Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

महालक्ष्मी किरणोत्सव समाप्त, कोल्हापूर(म्हणे) भारतातून हिंदु धर्माला हद्दपार करणार !

तमिळनाडू तौहीद जमात संघटनेचे फुत्कार !
देशात असहिष्णुता वाढत असल्याची ओरड करणारे आता कुठे गेले ? 
धर्मांधांचा उघड हैदोस म्हणजे सहिष्णुता आणि हिंदूंची न्याय्य 
मागणीसाठीची चळवळ म्हणजे असहिष्णुता, असे समीकरण आहे कि काय ?
     चेन्नई - तमिळनाडू तौहीद जमात नावाच्या जिहादी संघटनेने तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे ३१ जानेवारीला एका हिंदुविरोधी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिर्क ओजिप्पु मानाडु (म्हणजे मूर्तीपूजेला नष्ट करण्यासाठी संमेलन) नावाने आयोजित या कार्यक्रमाला लाखो धर्मांध उपस्थित होते. या कार्यक्रमात भारतातून हिंदु धर्माला हद्दपार करण्याची जिहादी घोषणाही करण्यात आली.
१. कार्यक्रमाच्या माध्यमातून संघटनेने मूर्तीपूजा, ज्योतिषशास्त्र, योग आणि हिंदूंच्या धार्मिक कृत्यांना इस्लामविरोधी मानून त्यांचा अंत करण्याची शपथ घेतली.
२. दर्ग्यात प्रार्थना करण्याच्या कृतीलाही इस्लामविरोधी मानून त्याला इस्लाममध्ये स्थान नसल्याचे घोषित करण्यात आले.
३. यामुळे दुखावलेल्या कोइम्बत्तूरच्या सुन्नत जमात फेडरेशनने आयोजकांच्या विरोधात तत्परतेने याचिका दाखल केली.

(म्हणे) आज सर्वांना सहिष्णु रहाण्याची आवश्यकता !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते बॉम्ब बनवून एकमेकांवर 
फेकत असतांना मुख्यमंत्री ममता (बानो) बॅनर्जी यांचे फुकाचे बोल !
     कोलकाता (बंगाल) - ३० जानेवारीला कोलकाता येथील नेताजी इंडोर स्टेडियममध्ये भारत सेवाश्रम संघाचा शताब्दी समारोह पार पडला. या वेळी अतिथीच्या रूपात उपस्थित बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी समारोहाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाला भारत सेवाश्रम संघाचे सहस्रो भक्त आणि समर्थक उपस्थित होते. बॅनर्जी त्यांच्या मार्गदर्शनात म्हणाल्या की,
१. कोणताच धर्म असहिष्णुता शिकवत नाही ! (जगभरात होणारा जिहादी आतंकवाद ज्या शिकवणीमुळे होत आहे ती त्यांची धर्मशिकवण आहे, याविषयी ममता बॅनर्जी का बोलत नाहीत ? - संपादक)
२. हिंदु धर्माने सर्व धर्म आणि धर्मियांचा आदर करण्याची शिकवण दिल्याने तो जागतिक धर्माच्या रूपात ओळखला जातो. आपण व्यापक व्हायला हवे. आज जगाला सहिष्णु रहाण्याची आवश्यकता आहे.

महिला शनीची पूजा करतील, तर त्यांना त्रासाव्यतिरिक्त काहीही मिळणार नाही ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

     प्रयाग (अलाहाबाद) - माघ मेळ्यानिमित्त येथे आलेले द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी भक्तांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे शनिपूजा करण्याच्या नावाखाली गोंधळ निर्माण करणारी महिला (तृप्ती देसाई) काँग्रेसकडून निवडणूक लढली आहे. निवडणूक हरल्यानंतर ती आम आदमी पक्षामध्ये सहभागी झाली. आता ती शनिपूजेवरून राजकारण करत आहे. जर महिला शनीची पूजा करतील, तर त्यांना त्रासाव्यतिरिक्त काहीही मिळणार नाही. दोन दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये धर्मपरीवर्तनाच्या कारणावरून ग्रामस्थांनी एका व्यक्तीला चोप दिला.

महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने नाही ! - पंकजा मुंडे, महिला आणि बालकल्याणमंत्री

पुरो(अधो)गामी महिला पंकजा मुंडे यांच्याकडून काही शिकतील का ?
     मुंबई - महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने नाही. शनिशिंगणापूर येथील मंदिरात हट्टाने जाणार्‍या महिलांनी समाजातील शांतता भंग करू नये. आतापर्यंत जातीभेदाची लढाई लढलो, आता ही स्त्री-पुरुष भेदाची लढाई कशासाठी ? हा विषय आपसात मिटवावा, असे वक्तव्य राज्याच्या महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी ३१ जानेवारी या दिवशी माध्यमांशी बोलतांना केले. सावता परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या वेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
     जलसिंचन प्रकल्पातील घोटाल्याविषयी पंकजा मुंडे म्हणाल्या, जलसिंचनासाठी सात सहस्र कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला; मात्र एकही धरण झाले नाही. या भ्रष्टाचारातून काही लोकांची घरे मात्र भरली.

बंगालच्या बीरभूममध्ये तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरातून ८० बॉम्ब जप्त

ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची ही सहिष्णुता म्हणायची का ?
सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे तृणमूल 
काँग्रेसवर बंदी घालण्याची मागणी का करत नाहीत ?
      बीरभूम - गेल्या काही दिवसांत बॉम्ब बनवतांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. तसेच तृणमूल कार्यकर्त्यांच्या गटांत झालेल्या हाणामारीत एकमेकांवर बॉम्ब फेकण्यातही आले होते. आता बीरभूम येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरातून तीन पिंप भरलेले ८० बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.

आजार बरे करण्याच्या नावाखाली धर्मांतर करणार्‍या आशीर्वाद प्रार्थना केंद्राला अखेर टाळे !

हिंदु संतांवर संघटितपणे एकाच वेळी अकारण चिखलफेक करणार्‍या
वृत्तवाहिन्या याविषयी चर्चासत्रे का आयोजित करत नाहीत ?
     घरवापसीविषयी जिवाच्या आकांताने हिंदु संघटनांवर टीका करणारे काँग्रेसवाले, धर्मनिरपेक्षवाले, पुरोगामी ख्रिस्त्यांच्या या धर्मांतराविषयी आणि अंधश्रद्धेविषयी गप्प का ? यातून त्यांची बेगडी धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामीत्व दिसून येते !      वसई - आजार बरे करण्याच्या नावाखाली धर्मांतर करणारे सॅबेस्टिअन मार्टिन यांच्या आशीर्वाद प्रार्थना केंद्राला पोलिसांनी अखेर टाळे ठोकले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. गेल्या ८ वर्षांपासून वसईमध्ये गरीब आणि भोळ्या हिंदूंना आजार बरे करण्याच्या नावाखाली फसवून सॅबेस्टिअन मार्टिन त्यांचे धर्मांतर करत आहेत.
     एका वाहिनीने या वृत्ताचा पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी अखेर ही कारवाई केली आहे. विष्णु कुडवे हे आशीर्वाद प्रार्थना केंद्राचे व्यवस्थापक आहेत.

दाभोलकर, कलबुर्गी आणि पानसरे यांच्या हत्यांसाठी वापरण्यात आलेल्या बंदुकीच्या गोळ्यांचे नमुने स्कॉटलंडला पाठवण्याची पानसरे कुटुंबियांच्या वकिलांची मागणी !

     मुंबई (वृत्तसंस्था) - कलबुर्गी, पानसरे आणि दाभोलकर यांच्या हत्यांमध्ये समानता आहे. एकसारख्याच गोळ्या तिघांवरही झाडण्यात आल्या होत्या, असा दावा कर्नाटक पोलिसांनी केला होता. त्यासाठी कर्नाटकमधील बंगळुरु फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाचा हवाला देण्यात आला होता. मात्र हा अहवाल आणि मुंबईतील कालिना येथील फॉरेन्सिक लॅबचा अहवाल यांत तफावत आढळून आली होती. हा मुद्दा उचलत आज पानसरे कुटुंबियांचे वकील अभय नेवगी यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. या तपासणीत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत म्हणून या हत्यांसाठी वापरण्यात आलेल्या गोळ्यांचे नमुने स्कॉटलंडच्या लॅबमध्ये पाठवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला द्यावेत, अशी मागणी नेवगी यांनी न्यायालयात केली.

एक महिलाही परिवाराची कर्ता होऊ शकते ! - देहली उच्च न्यायालयाचा निर्णय

      नवी देहली - देहली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नाजमी वजीरी यांनी एका याचिकेवर सुनावणी करतांना निर्णय दिला की, हिंदु संस्कृती आणि परंपरा यांनुसार पुरुषांनाच परिवारामध्ये कर्ता मानण्यात आले आहे. जर सर्वांत आधी जन्माला येण्याने मुलगा घरात कर्ता होऊ शकतो, तर त्याच न्यायाने मुलगीही कर्ता होऊ शकते. सध्या महिला देशातील सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत असतांना आतापर्यंत असे का करण्यात आले नाही ?

युद्धातून पळणार्‍या आपल्याच २० आतंकवाद्यांचा इसिसने केला शिरच्छेद !

      कैरो - मोसूल येथे युद्धातून पळणार्‍या आपल्याच २० आतंकवाद्यांचा पाठलाग करून इसिसने पकडले. त्यांना शरीया न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने त्वरित त्यांचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिल्यावर त्याची त्वरित अंमलबजावणी करत जाहीरपणे सहस्रों लोकांसमोर शिरच्छेद केला. काहींचे हातपाय बांधून त्यांचे चेहरे झाकून फासावर लटकवले. त्यानंतर त्यांना पेटवून दिले. (कुठे युद्धातून पळणार्‍यांचा त्वरित शिरच्छेद करणारा इसिस, तर कुठे जिहादी आतंकवाद्यांना पोसणारा, इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकवणार्‍यांना पकडू न शकणारा आणि देशद्रोह्यांना कठोर दंड न देणारा भारत ! - संपादक) एका चलचित्रद्वारे (व्हीडिओद्वारे) इसिसने ही माहिती दिली आहे. हे चलचित्र फ्रेंच भाषेत आहे.

सीरियामध्ये शिया पंथियांच्या दर्ग्याजवळील बॉम्बस्फोटांत ७१ जणांचा मृत्यू !

     बैरुट - सीरियाची राजधानी दमिश्क येथून काही अंतरावरील शिया पंथियांच्या सैयदा जैनब दर्ग्याजवळ झालेल्या दोन बॉम्बस्फोटांत ७१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. इस्लामिक स्टेटने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. पहिला स्फोट एका चारचाकी वाहनात, तर दुसरा स्फोट आत्मघाती आतंकवाद्यांने स्वतःला उडवून घेऊन केला.

सीरियात मारला गेला भारतीय वंशाचा आतंकवादी !

     मेलबर्न - ऑस्ट्रेलियामध्ये इसिससाठी युवकांची भरती करणारा भारतीय वंशाचा फिजीचा नागरिक नील प्रकाश सीरियात ठार झाला आहे. प्रकाश अबु खालिद अल-कंबोडी नावाने ओळखला जायचा. दैनिक हेराल्ड सनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार मेलबर्नमध्ये जन्मलेल्या नील प्रकाशच्या मृत्युची माहिती इसिसच्या एका आतंकवाद्याने टेलीग्राम अ‍ॅपवर प्रसारित केली आहे.

माता सीतेचा त्याग केला; म्हणून भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या विरोधात करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळली !

न्यायालयाने केवळ याचिका फेटाळून न लावता न्यायालयाचा वेळ
वाया घालवणार्‍यांना दंड केला पाहिजे, असेच जनतेला वाटते !
     गोरखपूर - त्रेतायुगात भगवान श्रीरामाने एका परिटाच्या टीकेवरून पत्नी सीतेचा त्याग केला. यावरून बिहारच्या सीतामढी येथील डुमरी कला गावातील अधिवक्ता ठाकूर चंदन सिंह यांनी मुख्य दंडाधिकारी न्यायालयात भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्याच्या आज झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायाधिशांनी याचिकेला निराधार ठरवत ती फेटाळून लावली. तत्पूर्वी न्यायाधिशांनी विचारले की, त्रेतायुगातील घटनेविषयी कोणाला पकडणार ? यासाठी कोण साक्ष देणार ? तुम्ही याचिकेत भगवान श्रीरामांनी माता सीतेला कधी घरातून काढले होते ती दिनांक नाही सांगितली, असे प्रश्‍न विचारले.

मुलांना छत्रपती शिवाजी महाराज, राणी पद्मिनी आणि झाशीची राणी यांचा इतिहास शिकवा ! - राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. योगेश महाराज साळेगावकर

हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून नाशिककरांमध्ये चेतवले गेले धर्मतेजाचे स्फुल्लिंग ! 
दीपप्रज्वलन करतांना डावीकडून पू. (कु.) स्वाती खाडये,
श्री. सुनील घनवट आणि ह.भ.प. योगेश महाराज साळेगावकर

     नाशिक, १ फेब्रुवारी (वार्ता.) - आज सर्वत्र चुकीचा इतिहास शिकवून मुलांना खर्‍या इतिहासापासून हेतुपुरस्सर दूर ठेवले जात आहे. सर्वत्र आतंकवादही वाढलेला आहे. त्या विरोधात लढण्यासाठी मुलांना शौर्याचे शिक्षण द्या. जन्मदात्या आईसह मातृभूमीरूपी आई आणि हिंदु धर्मरूपी वडीलही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, राणी पद्मिनी, झाशीची राणी यांचा इतिहास मुलांना शिकवून त्यांना मनाने कणखर करा. हा सत्य इतिहास शिकवल्यासच हिंदु मुली लव्ह जिहादपासून वाचतील, असे प्रतिपादन राष्ट्र्रीय कीर्तनकार ह.भ.प. योगेश महाराज साळेगावकर यांनी केले. ते येथे ३१ जानेवारी या दिवशी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या पू. (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते. या सभेला नाशिक शहर, जिल्हा, तसेच आजूबाजूच्या गावांतील धर्माभिमानी उपस्थित होते. 

युवा सेनेच्या वतीने खराब रस्त्यांच्या विरोधात आंदोलन !

कुपवाड येथे आंदोलन करतांना युवासेनेचे कार्यकर्ते
     कुपवाड (सांगली) - कुपवाड शहरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या युवासेनेचे शहरप्रमुख श्री. सुरेश साखळकर आणि श्री. सूरज कासलीकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन घेण्यात आले. या प्रसंगी जिल्हाप्रमुख श्री. शंभोराज काटकर, सर्वश्री अजिंक्य पाटील, अनिल शेटे, संतोष पाटील, रूपेश मोकाशी यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.आमच्या हिटलिस्टवर इसिस ! - पारस राजपूत

कात्रज (पुणे) येथे हिंदु धर्मजागृती सभा
जिहादी आतंकवाद गाडून टाकून हिंदु राष्ट्र स्थापना करण्याची धर्मप्रेमींची सिंहगर्जना 
श्री पारस राजपूत
    पुणे, १ फेब्रुवारी (वार्ता.) - इसिस ने प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये भारताला खुरासान या नावाने दाखवण्यात आले आहे; मात्र इसिसचे आतंकवादी हे विसरले आहेत की, या भारतभूमीने जगज्जेत्या सिंकदरलाही पराजित केले. ही भारतभूमी नपुंसकांची नसून वीरांची आहे. जर इसिसच्या हिटलिस्टवर भारत असेल, तर त्यांनीही हे लक्षात घ्यावे की, ते आमच्या हिटलिस्टवर आहेत. आम्ही त्यांना आमची शक्ती दाखवून देऊ. कुठल्याही परिस्थितीत आम्ही भारतभूमी इस्लामिक राजवटीखाली येऊ देणार नाही, अशी खणखणीत चेतावणी इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट या संकेतस्थळाचे संपादक श्री. पारस राजपूत यांनी दिली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील कै. हनुमंत थोरवे विद्यालयाच्या पटांगणावर ३१ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या सभेला ३ सहस्र ५०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थिती होते.

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणार्‍या साधाकांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने कोल्हापूर शहरातून भव्य वाहन फेरी !

हिंदु धर्मजागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन 
धर्मजागृती सभेच्या निमित्ताने शहरातून अशी भव्य वाहन फेरी काढण्यात आली.

     कोल्हापूर, १ फेब्रुवारी (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुवार, ४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता राजारामपुरीतील लकी बाजाराशेजारी असलेल्या महापालिका शाळा क्रमांक ९ च्या मैदानावर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने प्रचार आणि प्रसारासाठी १ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १० वाजता सभेच्या ठिकाणापासून भव्य वाहन फेरी काढण्यात आली. फेरीच्या प्रारंभी भगव्या धर्मध्वजाचे पूजन बांधकाम व्यावसायिक श्री. भैय्या शेटके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पुरोहित श्री. आण्णी गेरी यांनी मंत्रपठण केले. या फेरीत १२५ दुचाकी आणि ३ चारचाकी वाहने सहभागी झाली होती. शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या या फेरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फेरी काढतांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रथमपासून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फेरी चालू असतांना ध्वनीक्षेपकावर उद्घोषणा करून सर्वांना ४ फेब्रुवारी या दिवशी येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आदर्शांचे आचरण झाल्यास अनेक प्रश्‍न सुटतील ! - विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नावर सरसंघचालकांचे उत्तर

      पुणे- आता राम मंदिर उभारलेले नाही, तरी गरिबांच्या ताटात जेवण येणार आहे का ? मंदिर हे एक आदर्श आहे. आदर्शांचे आचरण झाल्यास अनेक प्रश्‍न सुटतील. त्यामुळे राम मंदिर उभारले जाणे महत्त्वाचे आहे. प्रभु श्रीराम हे भारतीय संस्कृतीतील आदर्श पुरुष असून त्यांची प्रतिष्ठापना व्हायला हवी. प्रश्‍न केवळ मंदिर बांधण्याचा नाही. देशाच्या संस्कृतीतील आदर्श पुरुषांची स्मारके उभी रहायला हवीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी केले. राम मंदिर उभे केल्यावर गरिबांच्या ताटात पोळी येणार का ?, असा प्रश्‍न एका विद्यार्थ्याने माईर्स एमआयटीच्या वतीने आयोजित भारतीय छात्र संसदेत त्यांना केला. त्याला उत्तर देतांना श्री. भागवत बोलत होते.
     कार्यक्रमात संस्कृती, राज्यघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता या विषयावर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.

गल्लीबोळात चालू असलेल्या उच्छादावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हेच उत्तर ! - अनुप केणी

अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने प्रांतिक आणि जाहीर सभा  

कार्यक्रमप्रसंगी आमदार श्री. सुधीर गाडगीळ (उजवीकडून चौथे) यांसह हिंदु महासभेचे कार्यकर्ते

     सांगली, १ फेब्रुवारी (वार्ता.) - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण अत्यावश्यक आहे. हा देश स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर चालला असता, तर तो कितीतरी पुढे गेला असता. आज आपण विकासाच्या चर्चेत गुंग आहोत; मात्र गल्लीबोळात चालू असलेल्या उच्छादावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हेच उत्तर आहे, असे परखड मत अखिल भारत हिंदु महासभेचे राज्य अध्यक्ष श्री. अनुप केणी यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनास ५० वर्षे पूर्ण होत असल्याने हिंदु महासभेच्या वतीने राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सांगलीत क्रांतीवीर बाबाराव सावरकर स्मृती प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

अविभक्त हिंदु कुटुंबात ज्येष्ठ मुलगी ही कर्ता होऊ शकते, या निर्णयाविषयी धर्मशास्त्र काय सांगते ?

     देहली उच्च न्यायालयाने एका प्रकरणाविषयी निकाल देतांना अविभक्त हिंदु कुटुंबातील ज्येष्ठ मुलगी ही त्या कुटुंबाची आणि त्याच्या कुटुंब व्यवसायाची कर्ता होऊ शकते, असा निवाडा दिला आहे. याविषयी धर्मशास्त्रीय दृष्टीकोन पुढे दिला आहे.
१. मनुस्मृति मुलीचा वारसा-अधिकार मान्य करते !
मनुस्मृतीच्या ९ व्या अध्यायामधील पुढील श्‍लोक वरील आधार आहेत. 
१ अ. श्‍लोक ११८
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक् ।
स्वात् स्वादंशाच्चतुर्भागं पतिता: स्युरदित्सव: ॥
अर्थ : वडिलोपार्जित संपत्तीमधील स्वतःच्या भागातील चौथा भाग बहिणीला देणे, हे प्रत्येक भावाचे कर्तव्य आहे. त्याचे पालन न करणारा भाऊ पतित मानला जातो.
१ आ. श्‍लोक १३०
यथैवात्मा तथा पुत्र: पुत्रेण दुहिता समा ।
तस्यामात्मनि तिष्ठन्त्यां कथमन्यो धनं हरेत् ॥
अर्थ : जसा आपला आत्मा तसाच आपला मुलगा होय. मुलगा आणि मुलगी समान आहेत.

सोलापूर जिल्हा शासकीय अधिवक्तापदी श्री. संतोष न्हावकर !

     सोलापूर - सोलापूर जिल्हा शासकीय अधिवक्तापदी श्री. संतोष न्हावकर यांची शासनाच्या विधी आणि न्याय खात्याने २ वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. सोलापूर न्यायालयीन इतिहासात अल्प वयात पदावर नियुक्त होणारे न्हावकर हे प्रथमच अधिवक्ता आहेत. १९९९ पासून त्यांनी अधिवक्ता व्यवसायाला प्रारंभ केला. ज्येष्ठ अधिवक्त्यांंसमवेत उमेदवारी केल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे वकिली व्यवसाय समर्थपणे पेलतांना अनेक दिवाणी आणि फौजदारी खटले यशस्वीपणे हाताळले.
     भाजप, शिवसेना या राजकीय पक्षांसह रिलायन्स, एच्डीएफ्सीसह काही बँकांचे कायदेविषयक सल्लागार म्हणून काम पाहिलेले आहे. सोलापूर बार असोसिएशनचे ते सचिव आणि उपाध्यक्षपद होते. विधीगंध सेवा संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.
     इचलकरंजी - येथील नगरपालिकेतील कर विभागातील अधिकारी धर्मांध राजू अहमद मुल्ला याला दीड सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली. ३० जानेवारीला ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. गेल्या काही मासांमध्ये नगरपालिकेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेली ही तिसरी कारवाई आहे. मुल्ला याच्या विरोधात विश्‍वनाथ लोटे (रा. लिगाडे मळा) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

६० सहस्र रुपयांची लाच घेतांना सोलापूर येथे तलाठीला अटक !

     सोलापूर - भूमीच्या फेरफारला नोंद घेऊन ७/१२ उतारा देण्यासाठी ३ लक्ष रुपयांच्या लाचेची मागणी करून ६० सहस्र रुपये स्वीकारणार्‍या देगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील तलाठी विजय विजापुरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगभवन परिसरात अटक केली. याविषयी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट झाला आहे.
     तक्रारदारांच्या आत्यांनी मृत्युपूर्वी त्यांच्या मालकीच्या देगाव येथील शेती तक्रारदाराच्या नावे करण्याविषयी मृत्युपत्र केले होते. त्याप्रमाणे फेरफारला नाव लावण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे गावकामगार तलाठी विजापुरे यांनी ३ लक्ष रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २ लक्ष रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली. त्यानुसार पथकाने वरील कारवाई केली.

समर्थ रामदास्वामींच्या पादुकांचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन !

समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुका 
१. समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुकांचे पूजन करतांना श्री. संदीप सकपाळ 
२. पादुकांच्या आगमनप्रसंगी आश्रमात
लिहिण्यात आलेला स्वागताचा फलक
     देवद (पनवेल), १ फेब्रुवारी (वार्ता.) - समर्थ रामदास्वामींच्या पादुकांचे येथील सनातनच्या आश्रमात १ फेब्रुवारी या दिवशी शुभागमन झाले. आश्रमातील प.पू. पांडे महाराज, सनातनचे संत, तसेच साधक यांनी पुष्प अर्पून पादुकांच्या दर्शनाचा भावपूर्ण लाभ घेतला. या वेळी सज्जनगड येथील श्री रामदासस्वामी संस्थानचे सेवेकरी उपस्थित होते. या पादुका समर्थ रामदासस्वामी यांनी त्यांच्या शिष्या वेणास्वामी यांना दिल्या होत्या. पादुकांचे आश्रमात आगमन झाल्यावर शंखनाद करण्यात आला. पादुकांचे पूजन आश्रमातील साधक श्री. संदीप सकपाळ यांनी केले. सेवेकर्‍यांना हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर यांनी आश्रमात चालणार्‍या सेवांविषयी अवगत केले, तसेच सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याविषयी माहिती दिली. 


पुणे येथे गोमांस नेणारा ट्रक आणि टेम्पो गोरक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला

शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी !
      पुणे - बारामती येथून मुंबई येथे १२ गायींची हत्या करून त्यांचे ७.५ टन मांस एका ट्रक आणि टेम्पो यांमधून नेत असल्याची माहिती गोरक्षक कार्यकर्ते श्री. शिवशंकर स्वामी यांना मिळाली. त्यानुसार गोरक्षक कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग करून तो ट्रक आणि टेम्पो पोलिसांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी सिंहगड आणि वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक फिरोज शेख आणि दादा खंडागळे यांना अटक केली आहे.
१. गोरक्षक कार्यकर्ते शिवशंकर स्वामी यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ती माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना दिली; परंतु पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. (अशा पोलिसांवर पोलीस प्रशासन कोणती कारवाई करणार आहे ? - संपादक)
२. गोरक्षकांनी ती वाहने पुण्याच्या हद्दीमध्ये नवले पुलाखाली आल्यानंतर अडवली.

शनिदर्शनाची खोटी लालसा दाखवून एका गावातून आणल्या ट्रक भरून महिला !

तृप्ती देसाई यांचा खोटारडेपणा उघड
     कोल्हापूर - तृप्ती देसाई यांनी केलेले आंदोलन हे केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर केल्याचे उघड होत आहे. तृप्ती देसाई यांनी त्या वेळी ५०० महिलांना घेऊन आल्याचा दावा केला होता. पाठिंब्यासाठी आणलेल्या या महिलांना कशा प्रकारे आणले होते याचे एक उदाहरण नुकतेच पुढे आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावातील सुमारे ५० हून अधिक महिलांना तुम्हाला शनिदर्शन घडवतो. तुमची जाण्याची-येण्याची-जेवणाची व्यवस्था करण्यात येईल. तुम्ही केवळ यायचे, असे खोटे सांगून शनिशिंगणापूर येथे नेण्यात आले होते.

पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाचा बँकेवर दरोडा !

दरोडेखोर नेते असणार्‍या या पक्षाने देश न लुटला तरच नवल ! 
     पनवेल - पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाबळ तालुका अध्यक्षानेच बँकेवर दरोडा घातल्याची घटना घडली आहे. वासुदेव पाटील असे या तालुका अध्यक्षाचे नाव असून अटक करण्यात आलेल्या चोरट्यांनी पाटील हाच त्यांचा मोहरक्या असल्याचे पोलिसांसमोर सांगितले आहे. 

फलक प्रसिद्धीकरता

हिंदु धर्मावर प्रतिबंध लादण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
     तमिळनाडू तौहीद जमात या संघटनेकडून तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात मूर्तीपूजा, ज्योतिषशास्त्र, योग आदींना इस्लामविरोधी मानून त्यांचा अंत करण्याची शपथ घेण्यात आली, तसेच कार्यक्रमाला उपस्थित लक्षावधी धर्मांधांनी हिंदु धर्मावर प्रतिबंध लादण्याची घोषणा केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Tamilnadume Tamilnadu Thowheed Jamathne Bharatme Hindu Dharmapar pabandi laganeki ghoshna ki !
Hinduonko asahishnu kahanewale ab ise kya kahenge ?

जागो ! : तमिळनाडू में तमिळनाडू तौहीद जमातने भारत में हिन्दू धर्म पर पाबंदी लगाने की घोषणा की !
हिन्दुआें को असहिष्णु कहनेवाले अब इसे क्या कहेंगे ?

(म्हणे) 'पॅरिसपेक्षाही भयंकर आक्रमणे करू !'

इसिसची ब्रिटनला धमकी 
     लंडन - गेल्या महिन्यात ब्रिटीश संसदेने इसिसला 'जशास तसे' प्रत्युत्तर देण्याचा निर्धार करत सीरियावर हवाई आक्रमणे करण्याचा ठराव संमत केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या इसिसने ब्रिटनला धमकी दिली आहे. इसिसने फ्रान्सवर आक्रमण केल्यानंतर आता पुन्हा एकदा युरोपला धमकी दिली आहे. इसिसच्या 'अल नबा' (द न्यूज) या दैनिकातील एका लेखातून देण्यात आलेल्या या धमकीत म्हटले आहे की, मुसलमानांविरुद्ध युद्ध छेडण्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. ब्रिटनवर पॅरिसपेक्षाही महाभयंकर आक्रमणे करू. ही आक्रमणे इतकी भयानक असतील की, तुमच्या मुलांबाळांचे केससुद्धा पांढरेफटक पडतील. पॅरिसमध्ये आम्ही १३० जणांना ठार केले; पण ब्रिटनवर असे आक्रमण करू की, तो त्यांच्या विनाशाचा दिवस असेल. ब्रिटनमध्ये रक्तामासाचे सडे पडतील आणि आम्ही हे लवकरच करून दाखवू.

मुरुड (रायगड) समुद्रकिनार्‍यावर १३ विद्यार्थी बुडाले

     रायगड - जिल्ह्यातील मुरुड जंजिरा समुद्रकिनार्‍यावर १३ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत १० विद्यार्थिनी आणि ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ५ विद्यार्थ्यांवर उपचार चालू आहेत. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. हे सर्व विद्यार्थी पुण्यातील अबिदा महाविद्यालयाचे असून सहलीसाठी मुरुडला आले होते. एकदरा समुद्रकिनार्‍यावर हे विद्यार्थी पोहत होते. त्या वेळी ही दुर्दैवी दुर्घटना घडली. भरतीची वेळ असतांनाही हे विद्यार्थी पोहत होते. स्थानिकांनी पोहायला विरोध केला होता, पण विरोध डावलून विद्यार्थी पोहत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सहलीला बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स आणि बीसीएचे १२३ विद्यार्थी होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्या ९ मालमत्तांवर धाडी

घोटाळेबाज नेते असणार्‍या पक्षांवर जनतेने बंदीची मागणी का करू नये ?
     मुंबई - बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ९ मालमत्तांवर धाडी टाकल्या आहेत. छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांचीही काही घरे आणि कार्यालये या मालमत्तांचा त्यात समावेश आहे. 

गांधीवधाची पुन्हा चौकशी करण्याची अभिनव भारत संघटनेची केंद्रशासनाकडे मागणी

     मुंबई - अभिनव भारत संघटनेचे विश्‍वस्त डॉ. पंकज फडणीस यांनी केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांच्याकडे गांधीवधाचे पुन्हा अन्वेषण करावे, अशी मागणी केली आहे. 
डॉ. फडणीस यांनी मांडलेली सूत्रे 
१. गांधीवधाची चौकशी करणार्‍या कपूर आयोगाने काही मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते. 
२. गांधी वधानंतर ३१ जानेवरी १९४८ यादिवशी कराची येथून प्रकाशित डॉन वृत्तपत्राने लिहिले होते की, गांधी यांना चार गोळ्या लागल्या. 
३. रॉयटर्स वृत्तसंस्थेचे पत्रकार के.सी. रॉय यांनीही त्यांच्या कार्यालयात दूरभाष करून गांधी यांना चार गोळ्या लागल्याचे सांगितले होते.
४. अन्यही वर्तमानपत्रांत चार गोळ्या लागल्याचे प्रकाशित झाले होते.

(म्हणे) राममंदिर उभारण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा परिणाम देशावर होईल !

बाबरी मशीद प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते हाशिम अंसारी यांची चेतावणी
     नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी अयोध्येत वादग्रस्त ठिकाणी राममंदिर उभारण्याची गोष्ट करणारे देशाचे कायदे पायदळी तुडवण्याचे षड्यंत्र रचत आहेत. या देशातील मुसलमान हे सर्व सहन करणार नाहीत. कुणी बलपूर्वक राममंदिर उभारण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा थेट परिणाम देशावर होईल, अशी चेतावणी बाबरी मशीद प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते हाशिम अंसारी यांनी दिली आहे. फैजाबाद येथील रामकथेमध्ये प्रवचन करतांना चित्रकूट येथील तुलसी पिठाधिश्‍वर जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांच्या उपस्थितीत राममंदिराच्या उभारणीचा दिनांक घोषित केला. या वेळी जगद्गुरु रामभद्राचार्य म्हणाले, अशोक सिंघल यांनी राममंदिर उभारण्याचे स्वप्न पाहिले. आज ते हयात नाहीत; परंतु त्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. अयोध्येत रामललासाठी राममंदिराची निर्मिती झाली असून आता केवळ जीर्णोद्धाराची आवश्यकता आहे, जो लवकरच चालू होईल. जगद्गुरु रामभद्राचार्य यांच्या या प्रतिपादनानंतर अंसारी संतप्त झाले असून त्यांनी जगद्गुरु रामभद्राचार्य यांच्यासह डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांना गप्प बसवावे, अशी मागणी थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

असहिष्णुतेवर निवडक आक्रोश, काँग्रेस, उच्चभ्रू आणि डावे !

मान्यवरांचे मत !
  • नव्या पद्धतीला जुनी पद्धत वाट मोकळी करून देते आणि ईश्‍वर स्वत: अनेक प्रकारे ते साध्यही करतो, एकच पद्धत कायम राहिल्यास तिचा गैरवापरही केला जाऊ शकतो. - लॉर्ड टेनिसन
  • मी आपल्या मताशी सहमत नाही, तरी आपल्या या आधिकाराचा बचाव मी मरेपर्यंत करीन. व्हॉल्टेअर
  • सत्य तीन प्रक्रियांमधून जाते. पहिली, त्याची उपेक्षा केली जाते. दुसरी, त्याला कमालीचा विरोध होतो. तिसरी, स्वत:ची साक्ष म्हणून ती मान्य करणे. आर्थर शॉपनहॉवर

१. बुद्धीवाद्यांनी त्यांचे पुरस्कार परत न 
करता पोलीस व्यवस्थेत परिवर्तन 
करण्याची मागणी करायला हवी होती !
    ज्या वेळी लेखक, इतिहासकार, वैज्ञानिक, चित्रपट निर्माते यांनी त्यांना मिळालेले राज्यपुरस्कार, तसेच अन्य संस्थांकडून मिळालेले पुरस्कार परत केल्याचे वृत्तपत्रांमधून वाचून, दूरदर्शन वाहिन्यांवरून ऐकून जगातील काही उत्तम पुरुषांच्या वर नमूद केलेल्या उत्कृष्ट वचनांची मला आठवण झाली. त्यांच्यापैकी बहुतेकांनी, आजकालचे असहिष्णुतेचे वातावरण आणि धर्मांध कायदे त्यांच्या वरील कृतीला उत्तरदायी असल्याचे म्हटले आहे. काहींनी तर, हल्लीच्या घटना म्हणजे विज्ञान, विज्ञाननिष्ठ आणि बुद्धीवादी यांच्या मूल्यांच्या गाभ्यावरच घाला, असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि एम्.एम्. कलबुर्गी अन् गोमांस खाल्ल्याचा आरोप असलेली एक मुसलमान व्यक्ती मोहम्मद अखलाक यांच्या हत्या झाल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे.

ओवैसींची मतदारांना गोमांसाची लालूच !

     भाग्यनगर (हैद्राबाद) महानगरपालिकेची निवडणूक आज होत आहे. निवडणुकीच्या प्रचारात एम्आयएम्चे असदुद्दिन ओवैसी यांनी ही निवडणूक हरल्यास आम्ही सत्तेत आलो नाही, तर शहरात गोमांस (बीफ) खाणे, विक्रीवर बंदी घातली जाईल, त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे येथील बीफचे व्यापारी संकटात सापडतील, असे म्हटले आहे. बीफ या सूत्राभोवतीच लक्ष केंद्रित करून दैनंदिन स्तरावर निर्माण होत असलेल्या सर्व सामाजिक समस्यांचे समाधान होणार आहे का ? व्यापार करण्यासाठी कैक मार्ग उपलब्ध आहेत; पण जाणीवपूर्वक एकाच व्यापारात गुंतून रहाण्याचा फुटकळ समादेश स्वधार्मियांना देऊन राजकीय पोळी भाजून घेण्याचा लाचारपणा ओवैसींनी केला आहे. भविष्यात केंद्र आणि राज्य स्तरावरून गोहत्याबंदीचा प्रस्ताव संमत करण्याविषयी शासन स्वतःहूनच विचार करणार नाही. ओवैसींना विकासाची भाषा येतच नाही, हे वेळोवेळी त्यांच्या विधानांवरून सिद्ध होत असते. यांना स्वधार्मियांत सामाजिक विकासाची जागृती करण्यासाठी कार्यरत रहाण्यापेक्षा चिथावणीखोर विधाने करत सामाजिक वातावरण गढूळ करण्यात आसुरी आनंद वाटत आला आहे.

पुरोगाम्यांचा विवेक कि वैचारिक आतंकवाद ?

 कु. प्राजक्ता धोतमल
      स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या विचारवंतांनी सध्या समाजाला विवेक शिकवण्याचा ठेका घेतला आहे, असे दिसते. शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश करण्याच्या विषयासंदर्भात किंवा दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरण, श्रीपाल सबनीस अन् अधिवक्ता पुनाळेकर यांनी केलेली वक्तव्ये यांसंदर्भात काही दिवसांपासून चर्चासत्रे गाजत आहेत. या सर्वांमध्ये पुरोगाम्यांनी अगदी जय्यत पूर्वसिद्धता करून रणांगणात आपले वैचारिक वारू उधळले. एकमेकांना पाठीशी घालत, एकमेकांच्या (कु)विचारांचे समर्थन करत पुरोगामी आपली बाजू एकजुटीने टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. या त्यांच्या वैचारिक रणनीतीतून पुरोगाम्यांचा (अ)विवेक कसा आहे ?, याविषयी जी सूत्रे लक्षात आली, ती पुढे देत आहे.

पाकिस्तानरूपी हिरव्या सापाला भारत ओळखेल, तो सुदिन !

सौ. अनघा जोशी
१. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस आणि भाजप यांनी सत्तेसाठी 
मुसलमानांचे लांगूलचालन करून पाकिस्तानरूपी सापाला दूध पाजणे 
     स्वातंत्र्यानंतरच्या काळात केवळ सत्तेसाठी मतांच्या लोभाने यापूर्वी सत्तेवर असलेली काँग्रेस आणि सध्याचा भारतीय जनता पक्ष यांच्यात लागलेली मुसलमानांच्या लांगूलचालनाची स्पर्धा आज विकोपाला गेली आहे. सत्ता जाण्याच्या भयापोटी पाकिस्तानरूपी हिरव्या सापाला भारत दूध पाजत आहे. हे पाहिल्यावर इसापनीतीतील पुढील एक गोष्ट आठवते.
२. इसापनितीतील धूर्त सापाची गोष्ट 
२ अ. सापाने वृद्ध झाल्याचे नाटक करून बेडकांचा विश्‍वास जिंकणे : एक धूर्त साप नदीत रहाणार्‍या बेडकांना खाण्यासाठी नदीकाठी जाण्याची सिद्धता करतो; परंतु मी गेलो, तर बेडूक मला पाहून पलायन करतील, या विचाराने तो वृद्ध झाल्याचे नाटक करायचे ठरवतो. त्यानुसार तो नदीकाठी जाऊन शांत पडून रहातो. नदीतील सर्व बेडूक सापाला पाहून घाबरून पळायला लागतात. तेव्हा तो साप सांगतो, अरे बाबांनो, मी तुम्हाला खायला आलो नाही. मला खायला दातपण नाही. मी असाच आलो आहे. त्या बेडकांना हे खरे वाटते. ते आनंदी होतात आणि त्यांना सापाची दया येते. ते त्याला खायला देतात. त्याच्या अंगावर चढून खेळतात. काही दिवसांतच त्या बिचार्‍या बेडकांचा सापावर विश्‍वास बसला की, हा आपल्याला काहीच करणार नाही. ते त्याच्या अंगावर अधिक आनंदाने खेळू लागतात.

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्याचा डिसेंबर २०१५ मधील आढावा

१० डिसेंबर : हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते श्री. शैलेंद्र दीक्षित यांनी मशिदींवरील अवैध भोंग्यांच्या विरोधात केलेल्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयात झाली. या सुनावणीला मी उपस्थित होतो. आयत्या वेळी काही मुसलमान अधिवक्त्यांनी हस्तक्षेप करून याचिकेला विरोध केला.
१६ डिसेंबर : पुणे येथील कार्यकर्ते श्री. हेमंत शिंदे यांनी डॉ. विखे पाटील फाऊंडेशन या संस्थेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या संदर्भात पुणे येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने मी उपस्थित होतो. 
१८ डिसेंबर : प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना पंताजीकाका बोकील पुरस्कार देण्यात आला. हा सोहळा वाई येथे पार पडला. या वेळी अधिवक्ता पुनाळेकर यांनी उपस्थितांना हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्याविषयी, तसेच हिंदु राष्ट्र्र्राच्या आवश्यकतेेविषयी संबोधित केले.
२० डिसेंबर : सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
२२ डिसेंबर : औषधांच्या समवेत दिली जाणारी माहितीपत्रके आणि वेष्टनांवरील औषधांची माहिती वाचता येण्यासारखी असावी, यासाठी आधुनिक वैद्य मनोज सोलंकी यांनी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीला अधिवक्ता नागेश ताकभाते यांनी युक्तीवाद केला. 
- अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद.

भारतातील कथित धर्मनिरपेक्षतेतील फोलपणा !

१. सरसंघचालक मोहन भागवत यांनी 
मदर तेरेसा यांच्याविषयी केलेल्या 
विधानावरून टीकेची झोड उठणे
     २४.२.२०१५ च्या एशियन एजच्या अंकात संघाचे सरसंघचालक भागवत म्हणाले होते, मदर तेरेसांच्या लोकसेवेच्या कार्यात लोकांना ख्रिस्ती करण्याचा उद्देश होता. धर्मपरिवर्तनाचा येथे प्रश्‍न नाही; पण समाजसेवेचा हेतू धर्मपरिवर्तन असेल, तर त्या सेवेचे अवमूल्यन होईल. 
     श्री. भागवतांचे वरील विधान भूकंपासारखे ठरले. दुसर्‍या दिवशीची वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, चर्चा, वक्तव्ये इत्यादींना ते शब्द तोफखान्याच्या गोळीबारासारखे वाटले. २५.२.२०१५ च्या एशियन एजच्या अंकात वरील वक्तव्याविषयी प्रदीर्घ वार्तापत्र होते. त्याचे शीर्षक होते, भागवत गेट्स फ्लॅक फॉर रिमार्क्स. (भागवत यांच्यावर टीकेचा भडीभार)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही आवश्यकता आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

धर्मांतरितांच्या शुद्धीकरणाविषयी स्वामी विवेकानंद यांचा दृष्टीकोन

     शुद्धीच्या संदर्भात प्रबुद्ध भारतचा प्रतिनिधीशी बोलतांना स्वामी विवेकानंद म्हणाले होते, निश्‍चित त्यांना परत घेता येईल नि परत घेतलेच पाहिजे. नंतर ते काही क्षण गंभीर राहिले. ते विचार करून म्हणाले, कारण आपली संख्या न्यून होईल... हिंदु कुळातून एक मनुष्य बाहेर गेला की, आपला एक मनुष्य न्यून होतो; परंतु शत्रूची संख्या वाढते. (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, एप्रिल २०१५)

ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या चळवळीची तीव्रता

     एक वेळ मिशनर्‍यांच्या बाजूने असणार्‍या पंडित नेहरूंना आदेश द्यावा लागला की, या भागातील ज्या परकीय पाद्य्रांचा अराष्ट्रीय चळवळीत हात असल्याचे सिद्ध होईल, त्यांना भारत सोडावे लागेल, हे त्यांना कळवावे. मध्य भारतातही ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या चळवळीचा शोध घेण्यासाठी काँग्रेस शासनाला समिती नेमावी लागेल.
(संदर्भ : मासिक धर्मभास्कर, एप्रिल २०१५)

रामनाथी आश्रमातील साधिका कु. सर्वमंगला मेदी यांनी काढलेले भावचित्र

धुळे येथील हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त श्री एकविरादेवी आणि मारुति यांच्या मंदिरात दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती

      मी काही साधकांसमवेत धुळे येथील श्री एकविरादेवी आणि मारुति यांच्या मंदिरात गेले होते. तेव्हा आम्ही दोन्ही देवतांना २४.१.२०१६ या दिवशी धुळे येथे होणारी हिंदु धर्मजागृती सभा निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी प्रार्थना केली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. श्री एकविरादेवीच्या विराट रूपाचे दर्शन होणे आणि ती सनातनचे पू. नंदकुमार जाधवकाका आणि सर्व साधक यांना धर्मकार्य करण्यासाठी शक्ती देत असल्याचे दिसणे : वरील प्रार्थना केल्यानंतर मला श्री एकविरादेवीच्या विराट रूपाचे दर्शन झाले. त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, आई एकविरा प्रसन्नतेने हसत आहे. ती सनातनचे पू. नंदकुमार जाधवकाका आणि सर्व साधक यांच्या पाठीशी उभी आहे अन् ती सर्वांना धर्मकार्य करण्यासाठी शक्ती देत आहे.

साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेत साहाय्य करून त्यांना घडवणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. अंजली क्षीरसागर !

कु. अंजली क्षीरसागर
      जून २०१३ मध्ये माझ्याकडे एका विभागातील सेवांचे दायित्व देण्यात आले होते. त्यात माझ्याकडून अनेक चुका झाल्या. समष्टीत कसे आणि काय बोलायचे ? चुका कशा सांगायच्या ? कडकपणा आणि किती प्रेमळपणा याचे संतुलन कसे साधायचे ?, ते मला कळत नव्हते. भावनाशीलतेमुळे मी साधकांना मानसिक स्तरावर सांभाळत होते. ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१३ मध्ये एका संतांनी विभागाच्या ३ - ४ बैठकांमध्ये मला माझ्या चुकांची जाणीव करून दिली अन् योग्य दृष्टीकोन दिले. मला त्यानंतर वाटत होते, मला कधीच समष्टीत बोलता-वागता येणार नाही. माझी शिकण्याची स्थिती नव्हती. माझ्या मनात चुकांची भीती आणि नकारात्मकताच अधिक होती. त्यानंतर विभागसेवांचे दायित्व कु. अंजली क्षीरसागर यांच्याकडे सोपवण्यात आले.
     अंजलीताईच्या माध्यमातून गुरुमाऊलीने मला टप्प्याटप्प्याने समष्टीतील बारकावे शिकवून सकारात्मक स्थितीत आणले. माझ्या काही प्रमुख दोषांवर मात करण्यासही पुष्कळ साहाय्य केले. त्यांच्याकडून शिकायला मिळालेले गुण पुढे देत आहे.

सतत सेवेचा ध्यास असलेले आणि स्वतःमध्ये जाणीवपूर्वक पालट घडवून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस !

      
श्री. चेतन राजहंस
श्री. चेतन राजहंस यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे २४ जानेवारी २०१६ ला घोषित करण्यात आले. त्यांच्या बहिणी सौ. अवनी आळशी आणि सौ. नंदिनी चितळे यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. चांगली स्मरणशक्ती
      चेतन एकपाठी आहे. तो लहानपणी अधिक अभ्यास करायचा नाही. शिक्षक शाळेत जे शिकवत होते, त्यावरच तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचा. त्याला सेवेतही त्याच्या या दैवी गुणाचा उपयोग होतो. त्याला घडलेल्या घटनांचे वर्ष, इतिहासातील घटना आदी पूर्णपणे आठवत असतात. तो जे वाचतो, ते त्याच्या पूर्ण लक्षात असते.
२. अष्टावधानी
      चेतन संगणकावर सेवा करत असतांना एखादा साधक विचारायला आल्यावर त्याला उत्तरे देणे, दुसर्‍या भ्रमणभाषवर आलेल्या लघुसंदेशांना उत्तरे देणे, भ्रमणभाषवर बोलणे इत्यादी सेवा करत असतो. हे सर्व तो शांतपणे आणि संयमाने करत असतो.

अमेरिकेत राहूनही ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शिल्पा राजीव कुडतरकर (वय ४५ वर्षे) हिने व्यष्टी साधनेपासून समष्टी साधनेत घेतलेली गरूडभरारी !

सौ. शिल्पा कुडतरकर
वर्ष १९९६
      एक साधिका कु. शिल्पा वेरेकर सनातनच्या गोव्यातील आश्रमात रहायची. तिचा विवाह झाल्यावर ती सौ. शिल्पा कुडतरकर झाली आणि पतीसमवेत अमेरिकेतील न्यू जर्सी येथे रहायला गेली. १७.५.१९९६ या दिवशी रात्री अमेरिकेला नवर्‍याकडे जाणार होती. विवाहापूर्वी काही आठवडे ती माझ्याबरोबर मुंबई येथील शीव सेवाकेंद्रात राहिली होती. जायच्या दिवशी सकाळी ती माझा निरोप घेण्यासाठी सासरहून शीव सेवाकेंद्रात परत आली. ती अमेरिकेला गेल्यावर माझ्याकडून पहिल्याप्रमाणे मार्गदर्शन होऊ शकणार नाही, या विचाराने तिला खिन्न वाटत होते. निघायची वेळ आल्यावर तिची खिन्नता आणखीनच वाढली. ती पाहून मला पुढील ओळी सुचल्या. त्या पटकन लिहून मी तिला तो कागद दिला. तो वाचल्यावर तिला वाटणारी खिन्नता दूर झाली आणि ‘ईश्‍वर अमेरिकेतही तिला मार्गदर्शन करील, अशी खात्री वाटून ती शांतपणे निरोप घेऊ शकली.

साधक आणि कार्यकर्ते यांना सूचना !

मान्यवरांना उत्पादने भेट न देता ग्रंथ, लघुग्रंथ किंवा ध्वनीचित्र-चकत्या भेट द्या !
     विविध कार्यक्रमांत किंवा प्रत्यक्ष भेटीत साधक मान्यवरांना भेटवस्तू देतात. काही वेळा या भेटवस्तूंमधून सनातनची सात्त्विक उत्पादने दिली जातात, असे लक्षात आले आहे. उत्पादनांचा वापर हा मर्यादित कारणांसाठी होतो. त्यामुळे उत्पादने भेट म्हणून देऊ नयेत. त्याऐवजी सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ, ध्वनीचित्र-चकत्या, पंचांग आदी प्रसारसाहित्य भेट म्हणून द्यावे. असे केल्यास त्यातील राष्ट्र आणि धर्म यांसंबंधी विचारांचा प्रसार होतो. हा प्रचार एका व्यक्तीपुरता मर्यादित न रहाता विविध लोकांपर्यंत पोचतो.

पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांची देहबुद्धी अल्प असण्याची काही उदाहरणे

पू. डॉ. ॐ उलगनाथन्
१. विमानतळावर अनवाणी चालतांनाही काही न वाटणे : एका मंदिरात गेले असता पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांची तेथे चप्पल हरवल्यामुळे मदुराई विमानतळावर ते अनवाणीच आले होते. विमानतळावर अनवाणीच कसे जायचे ?, असा प्रश्‍न त्यांच्या मनात आला नाही. हे पाहून आम्ही त्यांना एका साधकाची चप्पल घालावयास दिली. त्या वेळी ते म्हणाले, नको, मी अनवाणी कुठेही जाऊ शकतो. (यावरून असे वाटले, महर्षी ज्या स्थितीत ठेवतात, त्या स्थितीतही ते आनंदाने रहातात. - संकलक)
२. कोणत्याही प्रकारच्या पोशाखात सहज वावरणारी प्रकृती !  : कुठे विमानाने जायचे असेल, तर ते कधी गॉगल घालून सुटाबुटात येतात. कधी ते कमरेला अगदी केवळ एक पंचाही गुंडाळून येतात, तर कधी पंचा नेसून अंगावर काही न घालता भस्माचे पट्टे ओढूनही येतात. कधी कधी टी शर्टही घालतात. कोणत्याही पोशाखात ते नेहमीप्रमाणे सहजच वावरू शकतात. ना पंचा पांघरायची त्यांना लाज वाटते, ना एकदम सुटाबुटात येण्याची.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणावर प्रेम करीत नाही. प्रेम मला खेचते. 
मी प्रेमात फसेन म्हणून मी प्रेमात अडकलो.
      भावार्थ : मी प्रेम कोणावर करीत नाही, यातील प्रेम शब्द हा व्यावहारिक, मायेतील प्रेमासंबंधी आहे. प्रेम मला खेचते, यातील प्रेम म्हणजे प्रीती, पारमार्थिक प्रेम. नामधारकाचे प्रेम मला खेचते, म्हणजे मला त्याच्याविषयी ओढ वाटते.
      मी प्रेमात फसेन, यातील प्रेम हा शब्द व्यावहारिक प्रेमासंबंधी आहे. म्हणून मी प्रेमात अडकलो, यातील प्रेमात हा शब्द प्रीती म्हणजे पारमार्थिक प्रेम या अर्थाने वापरला आहे. थोडक्यात व्यावहारिक प्रेमात फसू नये, म्हणून मी पारमार्थिक प्रेमात अडकलो आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी आमिष दाखवावे लागते, मुसलमानांना धमकवावे लागते, तर हिंदु धर्मातील ज्ञानामुळे इतर धर्मीय हिंदु धर्माकडे आकर्षित होतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१.२०१६)

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सत्याची कास कधीही सोडू नये ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     परमेश्‍वराची साथ नित्य रहावी, ही इच्छा असेल, तर कधीही सत्याची कास सोडू नये. सतत सत्याचे अधिष्ठान ठेवावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

जीवघेणे शिक्षण !

संपादकीय
     रोहित वेमुला याने आत्महत्या केल्यानंतर त्याचा खूप गाजावाजा झाला; मात्र त्याच कालावधीत तमिळनाडूतील वेल्लपुरम् जिल्ह्यातील एस्व्हीएस् कॉलेज ऑफ योगा अ‍ॅण्ड नॅचरोथेरपी या महाविद्यालयात शिकणार्‍या प्रियांका, शरण्या आणि मोनीषा या तीन विद्यार्थिंनींनी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये भरमसाठ फी, महाविद्यालयामध्ये सुविधांचा अभाव आणि तेथे केला जाणारा छळ यांमुळे कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn