Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !


महाराणा प्रताप यांचा आज स्मृतीदिन

उमर खालिद हाच देशद्रोही घोषणांचा मुख्य सूत्रधार ! - पोलीस चौकशीत कन्हैया कुमारने दिली माहिती

     नवी देहली - कन्हैया कुमारची देहली पोलिसांकडून कसून चौकशी चालू आहे. त्याने दिलेल्या माहितीत विद्यार्थी नेता उमर खालिद हा देशद्रोही घोषणांचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. खालिदनेच ९ फेब्रुवारीला विद्यापिठात कार्यक्रम आयोजित केला होता. सध्या खालिद फरार आहे.
कन्हैयाने पोलिसांना दिलेली माहिती 
१. उमर खालिद काश्मिरी फुटीरतावाद्यांशी संबंधित आहे. त्याच्याकडे काश्मीर खोर्‍यातील संशयास्पद लोक येत असत. त्यांनीच त्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्या. या कार्यक्रमात विद्यापिठाबाहेरील युवकही सहभागी झाले होते. 
२. या कार्यक्रमाची अनुमती रहित केल्यानंतर डेमॉक्रेटिक स्टुडंटस् युनियन आणि साम्यवादी संघटना यांच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात मोर्चा काढला. त्या वेळी उमर खालिद त्याचे नेतृत्व करत होता. विद्यापीठ प्रशासन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या विरोधात खालिदनेच घोषणा देण्यास प्रारंभ केला. 
३. केवळ काश्मीरच नव्हे, तर मणीपूर, आसाम, केरळ, नागालॅण्ड आणि गोरखालॅण्ड या भूभागांना स्वतंत्र करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. 
४. कार्यक्रमाच्या ५ दिवस आधी विद्यापीठ परिसरातील प्रत्येक भिंतीवर डेमॉक्रेटिक स्टुडंट्स युनियनकडून भित्तीपत्रके चिटकवण्यात आली होती.

सनातनच्या २ साधकांचे पॉलिग्राफिक चाचणी करण्याच्या संमतीचे आवेदन शिवाजीनगर न्यायालयात सादर

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण
     पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक सर्वश्री हेमंत शिंदे आणि नीलेश शिंदे यांची पॉलिग्राफिक चाचणी करण्याच्या संमतीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सी.बी.आय.ने) शिवाजीनगर न्यायालयात आवेदन प्रविष्ट केले होते. त्या अनुषंगाने १७ फेब्रुवारी या दिवशी शिवाजीनगर न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी सनातनचे साधक सर्वश्री हेमंत शिंदे आणि नीलेश शिंदे हे त्यांच्या अधिवक्त्यांसमवेत उपस्थित होते. या वेळी त्यांनी सदर चाचणीस अनुमती असल्याचे लेखी पत्र न्यायालयास सादर केले.

ओडिशातील राऊरकेला येथून सिमीच्या ४ आतंकवाद्यांना अटक

आतंकवादग्रस्त भारत !
फरासखाना (पुणे) येथील बॉम्बस्फोटात सहभाग
     राऊरकेला - ओडिशातील राऊरकेला येथे सिमीच्या (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाच्या) महंमद खालिद, अमजद खान, झाकीर हुसेन आणि एस्.के. मेहबूब या ४ आतंकवाद्यांना १७ फेब्रुवारीला सकाळी अटक करण्यात आली. (आतंकवाद्यांना धर्म नसतो, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? - संपादक) कारवाईच्या वेळी आतंकवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही याला प्रत्युत्तर दिले. ओडिशा आणि तेलंगण पोलीस अन् गुप्तचर विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या कारवाई करत या आतंकवाद्यांना अटक केली. यांच्याकडून ५ बंदुका आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हे चौघे जण गेल्या ४-५ वर्षांपासून येथे रहात होते. (एका बंदी असलेल्या संघटनेचे आतंकवादी ४-५ वर्षे रहात असतांना स्थानिक पोलीस आणि गुप्तचर विभाग यांना त्याची माहिती नसणे लज्जास्पद ! - संपादक) हे चौघेही मध्यप्रदेशातील खांडवा भागातील रहिवासी आहेत. ते कारागृहातून पळाले होते.

अमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने शासनाची जलयुक्त शिवार योजना कार्यरत होणार !

देशाला असहिष्णु म्हणून झाल्यावर प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न 
अमीर खान करत आहेत, असे कुणाला वाटले, तर त्यात वावगे काय ?
     मुंबई - अभिनेता अमीर खान यांनी स्थापन केलेल्या पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्र शासन जलयुक्त शिवार योजना राबवणार आहे. अमीर खान या योजनेच्या संदर्भात लोकांशी संवाद साधणार आहेत. आरंभी प्रायोगिक तत्त्वावर पावसाळ्यापूर्वी पहिल्या सत्रात विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्र येथील प्रत्येकी शंभर गावांमध्ये ही योजना राबवली जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. या वेळी व्यासपिठावर अमीर खान, जलसंधारण मंत्री सौ. पंकजा पालवे आणि या योजनेत सहभागी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवार योजना ही खर्‍या अर्थाने लोकचळवळ झाली आहे. अमीर खान यांनी ८ मासांपूर्वीच या संदर्भात चर्चा केली होती. या संदर्भात अभ्यास, चर्चा आणि संशोधन करून ही योजना आखली आहे. अमीर खान हे या योजनेचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर नसून खरे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर हे या संदर्भात काम करणारे डॉ. पोळ हेच आहेत.

केरळच्या कन्नूरमध्ये संघ स्वयंसेवकाच्या हत्येनंतर आता भाजपच्या कार्यालयावर बॉम्बफेकीची घटना !

काँग्रेसच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा !
     कन्नूर (केरळ) - येथे १५ फेब्रुवारीला संघाचा स्वयंसेवक पी.व्ही. सुजीत यांच्या हत्येनंतर १७ फेब्रुवारीला येथील तालासेरीमध्ये असलेल्या भाजपच्या कार्यालयावर अज्ञातांनी एकापाठोपाठ एक असे अनेक बॉम्ब फेकले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुजीत याच्या हत्येवरून भाजप आणि माकप (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) यांच्या कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली होती. त्यातूनच बॉम्बफेक करण्यात आली का, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. केरळमध्ये लवकरच निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
     भाजपच्या उदयाने व्यथित झालेले डावे पक्ष खुनाच्या राजकारणामधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते एम्.जे. अकबर यांनी केली. केरळमध्ये सातत्याने चाललेल्या हिंसाचाराच्या राजकारणाच्या संदर्भात डाव्या पक्षांकडे कोणतेही उत्तर उरलेले नाही. या राज्यामध्ये २०० हून अधिक भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. मात्र मार्क्सवादी पक्षाने हा आरोप फेटाळून लावला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची त्याच्या वृद्ध आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत हत्या करण्यात येते, यासंदर्भात ५० लक्ष स्वयंसेवक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आवाज उठवावा, ही हिंदूंची अपेक्षा !

     कन्नूर (केरळ) - येथील पप्पीनिसेरी गावात १५ फेब्रुवारी २०१६ च्या रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची हत्या करण्यात आली. २७ वर्षीय पी.व्ही. सुजीत या स्वयंसेवकाची त्याच्या वृद्ध आई-वडिलांच्या डोळ्यांदेखतच हत्या करण्यात आली. सुजीतला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या घरच्यांवरही आक्रमण करण्यात आले. या प्रकरणात माकप समर्थक असलेल्या ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी !

श्री हनुमानाचा अवमान केल्याचे प्रकरण
केजरीलवाल यांचा हिंदुद्वेष ! केजरीवाल यांचे अन्य पंथियांच्या 
श्रद्धास्थानांचे असे विडंबन करण्याचे धाडस झाले असते का ?
केजरीवाल यांनी ट्विटरवर शेअर केलेले श्री हनुमानाचे अवमान करणारे व्यंगचित्र
     नवी देहली - देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी ट्विटरवर श्री हनुमानाचे अवमान करणारे व्यंगचित्र शेअर केल्याच्या प्रकरणी हिंदु लीगल सेलने देहली पोलिसांकडे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (हिंदु देवतांचा अनादर करणार्‍यांवर कारवाईची तत्परतेने मागणी करणार्‍या हिंदु लीगल सेलचे अभिनंदन ! - संपादक) 
१. सेलचे सचिव अधिवक्ता प्रशांत पटेल यांनी या मागणीचे अधिकृत पत्र देहली पोलिसांकडे पाठवले आहे.
२. तेलंगण येथील धर्माभिमानी श्री. करूणा सागर करीमशेट्टी यांनीही तेलंगणच्या सायबराबाद पोलिसांकडे केजरीवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वाजिद अली शाह महोत्सवात फलकाद्वारे श्रीकृष्ण आणि राधा यांचे विडंबन : राधेला अल्पवस्त्रात दाखवले !

मुसलमान व्यक्तीच्या नावे असलेल्या महोत्सवात हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणे, हा समाजवादी 
पक्षाच्या शासनाचा कुटील डाव होय ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करण्याचे धाडस 
शासन दाखवणार का ?
उत्तरप्रदेश शासनाचा हिंदुद्रोह !
    लक्ष्मणपुरी (लखनौ) - उत्तरप्रदेश शासनाने आयोजित केलेल्या एका महोत्सवाच्या फलकाद्वारे श्रीकृष्ण आणि राधा यांचे घोर विडंबन करण्यात आले. यात राधेला अल्प वस्त्रात दाखवण्यात आले.
१. १४ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या पर्यटन दिवसानिमित्त राज्यशासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे वाजिद अली शाह महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
२. या महोत्सवात राधा-कन्हैया का किस्सा या नावाने एक नाटक सादर करण्यात आले. 
३. महोत्सवाच्या आधी या महोत्सवाच्या प्रसारासाठी शहरात विविध ठिकाणी फलक लावण्यात आले होते.

छत्तीसगडमध्ये ११ सहस्र आदिवासी महिला बेपत्ता ! - काँग्रेसचा आरोप

    नवी देहली - छत्तीसगडमध्ये आदिवासींच्या संदर्भात बलात्कार आणि छेडछाड यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पोलिसांचाही यात सहभाग आहे; परंतु याप्रकरणी राज्यशासन काहीही कारवाई करत नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. राज्यात ११ सहस्र आदिवासी महिला बेपत्ता असून त्यांच्याविषयी कोणाहीकडे आणि कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

भारत-पाक सीमेवर लेझरच्या भिंती उभारणार !

आतंकवाद्यांनी देश पोखरल्यावर भारत-पाक सीमेवर उपाययोजना करणे, 
म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे आहे.
पठाणकोटच्या आक्रमणानंतर सुरक्षादलाची उपाययोजना
    नवी देहली - यापुढे पाक सीमेवरून आतंकवाद्यांनी भारतात घुसखोरी करू नये, यासाठी लवकरच ४० पेक्षा अधिक संवेदनशील ठिकाणी लेझरच्या भिंती उभारण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्रालयातील एका अधिकार्‍याने दिली. 
   लेझर स्रोत आणि डिटेक्टर दरम्यान येणार्‍या कोणत्याही वस्तूचा शोध घेण्याचे काम या तंत्रामध्ये करण्यात येते. भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर अनुमाने ४० संवेदनशील ठिकाणे आहेत. त्यापैकी केवळ ५-६ ठिकाणीच ही उपाययोजना करण्यात आली आहे. नदीवर लावण्यात आलेल्या लेझरमधून कोणीही भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, तर मोठ्याने सायरन वाजतो. पंजाबमधील पठाणकोट आक्रमणाच्या वेळी आतंकवाद्यांनी बामियाल येथील उज नदीचा वापर केला होता. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षादलाकडून ही उपाययोजना राबवण्यात येणार आहे.

पत्रकाराच्या प्रश्‍नावर रागावलेले तेजप्रताप यादव म्हणतात, पत्रकारांच्या पोटातही किडे असतात !

लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि बिहारचे आरोग्यमंत्री 
तेजप्रताप यादव यांची असंवेदनशीलता !
शासकीय औषधांनी आजारी पडत असलेल्या मुलांच्या संवेदनशील विषयाला दिली बगल !
  पाटलीपुत्र (पाटणा), बिहार - राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी प्रसारमाध्यमांवर टीका केली आहे. १४ फेब्रुवारी या दिवशी पाटलीपुत्रात झालेल्या जनता दरबारात सहभागी झालेले तेजप्रताप यादव यांना एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नाचा राग आला. पोटात होणार्‍या किड्यांवर शासनाने दिलेल्या औषधाने मुले आजारी का पडत आहेत ? या संवेदनशील प्रश्‍नावर यादव म्हणाले की, पत्रकारांच्या पोटातही किडे होतात. त्यामुळे त्यांनाही औषध द्यावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास आम्ही त्याची व्यवस्थाही करून देऊ. (यातून बिहारच्या आरोग्यमंत्र्यांची लहान मुलांच्या आरोग्याविषयी असलेली असंवेदनशीलताच दिसून येते. असे राज्यकर्ते जनतेच्या आरोग्याची काळजी काय घेणार ? - संपादक)

मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी.एस्. करनन् म्हणतात, भारतात जन्माला येणे माझ्यासाठी लज्जास्पद !

सी.एस्. करनन् यांच्या सारख्या व्यक्ती भारतात जन्माला येणे, हे भारतियांसाठी
लज्जास्पद असे राष्ट्रप्रेमी नागरिकांनी म्हटले, तर ते चुकीचे कसे ठरेल ? 
     नवी देहली - मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी.एस्. करनन् यांची कोलकाता उच्च न्यायालयात बदली झाली आहे. यामुळे नाराज झालेल्या न्या. करनन यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, भारतात जन्माला आल्याविषयी मला लाज वाटते आहे. मी मागासवर्गीय असल्याने माझ्याशी भेदभाव केला जात आहे. गेल्या आठवड्यात मुख्य न्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील समितीने करनन् यांच्या बदलीचा आदेश दिला होता. या आदेशावर स्वतः करनन् यांनीच स्थगिती आणली होती. तसेच न्या. ठाकूर यांच्याकडे या संदर्भात स्पष्टीकरणही मागितले होते. यावरूनच सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की, न्या. करनन् यांच्याकडे कोणताही खटला देऊ नये. न्या. करनन् यांनी न्यायाधिशांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची चेतावणी दिली आहे.

साधकांनो, आश्रम पहाण्यासाठी जिज्ञासू बनून येणार्‍या पोलिसांपासून सतर्क रहा !

     सनातनचा एक आश्रम पहाण्यासाठी एक पोलीस पत्नीसह आला होता. रात्रीच्या वेळी आलेल्या या पोलिसाने प्रथम आपली ओळख पोलीस अशी करून न देता एक जिज्ञासू म्हणून दिली होती. त्याला दुसर्‍या दिवशी सकाळी आश्रम पहाण्यासाठी येण्यास सांगितल्यावर तो सकाळीही सपत्नीक आला. त्याला आश्रमात चालणार्‍या सेवांची माहिती दिल्यावर त्याने पोलीस असल्याचे उघड करत मला सनातनच्या राष्ट्र आणि धर्म विषयक कार्याची माहिती घेण्याची जिज्ञासा होती, असे सांगितले. त्याने आपण एका संप्रदायानुसार साधना करत असल्याची माहिती दिली. 
     सनातन संस्थेच्या आश्रमांतून राष्ट्र आणि धर्म विषयक कार्य चालत आहे. या विषयीची सर्व माहिती विविध अन्वेषण यंत्रणांना वेळोवेळी देण्यात आली आहे. 
     असे असतांना अशा प्रकारे आश्रमात येणारे पोलीस काय साध्य करू पहात आहेत ? पोलिसांनी त्यांची शक्ती विविध विद्यापिठांसह भारतभरात कार्यरत असणार्‍या देशद्रोह्यांना शोधण्यासाठी वापरल्यास देशातील आतंकवाद तरी अल्प होईल !

(म्हणे) कन्हैया कुमार निर्दोष आहे !

भाजपने सिन्हा यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे !
शत्रुघ्न सिन्हा यांचे राष्ट्रद्रोह्यांना पाठीशी घालणारे वक्तव्य !
  नवी देहली - जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यापिठातील (जेएन्यु) विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमार हा निर्दोष असून, त्याने भारताच्या विरोधात कोणतेही कृत्य केले नाही, असे मत भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले आहे. (देहली पोलिसांकडे कन्हैया कुमार याच्या राष्ट्रद्रोही कृत्यांचे ठसठशीत पुरावे असतांना, सिन्हा स्वत:ला पोलिसांपेक्षा अधिक शहाणे समजतात का ? - संपादक) संसदेवर आक्रमण करणार्‍या मंहमद अफजल याला वर्ष २०१३ मध्ये फाशी देण्यात आली होती, याचा निषेध करत जेएन्यूमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत कन्हैया कुमारने भारताच्या विरोधात घोषणा दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे कन्हैया कुमारसह अन्य काही विद्यार्थ्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली.

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
       वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आज आपण साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर कुटुंबियांना अनुभवायला मिळालेला आनंद आणि व्यक्त केलेली कृतज्ञता पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

लहानपणापासून धर्मशिक्षण न देण्याचा हा परिणाम आहे !

     खासगी आरोग्यसेवा हा शीघ्रगतीने पैसा कमवण्याचा धंदा झाला आहे. भारतातच नव्हे; तर जगभरातील डॉक्टरांमध्ये रुग्णांना लुटण्यासाठीच्या स्पर्धा चालू आहेत. त्यात भर म्हणून आरोग्य विमा कंपन्या खतपाणी घालत आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेने आताच जागे होऊन शासकीय वैद्यकीय सुविधा सुधारण्यावर भर द्यावा. - डॉ. पुनम सिंह, संचालक, दक्षिण पूर्व आशिया खंड विभाग, जागतिक आरोग्य संघटना.

नालासोपारा येथे मातृ-पितृ पूजन दिवस सोहळा उत्साहात साजरा !

     नालासोपारा - हिंदु गोवंश रक्षा समिती आणि शिवसेना संयुक्त नगर शाखा यांनी १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून येथे उत्साहात साजरा केला. या वेळी मुलांनी आपले माता-पिता यांचे पूजन केले. 
     या वेळी एक पालक म्हणाले, माता-पिता यांच्याविषयी आदर बाळगणे, हे धर्मशास्त्रात सांगितले आहे. श्री गणेशानेही पृथ्वीप्रदक्षिणा आपल्या मातापित्याला घातली. आमच्या मुलांनी जेव्हा आमचे पूजन केले, तेव्हा त्यांना वेगळा आनंद मिळाला. आपल्या आयुष्यात माता-पिता यांचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे त्यांना समजले. आम्हालाही पुष्कळ आनंद झाला. माता-पिता यांचे उपकार आपण फेडू शकत नाहीत; पण कृतज्ञतेची भेट म्हणून आपण त्यांची पूजा तरी करावी.

देशाच्या विरोधात कुणी काही बोलत असेल, तर शिक्षा व्हायलाच हवी ! - श्री श्री रविशंकर

      नवी देहली - देशाच्या विरोधात कुणी बोलत असेल, मग तो विद्यापिठात बोलत असो किंवा विद्यापिठाच्या बाहेर बोलत असो, त्याला कायद्याने शिक्षा मिळायलाच हवी. आणि शिक्षा द्यायची नसेल, तर कायदाच काढून टाका आणि देशभरात सांगून टाका की, देशविरोधी काहीही बोलल्यास काहीही कारवाई होणार नाही. तसेच काहीही बोलण्याची सूट असल्याची घोषणाच करून टाका, असे संतप्त मत श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले आहे.
श्री श्री पुढे म्हणाले की,
१. तो विद्यार्थी आहे आणि त्याने देशद्रोही वक्तव्य केले असेल, म्हणून तो योग्य कसा असू शकतो ?
२. कुणीतरी भडकवल्याशिवाय ही मुले असे काही बोलणार नाहीत.
३. जगातील कोणत्याही देशात जा, सर्वत्र देशद्रोहासाठी कायदा आहेच आणि देशद्रोहाचे कुणी उल्लंघन करत असेल, तर त्याला त्यानुसार शिक्षा मिळायलाच हवी.
४. कायदा ही एक शिस्त आहे, सामाजिक नियम आहे. स्वातंत्र्य ही एक वेगळी गोष्ट आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच. मात्र देशाविरोधी कुणी बोलत असेल, तर कारवाई व्हायलाच हवी.

शिवरायांच्या समुद्रसुरक्षेचा विसर पडल्यानेच आतंकवाद्यांकडून मुंबईवर आक्रमणाचे धाडस ! - पांडुरंग बलकवडे, इतिहासतज्ञ

    काणकोण, १७ फेब्रुवारी (वार्ता.) - शिवरायांनी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही आदींबरोबर पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच या पाश्‍चात्त्य आक्रमकांशी संघर्ष करून स्वराज्य स्थापन केले. यासाठी त्यांनी ३५० वर्षांपूर्वी स्वत:चे नौदल स्थापन केले. मालवणपासून बसरूरपर्यंत नौदल मोहीम यशस्वी केली. आज देशाला शिवरायांच्या समुद्रसुरक्षेविषयीच्या दूरदृष्टीचा विसर पडल्याने आतंकवादी शत्रूने सागरमार्गे मुंबईवर पर्यायाने देशावर आक्रमण करण्याचे धाडस केले, असे प्रतिपादन इतिहासतज्ञ श्री. पांडुरंग बलकवडे यांनी येथील डॉ. पुंडलिक गायतोंडे मैदानात आयोजित जाहीर सभेत केले.

शिष्यवृत्ती वाटपातील अपहाराप्रकरणी राज्यातील बोगस संस्थांची सूची सिद्ध करण्यास प्रारंभ

घोटाळ्यातील संबंधितांवर कठोरात कठोर कारवाईच करायला हवी !
     गडचिरोली - सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाकडून देण्यात येणार्‍या केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती वाटपातील अपहाराप्रकरणी गठीत केलेल्या विशेष चौकशी पथकाने (टास्क फोर्सने) प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला आहे. विशेष चौकशी पथकाला ६० दिवसांत मुख्य सचिवांकडे अहवाल सादर करायचा असल्याने पहिल्या टप्प्यात राज्यातील बोगस संस्थांची सूची सिद्ध करणे चालू आहे.
१. गडचिरोली प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये उघडकीस आलेला कोट्यवधींच्या शिष्यवृत्ती अपव्यवहारात सहभागी समाजकल्याण आणि आदिवासी प्रकल्प अधिकार्‍यांना निलंबित, तर अनेक संस्थाचालकांना अटक झाली असून त्यांची चौकशीही चालू आहे.

अधिकोषांच्या एटीएम् यंत्रणेवर दरोडा टाकणार्‍या टोळीला पोलिसांकडून अटक !

     कोल्हापूर - जिल्ह्यातील जयसिंगपूर-शिरोळ रस्त्यावरील बँक ऑफ बडोदा या अधिकोषाचे एटीएम् यंत्रणा फोडण्याच्या सिद्धतेत असणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी १२ फेब्रुवारीला रात्री २ वाजता अटक केली. याच टोळीने १० फेब्रुवारीला भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम् यंत्रणा फोडण्याचाही प्रयत्न केला होता; मात्र त्या वेळी सिलेंडरचा स्फोट झाल्याने या टोळीने पळ काढल्याची माहिती पोलिसांना दिली. विजय पाटील, महादेव लोहार, सुनील पाटील, बलराज केसरकर आणि सागर कमलाकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. पोलिसांनी या सर्वांकडून एका कारसह १ लक्ष ५५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.जेएन्यूला पाश्‍चात्त्य देशांमधून अर्थपुरवठा ! - डॉ. सुब्रह्यण्यम् स्वामी यांचा आरोप

डॉ. स्वामी यांचा सल्ला केंद्रशासन स्वीकारणार का ?
       नवी देहली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ भारतविरोधी आहे आणि त्याला पाश्‍चात्त्य देशांतून अर्थपुरवठा केला जातो, असा आरोप डॉ. सुब्रह्यण्यम् स्वामी यांनी केला आहे.
      डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, मेमधील परीक्षेनंतर चार महिने विद्यापिठाला बंद ठेवले पाहिजे. परत चालू करतांना प्रत्येकाकडून त्याचे भारतीय राज्यघटनेवर आणि अखंडतेवर विश्‍वास असल्याचे शपथपत्राद्वारे लिहून घ्यावे. मात्र ज्यांच्याविरुद्ध जिहादी, नक्षलवादी आणि आतंकवादी संघटनांचे सदस्य असल्याचे पुरावे मिळाले आहेत, त्यांना विद्यापिठातून बाहेर काढावे. ज्या विद्यार्थ्यांनी पदवीचा अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रत्येकी तीन वर्षांत पूर्ण केलेला नाही, त्यांनाही विद्यापिठाबाहेर काढावे. विद्यापिठाला शंभर टक्के शासकीय अनुदान असून विद्यापीठ संसद आणि लेखापरीक्षक यांना उत्तरदायी आहे.

पाणीपट्टी दरवाढीला जोरदार विरोध

     पुणे - प्रस्तावित पाणीपट्टीच्या दरवाढीविरोधात पुणे महानगरपालिका भवनात शिवसेना, मनसे आणि काँग्रेस यांनी १६ फेब्रुवारीला जोरदार विरोध दर्शवला. पुणे शहराला २४ घंटे पाणीपुरवठा योजनेसाठी १२ टक्के दरवाढ करण्यास स्थायी समितीने संमती दिली आहे. त्यानंतर पुढील ५ वर्षे प्रत्येकी १५ टक्के दरवाढ आणि त्यानंतर वर्ष २०४७ पर्यंत प्रत्येक वर्षी ५ टक्के दरवाढ होणार आहे. या दरवाढीच्या विरोधात नगरसेवक महापौरांच्या पुढ्यात आले. काहींनी याच्या निषेधार्थ टाळ वाजवत आंदोलन केले, तर काहींनी महापौरांची आरती केली.

हुसेन यांच्या चित्रांवर स्वत:हून बंदी घालावी, असे राज्यकर्ते आणि पोलीस यांना का वाटत नाही ? त्यासाठी मागणी का करावी लागते ?

     कळवा येथील आर्ट फेस्टीव्हल २०१६मध्ये पिकासो ते एम्.एफ्. हुसेन हे चित्रप्रदर्शनाचे दालन उघडण्यात येणार होते. या दालनात हिंदूंच्या देवता आणि भारतमाता यांची नग्न आणि अश्‍लील चित्रे काढून त्यांचा अवमान करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचा समावेश करण्यात येणार होता. या प्रदर्शनाच्या माध्यमातून चित्रकार हुसेन यांचे उदात्तीकरण करण्यात येणार होते. यावर आक्षेप घेत हिंदु जनजागृती समितीने हुसेन यांच्या चित्रांचा समावेश करण्यात येऊ नये, अशी मागणी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली होती, तसेच अन्य समविचारी संघटनांसमवेत पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करण्यात आली होती.

डायघर, ठाणे येथे हिंदु धर्मजागृती सभा !

दिनांक : शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०१६
वेळ : दुपारी ४ वाजता
स्थळ : प.पू. स्वामी डी.के. दास महाराज क्रीडांगण, डायघर गाव, कॅफेनगर, कल्याण फाटा, पो. पडले, ठाणे. 
संपर्क : ९२२१०६७७७७, ९३२४८६८९०६
आयोजक : डायघर ग्रामस्थ मंडळ, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती आणि हिंदु जनजागृती समिती

बंदुकीच्या पुंगळ्या आणि गोळी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्याचा न्यायालयाचा आदेश !

कॉ. पानसरे हत्या प्रकरण
      कोल्हापूर, १७ फेब्रुवारी (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावरील आक्रमणानंतर घटनास्थळी सापडलेल्या रिकाम्या पुंगळ्या आणि एक गोळी न्यायवैद्यक अन्वेषणासाठी केंद्रीय अन्वेेषण विभागाकडे (सी.बी.आय.कडे) सोपवण्याचा आदेश अतिरिक्त आणि सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी विशेष अन्वेषण पथकाला (एस्.आय.टी.ला) दिला आहे. अन्वेषणानंतर रिकाम्या पुंगळ्या आणि गोळ्या न्यायालयात सादर करण्याचे बंधनही त्यांच्यावर घालण्यात आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक एस्.आर्. सिंह यांनी येथील अतिरिक्त आणि सत्र न्यायाधीश बिले यांच्याकडे अर्ज करून वरील मागणी केली होती.

राजबारी जिल्ह्यातील मंदिराच्या प्राचीन मूर्ती आणि मौल्यवान वस्तू यांची धर्मांधांकडून चोरी !

बांगलादेशातील हिंदूंवर वाढत असलेल्या आक्रमणांचे आणखी एक उदाहरण !
तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या चष्म्यातून हिंदूंवरील आक्रमणे पाहू न शकणार्‍या 
प्रसारमाध्यमांचा निषेध करावा तितका थोडाच !
     ढाका (बांगलादेश) - बांगलादेशच्या राजबारी जिल्ह्यात श्री राधानाथ मंदिर नावाचे श्रीकृष्णाचे ३०० वर्षे प्राचीन मंदिर आहे. चट्टोपाध्याय या हिंदु कुटुंबाच्या मालकीचे असलेले हे मंदिर त्या भागात प्रसिद्ध असून या मंदिरातील देवतांच्या मूर्ती आणि इतर मौल्यवान वस्तू यांची नुकतीच चोरी झाली. या मंदिरातील चोरीची ही घटना काही नवीन नाही. 
१. वर्ष १९९४ मध्ये या मंदिरातील श्रीकृष्णाची ३०० वर्षे जुनी मूर्ती चोरण्यात आली होती. याविषयी चट्टोपाध्याय कुटुंबाने तक्रार करूनही आणि मूर्ती परत मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करूनदेखील काही उपयोग झाला नाही.
२. त्यानंतर या कुटुंबाने त्याच प्रकारची दुसरी मूर्ती बनवून तिची स्थापना केली. वर्ष २००४ मध्ये ती मूर्तीही चोरीला गेली.

इसिसजवळ रासायनिक शस्त्रे आहेत ! - जॉन ब्रेनन, सीआयएचे प्रमुख

इसिसच्या आतंकवादी कारवायांचा सामना करण्यासाठी भारताने काय सिद्धता केली आहे ?
     वॉशिंग्टन - इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेजवळ रासायनिक शस्त्रे असल्याचा दावा अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख जॉन ब्रेनन यांनी केला आहे. इसिसने यापूर्वीही अनेक घटनांमध्ये रासायनिक शस्त्रांचा वापर केला असल्याचे आम्हाला माहिती आहे, तसेच लहान प्रमाणात अशी शस्त्रे बनवण्याची त्यांची क्षमता आहे, असेही ब्रेनन यांनी म्हटले आहे. 
१. आर्थिक लाभासाठी इसिस पाश्‍चिमात्य देशांना या शस्त्रांची निर्यातही करू शकते. यामुळेच या संघटनेने शस्त्रास्त्रांची वाहतूक आणि तस्करी यासाठी वापरलेले मार्ग तोडून टाकण्याची आवश्यकता आहे, असा इशारा ही ब्रेनन यांनी दिला.

शरणार्थींनी त्यांना आश्रय दिलेल्या युरोपीय देशांच्या परंपरांचा आदर करायला हवा ! - आयर्लंडचे बिशप

     डब्लिन, आयर्लंड - आयर्लंडमध्ये २६ फेब्रुवारीला राष्ट्रस्तरीय निवडणुका होत आहेत. या दृष्टीने दक्षिण आयर्लंडच्या कॉर्क अ‍ॅन्ड रॉस या कॅथलिक चर्चच्या प्रशासनाने आयर्लंडसमोर असलेल्या प्रमुख समस्या मांडल्या आहेत. यामध्ये युरोपमध्ये येणार्‍या मुसलमान शरणार्थींच्या लोंढ्यांचा त्यांच्या देशावर होत असलेल्या परिणामावर चर्चने ताशेरे ओढले आहेत. युरोपात शरणार्थींचे संकट युरोपीय देशांच्या मूलभूत संस्कृतीला आव्हान देत असल्याचे मत बिशप डॉ. जॉन बुक्ले यांनी व्यक्त केले आहे. शरणार्थींनी प्रत्येक यजमान युरोपीय देशाची मूल्ये, कायदे आणि परंपरा यांचा आदर करायला हवा, असे डॉ. बुक्ले यांचे म्हणणे आहे. बुक्ले यांचे वक्तव्य अशावेळी आले आहे, जेव्हा सिरियाच्या शरणार्थींना मोठ्या प्रमाणात स्वीकारण्याचा आयर्लंडवर आंतरराष्ट्रीय दबाव आणला जात आहे.विजेचा झटका देणार्‍या काठ्या आणणारे पोलीस हिंदूंना गुंड आणि हिंसाचारी समजतात का ?

     धार (मध्यप्रदेश) येथे वसंतपंचमीच्या दिवशी संपूर्ण दिवस केवळ हिंदूंनाच भोजशाळेत जाण्याची अनुमती देण्यात यावी, या मागणीसाठी ८ फेब्रुवारी या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वाहनफेरी काढून हिंदूंमध्ये जागृती निर्माण केली. या वेळी शीघ्र कृती दलाच्या सैनिकांच्या हातात विजेचा झटका देणार्‍या लाठ्या आणि अत्याधुनिक शस्त्रे होती.

फलक प्रसिद्धीकरता

धर्मनिरपेक्षतावाद्यांसाठी दादरी असहिष्णु, तर कन्नूर सहिष्णुतेचे उदाहरण आहे का ?
     केरळच्या कन्नूरमध्ये संघाचा स्वयंसेवक पी.व्ही. सुजीत यांच्या हत्येनंतर आता येथील भाजपच्या कार्यालयावरही अनेक बॉम्ब फेकण्यात आले आहेत. या घटनांमागे माकप पक्षाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Kannur (Keral) me RSS swayamsevakki hatyake paschat BJP karyalaypar bhi anek bamodwara akraman hua.
In atyacharopar ab media chup kyon ? 
जागो ! : कन्नूर (केरल) में संघ स्वयंसेवक की हत्या के पश्‍चात भाजपा कार्यालय पर भी अनेक बमोंद्वारा आक्रमण हुआ. 
इन अत्याचारों पर अब मीडिया चुप क्यों ?

मुंबईत जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यापीठ निर्माण झाल्यास बजरंग दल त्याला योग्य प्रकारे उत्तर देईल ! - शंकरजी गायकर, कोकण प्रांत प्रमुख, बजरंग दल

आझाद मैदान, मुंबई येथे बजरंग दलाकडून निषेध आंदोलन 
आंदोलनात सहभागी कार्यकर्ते
      मुंबई - भारतात अशा घटना आम्ही कधीही सहन करणार नाही. देशातील अनेक गल्ल्यांमध्ये पाकिस्तान झाले आहेत. ते निर्माण करणार्‍यांना धडा शिकवणे, हे आपले कर्तव्य आहे. मुंबईमध्ये जर असे जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यापीठ निर्माण झाले, तर बजरंग दल त्याला योग्य प्रकारे उत्तर देईल ! देशविरोधी घोषणा देणार्‍यांवर कारवाई न झाल्यास बजरंग दल न्यायालयातही जाण्यास सिद्ध आहे, असे प्रतिपादन बजरंग दलाचे कोकण प्रांत प्रमुख श्री. शंकरजी गायकर यांनी केले. नवी देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील राष्ट्रद्रोही घटनेच्या विरोधात येथील आझाद मैदानात बजरंग दलाने निषेध आंदोलन केले. या वेळी ते बोलत होते.

बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करा !

शेकडो बलुचिस्तानींचे व्हाईट हाऊससमोर आंदोलन
    वॉशिंग्टन - बलुचिस्तानला पाकिस्तानच्या नियंत्रणातून मुक्त करावे, यासाठी शेकडो बलुचिस्तानींनी नुकतेच अमेरिकेतील व्हाईट हाऊससमोर आंदोलन केले. या वेळी या प्रकरणात अमेरिकेने हस्तक्षेप करून तेथे नाटो सैन्य तैनात करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. हे आंदोलन बलूच नॅशनल मूव्हमेंट या संघटनेने आयोजित केले होते. या वेळी बलूच नॅशनल मूव्हमेंटकडून त्यांच्या नेत्यांच्या हत्येविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. संघटनेचे महासचिव डॉ. मन्नच बलूच यांची पाकच्या सैन्याकडून हत्या करण्यात आल्याविषयी संघटनेने पाकिस्तानवर टीका केली. या संघटनेच्या मते पाकिस्तानपासून बलुचिस्तान मुक्त झाले, तरच तेथे सुरक्षा आणि स्थिरता प्राप्त होऊ शकते. पाकिस्तानने बलुचींची भूमी, ग्वादर बंदर, नैसर्गिक वायू, खनिज, तांबे आणि सोन्याच्या खाणी असलेला प्रदेश कह्यात घेतला असून त्यांच्याकडून सर्व सामान्य नागरिकांना अमानुषपणे ठार मारण्यात येत आहे. या आंदोलनात सहभागी व्हाईस फॉर बलूच मिसिंग पर्सनचे उपाध्यक्ष मामा अब्दुल कादिर बलूच म्हणाले, आतापर्यंत अनुमाने ३५ सहस्र बलूची बेपत्ता झाले असून यामागे पाकचे सैन्य आणि गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा हात आहे.

मुसलमान महिलांनी हिजाब उतरवून आधुनिक व्हावे ! - जर्मनीतील एक मुसलमान महिला खासदार

महिला खासदाराला ठार मारण्याच्या धमक्या !
     बर्लिन (जर्मनी) - जर्मनीमधील ग्रीन पक्षाच्या खासदार आणि प्रमुख मुसलमान नेत्या एकिन डेलिगोज यांनी मुसलमान महिलांना हिजाब (डोके आणि केस झाकण्याचा रूमाल) उतरवून आधुनिक बनण्याचे आवाहन केल्यामुळे त्यांना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. डेलिगोज या स्वत: मुसलमान आहेत. त्यांचा जन्म तुर्कस्थानमध्ये झाला असून त्या जर्मनीत वाढल्या आहेत. त्यांनी वृत्तपत्रात एक लेख लिहिला असून त्यात त्यांनी मुसलमान महिलांच्या हिजाबविषयी टिप्पणी केली होती. हा लेख प्रकाशित होताच त्याविषयी सर्वत्र चर्चा चालू झाली. धर्मांध मुसलमानांना जेव्हा यासंदर्भात माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी या मुसलमान महिला खासदाराला ठार मारण्याची धमकी दिली. या पार्श्‍वभूमीवर जर्मनीचे एक मंत्री वोल्फगँग एश्‍चाब्ल यांनी या मुसलमान खासदाराच्या बाजूने उभे रहाण्याचे आवाहन केले आहे. तुर्की वृत्तपत्रांनी त्यांना टर्किश नाझी संबोधले असून मानवजातीला कलंक असल्याचे म्हटले आहे. जर्मनीतील तुर्की समाजाचे अध्यक्ष केनन कोलात म्हणाले, खासदार डेलिगोज यांचे वक्तव्य चुकीचे आहे; मात्र त्यांना असे करण्याचे स्वातंत्र्य आहे. डलिगोज त्यांच्या टिप्पणीवर कायम असून त्यांनी मागे हटण्यास नकार दिला आहे.

समीर सरदानावर लक्ष ठेवण्याची गोवा पोलिसांची डेहरादून आणि मुंबई पोलीस यांच्याकडे मागणी

असे होते, तर जामीनच का दिला ? आधी संशयिताला मोकळे सोडून नंतर 
लक्ष ठेवण्यासाठी वेळ आणि शक्ती वाया घालवणारे गोवा पोलीस ! 
    पणजी - इसिस या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून वास्को रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलिसांनी अटक केलेला आणि पुढे ठोस पुराव्याअभावी न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केलेला समीर सरदाना याच्यावर लक्ष ठेवण्याची मागणी गोवा पोलिसांनी डेहरादून आणि मुंबई पोलिसांकडे केली आहे.
  पोलीस सूत्रांनुसार न्यायालयाच्या आदेशानुसार समीर सरदाना गोवा पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकासमोर १५ फेब्रुवारीपर्यंत चार दिवस उपस्थित राहिला. समीर सरदाना याच्याकडे मिळालेली माहिती चिकित्सेसाठी पाठवली आहे आणि यासंबंधीचा अहवाल येण्यास उशीर लागणार आहे. उत्तराखंड आणि मुंबई पोलिसांनी समीरसंबंधी माहिती पुरवली आहे. गरज भासल्यास समीरला पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार आहे. समीरकडे पोलिसांना सहा पारपत्र, एक भ्रमणसंगणक, चार भ्रमणभाष, ३२ भ्रमणभाष सिमकार्ड सापडले होते आणि एक भ्रमणभाष सिमकार्ड पाकिस्तानमधील असल्याचा दावा अन्वेषण यंत्रणांनी केला होता. पोलिसांना समीरच्या ३५ इमेल खात्यांपेकी ६ खाती उघडण्यासाठी पासवर्ड प्राप्त झाले आहेत.

इंग्रजी माध्यमाच्या १३३ शाळांना अनुदान चालूच राहील ! - लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री

गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍न !
     डिचोली - प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हायला पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे; मात्र इंग्रजी माध्यमातील १३३ प्राथमिक शाळांना शासकीय अनुदान चालूच रहाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी झांट्ये सभागृह, डिचोली येथे डिचोली तालुका भाजप मेळाव्यात दिली. (मराठी शाळा खाजगी आस्थापनांना दत्तक देण्याचा शासन विचार करत असतांना इंग्रजी शाळांवर अनुदानाची खैरात का केली जात आहे, याचे उत्तर मुख्यमंत्री देतील का ? शासन राजकीय स्थितीनुसार भूमिका पालटते, असे कोणाला वाटल्यास त्यात गैर ते काय ? - संपादक) या वेळी भाजप शासनातील विविध मंत्री आणि नेते यांची उपस्थिती होती. चर्चसंस्था चालवत असलेल्या इंग्रजी माध्यमातील १३३ प्राथमिक शाळांना शासकीय अनुदान रहित करावे, या अनुषंगाने मातृभाषाप्रेमी आणि भारतीय भाषा सुरक्षा मंच यांनी राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. या विषयाला अनुसरून मुख्यमंत्री पार्सेकर यांनी भाजपची उपरोल्लेखित भूमिका स्पष्ट केली.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएन्यु) हा साम्यवाद्यांचा देशविरोधी कारवायांचा अड्डाच !

श्री. सुरेश चिपळूणकर
     नरेंद्र मोदी शासन सत्तेवर आल्यापासून देशात असहिष्णुता निर्माण झाली असल्याचा कांगावा पुरोगामी विचारसरणीचे लेखक, साहित्यिक आणि कलाकार यांनी ४-५ मासांपूर्वी केला होता. या षड्यंत्रामागील मूळ कोण आहे, ते सांगणारा हा लेख श्री. सुरेश चिपळूणकर यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांच्या ब्लॉगवर प्रसारित केला होता. या लेखात त्यांनी हे तथाकथित पुरोगामी लेखक, साहित्यिक आणि कलाकार जवाहरलाल नेहरू विद्यापिठातूनच या संदर्भात शिक्षण घेतात, असे म्हटले आहे. सध्याची नेहरू विद्यापिठातील देशद्रोहाची घटना पहाता त्यांचे म्हणणे किती रास्त आहे, याचा अनुभव आपण घेत आहोत. या अनुषंगाने नोव्हेंबर २०१५ मधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या स्वरूपातील सहिष्णुता आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांवर प्रकाश टाकणारा हा लेख वाचकांसाठी येथे देत आहोत.

दीड महिन्यात १२४ शेतकर्‍यांच्या आत्महत्या !

बहुतांश जनता धर्माचरण करत नसल्यामुळेच 
समाजाची अशी दुःस्थिती झाली आहे. जनतेने साधना 
केल्यासच ईश्‍वराची कृपा होऊन ही स्थिती पालटू शकते !
      मुंबई - या दीड महिन्यात राज्यभरात १२४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे राज्यशासनाने मुंबई न्यायालयात सांगितले. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांविषयी मुंबई न्यायालयात सुमोटो याचिकेवर सुनावणी चालू आहे. त्या वेळी ही माहिती सांगण्यात आली.

उत्तरप्रदेशात हिंदूंचे नेतृत्व हवे !

    गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील गोरखनाथ मंदिराच्या संत सभा-चिंतन बैठकीत उपस्थित एक सहस्रहून अधिक साधू-संतांच्या समक्ष महंत महामंडलेश्‍वर नारायणगिरी यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटले होते की, राममंदिराच्या निर्मितीसाठी उत्तरप्रदेशात एक सशक्त हिंदु मुख्यमंत्री असणे आवश्यक आहे, जो राममंदिरासाठी सर्व प्रकारच्या त्यागासाठी सिद्ध असेल. या प्रस्तावास अनुमोदन देतांना भाजपचे खासदार महंत योगी आदित्यनाथ यांच्या नावाच्या घोषणा साधू-संतांनी दिल्या. या प्रस्तावातील मागणी लक्षवेधी आहे. हिंदु हा सहिष्णु असल्याने त्याच्या छत्रछायेखाली अन्य पंथीय निश्‍चिंतपणे राहू शकतात.

(म्हणे) जेएन्यूच्या विद्यार्थ्यांवरील कारवाई अन्यायकारक !

राष्ट्रद्रोही घोषणा देणार्‍यांची बाजू घेणारे प्रकाश आंबेडकर यांचा कांगावा !
      पुणे, १७ फेब्रुवारी - जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यूमध्ये) ज्यांनी घोषणा दिल्याच नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. घोषणा कोणी दिल्या, त्याचे चित्रीकरण असतांना कन्हैय्या नावाच्या विद्यार्थ्याकडून पोलीस वदवून घेऊ पहात आहेत. सुखबीरसिंहने खलिस्तानवादी घोषणा दिल्याने देशद्रोह ठरत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये घोषणा दिल्यावरून विद्यार्थ्यांवर कारवाई करणे अन्यायकारक आहे. अफझलला फाशी देऊ नका, अशी भूमिका मी घेतली होती. माझ्यावर कारवाई करून दाखवावी; पण ते करणार नाहीत, अशी दर्पोक्ती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर त्यांनी केली.
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
-- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

परोपकार हेच सर्वश्रेष्ठ पुण्यकर्म !

      विधात्याने जय-विजयला त्या वर्षी स्वर्गात कुणाला सन्मानाने प्रवेश दिला जावा ?, हे शोधून काढण्यासाठी पाठवले. दोन्ही दूत सगळीकडे फिरून सज्जन आणि भक्तजन यांविषयीच्या माहितीची नोंद करून घेत होते. एकदा त्यांनी रस्त्याच्या कडेला दिवा लावून बसलेला एक अंध वृद्ध माणूस पाहिला. देवदूतांनी विचारले, हे वृद्ध माणसा, घरापासून दूर आणि तुला दृष्टी नसतांनाही तू दिवा लावून रात्रभर जागत बसला आहेस. याचे कारण आम्हाला कळले नाही. तो वृद्ध माणूस म्हणाला, आपण जे काही करतो, ते केवळ आपल्यासाठीच असावे, हे आवश्यक आहे का ? या जगातील सगळे लोक आपलेच आहेत. येथून रात्री जाणार्‍या लोकांना अडखळून पडण्यापासून वाचवण्यातच मला संतोष आणि आनंद मिळतो. स्वार्थ ठेवून जगण्यापेक्षा हा लाभ काय वाईट आहे का ? देवदूत आपले निरीक्षण करून परतले आणि त्यांनी विधात्याला आपले विवरण सांगितले असता तो आंधळाच सर्वश्रेष्ठ ठरला ! मग देवतांनी आपल्या खांद्यावर पालखी घेऊन त्याला स्वर्गात आणले आणि त्याला पुण्यात्म्यांपेक्षाही वरिष्ठ लोकांच्या जागी ठेवले. (संदर्भ : अखंड ज्योती, जानेवारी २००१) उज्जैन कुंभमेळ्यासाठी पुढील साहित्याची विनामूल्य उपलब्धता करून देऊन राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात हातभार लावा !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     २२.४.२०१६ ते २१.५.२०१६ या कालावधीत उज्जैन (मध्यप्रदेश) येथे सिंहस्थ पर्व असणार आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मप्रसारासाठी कुंभस्थळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कुंभपर्वासाठी येणार्‍या भाविकांना धर्मशिक्षण देण्यासाठी विविध प्रदर्शनकक्ष लावण्यात येणार आहेत. त्याकरता तंबू उभारण्यासाठी हिरव्या रंगाच्या २,४०० फूट जाळीदार कापडाची (नेटलॉनची) आवश्यकता आहे. 
     कुंभपर्वाच्या कालावधीत उज्जैन येथे कडक उन्हाळा असल्याने सेवेमध्ये सहभागी होणार्‍या साधकांना उष्णतेचा तीव्र त्रास होऊ शकतो.

भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवेद्वारे श्रीगुरूंचे मन जिंकणारे श्री. दादा कुंभार, श्री. प्रकाश सुतार आणि श्री. राजू सुतार यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

परिपूर्ण सेवा करून स्वतःत साधकत्व निर्माण करणारे कामगार 
श्री. बाबूलाल चौधरी आणि श्री. बसू ठाणेद हेही जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !
डावीकडून (उभे असलेले) श्री. राजू सुतार, श्री. बसू ठाणेद, 
श्री. प्रकाश सुतार, (बसलेले) श्री. दादा कुंभार, पू. डॉ. मुकुल गाडगीळ, श्री. बाबूलाल चौधरी
      रामनाथी, १७ फेब्रुवारी (वार्ता.) - साधकात ईश्‍वराप्रती भाव असेल, तर त्याची साधनेत किती जलद उन्नती होऊ शकते, हे साधकांना आज अनुभवायला मिळाले. आश्रमातील लागवड विभागात सेवा करून स्वतःच्या मनातच भाव-भक्तीची बाग फुलवणारे श्री. दादा कुंभार (वय ५३ वर्षे), स्वयंपाकघराच्या नूतनीकरणाच्या आणि इतर सेवा अत्यंत भावपूर्ण आणि परिपूर्ण करून श्रीगुरूंचे मन जिंकणारे सुतार विभागातील साधक श्री. प्रकाश सुतार (वय ३६ वर्षे), सनातन-निर्मित श्री गणेशमूर्ती घडवण्याची असो कि आश्रमातील महत्त्वाच्या सोहळ्यांचे छायाचित्रण असो, प्रत्येक कृती सत्यम् शिवम् सुंदरम् करणारे श्री. राजू सुतार (वय ३३ वर्षे) आणि प्रथम कामगार म्हणून आश्रमात बांधकामासाठी आलेले अन् अत्यंत परिपूर्ण सेवा करून आता सनातन कुटुंबाचेच सदस्य बनलेले साधक कामगार मूळचे बिहार येथील श्री. बाबूलाल चौधरी (वय ४९ वर्षे) आणि मूळचे बिजापूर (कर्नाटक) येथील श्री. बसू ठाणेद (वय ४२ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे एका अनौपचारिक सोहळ्यात घोषित करण्यात आले. सनातनच्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांच्या प्रगतीची घोषणा केली, तसेच अन्य साधकांनीही असेच प्रयत्न करून साधनेतील आनंद मिळवावा, असे मार्गदर्शन केले. साधनेत प्रगती करण्यासाठी स्वतःतील स्वभावदोष-अहंच्या अडथळ्यांवर भावजागृतीच्या प्रयत्नांद्वारे कशी मात करावी ?, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एक सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी भावपूर्ण सेवेच्या तात्त्विक मार्गदर्शनासमवेत प्रायोगिक भागही अनुभवण्यास मिळाल्यामुळे साधकांना प्रयत्न कसे करावे ?, याचे मूर्तीमंत उदाहरणच पहायला मिळाले. या सोहळ्याला आश्रमातील बांधकाम आणि चित्रीकरण विभागातील साधकांसमवेत श्री. दादा कुंभार यांच्या पत्नी सौ. राजश्री कुंभार, श्री. प्रकाश सुतार यांची आई श्रीमती सुतार, पत्नी सौ. प्रचीती सुतार, वहिनी सौ. सिद्धी सुतार, तर श्री. राजू सुतार यांची पत्नी सौ. साधना सुतार, सासरे श्री. केरेमणीबाबा आणि सासूबाई सौ. केरेमणी उपस्थित होत्या.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे गांभीर्य नसल्याने स्वतःसह साधकांच्या साधनेची अन् गुरुकार्याची हानी करणारी एक अहंभावी कार्यकर्ती !

      काही दिवसांपूर्वीच्या हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय स्तरावरील सत्संगात एका राज्यातील प्रसारसेवेचे दायित्व पहाणार्‍या कार्यकर्तीकडून झालेल्या गंभीर चुका घेण्यात आल्या. या अक्षम्य चुका पुढे देत आहे.
१. कार्यकर्तीच्या साधनेची दयनीय स्थिती !
१ अ. साधनेऐवजी बाह्य गोष्टींकडे कल असणे : सहसाधिकांशी साधनेतील प्रयत्नांविषयी चर्चा करण्याऐवजी विनोदी प्रसंग, गमती-जमती या संदर्भात बोलण्याकडे, तसेच इतरांची मस्करी करण्याकडे या कार्यकर्तीचा अधिक कल असायचा. अशा प्रकारे बाह्य गोष्टींकडे कल असल्याने तिच्यात बहिर्मुखताही अधिक प्रमाणात होती.

साधकांनो, महाशिवरात्रीच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनात ग्रंथ वितरणावर अधिकाधिक भर देऊन धर्मप्रसाराच्या अमूल्य संधीचा लाभ घ्या !

७.३.२०१६ या दिवशी महाशिवरात्र आहे. त्या संदर्भातील काही सूत्रे पुढे देत आहे. 
१. साधकांनो, ग्रंथविक्रीसाठी तळमळीने प्रयत्न करून 
सनातनने प्रकाशित केलेली ग्रंथसंपदा सर्वदूर पोचवा !
     अखिल विश्‍वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यासाठी, तसेच जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यासाठी सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा असणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावतांना अधिकाधिक ग्रंथविक्री करण्यासाठी साधकांनी प्रयत्न करावेत. प्रदर्शनस्थळी जास्तीतजास्त ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील, असे उत्तरदायी साधकांनी पहावे. जागेअभावी काही ग्रंथ प्रदर्शित करणे शक्य नसेल, तर ग्रंथांची माहिती विशद करणारी ग्रंथसूची प्रदर्शनावर ठेवावी. अशा वेळी शक्य असल्यास नवीन प्रकाशित झालेल्या ग्रंथांचा वेगळा डिस्प्ले करू शकतो. 
२. महाशिवरात्रीचे औचित्त्य साधून पुढील ग्रंथ आणि
लघुग्रंथ यांच्या वितरणासाठी विशेष प्रयत्न करा !
२ अ. ग्रंथ
२ अ १. देवता, धार्मिक कृती, आचारधर्म आदींविषयीचे ग्रंथ

रामनाथी आश्रमातील एका खोलीमध्ये नामजपाला बसल्यावर डोक्याच्या वर संवेदना जाणवून ध्यान लागणे आणि स्वतः शून्य झाल्यासारखे वाटणे

श्री. नंदकुमार कैमल
     १.९.२०१४ या दिवशी सायंकाळी ४.४५ वाजता एका खोलीत नामजपाला बसल्यावर डोक्याच्या वरच्या भागावर संवेदना जाणवू लागल्या. थोड्याच वेळात ध्यान लागल्यासारखे झाले. थोड्या वेळाने केवळ अस्तित्व आहे, शरीर नाही, असे अनुभवू लागलो. मी शून्य (शरीर पूर्ण वितळून गेल्यासारखा) झालो आहे, असे वाटले. त्या वेळी सायंकाळचे ५.१५ वाजले होते. त्या वेळी पुष्कळ चांगली स्थिती होती.
प्रश्‍न : प.पू. डॉक्टर, त्या वेळी नेमके काय घडले ?
डॉ. आठवले : देहबुद्धी अल्प झाली होती.
- श्री. नंदकुमार कैमल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०१४)

संतांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व !

आध्यात्मिक त्रास आणि साधनेतील अडचणी यांविषयी 
पू. (सौ.) बिंदाताईंशी बोलल्यावर स्वतःत जाणवलेले पालट 
        पू. बिंदाताईंच्या मार्गदर्शनामुळे हळूहळू प्रयत्न चालू झाले. मला ईश्‍वराला अपेक्षित असे प्रयत्न वाढवण्याची शक्ती द्यावी आणि माझ्याकडून प्रयत्न करून घ्यावेत, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना आहे.
- श्री. नंदकुमार कैमल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०१४)

प्रेमभाव आणि उत्कट भाव यांचा अपूर्व संगम असलेले प.पू. पांडे महाराज !

प.पू. पांडे महाराज
     माघ शुक्ल पक्ष दशमी या तिथीला प.पू. पांडे महाराज आणि प.पू. डॉक्टर यांची प्रथम भेट झाली होती. प.पू. पांडे महाराजांना त्या वेळी झालेल्या साक्षात्काराने त्यांनी प.पू. डॉक्टरांच्या चरणी आपल्या भावाश्रूंनी अभिषेक केला. प्रथम भेटीतच प.पू. डॉक्टरांमधील अलौकिकत्व ओळखणार्‍या प.पू. पांडे महाराजांच्या दृष्टीने गुरुभेटीचा जीवनातील हा अमूल्य दिवस असल्याने तो दिन ते आपला जन्मदिवस म्हणून मानतात. या वर्षी ही तिथी १७.२.२०१६ या दिवशी झाली. त्या निमित्ताने साधकांनी अनुभवलेली त्यांची वैशिष्ट्ये, अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढील लेखांतून देत आहोत.
       वर्ष २००९ ते २०११ या कालावधीत मी देवद आश्रमात रहाण्यास होते. तेव्हा माझा आध्यात्मिक त्रास पुष्कळ प्रमाणात वाढला होता. त्रासाच्या निमित्ताने प.पू. पांडे महाराजांचा जवळून सत्संग मिळाला. प.पू. बाबांच्या संदर्भात जाणवलेली काही सूत्रे येथे देत आहे.

रामनाथी आश्रमात वेगवेगळ्या ठिकाणी असतांना जाणवलेली सूत्रे

प्रश्‍न : प.पू. डॉक्टर, अशा वेगवेगळ्या अनुभूतींतून देवाला काय शिकवायचे आहे ?, हे समजले नाही.
डॉ. आठवले : काळानुसार मनाची स्थिती पालटते. त्यामुळे वेगवेगळ्या अनुभूती येतात.
(निरीक्षणाचा कालावधी : साधारण १ आठवडा)
- श्री. नंदकुमार कैमल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०१४)

पदोपदी, क्षणोक्षणी चुकते रे देवा मी ।

सौ. अश्‍विनी साळुंके
पदोपदी, क्षणोक्षणी चुकते रे देवा मी ।
चुकून अशी तुझ्यापासून दूर जाते रे देवा मी ॥ १ ॥
चुकांची जाणीव करून देतोस तू समष्टीतूनी ।
स्वीकारल्या जाऊ दे मज त्या अंतर्मनातूनी ॥ २ ॥
निर्माण होऊ दे खंत या अपराधी मनी ।
न घडो ती पुन्हा चूक पुढच्या क्षणी ॥ ३ ॥

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
अमृत आणि विष अमृतको जहरका डर होता है ।
भावार्थ : अमृत प्यायलेल्यालासुद्धा जहर म्हणजे विष घेतले, तर आपण मरू कि काय, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते; मात्र सर्व संकटांतून गेलेल्याला कशाचीच भीती वाटत नाही. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     नोकरी करायची असेल, तर कोणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीबद्दल थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधना 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    समुद्रातील वादळे अल्पकाळात नाहीशी होतात; पण मनातील वादळे एकदा निर्माण झाली की, ती आवरणे अतिशय कठीण; म्हणून ती निर्माण होऊ न देण्यासाठी साधना करणेच श्रेयस्कर ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

इन्द्राय स्वाहा, तक्षकाय...!

संपादकीय
    ज्याप्रमाणे गुन्हेगाराचा मूकसंमतीदार हा गुन्हेगारच असतो आणि कायद्याप्रमाणे दोषीही ठरतो, अगदी तसेच आतंकवाद्यांचे समर्थक हे त्यांच्या विचारांचेच असतात अन् म्हणून तेही तितकेच दोषी ठरतात. तक्षकाला अभय देणार्‍या साक्षात् इंद्र देवालाही जेथे तत्त्वनिष्ठपणे कठोरात कठोर शिक्षा ठोठावली गेली, तेथे आजच्या जिहादी आतंकवाद्यांच्या उपटसुंभ समर्थकांची काय तमा ? यातून संदेश मिळतो, तो समष्टी हितासाठी म्हणजेच समाजहितासाठी कठोरात कठोर पावले उचलण्याचा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn