निधर्मी नव्हे, तर धर्मराज्यच होते !

      छ. शिवाजी महाराजांनी हिंदवी राज्याची स्थापना केली. हिंदवी राज्य म्हणजे हिंदूंचे राज्य. भावी पिढ्यांचा उगाच अपसमज होऊ नये, म्हणून ही हिंदूंच्या अधिराज्याची कल्पना छत्रपतींनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितली आहे. बखरकार आणि इतिहासकार यांनी तिचा अनेकदा पुनरुच्चार केला आहे; तरी शेवटी व्हायचे ते झालेच ! (मंदबुद्धी किंवा अप्रामाणिक माणसांशी गाठ पडली की, असेच होत असते.) शिवराज्याचे वर्णन अनेक आधुनिक पंडित निधर्मी राज्य म्हणून करू लागले. ते राज्य सगळ्यांचे होते, त्या राज्यात सर्व धर्मांना समान स्थान होते, असे ते अट्टाहासाने ओरडू लागले. आजच्या राज्यकर्त्यांच्या आणि स्वतःच्या मतांचा ते शिवराज्यावर आरोप करू लागले. महाराजांचे राज्य हे हिंदवी होते, हिंदूंचे होते, हे मान्य करतांना त्यांना संकोच वाटू लागला. तो काळ आणि त्या काळातील बलवत्तर धार्मिक प्रेरणांचा विसर पडल्याचे ढोंग ही मंडळी करू लागली. छ. शिवाजी महाराजांचे राज्य हे हिंदूंचे राज्य असण्यात आणि तसे म्हणण्यात जणूकाही छत्रपतींना अन् त्यांच्या सर्व सहकारी हिंदूंना फारच कमीपणा येतो, अशी या दीडशहाण्यांची कल्पना ! - भाषाप्रभु पु.भा. भावे सनातनच्या विरोधात वेगवेगळे जनजागृती मंच उभारणारे तथाकथित गोमंतकप्रेमी सरदानाच्या बातम्या वाचून गप्प का ?

    २००९ मध्ये मडगाव येथे झालेल्या दुर्दैवी बॉम्बस्फोटात सनातनचे दोन साधक मारले गेले. त्यानंतर तथाकथित गोमंतकप्रेमींनी सनातनला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून साधकांना त्रास द्यायला सुरुवात केली. या तथाकथित गोमंतकप्रेमींनी गोव्यातील जवळपास प्रत्येकच गावात जनजागृती मंच उभारून सनातनला विरोध केला. त्यासाठी पत्रकार परिषदा, जाहीर सभा, कोपरा सभा, परिसंवाद अशी विविधांगी आयोजने करून सनातनविषयी जनमानस कलुषित करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांचे एकच तुणतुणे होते, ते म्हणजे सनातनवाल्यांनी शांतताप्रिय गोव्याचे नाव अपकीर्त केले. काही काळ खर्‍या गोमंतकियांना या जनजागृती मंचवाल्यांचे बोलणे खरेही वाटू लागले होते; परंतु ४ वर्षांनी सत्य समोर आल्यावर या जनजागृती मंचवाल्यांची बोलती बंद झाली.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) धर्मद्रोही घटनांना पायबंद घालण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या शासनाने कोणतेही प्रयत्न न करणे

अ. शिवाजीला धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) बनवणे 
आ. त्यांची गोब्राह्मण प्रतिपालक ही सर्वश्रेष्ठ उपाधी पुसून टाकणे 
इ. सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या पराक्रमाची चित्रे लावण्यास प्रतिबंध करणे 
ई. गोहत्येला प्रोत्साहन देणे 
उ. समाजात ब्राह्मणद्वेष पसरवणे 
ऊ. भगवा दहशतवाद अस्तित्वात आहे, असे विधान करणे 
ए. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे काल्पनिक असल्याचे शपथेवर सांगणे 
या आणि अशा अनेक धर्मद्रोही घटना घडल्या, तरी त्या थांबवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. 
- श्री. दुर्गेश परुळकर (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २०१३)

उपजतच अध्यात्माची ओढ असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला प्रियोळ, फोंडा, गोवा येथील कु. सार्थक राज भट (वय ८ वर्षे) !

     कोने, प्रियोळ, फोंडा, गोवा येथील कु. सार्थक राज भट (वय ८ वर्षे) हा सनातनच्या रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या साधिका कु. शायरी मराठे यांचा मामेभाऊ आहे. सार्थकची १९.२.२०१६ या दिवशी मुंज आहे. त्यानिमित्ताने कु. शायरी मराठे आणि त्याची आत्या सौ. वृंदा मराठे (कु. शायरी मराठे हिची आई) यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

कु. सार्थक यास मौजीबंधनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
१. कु. शायरी मराठे (सार्थकची आतेबहीण)
कु. सार्थक भट
१ अ. प्रेमभाव : एकदा मी कु. सार्थकला शाळेतून आणायला गेले होते. त्याच्या ताईला (कु. राघवी हिला) तिच्या शाळेत सोडून त्याला घेऊन येतांना मी एका दुकानात काही साहित्य घ्यायला थांबले. तेथे चॉकलेट्सही होते. मी साहित्य घेईपर्यंत सार्थकने चॉकलेट मागितले नाही; म्हणून मीच त्याला विचारले, चॉकलेट हवं का तुला ? तेव्हा तो नको म्हणाला. घरी आल्यावर तू चॉकलेट नको, असे का म्हणालास ?, असे मी त्याला विचारले. तेव्हा तो म्हणाला, मी आता चॉकलेट घेतले असते, तर माझ्या ताईला मिळाले नसते आणि तिला वाईट वाटले असते. त्यापेक्षा आपण तिला सायंकाळी शाळेतून आणायला जाऊ, तेव्हाच चॉकलेट घेऊ. घरी त्याला कोणीच असे वागायचे असते, असे सांगितले नव्हते.

साधकांना साधनेत साहाय्य करणारे आणि प्रीतीचे मूर्तीमंत प्रतीक असलेले सनातनचे पू. जयराम जोशी (आबा) (वय ७७ वर्षे) !

१. आबांची गुणवैशिष्ट्ये
पू. जयराम जोशी
१ अ. स्वतःमुळे इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी घेणे
अ. आबा मला बरे नसतांना स्वतःचे कपडे स्वतःच धुण्याचा प्रयत्न करतात. त्या वेळी स्वतःला बरे नाही, असा विचार ते करत नाहीत. तेव्हा त्यांना तसे करू नका, असे सांगावे लागते.
आ. त्रास होत असतांना माझ्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, या विचारामुळे ते काहीच सांगत नाहीत. त्यांना विचारल्यावर लक्षात येते. त्रास होत असतांना ते प.पू. डॉक्टरांचा चरित्रग्रंथ छातीला लावून जप करत आणि धावा करत बसून रहातात; परंतु पुष्कळ त्रास होईपर्यंत कुणालाही उठवत नाहीत. आपला त्रास प.पू. डॉक्टरांनाच कळतो, असे ते म्हणतात.

नवीन सदनिका विकत घेतांना तळमजला, पहिला अथवा दुसर्‍या मजल्यावरील सदनिका घेण्यास प्राधान्य द्या !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     काही जण नवीन सदनिका (फ्लॅटस्) विकत घेतांना इमारतीमध्ये उद्वाहन यंत्राची (लिफ्टची) सुविधा असल्यास वरच्या मजल्यावरील सदनिका बूक करतात. संभाव्य आपत्काळात विजेची उपलब्धता नसल्यास वरच्या मजल्यावरील सदनिकेत रहाणार्‍यांची असुविधा (गैरसोय) होऊ शकते. त्यामुळे सदनिका विकत घेण्यास इच्छुक साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांनी शक्यतो तळमजला, पहिला अथवा दुसर्‍या मजल्यावरील सदनिका घेण्यास प्राधान्य द्यावे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगली जिल्ह्यातील गुरुपौर्णिमेत एकही संत नाही, असे वाटणे आणि पू. (कु.) स्वाती खाडये यांनी आबा संतपदी विराजमान झाल्याची घोषणा केल्यावर आनंद होणे

      गुरुपौर्णिमेच्या दिवशी वाटत होते, सांगली जिल्ह्यात एकच गुरुपौर्णिमा आहे आणि त्यात एकही संत नाही. त्यामुळे मनातून वाईट वाटत होते. त्यानंतर प्रार्थना आणि कृतज्ञता वाढवली आणि स्वीकारायचे ठरवले. त्यानंतर आबा दिसले. ते पुष्कळ नम्र दिसत होते. त्यांना नमस्कार करावा, असे मला वाटत होते. मग मी मनातूनच त्यांना नमस्कार केला. त्यानंतर जेव्हा पू. स्वातीताईंचे मार्गदर्शन होते. त्या वेळी कृतज्ञता वाटली, देवाने आज आपल्याला संतांचा सत्संग दिला आहे. त्यांचा आवाज ऐकायला मिळणार. त्यानंतर पू. ताईंनी आबा हे पू. आबा झाल्याची घोषणा केल्यावर पुष्कळ आनंद जाणवला आणि कृतज्ञता वाटली, देवाने आज गुरुपौर्णिमेला ही संतांची भेट आपल्याला दिली आहे. त्यानंतर दिवसभर ती भावावस्था टिकून होती.
- सौ. निशा सारडा, विश्रामबाग, सांगली. (९.८.२०१५)

संकटकाळी हरि ॐ जय मे जयम् । हा जप करा !

साधकांना सूचना 
     राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर धर्मद्रोही आणि प्रसारमाध्यमे सध्या अनेक बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्याशिवाय अन्वेषण यंत्रणांनीही निरपराध साधकांच्या मागे नाहक चौकशीचा ससेमिरा लावला आहे. तसेच काही घटनांमध्ये धर्मद्रोही, पोलीस आणि निधर्मी राजकारणी हेही साधकांना हेतूत: त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. असे कोणतेही संकट निर्माण झाल्यास साधकांनी हरि ॐ जय मे जयम् । हा जप सतत करावा. संकटाची तीव्रता न्यून झाल्यानंतर साधक नेहमीचा नामजप चालू करू शकतात. - (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तेणी, तमिळनाडू. (१७.२.२०१६, सकाळी ८.१७)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
     दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करणार्‍यांनी हिंदूंमध्ये दुही निर्माण केली. त्यामुळे हिंदू आणि भारत यांची स्थिती बिकट झाली आहे; म्हणून दुही करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही होत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 


बोधचित्र

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      कठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने आणि हुशारीने त्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पुरोगामी साम्यवाद्यांचा आतंकवाद !

संपादकीय
    इस्लामी आतंकवादाच्या प्रभावाने जगभरातील देश त्रस्त झाले आहेत. मध्य-पूर्व, उत्तर आफ्रिका आणि पश्‍चिम आशियातील इस्लामी देशांत जिहादी आतंकवादाने टोक गाठले आहे. इस्लाम म्हणजे शांती, असे म्हटले जाते; मात्र प्रत्यक्षात तिथे केवळ अशांतीच असल्याचे चित्र दिसत आहे. भारतातही गेले तीन दशके इस्लामी आतंकवाद धुडगूस घालत आहे. त्याच्या आधीपासून देशात साम्यवाद्यांचा आतंकवाद अस्तित्वात आहे. त्यातच साम्यवाद्यांचा नक्षलवाद गेली ५० वर्षे देशातील २२ राज्यांत हिंसाचार करत आहे आणि त्याच्यावर एकाही शासनाला नियंत्रण मिळवता आलेले नाही. बंगालमध्ये साम्यवाद्यांनी ३५ वर्षे एकछत्री राज्य करतांना माओवाद्यांच्या राज्यातील हिंसाचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते. पुढे साम्यवाद्यांवर नाराज झालेल्या माओवाद्यांना हाताशी धरून ममता बॅनर्जी यांनी साम्यवाद्यांची सत्ता उखडून टाकली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn