Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. भालचंद्र महाराज, सिंधुदुर्ग यांची आज जयंती

(म्हणे) बाबरी मशीद पाडल्याने देशाच्या प्रतिमेला धक्का बसला !

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे मुसलमानप्रेम !
      नवी देहली - अयोध्येतील राममंदिराची द्वारे उघडण्याचा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा निर्णय चुकीचा होता. ही कृती टाळता येणे शक्य होते. बाबरी मशीद पाडण्याचे कृत्य म्हणजे नि:संशय विश्‍वासघात होता. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सारासार विचार न करताच या धार्मिक स्थळाची नासधूस करण्यात आली. त्यामुळे भारत आणि परदेशातील मुसलमान समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या, तसेच त्यामुळे भारताच्या सहिष्णु आणि अनेक तत्त्ववादाच्या प्रतिमेलाही धक्का बसला, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.
     प्रणव मुखर्जी यांच्या द ट्रिब्युलंट इयर्स : १९८०-९६ या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या पुस्तकाच्या दुसर्‍या खंडात मुखर्जी यांनी वरील गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ बंद करण्याच्या सूचना दिल्या नव्हत्या ! - केंद्रशासनाचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिपादन

शासनाच्या अनुमतीशिवाय संकेतस्थळ बंद करणार्‍या दूरसंचार 
आस्थापनावर शासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे !
    मुंबई - हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ दाखवणे एअरटेल या आस्थापनाने बंद केले होते. याविरुद्ध समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २८ जानेवारीला न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपिठासमोर झालेल्या सुनावणीत केंद्रशासनाच्या अधिवक्त्यांनी समितीचे संकेतस्थळ बंद करण्याचे कोणतेही आदेश दिले नव्हते, असे प्रतिपादन केले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी ८ मार्च या दिवशी ठेवण्यात आली आहे.

पनवेलनजीकच्या जंगलाची इसिसकडून प्रशिक्षणकेंद्रासाठी रेकी ?

भारताला इसिसचा धोका नाही, असे म्हणणार्‍या शासनाला याविषयी काय म्हणायचे आहे ?
     मुंबई - पनवेलपासून जवळच असलेल्या कर्नाळा अभयारण्याच्या निर्मनुष्य जंगलामध्ये इसिसचे (आय.एस्.आय.एस्.चे) भारतातील पहिले प्रशिक्षणकेंद्र उभे करण्याचे नियोजन चालू होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. देशभरात इसिसच्या २० आतंकवाद्यांना अटक केल्यावर ही माहिती पुढे आली आहे. (भारतात इसिसची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, तेच यातून लक्षात येते.
     २६ जानेवारीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी या धर्मांधांवर केलेली कारवाई यापूर्वीच केली असती, तर इसिसमध्ये सहभागी होणार्‍यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढण्यास काही प्रमाणात तरी आळा बसला असता. - संपादक) उत्तरप्रदेशात अटक झालेला आतंकवादी रिझवान अहमद (वय २० वर्षे) या जागेचे अवलोकन (रेकी) करण्यासाठी आला होता.

बंगालच्या बीरभूममध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गोळीबार आणि बॉम्बफेक : २ जणांचा मृत्यू !

केंद्रशासन तृणमूल काँग्रेसवर बंदी घालणार का ?
ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा आतंकवाद !
     बीरभूम (बंगाल) - २९ जानेवारीला येथे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूलच्या दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात एकमेकांवर गोळीबार करण्यासह बाँब फेकण्यात आले. हा हिंसाचार काल रात्रीपासूनच चालू होता. यात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

इजिप्तमध्ये लेखिका फातिमा नाऊत यांना इस्लामचा अवमान केल्याच्या प्रकरणी तीन वर्षांची शिक्षा !

बकरी ईदच्या दिवशी होणार्‍या प्राण्यांच्या हत्याकांडाला विरोध करण्याचा परिणाम !
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या तथाकथित पुरोगामी महिला यावर तोंड उघडतील का ?
     कैरो (इजिप्त) - इजिप्तमधील प्रसिद्ध लेखिका फातिमा नाऊत यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बकरी ईदला जगभरात होणार्‍या प्राण्यांच्या हत्याकांडाच्या विरोधात आवाज उठवला होता. मानवी जगातील सर्वांत मोठे हत्याकांड, असा उल्लेख नाऊत यांनी केला होता. मुसलमानांच्या सणांच्या वेळी होणार्‍या निरपराध प्राण्यांच्या क्रूर हत्यांवर पुन्हा एकदा विचार झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती. यात कुठेही इस्लामचा अवमान करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता; परंतु धर्मांधांनी नाऊत यांच्यावर ईशनिंदेचा आरोप केला. या प्रकरणी नाऊत यांना तीन वर्षे शिक्षा आणि १ लक्ष ७५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. नाऊत या शिक्षेला कारागृहात राहून आव्हान देऊ शकतात. (वाघांच्या रक्षणासाठी, माणसांना चावणार्‍या भटक्या कुत्र्यांसाठी पुढाकार घेणारे प्राणीप्रेमी नाऊत यांच्यासाठी काही करतील का ? - संपादक)

मुंबईकडे येणार्‍या महानगरी एक्स्प्रेसमध्ये सापडला टाइमबॉम्ब !

यावरून भारतातील सुरक्षाव्यवस्था किती ढिसाळ आहे, हे लक्षात येते ! भारतात सर्वत्र 
आतंकवादाचे सावट असतांना सुरक्षाव्यवस्थेत असा अक्षम्य निष्काळजीपणा करणार्‍या
 उत्तरदायींवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
     मुंबई - वाराणसी येथून मुंबईकडे येणार्‍या महानगरी एक्स्प्रेसमध्ये २६ जानेवारी या दिवशी टाइमबॉम्ब सापडल्याचे वृत्त आहे. या बॉम्बचा स्फोट झाला असता, तर किमान तीन डबे उद्ध्वस्त झाले असते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
     वाराणसी येथून निघालेली महानगरी एक्स्प्रेस चित्रकूटमधील माणिकपूर रेल्वस्थानकाजवळ आल्यावर गाडीच्या एस् ३ क्रमांकाच्या स्लीपर कोचच्या शौचालयात एक पिशवी असल्याचे अनिल कुमार या प्रवाशाच्या लक्षात आले. त्याने मुंबई येथे टॅक्सी चालवणारे अशोक यादव या प्रवाशाला याविषयी सांगितले. त्याने तातडीने गाडीची साखळी खेचली आणि माणिकपूर स्थानकात गाडी थांबवली.

(म्हणे) हिंदु राष्ट्राची मागणी करणे म्हणजे मुसलमानांना डिवचणे !

अबू आझमी यांना झोंबली राजासिंह ठाकूर यांची राष्ट्राभिमानी वक्तव्ये !
     जळगाव - हिंदु राष्ट्राची जी काही मागणी या देशात केली जात आहे, ती म्हणजे संविधानावर विश्‍वास ठेवून या देशात राहिलेल्या मुसलमानांना डिवचणेच आहे. या देशामध्ये हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये अंतर्गत विवाह केलेच जातात; पण याला लव्ह जिहादचे स्वरूप देऊन देशाचे वातावरण बिघडवण्याचे काम चालू आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून एखाद्या मुलीचे बलपूर्वक धर्मांतर केले जातेे, हे खोटे आहे. देशातील एकही मुसलमान संघटना अशाप्रकारचे प्रयत्न करत नाहीत, असे निखालस खोटे वक्तव्य अबू आझमी यांनी येथील एका पत्रकार परिषदेत २९ जानेवारी या दिवशी केले. (केरळ उच्च न्यायालयाने लव्ह जिहाद संदर्भात वक्तव्य केले आहे. या देशात सहस्रो लव्ह जिहादची प्रकरणे झाली आहेत आणि त्यांतील कित्येक उघड होत आहेत. त्यासाठी आझमींच्या साक्षीपुराव्यांची आवश्यकता नाही. - संपादक)

केवळ धार्मिक द्वेषामुळेच हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात अबू आझमी यांना पोटशूळ ! - हिंदु जनजागृती समिती

     जळगाव - येथे २९ जानेवारी या दिवशी आयोजित एका कार्यक्रमात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राजासिंह ठाकूर यांनी मारा-तोडाची भाषा केली आणि देशातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला, असा निखालस खोटा आरोप केला आहे. या आरोपाचा हिंदु जनजागृती समिती निषेध करते. आतापर्यंत झालेल्या १ सहस्र ५० हून अधिक हिंदु धर्मजागृती सभांमधील उद्बोधने ही कायद्याच्या कक्षेत राहूनच करण्यात आली आहेत. या सभांमुळे हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती आणि संघटन होत असून तीच अबू आझमी यांची खरी पोटदुखी आहे. जळगाव येथे अकारण हिंदु संघटनांवर आगपाखड करणार्‍या अबू आझमी यांच्यासारख्या नेत्यांमुळेच आज समाजसौख्य बिघडत आहे. याची शासनाने दखल घेऊन अशा नेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

रत्ननगरीत स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनास भव्य ग्रंथदिंडीने उत्साहात प्रारंभ

ग्रंथदिंडीत सहभागी झालेले डावीकडून उमेश शेटये, खासदार विनायक राऊत, त्यांच्या मागे दीपक पटवर्धन, दादा इदाते, त्यांच्या मागे शिवसेनेचे आमदार राजन साळवी आणि आमदार उदय सामंत (उजवीकडे)
    
स्वातंत्र्यवीर सावरकर
रत्नागिरी - स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचा २९ जानेवारी या दिवशी भव्य ग्रंथदिंडीने उत्साहात प्रारंभ झाला. हे संमेलन स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई; सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
      स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या श्री पतितपावन मंदिरापासून या ग्रंथदिंडीस २९ जानेवारीला सकाळी ८.३० वाजता प्रारंभ होऊन नगरवाचनालय, जयस्तंभ येथे दिंडीचा समारोप करण्यात आला.

प्रथा-परंपरा झुगारणार्‍यांनी शनिदेवाची आराधना आणि मूर्तीपूजनाचे शास्त्र सांगणार्‍या धर्मग्रंथांचा अभ्यास करावा ! - सौ. सुनीता पाटील, सनातन संस्था

चर्चासत्रात सहभागी (डावीकडून) सूत्रसंचालक,
सौ. सुनीता पाटील आणि अन्य मान्यवर महिला
     मुंबई - धर्माने आजवर स्त्रियांसाठी अनुकरणीय शास्त्रच सांगितले आहे; मात्र हिंदूंच्या अनेक धर्मग्रंथांत शनिदेवाची आराधना, तसेच त्याच्या मूर्तीपूजनाचे शास्त्र यांविषयी माहिती दिली आहे. प्रथा-परंपरा झुगारणार्‍यांनी त्याचा सखोल अभ्यास करावा, असे परखड प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. सुनीता पाटील यांनी केले. त्या २७ जानेवारी या दिवशी साम वाहिनीवर झालेल्या चर्चासत्रात बोलत होत्या. शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्यास महिलांना अनुमती मिळावी, यासंदर्भात सध्या वाद चालू आहे. त्या अनुषंगाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात काँग्रेसच्या नीला लिमये, लेखिका नंदिनी आत्मसिद्ध, भाजपच्या प्रवक्त्या कांता नलावडे, भूमाता ब्रिगेडच्या दुर्गा शुक्रे, शनि मंदिर संस्थानच्या डॉ. विभाश्री उपस्थित होत्या. सूत्रसंचालन संजय आवटे यांनी केले.

कुटुंबियांना पोलीस, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागलेले त्रास

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, हे पाहिले. आता आपण साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

मध्ये रेल्वे प्रबंधकांना शिवसेनेच्या मध्य रेल्वे प्रवासी सेनेकडून विविध मागण्यांचे निवेदन !

     मिरज - मिरज येथील उत्तरेकडील पादचारी पूल तातडीने दुरुस्त करून नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात यावा, कोल्हापूर-सोलापूर या एक्स्प्रेसचा विस्तार भाग्यनगरपर्यंत करावा, रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील नाल्याची स्वच्छता करावी, माधवनगर रेल्वे स्थानकाची दुरावस्था दूर करावी, या तसेच अन्य मागण्यांचे निवेदन मध्य रेल्वे पुणे कार्यालयाचे अधिकारी आय.जे. जोसेफ यांना शिवसेनेच्या मध्य रेल्वे प्रवासी सेनेच्या वतीने देण्यात आले. या वेळी सर्वश्री किशोर भोरावत आणि संदीप शिंदे उपस्थित होते.

भारत सेवाश्रम संघाच्या शताब्दी कार्यक्रमातून इमाम बरकतीची हकालपट्टी !

हिंदूंच्या विरोधाचा परिणाम !
      कोलकाता - आचार्य स्वामी प्रणवानंद महाराज यांनी १०० वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या कोलकाता येथील भारत सेवाश्रम संघाचा शताब्दी कार्यक्रम ३० जानेवारी या दिवशी नेताजी स्टेडीयमवर आयोजित करण्यात आला आहे. संघ नेहमीच हिंदूविरोधी कट्टरवादाशी लढा देत आला आहे. तरीही या कार्यक्रमास इतर मान्यवरांसोबत टिपू सुलतान मशिदीचे इमाम नुरार रहमान बरकती या कट्टरवादी व्यक्तीलाही निमंत्रित केले गेले होते. त्यामुळे सहस्रो हिंदूंनी भारत सेवाश्रमचा दूरध्वनीद्वारे आणि प्रत्यक्ष निषेध व्यक्त केला होता. हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या आयोजकांनी इमाम बरकती यांना दिलेले निमंत्रण रहित केले आणि कार्यक्रमाची सुधारित निमंत्रण पत्रिका घोषित केली. त्याविषयी हिंदूंमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हिंदू एक्झीस्टन्स, हिंदु जनजागृती समिती यांसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी भारत सेवाश्रम संघाच्या कृतीचा निषेध केला होता. या कार्यक्रमास बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

ममता बॅनर्जी यांच्या बंगालमध्ये ५० टक्के बालके आणि ५३ टक्के गर्भवती महिला अशक्त !

महिलांना समानतेची वागणूक द्या, असे म्हणणार्‍या ढोंगी पुरोगामी 
महिला या विषयी तोंड उघडतील का ?
     कोलकाता - राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे की, बंगालमधील पाच वर्षांखालील ५० टक्के बालके ही अशक्त आहेत. आरोग्य मंत्रालयाने या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास राज्यातील बालमृत्यूचा दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बाल हक्क पूर्व विभागाचे प्रादेशिक संचालक अतिंद्रनाथ दास म्हणाले की, राज्यातील दोनपैकी एक मूल अशक्त आहे. मागील दशकभराचा अवधी लक्षात घेतला, तर हे प्रमाण सात टक्क्यांनी अल्प झाले असले, तरी ते अद्याप धोक्याच्या पातळीवर आहे. 
    दास पुढे म्हणाले की, राज्यातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्‍नही गंभीर झाला असून, ६० टक्के सामान्य महिला आणि ५३.२ टक्के गर्भवती महिला कमालीच्या अशक्त आढळून आल्या आहेत. आजही राज्यातील बहुसंख्य बालकांना पुरेसा पोषण आहार मिळत नाही. (ममता बॅनर्जी एक महिला असूनही त्यांच्या राज्यातील महिलांची ही स्थिती त्यांच्या कारभाराची लक्तरे उघड करतात ! - संपादक)

हाजी अली दर्ग्याच्या गाभार्‍यात प्रवेश मिळण्यासाठी मुसलमान महिलांकडून आंदोलन

     मुंबई - येथे दर्गा प्रवेशासाठी मुसलमान महिलांनी आझाद मैदानावर आंदोलन चालू केले आहे. मुंबईच्या हाजी अली दर्ग्याच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही प्रविष्ट करण्यात आली आहे. दर्ग्याच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश देणे, हे इस्लामच्या विरोधात आहे. ते घोर पाप आहे, असे सांगत न्यासाने वर्ष २०११ मध्ये महिलांना दर्गाबंदी केली होती. १५ व्या शतकात उभ्या राहिलेल्या या दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश नाकारतांना दर्गा न्यासाने वरील युक्तीवाद केला होता.

संभाजीनगर येथे टवाळखोर धर्मांधाकडून एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी छेडछाड

धर्मांधाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट
काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमधील एका विद्यार्थिनीने टवाळखोरांकडून होणार्‍या
छेडछाडीमुळेच शाळेत जाणे सोडले होते. आता अशाच प्रकारचा आणखी एक गुन्हा
प्रविष्ट झाला असून त्या विरोधात पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार आहे ?
     संभाजीनगर - येथील सिडको भागात एका १४ वर्षीय विद्यार्थिनीला टवाळखोर धर्मांध सय्यद माजीद सय्यद आबीद हा छेडछाड करत होता. त्याला त्या विद्यार्थिनीच्या वडिलांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने शिवीगाळ करत धमक्या दिल्या. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

पळसे गावातील (जिल्हा पुणे) शेतात आढळले गोमांस !

शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी, ही अपेक्षा !
     मावळ - येथील पळस गावाजवळच्या आडरानामध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शिवसैनिकांना कळताच त्यांनी पोलिसांना ही माहिती कळवली. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात शिवसेना मुळशी तालुकाप्रमुख प्रकाश भेगडे यांनी तक्रार दिली असून गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर ग्रामस्थ आणि शिवसैनिक यांनी ते गोमांस नष्ट केले.

बंगालमध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण आणि बलात्कार करून हत्या

  • बंगालमध्ये धर्मांधांचे लांगूलचालन करणार्‍या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचे शासन असल्याने उद्दाम झालेले धर्मांध सातत्याने हिंदूंवर अत्याचार करत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी आता हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
  • बंगालची काश्मीरच्या दिशेने वाटचाल !
      कोलकाता - वर्धमान जिल्ह्यातील जमुरीया गोयलपारा येथील दहावीच्या वर्गात शिकणार्‍या १६ वर्षीय ट्विंकल कुमारी शा हिचे अफताब आलम या धर्मांधाने २४ जानेवारी या दिवशी तिच्या घरून अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर दोन दिवसांनी तिचा मृतदेह एका खड्ड्यात सापडला. तिच्या देहावर मारहाणीच्या आणि आम्ल टाकल्याच्या जखमा दिसत होत्या. या घटनेने जमुरीया येथील हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे. यात त्यांनी इतर धर्मांधांचा हात असल्याचा आरोप केला असून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.

१ लक्ष रुपये द्या आणि मद्य विक्रीसाठी अनुज्ञप्ती (परवाना) घ्या !

  • मद्यामुळे अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले असतांना सुपा ग्रामपंचायतीने असा ठराव चर्चेसाठी प्रविष्ट करून घेणे, म्हणजे महिलांच्या जखमेवर मीठ चोळणेच होय !
  • धान्यापासून मद्य बनवण्यास सांगणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या तालुक्यात याहून वेगळे काय होणार ?
  • प्रजासत्ताकदिनी सुपा ग्रामपंचायतीच्या (जिल्हा पुणे) ग्रामसभेत समाजद्रोही ठरावाची चर्चा
      बारामती, २९ जानेवारी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात मद्यालये (बिअरबार) दुकानाची अनुज्ञप्ती लिलाव पद्धतीने देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने झालेल्या ग्रामसभेत तलावाच्या खोलीकरणासाठी १ लक्ष रुपये द्या आणि मद्य विक्रीसाठी अनुज्ञप्ती घ्या !, असा अजब ठराव बारामती तालुक्यातील सुपा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत चर्चेला आला होता. याद्वारे मिळणारी रक्कम तलावातील गाळ काढण्यासाठी व्यय करण्याचा ठरावही या वेळी ग्रामसभेत करण्यात आला.

राणीबेन्नूरू (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समितीचा फलक काढणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांना हिंदु तरुणांनी रोखले !

हिंदुद्वेष्ट्यांना रोखणार्‍या धर्माभिमानी हिंदूंचे अभिनंदन !
     राणीबेन्नूरू (कर्नाटक) - येथील एका खाजगी इमारतीवर हिंदु जनजागृती समितीकडून लावण्यात आलेला गंगाजल चौडेश्‍वरी जत्रा महोत्सवाचा फलक काही हिंदुद्वेष्ट्यांनी काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना हिंदु तरुणांनी रोखले. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण होऊन तणाव निर्माण झाला. याविषयी माहिती मिळताच पोलीस दलाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पोलिसांनी सुचवल्याप्रमाणे सदर फलक अन्यत्र लावण्यात आला. येथील दुर्गा चौकात ही घटना घडली.
     २५ जानेवारीपासून प्रारंभ झालेल्या ५ दिवसांच्या जत्रा महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीकडून देवीचे चित्र असलेला मोठ्या आकाराचा फलक लावण्यात आला होता. या फलकावर १९ जानेवारी या दिवशी काही हिंदुद्वेष्ट्यांनी आक्षेप घेतला आणि तो काढण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तेथे उपस्थित हिंदु तरुणांनी हिंदुद्वेष्ट्यांना फलक काढण्यापासून अडवले. त्यामुळे दोन्ही गटांतील तरुणांमध्ये वाद झाला आणि तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकरी अनिलकुमार भूमरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी आले. त्यानंतर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

काश्मीरमधील शंकराचार्य टेकडीचे नाव पालटू नये ! - बी.के. वासन

     श्रीनगर - भारतीय पुरातत्व खात्याने काश्मीरमधील शंकराचार्य टेकडीचे तख्त-इ-सुलेमान, असे नामकरण केले आहे. भारतीय पुरातत्व खात्याने शंकराचार्य टेकडीच्या इतिहासाविषयी विशिष्ट दृष्टीकोनातून केलेले वर्णन पर्यटक स्मृतीशिलेवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. एके काळी या टेकडीवर ज्यूंचे नियंत्रण होते, असा दावा करणारी एक कल्पित कथा रचण्यात आली आहे. या कथेच्या आधारे सोलोमन यांचे नाव या टेकडीशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे तख्त-इ-सुलेमान हे नाव आले आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन शंकराचार्य टेकडीचे नाव पालटू नये, अशी मागणी कलिफोर्निया, अमेरिका येथे वास्तव्य करणारे श्री. बी.के. वासन यांनी केली आहे.

हिंदु धर्मजागृती सभेच्या पूर्वसंध्येला हिंदु जनजागृती समितीकडून भव्य पदयात्रेच्या निमित्ताने झाले भगवे संघटन !

हिंदु धर्माचा विजय असो ! च्या जयघोषाने अवघे नाशिक शहर भगवेमय झाले
     नाशिक (वार्ता.) - ३१ जानेवारी या दिवशी नाशिक शहरात होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने २९ जानेवारीला भव्य पदफेरीचे आयोजन करण्यात आले होते. पदफेरीची सुरुवात सनातन संस्थेचे पू. महेंद्र क्षत्रिय यांच्या शुभहस्ते धर्मध्वज पूजनाने झाली. या पूजनाचे पौरोहित्य श्री. शाम पुराणिक यांनी केले. श्री काळाराम मंदिर, पंचवटी येथून फेरीची सुरुवात झाली.
     पदफेरीच्या अग्रभागी धर्मध्वज हातात पकडलेला युवक आणि त्यामागे पारंपरिक पेहरावामध्ये ६० हून अधिक नागरिक उपस्थित होते. वंदे मातरम्, जयतु जयतु हिंदु राष्ट्रम, हर हर महादेव, जय श्रीराम, शिवाजी महाराजांचा विजय असो इत्यादी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. फेरीला बघण्यासाठी मार्गातील शेकडो नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. यावेळी फेरीमार्ग संपूर्ण भगवेमय होऊन पदफेरीतून धर्मसभेचे निमंत्रणही नागरिकांना देण्यात आले.

पुणे येथील हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार शिगेला...!

पुणे येथील प.पू. आबांनी कात्रज येथे 
होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेसाठी दिलेला संदेश
हिंदु राष्ट्राची स्थापना होईलच !
      हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मियांमध्ये केली जाणारी जनजागृती कौतुकास्पद आहे. या कार्यामुळे भविष्यात एक ना एक दिवस हिंदु राष्ट्र स्थापन होईल, याची आम्हाला निश्‍चिती वाटते.
- (प.पू.) आबा उपाध्ये आणि सौ. मंगला उपाध्ये, पुणे. (२७.१.२०१६)
रिक्शांवर सभेची भित्तीपत्रके लावून प्रसार करण्यात येत आहे
नागरिक सभेचा विषय समजून घेतांना...
      पुणे, २९ जानेवारी (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ जानेवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता भारती विद्यापीठ परिसरात कै. हनुमंत थोपटे विद्यालयाच्या पटांगणावर (महापालिका शाळा क्र. १६२) हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मशिक्षित हिंदूंचे जात-पात विरहित विराट संघटन उभे रहावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे दिशेने मार्गक्रमण व्हावे, या उद्देशाने या सभेचा गेले १५ दिवस वैशिष्ट्यपूर्ण प्रसार चालू आहे. प्रसार करणारे कार्यकर्ते प्रसारकार्यातून साधना व्हावी, यासाठीही प्रयत्नशील असल्याने धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णच्या कृपेने धर्मसभेसाठी समाजातील व्यक्तींचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे....मग ते जवळपासच्या गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे हिंदु संघटनासाठी बैठका ठरवणे असो अथवा भित्तीपत्रके लावणार्‍या कार्यकर्त्यांना आपलेच कार्य समजून भित्तीपत्रके लावण्यासाठी मोक्याची ठिकाणे आपणहून दाखवणे असो ! सभेच्या प्रसाराच्या कालावधीत साधकांमध्ये निर्माण झालेल्या सांघिकभावामुळे, तसेच सकारात्मतेमुळे साधकांची प्रतिभा जागृत होऊन त्यांना प्रेरणादायी काव्येही सुचतात. सभा यशस्वी करण्यासाठी सांघिक भावाने आणि सकारात्मकतेने प्रयत्न करणारे कार्यकर्ते जणू ईश्‍वराचीच अनुभूती या धर्मकार्यात घेत आहेत.

भारत हा सर्वांत सहिष्णु देश ! - नाना पाटेकर

     मुंबई - देशभरात सहिष्णु आणि असहिष्णुता यांविषयी वाद चालू असतांना आता चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांनीही त्यांचे याविषयी मत मांडले आहे. नाना पाटेकर म्हणाले की, आपला देश जगातील सर्वांत सहिष्णु देश आहे. भारतासारखी माणसे या जगात कुठेही भेटणार नाहीत.
     शनिशिंगणापूरच्या संदर्भात नाना पाटेकर म्हणाले, सर्वांना सर्व ठिकाणी जाऊन प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये पुरुष आणि स्त्री असा भेद करता कामा नये. मी स्त्री-पुरुष भेद मानत नाही. (नाना पाटेकर यांनी मानसिक पातळीवर मत न मांडता अध्यात्मिक विषयाच्या संदर्भात त्याचा अभ्यास करून मगच शास्त्रशुद्ध पद्धतीने विचारपूर्वक मत मांडावे, असे हिंदूंना त्यांच्याकडून अपेक्षित आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! - संपादक)

वर्ष २०१६ मध्ये मुसलमान युरोपवर आक्रमण करतील !

भाकितांना थोतांड म्हणणार्‍या अंनिसला यासंदर्भात काय म्हणायचे आहे ?
बल्गेरिया येथील महिलेचे भाकित 
     मुंबई - वयाच्या सोळाव्या वर्षी एका वादळामध्ये स्वत:ची दृष्टी गमावणार्‍या बल्गेरिया येथील वेंजेलिना पांदेवा दिमीत्रोवा उर्फ वांगा या महिलेने वर्ष २०१६ मध्ये मुसलमान युरोपवर आक्रमण करतील, असे भाकित वर्तवल्याचे समोर आले आहे. (सध्या मध्य-पूर्वेतील मुसलमान शरणार्थींकडून युरोपमधील महिलांवर अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे हे भाकित खरेच ठरत आहे. - संपादक) वर्ष १९९६ वेंजेलिना यांचे निधन झालेले आहे. वेंजेलिना यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक भाकिते केली होती. वेंजेलिना यांनी दुसरे महायुद्ध, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील आक्रमण, वर्ष २००४ मधील त्सुनामी या घटनांच्या संदर्भात भाकिते वर्तवली होती. ही भाकिते काळाच्या ओघात खरी ठरली. राजा दुसरा बॉरीस आणि अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी तिची भेटही घेतली होती. 

फलक प्रसिद्धीकरता

केंद्रशासन तृणमूल काँग्रेसवर बंदी घालणार का ?
     बंगालमधील बीरभूम येथे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात एकमेकांवर गोळीबार करण्यासह बॉम्ब फेकण्यात आले. या हिंसाचारात आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangal ke Birbhum me TMC ke karyakartaome golibari aur bombfek, 2 karyakartaonki mrutyu.
kya kendrashasan TMCpar bandi layegi ?
जागो !
: बंगाल के बीरभूम में तृणमूल काँग्रेसके कार्यकर्ताआेंमें गोलीबारी और बॉम्बफेक, २ कार्यकर्ताआेंकी मृत्यू क्या केंद्रशासन तृणमूल काँग्रेसपर बंदी लाएगी ?

महाराष्ट्रात मागील वर्षात ३ सहस्र २२८ शेतकर्‍यांनी केल्या आत्महत्या

     मुंबई - महाराष्ट्रामध्ये वर्ष २०१५ मध्ये ३ सहस्र २२८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्यशासनाच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने प्रसिद्ध केली आहे. (केवळ माहिती प्रसिद्धी करणारे नव्हे, तर ती रोखण्यासाठी कृती करणारे शासन हवे ! - संपादक) विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी राज्यशासनाने १ सहस्र ८४१ शेतकरी हानीभरपाईस पात्र आहेत, असे मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते. कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दोन्हीही आकडेवारी योग्यच असल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार शासनाने न्यायालयात सांगितलेली संख्या ही केवळ शेतीसंबंधी कारणांसाठी आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची असून तेच भरपाईस पात्र आहेत. अमरावतीत १ सहस्र १७९, संभाजीनगरमध्ये १ सहस्र १३०, नाशिकमध्ये ४५९, नागपूरमध्ये ३६२, पुण्यात ९६, तर कोकणात २ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

(म्हणे) संत तुलसीदासांनी रामचरितमानसची निर्मिती बाबरी मशिदीमध्ये केली !

अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांविषयी असे बोलण्याचे धाडस कुणी केले असते का ?
देहली विश्‍वविद्यालयाचे प्राध्यापक हरिश त्रिवेदी यांची बौद्धिक दिवाळखोरी !
     जयपूर - हिंदूंसाठी पवित्र असलेल्या रामचरितमानस या ग्रंथाची निर्मिती करतांना संत तुलसीदास यांनी एका मशिदीमध्ये आश्रय मागितला होता आणि ती बाबरी मशीद असू शकते. त्यामुळेच रामचरितमानसावर मोगलांचा प्रभाव दिसून येतो, असे विधान जयपूर येथील साहित्य संमेलनामध्ये देहली विश्‍वविद्यालयाचे प्राध्यापक हरिश त्रिवेदी यांनी करून स्वतःची बौद्धिक दिवाळखोरीच उघड केली आहे.

७ फेब्रुवारी २०१६ ला बार्शीत (जिल्हा सोलापूर) हिंदु धर्मजागृती सभा !

हिंगणगावच्या (जिल्हा धाराशिव) प्रत्येक घरातील एका तरी हिंदूला सभेला 
आणण्यासाठी प्रयत्न करू ! - श्री. बळीराम मारकड आणि उपसरपंच सौदागर गोरे
श्री. सांगोलकर ग्रामस्थांना सभेचा विषय सांगताना
     परांडा (जिल्हा धाराशिव), २९ जानेवारी (वार्ता.) - येथे ७ फेब्रुवारी २०१६ या दिवशी बार्शी येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला हिंगणगावच्या प्रत्येक घरातील एका तरी हिंदूला सभेला आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन श्री. बळीराम मारकड आणि उपसरपंच सौदागर गोरे यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना दिले.

साहित्यिकांना राष्ट्राच्या उत्थापनाचे मंथन करण्यास प्रवृत्त करणारे एकमेवाद्वितीय साहित्यिक स्वातंत्र्यवीर सावरकर !

रत्नागिरी येथे २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत होत असलेल्या स्वातंत्र्यवीर 
सावरकर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने...
१. आपल्या साहित्यातूनही राष्ट्राचे संरक्षण आणि उत्थापन यांचाच विचार करणारे सावरकर !
लंडनमध्ये एकदा गुप्तचरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अडवले आणि म्हटले, महाशय, क्षमा करा. आम्हाला तुमच्याविषयी संशय आहे. तुमच्यापाशी घातक हत्यार आहे, अशी निश्‍चित वार्ता असल्याने तुमची झडती घ्यायची आहे !

शनि देव नाही, तर ग्रह आहे, या शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या विधानाला संतांकडून विरोध !

      नवी देहली - शनिशिंगणापूरच्या प्रकरणी द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले होते की, महिलांनी शनीच्या चौथर्‍यावर प्रवेशासाठी भांडण्याची काही आवश्यकता नाही. त्यांनी शनीची पूजाच करायला नको, पूजा ईश्‍वराची होते, ग्रहाची नाही, त्यामुळे शनीची पूजा करण्याऐवजी त्याच्यापासून दूर रहायला हवे. त्यांच्या या विधानावर आता काही संतांनी टीका केली आहे.

गांधीहत्येमध्ये कोणत्याही प्रकारे सावरकरांना गोवून हिंदुत्ववादी चळवळीला चिरडून टाकण्यासाठी नेहरू सरकारने केलेल्या कुटील कारवाया !

३० जानेवारी या गांधीवधदिनानिमित्त...
     नथुराम गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ या दिवशी नवी देहली येथे गांधीजींची हत्या केली. या हत्येमध्ये येनकेनप्रकारेण स्वातंत्र्यवीर सावरकरांना गोवून वाढत्या हिंदुत्ववादी चळवळीला चिरडून टाकण्याचा चंग नेहरू शासनाने बांधला होता. त्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या कुटिल कारवायांचा पाढा गांधींच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध करत आहेत.

नास्तिक महिलांनो, राष्ट्रद्रोही गोष्टींच्या विरोधात शक्ती वापरा !

     २६ जानेवारी या दिवशी काही नास्तिकवादी महिलांनी शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्यासाठी मोठे आंदोलन केले. त्या आंदोलनाला यश आले नाही, हेही तितकेच महत्त्वाचे. या आंदोलनाला प्रसिद्धीमाध्यमे, तथाकथित पुरोगामी, राजकीय आणि सामाजिक व्यक्तीमत्वे यांनी उचलून धरले. त्यापूर्वीही शनिशिंगणापूर, सातारा जिल्ह्यातील सोळशी येथील श्री शनैश्‍वर मंदिर आणि बीड शहरातील श्री हनुमान मंदिरात महिलांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. सदर कृतीने आपण जणू काही महिलांच्या क्रांतीचे बिगुल फुंकले आणि त्यामुळे महिलांचे सर्व प्रश्‍न संपणार आहेत, असाच अविर्भाव तथाकथित पुरोगामी आणि नास्तिकवादी मंडळी यांच्या वर्तनातून दिसत आहे. खरे पहायला गेले, तर ही लढाई न्यायासाठी नव्हे, तर अहंकारासाठी जास्त आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची मुक्ताफळे !

     प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले, धनाजी गुरव, भारत पाटणकर आदी विद्रोही साहित्यिक निष्ठावान, अभ्यासू आहेत. त्यांचे समर्पण आणि तपश्‍चर्या यांना विनम्र अभिवादन ! पण सतत विद्रोहाची भूमिका घेणे शक्य आहे का, हेही पहायला हव - श्रीपाल सबनीस, अध्यक्ष, ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे

धर्मनिरपेक्ष भारतात शासकीय वाहिनीवरून पोपच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण !

      २५ डिसेंबरला नाताळच्या दिवशी दुपारी दूरचित्रवाणीवरील वाहिन्या पहात असतांना DD National पाशी थबकलो. खरं पहायला गेलं, तर DD National ही वाहिनी सहसा कुणी आवडीने अथवा मुद्दामहूनही पहात नाही. त्या दिवशी मात्र या शासकीय वाहिनीवर चालू असलेला कार्यक्रम पाहून धक्का बसला. वाहिनीवर Pope Christmas Message Live अशा नावाचा कार्यक्रम (दुपारी ४.३० ते ५.३०) चालू होता. उत्सुकता म्हणून तो कार्यक्रम बघितला आणि त्यातून तथाकथित पुरोगाम्यांच्या दांभिकपणाची जाणीव झाली. त्या निमित्ताने काही सूत्रांचे विचारमंथन झाले. 

पुरातन धार्मिक स्थळ असलेल्या भोजशाळेत हिंदूंना प्रार्थना करायला मिळायलाच हवी !

भोजशाळेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !
टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचे परखड मत
अधिवक्ता
संजीव पुनाळेकर 
     मुंबई - धार, मध्यप्रदेश येथे दगडापासून बनलेली पुरातन अशी भोजशाळा आहे. या ठिकाणी मोठे दगडी खांब आणि यज्ञकुंड आहे. ब्रिटीशकालापासून म्हणजेच १९११ पासून या स्थळाची हिंदूंचे प्रार्थनास्थळ म्हणून नोंद आहे. याविषयी कागदपत्रे उपलब्ध आहेत. या ठिकाणची सरस्वतीची मूर्ती लंडनमध्ये आहे. ही मूर्ती परत आणण्याचा प्रयत्न पंतप्रधान वाजपेयी यांच्या शासनकाळात झाला होता. वाद निर्माण झाल्यानंतर मुसलमानांनी या ठिकाणी मशीद निर्माण केली. भोजशाळेचे बांधकाम दगडाचे आहे, तर मशिदीचे बांधकाम विटांचे आहे. यावरून हे हिंदूंचे स्थळ आहे, हे स्पष्ट आहे. हिंदूंच्या स्थळाचा विध्वंस केल्याविषयी मुसलमानांनी हिंदूंची क्षमा मागायला हवी. हिंदूंना या ठिकाणी सरस्वतीची उपासना करायला मिळावी हीच आमची मागणी आहे, असे स्पष्ट प्रतिपादन सनातन संस्थेचे कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर २२ जानेवारीला झालेल्या मुझफ्फरनगरनंतर धार का ? या विषयावरील चर्चासत्रात केले.

आव्हाड आतंकवादी हाफिज सईदलाही बोलावतील ! - संजय राऊत

      मुंबई - आव्हाड उद्या पाकिस्तानी आतंकवादी हाफिज सईदलाही ठाण्यात बोलावू शकतात आणि इशरत जहाँ या नावाने पुरस्कार द्यायलाही ते मागेपुढे पहाणार नाहीत. अशा बाटग्यांपासूनच देशाला मोठा धोका आहे, असे टीकास्र शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी यांनी सोडले आहे. शिवसेनेच्या चेतावणीनंतर २९ जानेवारी अंधेरी येथे आयोजित केलेला गुलाम अलींचा कार्यक्रम रहित करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर मुंबईप्रमाणेच गुलाम अलींचा ठाण्यातील कार्यक्रमही उधळून लावण्याची चेतावणी दिली होती.

सनातन संस्था आतापर्यंत सबनीस यांच्या कोणत्याही प्रकारे संपर्कात आली नसतांना अशी वक्तव्ये करणार्‍यांची कीव करावी तेवढी थोडी !

     मी साहित्यकारणात असूनही माझी गाढवावरून धिंड काढण्यात येत आहे. सनातनच्या गोळ्या घातल्या जात आहेत. माझ्यासारखा वेडा, अव्यवहारी माणूस राजकारणात टिकूच शकत नाही. - श्रीपाल सबनीस, अध्यक्ष, ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

नाशिक येथे हिंदु धर्मजागृती सभा

दिनांक : ३१ जानेवारी, वेळ : सायंकाळी ५
स्थळ : आर्.पी. विद्यालय मैदान, निमाणी बस स्थानकाजवळ, पंचवटी, नाशिक.
भ्रमणभाष क्रमांक : ९४०४९ ५६४८१

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा

      पुणे, २९ जानेवारी - स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (मुंबई) आणि कलांगण (बालस्वर) यांच्या वतीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ३१ जानेवारी २०१६ या दिवशी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी उद्यान, दादर येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये प्रवेश सशुल्क असून शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक हे विषय केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना गौरवचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. अन्य सहभागी प्रत्येक स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.
     कुठे निवडणुका आल्यावरच निवडून येण्यासाठी सभा घेणारे सर्व राजकीय पक्ष, तर कुठे केवळ राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात जागृती होण्यासाठी सभा घेणारी हिंदु जनजागृती समिती !
अध्यात्मातील प्रत्येक का अन् कसे यांची शास्त्रशुद्ध उत्तरे
www.sanatan.org

सर्व साधकांना खाऊ मिळावा, या हेतूने स्वतः अगोदर खाऊ न खाणारी कु. अंबिका हंबर्डे (वय ९ वर्षे) !

कु. अंबिका हंबर्डे
      कु. अंबिका अमोल हंबर्डे हिचे आई-बाबा रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. तसेच अंबिकाही शाळेतून आल्यावर तिला आश्रमात जमेल ती सेवा करते. तिची आई ग्रंथ विभागात सेवा करते. त्यामुळे अंबिकाही ग्रंथ विभागात अधिक वेळ असते. एखाद्या साधकाने खाऊ आणला की, अंबिका तो खाऊ विभागातील प्रत्येक साधकाला देते. ती खाऊ देत असतांना प्रत्येक वेळी मी तिला विचारते, तू हा खाऊ घेतलास का ? त्यावर ती सांगते, मी शेवटी घेते.
       एकदा ती खाऊ देत असतांना मी तिला म्हणाले, एकदा तरी तू सर्वांच्या आधी खाऊ खा ना ! त्यावर तिने सांगितले, मी आधी खाऊ खाल्ला, तर जे साधक विभागात उपस्थित नाहीत, त्यांना खाऊ मिळणार नाही. समजा हा खाऊ संपला, तर माझ्याकडे दुसरा खाऊ आहे.
       त्या प्रसंगी ९ वर्षांच्या अंबिकाची इतरांचा विचार करण्याची वृत्ती, प्रेमभाव आणि बुद्धीची प्रगल्भता पाहून मी आश्‍चर्यचकित झाले.
- सौ. अंजली काणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२२.१२.२०१५)

जन्मतःच सात्त्विकतेची आवड असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा धुळे येथील चि. पवन भगवान चव्हाण (वय २ वर्षे) !

चि. पवन चव्हाण
      ३०.१.२०१६ (पौष कृष्ण पक्ष षष्ठी) या दिवशी धुळे येथील चि. पवन भगवान चव्हाण याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
चि. पवन भगवान चव्हाण याला सनातन 
परिवाराकडून वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !
१. जन्म ते १ वर्ष
१ अ. धर्मकार्य चालू असतांना बाळाचा जन्म झाला, याचा आनंद होणे : २२.१.२०१४ या दिवशी सकाळी ९.१५ वाजता जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेची प्रसारफेरी निघाली आणि त्याच वेळी पवनचा जन्म झाला. धर्मकार्य चालू असतांना पवनचा जन्म झाला, याचा मला आनंद झाला.
१ आ. तो झोपेत बोटांच्या वेगवेगळ्या मुद्रा करतो.
१ इ. लाल मुंग्या न चावणे : पवन ६ मासांचा (महिन्यांचा) झाल्यावर अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना झोक्यात झोपलेला असतांना त्याच्या पाठीखाली लाल मुंग्या होत असत; पण देवाच्या कृपेमुळे त्याला एकही मुंगी चावत नसे.

बालवयातच सात्त्विक गोष्टींची आवड असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. हर्षिणी प्रतीक ठोमके (वय १ वर्ष) !

चि. हर्षिणी ठोमके
      कोल्हापूर येथील चि. हर्षिणी प्रतीक ठोमके हिचा पौष कृष्ण पक्ष षष्ठी (३०.१.२०१६) या दिवशी पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आजी सौ. उमा ठोमके यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. हर्षिणी प्रतीक ठोमके हिला सनातन 
परिवाराकडून प्रथम वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !
१. जन्म ते ४ मास
अ. ती जन्मल्यावर तिचे डोळे श्रीकृष्णासारखे दिसत होते.
आ. ती अडीच मासांची असतांना आम्ही श्रीकृष्णाचा जप करायचो. तेव्हा तीसुद्धा ॐचा उच्चार करत असे.
इ. तिच्या अंथरुणाजवळ दत्ताचे चित्र ठेवले की, ती शांत झोपते, तसेच दत्ताचा नामजप लावल्यावर शांत रहाते.

प.पू. डॉक्टरांच्या कृपेने श्रीकृष्ण आणि श्री लक्ष्मीदेवी यांच्या चैतन्यमय अन् सुंदर रूपांचे झालेले विलोभनीय दर्शन

      १५.७.२०१४ च्या रात्री ९.४५ च्या सुमारास माझे मन काहीसे अस्वस्थ होऊन मला झोप येत नव्हती. आमच्या खोलीतील सर्व साधिका झोपल्या असल्याने त्यांना त्रास होऊ नये; म्हणून मी खोली क्रमांक २०५ जवळील आगाशीत जाऊन बसले. एकीकडे मी नामजप करत होते, तर दुसरीकडे माझे मन अस्वस्थ होते. ते पूर्वपदावर यावेसे वाटत होते; मात्र तसे होत नव्हते. नामजप करतांना माझ्या मनात विचार आला, देवा, माझ्याकडून प्रार्थना होत नाही; पण तू सांगितल्याप्रमाणे नामजप मात्र होत आहे. मग मी काय करू ?
१. औदुंबर वृक्षाजवळ शंखचक्रगदाधारी सुंदर श्रीकृष्णाचे दर्शन 
होणे, गोविंदाच्या डोळ्यांतून दया, करुणा, कृपा आणि प्रेम ओसंडून 
वहात असल्याचे वाटणे आणि गोविंदाच सर्व जिवांची काळजी घेत असून 
अनेक रूपांत दर्शन देत आहे, या विचाराने भावजागृती होऊन कंठ दाटून येणे
सौ. अंजली कणगलेकर
      त्याच वेळी आश्रमाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला विहिरीच्या पलीकडे असलेल्या औदुंबराच्या वृक्षाकडे नकळत माझी दृष्टी गेली आणि मला तेथे देवी आहे, असे प्रथम वाटले; म्हणून मी निरखून पाहू लागले. तेव्हा आरंभी मला तिथे शंख आणि चक्र धारण केलेले दोन हात दिसले आणि त्यानंतर मुकुट दिसला. त्या मुकुटाच्या पुढील बाजूवर एक मोठा खडा होता. वरील बाजूस मोरपीस लावले होते. कानात कुंडले होती. त्यानंतर दोन रेखीव डोळे आणि सरळ नाक दिसले. याचा अर्थ ती देवी नसून तो माझा गोविंदा होता. तो तोंडवळा इतका रेखीव होता की, त्याचे वर्णन शब्दांत करणे शक्य नाही. त्याच्या कपाळावर गंध लावले होते. त्याच्या डोळ्यांतून दया, करुणा, कृपा आणि प्रेम ओसंडून वहात आहे, असे मला वाटले. त्याचे ते दयार्द्र नेत्र पाहून माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. आता त्याचे रूप मला स्पष्ट दिसत होते. तो चतुर्भुज असूनही त्याने पुढील दोन हातांची घडी घातली होती. (त्याचे कारण मात्र मला कळले नाही.) गोविंदा उजव्या पायाची मांडी घालून डावा पाय खाली सोडलेल्या स्थितीत बसला होता. हे गोविंदा, तू सर्व जिवांची किती काळजी घेतोस आणि त्यांना किती रूपांत दर्शन देतोस ?, असा माझ्या मनात विचार आला आणि या विचाराने माझा कंठ दाटून आला.

धार्मिक विधींच्या वेळी केल्या जाणार्‍या काही कृतींमागील शास्त्र

वेदमूर्ती केतन शहाणे
१. धार्मिक विधींच्या वेळी यजमान 
दांपत्यातील पत्नीने पतीच्या उजव्या 
हाताला दर्भच लावणे अधिक योग्य असणे
     प.पू. रामभाऊस्वामी यांच्या यज्ञाच्या संकल्पविधीच्या वेळी पू. (सौ.) गाडगीळ यांनी पू. मुकुल गाडगीळ यांच्या उजव्या हाताला दर्भ लावला. धार्मिक विधींच्या वेळी यजमान दांपत्यातील पत्नीने पतीच्या उजव्या हाताला स्वतःच्या हाताने स्पर्श न करता दर्भच लावणे अधिक योग्य आहे. त्रेताग्नि उपासनेत दर्भच लावत. स्मार्त याज्ञिकीत हाताला हात लावण्यास सांगतात.
२. दक्षिण भारतात पुरुष धार्मिक 
विधींच्या वेळी लुंगी नेसतात आणि 
क्वचित प्रसंगी धोतर (काष्टा घातलेले) नेसतात
      प.पू. रामभाऊस्वामी यांच्या यज्ञाला आलेले दक्षिणेतील याज्ञिक धोतर नेसले होते. काष्टा घातलेल्या पद्धतीने धोतर नेसणे, सगळ्यात सात्त्विक आहे. दक्षिण भारतात धार्मिक विधींच्या वेळी लुंगी नेसण्याची पद्धत आहे. क्वचितप्रसंगी धार्मिक विधींच्या वेळी ते धोतर (काष्टा घातलेले) नेसतात; मात्र संन्याशाला काष्टा घालण्याचे बंधन नाही.

नामपट्ट्यांचे मंडल घालून झोपल्याने साधिकेचे वाईट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण होणे

     रामनाथी आश्रमात आल्यावर एका साधिकेने रात्री झोपतांना नामपट्ट्यांचे मंडल घालायला सांगितले; पण नामपट्ट्या नसल्यामुळे तात्पुरते कापराचे मंडल घालू शकते, असे मी म्हणाले. त्या दिवशी रात्री झोपतांना माझ्याकडून मंडल घालणे झाले नाही. दुसर्‍या दिवशी झोपण्याच्या आधी मंडल घालावे, याची ईश्‍वराने आठवण करून दिली. सहसाधिकेनेही मंडल घातले होते. या दोन मंडलांमध्ये थोडीशी जागा उरली होती. सकाळी उठल्यावर लक्षात आले की, लादीवर डाग उमटले होते. प्रियांकाताईने (कु. प्रियांका लोटलीकर यांनी) सांगितले, हे वाईट शक्तींचे आक्रमण आहे आणि ते मंडल न घातलेल्या जागेवरच झाले आहे. त्या वेळी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. श्रीकृष्णाने त्या रात्री मला मंडल घालण्यासाठी सुचवले आणि माझे रक्षण केले. प्रियांकाताईने सांगितले, मंडलामुळे त्रासांची तीव्रता न्यून झाली आहे.
- कु. केतकी अरुण कुलकर्णी, लातूर (१९.५.२०१५)
     (भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांना आलेल्या या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक)

साधकाला पडणारी समष्टी साधनेविषयक स्वप्ने आणि त्याची कारणमीमांसा

१. मला झोपेत अधूनमधून पुढीलप्रमाणे अनुभव येतो.
श्री. राम होनप
अ. स्वप्नात एकदा जंगलात काही तरुण व्यायाम करीत असल्याचे दृश्य दिसले. ते अतिशय सक्षम आणि उत्तम साधक वाटत होते, त्यांना बघून मी त्यांच्या गुरूंची भेट घेतली. ते एक तेजस्वी ऋषी दिसत होते. त्यांना भेटून मी सनातनच्या कार्याविषयी माहिती सांगून त्यांच्याशी त्यांच्याकडील तरुणांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घेण्याविषयी बोललो. त्यानंतर पुढे काय झाले, हे कळले नाही.
आ. झोपलो असतांना एकदा मी आकाशमार्गाने जात होतो. वाटेत माझ्या परिचित असलेली मृत झालेली एक आजी दिसली. तिचा आत्मा अतृप्त असल्याचे लक्षात आल्यावर तिला मी दत्ताचा नामजप करण्यास सांगितले.
इ. २ - ३ दिवसांपूर्वी रात्री झोपेत असतांना मी एका विवाहित स्त्रीच्या घरी असून तिला कुलदेवीचा तसेच दत्ताच्या नामजपाचे महत्त्व सांगून तिच्याशी साधनेविषयक चर्चा करत असतांनाचे मी बघत होतो. असे बर्‍याच वेळ चालू होते, असे लक्षात आले.

प्रदक्षिणा आणि परिक्रमा

१. प्रदक्षिणा (प्र + दक्षिणा)
      प्रदक्षिणा म्हणजे देव किंवा तीर्थक्षेत्र यांना स्वतःच्या उजवीकडे ठेवून मार्गक्रमण करणे. यात दिशेचा थेट उल्लेख आहे.
२. परिक्रमा (परि + क्रमा)
      परि म्हणजे सर्व बाजूंनी आणि क्रमण म्हणजे फिरणे. गोल फिरणे याला परिक्रमा म्हणतात. यात दिशेचा थेट उल्लेख नाही. नदी, तीर्थक्षेत्र यांना स्वतःच्या उजवीकडे ठेवून मार्गक्रमण करणे, असा शब्दाच्या व्युत्पत्तीत उल्लेख नाही; परंतु शास्त्रानुसार परंपरा हाही शब्दांचा अर्थ लावण्यासाठी महत्त्वाचा घटक असल्याने नदी, तीर्थक्षेत्र यांना स्वतःच्या उजवीकडे ठेवून मार्गक्रमण करणे, असाच याचा अर्थ घेतला जातो.

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (माई) यांच्याविषयीचा दैनिक सनातन प्रभातमधील लेख वाचल्यावर प्रभु रामचंद्राचा निःस्सीम भक्त असलेल्या हनुमंताची आठवण होणे

प.पू. परशराम पांडे
     १२.१.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या पृ.क्र. ६ वर पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (माई) - निष्काम मातृसेवेचा आदर्श ! या मथळ्याखाली लेख प्रसिद्ध झाला होता. त्यातील दुसर्‍या सूत्रात त्यांनी त्यांच्या आईला केलेल्या मागण्याविषयी लिहिले आहे. त्यांनी त्यांच्या आईकडे अशी गोष्ट मागितली की, जी मोक्षाला जाईपर्यंत त्यांच्यासमवेत राहील, किंबहुना त्या गोष्टीमुळे माईंना मोक्ष मिळेल. त्यांनी त्यांच्या आईकडे केवळ आशीर्वाद मागितला. त्यांचे हे मागणे वाचल्यावर मला प्रभु रामचंद्राचा निःस्सीम भक्त असलेल्या हनुमंताची आठवण झाली. मारुतिरायाने प्रभु रामचंद्राकडे मायेतील कुठलेच मागणे मागितले नव्हते. त्याने प्रभु रामचंद्राला प्रभो, मला मायेतील काही नको. शाश्‍वत असे तुझे नाम मला दे, असे मागणे मागितले होते.
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१.२०१६)

महर्षींनी साधकांकडून दक्षिणा घेऊन त्या धनातून काही मंदिरांचे नित्य प्रतिपालन करून देवांच्या पूजेतून प्रक्षेपित होणारी स्पंदने परम गुरुजींच्या शिष्यांना आणि त्यांच्या कार्याला मिळवून देऊन त्यांना आध्यात्मिक लाभ करवून देणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्याकडून पूर्वीच काही मंदिरे बांधून घेणे आणि पुढे येणार्‍या परम गुरुजींच्या शिष्यांना अन् परम गुरुजींच्या कार्याला आशीर्वाद देण्यासाठीच या मंदिरांची आम्ही आधीच योजना करून ठेवली असल्याचे नाडीवाचनातून सांगणे : काही मासांपूर्वी देहली येथे झालेल्या नाडीवाचनात महर्षींनी सनातनच्या साधकांना प्रत्येक मासाला ठराविक रकमेत दक्षिणा देण्यास सांगितले. जयपूर, राजस्थान येथे एका साधकाच्या घरी नाडीवाचन झाले, त्या वेळी महर्षींनी सनातनच्या साधकांना प्रतिमास एका ठराविक रकमेची दक्षिणा देण्यास सांगितले. महर्षींनी सांगितले, या दक्षिणेचा उपयोग आम्ही बांधलेल्या मंदिरातील देवाला प्रतिदिन अभिषेक घालणे, वस्त्र नेसवणे, त्याच्यासाठी प्रसाद बनवणे, तसेच मंदिराची देखभाल करणे, उत्सवाच्या वेळी अन्नदान करणे, कधी यज्ञाचे आयोजन करणे, या धार्मिक कार्यासाठी केला जाईल. यातून मिळणार्‍या दैवी स्पंदनांच्या परिणामामुळे सनातनच्या त्या त्या परिवाराचे पुढे रक्षणही केले जाईल.

साधकांनो, एखाद्या साधकाने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यावर निराश होऊ नका !

परात्पर गुरु डॉ. आठवले
    काही साधकांना एखाद्या साधकाने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यावर निराशा येते. त्यांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.
१. ६० टक्के पातळी गाठणार्‍या साधकात कोणते गुण आहेत ?
२. आपण कमी कुठे पडतो ?
३. दोघांची साधना सारखीच असली, तरी एकाची प्रगती जलद होते, दुसर्‍याची नाही. याचे कारण पहिल्यास प्रारब्धाची तीव्रता अल्प असते, तर दुसर्‍यात प्रारब्धाची तीव्रता अधिक असते.
४. निराशा येण्याऐवजी त्या साधकाने ६० टक्के पातळी गाठली, तर मीही गाठू शकेन, असा विचार करावा किंवा त्यासंदर्भात स्वयंसूचना द्याव्यात.
५. चांगले साधकत्व असल्यास निराशा न येता त्या साधकाचे कौतुक केले जाते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.१.२०१६)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जिवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

   
परात्पर गुरु डॉ. आठवले
  धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी जनता नीतीशून्य झालेल्या भारतात भ्रष्टाचार, बलात्कार, दंगली यांपेक्षा निराळे काय होणार ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

स्नेही निर्धन असला, तरी चालेल पण सदाचारी असावा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    धनवान स्नेही दुराचारी असेल, तर तो कधीही तुमचा विश्‍वासघात करू शकतो; पण तुमचा स्नेही सदाचारी असेल, तर तो कितीही निर्धन असला, तरी नित्य तुम्हाला साथच देतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

भरकटलेली चर्चा !

संपादकीय
     शनिशिंगणापूर येथील शनिदेवांच्या चौथर्‍यावर चढून महिलांनी शनिदेवांचे दर्शन घेण्याचे सूत्र आता देशभर चर्चेत आहे. देशातील विविध दूरचित्रवाहिन्यांवर चालू असलेली चर्चा हा त्याचा पुरावा आहे. मूळ सूत्र चौथर्‍यावर चढून महिलांनी दर्शन घेणे, या विषयाशी संबंधित आहे. हा मूळ विषय भरकटला आणि महिलांना शनिदेवांचे दर्शन घेण्यास अडथळा, असे त्याचे स्वरूप झाले. ज्यांचा चौथर्‍यावर चढून देवदर्शन घ्यायचा अट्टाहास आहे, त्यांचे लोकेषणाचे षड्यंत्र त्यामुळे उघड झाले. निवळ पाच दिवस ही चर्चा विविध वाहिन्यांवर घेण्यात आली. अखेर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात गेले आणि त्यावर कायद्याच्या चौकटीत राहून निवाडा लागेल. शनिशिंगणापूरच्या मंदिरातील धार्मिक परंपरा रद्दबातल ठरवण्याविषयी न्यायालयाला लक्ष घालावे लागत आहे, याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. असो. मूळ विषयाला बगल देऊन वृत्तवाहिन्यांवर चर्चा घडवून आणल्याने जनतेमध्ये कसा गोंधळ निर्माण होतो, त्याचे उत्तम प्रात्यक्षिक या प्रकरणामुळे झाले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn