Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन

 वीर उमाजी नाईक यांचा आज बलीदानदिन (दिनांकानुसार)

आळते (जिल्हा कोल्हापूर) येथील भगवा झेंडा हटवण्यासाठी धर्मांधांकडून दंगल !

असहिष्णुतेचा कांगावा करणारे धर्मांधांच्या या कृत्यांविषयी ब्रही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
धर्मांधांची हिंदूंवर वारंवार होणारी आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूसंघटन हाच पर्याय !
  • धर्मांधांकडून हिंदु महिलांना मारहाण
  • वाहनांची नासधूस
  • पोलिसांची बघ्याची भूमिका
     आळते (तालुका हातकणंगले) - येथील शिवाजी चौकात गेल्या अनेक वर्षांपासून भगवा झेंडा फडकत आहे. हा झेंडा काढण्याच्या कारणारून धर्मांधांनी हिंदुत्ववाद्यांशी वाद घालून त्यांना मारहाण केली. या घटनेत एका हिंदु तरुणाचा पायाला गंभीर दुखापत झाली असून आणखी ३ हिंदू घायाळ झाले आहेत. मुसलमानांनी हिंदूंच्या घरात घुसून गज आणि काठ्या यांनी महिलांनाही मारहाण केली आहे, (धर्मांधांच्या या आक्रमणांना तोंड देण्यासाठी हिंदूंना आत्मरक्षणासाठी सिद्धता कराविशी वाटली, तर चूक ते काय ? - संपादक) तसेच रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड केली. (ही हानी या धर्मांधांकडून कोण भरून घेणार ? - संपादक) या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. गावात तणावाचे वातावरण आहे.

बांगलादेशी धर्मांधांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी लढणारे अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांच्या सहकारी यांवर पोलिसांनीच केले प्राणघातक आक्रमण !

गेल्या १५ दिवसांत अधिवक्ता घोष यांच्यावर झालेल्या आक्रमणाची तिसरी घटना !
बांगलादेशी हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांच्या विरोधात
केंद्र शासनाला कृती करावीशी का वाटत नाही ?
     ढाका - इस्लामी बांगलादेशमध्ये हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बांगलादेशच्या कानाकोपर्‍यातून जवळपास प्रतिदिन हिंदूंवर अत्याचार होत असल्याची वृत्ते वाचनात येतात. या अत्याचारांमध्ये पोलीसांचाही सहभाग असल्याचे अनेक वेळा दिसून आले. अशा वेळी धर्मांधांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी लढणारे अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांच्या सहकार्‍यांवर पोलिसांनीच प्राणघातक आक्रमण केल्याची घटना घडली आहे.
१. चितगांव जिल्ह्यातील निर्भही उपजिल्ह्यात सुमन कुमार डे या हिंदु व्यापार्‍याचा दगडांशी संबंधित (स्टोन मॅन्युफॅक्चरिंग) व्यवसाय आहे.
२. त्यांना काही दिवसांपूर्वी स्थानिक पोलिसांनी त्रास द्यायला आरंभ केला.

रा.स्व. संघाकडून महिलांना चौथर्‍यावरील बंदीचे समर्थन

शनिशिंगणापूर प्रकरण
      नवी देहली - ऑर्गनायझर हे नियतकालिक रा.स्व. संघाचे मुखपत्र म्हणूनच ओळखले जाते. या नियतकालिकात शनिशिंगणापूर येथे शनिमंदिराच्या चौथर्‍यावर जाऊन पूजा करण्याला महिलांना असलेल्या बंदीचे समर्थन करण्यात आले आहे.
     ऑर्गनायझरमध्ये म्हटले आहे की, ब्रिटिशांच्या काळात सुधारणावादी विचारवंतांनी शासनाच्या सामाजिक कायद्यांचे समर्थन केले होते; मात्र लोकमान्य टिळकांनी त्या कायद्यांचा विरोध केला होता. टिळकांचे म्हणणे होते की, संवादाच्या प्रक्रियेतूनच आमच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. शनिशिंगणापूरची परंपरा ४०० वर्षे जुनी आहे. धार्मिक प्रकरणांत महिलांच्या स्थानाविषयी चिंता व्यक्त केली जाऊ शकते; परंतु त्यासाठी आंदोलन करणार्‍यांकडून परंपरांना चुकीचे ठरवण्यासाठी देण्यात आलेले तर्क योग्य नाहीत.

भोजशाळेत वसंतपंचमीला दुपारी १ ते ३ या वेळेत मुसलमानांना नमाजपठणासाठी अनुमती !

केंद्रशासनाच्या पुरातत्व विभागाचा आदेश !
शासनाकडून धार (मध्यप्रदेश) येथील हिंदूंचा वारंवार विश्‍वासघात !
      धार (मध्यप्रदेश) - १२ फब्रुवारी या दिवशी वसंतपंचमीच्या निमित्तानेे भोजशाळेमध्ये पूजा आणि नमाजपठण हे दोन्ही करण्याचे आदेश पुरातत्व विभागाचे महासंचालक राकेश तिवारी यांनी दिले आहेत. यानुसार सूर्योदयापासून दुपारी १२ वाजेपर्यंत आणि दुपारी ३.३० पासून सूर्यास्तापर्यंत हिंदूंना पूजा करण्याची अनुमती देण्यात आली आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत मुसलमानांना नमाजपठणाची अनुमती असेल. पूजेच्या वेळी हिंदू केवळ काही फुले आणि अक्षताच घेऊन जाऊ शकतील. केवळ १२ फेब्रुवारी या दिवसासाठी लागू केलेला हा विशेष तात्कालीन आदेश आहे.
१. भोजशाळेमध्ये पूजा आणि नमाजपठण सुरळीत पद्धतीने व्हावे, यासाठी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
२. धार जिल्हा प्रशासनाने या यचिकेवर १ फेब्रुवारी या दिवशी जबाब दिला आहे.
३. भोजशाळेमध्ये पूजा आणि नमाजपठणाविषयी शासनाकडून जो आदेश दिला जाईल त्याचे पालन होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.
४. या प्रकरणामध्ये धार येथील रहिवाशांनी याचिका प्रविष्ट केली आहे.

अभिनेते अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला !

पाकिस्तानच्या या निर्णयाचा भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी
निषेध करणार नाहीत, हेही तितकेच खरे !
     नवी देहली - कराची येथे ५ फेब्रुवारीला होणार्‍या साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान शासनाने १८ जणांपैकी अभिनेते अनुपम खेर यांना वगळता इतर सर्वांना व्हिसा संमत केला आहे. (भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांवर ज्या प्रकारे अनुपम खेर शाब्दिक प्रहार करत आहेत, आमीर खान, शाहरूख खान यांचा ढोंगी सर्वधर्मसमभाव उघड करत आहेत, जिहादी आतंकवाद्यांनी केलेले काश्मिरी हिंदूंवरील अन्याय आणि अत्याचार जगासमोर मांडत आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर पाकच्या कृतीचे कुणालाच आश्‍चर्य वाटणार नाही ! या घटनेनंतर साहित्यिक पाकच्या या असहिष्णुतेवरून पुरस्कार परत करतील का, हे पहावे लागेल ! - संपादक) पाकिस्तानमधील अधिकार्‍यांनी अनुपम खेर यांनी व्हिसासाठी अर्जच केला नसल्याचे म्हटले आहे. अनुपम खेर यांना दुसर्‍यांदा पाकिस्तानने व्हिसा नाकारला आहे. मात्र या संदर्भात अनुपम खेर यांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला. खेर यांनी पाकिस्तान शासनाच्या कार्यालयाशी या संदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराची कागदपत्रे सादर केली.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी साहाय्य करण्याचे मुसलमान धर्मगुरूंना आवाहन !

     नवी देहली - भारतात इसिसच्या वाढत्या संकटाच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी २ फेब्रुवारीला त्यांच्या निवासस्थानी मुसलमान धर्मगुरूंची बैठक घेतली. या वेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते. तीन घंटे चाललेल्या या बैठकीत जिहादी आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी साहाय्य करण्याचे आवाहन करण्यात आले. (जिहादी आतंकवादाच्या विरोधात प्रत्येक मशिदीतून आणि मदरशांतून प्रबोधन चळवळ राबवण्याची अन् राष्ट्रभक्तीचे धडे देण्याची योजना केंद्रशासनाने आखावी, अशीच जनतेची मागणी आहे ! - संपादक)

सुरक्षेतील त्रुटींमुळे पंजाबमध्ये आतंकवादी आक्रमणे !

केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांची स्वीकृती
देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाल्यावरही सीमेवरील सुरक्षेतील
त्रुटींंमुळे आतंकवादी आक्रमण होणे लज्जास्पद !
     अमृतसर - सुरक्षेतील त्रुटींमुळे पंजाबमधील पठाणकोट आणि दीनानगर येथे आतंकवादी आक्रमण झाल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मान्य केले. ते दोन दिवसांच्या पंजाब दौर्‍यावर आले होते. या दौर्‍यात त्यांनी भारत-पाकिस्तान सीमेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि सीमेवरील त्रुटींकडे तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. आतंकवाद्यांच्या घुसखोरीविषयी बोलतांना रिजिजू म्हणाले, काही जण पंजाबमध्ये वर्ष १९८० च्या दशकासारखी अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु कोणत्याही परिस्थितीत येथे शांती कायम राखण्यात येईल. ज्या शेतकर्‍यांची शेती सीमेजवळ आहे, त्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल.

समीर भुजबळ यांना अटक केल्याच्या प्रकरणी भुजबळ समर्थकांकडून जाळपोळ !

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण
जनतेला लुटणार्‍या भ्रष्टाचार्‍यांवर भाजप शासनाने
कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
     मुंबई - महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी १ फेब्रुवारीला रात्री अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडीकडून) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना २ फेब्रुवारीला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. यावरील प्रतिक्रिया म्हणून भुजबळ समर्थकांनी नाशिक जिल्ह्यात आंदोलने, तसेच जाळपोळ करून घोषणाबाजी केली. (भ्रष्टाचार करणारे नेते आणि गैरवर्तन करणारे समर्थक जनतेला कधीतरी कायद्याचे राज्य देतील का ? - संपादक) ईडीने विचारलेल्या प्रश्‍नांना समाधानकारक उत्तर देण्यात समीर भुजबळ अपयशी ठरले. छगन भुजबळ यांच्या अटकेची शक्यताही आता वाढली आहे. छगन भुजबळ हे उपचारासाठी अमेरिकेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
     पूर्वी महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी समीर आणि पंकज भुजबळ यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आले होते. तरीही दोघे ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नाहीत.

इसिसचे प्रमुख लक्ष्य गोव्यातील पर्यटनस्थळे आणि महाराष्ट्रातील सैनिकांचे तळ ! - महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक

इसिससारख्या आतंकवादी संघटनांच्या क्रूर कारवायांना 
सामोरे जाण्यासाठी भारतातील हिंदू सिद्ध आहेत का ?
क्रूर आतंकवादाचे संकट आता दाराशी ! 
अशा क्रूर आतंकवाद्यांचा निःपात करण्याचे सामर्थ्य अन्वेषण यंत्रणांमध्ये आहे का ?
      मुंबई - द इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅन्ड अल्-श्याम (आयएस्) यांचे गोव्यातील पर्यटनस्थळे आणि महाराष्ट्रातील पुणे अन् मुंबई येथील प्रमुख सैनिकांचे संरक्षणतळ लक्ष्य होते, अशी धक्कादायक माहिती महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने उघड केली आहे. आतंकवाद्यांनी मडगाव (गोवा) येथे भाडेपट्टीवर घर घेतल्याचीही माहिती उघड झाली आहे. (आतंकवादी महत्त्वाच्या स्थळी प्रवेश मिळवतात आणि घरे भाड्याने घेऊन रहातात, तरीही आपल्या सुरक्षायंत्रणांना सुगावाही लागत नाही ! आतंकवाद्यांनी येथील सर्व यंत्रणा पोखरल्यावर जागी होणारी अशी ढिसाळ सुरक्षाव्यवस्था काय कामाची ? - संपादक) महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाला चौकशीअंती मिळालेल्या माहितीनुसार,
१. इंडियन मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेशी फारकत घेऊन इसिसला मिळालेला साफी आर्मार उपाख्य युसूफ देशातील युवकांना इसिसमध्ये भरती करण्याची प्रमुख भूमिका बजावत आहे.
२. युसूफने इसिसचा भारत विभागप्रमुख मुदाब्बीर शेख, त्याचा साहाय्यक खलीद अहमद अली नवाझुद्दीन उपाख्य रिझवान आणि त्यांचे साथीदार यांच्या साहाय्याने उपरोल्लेखित अनेक योजना आखल्या होत्या.
३. साहाय्यक खलीद याला सुरक्षित ठिकाणी रहाण्यासाठी घर मिळवण्याचे दायित्व देण्यात आले होते.

इसिसकडून शिरच्छेद करण्यात आलेल्यांमध्ये चार भारतीय जिहादी आतंकवादी !

   कैरो - इसिसने इराकमधील मोसूल शहरातून पळून जाणार्‍या आपल्याच वीस आतंकवाद्यांचा जाहीररित्या शिरच्छेद केला. त्यात चार भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. इसिसमध्ये आतापर्यंत २३ भारतीय सहभागी झालेले आहेत. यातील सहा जणांचा इराक आणि सिरियामध्ये विविध ठिकाणी मृत्यू झाला आहे. अद्याप १७ भारतीय नागरिक इसिसचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये कृतीशील आहेत. (जे कार्य भारतीय राज्यकर्ते करू शकत नाहीत, ते इसिस तत्परतेने करते ! - संपादक)

घुसखोरी करणार्‍या शरणार्थींना आवश्यकता वाटल्यास गोळ्या घाला ! - जर्मनीतील महिला नेत्या फ्राउके पेट्री यांचे आवाहन

५ कोटी बांगलादेशी घुसखोरांनी देश पोखरला असतांना भारतातील कोणताही 
राजकीय नेता असे म्हणण्याचे धारिष्ट्य दाखवत नाही, हे सत्य जाणा !
सिरियातून ग्रीसच्या दिशेने निघालेले विस्थापित. 
अवैधरित्या युरोपमध्ये प्रवेश करणारे हे विस्थापित 
युरोपची डोकेदुखी बनले आहेत !
     बर्लिन - जर्मनीतील यूरोस्केप्टिक ऑल्टरनेटिव फ्यूर डॉयचेलैंड (एएफ्डी) पक्षाच्या प्रमुख फ्राउके पेट्री यांनी मॅनहायमर मॉर्गन दैनिकाच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, पोलिसांना अवैध पद्धतीने ऑस्ट्रियामधून येणार्‍या शरणार्थींना जर्मनी घुसण्यापासून रोखले पाहिजे आणि आवश्यकता वाटल्यास त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. मला कधीही असे केलेले आवडणार नाही; मात्र अंतिम पर्याय म्हणून सैन्यबळाचा वापर करावा लागेल. पेट्री यांच्या या विधानावर देशातील साम्यवादी पक्षांनी आणि जर्मन पोलीस युनियन यांनी टीका केली. 
१. जर्मनीत शरणार्थींच्या स्थानांवर आक्रमण होण्याच्या घटनेत २०१४ च्या तुलनेत पाच पट वाढ झाली आहे. या स्थानांवर १ सहस्र ५ वेळा आक्रमणे झाली आहेत. 
२. दोनच दिवसांपूर्वी जर्मनीच्या चान्सलर अँजेेला मार्केल यांनी म्हटले होते की, सीरिया आणि इराकमधून येणारे बहुतेक शरणार्थी त्यांच्या देशातील युद्ध संपल्यावर परतणार आहेत.

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणार्‍या साधाकांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

मशिदी किंवा मदरसे यांची एखादी वीट पाडल्यास बाँबस्फोट करण्याची धमकी !

सोलापूर येथे दैनिक सुराज्यसह जिल्हाधिकारी,
महानगरपालिका आयुक्त यांना 'इसिस'च्या नावाने धमकीचे पत्र 
धर्मांधांच्या क्रूर आक्रमणांना सामोरे जाण्यास सोलापूर प्रशासन सिद्ध आहे का ? 
     सोलापूर, २ फेब्रुवारी - तुम्ही कुत्र्याच्या मृत्यूप्रमाणे मारले जाल. एकेकाला आम्ही जिवंत गाडू. तुमचा सर्वनाश होणार आहे. मशिदी किंवा मदरसे यांची एक वीट जरी पाडली, तरी आम्ही बाँबस्फोट करू. हे इसिसचे आव्हान आहे, अशा धमकीचे पत्र दैनिक सुराज्यसह जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांना इसिसच्या नावाने २७ जानेवारी या दिवशी आले आहे. जिल्ह्यात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ७ फेब्रुवारीपासून अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडण्याची मोहीम तीव्र करण्यात येत आहे. याच धर्तीवर हे पत्र आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. (अनधिकृत प्रार्थनास्थळांविषयी धर्मांध असे जागरूक असतात. किती हिंदू त्यांच्या मंदिरांविषयी जागृत असतात ? - संपादक) 

धर्मासाठी पोलादी पुरुष बनणे आवश्यक ! - महंत हरीगिरीजी

हरिद्वारचे महंत हरिगिरीजी यांचे बार्शी येथील धर्मजागृती सभेसाठी आशीर्वाद ! 
महंत हरिगिरीजींना धर्मसभेची विशेष स्मरणिका
भेट देतांना समितीचे श्री. विलास पुजारी, शेजारी श्री. अमित कदम

     तुळजापूर (जि. धाराशिव), २ फेब्रुवारी (वार्ता.) - 'धर्मासाठी पोलादी पुरुष बनणे आवश्यक आहे', असे परखड मार्गदर्शन हरिद्वारचे महंत हरिगिरीजी महाराज यांनी केले. रविवार, ३१ जानेवारी या दिवशी तुळजापूर येथील सोमवारगिरी मठामध्ये मठाधिपती महंत इच्छागिरी यांच्या दीक्षा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभासाठी अंातरराष्ट्रीय संरक्षक जुना आखाडा, मायादेवी मंदिर, हरिद्वार येथील महंत हरिगिरीजी आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विलास पुजारी यांनी महंत हरिगिरीजी यांची भेट घेऊन समितीच्या कार्याची माहिती दिली आणि धर्मसभेची स्मरणिका भेट दिली. या वेळी महंत हरिगिरीजी यांनी २० मार्चला तुळजापूर येथे होणार्‍या धर्मजागृती सभेसाठी आशीर्वाद दिले. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी ऋषिकेश येथील योगी अरविंदही उपस्थित होते. 

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना महिलांच्या समान वागणुकीच्या संदर्भात जाहीर आव्हान !

     महिलांना समान वागणूक या खुळाच्या नादी लागून हिंदूंच्या कुठल्याही धार्मिक स्थळी, मंदिरात, गाभार्‍यात महिलांना प्रवेश देण्याचे काहीच कारण नाही, हे सर्वच मंदिरांच्या विश्‍वस्तांनी लक्षात ठेवावे. असे खूळ डोक्यात ठेवून आग्रह धरणार्‍यांना मंदिर परिसरातून ग्रामस्थांनी हाकलून देण्याचा आदर्श श्री शनिशिंगणापूरच्या महिला ग्रामस्थांनी घालून देत आपले धर्मकर्तव्य बजावल्यासाठी सर्व हिंदूंच्या वतीने त्यांचे जाहीर अभिनंदन !
     हिंदु धर्माचा काडीचाही अभ्यास नसणार्‍यांनी यापुढे असे प्रताप करण्याचा उद्योग आरंभल्यास हिंदु धर्मियांकडून अशा तथाकथित मंडळींना खडसवण्याची व्यवस्था आता हिंदूंनाच करावी लागणार आहे. त्याविना असे प्रकार थांबणार नाहीत. अशा तथाकथित महिला किंवा इतर यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. हिंदु धर्मातील धार्मिक गोष्टींच्या संदर्भात ढवळाढवळ करण्याचे भलतेच उद्योग करणे सोडून द्या, अशी चेतावणी हिंदु धर्मियांच्या वतीने करण्यात येत आहे.
     मुख्यमंत्र्यांनीही अशांना थारा न देता हिंदु धर्मातील जाणकार, शास्त्र जाणणारे विद्वान, पंडित, शास्त्री, धर्माचार्य यांना विचारात घेऊनच अशा प्रकरणी निर्णय द्यावा.

सुरक्षेच्या कारणास्तव सिरियाच्या शरणार्थींना फिनलँड शरण नाही देणार !

     फिनलँड - उत्तर युरोपातील फिनलँडच्या पंतप्रधान जुहा सिपिला यांनी काही मासांपूर्वीच आपल्या नागरिकांना आवाहन केले होते की, सिरियातील लोकांची अवस्था आपली समजून त्यांना देशात रहाण्यासाठी सर्वप्रकारे साहाय्य करा !; परंतु आता सिपिला यांनीच घोषित केले आहे की, त्यांचा देश सुरक्षेच्या कारणांसाठी सिरियाच्या शरणार्थींना त्यांच्या देशात सध्या शरण देण्यास असमर्थ आहे.
     गेल्या वर्षी ३२ सहस्र लोकांनी फिनलँड सरकारकडे आश्रय घेतला होता. त्यांपैकी २० सहस्र लोकांना परत पाठवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. स्वीडन, नॉर्वे, डेनमार्कसारख्या उत्तर युरोपातील अन्य देशांनीही शरणार्थींच्या संदर्भात कठोर नियम बनवायला आरंभ केला आहे. सिरियाच्या शरणार्थींना सुविधा पुरवण्यासाठी जॉर्डनने युरोपकडे १ सहस्र ६०० कोटी रुपयांच्या आर्थिक साहाय्याची मागणी केली !

कुठलाही देश शरणार्थींना आश्रय देतांना स्वहित पहातो. जॉर्डनही तेच करत आहे ! 
शरणार्थींच्या संदर्भात भारतच उदार होतो, हे दुर्दैवी आहे ! 
     जॉर्डन - सिरियाचा शेजारी देश जॉर्डनने सिरियातील लाखो शरणार्थींना शरण दिली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार ९० लक्ष ५० सहस्र लोकसंख्या असलेल्या इवल्याशा जॉर्डनने आतापर्यंत १२ लक्ष ७० सहस्र शरणार्थींना शरण दिली आहे. परंतु यामुळे जॉर्डनला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावर जॉर्डनचे पंतप्रधान अब्दुल्ला एनसोर यांनी युरोपकडे मागणी केली आहे की, जॉर्डनला १ सहस्र ६०० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य केले गेले पाहिजे; यातून जनतेला शाळा, आरोग्य आणि अन्य सेवांच्या सुविधा उपलब्ध करून देता येतील. तसेच पुढील काही वर्षे दीड लाख शरणार्थींना नोकर्‍याही देता येणे शक्य होईल. परंतु जर आर्थिक साहाय्य मिळाले नाही, तर जॉर्डनचा समतोल बिघडू शकतो. अधिकाधिक शरणार्थींना जॉर्डनमध्येच थांबवण्यात यश आल्यास युरोपात होत असलेले त्यांचे स्थलांतर थांबवणे शक्य होईल. त्यामुळे जॉर्डनच्या मागणीकडे गांभीर्याने पहाणे युरोपच्या हिताचे आहे, असे म्हटले जात आहे.

ढगाळ वातावरण आणि मार्गातील अडथळे यांमुळे श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात किरणोत्सव झाला नाही !

     कोल्हापूर, २ फेब्रुवारी (वार्ता.) - ३१ जानेवारीला म्हणजे किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी मावळतीच्या सूर्यकिरणांनी श्री महालक्ष्मीला चरणस्पर्श केला होता. १ फेब्रुवारी या दिवशी ढगाळ वातावरणात सूर्यकिरणेच झाकोळली गेल्याने किरणोत्सव झाला नाही. किरणोत्सव मार्गातील अडथळा असलेल्या एका कापडाच्या दुकानाचा फलक काढण्यासाठी महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेने तो फलक काढलेला नाही. त्यामुळे भाविक संतप्त आहेत. किरणोत्सव पहाण्यासाठी गुजरातहून भाविक आले होते; मात्र तो न झाल्याने तेही अप्रसन्न झाले. 

विक्रोळी (मुंबई) येथे हिंदु कुटुंबाला त्रास देणार्‍या धर्मांधांना श्री शिवकार्य प्रतिष्ठानने समज दिली !

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात तत्परतेने संघटित 
होऊन कृती करणार्‍या श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे अभिनंदन ! 
     मुंबई - येथील एका झोपडपट्टीत रहाणारे श्री. बिल्लू मेहेरसिंग वाल्मिकी आणि श्री. संगीता बिल्लू वाल्मिकी या दांपत्याला तेथील धर्मांध क्षुल्लक कारणावरून त्रास देत होते. वाल्मिकी कुटुंब रहात असलेला भाग हिंदुबहुल असून तेथे केवळ ७ ते ८ झोपड्या मुसलमानांच्या आहेत. धर्मांधांनी त्यांच्या घरावर ४ ते ५ वेळा दगडफेक केली. त्यामुळे वाल्मिकी कुटुंबाला अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले. ते काही काळाने पुन्हा पहिल्या वस्तीत आले. त्यानंतर धर्मांधांनी वर्ष २०१५ मध्ये दिवाळीत त्यांच्या घराची जाळपोळ करण्याचाही ३-४ वेळा प्रयत्न केला. यात त्यांच्या घराची हानी झाली आहे. 

टपालाच्या तिकिटांवरील काँग्रेसची मक्तेदारी केंद्र शासनाकडून हद्दपार

आतापर्यंत काँग्रेसने गांधी आणि नेहरू घराण्याची नावे रस्ते, चौक, उद्याने, शासनाच्या 
विविध योजना यांना दिलेली असून ती हद्दपार करावीत आणि देशभक्त, महापुरुष अन्
क्रांतिकारक यांची नावे मोदी शासनाने द्यावीत, ही जनतेची अपेक्षा !
      संभाजीनगर - काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात कोणतीही शासकीय योजना असो अथवा टपालाची तिकिटे असो, यांवर गांधी कुटुंबातील कोणाचे तरी नाव देण्याचा पायंडाच होता. त्यातून काँग्रेसचीच मक्तेदारी दाखवण्याचा प्रघात रूढ झाला होता. काँग्रेसची ही मक्तेदारी आताच्या केंद्रशासनाने मोडीत काढून काँग्रेसचा प्रचार हद्दपार केला आहे. टपाल तिकिटांवर आता मोहनदास गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या छायाचित्रांऐवजी प्रथमच स्वामी विवेकानंद, दीनदयाळ उपाध्याय, हुतात्मा भगतसिंग, डॉ. होमी भाभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, सी.व्ही. रमण, मौलाना अबुल कलाम आझाद आदींची छायाचित्रेही दिसून येत आहेत.
      मागील ६० वर्षांपासून देशात काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे प्रत्येक शासकीय योजना आणि टपाल तिकिटे यांवर छायाचित्रांचा भडिमार झालेला होता.

विस्थापितांमध्ये विनापालक अल्पवयीन मुलांचा भरणा असल्याने युरोप त्रस्त

  • युरोपमध्ये विस्थापितांची समस्या ऐरणीवर
  • स्वीडनमध्ये आश्रयासाठी एकाच आठवड्यात ८ सहस्र विस्थापित 
  • धर्मांध विस्थापित वय अल्प दाखवून विनापालक मुलांच्या सवलती लाटतात !
     स्टॉकहोम - इराक, सिरिया आणि इतर आफ्रिकन देशांतील विस्थापितांची युरोपमध्ये येण्यासाठी रीघ लागली आहे. युरोपमधील कायदे मानवतेच्या दृष्टीकोनातून बनवले असल्याने या कायद्यातील पळवाटांचा अपलाभ घेण्यासाठी धर्मांध विस्थापित अनेक युक्त्या योजत आहेत. स्वीडनसारख्या जगातील सर्वाधिक मुक्त समजल्या जाणार्‍या देशात अल्पवयीन मुलांना अधिक सोयीसुविधा मिळतात, हे बघून अनेक विस्थापित धर्मांध तरुण असूनही विनापालक असलेले अल्पवयीन या श्रेणीचा दर्जा प्राप्त करून घेतात. एकदा आश्रय मिळाल्यावर त्यांचे खरे स्वरूप उघडकीस येते; मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ निघून गेलीली असते.

प्रयाग स्नान पुण्यकाल पर्वणीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात     कोल्हापूर, २ फेब्रुवारी (वार्ता.) - १५ जानेवारी ते १३ फेब्रुवारी अखेर प्रयाग स्नान पुण्यकाल पर्वणी होणार आहे. पुण्य-पर्वणीकालात प्रयाग पंचगंगा संगम तीर्थात स्नान करून भगवान श्री दत्तात्रेयांचे दर्शन मनोभावे घेतले जाते. या निमित्ताने १५ जानेवारीपासून पहाटे आरती, अभिषेक, भजने आणि महाप्रसाद असे विविध कार्यक्रम होत आहेत. १५ जानेवारीला सकाळी ९ ते ११.३० वाजेपर्यंत प्रयाग स्नानाला प्रारंभ करण्यात आला. तसेच पालखी उत्साह सोहळा पार पडला. प्रती गुरुवारी श्रींचा पालखी सोहळा असतो. प्रयाग पंचगंगा संगम तीर्थात स्नान केल्याने आध्यात्मिक लाभ होतो. याविषयी आशीर्वाद साक्षात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीने श्री कार्तिकस्वामी कथा माहात्म्यात दिला आहे. असा देवीचा आशीर्वाद आणि पुण्यप्राप्तीसाठी येथे मोठ्या संख्येने भाविक येत आहेत, अशी माहिती श्रीक्षेत्र प्रयाग पुजारी कु. रामगिरी दत्तात्रय गोसावी आणि श्री. ऋषिकेश गिरीगोसावी यांनी दिली.

आटके आणि जखिणवाडी (जिल्हा सातारा) येथे हिंदु धर्मजागृती सभा !

     सातारा, २ फेब्रुवारी (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कराड (जिल्हा सातारा) येथील आटके आणि जखिणवाडी या गावांमध्ये हिंदु धर्मजागृती सभा पार पडल्या. दोन्ही सभांचा वृत्तांत पुढे देत आहोत. 
आटके गाव 
     आटके या गावामध्ये पार पडलेल्या सभेमध्ये समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी आटके आणि पंचक्रोशीतील १०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कु. शिवानी शिंदे यांनी केले.

जगातील सर्व मुसलमान श्रीरामाचे वंशज ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

     नवी देहली - द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे की, जगातील सर्व मुसलमान भगवान श्रीरामाचे वंशज आहेत. मक्केत जेथे हज यात्रा केली जाते, तेथे शिवलिंग आहे. त्यामुळे तेथे हिंदु परंपरेनुसार केस काढून बिनशिलाईचे कपडे घालून धार्मिक कृती केल्या जातात. हिंदू चालीरितींप्रमाणेच तेथे कृती केल्या जातात.

युरोपमध्ये १० सहस्र शरणार्थी मुले बेपत्ता !

     बर्लिन - युरोपमध्ये शरणार्थींचा विरोध प्रतिदिन वाढत चालला आहे. युरोपोल या संस्थेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, युरोपात पोहोचल्यानंतर सुमारे १० सहस्र शरणार्थी मुले बेपत्ता झाली आहेत. युरोपीय देशांमध्ये नोंदणी झाल्यानंतर ती बेपत्ता झाली आहेत. युरोपोलने चेतावणी दिली आहे की, अशी मुले पुढे लैंगिक शोषणाला बळी पडतील किंवा गुन्हेगारी टोळ्यांचे लक्ष्य बनतील. ओडिशातील भुवनेश्‍वर, कटक आणि रायरपूर येथे हिंदूसंघटन बैठकांचे आयोजन

बैठकीमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन
करतांना श्री. रमेश शिंदे
    राऊरकेला - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ओडिशा राज्यातील रायरपूर, भुवनेश्‍वर आणि कटक येथे हिंदूसंघटन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. 
    रायरपूर येथे श्री. सुरेशकुमार चौधरी यांच्या घरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तरुणांना मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे म्हणाले, कोणताही राजकीय पक्ष धर्माचे रक्षण आणि संवर्धन करेल, अशा भ्रमात न रहाता प्रत्येक हिंदूने धर्माचरण करून धार्मिक बळाच्या आधारे संघटित होऊन राजकीय नेतृत्वावर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे. यानंतर धर्मावर होणारे आघात आणि धर्माचरणाच्या संदर्भातील ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश मालोंडकर यांनी धर्माचरणाचे महत्त्व याविषयी उपस्थितांना माहिती दिली.

नैसर्गिक शेतीचा स्वीकार केलेल्या एकाही शेतकर्‍याने आत्महत्या केली नाही ! - सुभाष पाळेकर, शेती मार्गदर्शक

नैसर्गिक शेतीचे तत्त्व राबवून केलेली
पालेभाज्यांची लागवड
     अमरावती - यंदाचे पद्मश्री पुरस्कारप्राप्त आणि शेतीविषयक मार्गदर्शक श्री. सुभाष पाळेकर यांनी शासनाच्या शेतीविषयक धोरणांवर कडक शब्दांत टीका केली आहे. आंध्रप्रदेशातील काकिनाडाच्या दौर्‍यावर असलेले पाळेकर म्हणाले,
१. आतापर्यंत ७ लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण ज्या देशभरातील ४० लाख शेतकर्‍यांनी झिरो बजेट शेतीचा (नैसर्गिक शेतीचा) स्वीकार केला आहे, त्यांपैकी एकाही शेतकर्‍याने आत्महत्या केलेली नाही. 

मठ-मंदिरांच्या सरकारीकरणाच्या संदर्भात जागृत होणे आवश्यक ! - रमेश शिंदे

ओडिशा राज्यातील खोरत (जिल्हा जगतसिंगपूर) येथे संतसंमेलनाचे आयोजन 
संतसंमेलनात बोलतांना समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे

     राऊरकेला - सर्व क्षेत्रात खाजगीकरण होत असतांना मठ-मंदिरांचे सरकारीकरण करण्यामागे शासनाचा काय हेतू आहे ? हे लक्षात घेऊन मठ-मंदिरांच्या रक्षणासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी जगतसिंगपूर जिल्ह्यातील खोरत येथील अखंडमणिमंडलेश्‍वर मंदिरात २९ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या संतसंमेलनात केले. या संतसंमेलनात सुमारे ४० पेक्षा अधिक संत-महंत उपस्थित होते. 

तथाकथित मानवतावादी आणि सर्वधर्मसमभाववाले हेच जिहादचे पोशिंदे ! - भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार

बोलतांना श्री. भाऊ तोरसेकर
     ठाणे, २ फेब्रुवारी (वार्ता.) - आजचे पुरोगामी म्हणजे विरोधाभास आहेत, दादरीमध्ये जमावाकडून अखलाख महम्मद मारला गेल्यावर केवढा कल्लोळ होतो, तर दुसरीकडे बंगालला मालद्यात दंगल होते, संपूर्ण पोलीस ठाणे जाळले जाते, आसपासच्या घरांना आगी लावल्या जातात; पण कुठे काही आवाज येत नाही, अवाक्षर येत नाही, तक्रार किंवा चर्चा होत नाही, याला म्हणतात पुरोगामी ! स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे पुरोगामी नसून भामटे आहेत. तथाकथित मानवतावादी आणि सर्वधर्मसमभाववाले हेेच खरे जिहादचे पोशिंदे आहेत आणि आपण त्यांना विचारवंत समजणे, हा आपला गुन्हा आहे. पुरोगामी विचारसरणीमध्ये वावरतांना हिंदुत्वाचा विचार सांगायला भीती वाटेल, तेव्हा तुम्हाला वेगळी गोळी घालून मारायची आवश्यकता लागत नाही. तुम्ही विचारानेच मारले गेलेले असता. हाच पुरोगामीत्वाचा वैचारिक आतंकवाद आज चर्चासत्रांतून निर्माण केला जात आहे, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले. येथे विचार व्यासपिठाच्या वतीने 'पुरोगामी दहशतवाद' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. 

फलक प्रसिद्धीकरता

स्वरक्षणासाठी हिंदूसंघटनाला पर्याय नाही !
     आळते (जिल्हा कोल्हापूर) येथील शिवाजी चौकात असलेला भगवा झेंडा काढण्यावरून धर्मांधांनी हिंदुत्ववाद्यांशी वाद घातला आणि त्यांना मारहाण केली. त्यांनी हिंदूंच्या घरात घुसून महिलांना मारहाण केली, तसेच रस्त्यावरील वाहनांची तोडफोडही केली. या घटनेत ४ हिंदु तरुण घायाळ झाले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Maharashtrake Kolhapur jile me Bhagwa zenda nikalne ko lekar dharmandhonka hinduonpar akraman; 4 hindu ghayal ! - Hinduo, yah anyay kab tak sahoge ?
जागो ! : महाराष्ट्र के कोल्हापुर जिले में भगवा झेंडा निकालने को लेकर धर्मांधों का हिन्दुआें पर आक्रमण; ४ हिन्दू घायल ! - हिन्दुओ, यह अन्याय कब तक सहोगे ?

अमरनाथ यात्रेकरूंना मिळणार अधिक सुविधा !

     श्रीनगर - श्री अमरनाथ यात्रा श्राईन बोर्डाने अधिक सुविधा देण्यासाठी खाजगी आस्थापनांना कंत्राटे देण्याचे काम चालू केले आहे. यात्रेच्या दोन्ही मार्गांवर शौचालय, न्हाणीघर आणि लंगर उभारण्याचे काम चालू झाले आहे. पहलगाम मार्गावरील नुनवान तळ ते अमरनाथ गुहेपर्यंत १२०० शौचालये, १२० न्हाणीघरे, तसेच ४६ लंगर उभारण्यात येणार आहेत. बालटाल मार्गावरील हॅलिपॅडजवळ दोन तात्पुरती उपाहारगृहे बनवण्यात येणार आहेत, तसेच तंबू लावण्यात येणार आहेत.राम मंदिराची स्थापना हे स्वप्न नसून ते एक लक्ष्य आहे ! - डॉ. प्रवीण तोगाडिया

     एत्मादपूर (मध्यप्रदेश) - विश्‍व हिंदू परिषदचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया म्हणाले की, अयोध्येत श्रीराम मंदिर बनवणे हे केवळ स्वप्न नसून ते एक लक्ष्य आहे. या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी विहिंपचे कार्य चालू आहे. तोगाडिया हे एत्मादपूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना बोलत होते.

राजस्थान शासकीय विश्‍वविद्यालयांमध्ये आता दीक्षांत समारोहाच्या वेळी विद्यार्थी परिधान करणार भारतीय पोषाख !

     जयपूर (राजस्थान) - राज्यातील शासकीय विश्‍वविद्यालयांच्या दीक्षांत समारोहाच्या वेळी ब्रिटीश काळापासून परिधान करण्यात येणार्‍या गाऊनऐवजी (झग्याऐवजी) आता विद्यार्थी राजस्थानी पद्धतीचा भारतीय पोषाख परिधान करून पदवी ग्रहण करतील, अशी माहिती राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी दिली. (राजस्थानच्या राज्यपालांनी घेतलेल्या या निर्णयासाठी त्यांचे अभिनंदन ! अशा प्रकारचा निर्णय आता सर्वच राज्यांनी घ्यायला हवा. गुलामगिरी दर्शवणारी ही पद्धत स्वातंत्र्यानंतरच झुगारून द्यायला हवी होती. - संपादक) राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली २९ जानेवारी या दिवशी राजभवनात पार पडलेल्या कुलपती समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राजस्थान हे पहिलेच राज्य आहे की जेथे दीक्षांत समारोहामध्ये विद्यार्थ्यी भारतीय पोषाख परिधान करून पदवी ग्रहण करतील.आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात सावरकर यांचे विचार आजही प्रसंगोचित ! - डॉ. अशोक मोडक, माजी आमदार, कोकण पदवीधर संघ

डॉ. अशोक मोडक
रत्नागिरी येथे झालेल्या २८ व्या स्वातंत्रवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी 'आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सावरकरांचे द्रष्टेपण' या परिसंवादात डॉ. अशोक मोडक यांनी मांडलेले विचार 
    स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार वर्तमानकाळातील घटनांच्या अध्ययनासाठी शंभर टक्के उपयुक्त आहेत, हा निष्कर्ष प्रथम मनःपटलावर टंकलिखित करायला हवा. 
        पहिली घटना इराक आणि सिरिया या दोन देशांमध्ये इस्लामी राज्य (इस्लामिक स्टेट) करून उभ्या राहिलेल्या खिलाफती राज्याच्या संदर्भात आहे. आज या राज्याच्या छत्रछायेखाली ९० लक्ष ते १ कोटी नागरिक रहात आहेत. सौदी अरेबिया, टर्की आदी वेगवेगळ्या देशांकडून त्यांना साहाय्य केले जात आहे आणि या संघटनेने संपूर्ण जगात आतंक उत्पन्न केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या आयुष्यात या भविष्यकाळाचा जणूकाही वेध घेतला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पूर्वी स्वामी विवेकानंद, दयानंद एवढेच नव्हे, तर नेमस्त पुढारी गोपाळकृष्ण गोखले यांनीसुद्धा भारतासमोर असलेल्या या मुसलमान किंवा इस्लामी संकटाचा उल्लेख केला होता.

घोटाळ्यांची मालिका थांबणार केव्हा ?

     सध्या देशामध्ये पर्ल्स घोटाळ्याची चर्चा चालू आहे. या घोटाळ्यामध्ये देशभरातील ५ कोटींहून अधिक लोकांनी पैसे गुंतवले असून त्यांचे ५५ सहस्र कोटी रुपये लुबाडले गेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील १ कोटी जनतेने पैसे गुंतवले आहेत. पर्ल्सच्या संचालकांनी हा लुटलेला पैसा देश-विदेशांमध्ये भूमी, बांधकाम व्यवसाय आणि उद्योगधंदे यांमध्ये गुंतवलेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आस्थापनाच्या सर्व संचालकांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. हा सर्व पैसा शोधण्यासाठी भारत सिक्युरिटीज् अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड (सेबी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या तीन संस्था कार्यरत आहेत.

संभ्रमित आणि दुतोंडी साहित्यिक !

    ८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले. त्यापूर्वी आणि नंतर अनेक वाद-प्रतिवाद, क्षमायाचना यामुळे ते वादग्रस्त ठरले. राजकीय, साहित्य, अभिनय क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीने चांगलेच प्रसिद्ध पावले. संमेलनातील विविध उपमंडपात विविध चर्चासत्रे आणि परिसंवाद चालू होते. 
     संमेलनाच्या शेवटच्या दिवशी वाङ्मयीन पुरस्काराचे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान यावर साहित्यिकांचा परिसंवाद चालू होता. प्रत्येक साहित्यिक त्यांचे मत जोमात मांडत होते. सगळ्यांच्या संवादाची एकच आत्मप्रौढी शैली होती. या परिसंवादामध्ये सहभागी झालेल्या लेखकांनी त्यांचे कर्तृत्व, भूषवलेले पद, कामाची पारदर्शकता, त्यांच्या कारकिर्दीत पुरस्कारप्राप्त पुस्तकांविषयी बाळगलेली निष्पक्षता या प्रकारच्या आत्मप्रौढीत चढाओढ लागलेली होती. अनेकांना विषयाच्या अनुषंगाने बोलण्यास प्रयत्न करावे लागत होते. त्यामुळे परिसंवादाच्या माध्यमातून लेखक विषय मांडत होते कि आत्मप्रौढी करत आहेत, असा प्रेक्षकांचा संभ्रम होत होता.

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदुजागृती डॉट ऑर्ग (Hindujagruti.org) या संकेतस्थळाच्या प्रसारकार्याचा डिसेंबर २०१५ मधील आढावा

१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या 
२. संकेतस्थळावरील राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयीच्या मोहिमा
२ अ. हिंदु धर्म, देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या विडंबनाच्या विरोधात संकेतस्थळावर राबवण्यात आलेली जनजागृती मोहीम 
१. स्वामी विवेकानंद यांनी सनातन धर्मावर आधारित हिंदु वैदिक अध्ययनासाठी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनच्या मठात नाताळ साजरा करण्याच्या विरोधात जनजागृती आणि निषेध मोहीम

भीतीची संगत

     एका माणसाला सारखी कशाची ना कशाची तरी भीती वाटायची. तो एका वैद्यांकडे (डॉक्टरांकडे) गेला आणि म्हणाला की, मला कधी भुताची, कधी प्रेताची, कधी मृत्यूची भीती वाटते. असा एखादा उपाय सांगा की, ज्यामुळे मी भयमुक्त होईन.
    वैद्यांनी त्याला गोळ्या दिल्या आणि त्या नियमित घ्यायला सांगितल्या. काही मासानंतर तो परत वैद्यांकडे आला. वैद्यांनी विचारले, गेली ना तुझी भीती ? आता नाही ना घाबरत कशाला ?
    तो माणूस म्हणाला, भूत, प्रेत, मृत्यू वगैरेची भीती नाहीशी झाली; पण एक भीती मात्र सारखी छळते. गोळ्या मिळाल्या नाही, तर काय ? याची मात्र निरंतर भीती असते. त्यावर काही उपाय ?
     माणसाचे एक भय गेले की, दुसरे त्याची जागा घेतच रहाते. भीतीची संगत माणूस कधी सोडत नाही.
(संदर्भ : साप्ताहिक जय हनुमान, ७.६.२०१४)
(भीतीची संगत सोडण्यासाठी सर्वशक्तीमान असलेल्या परमेश्‍वराची संगत धरणे आवश्यक आहे, हेच या कथेचे तात्पर्य आहे. - संपादक) 

आमचा देश चळवळीचे हिंदूंना आवाहन !

१. दोन प्रमुख कर्तव्ये : हिंदूंनो, यापुढे दोन प्रमुख कर्तव्ये लक्षात ठेवा. स्वतःचे दुय्यम नागरिकत्व संपवण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी एक देश, एक ध्वज, एक समान नागरी संहिता (कायदा) या संदेशाचा देशभर आपल्या शक्तीप्रमाणे आणि बुद्धीप्रमाणे प्रचार करा.
२. पॅन-इस्लामी तत्त्वज्ञानाचा अभ्यास आवश्यक : हिंदूंना त्यांच्या देशात राहून काफीर; म्हणजेच शत्रू ठरवणार्‍या आणि दिवसातून पाच वेळा हिंदूंचा नाश चिंतणार्‍या पाकिस्तानच्या पॅन-इस्लामी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करा अन् इतरांनाही तसे सांगा. हे हिंदूंचे कर्तव्य जगात हिंदुस्थानचे आणि हिंदूंचे जीवन निश्‍चिंत करेल.
- आमचा देश चळवळ (बेळगाव)
(संदर्भ : प्रज्वलंत, २६ जानेवारी विशेषांक, वर्ष २००२)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

रामनाथी आश्रमातील साधिका कु. सर्वमंगला मेदी यांनी काढलेले भावचित्र

सात्त्विक व्यक्तीमत्त्व लाभलेल्या आणि गुरूंचे आज्ञापालन करण्यासाठी धडपडणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मंजिरी आगवेकर !

सौ. मंजिरी आगवेकर
१. व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा
     मंजिरी कपड्यांच्या घड्या करणे, मांडणी लावणे, संगणकाचे पटल पुसणे या कृती व्यवस्थित आणि नीटनेटकेपणाने करते. तिची स्वभावदोष-निर्मूलन सारणी, तसेच तिने परिधान केलेले कपडे, केशरचना, अशी प्रत्येक कृती व्यवस्थित आणि नीटनेटकी असते.
२. सात्त्विक व्यक्तीमत्त्व
     मंजिरीचे व्यक्तीमत्त्व पूर्वीपासूनच सत्त्वप्रधान आहे. आहार, वागणे आणि बोलणे यांतूनही तिची सात्त्विकता दिसून येते. कपडे, वस्तू आदी घेतांना ती रंग, आकार, नक्षी यांचा सात्त्विकतेच्या दृष्टीने विचार करून विकत घेते. तिचे सौंदर्यही पुष्कळ सात्त्विक आहे. त्यामुळे सनातनच्या अनेक कलाकृतींसाठी तिचा मॉडेल म्हणून वापर केला आहे.

प्रांतीय हिंदु अधिवेशन आणि हिंदूसंघटन मेळावा यांमध्ये विविध जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून झालेल्या चुका

      हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूसंघटनासाठी विविध उपक्रम राबवले जातात. समाजमनात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्याचे महत्त्व बिंबवण्यासाठी घेण्यात आलेली प्रांतीय हिंदु अधिवेशने, तसेच हिंदुसंघटन मेळावे यांमध्ये कार्यकर्त्यांकडून झालेल्या चुका पुढे देत आहे.
१. आयोजन सेवेत झालेल्या चुका
१ अ. एका सभागृहाच्या मालकांनी त्यांचे सभागृह विनामूल्य देणार असल्याचे सांगितल्यानंतरही त्यांच्याकडे त्याविषयी पत्र मागितल्याने ते पुष्कळ दुखावले जाणे : कल्याण (ठाणे) येथील दोन धर्माभिमानी तेथे होणार्‍या हिंदु संघटन मेळाव्यासाठी सभागृह पहायला गेले होते. तेव्हा एका सभागृहाच्या मालकांनी स्वतःचे सभागृह विनामूल्य देणार असल्याचे सांगितल्यावर त्या धर्माभिमान्यांनी त्याविषयी समितीचे श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांना कळवले आणि मालकांना एक पत्र देण्याविषयी विचारले. तो विषय व्यवस्थित समजून न घेताच श्री. कुलकर्णी यांनी त्यासाठी अनुमती दिली. नंतर धर्माभिमान्यांनी सभागृहाच्या मालकांना तुम्ही सभागृह विनामूल्य देणार असल्याचे आम्हाला कागदावर लिहून द्या, असे सांगितलेे. त्यामुळे ते मालक दुखावले गेले.

सगुणातील आनंद घेण्यास आतुरलेल्या साधिकेने व्यक्त केलेली भावपूर्ण कृतज्ञता !

कु. अक्षता रेणके
प.पू. डॉक्टर,
      तुमच्या कृपेमुळे रामनाथी आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. देवाच्याच कृपेने माझ्या गुरुरूपी देवाला मधूनमधून पहाण्याची संधीसुद्धा मिळते, त्यासाठी देवा, तुझ्या चरणी किती कृतज्ञ राहू तेवढे थोडेच ! देवा, या अवर्णनीय आठवणी अन् मोलाचे क्षण तुझ्याकडे व्यक्त करण्याचे थोर भाग्यसुद्धा मला तुझ्याच कृपेने लाभले. देवा, कृतज्ञ आहे.
१. प.पू. डॉक्टरांचा एखादा अवयव 
दिसला, तरी त्यांना भेटल्यासारखे वाटणे
      आश्रमात येणारे भले ते साधक असोत वा जिज्ञासू किंवा हितचिंतक, प्रत्येक जण आश्रमदर्शनाच्या वेळी आवर्जून एक प्रश्‍न नक्की विचारतो, तो म्हणजे, परम पूज्य कुठे असतात ? त्यांना पहायला मिळेल का ? लांबून पहायला मिळाले तरी चालेल. देवा, हे ऐकून माझ्या मनामध्ये कृतज्ञतेविना कोणताच शब्द नसतो. मी कधी जान्हवीताईकडे (सौ. जान्हवी शिंदे) सेवेनिमित्त गेल्यावर तुम्ही दिसता. कधी कधी तुम्ही मागून दिसता, कधी डोक्याचा भाग आणि केस, तर कधी केवळ हात तर कधी चरण; पण तेवढेच पाहिले, तरी तुम्हाला भेटल्यासारखे होते.

साधकांनो, नियमितपणे प्रगतीची सूचना देऊन स्वतःविषयीची नकारात्मकता दूर लोटा आणि साधनेतील निखळ आनंद अनुभवा !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
      काही साधकांमध्ये नकारात्मकता, निराशा, न्यूनगंड, स्वतःला न्यून लेखणे आदी अहंचे पैलू तीव्र स्वरूपात असतात. त्यामुळे ते योग्य प्रकारे साधनेचे प्रयत्न करत असूनही तिच्यातील आनंद घेऊ शकत नाहीत. अशा साधकांनी प्रामुख्याने पुढील प्रयत्न करावा.
१. प्रगती होत असल्यासंदर्भात 
सूचना दिल्याने स्वतःविषयीची 
सकारात्मकता आणि आत्मविश्‍वास वाढणे
      साधकांनी नियमितपणे प्रगती होत असल्यासंदर्भात सूचना दिल्यास त्यांच्यातील सकारात्मकता आणि आत्मविश्‍वास वाढतो अन् पुढील प्रयत्न करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळते. निराशेचे प्रमाण अधिक असल्यास प्रगती होत असल्यासंदर्भात सूचना दिवसातून ५ वेळा, तर प्रमाण अल्प असल्यास केवळ एकदाच द्यावी. प्रत्येक वेळी केवळ एकदाच सूचना म्हणणे अपेक्षित आहे.

साधकांना सूचना

     महर्षींनी सांगितल्याप्रमाणे प्रतिदिन रात्री जेवणानंतर हळद आणि काळी मिरी (मिरपूड) घालून एक पेलाभर दूध पिणार असल्यास ते जेवणानंतर दीड घंट्याने प्या !    
      महर्षींनी सांगितल्याप्रमाणे घरी रहाणारे साधक प्रतिदिन रात्री जेवणानंतर हळद आणि काळी मिरी (मिरपूड) घालून एक पेलाभर दूध पिणार असल्यास त्यांनी ते जेवणानंतर लगेच न पिता दीड घंट्याने प्यावे. असे करणे आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी योग्य आहे.
     आवश्यकतेनुसार साखर, हळद आणि काळी मिरी घातलेले दूध तीर्थ म्हणून चमचाभरच पिणार असल्यास ते जेवणानंतर लगेच घेतल्यास काही हरकत नाही. हे दूध प्राशन करतांना ॐ निसर्गदेवो भव । आणि वेदम् प्रमाणम् । यांचा एक-आड-एक जप करावा.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (२.२.२०१६)

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना विज्ञानासंदर्भात सुचलेले एक सूत्र त्याच दिवशी प.पू. डॉक्टरांनीही सांगणे

१. पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेले सूत्र
      अध्यात्मात शोध लावण्यासारखे काही नाही, तर शोध घेण्यासारखेच सर्वकाही असल्याने अध्यात्म हे एक परिपूर्ण शास्त्र असणे : अध्यात्मात शोध लावण्यासारखे काही नाही, तर शोध घेण्यासारखेच सर्वकाही असल्याने अध्यात्म हे एक परिपूर्ण शास्त्र आहे, म्हणजेच ते विज्ञानाच्याही अनंत पटींनी पुढे आहे.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, बेंगळुरू, कर्नाटक. (१८.१२.२०१५, सकाळी ९.५३)

साधकांना सूचना

महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !
     या वर्षी ७ मार्च या दिवशी महाशिवरात्र आहे. सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त देवळांमध्ये, तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रबोधनासाठी लावण्याकरता बनवलेल्या प्रसारसहित्याच्या पुढील धारिका नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर ठेवण्यात आल्या आहेत.
१. शिवोपासनेच्या कृतींमागील अध्यात्मशास्त्र सांगणारे ए ५ या आकारातील पाठपोट हस्तपत्रक
२. २.२५ x ३.५ फूट आकारातील ३ फलक
३. ए २ या आकारातील ४ भित्तीपत्रके (पोस्टर)
वरील प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा.
 
 

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवलेली शिवसंहितेतील अक्षरे स्पष्ट दिसू लागणे

     काही दिवसांपूर्वी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवलेली शिवसंहितेतील अक्षरे कागदावर पेन्सिलने लिहिल्याप्रमाणे अस्पष्ट दिसत होती. गेल्या १५ दिवसांपासून ती पेनने लिहिल्याप्रमाणे अधिक स्पष्ट दिसायला लागली आहेत, असे जाणवते.
- सौ. पार्वती जनार्दन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०१६)

विज्ञान अध्यात्मापुढे किती थिटे आहे आणि अध्यात्माचीच कास धरणे का महत्त्वाचे आहे, हे महर्षींनी नाडीवाचनातून सोदाहरण स्पष्ट करणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. दिव्याच्या ज्योतीचे लक्ष नेहमीच आकाशातील देवाकडे असणे; परंतु आजकालच्या मानवाने विज्ञानाच्या साहाय्याने लावलेले दिवे मात्र छताला उलटे टांगल्याने त्यांचे लक्ष जमिनीकडे असणे, असे सर्व उलटच करणारे विज्ञान काय कामाचे ?, असे महर्षींनी कलियुगातील मानवाला विचारणे : विज्ञानाची करणी स्पष्ट करतांना महर्षि नाडीवाचनातून म्हणतात, बघा, आम्ही पृथ्वीवर ज्योतीरूपात लावलेल्या दिव्यांचे लक्ष नेहमी ईश्‍वराकडे असते (तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा यांच्या ज्योती नेहमी खालून वरच्या दिशेने असतात, म्हणजेच त्यांचे तोंड देवाकडे असते, असे महर्षींना म्हणायचे आहे.); परंतु आजकालच्या मानवाचे मात्र सर्व उलटच आहे. त्याने विज्ञानाच्या साहाय्याने लावलेल्या दिव्यांचे लक्ष मात्र देवाकडे नाही. विज्ञानाचे दिवे वरून खालच्या दिशेने पहात आहेत. हे सर्व उलटच नाही का ? (आजकालच्या मानवाने विज्ञानाच्या साहाय्याने जे विजेवर चालणारे दिवे आहेत, ते छताला टांगलेले असतात. म्हणजेच त्यांचे तोंड वरून खालच्या दिशेने असल्याने आजकालचे विज्ञान कसे उलटेच आहे, असे महर्षींनी येथे स्पष्ट केले आहे.)
परात्पर गुरु डॉ. आठवले
    ज्याला जो मार्ग प्रगतीसाठी आवश्यक आहे, तो त्याला आवडतो, उदा. ज्ञानयोगाची आवड असणार्‍याला भक्तीमार्ग आवडत नाही, तर भक्तीमार्गाची आवड असणार्‍याला ज्ञानयोग आवडत नाही.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.१.२०१६)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही
नाही. ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
     भावार्थ : हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया व ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कधी विश्‍वबुद्धीतून ज्ञान मिळते का ? विश्‍वबुद्धी असे काहीतरी आहे आणि विश्‍वबुद्धीतून ज्ञान मिळते, हे तरी त्यांना ठाऊक आहे का ? ठाऊक नसल्यानेच ते बालवयातील मुले बडबडतात, तसे बडबडतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुठलेही कर्म मनःपूर्वक करणे हितकारक !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     कर्म करतांना ते छोटे आहे का मोठेे, हे पहाणे महत्त्वाचे नसून प्राप्त कर्म मनःपूर्वक करणे हितकारक आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

परत एकदा आरक्षणाचा उद्रेक !

      आंध्रप्रदेश येथे कापू समाजाचा आरक्षणात समावेश व्हावा, या मागणीसाठी चालू असलेल्या आंदोलनाचा ३१ जानेवारी या दिवशी उद्रेक झाला. आंदोलनकर्त्यांनी रत्नांचल एक्स्प्रेसच्या आठ डब्यांना आग लावली आणि अनेक गाड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. यात समाधानाची गोष्ट एवढीच की, आंदोलनाचा अधिक भडका उडण्याच्या अगोदर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हस्तक्षेप केल्याने रात्री उशिरा आंदोलनकर्त्यांनी सध्या आंदोलन स्थगित करत आहोत, असे घोषित केले. शांतताप्रिय असलेल्या या समाजाची आंध्र येथील लोकसंख्या साधारणत: २० प्रतिशत आहे. आम्ही शेतकरी असल्याने आमच्या जातीलाही लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी त्यांची आग्रही मागणी आहे. चार मासांपूर्वीच गुजरात राज्यात पटेल समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी उग्र आंदोलन केले. राजस्थानात तर मधूनअधून हे आंदोलन गंभीर स्वरूप प्राप्त करते. महाराष्ट्रातही मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले.

जम्मू-काश्मीरच्या सत्तास्थापनेचा पेच !

संपादकीय
     जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांचे निधन होऊन दोन आठवडे उलटले, तरी जम्मू-काश्मीर येथे नवीन शासन स्थापन होऊ शकलेले नाही. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल वोरा यांनी दोन्ही पक्षांना सत्तास्थापनेसाठी २४ घंट्यांची समयमर्यादा दिली असून यात काहीतरी निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. एकीकडे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सत्ता मिळाल्याने भाजप सहजासहजी सत्ता स्थापनेची संधी गमावू इच्छित नाही. दुसरीकडे पीडीपीच्या सर्वेसर्वा आणि मुफ्ती महंमद सईद यांची मुलगी मेहबूबा यांनी मात्र भाजपला खेळवत ठेवत एखाद्या कसलेल्या अन् चाणाक्ष राजकारण्याप्रमाणे युती करण्यासाठी होय अथवा नाही, असे काहीच सांगितलेले नाही. गेल्या १० मासांत भाजपसमवेत सत्ता स्थापन करून विशेष काही साध्य झाले नाही, हे मेहबूबा यांचे विधान अप्रत्यरित्या भाजपवर त्यांना आता सत्तेसाठी युती हवी असेल, तर आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील, असेच सांगणारे आहे. विघटनवाद्यांशी चर्चा, ३७० कलमावर कायमस्वरूपी काहीही न बोलणे अशा काही मान्य न होण्यासारख्या अटी मेहबूबा या भाजपवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी हिंदुहिताचा बळी द्यावयाचा का ? असा पेच भाजपसमोर असून प्राधान्याने भाजपने हिंदुहितच डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घ्यावा, हीच हिंदूंची अपेक्षा असणार आहे !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn