Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. विजय जोशी, मुंबई यांची पुण्यतिथी

भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी केवळ चौथर्‍यावरच नव्हे, तर शनिमंदिरातही येऊ नये ! - धर्मादाय सहआयुक्तांची नोटीस

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर नास्तिक महिलांनी चढण्याच्या संभाव्य धर्मद्रोहाचे प्रकरण हिंदूंनो, सहआयुक्तांनी दिलेल्या या नोटिशीचे पोलीस 
आणि प्रशासन यांनी पालन करावे, यासाठी आग्रह धरा !
    
चौथर्‍यावर असलेली शनिदेवाची मूर्ती -
पुणे - श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याचा धर्मद्रोह करू पहाणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या नास्तिक महिलांना शासनाची सणसणीतच चपराक बसली आहे. पुणे येथील धर्मादाय सहआयुक्त श्री. शि.ग. डिगे यांनी या महिलांनी २६ जानेवारीला चौथर्‍यावरच नव्हे, तर शनिमंदिरातही येऊ नये, असे नोटिशीत म्हटले आहे.
या नोटिशीत म्हटले आहे की,
१. भूमाता ब्रिगेडने ४०० महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्याचे घोषित केले आहे. त्यांना विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. त्यामुळे देवस्थानाच्या संपत्तीची हानी होऊ शकते.
२. २८ नोव्हेंबर २०१५ या दिवशी झालेल्या घटनेविषयी नगरच्या धर्मादाय उपायुक्तांनी पाठवलेल्या अहवालातही ही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
३. महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये न्यासाच्या संपत्तीची हानी होत असल्यास तेथे प्रतिबंध लादण्याचा अधिकार कार्यकारिणीस आहे.

सनातन संस्था धर्मप्रसाराचे उत्कृष्ट कार्य करत आहे ! - योगऋषी रामदेवबाबा

  
योगऋषी रामदेवबाबा
   मुंबई - सनातन संस्था धर्मप्रसाराचे उत्कृष्ट कार्य करत आहे, असे गौरवोद्गार योगऋषी रामदेवबाबा यांनी काढले. पतंजली योग समिती मुंबई यांच्या वतीने योगऋषी रामदेव बाबा यांचे योग चिकित्सा आणि ध्यान निःशुल्क शिबीर वांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स एम्एम्आर्डीए मैदान येथे १७ ते २१ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आले होते. शिबीर समाप्तीनंतर हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता वैद्य उदय धुरी यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. वैद्य धुरी यांनी योगऋषी रामदेवबाबा यांना दैनिक सनातन प्रभात आणि सनातनचे प्रकाशन गोसंवर्धन ग्रंथ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. शिबिराचा सलग ५ दिवस सहस्रो महिला, पुरुष आणि विद्यार्थी यांनी लाभ घेतला. या शिबिरात सनातन संस्थेच्या साधिका आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

(म्हणे) शनिदेवाच्या चौथर्‍याभोवती संरक्षककडे केल्यास कारवाई करणार !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्यासाठी पोलिसांची नोटीस
धर्मरक्षणासाठी स्वत: काही करायचे नाही आणि
 हिंदूंनाही करू द्यायचे नाही, हा पोलिसांचा हिंदुद्वेषच !
     शनिशिंगणापूर - २६ जानेवारीला येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याची चेतावणी भूमाता ब्रिगेडच्या नास्तिक महिलांनी दिली आहे. या धर्मद्रोहाच्या विरोधात स्थानिक भक्त, श्री शनैश्‍वर देवस्थान, हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांनी सदर महिलांना रोखण्यासाठी शनिमंदिराभोवती संरक्षककडे करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठीच्या जागृतीसाठी ठिकठिकाणी आंदोलने चालू केली आहेत; मात्र स्थानिक पोलिसांनी समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस दिली आहे. तीत म्हटले आहे की, २६ जानेवारीला भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनाच्या विरोधात समिती करत असलेल्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्था यांचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

हिंदूंना नोटीस देण्यापेक्षा पोलिसांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना नगर जिल्हा प्रवेशबंदी करावी !

पोलिसांच्या नोटिशीला हिंदु जनजागृती समितीचे चोख प्रत्युत्तर !
     शनिशिंगणापूर - २६ जानेवारीला येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याची चेतावणी भूमाता ब्रिगेडच्या नास्तिक महिलांनी दिली आहे. हा धर्मद्रोह रोखण्यासाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंना नोटीस देण्यापेक्षा पोलिसांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना नगर जिल्हा प्रवेशबंदी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. समितीच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिआंदोलन केल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करू, अशी नोटीस दिली होती. त्या नोटिशीला उत्तर देतांना ही मागणी केली आहे. (पोलिसांना योग्य पद्धतीने उत्तर देऊन त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन ! - संपादक)
 या उत्तरात पुढे म्हटले आहे की,

नवापूर (जिल्हा नंदुरबार) येथील ऐतिहासिक मोर्च्यात १२ सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग

अल्पवयीन हिंदु मुलीवरील बलात्कार प्रकरण
१५ दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल न झाल्यास आक्रमक जनआंदोलन करण्याची चेतावणी
   
मोर्च्यात सहभागी हिंदू
  नंदुरबार - नवापूर शहरातील दोन धर्मांधांनी शेजारी रहाणार्‍या अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार केल्याच्या विरोधात १९ जानेवारी या दिवशी विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात १२ सहस्रांहून अधिक हिंदू सहभागी झाले होते. हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात १५ दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून आरोपपत्र (चार्जशीट) दाखल न झाल्यास याहून आक्रमक जनआंदोलन छेडले जाईल, अशी चेतावणी देण्यात आली. एवढा विराट मोर्चा निघूनही कोणतीही अनुचित घटना शहरात घडली नाही. या मोर्च्यात हिंदु जनजागृती समितीचाही सहभाग होता.

मराठी साहित्य संमेलनामध्ये ग्रंथप्रदर्शन कक्षामध्ये देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन करणार्‍या साहित्याचे विक्री कक्ष

     ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी (पिंपरी) - नुकतेच ८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पिंपरी येथे १५ ते १८ जानेवारी या कालावधीत पार पडले. समाजात साहित्याचे महत्त्व कळावे, वाचन संस्कृती वाढावी आणि त्यातून नवीन साहित्यिक निर्माण व्हावे, या उद्देशाने संमेलनामध्ये ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शन कक्षामध्ये ग्रंथांऐवजी इतर साहित्याची विक्री करणारेही कक्ष होते. या प्रदर्शनामध्ये सिल्व्हर लाईन, मराठी कॅलिग्राफी टी-शर्टची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात होती. त्यामध्ये देवतांचे विडंबनात्मक छायाचित्र, देवतांची नावे, छत्रपती शिवाजी महाराज, शिवप्रतिज्ञा अशा प्रकारचे टी-शर्ट उपलब्ध होते. (हिंदूंच्या संघटनाच्या अभावी देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन होते. त्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन निर्माण करणे आवश्यक आहे. - संपादक) या ठिकाणी अनेकांनी गर्दी केली होती. (अशा हौशागौशा लोकांमुळे साहित्याविषयीची ओढ वाढेल, याविषयी साशंकता आहे. साहित्य मंडळाने अशा विक्री केंद्राऐवजी मराठी साहित्य संपदेचे आणखी विक्री कक्ष उभारायला हवेत. - संपादक) त्याचप्रमाणे सरबते, आवळा लोणचे, कॅन्डी अशा वस्तू विक्रीचाही कक्ष लावण्यात आला होता. दुसर्‍या एका कक्षावर झाडांवर फवारणी करण्यासाठी वापरण्यात येणारे स्प्रे विक्रीसाठी ठेवले होते.

युद्धात भारतापेक्षा वरचढ होण्यासाठी पाक वाढवत आहे परमाणू शक्ती ! - अमेरिकेचा अहवाल

भारताचा सर्वनाश करण्यासाठी टपलेल्या पाकला धडा शिकवण्याची हीच 
योग्य वेळ आहे, हे केंद्रशासन जाणील का ?
     अमेरिका - भारताशी युद्धबळात वरचढ होण्यासाठी पाकिस्तानकडून विनाशक अशी परमाणू अस्त्रे बनवली जात आहेत. भारताने पाकवर सैन्य कारवाई केल्यास त्वरित प्रत्युत्तर देण्यासाठी छोट्या पल्ल्याची अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे पाक विकसित करत आहे. वर्ष २०२५ पर्यंत पाकिस्तानकडे २२० ते २५० अणूबॉम्ब असणार आहेत, असा अहवाल अमेरिकेने बनवला आहे.

पठाणकोटवरील आक्रमणातील आतंकवाद्यांना दोन भारतीय आतंकवाद्यांंची साथ

     नवी देहली - पठाणकोट हवाईतळावर आक्रमण करणार्‍या सहा आतंकवाद्यांपैकी चौघांनीच पंजाब सीमा ओलांडत घुसखोरी केली. दोन भारतीय आतंकवाद्यांची त्यांना साथ लाभली असण्याची शक्यता राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) वर्तवली असली, तरी या दोघांची ओळख उघड करण्यात आलेली नाही.
१. चार एके-४७ रायफली आढळून आल्यामुळे पाक घुसखोरांना दोन स्थानिक आतंकवाद्यांची साथ मिळाल्याच्या शक्यतेला दुजोरा मिळतो.
२. मारल्या गेलेल्या सहा आतंकवाद्यांंपैकी चार अतिरेकी जैश-ए- महंमद या संघटनेचे होते. इंटरपोलमार्फत जारी केलेल्या ब्लॅक कॉर्नर नोटीसमध्येही चौघांचाच समावेश आहे. हवाईतळावर सुरक्षा जवानांनी केलेल्या कारवाईत मारल्या गेलेल्या सहाही जणांची ओळख पटवायची आहे.

बेळगावात मराठी टायगर्स चित्रपट प्रदर्शित करणारच; धैर्य असेल, तर अडवून दाखवा ! - डॉ. अमोल कोल्हे, अभिनेता

     पुणे - ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले, तो लढा अजून संपलेला नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न हा ४० लक्ष सीमावासियांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे. तेथील तरुणांमध्ये या लढ्याच्या संदर्भात जागर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मराठी टायगर्स या एका चित्रपटाने कर्नाटक शासनाचे धाबे दणाणले आहे. त्या चित्रपटावर बंदी घालण्याचा आदेश तेथील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. (अल्पसंख्यांकांच्या चित्रपटांविषयी असा निर्णय घेण्याचे धाडस काँग्रेसच्या मराठीद्रोही मुख्यमंत्र्यांनी दाखवले असते का ? - संपादक) आम्ही मराठी टायगर्स बेळगावात प्रदर्शित करणारच. धैर्य असेल, तर अडवून दाखवा. आम्ही आमच्या बळावर सीमाभागामध्ये प्रदर्शित करून दाखवू, असे सडेतोड प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते आणि शिवसेनेचे पुणे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

आपण कायमच युद्धसज्ज रहाणे आवश्यक ! - लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर

     पुणे - शत्रूराष्ट्रांना भेटी आणि चर्चा हा युद्धनीतीचा महत्त्वाचा भाग असतो; पण हे करतांना गाफील राहून चालणार नाही. शस्त्रसज्ज राष्ट्राचीच प्रगती होत असते. पालटते युद्धतंत्रज्ञान, नवनवीन शस्त्रे, आधुनिक युद्धनीती याचा अभ्यास करून भारतीय लष्करही अद्ययावत होत आहे. प्रगत राष्ट्राच्या तुलनेत आपणही काही अल्प नाही. धर्माच्या नावाखाली आक्रमणे करून नागरिकांचे प्राण घेण्याची नवीन युद्धपद्धती सिद्ध झाली आहे. प्रत्यक्ष युद्धात जिंकणार नसल्याची खात्री असल्याने अशा प्रकारे छुपी आक्रमणे चालू आहेत. आपण सक्षम नसल्यास आपल्यावर युद्ध लादले जाते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यासाठी आपण कायमच युद्धसज्ज रहाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर यांनी केले.

श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढू पहाणार्‍या नास्तिक महिलांना शनिभक्त महिला रोखतील ! - शनिशिंगणापूर ग्रामस्थांचा एकमुखी निर्धार

शनिशिंगणापूर ग्रामस्थ, श्रीशनैश्‍वर देवस्थानचे पदाधिकारी, 
हिंदुत्ववादी संघटना, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची संयुक्त सभा 
धर्मपरंपरांच्या रक्षणार्थ संघटित झालेल्या शनिभक्तांचे अभिनंदन ! 

सभेमध्ये मार्गदर्शन करतांना सरपंच
श्री. बाळासाहेब बानकर आणि उपस्थित शनिभक्त महिला
     शनिशिंगणापूर, २१ जानेवारी (वार्ता.) - २६ जानेवारीला ४०० नास्तिक महिला श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून तेथील शेकडो वर्षांची परंपरा मोडणार आहेत. त्यांना शनिभक्त ग्रामस्थ महिलाच रोखतील, असा एकमुखी निर्धार येथील सभेमध्ये २० जानेवारी या दिवशी करण्यात आला. समस्त हिंदुत्ववादी संघटना, ग्रामस्थ, श्रीशनैश्‍वर देवस्थानचे पदाधिकारी, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत संयुक्त सभा आयोजित केली होती. या सभेला २०० हून अधिक शनिभक्त उपस्थित होते. त्यामध्ये शनिशिंगणापूर आणि सोनई येथील १२५ हून अधिक महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. 

धर्मपरंपरेच्या रक्षणासाठी नगरच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करू ! सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे आश्‍वासन

१. सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना निवेदन देतांना
हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी आणि सनातन संस्थेच्या महिला कार्यकर्त्या 

२. गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांना निवेदन
सादर करतांना हिंदुत्ववादी संघटनांच्या महिला कार्यकर्त्या
     मुंबई, २१ जानेवारी (वार्ता.) - श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर चढून काही महिला प्रवेश घेणार आहेत. सदर परंपरा मोडली जाऊ नये, यासाठी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशी स्वतः बोलीन, असे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्यांचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले. हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि सनातन संस्था यांच्या महिला कार्यकर्त्यांनी मंत्रालयात त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सौ. सविता लेले, सौ. धनश्री केळशीकर आणि सौ. वेदिका पालन या वेळी उपस्थित होत्या. या वेळी सौ. सविता लेले यांनी सांगितले की, सदर महिलांना रोखण्यासाठी आम्ही श्री शनिमंदिराच्या भोवती संरक्षण कडे सिद्ध करणार आहोत. आम्हाला पूर्ण पोलीस संरक्षण द्यावे आणि प्रथा मोडण्यासाठी येणार्‍या नास्तिक महिलांना रोखावे. 

(म्हणे) पाकमधील आक्रमण भारताने घडवले !

पाकशी वारंवार मैत्रीचा हात पुढे करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
पाकचे भारतद्वेष्टे माजी अंतर्गत गृहमंत्री रेहमान मलिक यांचा बेताल आरोप
    इस्लामाबाद - पाकिस्तानातील वायव्येकडील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाचा खान विद्यापिठात जिहाद्यांनी केलेले आत्मघातकी आक्रमण हे भारतानेच घडवून आणले आहे. या आक्रमणात भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा हात आहे, असा बेताल आरोप पाकिस्तानचे माजी अंतर्गत गृहमंत्री रेहमान मलिक यांनी एका दूरचित्रवाहिनीवर बोलतांना केला आहे. 

आतंकवाद्यांशी लढणारे पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या पाठीशी नागरिक ठामपणे उभे असल्याचा फेरीतून संदेश !

     पुणे - देशांतर्गत आतंकवाद्यांशी लढणारे पोलीस अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना आतंकवादी धमकावणार असतील, तर हे अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी एकटे नाहीत. त्यांच्या पाठीशी सर्व नागरिक ठामपणे उभे आहेत, हे दाखवून देण्यासाठी येथील नागरिकांनी आतंकवाद निषेध फेरीचे आयोजन केले होते. आतंकवादविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांना आणि त्यांच्या कुटुंबियाना उडवून टाकू, अशा आशयाचे धमकीपत्र इसिस या आतंकवादी संघटनेकडून मुंबई पोलिसांना प्राप्त झाले होते. त्याचा निषेध करण्यासाठी ही आतंकवाद निषेध फेरी १७ जानेवारी या दिवशी काढण्यात आली होती.

शनिशिंगणापूर मंदिर परिसराला महिला पोलिसांसह पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे !

श्री शनैश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. अनिता शेटे यांची पोलिसांकडे मागणी 
 प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी 'भूमाता ब्रिगेड'च्या विरोधात 
कायदेशीर कारवाई करून त्यांना 'नगर जिल्हा बंदी' करावी, ही अपेक्षा ! 
     नगर, २१ जानेवारी - शनिशिंगणापूर येथे २६ जानेवारी या दिवशी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर काही नास्तिकवादी महिलांना घेऊन प्रवेश करण्याचा निर्धार पुणे येथील 'भूमाता ब्रिगेड' नामक संघटनेने केला आहे. त्यामुळे त्या महिलांना चौथर्‍यावर प्रवेश करण्यापासून रोखण्याच्या दृष्टीने मुख्य मंदिर परिसरात महिला पोलिसांसह पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी श्री शनैश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. अनिता शेटे यांनी केली आहे. 

धार्मिक मूलतत्त्ववाद पसरवल्यावरून मुंबईतील मौलानासह तिघांवर आरोपपत्र

भारतात असे ठिकठिकाणी असलेले मूलतत्त्ववादी हीच इसिसची भारतातील जिहादी सेना आहे ! 
ती भारतभर पसरली असून त्याविरुद्ध हिंदू कसे लढणार आहेत ?
     डिप्पी वांकाणी, मुंबई - भारताबाहेरील आतंकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी धार्मिक मूलतत्त्ववाद पसरवल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) पुसद येथील मौलानासह तीन तरुणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (युएपीए) आणि भारतीय दंड संहितेखालील विविध गुन्ह्यांखाली हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे.

मराठी टायगर्स चित्रपटाच्या प्रदर्शनाला कर्नाटक उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

     बेंगळुरू - सीमाप्रश्‍नावर आधारीत मराठी टायगर्स या चित्रपटावर बंदी घालणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन आम्ही थांबवू शकत नाही आणि जर कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्‍न असेल, तर त्यासंदर्भात शासनाने पावले उचलायला हवीत, असे मत मुख्य न्या. सुभ्रो कमाल मुखर्जी आणि न्या. रवि मलिमथ यांनी व्यक्त केले आहे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर केले जाणारे राजकारण निषेधार्ह ! - अभाविप

     पुणे - भाग्यनगर येथील केंद्रीय विद्यापिठात संशोधन कार्य करणार्‍या रोहित वेमुला याने आत्महत्या केल्यानंतर आंबेडकर स्टुडन्ट्स असोसिएशनचा वैचारिक विरोधक समजले जाणार्‍या अभाविपवर विनाकारण टीका केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर वेमुला याच्या आत्महत्येनंतर केले जाणारे राजकारण निषेधार्ह आहे, असे अभाविपने प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे.
या पत्रात पुढे म्हटले आहे...
 १. वेमुला हा देशविरोधी विचारसरणी असणार्‍या आंबेडकर स्टुडन्ट्स असोसिएशनचा कार्यकर्ता होता. ही संघटना आंबेडकरी नाही, तर मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारांची आहे. याकूबला जेव्हा फाशी देण्यात आली, तेव्हा या संघटनेने त्याचा निषेध केला होता. या संदर्भात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी प्रश्‍न विचारला असता त्या संघटनेकडून अभाविप कार्यकर्त्याला पुष्कळ मारहाण करण्यात आली होती.

(म्हणे) 'आम्ही देवाला मानणारे भक्त आहोत !'

भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांचे विधान
 देवाला मानणारे देव-धर्माचे कधीही उल्लंघन करत नाहीत, 
हेही न कळल्याने वाटेल ते बरळून स्वतःचेच हसे करून घेणार्‍या तृप्ती देसाई ! 
     नगर - कोणत्याही परिस्थितीत २६ जानेवारीचे आंदोलन होणारच. आम्ही देवाला मानणारे भक्त आहोत. चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्याचा हक्क मिळावा, यासाठी आम्ही अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, असे विधान भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केले आहे. शनिशिंगणापूर येथील शनि चौथर्‍यावर महिलांनाही प्रवेश मिळावा, या मागणीसाठी आंदोलन पुकारलेल्या पुण्याच्या भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी १८ जानेवारी या दिवशी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या. 
     'हे आंदोलन झाल्यास कायदा-सुव्यवस्था बिघडू नये; म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल', असे पोलीस अधीक्षक डॉ. त्रिपाठी यांनी देसाई यांना सांगितले. त्यावर 'हे आंदोलन आम्ही अहिंसेच्या मार्गाने करणार आहोत. कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचा प्रश्‍नच नाही', असे देसाई यांनी सांगितले.

शनिशिंगणापूर येथील भूमाता ब्रिगेडच्या धर्मद्रोही कृतीला विरोध करण्यासठी पनवेल येथील धर्माभिमानी संघटित !

     पनवेल - शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश बंदी असतांना २६ जानेवारी या दिवशी चौथर्‍यावर जाण्याची चेतावणी भूमाता ब्रिगेड संघटनेने दिली आहे. त्याच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने येथे नुकतेच बालाजी मंदिरात हिंदुत्ववाद्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. 
     विहिंपचे कोकण प्रांताचे धर्माचार्य प्रमुख श्री. दशरथ भोपतराव म्हणाले, "भूमाता ब्रिगेडच्या जर ४०० महिला जाणार असतील, तर आपण ४००० जणांनी जायला हवे. हा विषय सर्व लोकांपर्यंत जाण्यासाठी आंदोलन घ्या आणि स्वाक्षर्‍यांची मोहीमही घ्या." यासंदर्भात त्यांनी सर्व सहकार्य करण्याची सिद्धता दर्शवली. 

देहलीत सम-विषम योजनेवर २० कोटी रुपये खर्च

     नवी देहली - देहलीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील शासनाने महत्त्वाकांक्षी सम-विषम योजनेवर तब्बल २० कोटी रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे.
     या वर्षीच्या प्रारंभी १ ते १५ जानेवारी या कालावधीत देहलीतील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी सम-विषम वाहने एकदिवसाआड वापरण्याची योजना देहली शासनाने राबवली होती. या योजनेसाठी देहली शासनानेे १४ कोटी रुपये खर्च करून भाड्याने बसगाड्या घेतल्या होत्या. यामुळे नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सहजरित्या उपलब्ध झाली होती, तसेच नागरिकांच्या सुरक्षेची माहिती देण्यासाठी स्वयंसेवक ठेवण्यात आले होते. त्यावर साडेतीन कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर सुमारे अडीच कोटी रुपये या योजनेसंदर्भात बनवण्यात आलेल्या विज्ञापनांवर खर्च झाले आहेत. देहली शासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार देहली वाहतूक महामंडळाने या योजनेसाठी १ सहस्र २०० अतिरिक्त बसगाड्यांची सोय केली होती. या बसगाड्या ४२ रुपये प्रती किलोमीटर दराने भाड्याने घेण्यात आल्या होत्या. या बसगाड्यांच्या तिकिटांमधून प्रत्येक दिवशी २३ लाख रुपये मिळकत झाली, तर सम-विषम नियम न पाळल्यावरून वाहनचालकांना आकारण्यात आलेल्या दंडातून शासनाला एकूण २ कोटी रुपये मिळाले.

पठाणकोट येथे घुसखोरी करणार्‍या २ जणांना भारतीय सैनिकांनी ठार केले

एकएक घुसखोराला मारण्याऐवजी त्याचे निर्मितीस्थान असणार्‍या पाकलाच धडा शिकवा !
      पठानकोट - पंजाबमधील पठाणकोटजवळ असलेल्या बमियाल सेक्टर येथे सीमेपलीकडून घुसखोरी करणार्‍या २ घुसखोरांना सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी २१ जानेवारीला ठार केले. या वेळी अन्य २ घुसखोर पळून गेले. २१ जानेवारीला पहाटे ४ वाजता ही घटना घडली. ताश सैनिक नाक्याजवळ ४ संशयित घुसखोरी करत असल्याचे सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना लक्षात आले. चेतावणी देऊन हे घुसखोर न थांबल्याने सैनिकांनी गोळीबार केला. या वेळी २ जण मारले गेले. गोळीबारात ठार झालेले आतंकवादी होते कि तस्कर याची चौकशी चालू आहे. गोळीबार झाल्यानंतर कार्यपद्धतीनुसार यासंदर्भात भारतीय सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यामध्ये फ्लॅग मिटिंग झाली. २ जानेवारी या दिवशी पठाणकोट सैन्य विमानतळावर आक्रमण करणारे आतंकवादी हे पठाणकोट भागातून घुसले होते. यामुळे सीमा सुरक्षा दलावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. यामुळे आता सीमा सुरक्षा दल सतर्क झाले आहे.

बदायू (उत्तरप्रदेश) येथे प्राचीन मंदिराचे सहा घुमट तोडल्याचे उघडकीस !

समाजवादी पक्षाच्या उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या संदर्भातील या असहिष्णुतेविषयी 
प्रसारमाध्यमे आणि धर्मनिरपेक्षतावाले गप्प का ?
संतप्त नागरिकांकडून पोलिसांवर दगडफेक !
     बदायू - येथील खुनक या गावामध्ये १५ जानेवारी या दिवशी १५० वर्षांपूर्वीच्या एका प्राचीन मंदिराच्या १२ घुमटांपैकी ६ घुमट तोडल्याचे निदर्शनास आले. हे पाहून संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीनंतर बर्‍याच कालावधीने बिनाबर ठाण्याचे पोलीस अधिकारी घुमटांचे पाडलेले अवशेष हटवण्यासठी काही मजुरांना घेऊन पोहोचले. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. थोड्या वेळाने प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी लिखित तक्रार देऊनही पोलिसांनी अद्यापही गुन्हा प्रविष्ट केलेला नाही. गावात यामुळे तणाव निर्माण झाला. (मुसलमानांची मशीद किंवा ख्रिस्त्यांची चर्च यांसंदर्भात असे घडले असते, तर धर्मनिरपेक्षतावाल्यांनी आणि वृत्तवाहिन्यांनी मोदी शासनाच्या नावाने हलकल्लोळ माजवला असता. हिंदूंच्या मंदिराच्या संदर्भात असे घडल्यावर तथाकथित धर्मनिरपेक्षतावाले ब्रही काढत नाहीत. वृत्तवाहिन्या तर अशा बातम्या दाखवतही नाहीत. - संपादक)

गोव्यातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षक विक्रम नाईक अवैध संपत्ती बाळगल्याप्रकरणी निलंबित

  • कुंपणच शेत खाते ! ही म्हण सार्थ करणारे गोवा पोलीस !
  • अशा भ्रष्ट अधिकार्‍यांना केवळ निलंबित करू नका, तर त्यांनी अवैध मार्गाने मिळवलेली सर्व संपत्ती शासनाधिन करा !
     फोंडा - लाचखोरीचा आरोप असलेले येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम नाईक यांना २० जानेवारी या दिवशी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर अवैध संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
     मागील वर्षी नोव्हेंबर मासात झालेल्या एका मारहाण प्रकरणानंतर त्या प्रकरणातील संशयित आरोपी फरार झाला होता. हा आरोपी त्याच्या एका मित्राशी संपर्क ठेवून असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. यानंतर पोलिसांनी त्या मित्राला चौकशीसाठी बोलावून त्याच्या साहाय्याने संशयिताला अटक केली होती. हे प्रकरण येथेच संपले होते; मात्र पोलीस उपनिरीक्षक विक्रम नाईक यांनी या प्रकरणात मित्राला गोवण्याचा डाव रचला. ३५ सहस्र रुपये न दिल्यास सहआरोपी करण्याची धमकी त्याला देण्यात आली. संबंधिताने हे संभाषण भ्रमणभाषवर रेकॉर्ड करून ते दक्षता खात्याच्या लाचलुचपतविरोधी अधिकार्‍यांकडे सुपुर्द केले होते. याची दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक नाईक यांच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यांच्या वाहनाची झडती घेण्यात आली होती. पोलीस तपासात त्यांच्या मिळकतीपेक्षा उत्पन्न अधिक असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. हे अतिरिक्त उत्पन्न कुठल्या मार्गाने आले याची चौकशी केली जाणार आहे.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, प्रशासकीय अधिकार्‍यांचा हा नाकर्तेपणा जाणा !
     शनिशिंगणापूर येथील धर्मपरंपरेच्या रक्षणाच्या संदर्भात आजवर गप्प असलेल्या सहआयुक्तांच्या विरोधात हिंदु विधीज्ञ परिषदेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर सहआयुक्तांनी प्रथमच शनिशिंगणापूर येथील धर्मपरंपरेच्या रक्षणासाठी परिपत्रक काढले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Dharmadroh par chup rahnewale Dharmaday sahaayukt ko Hindu Vidhidnya Parishad ke karan GR nikalna pada !
     Naak Dabane ke bad mukh kholnewale adhikari !
जागो !
     धर्मद्रोहपर चुप रहनेवालेे धर्मादाय सहआयुक्त को हिंदु विधीज्ञ परिषद के कारण जीआर् निकालना पडा !
     नाक दबाने के बाद मुख खोलनेवाले अधिकारी !

२५ वर्षे श्री शिवप्रतिष्ठाननेे ३०० किलोमीटरवरून जपलेले 'रायगड व्रत' !

     सांगली, २१ जानेवारी (वार्ता.) - महाराष्ट्र शासनाच्या वतीने २१ ते २४ जानेवारी या कालावधीत शिवकालीन संस्कृतीचा चैतन्यदायी इतिहास लोकांसमोर येण्यासाठी रायगड महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात दृकश्राव्य कार्यक्रम, व्याख्यानमाला, शिवकालीन नाणी प्रदर्शन, किल्ल्यांच्या प्रतिकृती, शिवराज्याभिषेक (नाट्यरूप), कथाकथन, पालखी, ढोलताशा, लोककला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्ताक्षरातील पत्रे पहावयास मिळणार आहेत. याच रायगडाचे एक व्रत सांगली येथील श्रीशिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गेली २५ वर्षांहून अधिक काळ पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली जपले आहे. सांगली येथील धारकरी प्रतिदिन ३०० किलोमीटर अंतर कापून दुर्गराज 'रायगड'च्या पूजेसाठी जात आहेत. कोणताही ऋतू, ऊन, वारा, पाऊस, कोणतीही अडचण दूर सारून १४ जानेवारी १९९१ पासून ही पूजा सांगलीतील धारकर्‍यांकडून अखंडितपणे चालू आहे. त्यामुळेच हीच पूजा आता 'रायगड व्रत' बनली आहे. हिंदूंचे पवित्र ठिकाण असणार्‍या श्रीशिवछत्रपतींचे सिंहासन ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी पूजा नियमितपणे होत नव्हती. ती नियमितपणे होणे, त्यासाठी नागरिकांचा तन-मन-धन यांचा त्याग होणे, या उद्देशाने ही पूजा चालू झाली.

रायगड किल्ल्यावर रायगड महोत्सवाला प्रारंभ

     रायगड - राज्यशासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून होणार्‍या रायगड महोत्सवाला २१ जानेवारीपासून प्रारंभ झाला. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. रायगड हा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजधानी किल्ला. याच किल्ले रायगड आणि पायथ्याच्या पाचाडमध्ये शिवकालीन प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. २४ जानेवारीपर्यंत हा महोत्सव असणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री. नितीन देसाई यांनी पाचाड येथे जिजामाता राजवाड्याजवळ शिवसृष्टी उभारली आहे, तर रायगड किल्लाही शिवकालीन स्वरूपात सजवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळही फुलांनी सजवले आहे. शिवसृष्टीमध्ये इतिहासकालीन गावाचा साज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात गाय, बैल यांचा वावर, पेंढ्या आणि गवताने साकारलेल्या झोपड्यांमध्येच विविध कक्ष उभारण्यात आले आहेत.

सांगली येथे विधवांचा हळदीकुंकू (?) समारंभ !

मैत्रीण संघटनेचा हिंदु धर्मद्रोही उपक्रम ! 
     सध्या राष्ट्र आणि धर्म यांवर होत असलेले आघात वेगाने वाढत आहेत. असे असतांना इतर सर्व महत्त्वाच्या समस्या सोडून महिलांना शनिचौथर्‍यावर प्रवेश द्यायचा कि नाही, मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश द्यायचा का नाही, विधवा महिलांचे हळदीकुंकू यांसारख्या अनावश्यक विषयांकडे लक्ष वेधले जात आहे. यातून हिंदूंचे आणि त्यांच्या धर्मश्रद्धांचे अस्तित्वच धोक्यात आणले जात आहे. त्यामुळे हिंदु धर्मातील परंपरा जतन करणे अत्यावश्यक आहे ! 

भविष्यात पाण्यासाठी जागतिक युद्ध होण्याची शक्यता !

कणकवली येथील जलपरिषदेत जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली भिती
     कणकवली - समुद्र किनार्‍यालगतच्या राज्यांमध्ये जलसाक्षरता चळवळ निर्माण करण्याची आवश्यकता आहे. जलसाक्षरता म्हणजे पाण्याचे महत्त्व समजणे, समजावणे आणि पाण्याचे प्रदूषण रोखणे. नैसर्गिक जलस्रोत दूषित होणे रोखण्यासाठी त्यासाठी सत्याग्रह करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कोकणातील पाणी अडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. पाणीप्रश्‍न सकारात्मक दृष्टीकोनातून सोडविला गेला नाही, तर पाण्यासाठी विश्‍वजल युद्ध होण्याची भीती जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी येथे वर्तविली.

हैद्राबाद विद्यापिठातील १० दलित प्राध्यापकांचे त्यागपत्र

रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येवरून जातीय राजकारण !
      हैद्राबाद - हैद्राबाद विद्यापिठातील रोहित वेमुला हा विद्यार्थी इतर मागासवर्गीय असतांना तो दलित असल्याचे भासवून दलित विरुद्ध दलितेतर असे जातीय तेढ निर्माण करून राजकारण केले जात असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी स्पष्ट केले होते. असे असतांना या आत्महत्येला जातीय रंग देण्यासाठी हैद्राबाद विद्यापिठातील अनुसूचित जाती आणि जमाती शिक्षक आणि अधिकारी संघटनेशी संलग्न असलेल्या १० दलित प्राध्यापकांनी स्मृती इराणी यांच्या या वक्तव्याचाच निषेध म्हणून त्यागपत्र दिले.

इंग्लंडमध्ये शाळा, न्यायालये आणि सीमेवरील तपासणी नाके येथे बुरखा घालण्यास बंदी !

कुठे राष्ट्रीय सुरक्षेसाठी मुसलमानांवर कडक निर्बंध लादणारा देशहितदक्ष इंग्लंड, तर 
कुठे मतांसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणारे भारतातील देशद्रोही राजकीय पक्ष !
    लंडन - इंग्लंडमधील शाळा, न्यायालये आणि सीमेवरील तपासणी नाके येथे तोंडवळा लपवणारा बुरखा परिधान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पंतप्रधान डेविड कॅमरून यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. तथापि फ्रान्सप्रमाणे बुरख्यावर सरसकट बंदी घालण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वीच कॅमरून यांनी इंग्रजी भाषा अवगत नसलेल्या इंग्लंडमधील मुसलमान महिलांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

पठाणकोट आक्रमणाच्या वेळी झालेल्या त्रुटींचे अवलोकन करून त्यात सुधारणा करणे आवश्यक !

     पठाणकोट येथील हवाईदलाच्या तळावरच अतिरेक्यांनी आक्रमण केल्याने पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी समोर आल्या. गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीची सत्यता पडताळण्यात झालेला उशीर, अतिरेकी या तळास लक्ष्य करतील, याची जाणीव असूनही त्या दृष्टीने उपाय न करणे, सैन्य दलास पाचारण करण्यात झालेला विलंब, वृत्तवाहिन्यांवरून या घटनेचे वाटेल, तसे झालेले वार्तांकन आणि त्याला चाप लावण्याकडे झालेले दुर्लक्ष, विविध यंत्रणा कारवाईत सहभागी असल्याने त्यांचा कमांडर कोण याविषयीची संदिग्धता, तसेच या यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अशा त्रुटी दूर करून आणि अहं सोडला, तर आपण आतंकवादाला चोख उत्तर देऊ शकू.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत. 

शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याचा आचरटपणा चुकीचा !

     प्रत्येक ठिकाणी एक शिस्त असते, त्या ठिकाणी गेल्यावर ती पाळायला पाहिजे. जसे राष्ट्रपती आणि न्यायाधीश यांना विशिष्ट असा प्रोटोकॉल असतो आणि त्यात कुणीही पुढारी ढवळाढवळ करू शकत नाही, तसेच आमच्या देवतांचेही प्रोटोकॉल आहेत. त्यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याचा जो आचरटपणा करण्यात येत आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की, आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी की, अशी कृती व्हायला नको.
- करवीरपीठाचे जगदगुरू शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती

पाल्यांना आत्मघातापासून वाचवण्यासाठी सुसंस्कार हवेत !

     आईने भ्रमणभाषवर गाणी ऐकण्यास बंदी करून महाविद्यालयात जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून पिंपरी येथील एका तरुणीने काही दिवसांपूर्वी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. काही मासांपूर्वी पुण्यातील धनकवडी भागातील एका शालेय मुलाच्या संदर्भातही अशीच घटना घडली; कारण होते पालकांनी दूरचित्रवाणीवर कार्टून बघू न दिल्याचे ! मागील काही वर्षांत अशा क्षुल्लक कारणांमुळे घडलेल्या घटनांनी उच्चांक गाठला आहे.

जिहाद विरुद्ध जिहाद पुकारणे आवश्यक !

श्री. भाऊ तोरसेकर
१. सगळेच मुसलमान एकसारखे असतात, अशी धारणा जगभर वाढीस 
लागत असल्याचे पाकिस्तानातील द डॉन वृत्तपत्राचे म्हणणे !
     द डॉन हे पाकिस्तानातील एक प्रमुख मान्यवर इंग्रजी वृत्तपत्र आहे. त्याला जगभर मान्यता आहे. त्याने गेल्या शुक्रवारी लिहिलेले संपादकीय जगभरच्या इस्लामी देशांनी गंभीरपणे वाचून विचार करण्यासारखे आहे. कारण जगाला भेडसावणार्‍या जिहादचे खरे स्वरूप कुठले उदारमतवादी सांगू शकत नाहीत, इतक्या स्पष्ट शब्दांत मांडण्याचे धाडस पाकिस्तानी संपादकाने दाखवले आहे. पाकिस्तानचे बुद्धीजिवी या सत्याकडे डोळे उघडून बघू शकत नाहीत. म्हणूनच त्यांच्यावर आरोप झाला की, मग इस्लामचा आडोसा घेऊन ते हिंसाचाराच्या बचावाला पुढे येतात आणि त्याचाच आडोसा घेऊन तिथले जिहादी जगभर उच्छाद मांडत असतात.

धर्मपरंपरा तोडणार्‍यांवर कारवाई करा !

     आम्ही शासनाला सांगतो की, देवतांचे नियम पाळले गेले पाहिजेत. त्याच्या विरोधात जाऊन परंपरा तोडण्याचा प्रयत्न करणारे अतिरेकी विचारसरणीचे जे लोक आहेत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. त्याचबरोबर सर्व धर्माचार्यांचे मत विचारात घेऊन त्याप्रमाणे योग्य ती पावले उचलावीत. - प.पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास)

साहित्यिकांनी राजकारण्यांप्रमाणे निवडणूक न लढवता अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्तीची निवड करावी !

     साहित्य परंपरेमध्ये अनेक विचारवंत, साहित्यिक असून अनेक जण खर्‍या अर्थाने या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी पात्र असणारे आहेत; परंतु निवड प्रकियेेतील वाद-विवाद पहाता अनेक ज्येष्ठ साहित्यिक या अध्यक्षपदापासून दूर रहाणे पसंत करतात. तरी यापुढील संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी साहित्यातील ज्येेष्ठ व्यक्तींनी विचार-विनिमय करून योग्य व्यक्तीची निवड करावी. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

संत आणि महापुरुष यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान करणारे सबनीस !

      श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा एकेरी उल्लेख केला.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

वेदांनी मानवाच्या कल्याणासाठी दिलेले ज्ञानाद्वारे अग्निहोत्र आचरण करून शेती केल्यास पीक सुपीक येते. - स्वामी दयानंद शास्त्री

सर्व प्रकारचे प्रदूषण दूर होऊन मानवाच्या कल्याणासाठी अग्निहोत्र आवश्यक !
     आता हवा-पाण्यापासून ते विचारांचे प्रदूषण विकोपाला गेले आहे. त्यामुळे ढळणारे निसर्गचक्राचे संतुलन, वेगाने पालटणारे हवामान, नवनवीन व्याधी, वाढते तणाव अशांनी सर्व काही भयसूचक स्थितीला पोहोचले आहे. सर्वत्र मरगळ, औदासिन्य, नैराश्य पसरल्याचे जाणवते. प्रगत तंत्रविज्ञान या परिस्थितीवर ठोस उपाय देऊ शकत नाही; म्हणून जीवनपद्धतीत पालट करून अग्निहोत्राचे आचरण महत्त्वाचे बनले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची मुक्ताफळे !

      कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर, कलबुर्गी यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंतांची हत्या करणारे नथुरामच्या विचारसरणीचे असून त्या मारेकर्‍यांचा मी निषेध करतो.

कुटुंबियांना पोलीस, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागलेले त्रास

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील
 जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या 
सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, हे पाहिले.

स्वतःतील दैवीपणाची इतरांना प्रचीती देणारा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा नागपूर येथील चि. आदिनाथ अंकुश देशपांडे !

चि. आदिनाथ देशपांडे
     पौष शुक्ल पक्ष अष्टमी (१७.१.२०१६) या दिवशी नागपूर येथील चि. आदिनाथ अंकुश देशपांडे याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आईला आणि आजी-आजोबा यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. सौ. अंजली श्रीकांत पाध्ये (आदिनाथची आजी)
१ अ. जन्मापूर्वी
१ अ १. मुलीच्या गर्भारपणात नामजप आणि प्रार्थना यांत वाढ होणे अन् प्रत्येक कृती करतांना श्री गुरूंची सेवा करत आहोत, असा भाव असणे : सौ. शुचिता (आदिनाथची आई) गर्भवती असतांना त्या दिवसांमध्ये माझा नामजप, प्रार्थना, शरणागत आणि कृतज्ञता भाव वृद्धींगत झाला. प्रत्येक कृती करतांना श्री गुरूंची सेवा करत आहोत, असा भाव असायचा, उदा. शुचिताला आरंभीचे तीन मास (महिने) काळजी घ्यायला सांगितली होती. तेव्हा तिचे कपडे धुतांना गुरुदेवांचे कपडे धुण्याची संधी मिळाली आहे, असा भाव ठेवून कृतज्ञता व्यक्त होत होती. घरातील सर्व कामे करतांना गुरुदेवांसाठी करत आहे, असा भाव असायचा.
१ अ २. दारात वासरासह येणार्‍या गायीला प्रदक्षिणा घालून प्रार्थना करणे : त्या दिवसांमध्ये एक काळ्या रंगाची गाय वासरासह प्रतिदिन सकाळी दाराशी येऊन उभी राहायची. तिला गोग्रास देऊन प्रतिदिन प्रदक्षिणा घातली जायची आणि तुझ्यासारखेच वासरू शुचिताला होऊ दे, अशी प्रार्थना व्हायची.
१ अ ३. घरात दैवी कण चकाकतांना दिसणे : शुचिता गर्भावस्थेत असतांना घरात सगळीकडे दैवी कण चकाकतांना दिसायचे.

प.पू. डॉक्टरांची साधकांनो, घराचा आश्रम करा ही चौकट वाचून श्री. नितीन चव्हाण यांची झालेली भावजागृती आणि त्यांना आलेली आनंदाची अनुभूती

श्री. नितीन चव्हाण
      पौष शुक्ल पक्ष त्रयोदशी (२२.१.२०१६) या दिवशी श्री. नितीन चव्हाण यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना आलेली अनुभूती येथे देत आहोत.
श्री. नितीन चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. प.पू. डॉक्टरांच्या दैनिकातील चौकटीतील घराचा आश्रम करा या संदेशाचा विचार दिवसभर मनात घोळत असणे : दैनिक सनातन प्रभातमध्ये एके दिवशी प.पू. डॉक्टरांची पुढील आशयाची चौकट प्रसिद्ध झाली होती. घराचा आश्रम केल्यास घरातील सवार्र्र्ंनाच त्याचा लाभ होतो. अशा घरातून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने घराच्या आसपास असलेली अन्य घरे आणि तेथे रहाणारे लोक यांनाही त्या चैतन्याचा लाभ होतो, तसेच परिसराची शुद्धी होऊ लागते. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पृथ्वीची शुद्धी करायची आहे. या चौकटीत दिलेला प.पू. डॉक्टरांचा संदेश माझ्या मनात तरंगत होता आणि मी त्याच विचारात दिवसभर होतो.
२. दुसर्‍या दिवशी अंघोळ करतांना अंतर्मनातून आनंदी आनंद, असे शब्द आणि त्यानंतर प.पू. डॉक्टर, सनातनचे संत, साधक, आश्रम .. आनंदी ऽऽ असेे शब्द मुखातून बाहेर पडून भावावस्थेत जाणे, त्यानंतर रामनाथी आश्रमातून आनंदाच्या स्पंदनांची वलये बाहेर पडून सर्व आश्रमांत अन् विश्‍वभरात जातांना प्रत्यक्ष दिसू लागणे : दुसर्‍या दिवशी सकाळी अंघोळीनंतर अचानक माझ्या अंतर्मनातून आनंदी ऽ आनंद ऽऽ असे शब्द बाहेर पडू लागले.

स्वतः अंतर्मुख राहून इतरांना साधनेला प्रोत्साहन देणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सांगली येथील श्री. संकेत कुलकर्णी !

सौ. सुजाता कुलकर्णी
श्री. संकेत कुलकर्णी
      पौष शुक्ल पक्ष त्रयोदशी (२२.१.२०१६) या दिवशी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सांगली येथील श्री. संकेत कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या आईला त्यांच्यात जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती देत आहोत.
श्री. संकेत कुलकर्णी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. अंतर्मुख झाल्याचे जाणवणे
     संकेतदादा या वर्षभरात पुष्कळ अंतर्मुख झाले आहेत. त्यांना एखादी गोष्ट सांगत असतांना ते ऐकून घेतात; पण काहीच बोलत नाहीत. दादांना साधक घरी आल्यानंतर आनंद होतो; पण जेव्हा साधक बोलतात, तेव्हा ते काहीच बोलत नाहीत. यावरून ते साधनेत मग्न आहेत, असे वाटते.
२. पित्ताचा त्रास असूनही रात्री दादांचे कपडे पालटण्याकरता उठावे लागले, तरी त्रास न होणे
     मला पूर्वी जागरण झाले की, पित्ताचा पुष्कळ त्रास होत असे. गेली २ वर्षे मला रात्री संकेतदादांचे कपडे पालटण्याकरता न्यूनतम २ - ३ वेळा तरी उठावे लागत असूनही त्रास होत नाही. प.पू. डॉक्टरांनी मला हे दायित्व दिले आहे आणि तेच मला हे पार पाडण्याची शक्ती देत आहेत, असा भाव ठेवूून मी सेवा करण्याचा प्रयत्न करते; पण कधी कधी माझा तसा भाव टिकून रहात नाही

चंदीगढ येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. गौरव सेठी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री. गौरव सेठी
१. श्रीकृष्णाच्या तोंडवळ्यामध्ये पू. (सौ.) योया वाले यांचा तोंडवळा दिसणे
     अलीकडे मी श्रीकृष्णासमोर बसून नामजप करत असतांना मला श्रीकृष्णाच्या तोंडवळ्यामध्ये पू. (सौ.) योयाताईंचा (एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांचा) तोंडवळा दिसत आहे. याविषयी श्रीकृष्णाने मला पहिला विचार दिला आणि तो म्हणजे श्रीकृष्ण संतांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राची स्थापना करणार आहे.
२. राहिलेला नामजप देवघरात बसून पूर्ण करण्याविषयी श्रीकृष्ण आणि मृत आजी यांनी सूक्ष्मातून सांगूनही तसे न करणे, देवघरात परत जाण्यासाठी कुणीतरी भागपाडत असल्याचे जाणवणे अन् तेथे जाऊन नामजप करतांना श्रीकृष्ण प्रतिमेतूनबाहेर आल्याचे जाणवून अपूर्व आनंद अनुभवणे
      मला संतांनी ४ घंटे बसून नामजप करण्यास सांगितले आहे. एके दिवशी माझा केवळ २० मिनिटे नामजप करायचा राहिला असल्याने झोपण्यापूर्वी अंथरुणावर बसून तो पूर्ण करूया, असा विचार मी केला. त्याप्रमाणे आमच्या घरातील देवघरात जाऊन तिथे असलेल्या श्रीकृष्णाच्या प्रतिमेला नमस्कार करून सूक्ष्मातून तो विचार मी त्याला सांगितला. त्या वेळी माझ्यासमोर बसून नामजप पूर्ण कर, असे श्रीकृष्णाने मला सांगितले. त्याच वेळी माझ्या मृत आजीचा तोंडवळा मला त्या ठिकाणी दिसला आणि तीही मला तिथेच बसून नामजप करायला सांगत असल्याचे मला जाणवले, तरीही मी माझ्या खोलीत गेलो.

होशियारपूर, पंजाब येथील भृगूवाचक डॉ. विशाल शर्मा यांचा सनातन संस्थेला आशीर्वाद !

भृगु महर्षीं
महर्षीमधील भृगु मीच आहे ! - भगवद्गीता
     सप्तर्षींच्या आशीर्वादाबरोबरच आता भृगू महर्षींचाही आशीर्वाद सनातन संस्थेला प्राप्त होणे आणि महर्षींमधील महर्षि जे भृगु तो म्हणजे मीच असल्याचे श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगणे
१. भृगुसंहितेतून भृगु महर्षींनी केलेला कल्याणकारी उपदेश म्हणजे फलादेश
     होशियारपूर, पंजाब येथे डॉ. विशाल शर्मा यांच्याकडे भृगुसंहिता आहे. त्यांच्याकडे या संहितेचे पारंपरिक वाचन केले जाते. भृगुसंहितेतून केल्या जाणार्‍या उपदेशाला फलादेश म्हणतात.
२. भृगुसंहिता म्हणजे भृगु महर्षींचे स्थूल शरीरच असणे
     भृगुसंहिता म्हणजे प्रत्यक्ष भृगु महर्षींचे स्थूल शरीरच आहे, असे स्वतःच महर्षींनी संहितेत माहिती देतांना सांगितले आहे. भृगुसंहिता ही भुर्जपत्रावर आहे.
३. डॉ. विशाल शर्मा यांच्यामध्ये भृगु महर्षींचा संचार होणे
     डॉ. विशाल शर्मा यांच्यामध्ये भृगु महर्षींचा संचार होतो.

तीळगुळाचा हा गोडपणा ।

तिळाचा स्नेह, गुळाची गोडी ।
दोन जिवांची मैत्री जोडी ॥ १ ॥

मैत्रीत असावे सख्यत्वाचे प्रेम ।
ते व्यक्त करण्याचा संक्रांतीचा नेम ॥ २ ॥
 
तीळगूळ द्यावा, तीळगूळ घ्यावा ।
गोड बोलून प्रेम वर्षाव करावा ॥ ३

जे जमत नाही, त्यासाठी प्रयत्न करणे, ही साधनाच आहे !

पू. संदीप आळशी
     काही साधक सेवा परिपूर्ण जमत नाही म्हणून निराश होतात. काही साधक व्यष्टी साधनेतील प्रयत्न नीट जमत नाहीत म्हणून निराश होतात. परिपूर्ण सेवा करणे आणि साधनेच्या प्रयत्नांतील परिपूर्णता, हे साध्य आहे. एखाद्या गोष्टीतील अपूर्णत्व, हे त्यासंदर्भात अजून आपल्याला शिकायचे आहे, याचेच निर्देशक आहे. शिकण्यात आनंद आहे, हे प.पू. डॉक्टरांचे वाक्य सतत लक्षात ठेवले, तर आपण करत असलेल्या प्रयत्नांतून आपल्याला आनंदही मिळेल. तसेच ईश्‍वराविना परिपूर्ण कोणीच नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे. जे जमत नाही, ते करायचा प्रयत्न करणे, ही साधनाच आहे.
- (पू.) श्री. संदीप आळशी (२२.१२.२०१५)


परमेश्‍वर आणि मानव यांतील मुख्य भेद !

     परमेश्‍वर अनंत कोटी ब्रह्मांडांचा व्याप सांभाळतो; पण कार्याचे श्रेय विविध देवता, अवतार आणि संत यांना देतो, म्हणजेच त्याच्यात अहं नसतो. यावरून लक्षात येईल की, दुसर्‍याला श्रेय देतो तो परमेश्‍वर. याउलट अहं असलेला माणूस स्वतःला मोठेपणा मिळावा म्हणून प्रयत्न करतो !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१२.२०१५)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - पौष शुक्ल पक्ष चतुर्दशी/पौर्णिमा (२३.१.२०१६) सकाळी ७.३१ वाजता
समाप्ती - पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा (२४.१.२०१६) सकाळी ७.१५ वाजता
उद्या पौर्णिमा आहे.

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही.
ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
भारताच्या आणि हिंदूंच्या र्‍हासाचे एक प्रमुख कारण म्हणजे धर्मद्रोह्यांनी हिंदूंना शिकवलेला धर्मद्रोह ! त्यामुळे हिंदूंमधील एकजूट नष्ट झाली. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

समर्पित व्हा ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     इतरांना प्रकाश देण्यासाठी ज्योत सतत तेवत रहाते. तोच आदर्श समोर ठेवावा आणि गरजू लोकांसाठी आपले जीवन समर्पित करावे !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

स्त्रीला श्रेष्ठ मानणारा मनु (हिंदु धर्म) आणि स्त्रीला जनावरापेक्षा अधिक मूल्य नसणारे इतर पंथ

     कन्फ्युशिअस, अ‍ॅरिस्टॉटल, मिल्टन आणि प्रगतीवादी रुसोही स्त्रीला कनिष्ठ मानतात. इस्लामचे सर्वांगांनी अंगीकरण करणार्‍या खोमेनीच्या इराणमध्ये स्त्रीला जनावरापेक्षा अधिक मूल्य नाही. या शहाण्यांपेक्षा मनू नारीमहिमा मुक्त कंठाने गातो. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मे २०१०)

सवर्णांच्या विरोधातील नक्राश्रू !

संपादकीय 
     नवी देहली येथील हैद्राबाद विद्यापिठात उच्च शिक्षण घेत असलेल्या रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे खापर संघप्रणीत मोदी शासनातील मंत्र्यांवर, विद्यापिठाच्या कुलगुरूंवर आणि अभाविप या भाजपप्रणीत विद्यार्थी संघटनेवर फोडले जात आहे. दलित संघटना आणि रिपाईसारखे पक्ष हे या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे निमित्त करून हा दलित विरोधी सवर्ण असा वाद वाढवत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेससारखे पक्ष त्यावर पोळी भाजून घेत आहेत. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. या प्रकरणाच्या निमित्ताने दलित चळवळीच्या पार्श्‍वभूमीवर असणारी फुटीरतावादाची मुळे उघडी पडत आहेत, जी देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने घातक, किंबहुना देशद्रोहीच आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn