Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा, त्र्यंबकेश्‍वर, नाशिक.काश्मीरमधील आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणे बंद करा !

पाकिस्तानी खासदारांच्या समितीचा पाक शासनाला सल्ला
     पाकमधील आतंकवादी पाक सैन्याच्या नियंत्रणात आहेत, त्यामुळे पाक शासन त्यांना कधीही संपवू शकत नाही कि त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही, हे वास्तव पाकच्या खासदारांना माहीत नाही का ?
     इस्लामाबाद - पाकिस्तानी खासदारांच्या एका समितीने नवाज शरीफ शासनाला सल्ला दिला आहे की, त्याने काश्मीरमधील आतंकवादी संघटनांना प्रोत्साहन देणे बंद करावे आणि भारतात होणार्‍या आक्रमणांना उत्तरदायी असणार्‍या आतंकवाद्यांवर कारवाई करावी. पाक संसदेच्या परराष्ट्र संदर्भातील स्थायी समितीने काश्मीरप्रकरणी चार पानांचा कृती मसुदा पाक शासनाला दिला आहे. यात वरील सल्ला देण्यात आला आहे. या मसुद्यात काश्मीर प्रश्‍नाला प्रथम प्राधान्य देत ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे म्हटले आहे.
     सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीगचे खासदार अवैस अहमद लेघारी यांच्या नेतृत्वाखालील या समितीने असेही म्हटले आहे की, जगभरात पाकविषयी असे मत बनले आहे की, पाकिस्तान काश्मीरमध्ये होणार्‍या आतंकवादी आक्रमणाच्या संदर्भात काहीच कारवाई करत नाही.

आतंकवाद्यांना पठाणकोट हवाई तळामध्ये घरभेद्याने घुसवल्याचा अन्वेषण यंत्रणेला संशय

     नवी देहली - आतंकवाद्यांना पठाणकोट हवाई तळामध्ये घुसण्यासाठी घरभेद्याने साहाय्य केले असल्याचा संशय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला आहे. हवाई तळाच्या १० फूट उंच भिंतीवरील तारेच्या कुंपणाचे अवशेष ज्या स्थितीत पडलेले आढळले त्यावरून हे कुंपण आतूनच तोडले गेल्याचा यंत्रणेला संशय आहे. हीच तार बाहेरून तोडली असती, तर त्याची स्थिती वेगळी असती, असे सूत्रांनी सांगितले. याची निश्‍चिती करण्यासाठी यंत्रणेकडून फॉरेन्सिक चाचणी करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी हे कुंपण तोडले गेले, तेथील दिवा नादुरुस्त होता. हवाईतळात घुसखोरी करण्यासाठी आतंकवाद्यांनी याच भागाची निवड केली होती. यावरून या भागात अंधार आहे, हे माहीत असणारी व्यक्ती यात सहभागी असल्याची शंका यंत्रणांनी व्यक्त केली आहे. यंत्रणेकडून हवाईतळाच्या आतून केल्या गेलेल्या कॉल्सचीही पडताळणी करण्यात येत आहे. याशिवाय हवाईतळाच्या आतमध्ये रहाणार्‍या परिवारांकडूनही माहिती घेतली जात आहे.

धार येथील भोजशाळेत वसंत पंचमीच्या दिवशी नमाजपठण होऊ देणार नाही ! - हिंदुत्ववाद्यांचा निर्धार

केंद्रीयमंत्री महेश शर्मा यांचे हिंदुत्ववाद्यांना मार्ग काढण्याचे आश्‍वासन !
केंद्रात आणि राज्यात भाजपचे राज्य असतांना हिंदूंना पूर्ण दिवस पूजेचा 
अधिकार का मिळत नाही, असा हिंदूंच्या मनात येणारा प्रश्‍न चुकीचा कसा असेल ?
      धार (मध्यप्रदेश) - येथील भोजशाळेत शुक्रवार, १२ फेब्रुवारीला येणार्‍या वसंत पंचमीच्या दिवशी मुसलमानांना नमाजपठण करण्यास अनुमती देण्यावरून हिंदुत्ववादी संघटना विरोध करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत नमाजपठण होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी केला असल्याचे धर्मजागरण मंचाचे श्री. गोपाल शर्मा यांनी म्हटले आहे. या दिवशी सूर्योदय ते सूर्यास्त अशी पूजा करण्यास न दिल्यास बहिष्कार घालण्याची चेतावणीही त्यांनी दिली आहे.
     श्री. गोपाल शर्मा यांनी पुढे म्हटले की, या संदर्भात केंद्रीय संस्कृतीमंत्री महेश शर्मा यांच्याशी दूरभाषवरून संपर्क साधला होता. त्या वेळी त्यांनी लवकरच या प्रकरणी मार्ग काढण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे.
      भोजशाळा भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येत आहे. हे सरस्वतीचे प्राचीन मंदिर आहे. येथे मुसलमान आक्रमकांनी कमाल शाह मशीद बांधली आहे आणि ते या जागेवर त्यांचा अधिकार सांगत आहेत. याला हिंदू गेली अनेक वर्षे विरोध करत आहेत. हिंदूंना प्रत्येक मंगळवारी पूजेची, तर प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांना नमाजपठणाची अनुमती देण्यात आली आहे.

(म्हणे) हिंदु दहनसंस्कार पर्यावरणासाठी घातक !

अग्नितत्त्वाचे महत्त्व ज्ञात नसलेले राष्ट्रीय हरित लवाद !
हिंदु दहन संस्कार नव्हे, तर विज्ञानच पर्यावरणासाठी घातक ठरल्याने 
पृथ्वीच्या अस्तित्वाविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे !
     नवी देहली - राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरण मंत्रालय आणि देहली शासनाला सांगितले आहे की, मानवी मृतदेहांच्या दहन संस्कारला पर्याय म्हणून अन्य पद्धत लागू करण्याच्या योजनेसाठी प्रयत्न करावा. लवादाने लाकूड जाळून दहन संस्कार करण्याला, तसेच नदीत अस्थींचे विसर्जन करण्याला पर्यावरणदृष्ट्या घातक ठरवले आहे. लवादाच्या या सूचनेचा हिंदुत्ववादी ओजस्वी पार्टीने विरोध केला आहे. (प्रतिदिन रासायनिक कारखान्यांतून सोडला जाणारा धूर, नदीत सोडले जाणारे रसायनमिश्रित सांडपाणी यांमुळे किती प्रदूषण होते आणि दहनसंस्कारामुळे किती कथित प्रदूषण होते, हे राष्ट्रीय हरित लवादाने जनतेसमोर मांडले पाहिजे. - संपादक) न्यायाधीश यू.डी. साल्वी यांच्या नेतृत्वाखालील लवादाच्या पिठाने म्हटले आहे की, लोकांची विचारधारा पालटण्याची आणि विद्युत शवदाहिनी, सीएन्जी आदींचे पर्यावरण अनुकूल पद्धतीने अनुकरण करण्याची आवश्यकता आहे.

जातपंचायत आवश्यक कि अनावश्यक ? - सनातन दृष्टीकोन

     नंदुरबार जिल्ह्यातील कांजारभाट समाजातील एका विधवेवर बाह्यसंबंधांचा आरोप करून तिला नग्न करण्याची शिक्षा देण्यास सांगण्याच्या जातपंचायतीच्या निर्णयामुळे प्रसारमाध्यमांमध्ये जातपंचायत आवश्यक कि अनावश्यक ?, याविषयी चर्चा चालू आहे. या संदर्भातील सनातनचा दृष्टीकोन पुढे दिला आहे.
१. जातपंचायतीचा हा निर्णय निषेधार्ह आहे. अशा प्रकारचे निंद्य, रानटी आणि अमानवी निर्णय देणार्‍या जातपंचायतीतील तथाकथित न्यायाधिशांना प्रस्थापित कायद्यांनुसार कठोर शिक्षा होईल, यासाठी आपण आग्रह धरला पाहिजे.
२. जातपंचायतीचा हा निर्णय म्हणजे एकप्रकारची विकृती होय. अशा विकृत झालेल्या जातपंचायती चालण्यापेक्षा बंद होणे अधिक योग्य ठरते.
३. देशात स्वतंत्र न्यायपालिका असतांना जातपंचायतींनी सध्याच्या काळात अवैध निवाडे देण्याचे कार्य न करता केवळ स्वतःच्या ज्ञातीमध्ये संस्कृती संवर्धनाचे कार्य करावे.

(म्हणे) भेद मानणारा देव असेल, तर माझ्या लेखी तो देवच नाही !

श्री शनिशिंगणापूर प्रकरण
राजकीय पक्षांतील भेद चालणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार !
     मुंबई - श्री शनिशिंगणापूरच्या मंदिरात महिलांना दर्शनासाठी अनुमती देण्यात यावी. पुरुष-महिला असा भेद मानणारा देव असेल, तर माझ्या लेखी तो देवच नाही. सर्वांसाठी दर्शन खुले करण्याविषयी आपण स्थानिक लोकांशी चर्चा केली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी श्री शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर महिलांच्या प्रवेशाला बंदी असण्याच्या प्रकरणावर व्यक्त केले. ते छगन भुजबळ यांच्यावर करण्यात येत असलेल्या कारवाईच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
धर्मश्रद्धांच्या विषयात नाक खुपसणारे नास्तिक अंनिसचे अविनाश पाटील !
(म्हणे) श्री शनिशिंगणापूर येथील महिलांच्या प्रवेशावरून शासन पळ काढत आहे !
      पुणे - सर्व धर्मांतील महिलांना उपासनेचा अधिकार मिळावा आणि मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी समितीने उच्च न्यायालयात वर्ष २००० मध्ये याचिका प्रविष्ट केली होती. (उपासनेचा अधिकार सर्व धर्मांत सर्वांना आहेच ! - संपादक) श्री शनिशिंगणापूर येथील महिलांच्या प्रवेशावरून शासन पळ काढत आहे.

आतंकवादविरोधी पथकाची मशिदी आणि मदरसे येथे प्रवचने !

     आतंकवादविरोधी पथकाच्या हास्यास्पद उपाययोजना ! प्रवचनाने धर्मांधांची मने पालटत असती, तर इस्लामी आक्रमकांपासून हिंदूंचे रक्षण होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह सर्व राजा-महाराजांना लढाया कराव्या लागल्या नसत्या. आतंकवाद संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे कृती आवश्यक आहे, हे शासनाने जाणावे !       
     ठाणे - मुसलमान तरुणांनी इसिसच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी आतंकवादविरोधी पथकाने मशिदी, मदरसे, शाळा, तसेच महाविद्यालये येथे तकरीब म्हणजे प्रवचनाद्वारे मार्गदर्शन करणे चालू केले आहे. भिवंडीत १४७ मशिदींमधील मौलानांची आणि २० मदरशांमधील इमामांची भिवंडीचे पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. इंटरनेट हाताळतांना काय काळजी घ्यावी, याचेही मार्गदर्शन केले जात आहे. पोलिसांच्या फेसबूक खात्यावरून तरुण-तरुणींशी संपर्क साधून, त्यांनी कोणाला लाइक आणि अनलाइक करावे, याचेही मार्गदर्शन केले आहे.

आंबेडकरांचे नाव जोपर्यंत अस्तित्वात आहे, तोपर्यंत आरक्षण रहित होणार नाही ! - पंतप्रधान मोदी

     आंबेडकर यांनी स्वातंत्र्यानंतर केवळ १० वर्षे आरक्षण देण्याची तरतूद केली असतांना मतांच्या लांगूलचालनासाठी त्यात वाढ करणारी काँग्रेस आणि आता त्याला कायमस्वरूपी बनवणारे मोदी शासन जातीभेद कधीतरी नष्ट करील का ? 
     कोइम्बत्तूर (तमिळनाडू) - दलित, ओबीसी, तसेच अन्य वर्गांची आरक्षणे मोदी शासनाकडून रहित केली जाणार आहेत, अशी टीका काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांकडून केली जात आहे. याविषयी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव जोपर्यंत अस्तित्वात आहे, तोपर्यंत कोणीही आरक्षण रहित करणार नाही. देशाच्या एकात्मतेला धक्का लावण्यासाठी कट रचला जात आहे. अक्षरशः खोटेपणाची मोहीमच चालवली जात असून दलितांची दिशाभूल केली जात आहे. कोइम्बत्तूरमधील एका सार्वजनिक सभेत ते बोलत होते.

भुजबळ यांच्या अटकेवरून नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी चालूच !

     नाशिक - खासदार समीर भुजबळ यांना अटक केल्याच्या कारणावरून २ फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते येथे जाळपोळ आणि आंदोलन करत आहेत. ३ फेब्रुवारीलाही त्यांनी रस्त्यावर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी केल्याने सामान्य जनतेचे हाल झाले. कार्यकर्त्यांनी बसगाड्यांवर दगडफेक केली, तसेच चालकाला शिवीगाळ केली. राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'रस्ता बंद' आंदोलन केले. त्यामुळे भर उन्हात वाहने पाऊण घंटा थांबली होती. या 'रस्ता बंद' आंदोलनामुळे विद्यार्थी आणि लहान मुले यांचे हाल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांना दमदाटी करत होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे हे महिला आंदोलन असूनही या वेळी एकही महिला पोलीस येथे नव्हती आणि पोलिसांनी बघ्याचीच भूमिका घेतली. 
     जनतेला वेठीस धरणारे असे कार्यकर्ते असणारे पक्ष कायद्याचे राज्य कधीतरी देऊ शकतील काय ? या आंदोलनामुळे झालेली हानी शासनाने भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून वसूल करावी, अशी जनतेची मागणी आहे !

मुंबई समुद्र किनार्‍यावर अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना आहेत ? - उच्च न्यायालय

     मुंबई - मुंबईतील समुद्र किनारे आणि चौपाट्या यांवर होणारे अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, असा प्रश्‍न उच्च न्यायालयाने राज्य शासन आणि मुंबई महापालिका यांना केला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनार्‍यावर सहलीला आलेल्या १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाने हा प्रश्‍न विचारला आहे. गेल्या पाच वर्षांत १५९ लोकांचा समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाला आहे. मुंबईत समुद्र किनार्‍यावर पर्यटक आणि नागरिक येतात. या चौपाट्यांवर पर्यटकांना सुरक्षा देण्यात मुंबई महापालिका अपयशी ठरली आहे. त्यामध्ये मुंबई महापालिकेचे अधिकारी, सुरक्षारक्षक पुरवण्याऐवजी आता चौपाटीवरील मृतांचा आकडा लपवत असल्याचा प्रकारही समोर येत आहे

चांगल्या दिवसाचे (अच्छे दिन) चित्र धूसर होत आहे ! - खासदार राजू शेट्टी

     केंद्रशासनातील एका घटक पक्षाच्या नेत्याला असे वाटू शकते, ते सर्वसामान्य जनतेलाही वाटल्यास वावगे काय ? या वक्तव्याविषयी मोदी शासन विचार करेल का ?    
     पुणे - देशात सत्तापरिवर्तन झाले; परंतु व्यवस्थेचे परिवर्तन करण्यास आपण अपयशी ठरलो आहोत. चांगल्या दिवसाचे (अच्छे दिन) स्वप्न दाखवत सत्तेत आलो, पण आता चांगल्या दिवसाचे चित्र धूसर होत आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली. माईर्स एम्आयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६ व्या भारतीय छात्र संसदेत ते बोलत होते.

हिंदूंनो, दंगलीच्या वेळी बुद्धीप्रामाण्यवादी, विद्रोही, अंनिसवाले तुमच्या साहाय्याला येणार नाहीत, हे लक्षात घ्या !

     आळते, कोल्हापूर येथील शिवाजी चौकात गेल्या अनेक वर्षांपासून भगवा झेंडा फडकत आहे. हा झेंडा हटवण्यासाठी धर्मांधांनी हिंदुत्ववाद्यांशी वाद घालून त्यांना मारहाण केली. या घटनेत एका हिंदु तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून आणखी ३ हिंदू घायाळ झाले आहेत. मुसलमानांनी हिंदूंच्या घरात घुसून गज आणि काठ्या यांनी महिलांनाही मारहाण केली. तसेच रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड केली.

प्रभु श्रीरामावर खटला प्रविष्ट करणारे अधिवक्ता चंदन सिंह यांच्यावर तीन खटले प्रविष्ट !

हिंदुद्रोही कृत्य करणार्‍या अधिवक्त्याच्या विरोधात न्यायालयीन लढा देणार्‍या हिंदूंचे अभिनंदन !
     सीतामढी (बिहार)/ अयोध्या - प्रभु श्रीरामावर खटला प्रविष्ट करणारे चंदनकुमार सिंह यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्यामुळे तीन खटले प्रविष्ट करण्यात आले आहेत. या प्रकरणी धार्मिक संघटनांनी चंदन सिंह यांचा विरोध चालू केला आहे. जिल्हा अधिवक्ता संघानेही अधिवक्ता चंदन सिंह यांची सनद रहित करण्याची मागणी केली आहे. १ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयाने चंदन सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर ती अव्यवहारिक ठरवून फेटाळली होती. (अधिवक्ता चंदन सिंह यांना विरोध करणार्‍या हिंदु संघटनांचे तसेच जिल्हा अधिवक्ता संघाचे अभिनंदन ! मुळात चंदन सिंह यांना न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याच्या प्रकरणी न्यायालयानेच दंड देणे अपेक्षित होते, असे जनतेला वाटत आहे ! - संपादक)

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणार्‍या साधाकांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

बलात्काराच्या प्रकरणी बालसुधारगृहात दोन वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर अल्पवयीन मुलाने पुन्हा केला बलात्कार !

बालगुन्हेगार बालसुधारगृहात शिक्षा भोगूनही सुधारत नाहीत. 
त्यासाठी मुलांना लहानपणापासूनच धर्मशिक्षण द्या ! त्यातून त्यांना नैतिकतेचे धडे मिळतील ! 
     कृष्णागिरी (तमिळनाडू) - येथील सुलगिरी गावात ८ वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी १७ वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. चार वर्षांपूर्वी त्याने २४ वर्षार्ंच्या महिलेवर बलात्कार केला होता. या प्रकरणी बालसुधारगृहात दोन वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर तो सुटला होता; परंतु त्याने बाहेर येऊन पुन्हा बलात्कार केला.

३४ वर्षे सावरकरांच्या विचारांचा एकनिष्ठेने प्रचार आणि प्रसार करणारे राजेश्‍वर पारवेकर यांचा सत्कार

रत्नागिरीतील २८ वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन 
श्री. राजेश्‍वर पारवेकर याचा सत्कार करतांना श्री. दादा इदाते
     रत्नागिरी - रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई; स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई आणि नगरवाचनालय, रत्नागिरी यांच्या वतीने २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत झालेल्या तीन दिवसीय साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबईचे कार्याध्यक्ष श्री. राजेश्‍वर पारवेकर यांचा ते गेली २० वर्षे साहित्य संमेलनाला सातत्याने उपस्थित रहात असल्यावषयी आणि कार्याध्यक्ष म्हणून गेली ३४ वर्षे एकनिष्ठेने करत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार कार्यायिषयी सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
    श्री. पारवेकर यांनी आतापर्यंत ४५ शाळांमधून वीर सावरकर हा चित्रपट विनामूल्य दाखवला आहे.

सनातन संस्थेचे कार्य श्री शंकराचार्यांसारखे आहे ! - श्री श्री १००८ स्वामी हरिहरानंद रामानुजाचार्य महाराज

मालाड येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला 
श्री श्री १००८ स्वामी हरिहरानंद रामानुजाचार्य महाराज यांची भेट 
श्री श्री १००८ स्वामी हरिहरानंद रामानुजाचार्य महाराज ग्रंथप्रदर्शन पहातांना

     मालाड (मुंबई) - सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन पाहून संस्था करत असलेले कार्य उत्कृष्टच आहे, हे पटले. सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवरील प्रकाशित ग्रंथांतील महत्त्वाचा भाग आमच्या व्याख्यानांतून मांडून मी लोकांचे प्रबोधन करीन. सनातन संस्थेचे विविध उपक्रम आणि कार्य यांची व्याप्ती पहाता सनातन संस्थेचे कार्य श्री शंकराचार्यांसारखे आहे, असे प्रतिपादन श्री श्री १००८ स्वामी हरिहरानंद रामानुजाचार्य महाराज यांनी केले. येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट देतांना ते सनातनच्या साधकांशी बोलत होते. या वेळी संस्थेच्या वतीने 'हिंदु राष्ट्र का हवे ?' हा ग्रंथ महाराजांना भेट देण्यात आला. 

बेलापूर (जिल्हा नगर) येथे धर्मांधांच्या मारहाणीत एका हिंदूचा मृत्यू, तर एक गंभीर घायाळ

     हिंदूंना अमानुष मारहाण करणार्‍या धर्मांधांच्या कारवाया कायमच्या बंद होण्यासाठी आता हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही ! धर्मनिरपेक्ष हिंदू आणि अल्पसंख्यांकधार्जिणे राजकारणी यांनी अल्पसंख्यांकांचे नको एवढे लाड केल्यामुळेच अल्पसंख्यांक एखाद्या कुटुंबातील बिघडलेल्या मुलाप्रमाणे उद्दाम झाले आहेत.    
     श्रीरामपूर - तालुक्यातील बेलापूर येथे २८ जानेवारी या दिवशी रात्री ८ वाजता ११ धर्मांध आणि १ अल्पसंख्यांक यांनी दोन हिंदूंना मागील एका किरकोळ वादावरून गंभीर मारहाण केली. (काही ना काही निमित्त शोधून हिंदूंना मारहाण करणार्‍या धर्मांधांना किती काळ सहन करायचे, असे हिंदूंना वाटल्यास नवल ते काय ? - संपादक) धर्मांधांनी बेलापूर येथील रामेश्‍वर राजेंद्र महाले आणि राकेश नागले यांना मारहाण करण्यासाठी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके यांचा वापर केला होता. या मारहाणीमुळे रामेश्‍वर महाले याचा उपचाराच्या कालावधीत मृत्यू झाला असून राकेश नागले यांच्यावर उपचार चालू आहेत.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करून ८ जणांना अटक केली आहे.
      या गुन्ह्यातील अन्य ४ जण फरार आहेत. बेलापूर ग्रामस्थांनी २९ जानेवारी या दिवशी गाव बंद ठेवून या मारहाणीचा निषेध केला. मारहाणीमध्ये हत्या होण्याची श्रीरामपुरमधील ही चौथी घटना आहे.
     राकेश नागले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अक्रम अकिल शेख, असिफ शेख, नयूम बागवान, नोईद बागवान, सूरज मायकल नन्नवरे, सलमान बागवान, तौसिफ शेख, शाहीद मलिक, युनूस शेख यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. या घटनेमुळे गावातील तणाव वाढू नये; म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

एम्आयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर मारहाणीच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट !

     भाग्यनगर (हैद्राबाद) - एम्आयएमचे  खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासमोर ग्रेटर हैद्राबाद नगर निगम निवडणुकांदरम्यान एम्आयएम् आणि काँग्रेस यांचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाली. त्या वेळी ओवैसी यांच्यासमोर मारहाण झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते शब्बीर अली यांनी केला आहे. यात काही नेते आणि कार्यकर्ते जखमी झाले आहेत. (हाणामारी करणारे राजकीय पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देऊ शकतील का ? असे गुंडगिरी करणारे राजकीय पक्ष देशात असहिष्णूता वाढल्याची ओरड करत असतात.- संपादक) या प्रकरणी प्रथम माहिती अहवाल प्रविष्ट करण्यात आला आहे. यामध्ये ओवैसी यांना अटकही होऊ शकते. या हाणामारीच्या वेळी पोलिसांनी लाठीमार केला. अद्यापही येथे तणावाचे वातावरण आहे. 

सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी केलेला त्याग तरुणांच्या हातून घडला पाहिजे ! - आप्पासाहेब सातवर

एकसंबा येथे हिंदूसंघटन मेळावा साजरा
     एकसंबा (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) - सुभाषबाबू यांनी देशासाठी केलेला त्याग तरुणांच्या हातून घडावा, असे प्रतिपादन एकसंबा येथील धर्माभिमानी श्री. आप्पासाहेब सातवरगुरुजी यांनी केले. श्रीराम सेनेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त २३ जानेवारी या दिवशी राजमाता जिजाऊ आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून हिंदूसंघटन मेळावा घेण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून श्री रजनीकांत पांगम (एकसंबा) आणि प्रमुख वक्ते श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. नीलकंठ माने (हुपरी) उपस्थित होते. श्री. सातवर यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सुभाषचंद्र बोस आणि जिजाऊ यांनी केलेल्या त्यागाविषयी सांगितले.
     श्री. नीळकंठ माने यांनी आव्हान केले की, देश आणि धर्म यांवर विविध माध्यमांतून आक्रमणे होत आहेत. ती रोखण्यासाठी जात, संप्रदाय, मंडळ, पक्ष हे सर्व सोडून हिंदु म्हणून एक होऊन या विरोधात कृतीशील लढा देणे आवश्यक आहे.

(म्हणे) मोदी शासन भारतियांवर हिंदुत्व लादत आहे ! - मुसलमान संघटनांचा आरोप

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंवर शिक्षणाद्वारे इस्लामी इतिहास थोपवण्याचा प्रयत्न केला गेला ! 
त्याविषयी या संघटना काही बोलतील का ?
     ठाणे - ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांनी केंद्रातील मोदी शासनावर देशातील नागरिकांवर हिंदुत्व लादण्याचा आरोप केला आहे. 
   ठाणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नोमानी म्हणाले की, लोकांना सूर्यनमस्कार आणि योग करण्यासाठी बाध्य करणे, वन्दे मातरम् अनिवार्य करणे, हे लोकांवर हिंदु संस्कृती लादण्यासारखे आहे. जर शासन हिंदू संस्कृतीनुसार वागण्यास बाध्य करणार असेल, तर त्याने नमाज पढण्यासही शिकवले पाहिजे. (नमाज संपूर्णपणे धर्माशी संबंधित आहे. ती संबंधित धर्मानुसार करायची उपासना पद्धत आहे. सूर्यनमस्कार आणि योग यांना जगाने मान्यता दिली आहे आणि सर्वधर्माचे लोक ते करत आहेत. वन्दे मारतम म्हणणे हे देशाचे गुणगान करणे आहे, त्याला धर्माचे लेबल लावणारे कधीतरी देशभक्त होऊ शकतात का ? अशांना कोणी देशातून निघून जा असे म्हटल्यास ते चुकीचे कसे ठरेल ? - संपादक)

ब्रिटनने दाऊद इब्राहिम याच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातले !

     लंडन - ब्रिटनने दाऊद इब्राहिम याच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. येथे दाऊदची १ सहस्त्र कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे. प्रतिबंधित व्यक्तींच्या नव्या सूचीमध्ये दाऊदचे नाव आहे. ब्रिटनच्या अर्थ विभागाने २७ जानेवारी या दिवशी ही यादी प्रसिद्ध केली. यात शीख अतिरेक्यांशी संबंधित काही लोकांची नावेही आहेत. या सूचीमध्ये दाऊद इब्राहिम कासकरचे चार पत्ते असून ते सर्व कराचीतील आहेत. मुंबईत जन्मलेल्या दाऊदचे राष्ट्रीयत्व भारतीय असल्याचे लिहिले आहे. त्याच्या भारतीय पारपत्राचाही उल्लेख आहे. भारत शासनाने तो रहित केला होता.

राज्यातील एकूण धरणांत केवळ ३५ प्रतिशत साठा

राज्यातील दुष्काळाची दाहकता वाढणार
अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति
       अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, साधना केली, तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा तो सुसह्य होईल.
     संभाजीनगर - राज्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्‍चिम महाराष्ट्र्र या भागांत पाऊस अल्प झाला. आता हळूहळू उन्हाची दाहकता वाढू लागली असून फेब्रुवारीपासूनच पाण्याचे अधिक बाष्पीभवन होऊन त्याचा फटका सोसावा लागणार आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट आणखी वाढणार असल्याची चिन्हे आहेत. राज्यातील एकूण धरणांत केवळ ३५ प्रतिशत साठा आहे.

सोलापूर येथील उपाहारगृहात एम्आयएम्च्या धर्मांध कार्यकर्त्यांकडून तोडफोड

सातत्याने किरकोळ कारणावरून तोडफोड करणार्‍या 'एम्आयएम्' पक्षावर बंदी घालणे आवश्यक ! 
     सोलापूर, ३ फेब्रुवारी - 'मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन'च्या (एम्आयएमच्या ) धर्मांध कार्यकर्त्यांनी २ फेब्रुवारी या दिवशी शहरातील विजापूर वेशीतील अजीज प्लाझा या उपाहारगृहात घुसून तोडफोड केली. या वेळी १० हून अधिक धर्मांधांनी हातात काठ्या आणि शस्त्र घेऊन उपहारगृहातील काचा, फर्निचर आणि आसंद्या यांची हानी केली. (यावरून हे आक्रमण पूर्वनियोजित नसेल कशावरून ? धर्मांधांच्या वाढत्या आक्रमणांना आळा घालण्यासाठी शासन काय करणार ? - संपादक) सदर तोडफोडीमध्ये एम्आयएमचा  शहर युवक अध्यक्ष इफ्तिकार तुळजापुरे, त्याचा भाऊ असिफ तुळजापुरे आणि त्यांचे अन्य साथीदार यांचा समावेश होता. या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट झाला असून पोलीस तुळजापुरे याचा शोध घेत आहेत. 

आतंकवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांसाठी ओळखपत्र सक्तीचे !

भ्रष्टाचाराने पोखरलेले वनखाते असतांना केवळ पर्यटकांना
ओळखपत्रे देऊन आतंकवादाला तोंड कसे देणार ?
      पनवेल - पनवेलपासून जवळच असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांना यापुढे ओळखपत्र सोबत ठेवणे सक्तीचे केले आहे. सध्या ६ सीसीटीव्हींद्वारे वन अधिकार्‍यांकडून लक्ष ठेवले जाते. यात वाढ करून २० सीसीटीव्हींचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवला आहे. इसिसच्या अतिरेक्यांनी या भागाची रेकी (अवलोकन) केल्याच्या पार्श्‍वभूमीवर वन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
    पनवेल ग्रामीण पोलिसांनी वन अधिकार्‍यांना येथील रेकी होईपर्यंत वन कर्मचार्‍यांना किंवा अधिकार्‍यांना याची माहिती कशी मिळाली नाही ? अशी विचारणा केल्यावर एखादी व्यक्ती अभयारण्यात आल्यानंतर तो कोण आहे हे कसे शोधणार ?, असा प्रश्‍न अधिकार्‍यांनी केला.

आज प्रत्येक आई-वडील माझा मुलगा डॉक्टर, अभियंता वगैरे व्हावा, असे म्हणतात; पण कोणीही सत्पुरुष व्हावा, असे म्हणत नाहीत !- प.पू. झुरळे महाराज, डोंबिवलीश्री चैतन्य प्रसाद अण्णा महाराज यांचा देहत्याग !

श्री चैतन्य प्रसाद अण्णा महाराज 
     निपाणी (जिल्हा बेळगाव), ३ फेब्रुवारी (वार्ता.) - येथील श्री. रामचंद्र बळवंत पाटील उपाख्य श्री चैतन्य प्रसाद अण्णा महाराज (वय ८१ वर्षे) यांनी २ फेब्रुवारी या दिवशी रहात्या घरी देहत्याग केला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, १ मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. श्री चैतन्य प्रसाद अण्णा महाराज हे दत्ताची उपासना करत होते. वर्ष १९९९ मध्ये महाराजांचा रुद्राभिषेक आणि पट्टाभिषेक सोहळा कागल तालुक्यातील सांगाव या गावी झाला. त्यांचा भक्त परिवार पुष्कळ मोठा आहे. देहत्याग केल्यानंतर कोकणातील नाधवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे त्यांनी देहत्यागापूर्वी भक्तांना सांगितले होते. त्यानुसार त्यांच्यावर नाधवडे येथे २ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

लाच घेणारे पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र मोरे यांना अटक

भ्रष्टाचारग्रस्त पोलीस प्रशासन ! 
     मिरज, ३ फेब्रुवारी (वार्ता.) - जुगारप्रकरणी प्रविष्ट असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी पाच सहस्र रुपयांची लाच घेतांना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र मोरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली आहे. मोरे यांच्या विरोधात गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

उंचगाव येथे बालसाधकांकडून धर्मसभेचा प्रसार !

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कोल्हापूर येथे आज कोल्हापूर येथे हिंदु धर्मजागृती सभा 
बालसाधकांकडून माहिती ऐकतांना नागरिक

     कोल्हापूर, ३ फेब्रुवारी (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे ४ फेब्रुवारी या दिवशी होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार व्हावा, या उद्देशाने उंचगाव येथील प्रवेशद्वारासमोर बालसाधकांनी धर्मसभेची माहिती देणार्‍या फलकासमोर उभे राहून नागरिकांना धर्मजागृती सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. 

शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये प्रथा-परंपरांचे पालन झाले पाहिजे ! - राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, काँग्रेस

     मुंबई - नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये दर्शन घेण्याच्या प्रथा परंपरा आहेत, त्यांचे पालन झाले पाहिजे, अशी सुस्पष्ट भूमिका काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ३ फेब्रुवारी या दिवशी येथे व्यक्त केली. शनिशिंगणापूर येथे दर्शन घेण्यास स्त्री-पुरूषांना मुभा आहे. येथे महिलांना दर्शन घेण्यास बंदी नाहीच, असेही त्यांनी या वेळी ठासून सांगितले. 

पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्हिसासाठी दूरभाष केल्यावर अनुपम खेर यांनी पाकमध्ये जाण्याचे नाकारले !

स्वाभिमानी अनुपम खेर यांचे अभिनंदन !
     मुंबई - अनुपम खेर यांना व्हिसा नाकारणार्‍या पाकने त्याच्यावर टीका होऊ लागल्याने खेर यांना व्हिसा देण्याचा प्रयत्न केला; परंतु खेर यांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचेच नाकारले आहे. पाकचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी खेर यांना दूरभाष करून व्हिसा घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी मला वेळ नसल्याचे सांगत ती नाकारली. याची माहिती खेर यांनी ट्विटर द्वारे दिली आहे. अनुपम खेर कराची येथे होणार्‍या साहित्य संमेलनाला जाणार होते.

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणार्‍या बसपच्या नेत्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी चोपले !

राष्ट्रविरांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात जनतेला कायदा हातात 
का घ्यावा लागतोे, याचा शासन कधी विचार करेल का ?
     झाशी - आत्महत्या करणारा हैदराबाद विश्‍वविद्यालयाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्यासंदर्भात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये बहुजन समाज पक्षाचे माजी आमदार फूल सिंह यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चोपले. 
     राणी लक्ष्मीबाई देशासाठी नाही, तर मुलाला दत्तक घेण्याची प्रक्रिया इंग्रजांनी अमान्य केली; म्हणून लढल्या, असा आरोप करून राणी लक्ष्मीबाई या भित्र्या होत्या, असे अवमानकारक वक्तव्य केले. यावर त्यांना भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी चोपल्यानंतर फूल सिंह कसबसे तेथून निसटले. स्थानिक वकील सुधीर सिंह यांनी फूल सिंह यांच्या विरोधात नवाबाद पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. बसपचे जिल्हाध्यक्ष आर.के. अहिरवार म्हणाले की, फूल सिंह यांना पक्षातून काढण्यात आले आहे. महापुरुषांविषयी अपशब्द वापरणे अयोग्य आहे.

पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री पर्रीकर यांना मारण्यासंबंधी इसिसच्या नावाने मिळालेले पत्र बनावट

सुरक्षायंत्रणांची दिशाभूल करणार्‍यालाही आता देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली शिक्षा व्हायला हवी !
     पणजी - गोमांस बंदीच्या कारणावरून पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री पर्रीकर यांना मारण्यासंबंधी गोवा विधानसभेत इसिसच्या नावाने मिळालेले पत्र बनावट असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी दिली आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर गोवा पोलिसांनी केंद्रीय संरक्षणमंत्री पर्रीकर यांना झेड सुरक्षा स्वीकारण्याची विनंती केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, सुनील तटकरे यांच्या विरोधात लवकरच आरोपपत्र ! - गिरीश महाजन

राष्ट्रवादी (भ्रष्टवादी ?) काँग्रेसचे खरे स्वरूप ! 
     मुंबई, ३ फेब्रुवारी (वार्ता.) - बाळगंगा प्रकल्पात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधात फेब्रुवारीअखेरीस आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री श्री. गिरीश महाराज यांनी दिली. 

कॉ. पानसरे हत्या प्रकरणी सनातनला मोलाचे सहकार्य करणार्‍या धर्माभिमानी रणझुंजार अधिवक्त्यांचा सभेत होणार सत्कार !

     कोल्हापूर, ३ फेब्रुवारी (वार्ता.) - धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी ४ फेब्रुवारीला येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी धर्मद्रोही आणि पुरोगामी यांच्या धमकीला न जुमानता सनातनचा साधक श्री. समीर गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सनातन संस्थेला मोलाचे सहकार्य करणारे सांगली येथील धर्माभिमानी आणि रणझुंजार अधिवक्ते सर्वश्री एम्.एम्. सुहासे, समीर पटवर्धन, आनंद देशपांडे यांसह इतर अधिवक्त्यांचा जाहीर सत्कार हिंदु धर्मजागृती सभेत करण्यात येणार आहे. श्री. समीर यांचे वकीलपत्र घेण्यास कोल्हापूर येथील अधिवक्तांनी नकार दिला होता. येथील पुरोगाम्यांचे षडयंत्र उधळून लावण्यासाठी ३१ अधिवक्ते पुढे आले. सनातनच्या प्रेमापोटी एवढ्या अधिवक्त्यांचा सनातनला पाठिंबा मिळाला.

असहिष्णुतेच्या सूत्रावरून मुसलमान धर्मगुरूंकडून अभिनेता अमीर खानवर टीका

सहिष्णुतेचा ठेका घेणारे आता मुसलमान धर्मगुरूंनाही असहिष्णु ठरवतील !
     लक्ष्मणपुरी (लखनऊ) - देशातील कथित वाढत्या असहिष्णुतेवरून विधान करणारे अभिनेता अमीर खान यांच्यावर मुसलमानांच्या शिया पंथियांचे धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांनी टीका केली आहे. जव्वाद म्हणाले की, अमीरचे विधान निंदनीय आहे. भारतात कधीही असहिष्णुतेचे वातावरण नव्हते. सर्व धर्म एकोप्याने रहात आहेत. भारत जगभरातील सर्व धर्मियांसाठी चांगले स्थान आहे. येथे सर्वांना जीवन जगण्यासाठी स्वातंत्र्य आहे. 
    मौलाना जव्वाद यांनी उत्तरप्रदेशच्या समाजवादी पक्षाच्या सरकारवरही टीका केली. ते म्हणाले की, राज्यात ज्याप्रमाणे लूटमार, हत्या, दरोडखोरी, बलात्कार सारख्या घटना घडत आहेत, ते पहाता राज्यात भीतीचे वातावरण आहे.

ओडिशातील भद्रक, जगतसिंगपूर आणि काकतपूर येथे धर्माभिमान्यांच्या हिंदूसंघटन बैठकांत हिंदु जनजागृती समितीकडून मार्गदर्शन

    राऊरकेला (ओडिशा) - ओडिशा राज्यातील भद्रक, जगतसिंगपूर आणि काकतपूर येथील हिंदु धर्माभिमान्यांकडून हिंदूसंघटन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी मार्गदर्शन केले. 
      भद्रक येथे धर्माभिमानी श्री. अश्‍विनी पाघी यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी राष्ट्र आणि धर्म यांची सद्य:स्थिती, त्यामागील कारणे आणि हिंदु राष्ट्र निर्मितीची आवश्यकता या विषयांवर श्री. प्रकाश मालोंडकर म्हणाले की, धर्मरक्षणासाठी प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. तरच तो धर्मजागृती करून धर्मसंघटनाचे कार्य करू शकेल. 

इसिसला सोडून परतणार्‍या ब्रिटीश महिलेला ६ वर्षांची शिक्षा !

भारतात इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी निघालेल्या धर्मांधांचे प्रबोधन करून त्यांना सोडून 
दिले जाते, तर ब्रिटनमध्ये इसिसला सोडून परत आलेल्या युवतीची कारागृहात रवानगी होते ! 
विदेशात असे कठोर कायदे अस्तित्वात असल्यामुळेच तेथे आतंकवाद आटोक्यात आहे !
    बर्मिंघम (ब्रिटन) - ब्रिटीश वंशाची २६ वर्षीय महिला तरीना शकील इसिसला सोडून परत ब्रिटनमध्ये आपल्या पतीच्या घरी परतली होती. मात्र आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याच्या प्रकरणी ६ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सिरियामध्ये इसिसद्वारा महिलाचे होत असलेले लैंगिक शोषण पाहिल्यानंतर तिने परतीचा निर्णय घेतला होता.

इसिसकडे आहे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा फौजफाटा !

     नवी देहली - इसिसने सीरिया, इराक, लिबिया इत्यादी देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. यासाठी आवश्यक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा या जिहादी संघटनेकडे आहे. गेल्या काही मासांत इसिसने केलेल्या युद्धांमधून सीरिया आणि इराकी सैन्यांकडून ही शस्त्रास्त्रे हस्तगत केली आहेत. 
     मिलिटरी फॅक्टरी डॉट कॉम आणि विकिपीडिया संकेतस्थळांनुसार जिहादी संघटनेकडे विविध प्रकारच्या अत्याधुनिक रायफल्स, मशीन गन्स, फील्डगन्स, मिसाइल लॉन्चर, रॉकेट लॉन्चर इत्यादींचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. तसेच अत्याधुनिक जेट विमाने, हेलीकॉप्टर, रणगाडे आदींचा यात समावेश आहे. एवढेच नव्हे तर, संघटनेचे जिहादी वैज्ञानिक तसेच रिमोटवर चालणार्‍या आत्मघाती चारचाकी गाड्यांची सिद्धता करीत आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

पाकिस्तानातील असहिष्णुतेवर भारतीय निधर्मीवाद्यांचे मौन !
     कराचीमध्ये शितलामाता, संतोषीमाता आणि भवानीमाता यांच्या मूर्ती असलेल्या ६० वर्षांहून अधिक जुन्या मंदिराची सशस्त्र धर्मांध आक्रमणकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. या आक्रमणानंतर स्थानिक हिंदू भयग्रस्त झाले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Karachike purane mandir ki hathiyarband dharmandh akramankariyo ne todfod ki !
Pakistan ki asahishnuta par ab Bharatke nidharmi chup kyu ?
जागो ! : कराची के पुराने मंदिर की हथियारबंद धर्मांध आक्रमणकारियों ने तोडफोड की !
पाकिस्तान की असहिष्णुता पर अब भारत के निधर्मी चुप क्यों ?

बार्शी (सोलापूर) येथील सभेच्या प्रसाराला कृतीशील प्रतिसाद

धर्मसभेच्या वाहनफेरीला दुचाकी घेऊन ६० जण सहभागी होऊ ! - प्रशांत औताडे, धर्माभिमानी 
कांदलगाव ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना श्री. सांगोलकर

     बार्शी (जिल्हा सोलापूर) (वार्ता.) - धर्मसभेच्या वाहनफेरीला आम्ही ६० जण दुचाकी घेऊन सहभागी होऊ, असे आश्‍वासन धर्माभिमानी श्री. प्रशांत औताडे आणि त्यांचे सहकारी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. येथील हिंगणगावातील लोखंडे वस्तीत समितीचे श्री. तानाजी गोरे आणि सनातनचे श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांनी एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या तरुणांना संपर्क करून तेथे बैठक घेतली होती. 'समितीचे कार्य उत्कृष्ट असून आम्हाला त्यात सहभागी व्हायचे आहे', असेही धर्माभिमान्यांनी सांगितले. या बैठकीला सर्वश्री अजित पाटील, प्रकाश भोसले, अमित पाटील, हनुमंत लोखंडे, देवकर उपस्थित होते. 

(म्हणे) ख्रिस्ती पाद्रींनी मुलांचे लैंगिक शोषण करणे हा गुन्हा ठरतो, हे मला माहीत नव्हते ! - आर्चबिशप रॉबर्ट कार्लसन

     मिनियापोलीस (अमेरिका) - अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात सेंट लुईस चर्चचे आर्चबिशप रॉबर्ट कार्लसन यांनी न्यायालयासमोर त्यांचे म्हणणे मांडले आहे. ते स्वत:चा बचाव करतांना म्हणाले, ख्रिस्ती पाद्रींनी अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करणे हा गुन्हा ठरतो याची मला अजिबात माहीती नव्हती. (ख्रिस्ती पाद्य्रांच्या कुकृत्यांचे अश्‍लाघ्य समर्थन करणारे आर्चबिशप ! हे म्हणे प्रेम आणि शांती यांचे पुजारी ! - संपादक) त्यांच्या या विधानामुळे ख्रिस्ती नागरिक संतप्त झाले आहेत.

पाश्‍चात्त्य संस्कृतविरोधकांचे पितळ उघड करणार्‍या संस्कृतसाठी युद्ध या पुस्तकावर चर्चासत्रांचे आयोजन !

पुस्तकाचे अमेरिकी लेखक राजीव मल्होत्रा यांची विशेष उपस्थिती !
     मुंबई - अमेरिकेत वास्तव्य करणारे सुप्रसिद्ध हिंदुत्ववादी लेखक श्री. राजीव मल्होत्रा लिखित द बैटल फॉर संस्कृत : इज संस्कृत पॉलिटिकल ऑर सेकरेड, ऑप्रेसिव ऑर लिबरेटिंग, डेड ऑर अलाइव (संस्कृतसाठी युद्ध : संस्कृत भाषा राजकीय आहे कि पवित्र, अत्याचारी आहे कि स्वातंत्र्य देणारी, मृत आहे कि जिवंत ?) या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी हल्लीच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्कृत भारती संघटनेने १७ जानेवारीला बेंगळुरू आणि २८ जानेवारीला मुंबई येथे या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी स्वत: श्री. मल्होत्रा ही उपस्थित होते.

श्री १००८ श्री सत्यात्मा तीर्थ स्वामीजी यांचा हिंदु जनजागृती समितीच्या प्रस्तावित अंधश्रद्धा विरोधी कायद्याविरूद्धच्या चळवळीला पाठिंबा !

श्री १००८ श्री सत्यात्मा तीर्थ स्वामीजी यांना
माहिती सांगतांना समितीचे श्री. मोहन गौडा
    बेंगळुरु (कर्नाटक) - हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच श्री १००८ श्री सत्यात्मा तीर्थ स्वामीजी यांचे दर्शन घेतले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रस्तावित अंधश्रद्धा विरोधी कायद्याविषयी माहिती दिली आणि या कायद्यातील हिंदु धर्मावर आघात करणार्‍या कलमांविषयी सांगितले. या वेळी स्वामीजी म्हणाले, माझा तुमच्या प्रस्तावित अंधश्रद्धा विरोधी कायद्याविरूद्धच्या चळवळीला संपूर्ण पाठिंबा आहे. मी स्वतः याविषयी शासनाला पत्र लिहिन आणि या कायद्याला विरोध करण्यासाठी माझ्या भक्तांनाही माहिती देईन. या वेळी समितीचे श्री. मोहन गौडा आणि अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते. 

पाकिस्तानातील जिहादी आतंकवाद्यांना सौदी अरबकडून अर्थपुरवठा !

आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करणार्‍या सौदी अरबवर जागतिक 
बहिष्कार घालण्याचे आवाहन अमेरिका करणार का ?
     वॉशिंग्टन - पाकिस्तानातील आतंकवाद पोसण्यामध्ये सौदी अरबचा मोठा वाटा असल्याचे समोर आले आहे. पाकधील २४ सहस्रांपेक्षा अधिक मदशांना सौदीकडून अर्थपुरवठा करण्यात येत असल्याचा दावा अमेरिकेचे खासदार (सिनेटर) क्रिस मर्फी यांनी केला आहे. या मदरशांतील शिकवणुकीतून आतंकवादीच तयार होत आहेत आणि त्याकडे अमेरिका दुर्लक्ष करत असून हे धोक्याचे आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले. ते एका कार्यक्रमात बोलत होते. (सौदी अरबकडे बोट दाखवणार्‍या अमेरिकेनेही पाकसारख्या आतंकवादी देशाला आतापर्यंत अब्जावधी रुपयांचे अर्थसाहाय्य करून पोसण्याचे काम केले आहे. अमेरिकेला तिच्या पापाने प्रायश्‍चित्त घ्यायचे असेल, तर तिने पाकमधील जिहादी आतंकवाद मोडून काढला पाहिजे ! - संपादक)

संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच शिरस्त्राण (हेल्मेट) सक्ती होणार ! - दिवाकर रावते, राज्य परिवहन मंत्री

     संभाजीनगर, ३ फेब्रुवारी - सध्या संभाजीनगरमध्ये सर्व दुचाकीस्वारांसाठी शिरस्त्राण घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. यानंतर आता पुण्यातही या नियमाची अंमलबजावणी करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात लवकरच शिरस्त्राण घालणे सक्तीचे करण्यात येणार आहे. हा निर्णय म्हणजे सक्ती नसून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री श्री. दिवाकर रावते यांनी दिली. यापुढे दुचाकी विकतांना वाहनाच्या समवेत शिरस्त्राण देण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. संभाजीनगरमध्ये शिरस्त्राण घालणार्‍या वाहनचालकांचा सत्कार रावते यांच्या हस्ते ३ फेब्रुवारी या दिवशी करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. 

हिंदु राष्ट्र ही केवळ कल्पना नव्हे, तर विचार ! - डॉ. श्रीरंग गोडबोले, सावरकर साहित्याचे अभ्यासक

रत्नागिरी येथे झालेल्या २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी 
सावरकरांच्या कल्पनेतील हिंदु राष्ट्र या परिसंवादात डॉ. श्रीरंग गोडबोले यांनी मांडलेले विचार
डॉ. श्रीरंग गोडबोले
    सावरकरांच्या कल्पनेतील हिंदु राष्ट्र यापेक्षा सावरकरांचा हिंदु राष्ट्र हा विचार आहे. ती कल्पना नाही. हिंदु राष्ट्र विचाराच्या विकासात रत्नागिरीला अनन्य साधारण महत्त्व आहे. याचे कारण हिंदुत्वाविषयी मनन आणि चिंतन सावरकरांनी जरी अंदमानात केले असले, तरी हिंदुत्व नावाचा त्यांचा युगप्रवर्तक ग्रंथ त्यांनी रत्नागिरीच्या कारागृहात लिहून पूर्ण केला. सावरकरांचे पुण्यस्मरण करत असतांना सावरकर आणि माई सावरकर यांच्या राजकीय अन् सामाजिक कामात ज्यांनी निर्भयपणे आणि नि:स्पृहपणे सहकार्य केले, अशा रत्नागिरीकरांचा उल्लेख केल्यावाचून रहावत नाही. सावरकरांच्या विचारांवर आज जे आक्षेप घेतले जातात, त्याच्या विषयीची वस्तूस्थिती येथे मांडायची आहे.

हिंदु जनजागृती समितीचा मध्यप्रदेश येथील डिसेंबर २०१५ मधील धर्मप्रसार कार्याचा संक्षिप्त आढावा !

१. फ्लेक्स प्रदर्शनाचे आयोजन
१ अ. क्षिप्र्रा नदीच्या काठावरील कार्तिक मेळ्यात राष्ट्र आणि धर्मशिक्षण यांविषयी फलक (फ्लेक्स) प्रदर्शनाचे आयोजन : ३१ नोव्हेंबर ते २१.१२.२०१५ या कालावधीत उज्जैन येथील नगर निगमकडून क्षिप्र्रा नदीच्या काठी आयोजित करण्यात आलेल्या कार्तिक मेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्र आणि धर्मजागृती करणार्‍या फलक (फ्लेक्स) प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचा ५० सहस्रहून अधिक धर्मप्रेमींनी लाभ घेतला.
१ आ. दत्तमंदिरात फलक (फ्लेक्स) आणि ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी अनुमती मिळवून देणारे श्री. पंकज शर्मा ! : बांगर येथील दत्तमंदिरात दत्तजयंतीनिमित्त फलक (फ्लेक्स) आणि ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. बांगर येथील धर्माभिमानी श्री. पंकज शर्मा हे सकाळी ५ वाजता मंदिरात जाऊन तेथील व्यवस्थापनाला भेटले आणि त्यांनी मंदिर व्यवस्थापनाला समितीला प्रदर्शन लावायला सहकार्य करण्याविषयी विनंती केली.
     २७.१२.२०१५ या दिवशी श्री. पंकज शर्मा यांनी बांगर येथील भंडार्‍यात साधकांना प्रदर्शन लावण्यासाठी पटल-आसंदी आणि तंबूची व्यवस्था स्वखर्चाने करून दिली.

संत ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा वात्सल्याने सांभाळ करणारे संत निवृत्तीनाथ महाराज !

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने...
संत निवृत्तीनाथ महाराज
     संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्‍वर यांचे वडीलबंधू आणि गुरु होते. संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. त्या ठिकाणी रामानंद नावाचे सदगुरु रहात होते. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली. त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करत ते तेथे राहू लागले.
     पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसारास प्रारंभ केला. नंतर विठ्ठलपंतांना चार मुले झाली. पहिले निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्‍वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. त्यांनी आपल्या मुलांना त्या काळच्या रितीप्रमाणे सर्व काही शिकवले.
     त्या वेळेस विठ्ठलपंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्‍वराच्या मागील डोंगरावर गेले. त्या डोंगरावर दाट अरण्य होते. डोंगरात हिंडता-हिंडता एक वाघ धावत आला.

प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते !

     प्रभु श्रीरामाने सीतामातेला अग्नीपरीक्षा द्यायला लावून सीतामातेवर अन्याय केला असल्याचे सांगत बिहार येथील एका व्यक्तीने चक्क प्रभु श्रीरामचंद्रांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा उद्योग केला. अर्थात न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्याने या निमित्ताने सीतेला घराबाहेर काढून रामाने अन्याय केला; तिचा मानसिक छळ केला; मी सीतामातेसाठी न्यायाची भिक मागत आहे, अशी भूमिका (?) मांडली.

पुरोगामी बुद्धीमत्तेचे तेज फाकते, तेव्हा पानसरे, दाभोलकर यांचे मारेकरी निश्‍चिंत मनाने गुन्हे करू शकतात !

श्री. भाऊ तोरसेकर
पुरोगामी बाजारातील सेल्फीचे दुकान या लेखावर निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिलेली प्रतिक्रिया 
 श्री. तोरसेकर, 
    तुम्ही आत्महत्येची मीमांसा करून दिशाभूल करण्यापेक्षा त्यामागचे कारण शोधू शकत नाही का ? तुम्ही बुद्धीवंत आहात. त्यामुळे कृपया सामान्य व्यक्तीची दिशाभूल करू नका. आपण परिस्थिती पाहूया आणि काही महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवूया. ते तुमच्याकडून अपेक्षित आहे. 
- सुधाकर सुराडकर

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

     सनातनच्या विविध आश्रमांसाठी स्वयंपाकोपयोगी भांडी उपलब्ध करून देऊन अथवा त्याकरिता धनरूपात साहाय्य करून राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात सहभागी व्हा !
     सनातन संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष दिवसेंदिवस बहरत आहे. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी झोकून देऊन सेवा करण्यास इच्छुक साधकांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सनातनचे विविध आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्ये पुढील भांड्यांची तातडीने आवश्यकता आहे.
    जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील प्रकारची भांडी उपलब्ध करून देऊ शकतात अथवा त्याकरता धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी सौ. क्षमा राणे यांच्याशी ०८४५१००६२५८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

क्षणोक्षणी कृष्णाचे अस्तित्व अनुभवणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. योगेश्‍वर गरुड (वय ३ वर्षे) !

चि. योगेश्‍वर गरुड
     ४.२.२०१६ (पौष कृष्ण पक्ष एकादशी) या दिवशी चि. योगेश्‍वर गरुड याचा तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
चि. योगेश्‍वर गरुड याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव 
यांच्या अनुसंधानात असणे
१ अ. वडिलांसमवेत कृष्ण चालत असल्याचे सांगणे : मार्च २०१५ योगेश्‍वरचे बाबा कार्यालयात जायला निघाले, तेव्हा योगेश्‍वर म्हणाला, आई, बाबा कृष्णबाप्पाला घेऊन चालत गेले. कृष्णबाप्पाही बाबांसमवेत चालत होता. आपणही जाऊया चल. कृष्णबाप्पा गेला ना ? बाबा दिसेपर्यंत तो त्यांच्याकडे पाहून पुनःपुन्हा सांगत होता. नंतर जोराने हसू लागला.

संसारात राहून साधना करण्याचे महत्त्व

     एकदा घरामध्ये एका क्षुल्लक कारणावरून माझा बाबांशी वाद झाला. याचे चिंतन करतांना माझे चिडचिडेपणा, राग येणे इत्यादी स्वभावदोष वादाला कारणीभूत होते, हे लक्षात आले. आधी मला वाटायचे, मला राग येत नाही. मी कोणत्याही प्रसंगात स्थिर राहू शकतो; पण तसे नसून मी देवद येथे असतांना साधकांमध्ये वावरतो, तेव्हा तेथे त्यांच्या गुणांमुळे माझ्या दोषांवर पांघरूण पडते. साधक मला सांभाळून घेतात. घरी आल्यावर तशी परिस्थिती नसल्यामुळे येथे माझ्या दोषांची तीव्रता लक्षात येते. त्यामुळे हिमालयात राहून साधना करण्यापेक्षा संसारात राहून साधना केल्याने लवकर मोक्षप्राप्ती होते, या वचनाची प्रचीती आली.
- श्री. संकेत डिंगरे, पनवेल (२५.१.२०१६)

चंदोसी (हरियाणा) येथील सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती लीलावती पांडेयआजी (वय ९० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी


श्रीमती लीलावती पांडेयआजी यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार
करतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सनातनच्या साधिका श्रीमती शकुंतला किंगर


साधकांनो, स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाच्या प्रयत्नांना वेग येण्यासाठी पुढील प्रयत्न तळमळीने करा अन् साधनेतील अडथळ्यांची तीव्रता अल्प होत असल्याचे अनुभवा !

      काही वेळा साधक एखादा स्वभावदोष अथवा अहंचा पैलू याचे निर्मूलन होण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करत असूनही त्याची तीव्रता उणावत नाही. त्यामुळे साधकांच्या मनात आपण कितीही प्रयत्न केले, तरी आपल्यातील अमुक दोष अथवा अहंचा पैलू अल्पच होत नाही, असे नकारात्मक विचार येेतात. अशा वेळी प्रक्रियेतील उत्साह टिकून रहावा आणि साधनेतील त्या अडथळ्याचे (दोष अथवा अहंचा पैलू याचे) समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १८,५७७ वाचकांचे शेष नूतनीकरण २९.२.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

 साधकांना सूचना
     नियतकालिक सनातन प्रभात म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव वृत्तपत्र ! या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्यात्माविषयीची ज्ञानतृष्णा भागवली जाते, तसेच राष्ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळते. अंतरंगात अंकुरलेल्या साधनारूपी बिजाचे वटवृक्षात रूपांतर करणारेे, तसेच अंतरातील हिंदुत्वाची मशाल पेटती ठेवणारे हे नियतकालिक सर्व वाचकांना नियमितपणे मिळणे आवश्यक आहे. असे असतांनाही काही राज्ये आणि जिल्हे यांमधील साधकांकडून या नियतकालिकांचे नूतनीकरण वेळेत होत नाही.

रामेश्‍वरम् येथील धनुष्यकोडीच्या परिसरात श्रीरामसेतूचा दगड मिळणे, हा दगड आम्हीच तुम्हाला मिळवून दिल्याचे आणि तेव्हापासूनच आम्ही तुमच्याबरोबर आहोत, याचीच ही साक्ष असल्याचे त्यानंतर झालेल्या नाडीवाचनातून महर्षींनी सांगणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
महर्षींची सर्वज्ञता आणि नाडीपट्टीची अद्भुतता !
     आम्ही साधारणतः फेब्रुवारी २०१५ मध्ये रामेश्‍वरम् येथे गेलो होतो. तेथील धनुष्यकोडी या स्थानावर समुद्राच्या वाळूमध्ये आम्हाला श्रीरामसेतूचा दगड मिळाला. ही आमच्यासाठी मोठी अनुभूती होती; कारण श्रीरामसेतूसंदर्भात वाद निर्माण झाल्यापासून आता त्या परिसरात कुणालाच विनाअनुमती जाऊ देत नाहीत. तुम्हाला केवळ धनुष्यकोडीच्या परिसरापर्यंतच जाता येते. सुदैवाने आम्हाला अनुमती मिळली. श्रीरामसेतूचा दगड त्या परिसरात मिळणे अत्यंत दुर्लभ आहे. समुद्रातून हा दगड त्या स्थानापर्यंत वहात येणे, हा तर केवळ दैवी योगायोगच आहे, असे त्या परिसरातील लोकांनीही आम्हाला बोलून दाखवले. ते म्हणाले, खरंच, तुमच्यावर श्रीरामाची कृपा असल्याने तुम्हाला समुद्राच्या या वाळूत हा दगड मिळाला.

साधेपणा, शिस्तबद्धता आणि सहजावस्था असलेले पू. डॉ. मुकुल गाडगीळ !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
     संत कसे असतात ?, त्यांचे वागणे, बोलणे कसे असते ?, त्यांचे मन कसे असते ?, ते रागावतात का ?, साधकांनी संतपद प्राप्त केल्यावर त्यांच्यात काय पालट झालेले असतात; म्हणून ते संत होतात ? असे अनेक प्रश्‍न मला पडत असत. सनातन संस्थेच्या माध्यमातून अनेक साधकांनी साधना करून आतापर्यंत संतपद प्राप्त केले आहे. प्रत्येक संतांचे वागणे, बोलणे निराळे असते; पण ध्येय मात्र एकच असते, ते म्हणजे गुरूंना, प.पू. डॉक्टरांना आवडेल असेच वागणे, त्यासाठी त्यांचे आज्ञापालन करणे आणि त्याकरता प.पू. डॉक्टरांचा आदर्श ठेवून त्यांचे अनुकरण करणे. केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे मला अनेक संतांचा सत्संग मिळाला. त्यांपैकी पू. गाडगीळकाकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्याचा मला साधनेत झालेला लाभ पुढे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
    भारतातील हिंदूंनाच नव्हे, तर जगातील मानवजातीला आधार वाटतो हिंदु धर्माचा ! त्यामुळे जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात. बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मद्रोही आणि साम्यवादी यांचे तत्त्वज्ञान शिकण्यासाठी भारतात कोणीही येत नाही; पण हेही त्यांच्या लक्षात येत नाही ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
सतत वर्तमानकाळात रहाणे आम्ही कर्मधर्माला मानत नाही. कर्म मागे,
तर धर्म आमच्या पुढे असतो. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो.
     भावार्थ : कर्म मागे म्हणजे भूतकाळातील असल्याने केलेल्या कर्माचा विचार करीत नाही. धर्म आमच्या पुढे असतो म्हणजे भविष्यकाळातील योग्य आचरण. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो म्हणजे सतत वर्तमानकाळात असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      मानवी जन्म पूर्वपुण्याईनेच प्राप्त होतो; म्हणून जीवनात सुविचाराची साथ ठेवून जन्माचे सार्थक करावे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

इसिसला रोखणार कसे ?

संपादकीय
    अलीकडे भारतात इसिसचा हस्तक सापडला नाही, असा दिवस जात नाही. अन्य माणसांना जणू जगण्याचा अधिकारच नाही, अशी जिहादी मानसिकता असलेले हे आतंकवादी नागरिकांना शक्य तितक्या क्रूर पद्धतीने मारून टाकतात आणि त्याचे चित्रीकरण जगाला दाखवतात. यात मुख्यत्वे इस्लामेतर व्यक्तींचा समावेश आहे. अशी ही अत्यंतिक क्रूर आणि अमानवी संघटना इराकमध्ये तिचे हातपाय पसरत असतांना आपल्याकडे त्याविषयीची वृत्ते प्रसिद्ध होत होती. त्या वेळी दैनिक सनातन प्रभातमधून इसिसच्या वृत्तांसमवेत इसिसारख्या आतंकवादी संघटनांच्या क्रूर कारवायांना सामोरे जाण्यासाठी भारतातील हिंदू सिद्ध आहेत का ? अशी टीप प्रसिद्ध होत होती. त्यामागे हिंदूंना त्यांच्या समोरील आगामी धोक्याविषयी सजग करण्याचा उद्देश होता. सध्या इसिसच्या आतंकवाद्यांच्या अटकसत्रावरून सनातनचा द्रष्टेपणा स्पष्ट होतो. शासनाने इसिसला रोखण्यासाठी तेव्हाच कठोरात कठोर पाऊले उचलली असती, तर भारतातील गल्लीबोळांत पसरलेल्या त्याच्या पिलावळींच्या मागे धावाधाव करण्याची वेळ आली नसती. तथापि असे झाले नाही. उलट आपले लोकप्रतिनिधी भारतीय मुसलमानांवर इसिसचा प्रभाव पडणार नाही, असे तेव्हा सांगत होते आणि प्रतिदिन भारतीय मुसलमान इसिसचे हस्तक म्हणून पकडले जात असतांना आताही तेच सांगत आहेत !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn