Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

क्रांतीकारक रासबिहारी बोस यांचा आज स्मृतीदिन
लोकहो, सर्व राजकीय पक्ष क्रांतीकारकांना सोयीस्कररित्या 
विसरले असले, तरी तुम्ही असा कृतघ्नपणा करू नका !


इसिसचा सामना करण्यासाठी हिंदु स्वाभिमान सेनेच्या १५ सहस्र सैनिकांची धर्मसेना सज्ज !

दृष्टीक्षेपात धर्मसेना
  • ५० प्रशिक्षणतळ कार्यरत !
  • सैन्यात लहान-थोरांचा समावेश !
  • बंदूक आणि तलवार चालवण्याचे प्रशिक्षण !
  • सैनिकांना भगवद्गीतेचेही शिक्षण !
  • महंत बाबा नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर अपार श्रद्धा !
  • सैनिक बलीदान करण्यास सिद्ध !
     गाझियाबाद (उत्तरप्रदेश) - इसिस (आय.एस्.आय.एस्.) या जिहादी आतंकवादी संघटनेचा वाढता धोका लक्षात घेता या संकटाचा सामना करण्यासाठी येथील हिंदु स्वाभिमान सेनेची १५ सहस्र सैनिकांची धर्मसेना सज्ज आहे. हे सैनिक धर्मरक्षणासाठी बलीदान देण्यास सिद्ध आहेत. विशेष म्हणजे उत्तरप्रदेश ते उत्तराखंडपर्यंत या संघटनेचा मोठा प्रभाव असून संघटनेने तब्बल ५० प्रशिक्षण तळ उभारले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका चमूने हिंदु स्वाभिमानी सेनेच्या ४ प्रशिक्षण तळांना भेट दिल्यानंतर ही माहिती समजली.

हरिद्वारमध्ये इसिसच्या ४ आतंकवाद्यांना अटक !

हरिद्वार येथील अर्धकुंभमेळ्यावर आक्रमण करण्याचा कट फसला !
जिहादी आतंकवाद्यांनी पोखरलेला भारत ! भारतीय मुसलमान इसिसच्या प्रभावाखाली
 येऊ शकणार नाहीत, असे छातीठोकपणे सांगणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     नवी देहली - हरिद्वार येथे इसिस (आय.एस्.आय.एस्.) या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ४ आतंकवाद्यांना उत्तराखंड आणि देहली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली. हे आतंकवादी देहली, तसेच हरिद्वार येथे चालू असलेल्या अर्धकुंभमेळ्यावर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते. पोलिसांनी हा कट उधळून लावला. अटक करण्यात आलेल्या ४ आतंकवाद्यांपैकी एकाचे नाव अखलाक असून उर्वरित नावे समजू शकली नाहीत. या आतंकवाद्यांना देहली येथे आणून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या आतंकवाद्यांचा पठाणकोट येथील आतंकवादी आक्रमणाशी संबंध असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. पोलिसांनी १८ जानेवारी या दिवशी मेवात अब्दुल सामी या जिहादी आतंकवाद्याला मेवात (हरियाणा) येथील एका मशिदीतून अटक केली होती. सामीकडून पोलिसांना या ४ आतंकवाद्यांविषयी माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्यांना हरिद्वार येथून अटक केली.

देवास (मध्यप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिंदु युवकाची हत्या !

दादरी येथील प्रकरणावरून असहिष्णुता निर्माण झाल्याची ओरड करणारी 
प्रसिद्धीमाध्यमे आणि पुरस्कार परत करणारे पुरोगामी लेखक आता कुठे गेले ?
     देवास - धर्मांधांनी एका हिंदूवर भर बाजारात चाकूने आक्रमण केल्याच्या घटनेनंतर येथे दंगली भडकली. या घटनेनंतर प्रशासनाकडून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. ही संचारबंदी लागू असतांना १६ जानेवारीला धर्मांधांच्या जमावाने नरेंद्र राजोरिया या २५ वर्षांच्या युवकाला रस्त्यात अडवून त्याच्या गुप्तांगावर वार केले. या आक्रमणात तो गंभीररित्या घायाळ झाला. त्याच्यावर इंदूर येथील रुग्णालयात उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाला. प्रशासनाकडून २० जानेवारी या दिवशी सकाळी संचारबंदी उठवण्यात आली. तथापि येथील वातावरण अद्यापही तणावपूर्ण आहे.

धार्मिक परंपरा मोडण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना आक्रमक होईल ! - खासदार श्री. चंद्रकांत खैरे, शिवसेना

  
श्री. चंद्रकांत खैरे
   संभाजीनगर - शनिशिंगणापूर येथे काही नास्तिक महिलांनी २६ जानेवारीला शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याचा धर्मद्रोही निर्णय घेतला आहे. मागे डॉ. दाभोलकर यांनी तेथे यायचा प्रयत्न केला होता, त्यांना आम्ही शनिशिंगणापूरला येऊच दिले नाही. हिंदु धर्मशास्त्रात ढवळाढवळ करायचा अधिकार कोणालाही नाही. जर तुम्ही देव मानत नाही, तर तुम्ही तेथे जाताच कशाला ? हा निवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट आहे. जर धार्मिक परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेना आक्रमक होईल. हिंदु शास्त्र मानणार्‍या, देव मानणार्‍या आपल्या अनेक धर्माभिमानी महिला पुणे, संभाजीनगर, नगर, तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतून येत्या २६ जानेवारीला शनिशिंगणापूरला जाऊन त्या पुरोगामी महिलांना अडवणार आहेत, अशी चेतावणी येथील शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

१ सहस्र रुपयांच्या ३० कोटी नोटा चुकीच्या छापल्या आणि जाळल्या !

नाशिक येथील चलनी नोटांच्या मुद्रणालयातील अनागोंदी कारभार !
याला उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
     नाशिक - नाशिकरोड येथील चलनाच्या मुद्रणालयात एक सहस्र रुपयाच्या ३० कोटी सदोष नोटा छापण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ३ कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर ६ निरीक्षकांना (सुपरवायझर्स) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
     मुद्रणालयातील कामगारांवरील कारवाई मागे घ्यावी, या मागणीसाठी प्रेस मजदूर संघाने महाव्यवस्थापकांना दिवसभर घेराव घातला. महाव्यवस्थापकांना दुपारी जेवण्याची संधीही कामगारांनी दिली नाही. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने एक सहस्र रुपयांच्या पन्नास कोटी नोटा छापण्याची ऑर्डर नाशिक मुद्रणालयाला (नोटप्रेसला) दिली होती. त्यानुसार हौशंगाबादहून (मध्यप्रदेश) नाशिक मुद्रणालयात नोटांचा कागद आणला होता; मात्र त्यात चांदीची तारच नव्हती. १० कोटी नोटा छापून व्यवहारात आल्यानंतर हे लक्षात आले.
     लखनौ - अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या मागणीसाठी लखनौ (उत्तरप्रदेश) येथील हिंदु फ्रंट फॉर जस्टिस या अधिवक्त्यांच्या संघटनेतील ५०० अधिवक्त्यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. या पत्रावर अधिवक्त्यांनी रक्ताने स्वाक्षरी केली आहे. (हिंदुबहुल देशात राममंदिर उभारण्याच्या मागणीसाठी आंदोलन करावे लागणे दुर्दैवी आहे ! - संपादक)

पुणे येथील धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा निर्धार !

    
बैठकीत सहभागी हिंदुत्ववादी
     पुणे - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील भारती विद्यापीठ परिसरातील कै. हनुमंत तुकाराम थोरवे विद्यालय (म.न.पा. शाळा क्र. १६२) येथे ३१ जानेवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता एका भव्य हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या निमित्ताने या भागातील विविध संघटना, संप्रदाय आणि गणेश मंडळे यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणे- सातारा रस्त्यावरील श्री काळूबाई मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस उपस्थित असलेल्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी ही धर्मजागृती सभा १०० टक्के यशस्वी करण्याचा यशस्वी करण्याचा निर्धार केला.

बेळगाव येथे मराठी टायगर्स चित्रपट प्रदर्शित न झाल्यास महाराष्ट्रात कन्नड चित्रपट बंद ! - अभिनेता अमोल कोल्हे

   
हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करतांना डॉ. अमोल कोल्हे
   बेळगाव - येथे मराठी टायगर्स चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित झालाच पाहिजे. हा चित्रपट येथे प्रदर्शित न झाल्यास महाराष्ट्रात एकही कन्नड चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, अशी चेतावणी अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा मंदिर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा विडा उचलणार्‍या जिल्हा प्रशासनाला सणसणीत चपराक देत चित्रपटाचा नायक डॉ. कोल्हे यांनी १८ जानेवारीला बेळगाव येथे भेट दिली. ५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी डॉ. अमोल कोल्हे आपल्या पथकासह बेळगाव येथे आले होते. त्यानंतर धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेचा त्यांनी शुभारंभ केला.

गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवर विदेशी पर्यटक करत आहेत योगासने !

विदेशी पर्यटकही आता हिंदूंच्या योगासनांकडे आकृष्ट होत आहेत आणि भारतात 
मात्र योगासने शाळांमधून शिकवायला विरोध केला जातो, हे लज्जास्पद !
     पेडणे - भारतीय लोक आज पाश्‍चात्य संस्कृतीकडे आकृष्ट होत आहेत, तर विदेशी पर्यटक पर्यटनाच्या निमित्ताने देशात येऊन भारतीय संस्कृती शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोरजी, आश्‍वे-मांद्रे, हरमल किनार्‍यांवर विदेशी पर्यटक पहाटे उठून योगासने करतांना दिसत आहेत, तर काही जण येथे येऊन योगासने शिकून त्याचे धडे परदेशात जाऊन इतरांना देत आहेत.
     किनारी भागात पहाटे ५.३० वाजता उठून विदेशी पर्यटक योगासने करतात. विदेशी पर्यटक ते रहात असलेल्या हॉटेलमध्ये, तर काही जण किनार्‍यावर योगासने करतांना दिसतात. अनेक विदेशी पर्यटक सूर्यनमस्कार घालतांनाही आढळून येतात. नियमित योगासने केल्यास आरोग्याची कोणतीही समस्या निर्माण होत नाही, योगासने केल्याने शारीरिक त्रास कमी होतो, योगासने केल्यास सतत होणारा गुडघेदुखीचा आणि कंबरदुखीचा त्रास उणावला, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया काही विदेशी पर्यटकांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिल्या. -

चार महिन्यांत अनधिकृत प्रार्थनास्थळे तोडणार किवा नियमित करणार ! - राज्यशासनाचे न्यायालयाला आश्‍वासन

आतापर्यंत अधिकाधिक हिंदूंच्याच प्रार्थनास्थळांवर 
कायद्याचा बडगा उभारला जातो, असा अनुभव आहे. राज्यशासनाने 
अनधिकृत मशिदींच्या संदर्भातही न्यायालयाला दिलेले वचन पाळावे, ही अपेक्षा ! 
     मुंबई - न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास राज्यशासन कटिबद्ध आहे. मुंबईसह राज्यभरातील पदपथ आणि अन्य ठिकाणी उभारण्यात आलेली सर्वधर्मियांची अनधिकृत प्रार्थनास्थळे येत्या मे महिन्यापर्यंत तोडण्यात येतील अथवा त्यांतील काही प्रार्थनास्थळांचे अन्यत्र पुनर्वसन होईल किंवा ती नियमित करण्यात येतील, असे अधिवक्ता वग्यानी यांनी २० जानेवारी या दिवशी न्यायालयाला सांगितले. 

पाकमधील विद्यापिठावर आतंकवादी आक्रमण

२१ ठार, ४० घायाळ
पाकने जे पेरले, तेच उगवले !
     पेशावर - येथील बाचा खान विद्यापिठावर २० जानेवारीला सकाळी आतंकवाद्यांनी आक्रमण केले. या आक्रमणात २१ विद्यार्थी ठार, तर ४० जण घायाळ झाले. मृतांचा हा आकडा वाढण्याची भीती पाक शासनाने व्यक्त केली आहे. आतंकवाद्यांनी विद्यापिठाच्या परिसरात उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या प्रतिआक्रमणात ६ आतंकवादी मारले गेले आहेत. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. गेल्या वर्षी पेशावर येथील एका सैनिकी शाळेत आक्रमण करून अनेक मुलांना ठार केले होते.

काश्मीरमध्ये २ आतंकवाद्यांना ठार मारले

एकेक आतंकवादी मारण्यापेक्षा आतंकवाद्यांचे मूळ असलेल्या पाकलाच आता नष्ट करा !
     पुलवामा - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील नैना बातापोरा येथे २० जानेवारी या दिवशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या सैनिकांनी २ आतंकवाद्यांना ठार मारले. यानंतर सैनिकांनी गावात शोधमोहीम चालू केली आहे. मारले गेलेले दोघेही आतंकवादी हिजबूल मुजाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटनेचे सदस्य होते. १९ जानेवारीला रात्री सुरक्षा दलाचे सैनिक आणि आतंकवादी यांच्यात चकमक चालू झाली होती. हे दोघेही आतंकवादी लपले होते. तेथूनच त्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. त्यामुळे राज्य पोलीस दल आणि ५३ राष्ट्र्रीय रायफलचे सैनिक यांनी संपूर्ण गावाला वेढा घातला. आतंकवाद्यांच्या गोळीबाराला सैनिकांनी चोख प्रत्युत्तर देत त्यांना ठार मारले. सुरक्षा दलांनी आतंकवाद्यांविरुद्ध कारवाई चालू केल्यानंतर सर्व गावकर्‍यांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले होते.

पौष्टिक आणि सुरक्षित असलेल्या भारतीय गायीच्या दुधाला जगात मागणी !

आता विदेशातही भारतातील देशी गायींच्या दुधाची मागणी वाढत असतांना त्यांच्या 
संवर्धनासठी भारत शासन गोहत्याबंदी कायदा भारतभर लागू करणार का ?
    जयपूर - विदेशी प्रजातींच्या गायींच्या दुधामुळे गंभीर स्वरूपयाचे हृदय आणि डोक्याचे आजार निर्माण होतात. भारतीय वंशाच्या गायी या सर्वदृष्टीने उपयुक्त, शक्तीवर्धक आणि रोगप्रतिरोधक आहेत. यामुळे देशी गायीला आणि गायीच्या दुधाला जगातील अन्य देशांत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ब्राझील या देशात भारतीय वंशाच्या गायी मोठ्या प्रमाणात पाळल्या जात आहेत. (कुठे भारतातील देशी गायी पाळणारा ब्राझील, तर कुठे जर्सी गायी पाळणारे नतद्रष्ट भारतीय ! - संपादक) या देशात भारतीय गायींचे संरक्षण आणि संवर्धन केले जात आहे. 
   विदेशी गायींच्या ए-१ प्रकाराच्या दुधामुळे लहानपणात मधुमेह, हृदयरोग, अपचन, स्क्रिजोफ्रेनिया आणि मेंदूचे आजार उद्भवत आहेत. जनुकामधील पालट करून संक्रमित पद्धतीने निर्माण केलेल्या विदेशी गायींविषयी (एवन जेनेटिक म्यूटेशन) अमेरिकेत वर्ष २००९ मध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता. न्यूझीलंडमध्ये सर्वांधिक खप होत असलेल्या द डेविल इन द मिल्क या पुस्तकात ए-वन दुधामुळे होणार्‍या रोगांविषयी सविस्तर माहिती आहे. भारत आणि आफ्रिकेतील गोवंश हा ए-२ श्रेणीतील गोवंश आहे. अशा गायींचे दूध हे एकदम उपयुक्त आहे.

सीमा लढ्यातील हुतात्म्यांना शिवसेनेकडून अभिवादन !

   
सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात आलेली फेरी
  कोल्हापूर - १७ जानेवारी या दिवशी सीमा लढ्यात हुतात्मा पत्करलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून राजारामपुरी परिसरातून शिवसेनेकडून फेरी काढून अभिवादन करण्यात आले. या वेळी शिवसैनिकांनी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
     बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह ८६५ गावांच्या समावेश असणार्‍या संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला धुडकावणारा आदेश १६ जानेवारी १९५६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी काढला होता. सीमावासियांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १७ जानेवारी १९५६ या दिवशी मोर्चा काढण्यात आला.

सोलापूर येथील सिद्धेश्‍वर यात्रेत कप्पडकळीने धार्मिक विधींची सांगता !

     सोलापूर - ग्रामदैवत सिद्धेेरामेश्‍वर महाराजांच्या यात्रेतील विधींची सांगता १७ जानेवारीच्या रात्री १२ वाजता मल्लिकार्जुन मंदिर येथे कप्पडकळीने (वस्त्रविसर्जन) झाली. दरम्यान उत्तर कसब्यातील देशमुख वाड्यात रविवारी दुपारी १२.३० वाजता योगदंड आणि हिरेहब्बू यांची पाद्यपूजा करण्यात आली. रात्री १० वाजता हिरेहब्बू वाड्यातून पहिल्या आणि दुसर्‍या नंदीध्वजाची हिरेहब्बूंच्या हस्ते पूजा करण्यात आली. तेथे पाचही नंदीध्वज मल्लिकार्जुन गर्भ मंदिरास पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्यानंतर नंदीध्वजाची पूजा होऊन कप्पडकळीचा कार्यक्रम झाला. या वेळी उपस्थित भाविकांना खारीकाचा प्रसाद देऊन पाच दिवसांच्या धार्मिक विधींची सांगता झाली.

साहित्य संमेलनासाठीचा २५ लक्ष रुपयांचा निधी भाषा संवर्धनासाठी

     ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी (पिंपरी) - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाच्या वतीने २५ लक्ष रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात येते. यंदाच्या वर्षी मात्र स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील यांनी साहित्य संमेलनासाठी नेटकी आणि भव्य व्यवस्था केली होती. साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात पाटील यांनी साहित्य संमेलनासाठीचा २५ लक्ष रुपयांचा धनादेश साहित्य महामंडळाला परत केला. हा निधी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वापरावा, असे त्यांनी सुचवले.

काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्याची हीच योग्य वेळ ! - आदित्य ठाकरे, युवा सेना

     मुंबई - आपल्याच देशात काश्मिरी पंडितांना बेघर केले गेले. त्यांचे पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये पुनर्वसन केले पाहिजे. काश्मिरी पंडितांची इच्छा पूर्ण करण्यासाठी केंद्रात सक्षम शासन आहे. त्यामुळे त्यासाठी हीच योग्य वेळ आहे, अशी आग्रही मागणी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. प्रतिवर्षी १९ जानेवारी हा दिवस काश्मिरी पंडितांकडून निर्गमन दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. 

संत बनण्यासाठी आय.आय.टी. शाखेतील विद्यार्थिनीचे हिमालयाकडे प्रयाण !

धर्मांध युवक जिहादसाठी घरदार सोडतात, तर हिंदु युवक स्वच्या शोधासाठी म्हणजेच 
ईश्‍वरप्राप्तीसाठी घरदार सोडतात ! हिंदु धर्माची महानता यातून दिसून येते !
     व्यवहारातील शिक्षण नव्हे, तर साधनेनेच मनुष्य अंतिम ध्येय गाठू शकतो, हे जाणून भारत शासन साधना करू इच्छिणार्‍या तरुणांसाठी हे शिक्षण देण्याची व्यवस्था करेल का ? हिंदु राष्ट्रात अध्यात्मिक प्रगती करु इच्छिणार्‍या तरुणांनाही मार्गदर्शन केले जाईल !
    चेन्नई - भारतीय तंत्रज्ञान संस्था-मद्रासमधील (आय.आय.टी.-मद्रास) २६ वर्षीय कु. वेदांतम् एल्. प्रत्युषा या विद्यार्थिनीने संत बनण्यासाठी हिमालयाकडे प्रयाण केले आहे. (भौतिक सुख त्यागून संत होण्यासाठी हिमालयाकडे प्रयाण करणार्‍या कु. प्रत्युषा यांचे अभिनंदन ! हिंदूंनो, आता बुद्धीप्रामाण्यवादी कु. प्रत्युषा यांच्या या निर्णयावर टीका करतील. त्यांचा सडेतोड प्रतिवाद करा ! - संपादक)

हुतात्मा कोणाला म्हणतात, हेही ठाऊक नसलेले संमेलनाध्यक्ष सबनीस !

     ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भाषणात अध्यक्ष श्रीपाल सबनीस म्हणाले, आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांप्रती सहवेदना प्रकट करत असतांना, विवेक आणि सत्य यांची पेरणी करत असतांना ज्यांना गोळ्या घातल्या गेल्या, त्या डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी अशा हुत्मात्यांचे पुण्यस्मरण करून नथुरामच्या परंपरेतील मारेकर्‍यांचा मी जाहीर निषेध करतो. सीमेवर देशासाठी जे सैनिक लढतांना मृत्यूमुखी पडतात, त्यांना हुतात्मा म्हणतात. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी हे कोणत्या शत्रूसमवेत लढाई करतांना गेले नसून त्यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. त्यामुळे ते हुतात्मा कसे ? जिला हुतात्मा शब्दाचा अर्थही समजू नये, अशी व्यक्ती संमेलनाध्यक्ष होते, यापेक्षा दुर्दैव ते काय ?

कुपवाड-माधवनगर रस्त्यात खड्डयांमुळे अपघात होत असल्याने उपाययोजना करा ! - शिवसेनेचे निवेदन

     कुपवाड (सांगली) - कुपवाड कार्यक्षेत्रातील कुपवाड-माधवनगर रस्त्यावरील गोमटेश्‍वरनगर रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात मैलायुक्त पाणी साचून रहाते. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे नुकतेच दोन मोठे अपघातही झाले आहेत. खड्डयांमुळे वयोवृद्ध, विद्यार्थी यांचीही मोठी गैरसोय होते. तरी सदरच्या खड्डयात मुरुम टाकून ते बंद करावेत. येत्या आठ दिवसांत त्यावर कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या वतीने रस्ता बंद आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिवसेनेचे कुपवाड शहरप्रमुख श्री. अमोल पाटील यांनी साहाय्यक आयुक्ताकडे निवेदनाद्वारे केली आहे. (सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांना का दिसत नाहीत ? स्वातंत्र्यानंतर अजून किती वर्षे सामान्यांना रस्ते, पाणी यांसारख्या गोष्टींसाठी आंदोलन करावे लागणार आहे ? संपादक)

जळगाव येथे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी स्थापन झालेल्या शासकीय समितीमध्ये हिंदु जनजागृती समितीचा समावेश !

     जळगाव - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी 'राष्ट्रध्वजाचा मान राखा' ही मोहीम राबवली जाते. या वर्षी समितीच्या वतीने जळगाव येथे जिल्हाधिकारी सौ. रुबल अग्रवाल यांना ४ जानेवारी या दिवशी या विषयी निवेदन दिले आणि जिल्हास्तरीय समितीमध्ये हिंदु जनजागृती समितीला सहभागी करून घेण्याची विनंती केली होती. त्या वेळी त्यांनी 'आम्हाला अशा स्वयंस्फूर्तीने कार्य करणार्‍यांची आवश्यकता आहे', असे सांगितले होते आणि १८ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या ३ सदस्यांना जिल्हास्तरीय समितीमध्ये आणि ६ सदस्यांना तालुका स्तरावरच्या समितीमध्ये सहभागी करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी एका आदेशाद्वारे सांगितले. या आदेशाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयातून समितीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली. चोपडा, एरंडोल, जामनेर, भुसावळ, पाचोरा, पारोळा या तालुक्यांमध्ये समितीच्या सदस्यांना सहभागी करण्यात आले आहे. (हिंदु जनजागृती समितीवर विश्‍वास दाखवून समितीच्या सदस्यांना जिल्हा आणि तालुका यांच्या स्तरावरील समित्यांमध्ये सहभागी करून घेणार्‍या जिल्हाधिकार्‍यांचे अभिनंदन ! - संपादक) 

पुणे येथे धर्मांधांच्या टोळक्याची हिंदु तरुणाला मारहाण

पुण्यामध्ये धर्मांधांची वाढती गुन्हेगारी ! 
     पुणे, २० जानेवारी - दुचाकीवरून जात असतांना धक्का लागल्याच्या कारणावरून धर्मांधांच्या टोळक्याने गंगेश अरुण चवंदगे या हिंदु तरुणाला अमानुष मारहाण केल्याची घटना १६ जानेवारी या दिवशी येथील गणेश पेठेमध्ये घडली. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध दंगलीसह मारहाणीचा गुन्हा प्रविष्ट केला आहे. (किरकोळ कारणावरून वारंवार दंगली करणार्‍या धर्मांधांना आळा घालण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक) पोलिसांनी त्यातील इम्तियाज रशीद सय्यद, एजाज रशीद सय्यद आणि रियस रशीद सय्यद (रहाणार पुणे) या तिघांना अटक केली असून त्यांना जामीनही मिळाला आहे. 

पुरोगामी महिला स्वतःला इंदिरा गांधीपेक्षा श्रेष्ठ समजतात का ? - अधिवक्त्या कुसुम पाटील

शनिशिंगणापूर येथील धार्मिक परंपरांच्या रक्षणार्थ 
 हिंदु जनजागृती समितीची 'हिंदु धार्मिक परंपरा रक्षण मोहीम' 
पत्रकार परीषदेत उजवीकडून कु. रागेश्री देशपांडे, पू. नंदकुमार जाधव,
कु. प्रतिक्षा कोरगावकर, सौ. सुवर्णा पाटील, अधिवक्त्या कुसुम पाटील

     जळगाव, २० जानेवारी (वार्ता.) - दक्षिण भारतातील एका मंदिरात महिलांना प्रवेश नाही म्हणून इंदिरा गांधी यांना मंदिराच्या विश्‍वस्तांनी प्रवेश नाकारल्यावर त्यांनी विश्‍वस्तांच्या सांगण्याला मान देऊन मंदिरात प्रवेश केला नाही. तर त्या पंतप्रधान असून नम्रपणे नियम पाळू शकतात, तर या पुरोगामी महिला स्वतःला इंदिरा गांधीपेक्षा श्रेष्ठ समजतात का, असा प्रश्‍न अधिवक्त्या कुसुम पाटील यांनी जळगाव येथील पत्रकार भवनात शनिशिंगणापूर या विषयावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विचारला. 

वन्दे मातरम् न म्हणणार्‍यांच्या विरोधात शासनाने कठोर पावलेे उचलणे आवश्यक ! - श्री. प्रमोद मुतालिक

भटकळ (कर्नाटक ) येथे हिंदु धर्मजागृती सभेस उत्तम प्रतिसाद
हिंदु धर्मजागृती सभेत उपस्थित धर्माभिमानी हिंदू
    भटकळ - मुसलमान वन्दे मातरम् म्हणत नाहीत. त्यामुळे शासनाने अशांच्या विरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. केंद्रशासन राममंदिर बांधील, गोहत्या रोखील, तसेच पाकला धडा शिकवील, असे सर्व हिंदूंना वाटले होते; परंतु हे करण्यात शासन अपयशी ठरले आहे, असेही त्यांनी सांगितले.
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री तरुमाल व्यंकटरमण सभागृहात हिंदु धर्मजागृती सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद आणि सनातन संस्थेच्या डॉ. गौरी आचार्य या उपस्थित होत्या.

बलात्कारप्रकरणी धर्मांध मुसलमान तरुणास ३ वर्षांनंतर १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !

बलात्काराच्या प्रकरणांत तत्परतेने कारवाई आणि शिक्षा झाल्यासच अशा घटनांना आळा बसेल !
     इचलकरंजी - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी आजीम बाळासो मुल्ला (वय २६ वर्षे) याला १६ जानेवारी २०१६ या दिवशी इचलकरंजी जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरी आणि ५० सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. मुल्ला याच्या घराशेजारी रहाणार्‍या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर धर्मांध आजीम याने वर्ष २०१३ मध्ये लैंगिक अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. (लव्ह जिहादचे भयावह वास्तव जाणा आणि आपल्या मुलींचा बळी जाऊ देण्यापासून त्यांना वाचवा ! - संपादक)

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी पनवेल तहसीलदारांना निवेदन

तहसीलदारांना निवेदन देतांना राष्ट्राभिमानी
     पनवेल - येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी होणारी विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन येथील तहसीलदार श्री. दीपक आकडे यांना देण्यात आले. राष्ट्रध्वजाचा योग सन्मान राखला जावा, यासाठी सर्व संबंधितांंना सूचना देऊ, तसेच याविषयी जनजागृती होण्यासाठी परिसरातील सर्व चित्रपटगृहांत प्रबोधनात्मक दृश्यफीत दाखवण्यासाठी सांगू, असे आश्‍वासन त्यांनी दिले. या वेळी शिरढोण शिवसेना कार्यकर्ते श्री. मंगेश भोईर, येथील समितीचे कार्यकर्ते श्री. विनायक वाकडीकर, श्री. मच्छिंद्र पवार, पनवेल येथील श्री. मिलींद पोशे, डॉ. भरत बुगडे उपस्थित होते. तहसीलदारांनी समितीच्या कार्यकर्त्यांकडे प्रबोधनपर दृश्यफीत असल्यास ती सादर करण्यासही सांगितले.

रोहित वेमुला दलित नव्हता : रोहितच्या काकांचा खुलासा, तर आई म्हणते आम्ही दलितच !

जातीयतेचे राजकारण !
     भाग्यनगर - हैदराबाद विद्यापिठातील रोहित वेमुला याला दलित ठरवून त्याच्या आत्महत्येला जातीय रंग दिला जात असतांना आता या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. वेमुला हा दलित नव्हता, तो इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील होता, अशी माहिती त्याच्या काकांनी दिली आहे, तर त्याच्या आईने ते दलित असल्याचे म्हटले आहे. आई आणि काका यांच्या परस्परविरोधी माहितीमुळे रोहितच्या जातीबाबत कोणता अहवाल द्यायचा, असा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे. त्यामुळे गोंधळ आणखीनच वाढला आहे.

मध्यप्रदेशात धर्मांतराच्या प्रकरणी अंध जोडप्यासह १३ जण अटकेत

धर्मांतराची समस्या कायमची सोडवण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याविना पर्याय नाही !
     धार (मध्यप्रदेश) - धार जिल्ह्यातील देहार गावात हिंदूंना लालूच दाखवून आणि बलपूर्वक ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याच्या आरोपाखाली १३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात एका अंध जोडप्याचाही समावेश आहे. पोलीस अजून चौघांचा शोध घेत आहेत. अटक झालेले सर्वजण बडवानी येथील पेंटेकोस्टल चर्चशी संलग्न होते. अटक करण्यात आलेल्यांनी आम्ही धर्मांतर केले नाही, केवळ जिझसची आज्ञा पाळली, असे सांगत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. बाळू केशू सस्ते आणि त्याची पत्नी भुरी या अंध जोडप्यावर वर्ष २०१० मध्येही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता. तो खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार हे ख्रिस्ती अशिक्षित आणि गरीब हिंदूंना लालूच दाखवत होते, तसेच धमक्याही देत होते; मात्र अटक झालेल्यांनी पोलिसांनी हिंदू संघटनांच्या दबावाखाली अटक केली, असा आरोप केला.

जोधपूर येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाद्वारे जनजागृती !

     जोधपूर, २० जानेवारी (वार्ता.) - प्रतिवर्षी आयोजित होणार्‍या पश्‍चिम राजस्थान उद्योग हस्तशिल्प उत्सवात यंदा सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. जोधपूर येथील रावण का चबुतरा या मैदानात ७ ते १७ जानेवारी या कालावधीत या प्रदर्शन आयोजित केले होते. हिंदु जनजागृती समितीने लावलेले धर्मशिक्षण, धर्माचरण आणि गोरक्षण यांविषयीचे फलक प्रदर्शनाचे आकर्षण ठरले. अनेकांनी जिज्ञासेने या फलकांवरील माहिती जाणून घेतली. हे प्रदर्शन लावण्यासाठी जोधपूर इंडस्ट्रियल असोसिएशनचे श्री. विनोदसिंह राजपुरोहित आणि अधिवक्ता श्री. मोतीसिंहजी राजपुरोहित यांनी सहकार्य केले.

अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणार्‍या धर्मांधाला जन्मठेप

     मंदसौर (मध्यप्रदेश) - एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी झल्लू (अमजद) खान याला विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ४ एप्रिल २०१५ या दिवशी खान याने एका दलित अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले आणि विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी खान याला रतलाम येथे अटक केली होती. त्यानंतर त्याला या खटल्याची सुनावणी होऊन न्यायाधिशांनी त्याला शिक्षा ठोठावली.

उत्तरपत्रिकांची ऑनलाइन पडताळणी विचाराधीन - विनोद तावडे

    चिंचवड, २० जानेवारी - राज्यातील विद्यापीठांमध्ये लक्षावधी उत्तरपत्रिका जमा होत असतात; परंतु त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी पात्र शिक्षकांची संख्या अल्प आहे. अनेक वेळा पात्र असलेले शिक्षकही उत्तरपत्रिकांच्या पडताळणीच्या कामात टाळाटाळ करत असतात. त्याचसमवेत शिक्षकांचे पगार पुष्कळ वाढले असल्याने उत्तरपत्रिका पडताळणीला शिक्षक मिळत नाहीत. (अशा शिक्षकांवर शिक्षण विभाग आणि विद्यापीठ प्रशासन कोणती कारवाई करणार आहे ? - संपादक) त्याचा ताण इतर शिक्षकांवर पडतो, अशी ओरड विद्यापिठांकडून करण्यात येत असते. उत्तरपत्रिकांची पडताळणी करण्यावर शिक्षकांना बहिष्कार घालता येणार नसला, तरीही आहे ती शिक्षकसंख्याही पुरी पडत नाही. या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालांवरही होतो. त्यामुळे उत्तरपत्रिकांची पडताळणी ऑनलाइन करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी चिंचवड येथील एका कार्यक्रमात दिली.

भगिनींनो, जोमाने पुढे चला आणि ध्येय साध्य करा !

प.पू. आबा उपाध्ये
    परंपरेने चालत आलेल्या आपल्या संस्कृतीच्या रूढी, यात आपले विज्ञान आहे; पण ते त्या ज्ञानातच अंतर्भूत आहे. अशा आपल्या अनेक रूढी आहेत. त्या जागृत ठेवणे, हे हिंदु धर्माचे आद्यकर्तव्य आहे. मग आज आपल्या कोणत्याही हक्कांची पायमल्ली होणारी असो वा नसो, आजच्या युगात पुरुषांच्या बरोबरीने हक्क सांगणारी स्त्री एखाद्या गोष्टीने मागे हटवणारी असली, तरी हिरीरीने आपला हक्क सोडून जाते आणि आपल्या परंपरा राखण्यासाठी पुढे येते. या स्त्रियांविषयी ही गोष्ट निश्‍चितच कौतुकास्पद आहे. शनिशिंगणापूरमध्ये शनीच्या चौथर्‍यावर बंदी असलेल्या रितीला कायम ठेवण्यासाठी मोर्चा नेणे, हे फारच कौतुकास्पद आहे. योगायोगाने शनिशिंगणापूर देवस्थानच्या अध्यक्षपदी स्त्री निवडून येणे, हे स्त्रियांना भगवंताने दिलेले पाठबळ आहे. तेव्हा भगिनींनो, जोमाने पुढे चला आणि आपले ध्येय साध्य करा. याला माझा आणि माझ्या धर्मपत्नीचा ध्येयपूर्तीसाठी आशीर्वाद आहे ! आपले अभिनंदन !
- (प.पू.) श्री. आबा उपाध्ये आणि सौ. मंगला न. उपाध्ये

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या उत्सवांवरील जिहादी आतंकवादाचे सावट कधी दूर होणार ?
      हरिद्वार येथे इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ४ आतंकवाद्यांना पोलिसांनी अटक केली. हे आतंकवादी देहलीवर, तसेच हरिद्वार येथे चालू असलेल्या अर्धकुंभमेळ्यावर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Dehalipar tatha Haridwarke Ardhakumbmele par aakraman karne aaye ISISke 4 Atanki pakde gaye ! - Hinduonke tyoharonparki aatanki chhaya kab dur hogi ?
जागो ! : देहलीपर तथा हरिद्वार के अर्धकुंभ मेलेपर आक्रमण करने आए इसिस के ४ आतंकी पकडे
गए । - हिंदुओके त्योहारोंपर की आतंक की छाया कब दूर होगी ?

समीर गायकवाड यांना जामीन दिल्यास ते पसार होऊ शकतात ! - शासकीय अधिवक्त्यांचा युक्तिवाद

कॉ. पानसरे हत्या प्रकरण ! 
     कोल्हापूर, २० जानेवारी - मडगाव स्फोट प्रकरणातील पसार आरोपी रुद्र पाटील हे कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणातील संशयित आणि सनातन संस्थेचा साधक श्री. समीर गायकवाड यांच्याशी संबंधित आहेत. श्री. समीर यांना जामीन दिल्यास ते पसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी शासकीय अधिवक्त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. याचसमवेत श्री. समीर यांच्या जामीन आवेदनावरील सुनावणी २० दिवस पुढे ढकलावी, अशा मागणीचे आवेदन कॉ. पानसरे कुटुंबियांच्या वतीने न्यायालयात सादर केले आहे. श्री. समीर यांचे जामीन आवेदन आणि पानसरे यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आवेदनावर २२ जानेवारी या दिवशी एकत्रित सुनावणी होणार आहे.

राज्यशासन जुन्याच हेलिकॉप्टरचा पुनर्वापर करणार

     मुंबई - राज्यशासनाच्या 'डॉफीन ए.एस्. ३६५ एन्-३' या जुन्या हेलिकॉप्टरची दुरुस्ती करून त्याचा पुनर्वापर करण्याच्या प्रस्तावास राज्य मंत्रीपरिषदेने मान्यता दिली. त्यासाठी २४ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे नवीन हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी लागू शकणारा साधारणत: १०० कोटींचा खर्च वाचणार आहे. 
     महाराष्ट्र शासनाने 'डॉफीन ए.एस्.३६५ एन्-३' हेलिकॉप्टर एप्रिल २००१ मध्ये २३ कोटी रुपये इतक्या रकमेला फ्रान्समधील युरो कॉप्टर कंपनीकडून खरेदी केले होते. सहा प्रवासी आणि दोन चालक अशी आसन क्षमता असलेल्या या हेलिकॉप्टरचा राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून १० वर्षे वापर झाला होता.

अनधिकृत मशिदीवर कारवाई होईपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार !

पत्रकार आप्पा पवार यांचे उपोषण स्थगित 
बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे अनधिकृत मशिदीवर कारवाई न केल्याचे प्रकरण 
     बार्शी (जिल्हा सोलापूर), २० जानेवारी (वार्ता.) - 'मी प्रशासनाच्या विनंतीला मान देत उपोषण स्थगित केले असले, तरी अनधिकृत मशिदीवर कारवाई होईपर्यंत लढा चालूच राहील', असा निर्धार पत्रकार श्री. आप्पा पवार यांनी दैनिक सनातन प्रभातकडे व्यक्त केला. प्रशासन सांगत आहे की, मशिदीच्या न्यासाने जिल्हा समितीकडे अर्ज सादर केला आहे; मात्र मी तर १४ जानेवारीला अनधिकृत मशिदीवर कारवाई होण्यासाठी निवेदन दिले होते. प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने मला १६ जानेवारीला उपोषणास बसावे लागले. मग अर्ज १६ जानेवारीला सादर केला असला, तरी प्रशासनाला अनधिकृत मशिदीचा अडथळा वाटत नाही का ? अगोदरच कारवाई का केली नाही ? प्रस्ताव सादर करण्याची वाट का पहात होता ? केवळ मंदिरांचीच अडचण वाटत होती का, असे प्रश्‍नही या वेळी पत्रकार पवार यांनी उपस्थित केले. यामध्ये प्रशासनाचा खोटारडेपणा समोर येत असून कारवाई करण्यात टाळाटाळ करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. जिल्हा समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल. शहरातील शाहीर अमीर शेख चौकातील मदिना मशिदीचे काम अनधिकृत असून ते प्रशासनाने पाडावे, या मागणीसाठी पत्रकार श्री. आप्पा पवार यांचा लढा चालू आहे.

इसिसचा क्रूरकर्मा आतंकवादी जिहादी जॉन हवाई आक्रमणात ठार !

     बैरूत - अनेकांचा अतिशय क्रूरपणे शिरच्छेद करणारा इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेचा जिहादी जॉन हा क्रूरकर्मा आतंकवादी हवाई आक्रमणात ठार झाला आहे. इसिसने या बातमीला दुजोरा दिला आहे. 
    ब्रिटीश नागरिक असलेला महंमद एमवाझी हा जिहादी जॉन या नावाने ओळखला जात होता. इसिसचा प्रभाव असलेल्या सिरियातील राक्का शहरात चारचाकीतून प्रवास करत असतांना जिहादी जॉनच्या मोटारीवर अमेरिकेच्या ड्रोन विमानाद्वारे आक्रमण करण्यात आले होते. १२ नोव्हेंबर २०१५ला झालेल्या आक्रमणात जॉनची मोटार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या आक्रमणात गंभीर घायाळ झालेला जिहादी जॉन ठार झाला, असे वृत्त दाबिक या ऑनलाईन नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. जिहादी जॉन प्रवास करत असलेल्या वाहनावर ड्रोन विमानाने आक्रमण केल्याचे एका अमेरिकन अधिकार्‍याने यापूर्वीच स्पष्ट केले होते. जिहादी जॉनचा मृत्यू झाल्याचे इसिसने मान्य केले आहे.

इराकच्या सैन्यामध्ये जादूटोण्याचा वापर : जादूटोणा करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे इराकच्या गृहमंत्रालयाचे आदेश

अंनिस आणि तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     इराक - देशात जादूटोण्याचा वापर वाढत चालला आहे. लोकांकडून नोकरी मिळण्यासाठी, वैवाहिक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी, तसेच सैन्यातीलही समस्या सोडवण्यासाठी जादूटोण्याचे साहाय्य घेतले जात आहे. जादूटोण्याच्या अंतर्गत देण्यात येणारे ताविज आणि अन्य वस्तूंसाठी सहस्रो रुपये डॉलर मोजले जात आहेत. इराकमधील ५ सहस्रांहून अधिक लोक या जादूटोण्याचा वापर करत आहेत. जादूटोणा केलेले हा ताविज गळ्यात घातल्यानंतर आपल्या दिशेन येणार्‍या बंदूकीच्या गोळीची दिशा आपोआप पालटते आणि गोळी दुसर्‍या दिशेने जाते, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. हा जादूटोणा करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश इराकच्या गृहमंत्रालयाने दिले आहेत. जादूटोणा करणारे लोक देशातील समस्यांचा अपलाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, कलम २४८ अन्वये जादूटोणा करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. 
     गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, जादूटोणा करणारे तांत्रिक लोकांची गरिबी आणि अशिक्षितपणाचा अपलाभ घेत आहेत. जनता ज्या वेळी धार्मिक आणि सामाजिक नियमांचे पालन करतील, त्याच वेळी जादूटोणा संपुष्टात येऊ शकतो. 

इसिसने इराकच्या ३ सहस्र ५०० नागरिकांना बनवले गुलाम !

इसिसच्या क्रूर कारवायांना सामोरे जाण्यासाठी भारत शासन आणि जनता यांनी काय सिद्धता केली आहे ?
      जिनिव्हा - इसिसने इराकच्या ३ सहस्र ५०० हून अधिक नागरिकांचे अपहरण करून त्यांना गुलाम बनवले आहे. यात महिला आणि लहान मुलामुलींचे प्रमाण अधिक असल्याची माहिती संयुक्त राष्ट्र संघाने एका अहवालातून प्रसिद्ध केली आहे. इसिसच्या कह्यात सीरियाचा मोठा भाग आहे. इसिसने अनेक ठिकाणी मानवी मूल्ये पायदळी तुडवत क्रूर हत्या केल्या आहेत. एखाद्या भागावर ताबा मिळवल्यानंतर अपहरण केलेल्या नागरिकांपैकी पुरुषांना ठार मारून महिला आणि बालक यांना ओलिस ठेवले जाते. या महिला बहुतांशी याझिदी समुदायाच्या आहेत. गोळी घालून ठार मारणे, शिरच्छेद करणे, रणगाड्याखाली चिरडणे, जिवंत जाळणे आणि उंच इमारतीवरून ढकलून देणे अशा क्रूर शिक्षा इसिसकडून दिल्या जात आहेत. लहान मुलांना आतंकवादाचे शिक्षण दिले जात आहे. इसिसच्या कह्यात अशी ८०० ते ९०० मुले असल्याचा अंदाज आहे. या मुलांचा लहानपणापासूनच बुद्धीभेद करून त्यांना आतंकवादाच्या मार्गावर आणले जात असल्याने संयुक्त राष्ट्र संघाने चिंता व्यक्त केली आहे. अपहरण केलेल्यांना वेळेवर जेवणही मिळत नसल्याने अनेकांचा भुकेने तडफडून मृत्यू झाल्याचा अंदाजही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

चित्रपट आणि टी.व्ही. यांपासून सावधान !

१. हिंदी भाषिक कवीने भावी पिढीला सुप्त सामर्थ्याची जाणीव करून देणे
            मुलांना उद्देशून एका कवीने म्हटले आहे - 
तुम अग्नि की भीषण लपट । 
जलते हुए अंगार हो ॥ १ ॥
तुम चंचला (टीप १) की द्युति (टीप २) चपल । 
तीखी प्रखर असिधार (टीप ३) हो ॥ २ ॥
तुम खौलती जलनिधि-लहर । 
गतिमय पवन उनचास (टीप ४) हो ॥ ३ ॥

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

    रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 
     स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत. 

मेक इन इंडियाच्या बोधचिन्हाच्या निमित्ताने...

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया या उपक्रमाचे बोधचिन्ह विडेन-केनेडी या अमेरिकी आस्थापनाच्या भारतीय शाखेत सिद्ध झाल्याचे माहिती अधिकाराच्या अंतर्गत समोर आले आहे. कोणाही राष्ट्रप्रेमीस खटकणारी अशीच ही गोष्ट आहे. १२५ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या राष्ट्रात एक बोधचिन्ह बनवण्यासाठी केंद्रशासनाला कोणीच पात्र वाटले नाही का ? कि भारतियांपेक्षा विदेशी नक्कीच काही आगळेवेगळे सिद्ध करू शकतात, याविषयी शासनाला भलताच आत्मविश्‍वास आहे, असे वाटते. म्हणूनच कि काय त्यांना अमेरिकी आस्थापनाचे पाय पकडण्याची घाई झाली. हे बोधचिन्ह बनवण्यास निविदा मागवण्यात आल्या होत्या. असे असले तरी बोधचिन्ह बनवण्यासाठी विदेशी आस्थापानास देण्याच्या सूत्राचे कधीच समर्थन होऊ शकत नाही.

कोकणी जनांच्या इच्छाशक्तीच्या बळावर जैतापूरचे काल्का होईल ?

काल्का येथील वंडरलॅण्डचे विहंगम दृश्य
     कोकणातील जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प साकार करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या सत्ता काळात घेण्यात आला; मात्र प्रकल्पासाठी निवडलेली भूकंप प्रवण अशी अयोग्य भूमी आणि प्रकल्पामुळे होणारा निसर्गाचा र्‍हास, तसेच अन्य कारणे या सर्व गोष्टींचा विचार करता अणुऊर्जेला नव्हे, तर या प्रकल्पाला कोकणातील प्रत्येक व्यक्तीचा विरोध आहे. तरीही हा प्रकल्प पूर्ण करण्याचा अट्टाहास होत आहे. जर्मनीमध्येही अशीच परिस्थिती काल्का गावातील नियोजित अणुऊर्जा प्रकल्पाविषयी उद्भवली होती. तेथील जनतेचा जनक्षोभ पाहून हा पूर्ण झालेला प्रकल्प जर्मन शासनाला बंद करावा लागला. जैतापूर प्रकल्पाच्या विरोधातही कोकणी माणसामध्ये जनक्षोभ आहे. जर्मनीच्या धर्तीवरच कोकणातील प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक इच्छाशक्तीच्या जोरावर आंदोलन केल्यास नक्कीच यश मिळेल, याविषयी श्री. प्रदीप इंदूलकर यांनी मांडलेले विचार आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

साधकांनी इतर कैद्यांना केलेले साहाय्य आणि त्यांच्यामध्ये झालेले परिवर्तन

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल

समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी आयोजित केलेला यज्ञ आणि सनातनने आयोजित केलेला यज्ञ

     येथे दिलेला भेद काही ठिकाणी आलेल्या अनुभवावरून केला आहे. सर्वत्र अशी स्थिती असेल असे नाही. - संपादक 
- कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०१६, दुपारी १.२० ते ३.३८)

यज्ञाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. यज्ञाच्या आदल्या दिवशी चैतन्याच्या फुग्यात गाडी चालवत आहोत, असे जाणवणे : १४.१.२०१६ या दिवशी मला कार्यालयातून येतांना झुआरी पुलापासून पुष्कळ चैतन्य जाणवत होते. तसेच मी चैतन्याच्या फुग्यातच गाडी चालवत आहे, असेही जाणवले.
२. यज्ञाच्या पहिल्या दिवशी कार्यालयात चैतन्य जाणवणे आणि उजव्या सोंडेचा गणपति उग्र स्वरूपात दिसून त्याच्या सभोवती लाल अन् पिवळा प्रकाश दिसणे : १५.१.२०१६ या दिवशी मला चाकरी (नोकरी) करत असलेल्या वेरणा (गोवा) येथील कार्यालयात चैतन्य जाणवून माझी भावजागृती होत होती. तसेच मला शांत वाटत होते. मी डोळे मिटले आणि रामनाथी आश्रमात होत असलेल्या यज्ञाचे स्मरण करत होतो.

उच्छिष्ट गणपति यज्ञासंदर्भात आलेल्या विविध अनुभूती

समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील
 महान योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या 
मार्गदर्शनाखाली सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या निमित्ताने...
१. यज्ञकुंडाकडे पाहून आलेल्या अनुभूती
१ अ. यज्ञकुंड सिद्ध होतांना : यज्ञकुंड सिद्ध होत असतांना त्याकडे पाहून पुष्कळ शांती आणि चैतन्य जाणवले. उत्साहात वाढ झाली.
१ आ. बांधून पूर्ण झालेले यज्ञकुंड : बांधून पूर्ण झालेले यज्ञकुंड पहातच रहावेसे वाटत होते. लक्ष त्याकडे पुनःपुन्हा वेधले जात होते. तेव्हा शांती जाणवली. एखादे कार्य पूर्ण झाल्यानंतरचे वातावरण जाणवले.
२. प.पू. रामभाऊस्वामी यांची स्थुलातून आणि सूक्ष्मातून जाणवलेली वैशिष्ट्ये
     प.पू. रामभाऊस्वामी आश्रम पहात असतांना ते कलामंदिराकडून येत होते. त्या वेळी सेवेसाठी कलामंदिरात जात असतांना धान्य-विभागासमोर त्यांचे अनपेक्षित प्रथमच दर्शन झाले. हे दर्शन काही क्षणच झाले.

५६ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात सनातनचे साधक श्री. अनिकेत गजानन अर्धापूरकर यांचे सुयश !

    यवतमाळ - येथील रेचे चित्रकला महाविद्यालयातील कला शिक्षक पदविका (एटीडी) अभ्यासक्रमातील विद्यार्थी आणि सनातनचे साधक श्री. अनिकेत गजानन अर्धापूरकर यांच्या कलाकृतीची निवड करण्यात आली. या प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण माननीय जयंतराव पाटील खुले नाट्यगृह, ईश्‍वरपूर येथे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या यशाचे श्रेय श्री. अनिकेत यांनी श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले.

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी श्री. अविनाश जाधव यांना आलेल्या अनुभूती

श्री. अविनाश जाधव
१. नामजप श्‍वासाला आपोआप जोडला जाणे आणि आनंद होणे : उच्छिष्ट गणपति यज्ञस्थळी गेल्यावर नामजप श्‍वासाला आपोआप जोडला गेला. तो प्रयत्न न करताही आपोआप होऊन श्‍वासावर लक्ष केंद्रित झाले. मन प्रसन्न होऊन त्याच स्थितीत बसून त्याचा आनंद घ्यावा, असेच वाटत होते. एरव्हीच्या तुलनेत या वेळी उपायांची परिणामकारकता अधिक जाणवली.
२. मन निर्विचार होणे : एरव्ही आध्यात्मिक उपायांच्या निमित्ताने नामजप करण्यास रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिर वा अन्य ठिकाणी बसल्यानंतर १० ते १५ मिनिटांत मनात अधूनमधून एखादा विचार येऊन जातो. या वेळी यज्ञस्थळी बसल्यानंतर मन निर्विचार झाले होते. मन कोणताही प्रयत्न न करताच आपोआप एकाग्र झाले होते. डोळे उघडे असतांनाही तशीच स्थिती अनुभवता आली.
३. भाव जागृत होणे : यज्ञस्थळी यज्ञविधीकडे पाहून आणि यज्ञविधीच्या वेळी मंत्रपठण अन् अन्य विधी पहातांना भावाची स्थिती आपोआप साधली जात होती. वेगळा प्रयत्न करावा लागत नव्हता.
४. प.पू. रामभाऊस्वामी यांची प्रत्येक हालचाल ओतप्रोत भावाने भरलेली असल्याने त्यांतूनही भावजागृती होणे : यज्ञविधीमध्ये आहुती देतांना किंवा यज्ञविधीच्या अग्नीत प्रवेश करण्यापूर्वी प.पू. रामभाऊस्वामी यांची हालचाल भावपूर्ण असते. ही हालचाल पाहिल्यावर आपोआप समोरच्याचा भाव जागृत होतो. मन निर्विचार होऊन जाते.

उच्छिष्ट गणपति यज्ञात प.पू. रामभाऊस्वामी यांनी श्री गणेशमुखाची प्रतिमा साकारून तिला पुष्पस्वरूप अलंकार घालणे, याचे केलेले सूक्ष्म-परीक्षण

कु. रजनी कुर्‍हे
१. उद्देश
     सकाळपासून प्रारंभ झालेल्या यज्ञाचे सर्व कर्तेपण यज्ञाच्या मुखातच श्री गणेशमुख सिद्ध करून ते श्री गणेशाला अर्पण करत आहेत, असे मला जाणवले. देवाने हे विचार दिल्यावर माझे अंतःकरण कृतज्ञतेने आणि शरणागत भावाने दाटून आले.
२. वस्त्र आणि अलंकार घालणे
     यज्ञात श्री गणेशाचे सिद्ध केलेले प्रतीकात्मक मुख ठेवून त्याला वस्त्र आणि अलंकार घालणे, म्हणजे प्रत्यक्ष श्री गणेशाला सगुण स्वरूपात आवाहन करणे. त्या वेळी प्रत्यक्ष श्री गणेश धूम्रवर्णात आला असून प.पू. रामभाऊस्वामी हे श्री गणेशाला अत्यंत भावस्थितीत जाऊन पुष्पस्वरूप अलंकारांनी सुशोभित करत आहेत.
अ. त्या वेळी ब्रह्मांडातून सर्व देवतांचे तत्त्व यज्ञस्थळी आकृष्ट होऊन तेही गजपूजनाच्या वेळी उपस्थित आहेत.
आ. श्री गणेशाचे सगुणरूपात आवाहन केल्यावर त्या ठिकाणी नीला आणि सरस्वती (रिद्धी आणि सिद्धि) यांचे देवीतत्त्वही यज्ञस्थळी श्री गणेशाच्या प्रतिमेजवळ आकृष्ट झाले होते

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती

श्री. पुंडलीक माळी
१. यज्ञात आहुती देतांना आश्रमातील सर्व वातावरण चैतन्याने भरून गेले आहे, असे वाटले. त्यामुळे अनिष्ट शक्तींना जागा नसल्यामुळे त्या पळून जातांना दिसल्या.
२. यज्ञ स्वर्गात होत असल्याचे भासत होते. आश्रमातील प्रत्येकाच्या तोंडवळ्यावर प्रसन्नता दिसत होती. त्यामुळे ते वातावरण स्वर्गातील वातावरणाप्रमाणे जाणवले.
- श्री. पुंडलीक माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१.२०१५)

नामजप करतांना देह हलका होऊन अस्तित्वशून्यतेकडे जाणे आणि तेव्हा दिसलेला पांढरा प्रकाश म्हणजे गुरुदेवांंचे अस्तित्व, असे जाणवणे

श्रीमती मृणालिनी भोसले
     १.११.२०१५ या दिवशी सकाळी नामजप करतांना माझ्या मनात ॐकाराविषयी कुतूहल जागे झाले. त्या क्षणी मी हलकी होऊन आपोआप वर चालले आहे, असे वाटले. मला चांगले वाटले; म्हणून मी तशीच वरवर जात राहिले. थोड्या वेळाने मी मिरज या गावाच्या वर गेले. त्यानंतर संपूर्ण सांगली, महाराष्ट्र आणि भारतही मला खाली दिसू लागला. विमानातून असेच दिसत असावे, असे मला वाटले. मला देह नव्हता; पण केवळ माझे अस्तित्व होते.
      त्यानंतर पृथ्वीही लहान दिसू लागली. त्यानंतर सूर्यमंडळ दिसले, तरीही मी वरवर जात होते. कुठे, ते मला कळत नव्हते. त्यानंतर मला अनेक सूर्यमंडळे दिसू लागली. ही आकाशगंगा असावी, असे मला वाटले; पण त्यानंतर अनेक आकाशगंगा दिसल्या. मला भीती वाटत नव्हती; पण पुष्कळ शांत वाटत होते. त्यानंतर मी कुठे गेले ?, ते कळले नाही; पण जिथे होते, तिथे केवळ पांढराशुभ्र प्रकाश होता.

बालपणापासूनच धर्माभिमान असलेला उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला नवीन पनवेल, रायगड येथील कु. अमर दिलीप बागुल (वय ११ वर्षे) !

कु. अमर बागुल
     पौष शुक्ल अष्टमी (१७.१.२०१६) या दिवशी नवीन पनवेल, जिल्हा रायगड येथील कु. अमर बागुल याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. जन्मापूर्वी
१ अ. नामजप आणि आध्यात्मिक उपाय करणे : मला गर्भ रहात नसे. प.पू. जोशीबाबांनी मला ताईत दिला. तेव्हापासून माझा गर्भपात झाला नाही. मी या काळात नियमितपणे नामजप करत असे आणि इतरांना साधना सांगत असे. मी बाळाभोवती संरक्षक कवच निर्माण होण्यासाठी अंगफलक घालत असे.
१ आ. संतांना भेटल्यावर त्यांनी पेढा देणे : मला ७ व्या मासात (महिन्यात) संतांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली. मी प.पू. जोशीबाबांना भेटल्यानंतर त्यांनी मला पेढा दिला. तेव्हा वहिनीने मला मुलगा होणार असल्याचे सांगितले. घरी माझे डोहाळेजेवण असतांना मला पेढाच मिळाला. तेव्हा सर्व साधकांनीही मला मुलगाच होणार असल्याचे सांगितले आणि तसेच झाले.
२. जन्मानंतर
२ अ. संंतांनीच बाळाचे नामकरण करून त्याचे अमर हे नाव ठेवले.
२ आ. अमरचे पाठांतर चांगले आहे.

२ इ. सातत्य : तो प्रतिदिन सूर्यनमस्कार घालतो. तुळशीला पाणी घालतो. कपाळावर नाम लावतो. मला घरकामात साहाय्य करतो.
२ ई. काटकसरीपणा : अमर लहानपणापासूनच काटकसरी आहे. तो कपडे जपून वापरतो. तो शाळेत लागणार्‍या वस्तू काटकसरीने वापरतो.

पूजा करतांना देवतांनी ती अधिक चांगली करण्यासंदर्भात केलेले सूक्ष्मातील मार्गदर्शन

वेदमूर्ती केतन शहाणे
१. आश्रमासमोरील देवळातील मारुतीच्या मूर्तीची पूजा करतांना मूर्तीने पंचोपचार पूजा करण्यास सांगत असल्याचे जाणवणे, त्यानंतर नैवेद्य अर्पण करण्यास आणि त्यानंतर काही दिवसांनी शेंदूर वाहण्यास सांगितल्यामुळे ती मूर्ती जागृत होत असल्याचे जाणवणे : रामनाथी आश्रमात पुढच्या बाजूला घुमट्यावजा दोन लहान देवळे आहेत. एकात वीरमारुतीची स्थापना केली असून दुसर्‍या देवळात एका देवतेची पूजा सध्या केवळ कलशाच्या पूजेच्या माध्यमातून केली जाते. एकदा वीरमारुतीची पूजा करतांना माझी प्रतिदिन पंचोपचार पूजा करत जा, असे मारुती मला सांगत आहे, असे मला जाणवले. त्यामुळे मी गंध, फुले याचबरोबर अक्षता, धूप आणि दीप दाखवून पंचोपचार पूजा करू लागलो. दुसर्‍या दिवशी मारुति मला म्हणाला, माझी पंचोपचार पूजा होत आहे, तर मला नैवेद्यही दाखव. त्यानुसार प्रतिदिन मी मारुतिला साखरेचा नैवेद्य दाखवू लागलो. ५.८.२०१४ या दिवशी मला शेंदूर वाहा, असे मारुतीने मला सांगितले. त्यामुळे ही मारुतीची मूर्ती पुष्कळ जागृत आहे, असे मला जाणवते.
२. दुसर्‍या देवळातील कलशातील श्रीफळाची पूजा करतांना अनपेक्षितपणे गणपतीशी संबंधित मंत्र आणि श्‍लोक म्हटले जाणे : एका संतांनी सांगितल्याप्रमाणे मारुतिच्या देवळाशेजारील देवळात एका कलशावर श्रीफळाची स्थापना करण्यात आली आहेे. ते कोणते दैवत आहे, हे मला ठाऊक नाही. मी प्रतिदिन पूजा करतांना ज्या देवतेची पूजा करत असतो, त्या देवतेशी संबंधित स्तोत्र म्हणतो.

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक जोडप्याची आवश्यकता !

संतसेवेची सुवर्णसंधी !
     पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक जोडप्याची आवश्यकता आहे. जे सेवक जोडपे या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी श्री. रूपेश रेडकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
भ्रमणभाष : ८४५१००६०७०
इ-मेल : hinducoordination@gmail.com

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - पौष शुक्ल पक्ष चतुर्दशी/पौर्णिमा (२३.१.२०१६) सकाळी ७.३१ वाजता
समाप्ती - पौष कृष्ण पक्ष प्रतिपदा (२४.१.२०१६) सकाळी ७.१५ वाजता
दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे थोड्याशा भौतिक सुखासाठी ख्रिस्ती होणारे हिंदू, तर कुठे धर्मासाठी प्राण अर्पण करून इतिहासात अजरामर झालेले छत्रपति संभाजी महाराज ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.७.२०१५)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सदाचाराचे महत्त्व ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      मानवाचे रूप अल्प काळाचे असते. रूपाला महत्त्व नसते, तर व्यक्तीचे आचार-विचार आणि वर्तन यांनाच खरे महत्त्व असते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

आज धर्मरक्षणाकरता स्त्रियांनी सर्वस्व त्यागण्याचा विलक्षण दुर्धर प्रसंग ओढवला आहे !

     धर्माकरता केलेला सर्व त्यागच ‘इह आणि ‘पर जीवन कृतार्थ करतो. स्त्रीची तृप्ती मातृत्वात असली, तरी त्याहीपेक्षा श्रेष्ठतम, परमतृप्ती देणारा स्व-धर्माकरता मातृत्वाचाही त्याग करण्यात, प्रसंगी सर्वस्वाचा होम करण्यात आहे. हे सतीचे वाण आहे. किंबहुना त्याहीपेक्षा दिव्यदाहक आहे. सतीला किमान सरणावरच्या पतीशवाचा तरी आधार असतो. इथे तोही नाही. धर्म ही चीजच मुळी अमूर्त, अदृष्ट आहे. आज धर्मरक्षणाकरता स्त्रियांनी सर्वस्व होमून टाकण्याचा विलक्षण दुर्धर प्रसंग ओढवला आहे. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मे २०१०)

राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात !

संपादकीय 
      हरिद्वारहून ४ आतंकवाद्यांना कह्यात घेण्यात आले आहे. त्यांचा देहली आणि हरिद्वार येथील अर्धकुंभ पर्वात आतंकवादी कारवाया करण्याचा कट असल्याचे समोर आले आहे. नुकतेच हरियाणा येथील मशिदीतून एका आतंकवाद्याला अटक करण्यात आली होती. त्याने दिलेल्या माहितीवरूनच त्या चार आतंकवाद्यांना कह्यात घेण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांनाही जिवे मारण्याची धमकी इसिसकडून मिळाली आहे. नुकतेच पठाणकोट येथे झालेल्या आक्रमणाची जखमही अद्याप ओलीच आहे. या पार्श्‍वभूमीवर आतंकवाद्यांचा विचार करता भारताची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे, हेच पुनःपुन्हा ठळकपणे जाणवू लागले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn