Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज तिथीनुसार प्रजासत्ताकदिन

     देश प्रजासत्ताक झाला तो दिवस होता माघ शुक्ल पक्ष अष्टमी या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार २६ जानेवारी असल्याचे म्हटले जाते. भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारतीय प्रजासत्ताकदिन २६ जानेवारी या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे माघ शुक्ल पक्ष अष्टमी या दिवशी साजरा करा !
या वर्षी माघ शुक्ल पक्ष अष्टमी ही तिथी आज आहे.

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना हाफीज सईदचा पाठिंबा ! - राजनाथ सिंह

जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील देशद्रोहाचे प्रकरण
जिहादी आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांची बाजू घेणार्‍या सर्व नेत्यांवर 
राजनाथ सिंह यांनी कठोर कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे !
     प्रयाग/नवी देहली - जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याचा पाठिंबा आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, या विद्यार्थ्यांना हाफीजचा पाठिंबा मिळणे हे दुर्दैवी आहे आणि या संदर्भात संपूर्ण देशाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. सिंह यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले की, देशद्रोहाच्या घटनेविषयी राजकीय लाभ उठवण्याचा कुणी प्रयत्न करू नये. याविषयी संघटित व्हावे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.
देशद्रोही घोषणा देणारे बहुतांश विद्यार्थी काश्मिरी ! 
     जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात महंमद अफझलच्या स्मरण दिवसाच्या कार्यक्रमातील बहुतेक विद्यार्थी जम्मू-कश्मीरचे होते. त्यांनीच देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. देहली पोलीस त्यांची माहिती गोळा करत आहेत. यात १२ हून अधिक विद्यार्थी सहभागी होते. त्यात अटक करण्यात आलेला विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि सरचिटणीस रामा नागा यांचाही समावेश आहे.

अखंड शरणागत भावात रहाणार्‍या वरळी (मुंबई) येथील श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय ९५ वर्षे) संतपदी विराजमान !

पू. (श्रीमती) आनंदी पाटील आजी यांचा सन्मान करतांना पू. (कु.) अनुराधा वाडेकर
    मुंबई - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वरळी येथील हिंदु धर्मजागृती सभा १४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता चालू होणार होती. सभेला काही अवधी राहिला असतांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती अखंड शरणागत भाव असणार्‍या वरळी (मुंबई) येथील श्रीमती आनंदी पाटीलआजी या सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करून १४ फेब्रुवारी या दिवशी संतपदी विराजमान झाल्या.

नेहरूंनी इंग्रजांना चंद्रशेखर आझाद लपल्याची माहिती दिली होती !

क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांच्या पुतण्याचा खळबळजनक खुलासा
नेहरू आणि देशद्रोह यांचा परस्परांशी संबंध आहे, 
असे कुणी म्हटल्यास त्यात आश्‍चर्य ते काय !
     मुरादाबाद (उत्तरप्रदेश) - २७ फेब्रुवारी १९३१ या दिवशी जवाहरलाल नेहरूंनीच इंग्रजांना थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद हे कंपनी बाग येथे लपले असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे चंंद्रशेखर आझाद यांना इंग्रजांनी घेरले. परिणामी चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःच्या बंदुकीत राहिलेली शेवटची गोळी स्वत:ला मारून घेत भारतमातेला स्वत:चेे प्राण अर्पिले. उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद येथे आलेले चंद्रशेखर आझाद यांचे पुतणे सुजीत आझाद यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करतांना हा खळबळजनक खुलासा केला. चंद्रशेखर आझाद यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. (मोदी शासनाने सुजीत आझाद यांची मागणी मान्य करून या प्रकरणी सत्य शोधले पाहिजे ! - संपादक)
सुजीत आझाद पुढे म्हणाले की, 
१. सत्तेसाठी नेहरूंनी रचलेल्या या षड्यंत्रासाठी त्यांना शिक्षा मिळायला हवी. त्यांना देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार परत घ्यावा. 
२. इंग्रजांच्या कागदपत्रांतून चंद्रशेखर आझाद यांच्या नावाआधी जोडलेले आतंकवादी आणि गुंड हे शब्द काढून टाकले पाहिजेत. (देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या ६९ वर्षांत सर्वाधिक काळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसने हे का केले नाही ? - संपादक)
३. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास स्वातंत्र्य मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनांसारखेच आंदोलन आताही करण्यात येईल, अशी चेतावणीही आझाद यांनी या वेळी दिली. 
नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये राष्ट्रद्रोही घोषणा देणार्‍यांना फासावर लटकवा ! - सुजीत आझाद 
    जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात भारतविरोधी घोषणा देणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. ते राष्ट्रद्रोही आहेत. त्यांना देहलीतील रामलीला मैदानावर फाशी द्यायला हवी, असे सुजीत आझाद यांनी कठोर शब्दांत सुनावले. (सुजीत आझाद यांची मागणी हे राष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात जनतेत असलेल्या रागाचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. - संपादक)

ठाण्यातील प्रदर्शनातून हुसेन यांची चित्रे वगळली !

हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या विरोधाचा परिणाम !
     ठाणे - कळवा येथील आर्ट फेस्टीव्हल २०१६मध्ये पिकासो ते एम्.एफ्. हुसेन हे चित्रप्रदर्शनाचे दालन उघडण्यात येणार होते. या दालनात हिंदूंच्या देवता आणि भारतमाता यांची नग्न आणि अश्‍लील चित्रे काढून त्यांचा अवमान करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही चित्रकार म.फी. हुसेन यांच्या चित्रांचा समावेश करण्यात येणार होता. या प्रदर्शनाच्या माध्यामातून चित्रकार हुसेन यांचे उदात्तीकरण करण्यात येणार होते. यावर आक्षेप घेत समितीने हुसेन यांच्या चित्रांचा समावेश करण्यात येऊ नये, अशी मागणी ठाणे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती, तसेच अन्य समविचारी संघटनांसमवेत पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करण्यात आली होती.

व्हॅलेंटाईन डेला इस्लामी देशांत कोणतेही स्थान नाही ! - पाकचे राष्ट्रपती ममनून हुसेन

पाककडून भारतीय राज्यकर्ते काही बोध घेतील का ?
     इस्लामाबाद - व्हॅलेंटाईन डे पाश्‍चात्त्य देशांत साजरा केला जातो. त्याला इस्लामी देशात कोणतेही स्थान नाही, असे प्रतिपादन पाकचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी केले. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या एक दिवस आधी त्यांनी विद्यार्थ्यांना हा दिवस साजरा न करण्याचे आवाहन केले. आपल्या संस्कृतीशी त्याचा संबंध नाही; म्हणून तो साजरा करू नये. त्यापेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रत करावे, असेही त्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त पेशावरच्या जिल्हा परिषदेने व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात एकमताने प्रस्ताव संमत केला.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटन करण्याचा उपस्थित धर्माभिमान्यांचा निर्धार

हिंदूंना जागृत करण्यासाठी मुंबईतील प्रभादेवी 
आणि जोगेश्‍वरी येथे हिंदु धर्मजागृती सभा  
जोगेश्‍वरी : (डावीकडून) सौ. नयना भगत, डॉ. उपेंद्र डहाके आणि श्री. नरेंद्र सुर्वे

प्रभादेवी : श्री. सुमित सागवेकर, दीपप्रज्वलन करतांना 
सौ. सुनीता पाटील आणि वैद्य उदय धुरी
    मुंबई - इसिसचे भयावह संकट आज हिंदुस्थानच्या भूमीवर घोंगावत आहे. दंगली, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद आदी माध्यमांतून स्थानिक धर्मांधांनी हिंदूंना जगणे कठीण केले आहे. त्यात भर म्हणून विद्रोही आणि जातीयवादी हे पुरोगामीपणाच्या नावाखाली हिंदूंमध्ये उभी फूट पाडत आहेत. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे धर्मांतर आणि पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण यांना उत आला आहे. भ्रष्टाचार, लोकसंख्यावाढ, गुन्हेगारी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या आदी संकटांनी आज भारतवर्ष त्रस्त आहे. भारतमातेसमोरील या सर्व संकटांवर एकमेव उत्तर आहे आणि ते म्हणजे हिंदु राष्ट्र ! या हिंदु राष्ट्राच्या म्हणजेच धर्माधिष्ठित राष्ट्राच्या निर्मितीसाठी हिंदूंना जागृत करून हिंदूसंघटन करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु धर्मजागृती सभा १४ फेब्रुवारी या दिवशी मुंबईतील प्रभादेवी आणि जोगश्‍वरी येथे चैतन्यमय वातावरणात पार पडल्या.

खासदारांचे वेतन आणि भत्ते दुप्पट करा ! - बहुतांश खासदारांची मागणी

आता आमदार, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत येथील
लोकप्रतिनिधींनी पगारवाढ मागितल्यास आश्‍चर्य वाटायला नको !
      नवी देहली - खासदारांचे वेतन आणि भत्ते दुप्पट करण्याच्या केंद्रशासनाच्या प्रस्तावाची त्वरित कार्यवाही करण्याची मागणी संयुक्त संसदीय समितीच्या अनेक सदस्यांनी केली आहे. संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते या विषयावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त समितीच्या १० फेब्रुवारी या दिवशी पार पडलेल्या बैठकीत बहुतांश खासदारांनी ही मागणी केली. या संयुक्त समितीला संसदेकडून अधिकार मिळाले असल्यामुळे खासदारांचे वेतन आणि भत्त्यांची समीक्षा करण्यासाठी स्थापन करण्यात येणार्‍या कोणत्याही स्वतंत्र यंत्रणेचा अहवाल या संयुक्त संसदीय समितीद्वारे आला पाहिजे, असेही या खासदारांनी नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले.

अतीक अहमद या माजी नगरसेवकाच्या कथित हत्येवरून शेकडो समर्थकांनी केली तोडफोड !

मध्यप्रदेशातील रीवा शहराला आले बंगालच्या मालदासारखे स्वरूप !
माजी मुसलमान नगरसेवकाच्या समर्थकांच्या असहिष्णुतेवर आता कोणीही बोलत नाही !
     रीवा (मध्यप्रदेश) - १३ फेब्रुवारीच्या रात्री येथील माजी नगरसेवक अतीक अहमद उपाख्य रॉकीचा मृत्यू झाला. त्यामुळे क्रोधित झालेल्या अहमदच्या ३०० समर्थकांनी अनेक वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी अहमद यांना कारागृहात डांबून त्यांना बेदम मारल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप समर्थकांनी लावला.
१. मिळालेल्या माहितीनुसार अहमद त्यांच्या सहकार्‍यांसह एक घर बळजोरीने रिकामे करत होते. त्यामुळे घटनास्थळी येऊन पोलिसांनी त्यांना अटक केली आणि कारागृहात डांबले.

तीन वेळा तलाक बोलून अतिरिक्त जिल्हा न्यायाधिशाने दिला पत्नीला घटस्फोट !

स्वतः शरीयतनुसार वागणारे समाजाला भारतीय कायद्यानुसार न्याय काय देणार ?
      अलीगड (उत्तरप्रदेश) - येथील जिल्हा न्यायालयातील ५९ वर्षीय अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश महंमद जहीरुद्दीन सिद्दीकी यांनी त्यांच्या ४७ वर्षीय पत्नी आफशा खान हिला तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट दिला आहे. विशेष म्हणजे आफशा यांचा सिद्दीकी यांच्याशी १६ ऑगस्ट २०१५ या दिवशी विवाह झाला होता.
     या संदर्भात आफशा यांनी भारताचे मुख्य न्यायाधीश आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, माझ्यावर झालेला अन्याय अशा व्यक्तीने केला आहे ज्याच्याकडे समाजाला न्याय देण्याचे दायित्व आहे. आफशा यांनी पतीवर लैंगिक अत्याचाराचाही आरोप केला आहे. यासंदर्भात एका इंग्रजी दैनिकात न्यायाधीश सिद्दीकी यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आमच्या दोघांमध्ये तोडजोड होऊ न शकल्याने मी शरीयत कायद्यानुसार घटस्फोट दिला आहे.

कडुनिंबाने बरा होतो स्वादुपिंडाचा कर्करोग !

भारतीय संस्कृतीनुसार वापरण्यात येणार्‍या नैसर्गिक संपत्तीचे विज्ञानाला लक्षात येत असलेले महत्त्व !
      होस्टन - कडुनिंबापासून काढलेला अर्क स्वादुपिंडाच्या कर्करोगावर (पॅन्क्रिअ‍ॅटिक कॅन्सरवर) उपचार करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो, असे अमेरिकेतल्या एका संशोधनात आढळून आले आहे. तसेच या औषधाचा निरोगी, आरोग्यपूर्ण पेशींवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, असा निष्कर्षही त्या संशोधनातून निघाला आहे. एका विज्ञानविषयक नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. इतर कोणत्याही कर्करोगापेक्षा स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. निदान झाल्यापासून जेमतेम पाच वर्षांत ९४ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. कर्करोग झपाट्याने शरिरात पसरतो आणि सध्या या कर्करोगावर प्रभावी उपचार करण्यासासाठी उपाययोजना उपलब्ध नाहीत. त्यामुळे नवी औषधयोजना सापडणे महत्त्वाचे आहे.

प्रभादेवी आणि जोगेश्‍वरी येथील हिंदु धर्मजागृती सभेतील मान्यवरांचे विचार

प्रभादेवी 
हिंदूंच्या राष्ट्रव्यापी एकत्रीकरणातून निर्माण होणार्‍या प्रभावी 
संघशक्तीमुळेच हिंदु राष्ट्र येईल ! - वैद्य उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती 
     आज प्रत्येक धर्मप्रेमी हिंदूला भारत हे हिंदु राष्ट्र व्हावे, असे वाटते; पण हे हिंदु राष्ट्र कसे स्थापन होणार, असा प्रश्‍न सर्वांच्या मनात आहे. बंधूंनो, आम्ही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी यज्ञ प्रज्वलित केला आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला राष्ट्रव्यापी जनआंदोलन उभे करून हवन द्यायचे आहे. हिंदूंच्या राष्ट्रव्यापी एकत्रीकरणातून निर्माण होणार्‍या प्रभावी संघशक्तीमुळे धर्मनिरपेक्ष राज्यकर्त्यांनाही भारत हे हिंदु राष्ट्र आहे, असे राज्यघटनेद्वारे घोषित करावेच लागेल.
सनातनवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍यांचे गुन्हे दिसूनही 
त्यांच्यावर बंदी का नको ? - सौ. सुनीता पाटील, सनातन संस्था 
     सध्या स्वतःचा खुनी इतिहास ज्ञात नसलेले काही राजकीय पक्ष आणि अंनिससारख्या संघटना सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. ज्या काँग्रेसने शीखविरोधी दंगली घडवून सहस्रो निरपराध शिखांची कत्तल केली, तिच्यावर बंदी का नको ?

कर्णावतीत अभिनेते शाहरुख खान यांच्या गाडीवर दगडफेक !

  • जय श्रीराम आणि शाहरुख खान हाय हाय या घोषणा दिल्या !
  • या घटनेवरून भारतात असहिष्णुता वाढल्याचा कांगावा कुणी केला, तर आश्‍चर्य वाटायला नको !
      कर्णावती (अहमदाबाद) - रईस या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गुजरातची राजधानी कर्णावती येथे आलेले अभिनेते शाहरुख खान यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. १४ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजता ही घटना घडली.
१. शाहरुख खान मुक्कामाला असलेल्या हॉटेलबाहेर त्यांची गाडी उभी होती. या वेळी दुचाकीवरून तोंडावर कापड बांधून आलेल्या दोघांनी त्यांच्या गाडीवर दगड फेकत जय श्रीराम आणि शाहरुख खान हाय हाय, अशा घोषणा दिल्या.
२. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
३. या मासाच्या आरंभीच गुजरातच्या भुजमध्ये रईस या चित्रपटाचे चित्रीकरण होणार होते; परंतु विश्‍व हिंदु परिषदेच्या धर्माभिमानी कार्यकर्त्यांनी खान यांच्या चित्रीकरणाला विरोध केला. त्यामुळे भूजमध्ये होणारे चित्रीकरण रहित करण्यात आले होते.
४. शाहरुख खान यांनी काही दिवसांपूर्वी देशात असहिष्णुता असल्याचे राष्ट्रद्रोही वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत.

डेन्मार्कमध्ये महिलेने बांधली मशीद !

     कोपेनहेगेन - डेन्मार्कच्या कोपनहेगेनमधील शेरिन खानकान या महिलेने महिलांसाठी मरियम मशीद बांधली आहे. त्यात सर्व इमामही महिलाच आहेत. विशेष म्हणजे मशिदीत महिला आणि पुरुषही सोबत नमाज पढू शकतील. शेरिन प्रसिद्ध समालोचक आणि लेखिका आहेत. मशिदीत महिलांच्या प्रवेशासाठी त्या आंदोलन करत होत्या. शेरिन म्हणाल्या, इस्लाम महिलेला इमाम बनण्याची मुभा देतो. शेरिनच्या या प्रयत्नाला शहरातील मुसलमान समुदायातील बहुतांश लोकांनी आता सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आरंभी मोठ्या इस्लामिक केंद्रांनी त्याला विरोध केला होता. डॅनिश इस्लामिक सेंटर यात आघाडीवर होते.

हवेच्या प्रदूषणामुळे जगभरात प्रतिवर्षी ५५ लाख लोकांचा मृत्यू

५० टक्के मृत्यू केवळ चीन आणि भारत या देशांमध्ये !
      वॉशिंग्टन - हवेच्या प्रदूषणामुळे जगभरात प्रतिवर्षी अनुमाने ५५ लाख लोकांचा मृत्यू होत असल्याचे एका अभ्यास पाहणीतून समोर आले आहे. या पाहणीनुसार भारत आणि चीन हे दोन देश सर्वाधिक हवेचे प्रदूषण असणारे असून ५० टक्के मृत्यू हे केवळ चीन आणि भारत या देशांमध्ये होत आहेत.
१. या अभ्यास पाहणीनुसार हवेच्या या प्रदूषणामुळे वर्ष २०१३ या वर्षात चीनमध्ये १६ लाख, तर भारतात १४ लाख लोकांचा मृत्यू झाला.

सिरियात सौदीचे सैन्य घुसल्यास महायुद्ध होईल !

रशियाची सौदी आणि अमेरिका यांना चेतावणी
      मास्को - सिरियामध्ये सौदी अरबचे सैनिक घुसल्यास महायुद्ध होऊ शकते, अशी चेतावणी सौदी अरबच्या पाठीमागे उभ्या असलेल्या अमेरिकेला रशियाचे पंतप्रधान दमित्री मेदवेदेव यांनी दिली आहे. एकीकडे सौदी अरबकडून सिरियाच्या बंडखोरांना धन आणि शस्त्रास्त्रे देण्यात येत आहेत, तर दुसरीकडे रशियाचे सैन्य सिरियाच्या अल् असद शासनाच्या बाजूने लढतांना बंडखोरांसह इसिसच्या आतंकवाद्यांशीही लढा देत आहे. त्यामुळे सिरियात उत्पन्न झालेल्या स्थितीविषयी अमेरिका आणि अरब देशांना चेतावणी देतांना मेदवेदेव म्हणाले, याविषयी अमेरिका आणि आमच्या अरब सहकार्‍यांनी गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. त्यांना नेहमीसाठी युद्ध हवे आहे का ? ते अशा प्रकारचे युद्ध जिंकतील, असे त्यांना वाटते का ? या संदर्भात चर्चा करण्यासाठी जगातील प्रमुख राष्ट्रांनी जर्मनीतील म्युनिक येथे होणार्‍या चर्चेसाठी एकत्र आले पाहिजे, असेही रशियाने सुचवले आहे.

विद्यार्थ्याच्या धर्माला परीक्षांमध्ये गुप्त ठेवण्यासाठी उत्तरप्रदेश शैक्षणिक बोर्डाने काढला आदेश !

उत्तरपत्रिकेवर ओम इत्यादी धार्मिक चिन्ह लिहिण्यास मज्जाव !
      लखनऊ (उत्तरप्रदेश) - अनेक विद्यार्थ्यांना परिक्षा देतांना स्वत:च्या उत्तरपत्रिकेवर ओमसारखे धार्मिक चिन्ह लिहिण्याची सवय असते; परंतु उत्तरप्रदेश माध्यमिक शिक्षा परिषद या उत्तरप्रदेशच्या शैक्षणिक बोर्डाने परीक्षांमध्ये अशाप्रकारच्या धार्मिक चिन्हांचा उपयोग करणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून थांबवले जाईल, असे म्हटले आहे.
१. परिषदेने विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेत ओम अथवा ७८६ सारखे धार्मिक चिन्ह किंवा संख्या यांचा उपयोग न करण्याविषयी सांगितले आहे.
२. असे करण्यामागे विद्यार्थ्यांचा धर्म गुप्त ठेवणे, असे कारण परिषदेने सांगितले आहे.
३. परिषदेने परीक्षा अधिक्षकांना याची खात्री करण्याचा आदेशही दिला आहे.

बिहारमध्ये गेल्या १० दिवसांत भाजपच्या उपाध्यक्षांसह तीन नेत्यांची हत्या

बिहारमध्ये पुन्हा जंगलराज !
      पाटलीपुत्र (पाटणा) - भाजपचे बिहार राज्याचे उपाध्यक्ष विश्‍वेश्‍वर ओझा यांची भोजपूर जिल्ह्यातील सोनवर्षा भागात अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. राजकारणातील शत्रू माझी हत्या करतील, असे ओझा यांनी ९ ऑगस्ट २०१५ या दिवशी म्हटले होते. गेल्या दहा दिवसांत हत्येची ही तिसरी घटना आहे. विश्‍वेश्‍वर ओझा यांच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल होते. ११ फेब्रुवारी या दिवशी छपरामध्ये भाजपचे स्थानिक नेते केदार सिंह यांची गोळ्या घालून हत्या झाली. वैशाली येथे लोक जनता पक्षाचे नेते ब्रिजनाथी सिंह यांची हत्या झाली होती.

अल-कायदा आणि अन्य संघटना यांचे ९७ आतंकवादी पाकिस्तानच्या कह्यात !

पाकिस्तानच्या विरोधात सक्रीय असणार्‍यांवर कारवाई करणारा
पाक भारताच्या विरोधात कारवाया करणार्‍यांवर कारवाई करील तो सुदिन !
      कराची (पाकिस्तान) - एक मोठी कार्यवाही करत पाकिस्तानी सैन्याने अल-कायदा आणि लष्कर-ए-झांगवी या जिहादी आतंकवादी संघटनांच्या ९७ आतंकवाद्यांना अटक केली असल्याचा दावा लेफ्टनंट जनरल आसिम बाजवा यांनी केला आहे.
१. यात लष्कर-ए-झांगवीचे नईम बोखारी आणि साबिर खान तसेच अल-कायदाचा उपप्रमुख फारूख भट्टी यांचाही समावेश आहे.

पाकिस्तानमध्ये शासनाने १०० वर्षे प्राचीन जैन मंदिर पाडले !

भारतातील मानवाधिकारवाले, पुरस्कार वापसी करणारे आता गप्प का ?
      लाहोर (पाकिस्तान) - पाकमधील पंजाब प्रांताची राजधानी असलेल्या लाहोर शहरात १०० वर्षे प्राचीन जैन मंदिर पाडण्यात आले आहे. लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशाला झुगारून शासनाने हे मंदिर पाडले. एका मेट्रो योजनेच्या दृष्टीने शासनाने ही कारवाई केल्याचे समजते.
१. उच्च न्यायालयाने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या इमारतींपासून २०० फूट अंतरामध्ये कोणतेही नवीन बांधकाम करण्याच्या निर्णयावर स्थगिती आणली आहे.

पाकला एफ् - १६ विमाने देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे भारत नाराज !

भारत शासनाने अमेरिकेच्या राजदूताला समन्स पाठवले !
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी मैत्री असणार्‍या भारत शासनाला अमेरिकेची चपराक !
   नवी देहली - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या शासनाने संसदेतील अनेक सदस्यांचा विरोध होऊनही पाकिस्तानला एफ् - १६ जातीची लढाऊ विमाने देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी दर्शवली आहे, तसेच अमेरिकेच्या राजदूतांना समन्सही पाठवण्यात आले आहे.
    अमेरिका शासनाचे प्रवक्ता मार्क टर्नर यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या साहाय्यामुळे आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला बळ मिळते. अमेरिकेच्या संसदेतील सदस्यांचे म्हणणे होते की, अनेकदा सांगूनही पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कसारख्या आतंकवादी संघटनांवर ठोस कारवाई केली नसल्याने त्याला विमाने देऊ नयेत, तसेच पाक शासनामधील काही अधिकार्‍यांच्या साहाय्याने आतंकवादी मुक्तपणे पाकिस्तानात फिरत असतात, असेही त्यांनी शासनाला कळवले होते; मात्र अमेरिका शासनाने पाकिस्तानला साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आज आपण साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर कुटुंबियांना अनुभवायला मिळालेला आनंद आणि व्यक्त केलेली कृतज्ञता पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

पाकिस्तानात १२ जिहादी आतंकवाद्यांना देण्यात आली मृत्यूदंडाची शिक्षा !

पाक सैन्यदलाचे प्रमुख जनरल राहील शरीफ यांनी दिली पुष्टी !
आतंकवादाच्या विरोधात आम्ही काहीतरी करतो, हे दाखवण्याचा पाकचा डाव !
      इस्लामाबाद (पाकिस्तान) - पाकिस्तानच्या सैन्यदलाचे प्रमुख राहील शरीफ यांनी पाकमधील १२ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आल्याच्या सूत्राला पुष्टी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सैन्य न्यायालयाने आतंकवादाशी संबंधित जघन्य अपराधांमध्ये दोषी सिद्ध झालेल्या १२ जणांना ही शिक्षा दिली. (असे असले तरी, १९९३ बॉम्बस्फोटांचा मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम अथवा मुंबईच्या २६/११ च्या आक्रमणाचे मुख्य सूत्रधार जकीउर रेहमान लखवी आणि हाफिज सईद यांवर पाक काहीच कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या ! - संपादक)

ईशान्यपूर्वेकडील राज्यांतील हिंदूंची स्थिती अत्यंत चिंताजनक ! - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ओडिशामधील राऊरकेला,
 हाथीवाडी, कलुंगा, संबलेश्‍वर येथे हिंदूसंघटन बैठकांचे आयोजन
हाथीवाडी येथे हिंदुत्ववाद्यांना मार्गदर्शन करतांना
श्री. रमेश शिंदे (उजवीकडे), त्यांच्या बाजूला श्री. प्रकाश मालोंडकर
     राऊरकेला (ओडिशा), १४ फेब्रुवारी - अरुणाचल प्रदेश, नागालॅण्ड, मेघालय, आसाम आणि मिझोराम या ईशान्यपूर्वेकडील राज्यांमधील हिंदूंची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी संबलपूर येथील हिंदूसंघटन बैठकीत सांगितले. श्री. शिंदे यांनी ईशान्यपूर्व भागातील राज्यांना भेटी दिल्यानंतर ओडिशामध्ये आले होते. या वेळी ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर उपस्थित होते.
१. या बैठकीत देशातील हिंदूंच्या चिंताजनक स्थितीविषयी ते म्हणाले, आज अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करतांना परदेशात जाण्यासाठी पारपत्र काढण्यासारखेच कागदपत्र सादर करावे लागतात आणि त्यात दिलेल्या समयमर्यादेपर्यंतच राज्यात रहाता येते. आपण भारतातील एका राज्यात जात आहोत कि विदेशात ? असा प्रश्‍न पडतो.

इसिसला अफजलखानासारखे गाडून टाकू ! - पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

     पुणे - हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करणार्‍या धर्मांध अफजलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे गाडून टाकले, त्याप्रमाणे संपूर्ण विश्‍वाला इस्लाममय करू पहाणार्‍या इसिसलाही आम्ही गाडून टाकू, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. १३ फेब्रुवारी या दिवशी बालाजीनगर, धनकवडी येथील एलोरा पॅलेस चौकात करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सध्या भारतातील वातावरण आतंकवादी विचारांना पोषक बनू लागले आहे. देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी भारत मुर्दाबाद अशा देशद्रोही घोषणा देत आंदोलन केले. काश्मीरमध्येही फुटीरतावाद्यांच्या मागण्यांना बळी पडून अमरनाथ यात्रेचा कालावधी ५९ दिवसांवरून ४८ दिवसांवर आणण्यात आला. खरे तर ढोंगी धर्मनिरपेक्षतेमुळे देशात अतिरेकी विचारांचे थैमान वाढत आहे. ते थोपवण्यासाठी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे.
     या प्रसंगी शिवसेनेचे भारती विद्यापीठ शाखाप्रमुख श्री. कुणाल धनवडे, श्री. अनिल बटाणे, शिवसेनेचे श्री. विनायक वाळके, हिंदुत्ववादी श्री. नितीन चुरगुडे आणि शिवसेनेचे बालाजीनगर प्रमुख श्री. सारंग धारणे उपस्थित होते.

औंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) जवळील जागेची गुरुत्वीय लहरींच्या वेधशाळेसाठी निवड

     पुणे - गुरुत्वीय लहरींच्या वेधशाळेसाठी देशभरातील २२ ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यातून राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र येथील एकूण तीन ठिकाणे अंतिम सूचीत समाविष्ट करण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्रातील जागेला शास्त्रज्ञांची सर्वाधिक पसंती आहे, अशी माहिती इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे (आयुकाचे) संचालक प्रा. सोमक रायचौधरी यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथजवळील जागा या केंद्रासाठी शास्त्रीयदृष्ट्या योग्य असल्याचा निष्कर्ष आयुकाच्या समितीने काढला आहे. भारतातील तिन्ही जागा भूशास्त्रीयदृष्ट्या अमेरिकेतील वेधशाळांपेक्षा दहा पटींनी स्थिर असल्यामुळे भारतातील वेधशाळेतून अधिक दर्जेदार नोंदी होऊ शकणार आहेत.

सोलापुरात गोहत्यार्‍यांवर पोलिसांची मोठी कारवाई

  •  लक्ष ५० सहस्रांचे मांस जप्त
  • १३४ गोवंशाची मुक्तता
      सोलापूर, १४ फेब्रुवारी - शहर पोलिसांनी १० फेब्रुवारी या दिवशी शुक्रवार पेठेतील खाटिक गल्ली आणि लष्कर परिसरातील कुरेशी गल्ली येथे कारवाई करून कत्तलीसाठी आणलेल्या १३४ गोवंशियांची मुक्तता केली. कुरेशी गल्लीत दोन टेम्पोमधून ६ लक्ष ५० सहस्र रुपये किमतीचे गोवंशाचे मांस जप्त केले. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात ७ धर्मांधावर गोवंश हत्याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. तसेच जेलरोड पोलीस ठाण्यातही गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

नवी मुंबईत ४०० लिटर दूध चोरणार्‍या राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍याला अटक

राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची गुन्हेगारी मानसिकता जाणा !
      नवी मुंबई - येथील ऐरोली परिसरात व्यावसायिक वादातून ४०० लिटर दूध चोरल्याप्रकरणी राष्ट्र्रवादी काँग्रेसचा स्थानिक पदाधिकारी विठ्ठल बांगर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा दूध विक्रीचा व्यवसाय असून त्यांचे एका दूध विक्रेेत्यासमवेत व्यावसायिक वाद होते. गेल्या काही दिवसापासून त्या विक्रेत्याच्या दुकानातून दुधाची चोरी होत होती; मात्र चोराचा शोध लागत नव्हता. क्लोज्ड सर्किट टीव्ही कॅमेर्‍यांच्या चित्रीकरणाद्वारे विठ्ठल बांगर हेच दूध चोरत असल्याचे लक्षात आले. विठ्ठल बांगर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांचे विश्‍वासू म्हणून ओळखला जातात; मात्र विरोधकांनी पोलिसांना हाताशी धरून खोटा गुन्हा प्रविष्ट केल्याचा आरोप बांगर यांनी केला आहे.

नागपूर येथे अपूर्व किल्ले महोत्सवाचे आयोजन

     नागपूर - येथे नूतन भारत युवक संघाच्या अमृत महोत्सवप्रसंगी नूतन भारत युवक संघ आणि दुर्ग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २५ किल्ले एकाच ठिकाणी सिद्ध करण्यात आलेले होते. दुर्ग प्रतिष्ठान ही संस्था नागपूरमध्ये किल्ले सिद्ध करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या संस्थेचे सचिव श्री. अतुल गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चमूने हे किल्ले सिद्ध केले २४ जानेवारी ते ३० जानेवारी २०१६ या कालावधीत बजाजनगरस्थित बास्केट बॉल मैदानावर या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या.
     कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला पू. श्री सद्गुरुदास महराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांनी या उपक्रमास भरभरून आशीर्वाद दिले. या प्रसंगी शिवमुद्रा या ढोलपथकाच्या चमूने आपली कला सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.

हिंदूंच्या एकजुटीमुळे बांगरवाडी (जिल्हा पुणे) येथे उरुसाच्या निमित्ताने होणार्‍या शक्तीप्रदर्शनाला आळा हिंदूंच्या संघटनशक्तीचा विजय !

     जुन्नर (जिल्हा पुणे), १४ फेब्रुवारी (वार्ता.) - जुन्नर तालुक्यातील बांगरवाडी या गावात पीर मुन्सीबाबा पुण्यतिथीनिमित्त भरणार्‍या उरुसाच्या वेळी मुसलमानांकडून शक्तीप्रदर्शन केले जात होते, तसेच स्थानिकांना नाहक त्रास होईल, अशी कृत्ये केली जात होती. मुन्सीबाबा पुण्यतिथी कार्यक्रमाच्या बहाण्याने जाणीवपूर्वक केल्या जाणार्‍या शक्तीप्रदर्शनाला बांगरवाडीतील जागृत हिंदूंमुळे आता मात्र चाप बसला आहे. प्रत्येक वर्षी उरुसाला प्राप्त होणारे वाढते स्वरूप लक्षात घेऊन स्थानिक हिंदूंनी संघटितरित्या उरुसातील अपप्रकारांच्या विरोधात लढा दिला.

डायघर, ठाणे येथे हिंदु धर्मजागृती सभा !

दिनांक : शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०१६ 
वेळ : सायंकाळी ४ वाजता
स्थळ : प.पू. स्वामी डी.के. दास महाराज क्रीडांगण, डायघर गाव, कॅफेनगर, कल्याण फाटा, पो. पडले, ठाणे. 
संपर्क : ९२२१०६७७७७, ९३२४८६८९०६

फलक प्रसिद्धीकरता

चंद्रशेखर आझाद यांच्या मृत्यूमागील देशद्रोह्याचा शासनाने शोध घ्यावा !
     जवाहरलाल नेहरूंनी इंग्रजांना क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांच्या ठिकाणाची माहिती दिल्यामुळेच इंग्रजांनी त्यांना घेरले. परिणामी आझाद यांनी स्वत:ला गोळी मारून घेतली. त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांचे पुतणे सुजीत आझाद यांनी केली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Jawaharlal Nehrune Angrejonko krantikarak Chandrashekhar Azadjika thikana bataya tha - Sujeet Azad (Azadjike bhatije) 
- Kya sarkar iski jaanch karegi ?

जागो ! : जवाहरलाल नेहरू ने अंग्रेजों को क्रांतीकारक चंद्रशेखर आझादजी का ठिकाना बताया था - सुजीत आझाद (आझादजी के भतीजे) - क्या सरकार इसकी जांच करेगी ?

इशरत जहाँचे नाव असलेल्या रुग्णवाहिका जाळू ! - मनसे

रुग्णवाहिकांना आतंकवाद्यांचे नाव दिले जाणारा जगातील एकमेव देश भारत !
      ठाणे - इशरत जहाँच्या नावाने ठाण्यात फिरणारी रुग्णवाहिका दिसेल तिथे जाळण्यात येईल, अशी चेतावणी मनसेने दिली आहे. ठाण्यात मुंब्रा फाऊंडेशनच्या वतीने इशरत जहाँच्या नावाने रुग्णालय सेवा चालू आहे. मनसेने त्याला आता विरोध केला आहे. मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी ही चेतावणी दिली आहे.
     हेडलीने इशरत जहाँ आतंकवादी असल्याची साक्ष दिल्यानंतर परत चर्चेचे वादळ उठले. या निमित्ताने आतंकवादी इशरत जहाँला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काय काय साहाय्य केले, तेही आता समोर येत आहे.

धर्मपालन करून धर्मांधांना खडसावणार्‍या सौ. भाग्यश्री नलावडे यांनी अनुभवली धर्मशक्ती !

     पुणे - येथील चतुश्रुंगी मंदिरात येणार्‍या स्त्रियांना मंदिराच्या पायरीवर बसून मेंदी काढण्याचा माझा व्यवसाय आहे. एकदा मी सनातनच्या साधिका सौ. वर्षा ठकार यांना मंदिरात सनातन संस्थेचा फलक लिहितांना पाहिले, तेव्हा मला पहिल्यापासूनच अध्यात्माची आवड असल्याने मी त्यांना फलकाविषयी प्रश्‍न विचारू लागले. तेव्हा त्यांनी मला तुम्हाला देवीने व्यवसाय आणि देवीची सेवा करण्याची अमूल्य संधी दिली आहे, असेे सांगितले. सनातनचे सात्त्विक मेंदी हे पुस्तक दिले. मला त्यातील सर्व माहिती खूपच आवडली आणि मी मेंदी काढायला येणार्‍या स्त्रियांना मेंदी काढतांना कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व सांगू लागले. मला आंतरिक आनंदाची अनुभूती येऊ लागली आणि देवीची मनापासून कृतज्ञता वाटली.

गिरीष प्रभुणे यांना वासुदेव बळवंत फडके जीवन गौरव पुरस्कार घोषित !

     सांगली, १४ फेब्रुवारी (वार्ता.) - सांगली नगर वाचनालय आणि फडके स्नेह मंडळाचे शरद फडके यांच्या वतीने देण्यात येणारा आद्य क्रांतीवर वासुदेव बळवंत फडके जीवन गौरव पुरस्कार यंदा पुणे येथील श्री. गिरीष प्रभुणे यांना घोषित करण्यात आला आहे. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि १२ सहस्र रुपये रोख रक्कम, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार १७ फेबुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता नगर वाचनालय येथे देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. शरद फडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तंबाखू सेवनात महिला पुढे !

     जळगाव - महिलांमध्येही तंबाखू सेवनाचे प्रमाण अधिक असून ६० टक्के पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग होतो, तर महिलांमध्ये हे प्रमाण २५ टक्के आहे. त्यामुळे तंबाखूला दूर ठेवणेच महत्त्वाचे आहे, असे आवाहन डॉ. गोविंद मंत्री यांनी केले. येथील एका महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, तंबाखूमुळे होणार्‍या आजारांवरील व्यय सुमारे १ लक्ष कोटीपेक्षा जास्त आहे. (व्यसनाधीन होणार्‍या महिलांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी शासनाने कृतीशील पावले उचलावीत ! - संपादक)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

       भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

अत्यवस्थ शासकीय रुग्णालये

    आबालवृद्धांना सदासर्वकाळ आवश्यक असणारी तातडीची सेवा म्हणजे वैद्यकीय सेवा ! अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत आवश्यकतांप्रमाणे निरामय आरोग्य ही देखील मनुष्याची आत्यंतिक निकड आहे. याच हेतूने खेडोपाड्यांतील जनतेला वैद्यकीय सेवांचा लाभ मिळावा, आजारांवर तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी शासनाने शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्यकेंद्रे यांचे जाळे विणले; मात्र हे जाळे अद्यापही तकलादू अवस्थेतच असल्याचे आढळून येत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असणार्‍या शासकीय रुग्णालयांची स्थिती तर स्वतःच अत्यवस्थ असल्यासारखी आहेत. ११ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रुग्ण दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यानिमित्त केलेल्या एका पाहणीतही शासकीय रुग्णालयांमधील सुविधांविषयी ३० टक्के रुग्णही समाधानी नाहीत, असा निष्कर्ष समोर आला आहे.

प.पू. नाना महाराज तराणेकर यांचे भाग्यनगर येथील अनुयायी श्री. श्रीपाद पूरकर यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

श्री. श्रीपाद पूरकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना श्री. नागेश गाडे
सौ. स्नेहल पूरकर (उजवीकडे) यांना भेटवस्तू देतांना श्री. नागेश गाडे
भजन गातांनाची
सौ. स्नेहल पूरकर
यांची भावमुद्रा
 
भजन गातांनाची
श्री. श्रीपाद पूरकर
यांची भावमुद्रा
  रामनाथी, १४ फेब्रुवारी (वार्ता.) - प्रेमभाव, सहजता आणि आज्ञापालन आदी गुणांचा समुच्चय असलेले प.पू. नाना महाराज तराणेकर यांचे अनुयायी,भाग्यनगर येथील श्री. श्रीपाद पूरकर (वय ५५ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या एका कार्यक्रमात घोषित करण्यात आलेे. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे यांनी भेटवस्तू देऊन श्री. पूरकर यांचा सत्कार केला. या वेळी त्यांच्या धर्मपत्नी सौ. स्नेहल पूरकर, तसेच सनातनचे साधक उपस्थित होते.
श्री. पूरकर यांनी सपत्नीक रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच भेट दिली.

श्रीगुरु आणि संत यांच्याप्रती अत्यंत भाव असलेले श्री. श्रीपाद पूरकर !

१. सनातनचे ग्रंथ पहातांना ग्रंथांची अभ्यासपूर्ण पहाणी करणे आणि ग्रंथ अन् प.पू. डॉक्टर यांच्याप्रती भाव जाणवणे
   श्री. श्रीपाद पूरकर यांना वाचनाची आवड आहे. त्यामुळे त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ खरेदी केले आहेत. त्यांच्या घरी ग्रंथालय आहे. आश्रमामध्ये येण्यापूर्वी त्यांनी सनातनच्या ग्रंथांची सूची मागवून घेतली होती आणि त्यातील काही ग्रंथ खरेदी करण्यासाठी निवडले होते. त्यांनी निवडलेला प्रत्येक ग्रंथ उघडून पाहिला. ते विभागात आल्यानंतर त्यांना बसायला आसंदी देत असतांना ते म्हणाले, तुम्ही मला परके समजू नका. आपण एकाच घरातील आहोत. मी आसंदी घेतो. तुम्ही देऊ नका.
   विभागामध्ये सायंकाळी सर्वजण सामूहिक प्रार्थना करतात. साधक सामूहिक प्रार्थना करत असतांना त्यांनीही ग्रंथ पहाण्याचे थांबवून सामूहिक प्रार्थना केली.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणे
   परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेले सर्व ग्रंथ पाहून ते पुष्कळ भारावून गेले. सामान्य व्यक्ती अशा प्रकारचे ग्रंथ एवढ्या अल्प कालावधीमध्ये लिहू शकत नाही. यावरून परात्पर गुरु डॉ. आठवले हे अवतारी पुरुषच आहेत, असे ते म्हणालेे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची त्यांना पुष्कळ ओढ लागलेली असून त्यांच्याविषयी कळल्याने ते स्वतःला पुष्कळ भाग्यवान समजत आहेत.

प्रेमभाव, सहजता आणि अल्प अहंभाव असलेले श्री. श्रीपाद पूरकर !

  
श्री. श्रीपाद पूरकर
श्री. श्रीपाद नारायण पूरकर हे भाग्यनगर येथील पिनार एनव्हायरो या आस्थापनामध्ये सीइओ आणि प्रेसिडेंट या पदावर आहेत. ते प.पू. नाना महाराज तराणेकर यांचे अनुयायी आहेत. प.पू. नाना महाराज असतांना १५ वर्षे ते त्यांच्या सान्निध्यात होते. त्या वेळी त्यांची प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी भेट झाली होती. महाराजांच्या सत्संगामुळे श्री. पूरकर यांच्यामध्ये अध्यात्माची आवड निर्माण झाली. तेे रा.स्व. संघात गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत आहेत. तसेच व्यवसायानिमित्त २४ देशांमध्ये जाऊन आले आहेत.
२६.१.२०१६ या दिवशी श्री. श्रीपाद नारायण पूरकर देवद येथील सनातनच्या आश्रमामध्ये आले होते. देवद आश्रमातील साधिकांना त्यांच्याविषयी जाणवलेली आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. इतरांचा विचार करणे
   श्री. श्रीपाद पूरकर हे भाग्यनगर येथून देवद येथे सकाळी १०.३० वाजता पोहोचणार होते; परंतु काही कारणामुळे त्यांना पोहोचण्यास विलंब झाला. त्यांच्याजवळ भ्रमणभाष नसल्यामुळे आमचा एकमेकांशी संपर्क होत नव्हता. त्या वेळी त्यांनी आश्रमाचा लॅन्डलाईनचा क्रमांक शोधून काढून तेथे संपर्क केला आणि विमानतळावरील चौकशी काऊंटरचा क्रमांक संपर्कासाठी दिला. ते १२.३० पर्यंत पोहचणार होते; परंतु त्या वेळीही वेळेवर पोहोचण्यास त्यांना अडचण आली. तेव्हा त्यांनी पुन्हा संपर्क करून पोहोचण्यास विलंब होत असल्याचे कळवले. तसेच त्यांनी विचारले, महाप्रसाद वाढणार्‍या साधकांना माझ्यासाठी थांबावे लागणार असेल, तर मी बाहेरच महाप्रसाद घेऊन येऊ का ? यातून त्यांचा इतरांचा विचार करणे, प्रेमभाव, इतरांशी जुळवून घेणे आणि जवळीकता, हे गुण शिकायला मिळाले. - कु. शशिकला आचार्य

आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे । याची प्रचीती देणार्‍या पू. श्रीमती आनंदी पाटीलआजी !

श्रीमती आनंदी पाटील यांच्या नाती, नातजावई आणि त्यांची मुले (पतवंडे)
(डावीकडून उभे) कु. आराध्या महेश घाणेकर, श्री. महेश घाणेकर, श्री. मच्छिंद्र म्हात्रे,
कु. मंत्र मच्छिंद्र म्हात्रे, श्री. रवींद्र म्हात्रे, सौ. राखी रवींद्र म्हात्रे, सौ. दीपा मच्छिंद्र म्हात्रे,
सौ. कपिला महेश घाणेकर (मध्यभागी बसलेल्या) श्रीमती आनंदी पाटील
(त्यांच्या उजवीकडे) कु. साईल मच्छिंद्र म्हात्रे आणि (डावीकडे) कु. रुतिका रवींद्र म्हात्रे
     वयाच्या ९५ व्या वर्षीही मुंबईच्या श्रीमती आनंदी पाटीलआजी यांनी संतपदी विराजमान होऊन सनातन कुटुंबावर एकप्रकारे आनंदाची उधळणच केली आहे. आजींचा आनंद सर्वांनाच अनुभवता यावा, यासाठी त्यांची रामनाथी आश्रमात परात्पर गुुुरु डॉ. आठवले यांच्या समवेत झालेली भावस्पर्शी भेट, पू. आजींच्या निवडक भावमुद्रा, कुटुंबियांसमवेत पू. आजी यांचा भावछायाचित्रात्मक वृत्तांत येथे देत आहोत.

प.पू. डॉक्टर आणि श्रीमती आनंदीबाई पाटील यांच्या भेटीच्या वेळचा साधिकांनी अनुभवलेला भावसोहळा !

१. पाटीलआजींना पाहिल्यावर त्यांच्याकडे खेचले जात आहे, 
असे वाटणे आणि त्या लवकरच संतपद गाठतील, असे वाटणे
    श्रीमती आनंदीबाई पाटीलआजी कुटुंबियांसहित आश्रम पहाण्यासाठी रामनाथीला आल्या. तेव्हा माझा त्यांच्याशी प्रथम संपर्क आला. आजींकडे पाहिल्यावर पुष्कळ जवळीक असल्याचे वाटून आपोआप त्यांच्याकडे खेचली जात आहे, असेे जाणवले. आजींनी माझा हात त्यांच्या हातात घेऊन प्रेमाने माझी चौकशी केली. तेव्हा माझ्या मनाला फार आनंद जाणवत होता. त्यांचा स्पर्शही पुष्कळ मृदु जाणवला. त्या वेळी माझ्या मनात आजींची साधनेची वाटचाल संतपदाकडे होत असून लवकरच आजी पू. आजी होतील, असा विचार आला. आश्रमातील अनेक साधकही त्यांच्याकडे पाहून या कोण आहेत ? कोणी संत आहेत का ?, असे विचारत होते. यावरून आश्रमातील साधकांनाही त्यांच्याविषयी तसेच जाणवत आहे, असे माझ्या लक्षात आले.

सतत भावावस्थेत असलेल्या आणि संतांप्रती उत्कट शरणागत भावाचे दर्शन घडवून सर्वांना भावसोहळ्याचा आनंद प्रदान करणार्‍या वरळी, मुंबई येथील श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय ९५ वर्षे) !

श्रीमती आनंदी पाटीलआजी आणि 
पू. सौरभ जोशी यांच्या भेटीतील भावस्पर्शी क्षण
     वरळी, मुंबई येथील श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय ९५ वर्षे) या नातेवाइकांसह रामनाथी येथील सनातन आश्रमात आल्या होत्या. तेव्हा श्रीमती आजींचा ईश्‍वराप्रती असलेला आणि क्षणोक्षणी व्यक्त होणारा भाव बघायला मिळाला, तसेच संतांचे दर्शन होताच त्यांच्या चरणी नतमस्तक होत असतांना त्यांच्यातील कृतज्ञता आणि शरणागत भावाचे दर्शन साधकांना घडले. याद्बारे साधकांना भावसोहळ्याचा अवर्णनीय आनंद अनुभवता आला. तो शब्दबद्ध करणे कठीण आहे, तरीही तो सर्वांना अनुभवता यावा, यासाठी गुरूंच्या कृपेने शब्दबद्ध करण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न प.पू. गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे.

नावाप्रमाणेच आनंदी असणार्‍या आणि गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर आध्यात्मिक त्रासावर मात करणार्‍या श्रीमती पाटीलआजी !

१. जाणवलेली सूत्रे
१ अ. आजी नावाप्रमाणेच नेहमी आनंदी असतात.
१ आ. सतत नामजप चालू असणे :
वयाच्या ९५ व्या वर्षी आजी ६ ते ८ घंटे एका जागी बसून नामजप करतात, तसेच दिवसभर त्यांचा सतत नामजप चालू असतो.
१ इ. वयस्कर असूनही भावपूर्णरित्या घराची स्वच्छता करणे : त्यांना कोणताही शारीरिक त्रास नाही. अजूनही त्या घरातील लादी स्वतः स्वच्छ पुसतात. लादी चकचकीत दिसली की, देव त्याच्यावर बसतात, असा आजींचा भाव आहे.

भावजागृती आणि आनंद यांची अनुभूती देणारी प.पू. डॉक्टर अन् श्रीमती आनंदी पाटीलआजी यांची भेट !

१. आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१ अ. आजींचे बोलणे ऐकतांना आजी बहुतेक संतपदाला जाणार, असे विचार माझ्या मनात येत होते.
१ आ. प.पू. डॉक्टर प्रत्येक ठिकाणी सूक्ष्मातून स्वतःसमवेत असतात, असे जाणवणे :
मी ज्या ज्या ठिकाणी जाते, त्या त्या ठिकाणी प.पू. डॉक्टर माझ्यासमवेत सूक्ष्मातून असतात आणि त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती ते सातत्याने मला देतात. मला ते संत आणि साधक यांच्या माध्यमातून भेटतात आणि प्रेम देतात, हे आठवून माझी भावजागृती होत होती. ते निर्गुणातून अखंड माझ्या समवेत होतेच, आहेत आणि आता निर्गुणातून सगुणात प्रगट होत आहेत, असे विचार येऊन माझी भावजागृती होत होती.

पू. श्रीमती आनंदीबाई पाटीलआजी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. श्रीमती आजींना आलेल्या अनुभूती
१ अ. नामजप करतांना अनेक सर्प दिसणे, त्यांनी आजींना घाबरवण्याचा प्रयत्न करणे आणि नामजप चालू असल्याने आजींना कोणताही त्रास न होणे : एकदा आजी त्यांच्या मधल्या नातीच्या घरी नामजपाला बसल्या होत्या. तेव्हा त्यांना मनुष्याचा तोंडवळा आणि मागची बाजू सापासारखे असणारे आणि सरपटणारे अनेक सर्प दिसू लागले. आजी जिथे जातील, तिथे ते मनुष्यरूपी सर्प आजींच्या मागे यायचे आणि आजींकडे बघत रहायचे. ते आजींना फार घाबरवायचे. एकदा तर एकाने आजींना दंशही केला; पण त्या वेळी आजींचा नामजप चालू असल्यामुळे त्यांना दंश केल्याचे जाणवले, पायामध्ये कळही आली; पण दुसरा कोणताही तीव्र त्रास त्यांना झाला नाही. नंतर आजी स्वतःच्या घरी गेल्या, तरी ते सर्प आजींच्या मागे तिकडेही आले आणि आजींना मानसिक त्रास देऊ लागले. आजींच्या सततच्या प्रार्थना आणि नामजप यांमुळे शेवटी माघार घेऊन ते नष्ट झाले.

सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असलेल्या वरळी, मुंबई येथील पू. (श्रीमती) आनंदी पाटीलआजी !

१. अत्यंत कष्ट सोसून कुटुंबाचा भार वाहणे 
      आजींनी जीवनात पुष्कळ हालअपेष्टा सहन केल्या आणि कष्टही केले. आजींचे यजमान त्यांचा मुलगा ८ वर्षांचा असतांनाच गेले, तरीही आजींनी मुलांचे संगोपन फार चांगल्या पद्धतीने केले. आजींनी स्वतः कष्ट केले आणि मुलेे अन् त्यांची कुटुंबे यांचेही पालनपोषण वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत केले. आजींनी मिठाईच्या कारखान्यात कामाला जाऊन मुलांच्या कुटुंबासाठी आर्थिक साहाय्य केले.
२. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा
      आजींना स्वच्छता फार आवडते. पायाला जरा जरी कचरा लागला, तरी त्या लगेच झाडू घेऊन घर स्वच्छ करतात. अंथरुणे आणि कपडे यांच्या घड्या घालतात. नामजपाला बसण्यापूर्वी तेथील लादी पुसतात. वैशिष्ट्य म्हणजे आजींनी घरात केर काढला की, घर एकदम लख्ख दिसते. ते बघून अतिशय प्रसन्न वाटते, तसेच कपडे आणि अंथरुणे यांच्या घड्यांकडे बघून वाटते की, जणू त्या घड्या आनंदाने हसत आहेत आणि म्हणत आहेत, आजींचे हात आम्हाला लागले. त्यामुळे आम्ही धन्य झालो.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
माया आणि परमेश्‍वर
अ. परमेश्‍वराची माया समजून घेऊन आहे तिथेच समाधानाने रहावे.
भावार्थ : माया समजून घेऊन म्हणजे मायेतील ब्रह्म समजून घेऊन. ते झाले की समाधान, आनंदच आहे.
आ. परमेश्‍वर पहाण्यापेक्षा परमेश्‍वराच्या रचनेची जाणीव करून घेणे, हेच खरे ज्ञान.
भावार्थ : परमेश्‍वराची रचना म्हणजे माया. तिची खरी जाणीव, ओळख करून घेणे, म्हणजेच मायेतील ब्रह्म ओळखणे. हेच खरे ज्ञान.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     व्यवहारात पैसे मिळाले की, व्यक्ती ते स्वतःकडे ठेवते; मात्र अध्यात्मात ईश्‍वराचे प्रेम मिळाले की, संत ते सर्वांना वाटतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
      संस्कृती म्हणजे विद्वत्तापूर्ण चर्चा नसून कायम स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे आणि इतरांच्या दु:खाची जाणीव ठेवणे !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

मेक फॉर इंडिया

      नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया प्रकल्पाच्या मुंबईतील केंद्राचे उद्घाटन एका शानदार कार्यक्रमाद्वारे झाले आहे. त्या निमित्ताने मेक इन इंडिया सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या प्रथम दिनी महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्याचे करार झाल्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विदेशी आस्थापने भारतात याव्या आणि त्यांनी येथे गुंतवणूक करावी, यासाठी अक्षरशः पायघड्या घातल्या जात आहेत. एकूण ६८ देशांचे ५ सहस्र प्रतिनिधी मेक इन इंडियात सहभागी झाले आहेत. त्यामध्ये १९० आस्थापने भाग घेत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn