Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

वासुदेव बळवंत फडके स्मृतीदिन

देशद्रोही प्राध्यापक गिलानी यांना अटक !

देशद्रोह्यांवर तात्काळ कारवाई झाली, तरच त्यांना अटक 
करण्याच्या कृतीची परिणामकारकता टिकून राहील ! 
     नवी देहली - भारतविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून देहली विद्यापिठाचे माजी प्राध्यापक एस्.ए.आर्. गिलानी यांना १६ फेब्रुवारीला देशद्रोहाच्या अंतर्गत अटक करण्यात आली. (गिलानींसारखे प्राध्यापक विद्यापिठात असतील, तर विद्यार्थी आतंकवाद्यांच्या समर्थनार्थच घोषणाबाजी करणार, यात आश्‍चर्य ते काय ! देशातील सर्वच विद्यापिठांतील प्राध्यापकांच्या मानसिकतेची चौकशी करण्याची आज आवश्यकता आहे. - संपादक) ९ फेब्रुवारीला गिलानी यांनी देहलीच्या प्रेस क्लबमध्ये अफझल आणि मकबूल भट यांना हुतात्मा संबोधून काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी घोषणा दिल्या होत्या. देशविरोधी घोषणाबाजी केल्याने देहली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संसदेवरील आक्रमणाच्या प्रकरणी प्रा. गिलानी यांना १२ डिसेंबर २००१ या दिवशी अटक करण्यात आली होती; मात्र देहली उच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली होती

संसदेवरील आक्रमणातील हुतात्म्यांचे नातेवाईक आंदोलन करणार !

     नवी देहली - संसदेवरील आक्रमणातील हुतात्म्यांच्या नातेवाइकांनी आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. त्यांनी ऑल इंडिया अँटी-टेररिझम फ्रंटचे अध्यक्ष एम्.एस्. बिट्टा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापिठात राष्ट्र्रविरोधी घोषणाबाजी करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार्‍यांची मागणी केली आहे.
अफझलला हुतात्मा संबोधणार्‍यांना कुस्तीपटू योगेश्‍वर दत्त यांनी फटकारले ! 
     ऑलम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता कुस्तीपटू योगेश्‍वर दत्त यांनी फेसबूकवर प्रतिक्रिया नोंदवतांना एक कविता पोस्ट केली आहे. यात त्यांनी विचारले आहे की, अफझलला हुतात्मा संबोधले, तर सियाचिनमध्ये हुतात्मा झालेल्या हनुमंतप्पाला काय म्हणाल ? ही पोस्ट सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. (म्हणे) पोलिसांनी राजकीय दबावापोटी कन्हैया याला केली अटक !

मायावती यांचेही देशद्रोह्यांना समर्थन !
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांची री ओढत जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या प्रकरणी भाजप आणि संघ यांच्यावर टीका केली. मायावती म्हणल्या की, केंद्रशासन संघाची नीती लागू करण्याचा प्रयत्न करण्यासाठी या विद्यापिठाला देशविरोधी ठरवत आहे. मायावती यांनी कन्हैया कुमार यांची अटक राजकीय दबावापोटी करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

देहली उच्च न्यायालयाने एन्आयएची मागणी फेटाळली !

     नवी देहली - जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या प्रकरणी चौकशी करण्याची अनुमती देण्यात यावी, अशी मागणी करणारा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्आए)चा अर्ज देहली उच्च न्यायालयाने फेटाळला. देहली पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत असून ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अन्वेषणाची मागणी करणे उतावळेपणाचे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. (देहली पोलिसांनी आता या प्रकरणाचे लवकरात लवकर अन्वेषण करून देशद्रोह्यांना गजाआड करावे, अशीच जनतेची मागणी राहील अन्यथा एन्आयएकडेच हे प्रकरण द्यावे लागेल, असेही जनतेला वाटू शकेल ! - संपादक) हे प्रकरण आतंकवादाच्या संदर्भात असल्याचे सांगत एन्आयएने ही मागणी केली होती.

जम्मू-काश्मीर चीनचा भाग !

ट्विटरचा भारतद्वेष !
     नवी देहली - भारताचा अविभाज्य भाग असलेला जम्मू-काश्मीर हा भाग ट्विटरने चीनमध्ये असल्याचे दर्शवले आहे. ट्विट करतांना जर जम्मू-काश्मीर (लोकेशन) निवडण्याचा प्रयत्न केला, तर तो भाग चीनमध्ये असल्याचे दर्शवण्यात येत आहे.

(म्हणे) पाकिस्तान झिंदाबाद ही घोषणा देणे देशद्रोह नाही !

काँग्रेसी राजवटीतील महाधिवक्ता सोली सोराबजी यांचे मत
     नवी देहली - भारतात पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा दिली जाणे, हे दुर्भाग्यपूर्ण असले, तरी तो देशद्रोह होऊ शकत नाही, असे मत भारत शासनाचे माजी महाधिवक्ता सोली सोराबजी यांनी व्यक्त केले आहे. (ज्या देशात शत्रू राष्ट्राच्या समर्थनार्थ घोषणा देणे राष्ट्रद्रोह होत नाही, त्या देशात देशद्रोह्यांचे पीक आल्यास नवल नाही ! - संपादक) माजी महाधिवक्ता सोराबजी म्हणाले, भारत एक हुकूमशाही देश आहे, अशी घोषणाबाजी करण्यात आली असती, तर तो देशद्रोहाचा गुन्हा ठरला असता. भादंवि कलम १२४ (अ) नुसार, देशद्रोह म्हणजे तुमच्या घोषणाबाजीने जेव्हा सार्वजनिक व्यवस्थेला बाधा येते किंवा हिंसेला प्रवृत्त केले जाते तेव्हा तो राष्ट्रद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो, असे कायदा म्हणतो. लोकांना त्यांचा मूलभूत अधिकार मिळायलाच पाहिजे. मूलभूत अधिकाराला विरोध करणे चुकीचे आहे.

उत्तरप्रदेशच्या रामपूरमध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा !

अशा देशद्रोह्यांना पाकमध्ये पाठवा !
     मुझफ्फरनगर - येथील शिवरापूरम कॉलनीमध्ये १५ फेब्रुवारीच्या रात्री दुचाकीवरून आलेल्या काही युवकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि पलायन केले. या संदर्भात कॉलनीतील लोकांनी पोलिसांना कळवल्यावर पोलीस तेथे पोहोचले. अजून या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मुसलमान समाजाने महिलांना त्यांचे अधिकार दिलेले नाहीत ! - जमात-ए-इस्लामी हिंद

मुसलमान महिलांवर होणार्‍या अत्याचारांवर प्रसारमाध्यमे आणि 
धर्मनिरपेक्षतावादी मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !
     देहली - इस्लाममध्ये महिलांना कोणतेही शिक्षण घेण्यापासून मज्जाव करण्यात आला नसल्याचे मत जमात-ए-इस्लामी हिंद या भारतातील मुख्य मुसलमान संघटनेने व्यक्त केले आहे. संघटनेचे महासचिव मोहम्मद सलीम इंजीनियर यांनी हेही स्पष्ट केले की, भारतातील मुसलमान समाजाने आतापर्यंत महिलांना त्यांचे पूर्ण अधिकार दिलेले नाहीत. अशा वेळी मुसलमान महिलांना त्यांचे अधिकार पूर्ण स्वरूपात मिळावेत, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. (हिंदु धर्म महिलांशी भेदभाव करतो, असा खोटा प्रचार करून जोरजोरात ओरडणार्‍या स्त्रीमुक्ती संघटना, धर्मनिरपेक्षतावादी आता काहीच बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या ! - संपादक)

दक्षिण भारतातील कुंभमेळा महामहम महोत्सवाचा शुभारंभ !

 • कुंभकोणमच्या प्रमुख मंदिरांत झालेल्या ध्वजाराहेण विधीने महोत्सवाला झाला आरंभ
 • कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी जयेंद्र सरस्वतीजी यांची वंदनीय उपस्थिती
 • मेळ्याला ३६ लाख हिंदू येण्याची शक्यता
कावेरी नदीच्या काठावर वसलेल्या कुंभेश्‍वर
मंदिरात महामहमसाठी जमलेले भाविक
    तांजावुर (तमिळनाडू) - १३ फेब्रुवारी या दिवशी दक्षिण भारताचा कुंभमेळा समजला जाणार्‍या महामहम महोत्सवाचा शुभारंभ झाला. तांजावुर जिल्ह्यातील कुंभकोणमच्या आदिकुंबेश्‍वरर, नागेश्‍वरर, काशी विश्‍वनाथर, आबिमुगेश्‍वरर, कलाहस्तिश्‍वरर आणि सोमेश्‍वर मंदिरांत ध्वजारोहण विधी करून महोत्सवाचा आरंभ झाला. या वेळी कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी जयेंद्र सरस्वती यांची वंदनीय उपस्थिती होती.

हाफीज सईदकडून देशद्रोह्यांना समर्थन मिळाल्याचे शासनाकडे पुरावे ! - किरेन रिजिजू

     नवी देहली - जवाहरलाल नेहरू विद्यापिठात आतंकवादी संघटना लश्कर-ए-तोयबाच्या पाठिंब्यानेच अफझलच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या होत्या. घोषणाबाजी करणार्‍यांना हाफिज सईदचे समर्थन होते, याचे पुरावे आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केवळ हाफिजच्या ट्विटवरून विधान केलेले नाही, तर त्यासंदर्भातील पुरावे आहेत, असे ते म्हणाले.

काँग्रेसच्या काळात ३४ लाख ५३ सहस्र १९० कोटी रुपयांचा काळा पैसा देशाबाहेर पाठवला गेला ! - अमेरिकेतील संस्थेची माहिती

देशाबाहेर गेलेल्या काळ्या पैशाविषयीची जी माहिती अमेरिकेच्या 
संस्थेला मिळते, ती भारतीय शासनाला का मिळत नाही ?
     नवी देहली - २००४ ते २०१३ या काँग्रेस शासनाच्या कालावधीत भारतातून काळ्या पैशाच्या रूपात ३४ लाख ५३ सहस्र १९० कोटी रुपये (५०५ अब्ज अमेरिकी डॉलर) देशाबाहेर पाठवण्यात आले, अशी माहिती अमेरिकेतील ग्लोबल फायनान्स इंटिग्रिटी या नामांकित संस्थेने दिली आहे. अशाप्रकारे काळा पैसा बाहेर धाडण्यात भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो, असे या अहवालात म्हटले आहे. या माहितीतील सत्यता तपासण्याचे आदेश विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटीने) महसूल अन्वेषण संचालनालयाला दिले आहेत.

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण चालूच !

     नवी देहली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेली घसरण अद्याप चालूच आहे. गेल्या वर्षी डिसेंबर मासात एका बॅरलची किंमत ३४.५ डॉलर होती, ती आता २९.२५ डॉलर इतकी झाली आहे. विकसित देशांमधील मंदीच्या कारणामुळे त्यांच्याकडून मागणी अल्प झाली, तरी तेलाचे उत्पादन तितकेच होत असल्याने ही घसरण होत आहे. काही वर्षांपूर्वी एका बॅरलला १३० डॉलरहून अधिक मूल्य द्यावे लागत होते. त्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरण झाली असल्याचे दिसून येते.
महर्षींची दिव्य भविष्यवाणी खरी ठरली !
     डिसेंबर २०१५ मध्ये महर्षींनी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत घसरण होईल आणि अहंकारी देशांचा अहंकारही खाली उतरेल, अशी भविष्यवाणी केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेली घसरण पहाता महर्षींची दिव्य वाणी किती सत्य आहे, याची प्रचीती येते.

पृथ्वी २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

     बालासोर - १६ फेब्रुवारीला अण्वस्रधारी पृथ्वी २ या मध्यम पल्ल्याच्या भूमीवरून भूमीवर मारा करणार्‍या क्षेपणास्त्राची ओडिशा येथील चंडीपूरस्थित इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर) येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्राचा पल्ला ३५० किलोमीटर असून क्षेपणास्राची ५०० ते १००० किलो अण्वस्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.

५ आणि ६ मार्चला हरिद्वार येथे हिंदु स्वाभिमान संघटनेकडून धर्मसंसदेचे आयोजन

     गाझीयाबाद - इस्लामिक स्टेटच्या विरोधात १५ सहस्र हिंदूंना प्रशिक्षित करणार्‍या येथील हिंदु स्वाभिमान संघटनेने हरिद्वारमध्ये धर्मसंसद आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. जिहादचा विरोध आणि धर्मरक्षण यांसाठी ५ आणि ६ मार्चला ही धर्मसंसद आयोजित करण्यात येणार आहे. या वेळी हिंदु स्वाभिमानच्या राष्ट्रीय अध्यक्षा चेतना शर्मा, आचार्य धर्मेंद्र आणि डासना मंदिराचे मुख्य पुजारी, तसेच अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय संयोजक स्वामी नरसिंहानंद सरस्वती उपस्थित होते.

नमाज शब्दाचा आक्षेपार्हरित्या वापर करण्यात आलेल्या भोजपुरी गाण्यावर बंदीची शक्यता

     लक्ष्मणपुरी (लखनऊ) - भोजपुरी गायक सुभाष राजा यांनी एका गाण्यात नमाज शब्दाचा आक्षेपार्हरित्या उपयोग केल्याने त्यांच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या गाण्यावर प्रतिबंध घालण्यात येणार आहे; मात्र सध्या राज्यातील पूर्वांचल भागात हे गाणे ठिकठिकाणी वाजवण्यात येत आहे. राज्याचे मुख्य सचिव आलोक रंजन यांनी प्रमुख सचिव गृह देबाशीष पंडा यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पोलीस याची चौकशी करत आहेत.

आसाममध्ये चकमकीत ४ आतंकवादी ठार

     कोलकाता - आसामच्या लोहित येथे सुरक्षादलांसमवेत झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये तीन आतंकवादी उल्फाचे आणि एक एन्एस्सीएन्(के) या संघटनेचा होता. त्यांच्याकडून दोन पिस्तुलांसहित अनेक शस्त्रे हस्तगत करण्यात आली.

इस्रायलमध्येही आता मराठी भाषा शिकवली जाणार !

     पुणे - मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार विदेशात व्हावा, या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून १५ फेब्रुवारी या दिवशी इस्रायलमधील तेल-अवीव या विद्यापिठाशी मराठी भाषा शिकवण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी राज्याचे सांस्कृतिकमंत्री श्री. विनोद तावडे, तेल-अवीव विद्यापिठाचे उपाध्यक्ष प्रा. रानान रैन, इस्रायलचे वाणिज्य दूत डेव्हिड अकोव्ह, मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख आणि राज्य मराठी विकास संस्थेचे आनंद काटीकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. तावडे या वेळी म्हणाले, इस्रायलच्या मातीत जन्मलेल्या या लोकांच्या पुढच्या पिढ्या मातृभाषा म्हणून हिब्रू बोलतात.
     इस्रायली विद्यापिठांत संस्कृत, हिंदी, तसेच मल्याळम् भाषा शिकण्याची सोय असली, तरी मराठी शिकण्याची सोय आजवर उपलब्ध नाही. (कुठे स्वतःच्या भाषेसह संस्कृत आणि मराठी भाषा शिकणारे ज्यू नागरिक आणि कुठे या दोन्ही भाषा मरणासन्न करून इंग्रजाळलेले भारतीय ! - संपादक) त्यामुळे तेल-अवीव विद्यापिठासह इस्रायलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर १ मासाचा मराठी भाषेचा अभ्यासवर्ग उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायलमध्ये मराठी भाषेचा हा अभ्यासक्रम जून २०१६ पासून चालू करण्यात येईल.

कन्नूर (केरळ)मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या !

माकपचे आठ समर्थक अटकेत !
     कन्नूर (केरळ) - येथील पप्पीनिसेरी गावात १५ फेब्रुवारीच्या रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची हत्या करण्यात आली. २७ वर्षीय पी.व्ही. सुजीत या स्वयंसेवकाची त्याच्या वृद्ध आई-वडिलांच्या डोळ्यांदेखतच हत्या करण्यात आली. सुजीतला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या घरच्यांवरही आक्रमण करण्यात आले. या प्रकरणात माकप समर्थक असलेल्या ८ जणांना अटक करण्यात आली आहे. 
१. या आक्रमणात कन्नूर जिल्ह्याचे पंचायत सदस्य वेणुगोपालही घायाळ झाले.
२. कन्नूर जिल्ह्यातच डिसेंबर २०१३ मध्ये भाजपचे नेते विनोद कुमार यांची हत्या करण्यात आली होती आणि भाजपचेच दोन नेते गंभीररित्या घायाळ झाले होते.
३. आता पी.व्ही. सुजीत यांच्या हत्येनंतर भाजपने माकपवर हत्येचा आरोप केला आहे.
४. या हत्येचा निषेध करण्यासाठी कन्नूर, आझीकोड आणि पप्पीनिसेरी येथे भाजप आंदोलन करणार आहे

नेपाळच्या माजी पंतप्रधानांची दत्तक पुत्री होणार महामंडलेश्‍वर

     उज्जैन - महामंडलेश्‍वर महायोगी पायलट बाबा नेपाळचे माजी पंतप्रधान कृष्ण प्रसाद भट्टराई यांची दत्तक मुलगी अमिता माता हिला या सिंहस्थामध्ये महामंडलेश्‍वर करणार आहेत, अशी माहिती पायलट बाबा यांनी इंदूर येथील शिबिरात प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. बाबा म्हणाले, जगात माझे १० लाखांहून अधिक भक्त असून अडीच सहस्र भक्तांनी संन्यास परंपरेची दिक्षा घेतली आहे. रशियाचे संत विष्णुदेवानंद, अन्नापूर्णा माता आणि नेपाळच्या कविता माता (कैलादेवी योगमाता) यांचाही महामंडलेश्‍वर या पदावर पट्टाभिषेक करण्यात येणार आहे.

इंदूर (तेलंगण) आणि आग्रा येथे हिंदुत्ववादी संघटनांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

 • अमरनाथ यात्रेचा अल्प केलेला कालावधी वाढवा !
 • इसिसशी संबंधित संशयित धर्मांध युवकांवर कठोर कारवाई करा !
इंदूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात
सहभागी धर्माभिमानी हिंदू
  इंदूर (तेलंगण) - अमरनाथ यात्रेचा अल्प करण्यात आलेला कालावधी वाढवण्यात यावा, तसेच इसिसशी संबंधित संशयित धर्मांध युवकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, यांसाठीयेथे विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने येथे १४ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये श्रीराम युवा सेना, शिवसेना, भारत स्वाभिमान ट्रस्ट, हिंदु जनजागृती समिती, हनुमान परिनिरीक्षण समिती आदी संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट होऊ शकत नाही !

 • देहली पोलिसांकडून न्यायालयात अहवाल सादर
 • बिग बॉस च्या कार्यक्रमाच्या कालावधीत काली मंदिरात जोडे घातल्याचे प्रकरण
    देहली - हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते सलमान खान आणि शाहरुख खान यांना बिग बॉस च्या एका भागामध्ये काली मंदिरामध्ये जोडे घालून दाखवण्यात आल्याच्या प्रकरणी कोणतेही गुन्हेगारी प्रकरण सिद्ध होऊ शकत नाही, असे देहली पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
     अधिवक्ता गौरव गुलाटी यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी करण्यात आली. या याचिकेमध्ये उपरोक्त दोन्ही अभिनेत्यांवर धार्मिक भावना दुखावल्याविषयी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या अहवालात म्हटले की, बिग बॉस कडून प्रमोशनाचा हा कार्यक्रम लोकांच्या भावना किंवा श्रद्धा दुखावण्यासाठी करण्यात आला नव्हता. मिळालेल्या पुराव्याच्या आधारे सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या विरोधात कोणतेही गुन्हेगारी प्रकरण उभे राहू शकत नाही. या याचिकेत दूरचित्रवाहिनी, रिअ‍ॅलिटी शोचे दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

कतरास (झारखंड) येथे एकदिवसीय धर्मशिक्षणवर्ग शिबिराला उत्तम प्रतिसाद !

मनोगत व्यक्त करतांना शिबिरार्थी
    कतरास, १६ फेब्रुवारी (वार्ता.) - येथे झारखंड राज्यातील सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी एकदिवसीय धर्मशिक्षणवर्ग शिबिर पार पडले. या शिबिराचा कतरास, धनबाद आणि कोलकाता येथील ३० जणांनी लाभ घेतला. 
    श्री सदगुरूंच्या आरतीने शिबिराचा प्रारंभ झाला. शिबिराचा उद्देश श्री. आनंद जाखोटिया यांनी, तर साधनेच्या दृष्टीने धर्मशिक्षण वर्ग घेण्याचे महत्त्व याविषयी श्री. चित्तरंजन सुराल यांनी उपस्थितांना माहिती दिली. या वेळी प्रायोगिक सत्रांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांची सद्यस्थिती, साधना, धर्मशिक्षणाची आवश्यकता, धर्माचरण आदी विषयांवर उपस्थितांनी विषय प्रस्तुत केला. त्यानंतर आदर्श धर्मशिक्षण वर्ग कसा घ्यावा ?, या विषयी श्री. सुराल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तिरुपती येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सनातनच्या ग्रंथांविषयी माहिती
जाणून घेतांना जिज्ञासू
     तिरुपती (आंध्रप्रदेश) - येथे भारतीय विद्याभवन संस्थेच्या वतीने पुस्तक मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेकडून ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक लावण्यात आले. 
     ९ दिवस चाललेल्या या प्रदर्शनाचा १० सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. 
१. या मेळ्यात एकूण ६० संस्थांनी सहभाग घेतला. 
२. ९ दिवसांमध्ये २ सहस्र ३१ ग्रंथांचे वितरण करण्यात आले.
३. एका जिज्ञासूला सनातनची सात्त्विक उत्पादने आवडली. त्यानंतर त्याने त्याच्या दुकानदार मित्राला दुकानात सनातनची उत्पादने ठेवण्यासाठी उद्युक्त केले, तसेच या जिज्ञासूने एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करून त्यांच्या स्कूल डे कार्यक्रमात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 
४. एक जिज्ञासू दुसर्‍या दिवशी एका मंदिराच्या पुजार्‍याला प्रदर्शनस्थळी घेऊन आले. पुजार्‍याने ग्रंथांचा पूर्ण संच खरेदी केला.

फेसबूकवर मुसलमानांच्या विरोधात टिपणी केल्याचा आरोप

देशात हिंदुविरोधी वक्तव्य केल्यामुळे एखाद्या पोलीस अधिकार्‍याला 
निलंबित केल्याचे कधी वाचले आहे का ?
आसाममध्ये ज्येष्ठ पोलीस अधिकारी निलंबित
     गौहत्ती (आसाम) - फेसबूकवर ठेवलेल्या पोस्टमध्ये मुसलमानांच्या विरोधात टिपणी केल्याप्रकरणी कार्बी आंगलॉन्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंजन बोरा यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर मुसलमानांच्या विरोधात द्वेष पसरवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. 
    आरोपांनुसार बोरा यांनी त्यांच्या टिपणीत त्यांना मुसलमानांचा अजान थांबवायचा आहे, असे लिहले आहे. या टिपणीमध्ये बोरा यांनी पुढे म्हटले होते की, जय श्रीराम, जय हिंदुस्तान, जय जय श्रीराम, जय हिंदुभूमी, आम्हाला मुसलमानांपासून मुक्त अशा हिंदुस्थानसह असले पाहिजे. या टिपणीत बोरा यांनी अल्पसंख्यांक समाजातील अनेक लोकांना ठार केल्याचा दावा केल्याचाही आरोप करण्यात आला. बोरा यांच्या या पोस्टला अनेकांनी समर्थन दिले आहे. या संदर्भात वाद निर्माण झाल्यानंतर बोरा यांना १३ फेब्रुवारी या दिवशी निलंबित करण्यात आले. त्यांच्या विरोधात येथील एका मुसलमान संघटनेच्या नेत्याने गुन्हा नोंदवला आहे. गोहत्तीचे अधिवक्ता बी. रहमान यांनी बोरासारखे लोक आतंकवाद्यांहून अधिक धोकादायक असल्याचे म्हटले आहे.


इस्लामच्या नावावर हत्या करणार्‍यांच्याही विरोधात लढू !

मेरठ येथे सर्वधर्मीय परिषदेचे आयोजन
जमीयत उलेमा-ए-हिंदचे राष्ट्रीय महासचिव मौलाना सैयद महमूद मदनी यांचे आवाहन
    मेरठ - मुसलमानांना भारताविषयी प्रेम होते; म्हणून ते येथे थांबले. इस्लामच्या नावाने निर्माण झालेल्या देशात गेले नाही. काही मोठे शत्रू, जे मुसलमान आहेत, त्यांच्यामुळे संपूर्ण मुसलमान समाजाची मानहानी होत आहे, त्यांच्याही विरोधात लढले पाहिजे. आम्हाला कोणी देवबंदी किंवा बरेलवी यांच्या नावावर लढवत असेल, तर त्याला उत्तर दिले जाईल, तसेच इस्लामच्या नावावर हत्या करणार्‍यांच्याही विरोधात लढू, असे प्रतिपादन जमीयत उलेमा-ए-हिंदचे राष्ट्रीय महासचिव मौलाना सैयद महमूद मदनी यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व धर्मांतील नेते उपस्थित होते. (मदनी यांनी केवळ बाता करू नयेत, तर प्रत्यक्ष कृती करावी आणि भारताला जिहाद मुक्त करून दाखवावे ! - संपादक)

प्रादेशिक भाषांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल !

इंग्रजीचे अवास्तव स्तोम माजवून प्रादेशिक भाषांची शासनस्तरावरच अवहेलना होत असल्यामुळे 
आता समाजात त्याचे प्रतिबिंब दिसत आहे ! यासाठीच प्रादेशिक भाषांतून शिक्षण घेण्याचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे !
विद्यार्थ्यांना मातृभाषेचे महत्त्व शिकवले न गेल्याचा परिणाम !
     पणजी - प्रादेशिक भाषांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल सर्वाधिक असल्याची माहिती गोवा शिक्षण खात्याकडून मिळालेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे, असे वृत्त द गोवन् वार्ता या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.
या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार,
१. राज्यात इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेणारे ५५ सहस्र १४० विद्यार्थी (५७ टक्के), मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेणारे ३१ सहस्र ३५९ विद्यार्थी (३२ टक्के), तर कोकणी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेणारे ६ सहस्र ५६४ विद्यार्थी (६ टक्के) आहेत.

(म्हणे) हिंदुत्ववादी संघटनांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

कॉ. पानसरे यांच्या पत्नीचे बिनबुडाचे आरोप !
       कोल्हापूर - कॉ. पानसरे यांच्या हत्येत हिंदुत्ववादी संघटनांचाच हात आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे बिनबुडाचे आरोप कॉ. पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलतांना केले. कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ या दिवशी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या आक्रमणाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १६ फेब्रुवारीला कोल्हापूर येथे पानसरे कुटुंबीय आणि पुरो(अधो)गामी यांनी मॉर्निंग वॉक करून दिखाऊपणा केला. त्या वेळी त्या बोलत होत्या. कॉ. पानसरे यांचे २० फेब्रुवारीला २०१५ या दिवशी निधन झाले होते.
(म्हणे) शासनाने आरोपींना अटक करण्याची इच्छा दाखवावी !
शासनावर वारंवार दबाव आणणार्‍या धूर्त मेघा पानसरे !
      या वेळी मेघा पानसरे म्हणाल्या की, पानसरे यांच्या हत्येचा छडा लागत नसल्याने जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने एका वर्षात काय केले, हे सांगावे. जनतेने लोकशाही, न्यायव्यवस्थेवर विश्‍वास ठेवायचा असेल, तर आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी. त्यासाठी शासनाने इच्छा दाखवावी.

व्हॅलेंटाईन डेसाठी गोवा पर्यटन खात्याकडून विशेष हेलिकॉप्टर सेवा

व्हॅलेंटाईन डेच्या पाश्‍चात्त्य विकृतीला प्रोत्साहन देणारे गोवा शासन !
     पणजी, १६ फेब्रुवारी (वार्ता.) - गोवा शासनाकडून चालू करण्यात आलेली हेलिकॉप्टर सेवा लोकांच्या विरोधामुळे बंद पडली आहे; मात्र व्हॅलेंटाईन डेसाठी १४ फेब्रुवारीला गोवा पर्यटन खात्याकडून विशेष हेलिकॉप्टर सेवेचे आयोजन करण्यात आले. कासावली येथील पार्क हयात रिसॉर्ट येथून या सेवेचे आयोजन करण्यात आले होते.

आपचे नेता आशुतोष यांना ठार मारण्याची धमकी !

     नवी देहली - आम आदमी पक्षाचे नेता आशुतोष यांना ठार मारण्याची दोन वेळा धमकी मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ज्याप्रमाणे आतंकवाद्यांना मारले जाते त्याप्रमाणे तुम्हाला मारू, अशी धमकी मिळाल्याने त्यांनी म्हटले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या प्रकरणी ही धमकी मिळाल्याचा आशुतोष यांनी दावा केला आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.

वर्ष २०१६ मध्ये युरोपमध्ये मुसलमान शरणार्थींच्या संख्येत लक्षणीय वाढ !

दीड कोटी नागरिक सिरियातून पलायन करण्याच्या मार्गावर !
    एथेन्स (ग्रीस) - वर्ष २०१६ च्या पहिल्या सहा आठवड्यांमध्ये ८० सहस्रांपेक्षा अधिक शरणार्थींनी समुद्रमार्गे युरोपमध्ये प्रवेश केला आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांपेक्षाही अधिक आहे, अशी माहिती युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्यूजीज् (युएन्एच्सीआर्) या संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थींशी संबंधित उच्चायुक्तांनी दिली आहे. 
१. वर्ष २०१५ मध्ये १० लाखांहून अधिक निर्वासित युरोपमध्ये आले. 
२. जुलै २०१५ नंतर शरणार्थींच्या संख्येत वाढ होऊन प्रतिदिन २ सहस्रांपेक्षा अधिक शरणार्थी युरोपमध्ये प्रवेश करत होते.

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आज आपण साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर कुटुंबियांना अनुभवायला मिळालेला आनंद आणि व्यक्त केलेली कृतज्ञता पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

सनातनच्या वतीने सातारा येथील सदरबझारमध्ये हळदीकुंकू समारंभ

सौ. योजना जाधव उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना
     सातारा - सनातन संस्थेच्या वतीने सदरबझार येथील श्री मारुती मंदिरामध्ये मकरसंक्रातीनिमित्त हळदीकुंकू समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. योजना जाधव यांनी उपस्थितांना मकरसंक्रातीचे महत्त्व, सात्त्विक वाण लुटण्याचे महत्त्व विशद करून सांगितले. कार्यक्रमस्थळी धर्मशिक्षणाच्या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. सदरबझारमधील ६० महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नंदा कदम यांनी, तर आभारप्रदर्शन सौ. जयश्री घोरपडे यांनी केले. 
समाजातील चांगली कामे राजाश्रयावर नव्हे, तर लोकाश्रयावर चालतात ! - बाबूजी नाटेकर

 
ज्येष्ठ माजी सौनिकांचा शौर्य-गौरव पुरस्कार देऊन सत्कार करतांना 
विश्‍व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. बाबूजी नाटेकर
   सातारा - सध्या आतंकवाद्यांच्या देशविघातक कृत्यांनी भारताला मान खाली घालावी लागत आहे; परंतु तीच मान पुन्हा उंच आणि ताठ ठेवण्यासाठी आजी-माजी सैनिकांची देशाला आवश्यकता आहे. तुम्ही सैनिक घरादाराचा विचार न करता प्रसंगी प्राणांची आहुती देऊन देशावरील संकटांचा सामना करता, तेव्हा आमची छाती अभिमानाने भरून येते. आज आजी-माजी सैनिकांचा शौर्य-गौरव पुरस्कार देऊन सन्मान करतांना मला कृतज्ञतापूर्वक आनंद होत आहे. श्री मंगल मारुति मित्र मंडळाने राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून समाजातील चांगली कामे लोकाश्रयावर चालतात, राजाश्रयावर नव्हे, असे प्रतिपादन विश्‍व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. बाबूजी नाटेकर यांनी केले.

धर्मगुरूंनी मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचारांविषयी माहिती पुरवण्यास बिशप बांधील नाही ! - व्हॅटिकन चर्च

कथित आरोपांवरून हिंदु संतांची वारंवार अपकीर्ती करणारी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे 
ख्रिस्ती धर्मगुरूंच्या कुकृत्यांविषयी ब्रही काढत नाहीत !
     बॉस्टन - धर्मगुरूंकडून होणार्‍या बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी कार्डिनल बर्नार्ड लॉ यांना त्यांच्या बॉस्टन आर्कडायोसेसनमधून त्यागपत्र देण्यास भाग पाडले. बॉस्टन आर्कडायोसेसनमधील १५० धर्मगुरूंवर लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप होते. या संदर्भात व्हॅटिकन चर्चने धर्मगुरूंनी लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराविषयी माहिती पुरवण्यास बिशप बांधील नाही. पीडित किंवा त्यांचे कुटुंबीय यांनी पोलिसांत तक्रार द्यायला हवी, असे म्हटले आहे. अंतर्गत आरोपांविषयी चौकशी करणे, हेच बिशपचे मुख्य कर्तव्य असते. संशयितांची नावे पोलिसांना पुरवणे, हे बिशपचे काम नसते, असेही चर्चने म्हटले आहे.
    व्हॅटिकन चर्चचे पत्रकार जॉन अ‍ॅलन यांनी सर्वप्रथम क्रॉक्सनाऊडॉटकॉम या संकेतस्थळावर कॅथलिक चर्चचे धोरण प्रसिद्ध केले होते. पोप फ्रान्सिस यांनी लहान मुलांच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेला विशेष आयोग बिशप प्रशिक्षण कार्यक्रमात कोणतीच भूमिका घेत नसल्याचे आढळून आले आहे, असे अ‍ॅलन यांनी म्हटले आहे.

नेपाळमधील शाळांमध्ये संस्कृत भाषा शिकवण्याची सिद्धता !

भारत शासनानेही ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांचा विरोध झुगारून 
देववाणी संस्कृत शिकवणे अनिवार्य करायला हवे !
    काठमांडू (नेपाळ) - नेपाळची राजधानी काठमांडू आणि इतर भागांतील खाजगी शाळांनी जगातील प्राचीन अन् समृद्ध अशी संस्कृत भाषा शिकवण्याची सिद्धता केली आहे.
१. जयतु संस्कृतम्, सत्मार्ग अभियान, जियर शैक्षणिक ट्रस्ट आणि नेपाळ विकास तरंगिणी या संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावत शाळांत संस्कृत शिकवण्यासाठी आवश्यक अशी क्रमिक पाठ्यपुस्तके सिद्ध केली आहेत, अशी माहिती जियर फाऊन्डेशनचे श्री. वामन प्रसाद न्युपाने यांनी दिली आहे.

कुर्ला येथे मातृ-पितृ पूजन दिवस साजरा केला

आई-वडिलांचे आशीर्वाद घेतांना तरुण
     मुंबई - १४ फेब्रुवारी २०१६ या दिवशी कुर्ला (पूर्व) येथे भव्य स्वरूपात मातृ-पितृ पूजन सोहळा साजरा करण्यात आला. प्रतिवर्षीप्रमाणे मातृ-पितृ पूजन दिवस युवा हितकारिणी संघ अंतर्गत भारतीय युवा शक्तिद्वारा व्यापक रूपात कुर्ला (पू.) नेहरूनगर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वृद्धाश्रमातील वृद्ध आई-वडिलांची पूजा अनाथ मुलांनी करण्याचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला. हिंदु जनजागृती समिती, हिंदु गोरक्षा समिति, शिवकार्य प्रतिष्ठान, हिंदु राष्ट्र सेना, भारत विकास मंच, बजरंग दल, हिंदु महासभा, यूथ पनून कश्मीर या संघटनांचा सहभाग होता. मान्यवरांमध्ये भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी श्री. डी.जी. वंजारा, सुदर्शन वाहिनीचे श्री. सुरेश चव्हाणके, बजरंग दलाचे श्री. उमेेश गायकवाड, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर इत्यादी उपस्थित होते.

पाकिस्तानी कलाकारांना पायघड्या घालतांना हुतात्म्यांना विसरू नका ! - अनुराधा गोरे

     पाथर्डी (जिल्हा नगर) - पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भेटले आणि त्यानंतरच हाफिज सईद हा अतिरेकी, आम्ही ८ लक्ष जिहादी पाठवून भारताच्या चिंधड्या करणार, असे वक्तव्य करतो. त्यानंतर पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळ्यावर आक्रमण होणे, हा किती मोठा विरोधाभास आहे ? सीमेवरील आक्रमणे अश्‍वत्थामाच्या भळभळणार्‍या जखमेसारखी आहेत. ती रोखायलाच पाहिजेत. पाकिस्तान भारताच्या सीमेत अतिरेकी पाठवून सैनिकांवर आक्रमणे करत आहे. यात शहीद झालेल्या जवानांच्या नावे आपण किती दिवस मेणबत्त्या पेटवण्याचे काम करणार ? त्याचबरोबर पाकिस्तानी कलाकारांना पायघड्या घालतांना हुतात्म्यांना विसरू नका, असे परखड प्रतिपादन मुंबई येथील वीरमाता अनुराधा गोरे यांनी केले. 
     येथील हुतात्मा मेजर अतुल गर्जे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बर्ड संस्थेच्या वतीने आयोजित व्यर्थ न हो बलिदान या विषयावर त्या बोलत होत्या. 
     गोरे पुढे म्हणाल्या की, अमेरिकेने छापलेल्या नकाशात सियाचीनचा भाग पाकिस्तानमध्ये दाखवला. त्यानंतर आपल्याला जाग आली आणि आपण तेथे सैनिक पाठवले

धर्मसभा न्यासाच्या वतीने निगडे (जिल्हा पुणे) येथे हळदीकुंकू समारंभ

उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना डावीकडून सौ. रुक्मिणी जाधव आणि सौ. गौरी बोराटे
     भोर (जिल्हा पुणे) - येथील निगडे गावामध्ये १० फेब्रुवारी या दिवशी धर्मसभा न्यासाच्या वतीने श्री महागणपति मंदिरात हळदीकुंकू समारंभ पार पडला. उजव्या सोंडेचा महागणपति हे निगडे गावचे ग्रामदैवत आहे. त्या अनुषंगाने न्यासाच्या सौ. गौरी बोराटे यांनी श्री गणेशजयंती सोहळ्याचे औचित्य साधून श्री गणेशपूजनाचे अध्यात्मशास्त्र, मकरसंक्रांत, सात्त्विक वाण देण्याचे महत्व आणि साधना याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी सनातन निर्मित श्री गणपति या लघुग्रंथाचे वाण महिलांना देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. रुक्मिणी जाधव उपस्थित होत्या.

जीम चालकांच्या संदर्भात कारवाईचा निर्णय न झाल्यास मनसेच्या वतीने आंदोलन ! - नितीन शिंदे

     सांगली - शहरातील नामवंत जीममध्ये ट्रेडमिलवर व्यायाम करत असतांना ५ व्यायामपटूंचा मृत्यू झाला. अशा जीम चालकांची चौकशी करून त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे प्रविष्ट करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी श्री. त्रिगुण कुलकर्णी यांनी केली आहे. यावर निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी ८ दिवसांत सर्व जीमचालक आणि मनसे यांची बैठक बोलावण्याचे आदेश क्रीडाधिकार्‍यांना दिले होते. यावर दीड मास उलटूनही जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांनी बैठक बोलावलेली नाही. त्यामुळे येत्या ८ दिवसांत जीम चालकांच्या संदर्भात कारवाईचा निर्णय न झाल्यास मनसे जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या विरोधात आंदोलन करेल आणि मृत्यूमुखी पडलेल्या व्यायामपटूंना न्याय मिळवून देईल, अशी चेतावणी मनसेचे नेते आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

माझ्याकडे बंदूक असती, तर त्याला मी गोळीही मारली असती ! - भाजपचे आमदार ओमप्रकाश शर्मा

      नवी देहली - १५ फेब्रुवारीला देहलीतील पटियाला हाऊस न्यायालयाच्या परिसरात अधिवक्ता आणि देशद्रोह्यांचे समर्थन करणारे साम्यवादी विद्यार्थी यांच्यात हाणामारी झाली होती. तसेच भाजपचे आमदार ओमप्रकाश शर्मा आणि त्यांच्या समर्थकांनीही काही जणांना चोपले होते. या संदर्भात ओमप्रकाश शर्मा यांनी म्हटले आहे की, त्या वेळी माझ्याकडे बंदूक असती, तर मी गोळीही मारली असती. कोणी तुमच्या आईला शिव्या देत असेल, तर तुम्ही त्याला मारणार नाही का ?, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला.

पाकिस्तानचे नवाज शरीफ शासन अल्पसंख्यांकविरोधी !

पाकमधील हिंदूंच्या स्थितीविषयी भारताचे शासन काही करेल का ?
 • युएस् कमिशन रिलीजस फ्रीडमच्या अहवालातील माहिती
 • १९ कोटी पाक लोकसंख्येत हिंदू केवळ ३ टक्के !
     इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ यांचे शासन अल्पसंख्यांकांसाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचे युएस् कमिशन रिलीजस फ्रीडमच्या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार पाकमध्ये अल्पसंख्यांकांची स्थिती अतिशय दयनीय आहे. येथे अल्पसंख्यांकांशी भेदभाव कमाल मर्यादेवर पोचला आहे. पाकमधील अल्पसंख्यांक हिंदू, ख्रिश्‍चन, अहमदी एवढेच नव्हे, तर शिया मुसलमानांचेही म्हणणे आहे की, त्यांना येथे सुरक्षित वाटत नाही. त्यांच्यावर आक्रमण करणार्‍यांना अटक केली जात नाही, त्यांना सतत लक्ष्य केल्या जाते. बहुतांश लोकांच्या मते, नवाज शरीफ यांच्या हातात सूत्रे आल्यावर येथील अल्पसंख्यांकांची स्थिती अजूनच बिघडली आहे. शरीफ रुढीवादी वहाबी मुसलमान असून सौदी अरेबियाच्या जवळचे आहेत. या मुसलमानांचा अल्पसंख्यांकांच्या विरोधातील दृष्टीकोन कट्टर समजला जातो. पाकिस्तानच्या १९ कोटी लोकसंख्येत हिंदू केवळ ३ टक्केच शिल्लक राहिले आहेत.

काळा पैसा देशात परत आणण्याविषयी काँग्रेस आणि भाजप एकाच माळेचे मणी ! - राम जेठमलानी

शासन काळा पैसा देशात परत आणण्याच्या दृष्टीने ठोस पावले कधी उचलणार ?
      पुणे, १६ फेब्रुवारी - स्विस अधिकोषातून काळा पैसा देशात परत आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची घोषणा हे केवळ आश्‍वासनच ठरले आहे. निवडणूक प्रचारामध्ये दिलेली ही आश्‍वासने पाळली नाहीत, तर बिहारप्रमाणेच अन्य राज्यांचे निकालही शासनाच्या विरोधात जातील. काळा पैसा देशात आणण्याविषयी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे एकाच माळेचे मणी आहेत, अशी टीका माजी केंद्रीय कायदामंत्री राम जेठमलानी यांनी केली आहे.

धूर्त चीनवर लक्ष ठेवण्यासाठी भारताचे मालदीवला सहकार्य !

     नवी देहली - हिंदी महासागरात चीनचा होत असलेला विस्तार आणि वाढत्या प्रभावाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारताने प्रॉजेक्ट मौसम नावाची योजना आखली आहे. याअंतर्गत भारताने हिंदी महासागरात स्वत:ची सक्रीयता वाढवली आहे. मैत्रीपूर्ण संबंधांच्या अंतर्गत श्रीलंकेनंतर आता मालदीवमध्ये भारत विमानवाहू नौका पाठवत आहे. 
१. यात भारताने स्वत:च्या सर्वांत मोठ्या आणि क्षमतेच्या दृष्टीने सर्वांत प्रभावी आयएन्एस् विक्रमादित्य, आईएन्एस् मैसूर आणि टँकर आईएन्एस् दीपक या नौकांना मालदीवला पाठवले आहे.
२. समुद्री सीमेला लागून असलेल्या राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे भारताची प्राथमिकता आहे, असे या मोहिमेशी संबंधित एका अधिकार्‍याने सांगितले.
३. भारताच्या या कृतीला समुद्री मुत्सद्दीपणाचा एक भाग म्हणूनही पाहिले जात आहे.
४. भौगोलिक आणि राजकीय दृष्टीने मालदीव भारतासाठी एक महत्त्वपूर्ण देश आहे.
५. हिंदी महासागरात आपली क्षमता आणि प्रभाव वाढवण्याच्या अंतर्गत भारताने मालदीवबरोबर एक महत्त्वपूर्ण करार केला आहे. मालदीवमध्ये १० कोस्टल सर्विलेंस रडार सिस्टम स्टेशन्सची स्थापना करण्यात भारत मालदीवला साहाय्य करणार आहे.

बोईसर येथे किनार्‍यावर वहात आलेल्या गणेशमूर्तींचे पुन्हा समुद्रात विसर्जन

     बोईसर - माघी गणेशोत्सवानिमित्त १२ फेब्रुवारीला चिंचणीच्या समुद्रात विसर्जित केलेल्या दीड दिवसांच्या गणेशमूर्तींपैकी २७ गणेशमूर्ती भरतीसमवेत किनार्‍यावर परत आल्या. चिंचणी गावातील श्री. प्रमोद दवणे यांनी त्यांच्या सहकार्‍यांना समवेत घेऊन सर्व मूर्ती पुन्हा समुद्रात नेऊन विसर्जित केल्या. ते गेल्या अनेक वर्षांपासून विसर्जन केल्यानंतर वहात आलेल्या मूर्तींचे पुन्हा विसर्जन करत आहेत. (गणेशमूर्तींची विटंबना थांबवण्यासाठी प्रयत्न असणारे श्री. प्रमोद दवणे आणि त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन ! - संपादक) त्यांच्या या कृतीमुळे मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी त्यांचे कौतुक केले.
     नवी देहली - देशाविरोधात घोषणाबाजी करणार्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील विद्यार्थ्यांचे समर्थन केल्याने आणि तेथे सभा घेतल्याने अलाहाबाद जिल्हा न्यायालयात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांने केली आहे. अधिवक्ता आणि भाजप नेते सुशील मिश्र यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.

राष्ट्रद्रोह्यांचा भरणा असलेले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ महिलांवर अत्याचार करण्यातही आघाडीवर !

अशा विद्यापिठाला आता जनतेने पोसावे तरी कशाला ?
      देहली - विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील १०४ विद्यापिठांत महिलांवर होणार्‍या अत्याचारांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार, जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये महिला अत्याचारांच्या सर्वाधिक २५ घटना घडल्या.
१. केंद्रशासनाच्या मानव संसाधन मंत्रालयाने लोकसभेतील एका खासदाराने विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या आकडेवारीचा समावेश केला आहे.

(म्हणे) कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्यातील धर्मांध संघटनांवर बंदी घालावी !

प्रत्यक्षात काहीही पुरावे मिळालेले नसतांना पुरोगामी संघटनांची कावकाव !
      सांगली, १६ फेब्रुवारी (वार्ता.) - विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने १६ फेब्रुवारी या दिवशी येथील गांधी पुतळ्यापाशी धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी गृहमंत्र्यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॉ. पानसरे यांच्या खुनाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत अजून पोलीस पोहोचले नाहीत. खून करणार्‍या धर्मांध संघटनेवर बंदी घातली नाही. तरी खुनाच्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्यातील धर्मांध संघटनांवर बंदी घालावी. त्यांच्या समाजविरोधी कार्यावर गुप्तचर संघटनांनी लक्ष ठेवावे.

(म्हणे) जिहादचा खरा अर्थ मानवतेला शोषणवादी सत्तांपासून मुक्त करणे !

जमात-ए-इस्लामी हिंदने प्रसारित केलेल्या पत्रकातील माहिती
बॉम्बस्फोट करणे, गोळीबार करणे, निरपराध्यांचा जीव घेणे, याला 
शोषणापासून मुक्त करणे म्हणतात का ?
     पणजी - जमात-ए-इस्लामी हिंदया संघटनेने जिहाद उलगडतांना या विषयावर १९ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता एम्सीसी सभागृह, मडगाव, तर २० फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता गोमंतक मराठा समाज, पणजी येथे संघटनेचे उपाध्यक्ष सय्यद सदातुल्लाह हुसेनी यांच्या व्याख्यानांचे आयोजन केले आहे, अशी माहिती संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.

एकात्मता रक्षणाच्या नावाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून गोव्यात जाहीर कार्यक्रमाचे आयोजन

केवळ आरोपावरून ख्रिस्ती प्राध्यापकाचा हात तोडणारे म्हणे 
राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करणार !
    पणजी, १६ फेब्रुवारी (वार्ता.) - काही धर्मांध संघटनांकडून राष्ट्राची, तसेच गोव्याची एकात्मता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा कांगावा करून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या संघटनेच्या गोवा शाखेने गोव्यात एकात्मता रक्षणाच्या नावाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कुठल्या धर्माच्या संघटना एकात्मता धोक्यात आणू पहात आहेत, याविषयी स्पष्ट करण्याचे मात्र या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत टाळले.
   पी.एफ्.आय.च्या स्थापनादिनाच्या निमित्ताने पणजी येथील आझाद मैदान येथे १७ फेब्रुवारीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आर्य समाजाचे नेते स्वामी अग्नीवेश उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती पी.एफ्.आय.चे गोवा अध्यक्ष शेख अब्दुल रौफ यांनी हॉटेल पॅलेसियो दी गोवा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या संघटनेचे गोव्यात ५०० ते ६०० सदस्य असल्याचा दावा रौफ यांनी या वेळी केला.

डायघर (जिल्हा ठाणे) येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला चांगला प्रतिसाद

महिलांना मार्गदर्शन करतांना समितीची कार्यकर्ती
      ठाणे - ८० टक्के मुसलमानबहुल असलेल्या मुंब्याजवळील डायघर या गावात हिंदु जनजागृती समिती डायघर ग्रामस्थ मंडळ आणि हिंदु राष्ट्र जनजागरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने केल्या जाणार्‍या प्रसाराला वेग आला असून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

फलक प्रसिद्धीकरता

शासन हा पैसा भारतात कधी परत आणणार ?
     काळ्या पैशासंदर्भात भारताचा जगात ४था क्रमांक असून २००४ ते २०१३ या काँग्रेसच्या शासनकाळात भारतातून काळ्या पैशाच्या रूपात ३४ लाख ५३ सहस्र १९० कोटी रुपये देशाबाहेर पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती अमेरिकेतील ग्लोबल फायनान्स इंटिग्रिटीने दिली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Congress shasanke varsh 2004-2013 karyakalme Bharatse 34 lakh karod kala dhan videsh gaya. - Ameriki sanstha GFI - Kya Congress iska uttar de payegi ?

जागो ! : कांग्रेस शासन के वर्ष २००४-२०१३ कार्यकाल में भारत से ३४ लाख करोड काला धन विदेश गया. - अमेरिकी संस्था ग्लोबल फायनान्स इंटिग्रिटी - क्या कांग्रेस इसका उत्तर दे पाएगी ?

सोलापूर येथे हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि सुवर्ण गणपति युवक प्रतिष्ठान यांची पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण न करण्याची शिवप्रतिज्ञा !

अशी प्रतिज्ञा करणार्‍या राष्ट्राभिमान्यांचे अभिनंदन !
      सोलापूर, १६ फेब्रुवारी - हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि सुवर्ण गणपति युवक प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या वेळी शिवप्रेमींनी पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करणार नाही. हिंदु संस्कृतीचा र्‍हास होऊ देणार नाही, व्हॅलेंटाईन डे साजरा करणार नाही, अशी प्रतिज्ञा १४ फेब्रुवारी या दिवशी केली. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

(म्हणे) व्यक्तीस्वातंत्र्यावर निर्बंध आणणार्‍या शासनाला खाली खेचणार ! - प्रकाश आंबेडकर

रोहित वेमुलाप्रमाणे देशद्रोह्यांचे समर्थन करणे, शत्रूराष्ट्राच्या 
घोषणा देणे, हे व्यक्तीस्वातंत्र्य आहे का ?
     कुडाळ - स्वातंत्र्य मिळल्यानंतर या राष्ट्राला धर्म असणार नाही, हे स्वातंत्र्यकालीन पिढीने ठरवून दिल्याने गेल्या ६९ वर्षांत धर्माच्या नावाने युद्ध वा संघर्ष दिसला नाही. सध्या देशात धर्माचे नवे वादळ उभे राहत असल्याचे दिसते. संशोधनाची केंद्रे, महाविद्यालये, विद्यापिठे ही या वादळाची केंद्र आणि राज्यशासित केंद्रे आहेत. माणूस धर्मासाठी कि धर्म माणसासाठी हा वाद उफाळून येईल. लोकशाहीत माणसाला प्रगल्भ करण्याची आवश्यकता असतांना त्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन आणि निर्बंध घालण्यास प्रारंभ झाला आहे. अधिकार गाजविणार्‍यांना पाच वर्षांनी खाली खेचल्याशिवाय रहाणार नाही, असे ठणकावून सांगा, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी केले. (सध्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैद्राबाद विद्यापीठ आदी ठिकाणी जो देशद्रोह चालू आहे, त्याचे हे समर्थन नव्हे का ? धर्माच्या नावे वादळ खरोखरच उभे रहात असेल, तर ते मुसलमानांकडून उभे केले जात आहे ! त्याचा पुरावा म्हणजे दोन्ही विद्यापिठांतून दिल्या गेलेल्या पाकप्रेमाच्या घोषणा ! असे असतांना त्या प्रकाराला व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून प्रोत्साहन देणे, हाही देशद्रोह नव्हे का ? - संपादक)
     भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा आणि मुंबई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे बौद्ध धम्म मेळावा आयोजित करण्यात आला होता.

अल्पवयीन मुलींशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दोन तरुणांना पोलीस कोठडी

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे समाजाची झालेली दुःस्थिती !
    कणकवली - अल्पवयीन दोन शालेय मुलींना फूस लावून पळवून नेऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी अजय तुकाराम चिंचवलकर (भरणी-तांबळवाडी) आणि जगदीश बांदिवडेकर (कलमठ-गावडेवाडी) या दोन युवकांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे. ही घटना ६ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत घडली.
यापैकी एक मुलगी इयत्ता नववी, तर दुसरी दहावीत वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकत आहेत.
    ५ फेब्रुवारीपासून त्या मुली घरातून गेल्या होत्या, त्या १२ फेब्रुवारीला सायंकाळी घरी आल्या. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुली ६ फेब्रुवारीला जगदीश बांदिवडेकर याच्याबरोबर दुचाकीने गावडेवाडी, कलमठ येथील त्याच्या घरी गेल्या. तिथे दोघा संशयितांनी मुलींवर अत्याचार केले. घटनेची तक्रार पीडित अल्पवयीन मुलींच्या नातेवाइकांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी पुढील कार्यवाही केली.

नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भात शाळा आणि महाविद्यालये येथे प्रबोधन

हात उंचावून संकल्प करतांना एका शाळेतील विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. नरेंद्र पाटील
     नंदुरबार - येथील १८ शाळा आणि महाविद्यालये येथील प्राचार्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार टाळून भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. ११ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रबोधनात्मक व्याख्यानाच्या माध्यमातून ३ सहस्रांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत विषय पोहोचवण्यात आला. या वेळी सहस्रो विद्यार्थ्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या ऐवजी मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करणार, असा संकल्प हात उंचावून केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील आणि रणरागिणी शाखेच्या सौ. कल्याणी बंगाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

व्हॅलेंटाईन डेवर इंडोनेशियातील अनेक शहरांत बंदी !

भारतीय राज्यकर्ते इंडोनेशियाकडून बोध घेतील का ?
     जकार्ता (इंडोनेशिया) - इंडोनेशियातील अनेक प्रांतात व्हॅलेंटाईन डेला विरोध करण्यात आला. केवळ मुल्ला-मौलवीच नाही, तर अनेक शासकीय स्तरावरील यंत्रणांनीही व्हॅलेंटाईन डेला इस्लामविरोधी मानीत तो साजरा करण्यासाठी मज्जाव केला. 
१. देशातील असेह या प्रांताची राजधानी असलेल्या बांदा असेहमध्ये सहस्रो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शहरातून मोर्चे काढीत व्हॅलेंटाईन डेला आपला विरोध दर्शवला. (भारतातील हिंदु युवक यातून बोध घेतील का ? - संपादक)
२. शरिया कायद्याच्या अधिकार्‍यांसमवेत शहराचे महापौर इलिजा सलाउद्दीन जमाल हे १३ फेब्रुवारीला झालेल्या मोर्च्यांमध्ये सहभागी झाले. 
३. इंडोनेशियाचे दुसरे सर्वाधिक मोठे शहर असलेल्या सुराबयामध्ये ही अशाप्रकारचे विरोध मोर्चे काढण्यात आले.

महाराणा प्रताप बटालियनने क्रूरकर्मा बाबराच्या जन्मदिनानिमित्त त्याची प्रतिमा जाळली !

      पनवेल - येथील पृथ्वी सभागृहात महाराणा प्रताप बटालियनकडून १४ फेब्रुवारी या बाबराच्या जन्मदिनानिमित्त बाबराची प्रतिमा जाळण्यात आली. या वेळी बटालियनचे अध्यक्ष ठाकूर अजयसिंह सेंगर, भाजपच्या खोपोली सरचिटणीस स्नेहा अग्रवाल, विश्‍व हिंदु परिषदेचे सचिन खुले, विशाल कुरणे यांच्यासह हिंदु तरुण उपस्थित होते.
      या वेळी अजयसिंह सेंगर यांनी भाषणात सांगितले की, बाबराने हिंदूंची सहस्रावधी मंदिरे तोडून त्यांचे मशिदीत रूपांतर केले, याचे पुरावेही आहेत. आता बाबराचे नव्हे, तर श्री. नरेंद्र मोदी यांचे शासन आहे. तेव्हा श्री. मोदी यांनी बाबराने ज्या मंदिरांचे रूपांतर मशिदीत केले आहे, त्यांचे पुन्हा मंदिरात रूपांतर करावे, तसेच राममंदिराची लवकरात लवकर उभारणी करावी, असे त्यांनी सांगितले.

इंडिया नको; हिंदुस्थान म्हणा !

   भारत, हिंदुस्थान आणि इंडिया...एकाच देशाची तीन नावे...! हिंदुस्थान आणि भारत म्हणजे आपल्या दैदीप्यमान, उज्ज्वल पूर्वजांकडून, मिळालेली देणगी आणि इंडिया हे इंग्रज जातांना चिटकवून गेलेले बिरूद. आज या धरणीवर असा एकही देश नसावा, ज्याला तीन वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते, अपवाद फक्त भारत. मनुष्याची असो किंवा देशाची, पहिली ओळख ही त्याच्या नावावरून होते. एक सर्वांगसुंदर, सर्वसंपन्न देश आहे. इथला सजीव-निर्जीव प्रत्येक कण अन् कण संपूर्ण जगाला शतकानुशतके प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शक ठरला आहे; पण इंग्रजांनी त्याला इंडिया अशा स्वरूपात आज जगापुढे आणून ठेवले.

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडून श्री हनुमानाचा अवमान !

देशद्रोह्यांचे समर्थन करण्यासाठी श्री हनुमानाचा वापर करून 
त्याचा अवमान करणार्‍या केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे !
      नवी देहली - देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर श्री हनुमानाचे अवमान करणारे व्यंगचित्र शेअर केले आहे. यावरून सोशल मीडियावर केजरीवाल यांच्यावर टीका होत आहे.
     या व्यंगचित्रात मेक इन इंडियाच्या आग लागलेल्या व्यासपिठावर पंतप्रधान मोदी उभे आहेत. या व्यासपिठाभोवती महागाई, विधानसभा निवडणूक, कोसळता शेअर बाजार आदी विषय लिहिले आहे. तेथे आकाशात उड्डाण केलेला शेपटीला आग लागलेला हनुमान पंतप्रधान मोदी यांना सांगत आहे, काम झाले आहे. आता सर्व लक्ष जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयाकडे वळले आहे. तेव्हा चित्रात दाखवण्यात आलेली प्रसारमाध्यमे हनुमानाचे वाक्य ऐकून जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयाकडे धावत आहेत.
     या चित्रावर झैद हमिद नावाच्या ट्वीटर उपयोगकर्त्याने (युझरने) लिहिले आहे की, एकिकडे महंमद पैगंबर यांच्या अवमानासाठी मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते, तर भारतात हिंदुत्वाचा अवमान करून मते मिळवण्यात येतात.
     कल्याण - येथील १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या ५ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण पश्‍चिममधील वाडेघर परिसरात बलात्काराची घटना घडली. या प्रकरणात एका १५ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. पीडित मुलीचे एका मुलासमवेत प्रेमसंबंध होते. फिरायला जाण्याच्या बहाण्याने प्रियकराने तिला दुचाकीवरून जवळच्या जंगलात नेले. तेथे त्याचे अन्य ४ मित्रही होते. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

म्हैसाळ पाणी योजनेचे थकित वीजदेयक टंचाई निधीतून भरून योजना त्वरित चालू करा ! - मनसे

      कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली), १६ फेब्रुवारी (वार्ता.) - सांगली जिल्ह्यातील जत, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज आदी भागांतील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेली म्हैशाळ पाणी योजना पाच कोटी थकित देयकापोटी बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे शेतकर्‍यांची अंदाजे ७०० कोटी रुपयांची हानी होणार आहे. त्यामुळे म्हैसाळ पाणी योजनेचे थकित वीजदेयक टंचाई निधीतून भरून योजना त्वरित चालू करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रतिकात्मक भीक मागा आंदोलन करण्यात आले.

ब्रिटिशांच्या विरोधात मृत्यूनंतरही लढण्याचा निर्धार करून तरुणांसमोर जाज्वल्य राष्ट्राभिमानाचा आदर्श ठेवणारे क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके !

क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने....
    ज्या भूमीच्या पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करत उपाशी मरावे आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत रहावे, हे मला पहावले नाही आणि म्हणून ब्रिटीश शासनाच्या विरोधात मी बंड पुकारले ! अहो, माझ्या हिंदुस्थानवासी बांधवहो, तुमच्या कल्याणासाठी मी माझे प्राण पणास लावीत आहे. असा प्रयत्न करण्यातही मी काय पुरुषार्थ केला ? दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांच्या कल्याणासाठी नाही का काढून दिल्या ? तसेच माझे प्राण घेऊन तरी ईश्‍वराने तुम्हांला सुखी करावे, अशी माझी त्याला प्रार्थना आहे ! मी मरून जाईन. पण या दुष्ट, प्रजाभक्षक, चांडाळ इंग्रजांना मेल्यानंतरही मी शांतता लाभू देणार नाही. - क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके

सोनिया गांधी यांनी राष्ट्रीयतेची व्याख्या सांगावी ! - साध्वी प्राची

      नवी देहली - राष्ट्रीयतेची व्याख्या सोनिया गांधी यांनी देशाला सांगितली पाहिजे. त्या भारताच्या पैशांवर जगतात आणि पाकिस्तानचे गोडवे गातात. त्यामुळे देशद्रोह्यांचे समर्थन करणार्‍यांनाही शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी भाजपच्या नेत्या साध्वी प्राची यांनी जेएन्यूच्या बाहेर पत्रकारांशी बोलतांना केली.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून 
घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या !
www.hindujagruti.org

जळगाव येथील सभेला २५ सहस्र धर्माभिमानी उपस्थित असूनही कार्यकर्त्यांमधील अक्षम्य उदासीनतेमुळे केवळ ३०५ जणांनी अभिप्रायपत्रके भरून देणे

      २७.१२.२०१५ या दिवशी जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभा झाली. त्या सभेला २५ सहस्र धर्माभिमान्यांची उपस्थिती होती. अभिप्रायपत्रकांच्या संदर्भात सभेत झालेली अक्षम्य चूक पुढे देत आहे.
१. सभेला चांगली उपस्थिती लाभण्याची 
शक्यता असतांनाही तुलनेने अल्प पत्रके वितरित करणे
       सभेच्या आयोजनाचे दायित्व असणारे श्री. विजय पाटील, कु. प्रतीक्षा कोरगांवरकर आणि श्री. उदय बडगुजर यांनी पूर्वी ठरल्यानुसार सभेच्या संभाव्य उपस्थितीपेक्षा निम्मी अथवा त्याहून अल्प अभिप्रायपत्रके वितरित करू शकतो. जेणेकरून ती वाया जाणार नाहीत, असा विचार केला. सभेला चांगली उपस्थिती लाभू शकते, तर अधिक पत्रके वितरित करायची का ? याविषयी उत्तरदायींना न विचारता केवळ २ सहस्र पत्रके वाटण्याचे निश्‍चित केले.

प.पू. पांडे महाराज यांच्या सत्संगात कु. मृण्मयी गांधी हिने अनुभवलेले अमूल्य क्षण !

कु. मृण्मयी गांधी
     मी वर्ष २००८ ते वर्ष २०१० या कालावधीत देवद आश्रमात आईवडिलांसमवेत रहात होते. त्या वेळी मी शालेय शिक्षण घेत होते. त्या वेळी प.पू. पांडे महाराजांच्या सत्संगात रहाण्याची अमूल्य संधी मला मिळाली. त्यांनी केलेले संस्कार आणि अथांग प्रेम यांमुळे आम्ही बालसाधक घडत होतो. मला अनुभवायला मिळालेले त्यांतील काही अमूल्य क्षण येथे देत आहे.
१. मनकवडे प.पू. पांडे महाराज
१ अ. प.पू. महाराजांनी साधिकेला हवे असलेले चॉकलेट जाणून ते प्रसाद म्हणून देणे : देवद आश्रमात आम्ही काही बालसाधक रहात होतो. आम्ही सर्व जण सकाळची आरती झाली की, प.पू. पांडे महाराजांकडे (प.पू. बाबांकडे) जायचो. प.पू. बाबा प्रतिदिन सर्व बालसाधकांना प्रसाद (चॉकलेट) द्यायचे. एका प्रकारच्या चॉकलेट्सच्या बरणीतील सर्व चॉकलेट्स संपले की, ते दुसरी चॉकलेट्स द्यायचे. एके दिवशी आम्ही बाबांच्या खोलीत गेलो असतांना बाबा सर्वांना इक्लीयर्स चॉकलेट देत होते. त्या वेळी त्या बरणीत एकच चॉकलेट होते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, बाबांनी मला ते चॉकलेट द्यायला हवे. मला ते आवडते. हा विचार आल्याक्षणी मला माझ्या चुकीची जाणीव झाली. त्या वेळी माझ्या मनात विचार आले, प्रतिदिन मला हा प्रसाद मिळतो; परंतु त्याचे मला काहीच वाटत नाही. त्यातही आवड-नावड कशाला असायला हवी ? प.पू. बाबा जे काही देतील, ते मला प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे. असा विचार करून मी मनोमनच प.पू. बाबांची क्षमा मागितली. माझ्या मनात हे विचार चालू असेपर्यंत बाबांनी मला चॉकलेट दिले नाही. सर्व बालसाधकांना चॉकलेट्स दिली आणि सर्वांत शेवटी इक्लीयर्सचे ते चॉकलेट काढून मला दिले आणि हसून मला म्हणाले, झाले समाधान ? त्या वेळी यांना प्रत्येकाच्या मनातील प्रत्येक विचार कळतो, याची जाणीव झाली.

नाशिक येथील सिंहस्थ पर्वातील सेवा करतांना पू. (कु.) स्वाती खाडये आणि सहसाधक यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

पू. (कु.) स्वाती खाडये
१. पू. स्वातीताईंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार 
तळमळ वाढवायचा प्रयत्न करणे
       मी नाशिकला सेवेसाठी गेल्यावर मला पहिल्याच दिवशी रात्री पू. स्वातीताईंचे मार्गदर्शन ऐकायला मिळाले. मार्गदर्शनात त्यांनी सांगितले, माझ्यावर नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथील कुंभमेळ्यांच्या नियोजनाचे दायित्व होते. त्यात अनेक अडचणी येत होत्या; पण त्यावर श्रीकृष्णाच्या कृपेने मात करता येत होती. त्यातील एक म्हणजे प्रदर्शनाची दिनांक जवळ आली, तरी योग्य ठिकाण मिळत नव्हते. तेव्हा मी एका संतांना भेटले आणि अडचण सांगितल्यावर त्या संतांनी योग्य ठिकाणी जागा मिळवून दिली. हे ऐकून मला तळमळ असेल, तर देव कसे साहाय्य करतो, हे शिकायला मिळाले. त्याच वेळी मी ठरवले की, मला जी सेवा मिळेल, ती मी तळमळीने आणि झोकून देऊन करीन. देव पावलोपावली साहाय्य करणारच आहे.

संत हे देवाचे सगुण रूप याची घेते मी प्रचीती ।

सौ. अश्‍विनी सावंत
प.पू. पांडे महाराज,
यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार.
    प.पू. बाबा, (प.पू. पांडे महाराज) मला तुमची पुष्कळ आठवण येते. तुमच्या सेवेतील क्षण आठवून माझी भावजागृती होते. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुमचा सत्संग लाभला आणि नंतर ते क्षण आठवून माझी भावजागृती झाली. त्यासाठी आपल्या कोमल चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार.
श्रीगुरुदेवांनी जवळ घेऊनी कृपा मजवर केली ।
प.पू. बाबांच्या (टीप : १) सेवेतून देवाने
सगुण सेवा करून घेतली ॥ १ ॥ 

महर्षींनी वसंतपंचमीच्या दिवशी कळसपूजेनंतर सत्यनारायणाच्या प्रसादासारखा शिर्‍याचा प्रसाद रामनाथी आश्रमातील साधकांना देण्यास सांगितले, तसा प्रसाद मिरज आश्रमातही ग्रहण करण्यास मिळणे

      वसंतपंचमीच्या दिवशी मी मिरज आश्रमात होते. याच दिवशी प्रसारातील एका साधिकेने शिर्‍याचा प्रसाद तिच्या घरी करून आश्रमातील साधकांना देण्यासाठी आणला होता.
      १४.२.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये महर्षींनी रामनाथी आश्रमातील साधकांना शिर्‍याचा प्रसाद देण्यास सांगितल्याचे लिखाण वाचनात आल्यावर त्याच दिवशी आम्हालाही तसाच प्रसाद ग्रहण करण्याची संधी देवाकडून मिळाली. यासाठी महर्षि आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
- सौ. कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, मिरज. (१४.२.२०१६)

हिंदु धर्मजागृती सभांसाठी जागेची निवड करतांना विविध सोयीसुविधा आणि सुरक्षितता यांचा विचार करा !

कार्यकर्त्यांना सूचना
     हिंदु धर्मजागृती सभेसाठी जागेची निवड करतांना विद्युत पुरवठा, पाण्याची उपलब्धता, वाहनतळासाठी पुरेशा जागेची उपलब्धता, सर्वांच्या सोयीचे आणि मध्यवर्ती ठिकाण आदी बाबींचा विचार करावा. तसेच धर्मजागृती सभेच्या सुरक्षेचाही विचार प्राधान्याने करावा. त्यासाठी सभास्थळाच्या आजूबाजूला आणि येण्या-जाण्याच्या मार्गावर धर्मांध आणि धर्मद्रोही यांच्याकडून उपद्रव होण्याची शक्यता आहे का, हे पडताळून पहावे. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही अडचण वाटत असल्यास जागा निश्‍चित करण्यापूर्वी दायित्व असलेल्या साधकांना त्याची पूर्वकल्पना द्यावी. रामनाथी आश्रमात स्थापित होणार्‍या कळसांच्या पूजनाच्या वेळी कु. कल्याणी गांगण यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण

कु. कल्याणी गांगण
१. सायं. ५.२०
ध्यानमंदिरात प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवून ते वाईट शक्तीपासून रक्षण करत असल्याचे जाणवणे : कळसांची पूजा करण्यापूर्वी ध्यानमंदिरात प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवत होते. या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रकटदिन होता. त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज वाईट शक्तीपासून रक्षण करत आहेत, असे जाणवले. मी पूर्वसिद्धता चालू असतांना ध्यानमंदिरात गेले. तेव्हा तेथे जास्त प्रमाणात चैतन्य जाणवत होते.

राष्ट्र-धर्म कार्यात प्रभावीपणे साहाय्य करणार्‍या हितचिंतकांना शीघ्रतेने नियतकालिक सनातन प्रभात चालू करून त्याचा आढावा २९.२.२०१६ या दिवसापर्यंत पाठवा !

सर्व जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना 
१. विविध विषयांचे अमूल्य ज्ञानभांडार उपलब्ध करून देणारे नियतकालिक
 सनातन प्रभात सर्वत्रच्या हितचिंतकांपर्यंत शीघ्रतेने पोचवा ! 
      समाजाला धर्मशिक्षण देण्यासाठी, तसेच धर्मजागृती करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती कटिबद्ध आहेत. या कार्यात समाजातील अनेक जण विविध माध्यमांतून सहभागी होत असतात. धर्मप्रसाराच्या कार्यात आर्थिकदृष्ट्या किंवा अन्य मार्गांनी (उदा. सभागृह अथवा वास्तू वापरण्यास देणे, वस्तूरूपात अर्पण देणे, भोजन-निवासाची व्यवस्था करणे) प्रभावीपणे सहभाग घेणार्‍या हितचिंतकांना कार्यात सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने नियतकालिक सनातन प्रभात चालू करावे. असे केल्यास अध्यात्म, राष्ट्र, धर्म, आचारधर्म आदी विषयांचे अमूल्य ज्ञानभांडार उपलब्ध करून देणारे नियतकालिक वाचून हितचिंतकांना पुढील प्रयत्नांविषयी प्रेरणा मिळेल आणि त्यांचा कार्यातील सहभाग वाढेल.
२. हितचिंतकांना अंक चालू करतांना लक्षात घ्यावयाची सूत्रे 
अ. दैनिक वितरणाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी दैनिक चालू करण्यास प्राधान्य द्यावे. तसे शक्य नसल्यास साप्ताहिक, पाक्षिक अथवा मासिक सनातन प्रभात चालू करू शकतो.

अफाट ज्ञान, अभ्यासू वृत्ती आणि अथांग प्रेम असलेले प.पू. पांडे महाराज

प.पू. पांडे महाराज
      माघ शुक्ल पक्ष दशमी या तिथीला प.पू. पांडे महाराज आणि प.पू. डॉक्टर यांची प्रथम भेट झाली होती. प.पू. पांडे महाराजांना त्या वेळी झालेल्या साक्षात्काराने त्यांनी प.पू. डॉक्टरांच्या चरणी आपल्या भावाश्रूंनी अभिषेक केला. प्रथम भेटीतच प.पू. डॉक्टरांमधील अलौकिकत्व ओळखणार्‍या प.पू. पांडे महाराजांच्या दृष्टीने गुरुभेटीचा जीवनातील हा अमूल्य दिवस असल्याने तो दिन ते आपला जन्मदिवस म्हणून मानतात. या वर्षी ही तिथी १७.२.२०१६ या दिवशी येत आहे. त्या निमित्ताने साधकांनी अनुभवलेली त्यांची वैशिष्ट्ये, अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढील लेखांतून देत आहोत.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
वेळ न मिळणे
     जे व्यय (खर्च) करायचे आहे, ते तुम्ही गोळा (जमा) करता व जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता. याउलट कसे करायचे ते शिका.
भावार्थ : जे व्यय करायचे आहे, ते तुम्ही गोळा करता म्हणजे पैसा गोळा करता आणि जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता म्हणजे साधना करण्याचा बहुमूल्य वेळ वाया घालविता. याउलट कसे करायचे ते शिका म्हणजे वेळेचा जास्तीतजास्त वापर साधना करण्यासाठी करा. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     आपण आईचे दूध पितो, त्याप्रमाणे गायीचे दूध पितो; म्हणून गायीला गोमाता म्हणतात. असे असतांना गायीचीच हत्या करणे, हे आईची हत्या करण्यासारखेच झाले. ही कृतघ्नपणाची परिसीमा होय ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    कठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने आणि हुशारीने त्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)बोधचित्र


गरीब बिच्चारे आतंकवादीजी !

संपादकीय
     जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील देशद्रोही विद्यार्थ्यांना अटक झाल्यापासून काँग्रेसवाल्यांचे चित्त थार्‍यावर नाही. या गुणी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही मंडळी सध्या रस्त्यावर उतरली आहेत. बहुतांश वेळ सुट्टीवर असणारे आणि विदेशात दौर्‍यावर जाणारे राहुल गांधी यांना हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना, अत्याचाराने पीडित हिंदूंना भेटण्यासाठी वेळ नसतो; मात्र या देशद्रोह्यांसाठी त्यांच्याकडे वेळच वेळ आहे. भारताशी सरळ सरळ युद्ध पुकारण्याची भाषा करणार्‍या या नाठाळ विद्यार्थ्यांवर कायद्याचा बडगा उगारला जाणार, हे लक्षात आल्यावर राहुल गांधी थेट विश्‍वविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये त्यांना भेटले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn