Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

लालबहादूर शास्त्री यांचा आज स्मृतीदिन

कोटी कोटी प्रणाम !

आज नृसिंह सरस्वती जयंती


हेरगिरी प्रकरणी एका भारतीय सैनिकास राजस्थानमधून अटक !

असे फितूर सैनिक देशाचे काय रक्षण करणार ? अशांना जनतेने 
फासावर लटकवण्याची मागणी केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
     श्रीगंगानगर - पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे यांसाठी पाकिस्तानी तस्करांना साहाय्य करण्याच्या आरोपाखाली अनिल कुमार या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाला नुकतीच राजस्थानच्या रायसिंहनगर येथून अटक करण्यात आली आहे. ५ जानेवारी या दिवशी मोहाली पोलिसांनी गुरजंटसिंह उपाख्य भोलू, जितेंद्रसिंह उपाख्य जिंदी आणि संदीपसिंह या तिघांना अटक केली होती. हे तिघेही राजस्थान आणि पंजाब पोलिसांना हवे होते. त्यांच्याकडून ४ पिस्तुले, एक एअरगन, १९० जिवंत काडतुसे, ३१ भ्रमणभाष संच, पाकिस्तानी भ्रमणभाष संच आणि सिम कार्ड कह्यात घेण्यात आले.

तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नात ! - भाजप

मालडा हिंसाचार प्रकरण
मोदी शासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा !
     कोलकाता - मालडा येथे धर्मांधांनी केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेस पक्षातीलच काही गुंड कार्यकर्त्यांकरवी पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे, असा खळबळजनक आरोप भाजपचे नेते सिद्धार्थनाथ सिंह यांनी केला आहे. मुसलमानांच्या श्रद्धास्थानाचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ मालडा येथील कालियाचाक येथे सुमारे अडीच लाख मुसलमानांनी निषेधमोर्चा काढला होता. या मोर्च्यात धर्मांधांनी प्रचंड हिंसाचार करून सैनिकांचे वाहन आणि पोलीस ठाणे जाळले होते, तसेच सामान्यांच्या घरात घुसून लुटालूट केली होती. एवढे होऊनही बंगालच्या मुख्यमंत्री ममता (बानो) बॅनर्जी यांनी मालडा येथील घटना सांप्रदायिक नव्हती, असे संतापजनक विधान केले होते. त्यावर सिंह यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

ठाणे, नालासोपारा आणि कोल्हापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे शनिमंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशाविषयी हिंदु धर्माभिमान्यांनी रणशिंग फुंकले

   राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ संघटना संघटित राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी हिंदुत्ववाद्यांनी शनिशिंगणापूर येथे भूमाता ब्रिगेडच्या महिलांचा चौथर्‍यावर जाण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कृतीशील होण्याचा निर्धार व्यक्त केला.
ठाणे येथे शासनाला देण्यात येणार्‍या निवेदनावर स्वाक्षर्‍या करतांना हिंदू
भूमाता ब्रिगेडवाल्यांचा निव्वळ प्रसिद्धीसाठीचा 
केविलवाणा प्रयत्न ! - श्री. मोतीराम गोंधळी, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती
     ठाणे, १० जानेवारी (वार्ता.) - भूमाता बिग्रेडीवाल्यांनी शनिशिंगणापूर येथे २६ जानेवारी या दिवशी चौथर्‍यावर जाण्याचा आयोजित केलेला कार्यक्रम हा निव्वळ प्रसिद्धीसाठीचा केविलवाणा प्रयत्न आहे. पुरोगामी संघटनांना जर तरी स्त्रीमुक्तीचा एवढाच कळवळा असेल, तर इतर धर्मियांच्या स्त्रियांवर लादलेली बंधने पण तोडून दाखवावीत, असे प्रतिपादन हिंदु राष्ट्र जनजागरण समितीचे श्री. मोतीराम गोंधळी यांनी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले.

पठाणकोट आक्रमणाचा पारदर्शी तपास करा ! - अमेरिकेची पाकला पुन्हा ताकीद

     नवी देहली - पठाणकोट आक्रमणाच्या प्रकरणी पाकने पारदर्शीपणे तपास करावा, अशी ताकीद अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी नवाझ शरीफ यांना दिली. पाकने केलेल्या कारवाईची फलनिष्पत्ती दिसणेही आवश्यक आहे, असे ते म्हणाले. भारत आणि पाक यांच्यात लवकरच सचिव पातळीवर होणार्‍या बैठकीच्या पूर्वी पाकने जैश-ए-महंमदवर कारवाई करावी, अशी मागणी भारताने केली आहे. त्यानंतर अमेरिकेने या प्रकरणाच्या तपासावरून पाकची २ वेळा कानउघाडणी केली. (आतंकवादाविषयी कायमच दुटप्पी भूमिका घेणार्‍या अमेरिकेवर भारताने अवलंबून न रहाता स्वत:च्या सामर्थ्यावर पाकचा बीमोड करावा ! - संपादक)

आमदार नवाब यांची हकालपट्टी करा ! - अन्सारी

     लखनौ - मुलायम सिंह यादव यांना पुन्हा सत्ता हवी असेल, तर त्यांनी राममंदिराची मागणी करणारे त्यांच्या पक्षाचे आमदार बुक्कल नवाब यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी बाबरी मशिदीचे दावेदार हाशिम अन्सारी यांनी केली. आमदार नवाब यांनी नुकतीच अयोध्येत राममंदिर झाल्यास मी १० लाख रुपये, तसेच श्रीरामाच्या मूर्तीला सुवर्णमुकूट अर्पण करीन, अशी घोषणा केली होती. त्यावर अन्सारी यांनी टीका केली. (हिंदुबहूल भारतात राममंदिराची मागणी करणे गुन्हा आहे का ?- संपादक)

प्रजासत्ताकदिनी देशभरातील मदरशांवर राष्ट्रध्वज फडकवला जावा ! - रा.स्व. संघ

आतापर्यंतचा इतिहास पहाता, हे दिवास्वप्नच ठरणार नाही का ?
संघ देशव्यापी मोहीम राबवणार
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - प्रजासत्ताकदिनी देशभरातील मदरशांवर राष्ट्रध्वज फडकवला जावा, अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचने येथे केली. यासाठी संघ राष्ट्रध्वज फडकवा ही देशव्यापी मोहीम हाती घेणार असल्याची माहिती मुस्लिम राष्ट्रीय मंचचे उत्तरप्रदेश राज्याचे समन्वयक मोरध्वज सिंह यांनी दिली.
     सिंह पुढे म्हणाले,देशातील सर्व मदरशांना राष्ट्रध्वज फडकवण्याविषयी पत्र पाठवण्यात आले आहे. याशिवाय दारुल उलूम देवबंद आणि नदवा या संघटनांनाही पत्र पाठवून मुसलमानांना प्रजासत्ताकदिनासारख्या राष्ट्रीय दिनांचे महत्त्व सांगून जागरूकता निर्माण करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. संघाची राष्ट्रध्वज फडकवा मोहीम शाळा, महाविद्यालये, कार्यालये आदी ठिकाणी राबवण्यात येणार आहे. या मोहिमेची पुढील दिशा ठरवण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंचकडून २० आणि २१ जानेवारी या दिवशी वाराणसी येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्राच्या रस्ते सुरक्षा अभियानातूनही अमीर खान यांची हकालपट्टी !

     नवी देहली -अतुल्य भारत विज्ञापनाच्या सदिच्छादूत पदावरून अभिनेता अमीर खान यांची नुकतीच हकालपट्टी केल्यानंतर केंद्रशासनाने आता रस्ते सुरक्षा अभियानातूनही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अमीर यांनी असहिष्णुतेच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळेच शासनाने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेवरून डिसेंबर २०१४ मध्ये अमीर खान यांना रस्ते सुरक्षा अभियानासाठी सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या अभियानासाठी आता नवीन पर्याय शोधणे चालू झाले आहे.

(म्हणे) हेमंत करकरे यांची हत्या हिंदुत्ववादी संघटनांकडूनच ! - एस्.एम्. मुश्रीफ, माजी पोलीस महानिरीक्षक

करकरे आतंकवादी आक्रमणात मारले गेल्याचे सार्‍या जगाला माहीत आहे. असे असतांना त्यांची 
हत्या केल्याचा आरोप हिंदुत्ववाद्यांवर करणे, ही एस्.एम्. मुश्रीफ यांची असहिष्णुताच नव्हे का ?
 
वस्तूस्थितीकडे दुर्लक्ष करून हिंदुत्ववाद्यांवर बिनबुडाचे आरोप करणारे माजी पोलीस महानिरीक्षक
 मुश्रीफ यांनी त्यांच्या कारकीर्दीत कशाप्रकारे अन्वेषणे केली असतील, याचा विचारच न केलेला बरा !
     सोलापूर - मालेगाव बॉम्बस्फोटानंतर कानपूर, नांदेड, मक्का मशीद, समझोता एक्स्प्रेस, अजमेर या ठिकाणी झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा हेमंत करकरे (आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालिन प्रमुख) हे अतिशय प्रामाणिकपणे तपास करत होते. यात देशातील सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला; मात्र ते मागे हटले नाहीत, त्यामुळेच मुंबई आतंकवादाची संधी पाहून हिंदुत्ववादी संघटनांनीच करकरे यांची हत्या केली आहे, अशी गरळओक माजी पोलीस महानिरीक्षक एस्.एम्. मुश्रीफ यांनी पुन्हा केली.

श्रीक्षेत्र सोनई (जि. नगर) येथील संत प.पू. सद्गुरु नानामहाराज सोनईकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

प.पू. सद्गुरु नाना महाराज (उजवीकडे)
यांचा सन्मान करतांना सनातनचे श्री. प्रकाश मराठे
     रामनाथी (गोवा) - श्री रेणुका दरबार श्रीक्षेत्र सोनई, नेवासा, नगर येथील संत प.पू. नानामहाराज सोनईकर यांनी ८ जानेवारीला रामनाथी, फोंडा, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. सनातनचे साधक श्री. प्रशांत जुवेकर यांनी प.पू. नानामहाराज यांना आश्रमात चालणारे आध्यात्मिक संशोधन, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी सनातनचे साधक श्री. प्रकाश मराठे यांनी प.पू. नानामहाराज यांचा श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. या वेळी त्यांच्यासमवेत श्री. नितीन सबनीस, सौ. मेघना सबनीस, श्री. सर्वेश्‍वर नाईक आदी उपस्थित होते.

(म्हणे) भगव्या अतिरेक्यांना रोखले नाही, तर पठाणकोटसारखी आक्रमणे होणार !

पठाणकोटसारखी आक्रमणे कोण करतात, हे वेळोवेळी उघड झाले 
असतांनाही त्याचे खापर नाहक हिंदूंवर फोडून त्यांना भगवे अतिरेकी संबोधणे, हा हिंदुद्वेषच !
हिंदुद्वेषी प्रकाश आंबेडकर बरळले !
     संभाजीनगर - पठाणकोटवर झालेल्या आक्रमणात स्थानिकांचाही सहभाग असला पाहिजे. अशा हस्तकांचा बंदोबस्त केला जाणार आहे कि नाही ? पाकिस्तानी अतिरेक्यांना मुसलमानच साहाय्य करतात असे नाही, तर हिंदु अतिरेकीही साहाय्य करतात. पाकिस्तानी अतिरेक्यांना साहाय्य करणार्‍या अशा भगव्या अतिरेक्यांना जर वेळीच रोखले नाही, तर पठाणकोटसारखी आक्रमणेे वारंवार होत रहातील. पठाणकोट आक्रमणातही अशाच हस्तकांचे साहाय्य घेतले असावे, असे वैचारिक दिवाळखोरी करणारे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी केले. (सहिष्णु हिंदूंना अतिरेकी संबोधणे, ही असहिष्णुता नव्हे का ? - संपादक)

नवस बोलल्याप्रमाणे सोनिया गांधी यांना जामीन संमत झाल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्याने नवस फेडण्यासाठी बालाजीला हाताचे बोट दान केले !

याविषयी अंनिसला काय म्हणायचे आहे ?
     बेंगळुरू (कर्नाटक) - नॅशनल हेराल्ड घोटाळ्याच्या प्रकरणी आरोपी असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जामीन मिळावा, यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते इंदुवालू सुरेश तिरुपतीच्या श्री बालाजीला नवस बोलले होते. या प्रकरणी न्यायालयाने गांधी माता-पुत्र यांना न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी समन्स बजावल्यानंतर सुरेश यांनी श्री बालाजीला माझ्या नेत्यांना जामीन संमत झाला, तर मी डाव्या हाताचा अंगठा देईन, असा नवस बोलला होता. गांधी माता-पुत्राला जामीन संमत झाल्यानंतर २५ डिसेंबरला सुरेश यांनी तिरुपती येथे जाऊन स्वत:च्या डाव्या हाताचे एक बोट कापून दानपेटीत टाकले. मी १ सहस्र रुपयांच्या नोटेमध्ये माझे बोट गुंडाळून आभाराच्या चिठ्ठीसह दानपेटीत टाकले, असेही त्यांनी सांगितले.

मनीष तिवारी सध्या रिकामटेकडे असून आरोप करण्यावाचून त्यांच्याकडे अन्य काहीच काम नाही !

केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांचा काँग्रेसचे नेते तिवारी यांच्यावर पलटवार
सैन्याने देहलीकडे कूच केल्यासंबंधीचे आरोप फेटाळले !
      नवी देहली - काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांच्याकडे सध्या काहीच काम नाही. ते रिकामटेकडे आहेत. त्यामुळेच ते बिनबुडाचे आरोप करत सुटले आहेत, या शब्दांत केंद्रीयमंत्री व्ही.के. सिंह यांनी मनीष तिवारी यांचा समाचार घेतला. भारतीय सैन्याच्या दोन तुकड्यांनी वर्ष २०१२ मध्ये केंद्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता देहलीच्या दिशेने कूच केल्याच्या घटनेत तथ्य होते, असा खळबळजनक खुलासा काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन माहिती आणि प्रसारण विभागाचे राज्यमंत्री, तसेच संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचे सदस्य असणारे मनीष तिवारी यांनी नुकताच एका कार्यक्रमात केला. या घटनेसंबंधी तिवारी यांनी तत्कालीन सैन्यप्रमुख आणि सध्या केंद्रीयमंत्री असणारे व्ही.के. सिंह यांना उत्तरदायी ठरवलेे.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

(म्हणे) वर्गात विद्यार्थी नसतील, तर शिक्षकभरतीला मान्यता देऊ नका !

मुळात विद्यार्थी वर्गात शिकण्यासाठी का बसत नाहीत, याचे कारण शिक्षण 
विभागाने जाणावे ! शिक्षणाची गुणवत्ता सुधारल्यास शिक्षण विभागावर अशी वेळ येणार नाही !
शिक्षण विभागाचा आदेश
     पुणे - इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या वर्गात विद्यार्थीसंख्या अधिक दिसते; पण प्रत्यक्षात वर्गात विद्यार्थीच दिसत नाहीत. विद्यार्थी विविध शिकवण्यांना जात असल्यामुळे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीसंख्या अल्प असल्याची तक्रार सातत्याने विविध घटकांकडून करण्यात येते. एकीकडे वर्गात विद्यार्थी दिसत नाहीत आणि त्याच वेळी शिक्षकपदांसाठी महाविद्यालयांकडून संमती मागण्यात येते. जर महाविद्यालयात विद्यार्थीच नसतील, तर शिक्षक तरी काय करायचे, असा प्रश्‍न शिक्षण विभागाला पडला आहे.

पाकमधून आलेल्या विस्थापितांना भारताचे नागरिकत्व मिळावे !

बांगलादेशी मुसलमान घुसखोरांना भारताचे सहजरित्या नागरिकत्व मिळते; 
पण हिंदूंसाठी चळवळ राबवावी लागते ! 
सिंधी सेंट्रल पंचायतची मागणी 
      भोपाळ - पाकमधून भारतात येणार्‍या प्रत्येक सिंधी विस्थापितासाठी सिंधी सेंट्रल पंचायतचळवळ राबवणार आहे. पंचायत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांना निवेदन पाठवणार आहे. या निवेदनात या विस्थापितांना सुखरूपपणे भारतात आणणे, त्यांना नागरिकत्व देणे आणि त्यांच्या पूनर्वसनाचा बंदोबस्त करणे या मागण्या करण्यात येणार आहेत. पंचायतने म्हटले आहे, पाकिस्तानमध्ये हिंदूंना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. ज्या हिंदूंना तेथून भारतात यायचे आहे, त्यांना भारताने स्वीकारले पाहिजे. भारत-पाक फाळणीच्या वेळी ज्याप्रमाणे तत्कालीन शासनाने विस्थापितांना नागरिकत्व, रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन केले होते, त्याचप्रमाणे आताही पाकिस्तानातून आलेल्या सिंधी नागरिकांच्या पुनर्वसनाकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे.

आतंकवाद्यांवर कारवाई करण्यात चालढकलपणा करू नका ! - अमेरिकेकडून पाकची कानउघाडणी

पाकला एकीकडे चेतावणी देणारी अमेरिका दुसरीकडे त्यांना
 शस्त्रसाहाय्यही करते ! म्हणून अशा दुटप्पी अमेरिकेच्या वांझोट्या 
चेतावण्यांवर विसंबून न रहाता भारताने स्वत:च्या हिंमतीवर पाकचा बीमोड करावा !
पठाणकोट आक्रमणाचे प्रकरण
     वॉशिंग्टन - पाकने मुंबई आक्रमणातील आतंकवाद्यांवर कारवाई करण्यात चालढकल केली. तथापि पठाणकोटमधील भारतीय सैन्याच्या हवाई तळावर आक्रमण करण्याचा कट रचणार्‍या आतंकवाद्यांवर कारवाई करण्यात चालढकलपणा करू नका, अशा शब्दांत अमेरिकेने पाकची कानउघाडणी केली आहे. पाककडून आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी होणार्‍या विलंबाविषयी अमेरिकेच्या गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने पाक शासनावर ताशेरे ओढले. अमेरिकेचे अधिकारी पुढे म्हणाले,

७४ वर्षीय वृद्ध कारचालकाची ६ जणांना धडक

     मुंबई - अंधेरीत ७४ वर्षीय वृद्ध कारचालकाने भरधाव कार चालवून सहा जणांना धडक दिली आहे. या भीषण अपघातानंतर कारचालक पसार असून सर्व घायाळांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
     फरार कारचालकाचे नाव श्रीचंद पजाबी असे असून ९ जानेवारीला रात्री उशिरा हा अपघात घडला. पंजाबी हे अंधेरीतील तेली गल्लीत जात असतांना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या जवळ राहणार्‍या सहा जणांना कारने धडक दिली. अपघातात पती-पत्नी आणि दोन मुले असे एकाच कुटुंबातील चौघे जण तसेच अन्य दोन तरुण जखमी झाले. या सर्वांना तातडीने क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारचालकाच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि आय.एस्.आय.एस्.चे झेंडे फडकवणार्‍यांना फासावर चढवा !

     पठाणकोटचे आक्रमण बघता आपण अजून काहीच शिकलो नाही, असे वाटत आहे. पाकचे शेपूट वाकडे असून ते कधीच सुधारणार नाहीत आणि ते विश्‍वासपात्रही नाहीत. पाकमध्ये पंतप्रधान म्हणजे नुसती कटपुतली बाहुली असून खरी सत्ता लष्कराच्या कह्यात आहे, हे शेंबडे पोरंही सांगेल. भारतद्वेष हेच शासनामधील लोकांना करणे भाग आहे. जर त्यांना सत्तेत रहायचे असेल, तर अन्यथा लष्कर सत्ता उलथवून लावते, हा इतिहास आहे.
     पाकशी कुठलीच चर्चा करू नका. नवाझ शरीफ काही आश्‍वासन देत असतील, तरी ते खोटे आणि वरवरचे आहे. जरी खरे असले, तरी लष्कर आणि आतंकवादी ते पूर्ण करू देणार नाहीत. पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेकी अड्डे नष्ट करा. त्यांच्यावर आक्रमणे करा. काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि आय.एस्.आय.एस्.चे झेंडे फडकवणार्‍यांना फासावर चढवा.

महाविद्यालयात जातांना विद्यार्थिनींनी लिपस्टिक लावण्याची आवश्यकता नाही - कर्नाटकचे राज्यपाल वाजूभाई वाला

आता स्त्रीमुक्तीवाले राज्यपालांच्या विरोधात मोहीम उघडणार, हे निश्‍चित !
      बेंगळुरू - महाविद्यालयात जातांना विद्यार्थिनींनी लिप्स्टिक लावण्याची अथवा वैशिष्ट्यपूर्ण केशरचना करण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन कर्नाटकचे राज्यपाल वाजूभाई वाला यांनी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या झालेल्या समारंभात केले. ते पुढे म्हणाले, महाविद्यालयात विद्यार्थिनी शिकण्यासाठी जातात कि सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी ? महिला आणि पुरुष दोघांना बुद्धी असते; मात्र मुली अभ्यासाविषयी जितक्या गंभीर असतात, तितके गांभीर्य मुलांमध्ये आढळत नाही. तरुणांनी व्यसन आणि वाईट संगत यांपासून, तर मुलींनी फॅशनपासून दूर रहावे.

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपद्वारे पाक आतंकवाद्यांकडून भारतीय तरुण आतंकवादाच्या जाळ्यात !

केंद्रशासन आणि गृह विभाग आतंकवाद्यांच्या या नव्या षड्यंत्राचा कसा सामना करणार आहेत ?
     नवी देहली - सामाजिक संकेतस्थळावर स्वत:चा भ्रमणभाष क्रमांक उघड करण्याची सवय अनेक भारतियांना आहे. याच सवयीचा अपलाभ सध्या पाकिस्तानी आतंकवादी संघटना उठवत आहेत. 
१. पाकिस्तानी भ्रमणभाष वापरणारे आणि स्वतःची खोटी ओळख सांगणारे आतंकवादी पाकिस्तानमध्ये बसूनच भारतीय तरुणांच्या चर्चेतील नावे अथवा विषय यांचा वापर करून व्हॉट्स अ‍ॅप ग्रूप सिद्ध करत आहेत.
२. आतंकवाद्यांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ सीमेजवळ रहाणार्‍या तरुणांचे भ्रमणभाष क्रमांक घेऊन त्यांना स्वत:च्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सायबर तज्ञांचा समूह आतंकवाद्यांच्या या नव्या खेळीचा सामना करण्याची सिद्धता करत आहे.

नाशिक येथे गोदावरी नदी पुन्हा प्रदूषितच प्रक्रियाविरहीत पाण्याचे नदीत विसर्जन

     नाशिक - सिंहस्थ पर्वानंतर पुन्हा एकदा गोदावरी नदी प्रदूषित झाली आहे. कोट्यवधी रुपये व्यय करून बांधलेल्या नव्या घाटांची दुरवस्था होण्यासही प्रारंभ झाला आहे. संपूर्ण नदीपात्रातील पाण्यावर हिरव्या वनस्पती फुटल्याने हिरवा तवंग निर्माण झाला आहे. रामकुंडापासूनचा काही भाग सोडल्यानंतर तपोवनापर्यंत हा तवंग साचला आहे. त्यामुळे या भागाला डबक्याचे स्वरूप आले आहे.
     टाकळीच्या पुढे पुष्कळ दुर्गंधीचा त्रास सोसावा लागतो. टाकळी ते दसक यादरम्यान महानगरपालिकेने सिंहस्थात घाट बांधले; मात्र मलशुद्धीकरणाचा विषय तसाच ठेवल्याने फेसाळ आणि प्रक्रिया न केलेले पाणी गोदावरी पात्रात सोडले जाते. मार्च २०१५ पर्यंत गोदावरीत सांडपाणी मिसळणे बंद व्हावे, अशा निरीच्या सूचना होत्या; पण मार्च २०१६ जवळ आले असतांनाही गोदावरीचे प्रदूषण तसेच आहे.

राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती, संत-महात्मे आदींच्या स्मारक उभारणीस मुख्यमंत्र्यांकडून मान्यता !

स्मारक उभारण्याच्या जोडीला त्याची योग्य ती देखभालही केली जावी, 
यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना आदेश द्यावेत, ही अपेक्षा !
     मुंबई - राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, इतिहासप्रसिद्ध व्यक्ती, संत-महात्मे आणि राजकीय नेते यांची स्मारके उभारण्याच्या धोरणास मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ८ जानेवारी या दिवशी मान्यता दिली आहे. या धोरणानुसार एक राष्ट्रपुरुष अथवा थोर व्यक्ती यांची राज्यात दोनपेक्षा जास्त स्मारके उभारता येणार नाहीत. ही स्मारके वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांत उभारता येतील. राज्यात दोनपेक्षा अधिक स्मारके उभारण्यासाठी आवश्यक असणारी भूमी आणि व्यय स्मारकाची मागणी करणार्‍या संस्थेला करावा लागेल. त्यासाठी शासन निधी देणार नाही. यापुढे स्मारक ही एक योजना समजण्यात येणार आहे. राष्ट्रपुरुषांच्या जीवनाचे पैलू आणि कार्याची माहिती नागरिकांना मिळेल, अशा पद्धतीने स्मारकाची आखणी करून ती उत्कृष्ट पर्यटनस्थळे होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

केंद्रशासनाचे कुख्यात गुंड छोटा राजनशी विशेष संबंध ! - देहलीचे माजी पोलीस आयुक्त

     देहली - कुख्यात गुंड छोटा राजन याच्यासमवेत विद्यमान केंद्रशासनाचे विशेष संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप देहलीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी केला. ते देहली येथील एका साहित्य परिषदेत बोलत होते. छोटा राजन याला काही दिवसांपूर्वीच इंडोनेशिया देशातील बाली येथून भारतात आणण्यात आले होते. एकेकाळी छोटा राजनचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याच्याशी संबंध होते. तो सध्या देहलीतील तिहार कारागृहात बंद आहे.

देशात डाव्या विचारांच्या लोकांची असहिष्णुता वाढीस ! - उमा भारती

देशात असहिष्णुता वाढली, असे म्हणणारे आणि डाव्या विचारांचे लोक याविषयी उत्तर देतील का ?
      संभाजीनगर, १० जानेवारी - भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफ्टीआयआय) अध्यक्ष अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या विरोधात पुण्यात निदर्शने होत आहेत. देहली विद्यापिठात सुब्रह्मण्यम स्वामींना प्रवेश करण्यापासून अडवले जात आहे. ही असहिष्णुता नव्हे, तर काय आहे ? आमीर खानची सुरक्षा काढली; म्हणून आमच्याकडे स्पष्टीकरण मागितले जाते. एखाद्या व्यक्तीला किती धोका आहे, यावरून त्याची सुरक्षा न्यून-अधिक केली जाते. तरीही शासनाला दोषी ठरवले जाते. देशात डाव्या विचारांच्या लोकांची असहिष्णुता वाढीस लागल्याचा आरोप केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी केला. पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांच्या विभागीय संमेलनानिमित्त उमा भारती ९ जानेवारी या दिवशी आल्या होत्या.

केवळ ३३ टक्के भारतीय मुसलमान काम करतात ! - अहवालातील माहिती

     नवी देहली - देशातील मुसलमानांच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ३३ टक्के मुसलमान काम करत आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ४० टक्के लोकसंख्या काम करते. या टक्केवारीपेक्षा मुसलमानांमध्ये काम करणार्‍यांची टक्केवारी अल्प आहे. ही माहिती वर्ष २०११ च्या धर्मनिहाय जनगणनेच्या आधारे बनवलेल्या अहवालातून समोर आली आहे.

पिंपळवंडी (जिल्हा पुणे) येथे एका विद्यार्थिनीचा विनयभंग; संस्थेचा उपाध्यक्ष अटकेत

     आळेफाटा, (जिल्हा पुणे) - येथील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी परिसरातील सुभाष विद्या मंडळाच्या शाळेतील एका विद्यार्थिनीचा संस्थेच्या उपाध्यक्षाने विनयभंग केला. ही घटना ७ जानेवारी या दिवशी घडली असून आळेफाटा पोलिसांनी संस्थेचा उपाध्यक्ष राजू रमन काकडे यांना अटक केली आहे. (आज छत्रपति शिवाजी महाराज असते, तर त्यांनी अशा नराधमांचा चौरंगाच केला असता. - संपादक)
पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,
१. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी विद्यालयाजवळ तिची सायकल आणण्यासाठी गेली होती. त्या वेळी काकडे यांनी चहा करून देण्यासाठी तिला घरात बोलावले आणि विनयभंग केला.
२. या घटनेची माहिती संबंधित विद्यार्थिनीने घरी गेल्यानंतर आईला दिली. त्यानंतर तिच्या आईने आळेफाटा पोलिसांत तक्रार दिली आणि गुन्हा प्रविष्ट केला. त्यानंतर तो पसार झाला होता.
३. ही घटना समजताच संतप्त ग्रामस्थांनी काकडे यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आणि ८ जानेवारी या दिवशी विद्यालय बंद ठेवले होते. त्यानुसार काकडे यांना पुण्यात अटक करण्यात आली.

फलक प्रसिद्धीकरता

असे फितूर सैनिक देशाचे काय रक्षण करणार ?
     अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे यांसाठी पाकिस्तानी तस्करांना साहाय्य करण्याच्या आरोपाखाली अनिल कुमार या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाला नुकतीच राजस्थानच्या रायसिंह नगर येथून अटक करण्यात आली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Pak ke liye jasusi karne ke aropme Rajasthanke 1 sainikko banaya bandi.
kya deshke aise gaddaronko Pakme bhejana chahiye ?
जागो !
: पाक के लिए जासूसी करनेके आरोप में राजस्थानसे एक सैनिक को बनाया बंदी.
क्या देशके एैसे गद्दारोंको पाक में भेजना चाहिए ?

(म्हणे) हिंसेला उघड प्रोत्साहन देणार्‍या सनातनवर कारवाई करा ! - डॉ. भारत पाटणकर

पुरोगामीवाल्यांची सनातनविरोधी तीच ती गरळओक चालूच !
      कोल्हापूर, १० जानेवारी (वार्ता.) - सनातन आणि अभिनव भारत या दोन संघटना हिंसेला प्रोत्साहन देत आहेत. हिंसेला जाहीरपणे प्रोत्साहन देणार्‍यांवर कारवाई करा. त्यांच्या सूत्रधारांचा शोध घेऊन दोषी आढळणार्‍या सर्वांवर गुन्हे प्रविष्ट करावे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांचा खून करणारे अन् खुनाचा सूत्रधार असणार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे. कॉ. पानसरे यांच्या मारेकर्‍यांना ओळखणार्‍या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या संरक्षणाविषयीचे एक पत्र वर्तमानपत्रातून उघड झाले आहे. हे पत्र उघड करणार्‍यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे, अशी विधाने उघडपणे केली जात असतांनाही त्यावर कारवाई होत नाही. राज्यशासनाने अशा हिंसेला प्रोत्साहन देणार्‍यांवर कारवाई करावी अन्यथा जानेवारीनंतर अशांच्या विरोधात मोहीम राबवू, अशी धमकावणी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी ९ जानेवारी या दिवशी शाहू स्मारक येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

मुंबईच्या सागरी किनार्‍यावर पहारा करणार्‍या पोलिसांना ४ वर्षे मोडक्यातोडक्या झोपडीचा आधार !

  • पुन्हा त्याच प्रकारे आक्रमण झाले असते, तर पोलीस झोपडीच्या आधाराने आतंकवाद्यांना कसे सामोरे जाणार होते ?
  • मुंबईवर आतकंवादी आक्रमण करण्यासाठी सागरी मार्गाने आतंकवादी घुसले असतांनाही त्यानंतरची ४ वर्षे तेथे पहारा करणार्‍या पोलिसांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध न होणे, हे अत्यंत गंभीर आहे ! 
झोपडीवजा पोलीस चौकी (आधी)
अद्ययावत पोलीस चौकी (आता)

अयोध्येत त्वरित राममंदिर बांधा ! - तमिळनाडूतील शिवसैनिकांची मागणी

तमिळनाडूतील तंजावूर येथे आंदोलन करतांना शिवसैनिक
     चेन्नई - अयोध्येत त्वरित राममंदिर बांधावे, तसेच विस्थापित काश्मिरी हिंदूंसाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र वसाहत निर्माण करावी, अशी मागणी तमिळनाडूतील शिवसैनिकांनी केली. या मागण्यांसाठी त्यांनी तंजावूर येथे नुकतेच आंदोलन केले. या वेळी शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष जी. राधाकृष्णन्, उपाध्यक्ष श्री. पुलवानजी बोस, राज्य संयोजक श्री. जयम् पांडियन, सचिव श्री. गणेश बाबू आदी उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पल्लूरूथी (केरळ) येथे धर्माचरणाविषयी प्रवचन

      कोची - पल्लूरूथी, केरळ येथे एका कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थितांना धर्माचरण आणि साधना यांविषयी मार्गदर्शन केले. येथील धर्माभिमानी श्री. टिळकन् यांच्या निवासस्थानी एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या हिंदूंना समितीच्या कु. प्रणिता सुखटणकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आरंभ करण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. धर्माचरण करून धर्मप्रसाराच्या कार्यात सर्वांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे सांगून कु. सुखटणकर यांनी उपस्थित हिंदूंना या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. 
क्षणचित्र : हे प्रवचन आवडल्याचे सांगून अन्य ठिकाणी असे प्रवचन घेण्याची मागणी उपस्थित हिंदूंनी केली. 

भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झालेल्या भारतात न्यायालयाच्या आदेशाचे पालन होणार का ?

पू. अशोक पात्रीकर
१. कर्मचार्‍यांकडून भ्रष्टाचार थांबवण्याची हमी घ्या आणि नंतरच 
सातवा वेतन आयोग नेमा, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त करणे
     केंद्रीय कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी केंद्रशासनाने नुकताच सातवा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. एका अभियंत्याच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात या सूत्राचा उल्लेख करून उच्च न्यायालयाने केेंद्रशासनाला भ्रष्टाचार थांबवण्याची हमी कर्मचार्‍यांकडून घेऊन नंतरच सातवा वेतन लागू करावा, असे मत व्यक्त केले आहे.
२. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी शासनस्तरावर केलेले सर्व उपाय निष्प्रभ 
सिद्ध होऊन भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढत असणे आणि 
                                         कुणालाही त्याचे सुवेरसुतक नसणे
     आज भ्रष्टाचाराविषयी भारताची स्थिती अतिशय गंभीर आहे. व्यावसायिक आणि शासन यांचे एकही क्षेत्र यातून सुटलेले नाही. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी शासनस्तरावर यापूर्वी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यांपैकी सर्व शासकीय कायार्र्र्लयांमध्ये भ्रष्टाचार झाल्यास अमुक क्रमांकावर दूरध्वनी करा, अशा आशयाची सूचना लिहिण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी सर्व कार्यालयांमध्ये भ्रष्टाचारविरोधी शपथ घेण्याचे नाटक करण्यात आले. तसेच शासनाचा लाचलुचपत विभाग केवळ भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठीच निर्माण केला आहे. हे सर्व उपाय योजूनही भ्रष्टाचार न्यून न होता त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे कुणालाच सुवेरसुतक नाही.

३ मंदिरे द्या आणि ३९ सहस्र ९९७ मशिदी तुमच्या जवळ ठेवा !

भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा मुसलमानांसमोर प्रस्ताव
     नवी देहली - हिंदूंच्या वतीने तुम्हाला श्रीकृष्णाचा प्रस्ताव अर्थात भेट देत आहोत, आम्हाला केवळ तीन मंदिरे द्या आणि ३९ सहस्र ९९७ मशिदी तुमच्या जवळ ठेवा, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून मुसलमानांना नुकतेच केले. मला आशा आहे की, मुसलमान राममंदिराच्या उभारणीमध्ये दुर्योधनाच्या भूूमिकेत असणार नाहीत, असेही डॉ. स्वामी म्हणाले. महाभारताच्या काळात कौरव-पांडव यांचे युद्ध टाळण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वत: पांडवांच्या वतीने कौरवांकडे गेले होते आणि त्यांच्याकडे पांडवांना काही गावे देण्याचा प्रस्ताव ठेवला होता; मात्र दुर्योधनाने पांडवांना सुईच्या टोकाएवढीही भूमी देणार नाही, अशी स्पष्टपणे भूमिका घेतली होती. डॉ. स्वामी यांच्या म्हणण्यानुसार तीन मंदिरांमध्ये अयोध्येचे राम मंदिर, काशी येथील काशीविश्‍वनाथ मंदिर आणि मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिर यांचा समावेश आहे. (डॉ. स्वामी यांच्याकडून अयोध्येतील राम मंदिरासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न कौतुकास पात्र आहेत; परंतु इतिहासकारांनी नोंदवल्यानुसार गेल्या १ सहस्र वर्षांमध्ये धर्मांधांनी सहस्रो मंदिरे तोडून त्यांचे मशिदीमध्ये रूपांतर केले. त्यामुळे या प्रस्तावर हिंदूंना काय वाटते, हेही पहाणे आवश्यक आहे. - संपादक)

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, ही म्हण सार्थ ठरवणारे देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री !

लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने...
      लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असतांना एके दिवशी त्यांच्या पत्नी ललितादेवींना साडी आणण्यासाठी एका दुकानात गेले. त्यांना पाहून दुकानदाराने एक सहस्र, तीन सहस्र रुपये किमतीच्या भारी साड्या दाखवल्या होत्या. त्यावर शास्त्रीजी म्हणाले, अरे, एवढ्या महाग साड्या मला परवडणार नाहीत. दुसर्‍या साध्या आणि स्वस्त दाखवा. तेव्हा दुकानदार म्हणाला, आपण पैशांची काळजी कशाला करता ? मी थोडेच पैसे तुमच्याकडून घेणार आहे ! आमच्यावतीने ही आपणास भेट आहे. ते ऐकताच शास्त्रीजी एक दोन पावले मागे सरकले. सात्त्विक संतापाने उद्गारले, महाशय ! मी भारताचा पंतप्रधान अशासाठी नाही झालो की, अशा प्रकारे भेटी घेत फिरू ! पुढे कधी असे शब्द तोंडातून काढू नका आणि अभद्र व्यवहारही करू नका. कृपया मला परवडतील, अशाच साध्या साड्या दाखवा. 
     स्वस्त साड्या घेऊन आणि त्यांचे पैसे चुकते करून शास्त्रीजी दुकानातून बाहेर पडले. (साप्ताहिक कडेलोट, दीपावली विशेषांक (४.११.२०१३))
विद्यमान राज्यकर्ते असा विचार कधी करतात का ?

मारेकरी असल्याचा बेछूट आरोप करणारे सबनीस यांना न्यायालयात खेचणार ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर

अधिवक्ता संजीव पुनाळेकर सहभागी होताच टीव्ही ९ वरील 
कार्यक्रमातून श्रीपाल सबनीस यांचे पलायन !
अधिवक्ता संजीव 
पुनाळेकर
      मुंबई, १० जानेवारी (वार्ता.) - मला मारेकरी म्हणणारे सबनीस यांना मी न्यायालयात खेचणार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर यांनी केले. ते ७ जानेवारी या दिवशीच्या टीव्ही ९ या वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रात बोलत होते. त्या चर्चासत्रात ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस हेही सहभागी झाले होते. चर्चेच्या आरंभी सबनीस यांनी अधिवक्ता पुनाळेकर यांच्यावर बेछूट आरोप केले. त्या पार्श्‍वभूमीवर पुनाळेकर यांनी उपरोक्त वक्तव्य केले.
श्रीपाल सबनीस यांचे निराधार आरोप ! 
(म्हणे) पुनाळेकर यांची भाषा खुनाची !
      अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि सनातन संस्था यांच्यावर बेछूट आरोप करतांना श्रीपाल सबनीस म्हणाले, पुनाळेकर यांची खूनाची भाषा आहे. माझी हत्या झाली, तर मी घाबरत नाही. याला मी तसूभर घाबरणार नाही. मला गोळ्या घालायच्या असतील, तर जरूर घाला. पुन्हा दाभोळकर उभे रहातील. लाखो सबनीस उभे रहातील. मी पंतप्रधानांना विरोध केलेला नाही. केवळ खेडवळ भाषेमुळे मी त्यांचा एकेरी उल्लेख केला. भाषेच्या मतभेदासंदर्भात काही मतभेद असेल, तर त्यासंदर्भात मला अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी लेखनाद्वारे प्रश्‍न विचारावा.

थिल्लरपणाचा उच्चांक !

     संसदेत गंभीर सूत्रांवर कधी कधी प्रदीर्घ आणि नीरस भाषणे होतात, त्या वेळी कधी कधी आम्ही एकमेकींच्या साड्यांवरही चर्चा करतो. सततची भाषणे ऐकून कंटाळा आला, तर आम्ही इतर सूत्रांवर चर्चा करतो. मी संसदेत जाते. पहिले भाषण ऐकते. मग दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या भाषणात तेच तेच मुद्दे येतात. त्यामुळे कधी कधी डुलकीही लागते किंवा शेजारच्या खासदाराशी गप्पा मारते. तुमची साडी कुठून आणली, माझी कुठून आणली, अशीही चर्चा होते ! ही मुक्ताफळे उधळली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ! तीही कुठे खाजगीत नव्हे, तर चक्क एका जाहीर कार्यक्रमात ! एवढेच गुपित (?) सांगून त्या थांबल्या नाहीत, तर पुढे सांगितले, चौथ्या भाषणानंतर कोणता खासदार काय बोलला, हे विचारले, तर मला ठाऊक नाही, असे उत्तर मी देते. आमच्या तेथे जे चालते, तुमच्या वर्गात चालत नसेल. खासदारांशी गप्पा मारत असतांना वरून सगळे बघत असतात. कॅमेर्‍याची दृष्टी आमच्याकडे असते. तुमच्यासारख्या लोकांना काय वाटते की, आम्ही देशाची चर्चा करतो; पण तसे नसते. मी चेन्नईच्या खासदाराशी चर्चा करत असतांना तुम्हाला वाटत असेल की, ताई चेन्नईच्या पुराविषयी बोलत असतील; पण मी त्यांच्याशी त्यांच्या साडीविषयी बोलत असते.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.

परकीय संस्कृतीचा उदो उदो !

     आज आपल्या देशात परकीय संस्कृतीचा उदो उदो चालला आहे. पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या भपक्यास भुललेले मनुष्य ती संस्कृती अधिक चांगली आहे, असे समजून बिनदिक्कतपणे तिचा पुरस्कार करत असलेले आढळून येतात. सध्याचे राजकीय वातावरण आणि शिक्षणपद्धत या गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत, असेच दिसून येते. ही गोष्ट अत्यंत वाईट आहे. 
     धर्माचा निःपक्षपातीपणे अभ्यास न करता उगीचच वाचाळ-पंचविशी करणारा वर्ग आज मोठ्या प्रमाणात आढळतो, तसेच पाश्‍चात्त्यांचे सर्व दुर्गुणच या मंडळीत प्रामुख्याने आढळतात, त्यांचे सद्गुण आढळत नाहीत.

व्हॉट्स अ‍ॅपवरील विनोदावरून शनिशिंगणापूर येथील धार्मिक प्रथा मोडण्याच्या गाढवपणाचे मिळालेले उत्तर !

१. व्हॉट्स अ‍ॅपवरून आलेला विनोद
     काही दिवसांपूर्वी व्हॉट्स अ‍ॅपवरील एक विनोद वाचनात आला. त्याचा आशय असा होता. एक गुरुजी विद्यार्थ्यांना दारूचे दुष्परिणाम शिकवत असतात. त्यासाठी ते एका गाढवासमोर एका बालदीत दारू आणि दुसर्‍या बालदीत पाणी ठेवतात. ते गाढव पाण्याच्या बालदीकडे जाते आणि पाणी पिते. गुरुजी बालद्यांची अदलाबदली करतात. गाढव पुन्हा पाण्याच्याच बालदीकडे जाते आणि ते पिते. गुरुजी विद्यार्थ्यांना विचारतात, तुम्ही यातून काय शिकलात ? गुरुजींना अपेक्षित उत्तर असते, गाढवसुद्धा दारू पित नाही. त्यामुळे माणसांनीही ती पिऊ नये. प्रत्यक्षात एक विद्यार्थी उत्तर देतो, जे दारू पित नाहीत, ते गाढव असतात ! दुसरा विद्यार्थी म्हणतो, गाढवाला गुळाची (दारूची) चव काय !

प्राचीन वाङ्मयाची मनाला वाटेल, तशी मोडतोड करणारे आधुनिक साहित्यिक !

     दुर्वासांच्या शापामुळे दुष्यन्ताला स्मृतिभ्रंश झाला. काय हा चमत्कार ? कालिदासाच्या काळी शापाचे सामर्थ्य सर्वसंमत होते. आधुनिक विज्ञानयुगाच्या साहित्यशास्त्राच्या कसोट्या प्राचीन वाङ्मयाला लावणे योग्य नाही. हिरोशिमा आणि नागासाकी येथील अणुबाँब किंवा भोपाळच्या दुर्घटनेमुळे होणारा स्मृतिभ्रंश समर्थनीय वाटण्याचे कारणच काय ?
      दुष्यंत, शकुंतला, विश्‍वामित्र, मेनका, कण्व, दुर्वास, इंद्र, ही शाकुंतल नाटकामधील पात्रे ! ते अद्भूत वातावरण ! हे सर्व काढून टाकले, तर शाकुंतलमध्ये उरते काय आणि त्याची किंमत तरी काय ?

सत्य, अहिंसा, संयम आणि न्याय यांची हत्या करणार्‍या अविवेकी पिसाटांना धर्म, तपस्या आणि योग यांचे मोल कसे कळायचे ?

      सत्य, अहिंसा, संयम आणि न्याय यांची हत्या करणार्‍या पाश्‍चात्त्यांनी स्वच्छपणे घोषित केले आहे, वैदिक धर्म, योगसामर्थ्य आणि अलौकिक शक्ती हे सारे ढोंग आहे. थोतांड आहे. हे केवळ जनमानसाला जाळ्यात अडकवण्याचे कारस्थान आहे. साम्यवादाचा पुरस्कार करणार्‍यांना, धनसंपत्ती हेच सर्वस्व मानणार्‍यांना, वर्गसंघर्ष आणि वर्गविध्वंसाची वाटचाल करणार्‍यांना, योगसामर्थ्याची अलौकिकता कशी पटायची ? सत्य, अहिंसा, संयम आणि न्याय यांची हत्या करणार्‍या अविवेकी आततायी पिसाटांना धर्म, तपस्या आणि योग यांचे मोल कसे कळायचे ? धनसंपत्ती हीच सर्वस्व मानणार्‍या पाश्‍चात्त्य भौतिकवाद्यांना लाभ-हानी, जय-पराजय हे सारे समान मानणे कितपत शक्य आहे ?
     ईश्‍वर हे पाखंड, बंड आणि थोतांड आहे, असे उद्घोषित करणार्‍या पाखंडी पाश्‍चात्त्यांना आम्ही तुझे महात्म्य मान्य करायला लावू.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक घनगर्जित, एप्रिल २०१२)

देहलीतील कायदा आणि सुव्यवस्था यांची सद्यस्थिती !

      नवी देहली ही भारताची राजधानी आहे कि गुन्हेगारांची बजबजपुरी आहे ?, असा प्रश्‍न सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे. मी पत्रकार म्हणून वर्षभर देहलीत काम करत होतो, तेव्हा एका रिक्षातून जातांना तो रिक्षावाला दिशादर्शक (सिग्नल) तोडून निघाला. त्या वेळी मी त्याला रोखले; पण तो म्हणाला, साहब, यहाँ (संसदमे) सिर्फ कानून बनते है, यहा कानून नहीं चलते, बाकी देशमें चलते है ! त्या निरक्षर; पण अनुभवी रिक्षावाल्याच्या मताचा देहलीत ठायी-ठायी अनुभव तेथे गेलेल्या सर्वांनाच थोड्याफार प्रमाणात येतो. एका तरुणीवर बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेतील गुन्हेगारांना फाशी द्या, अशा उग्र मागणीसाठी ५-६ दिवस तरुण निदर्शकांनी सत्तारूढ नेते आणि पोलीस यांची झोप उडवली; पण या तरुणाईला समजून घेऊन तिच्या सात्त्विक संतापाचे ठोस कृतीद्वारे समाधान करण्याऐवजी तरुण निदर्शकांवर ऐन थंडीत गारपाण्याचा फवारा मारण्याचे, लाठीमार करण्याचे, अश्रुधूर सोडण्याचे प्रकार पोलिसांनी केले आणि त्याचे तत्कालीन काँग्रेस शासनाने निर्लज्जपणे समर्थन केले.
(संदर्भ : मासिक एकता, जानेवारी २०१३) 

अधिवक्ता पुनाळेकर यांच्याशी संवाद न साधता वाद वाढवून प्रसिद्धीची हौस भागवणारे श्रीपाल सबनीस !

      अधिवक्ता पुनाळेकर कार्यक्रमात सहभागी झाल्याचे सूत्रसंचालकाने सांगताच सबनीस म्हणाले, पुनाळेकर या कार्यक्रमात आहेत, हे मला माहीत नव्हते. मी अशा माणसाशी संवाद साधणार नाही. मारेकरी संस्थेचा वकील आहे. जोपर्यंत ते क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत मी संवाद साधणार नाही. मी शासन आणि समाज यांच्याशी संवाद करू इच्छितो. मी केलेल्या सांस्कृतिक संचिताचा हा प्रश्‍न आहे. संतसाहित्य आणि समाजसुधारक यांचा मी केलेल्या अभ्यासाचा हा प्रश्‍न आहे. (संतसाहित्याचा अभ्यास केला आहे, तर त्यानुसार आचरण का करत नाहीत ? आध्यात्मिक संस्था असलेल्या सनातन संस्थेवर गंभीर आरोप करणे, हा कोणत्या अभ्यासाचा भाग आहे ? - संपादक)

भारतियांची मानसिकता गुलामगिरीची असणे

      आपण गुलाम लोक आहोत. कोई बडे गुलाम अली, तर कोई छोटे गुलाम अली, लेकिन सब गुलाम ही गुलाम. आपण आपल्या धन्याचेच ऐकणार. कोणी शरद पवारांचे गुलाम, कोणी सोनियांचे, कोणी शहेनशहांचे, कोणी अरविंद केजरीवालांचे, कोणी चिनी साम्राज्याचे, कोणी अमेरिकेचे, तर कोणी इंग्रजांचे. गुलामाने धन्याचे नाही ऐकायचे, तर कोणाचे ? तुम्ही लेखक असा, कवी असा, इतिहास संशोधक असा अथवा आणखी कोणी असा, शेवटी गुलामच ना ? - दादूमिया (मासिक धर्मभास्कर, जून २०१४)

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) 



      हिंदु समाजाचा इतिहास पानोपानी ओरडून सांगतो की, अगोदर राजसत्ता हिंदूंच्या हातातून जाते, मग धर्म जातो आणि नंतर प्रदेश जातो. (साप्ताहिक राष्ट्रपर्व)

काही वर्षांत होणार्‍या तिसर्‍या महायुद्धात बॉम्बने हा सागरी मार्ग एका क्षणात नष्ट होईल आणि १० सहस्र कोटी रुपये पाण्यात जातील, हेही शासनाला कळत कसे नाही ?

     मुंबईतील बहुप्रतिक्षित सागरी मार्गाला केंद्राकडून अनुमती देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून नुकतीच दिली. या प्रकल्पाला यापूर्वीच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदिल दिला होता.या प्रकल्पानुसार नरिमन पाँईट ते कांदिवली असा ३५-३६ किलोमीटर लांबीचा रस्ता उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला १० सहस्र कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
     मागील १ मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
     यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

सतत आनंदी आणि उत्साही असणारा अन् देवाच्या अनुसंधानात रमणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला धनकवडी, पुणे येथील बालसाधक चि. प्रणव तागडे (वय अडीच वर्षे) !

चि. प्रणव तागडे
१. सौ. श्‍वेता तागडे (चि. प्रणवची आई)
अ. कपाळावर त्रिशूळ : चि. प्रणवचा जन्म झाल्यानंतर त्याच्या कपाळावर त्रिशूळ होते. आता ते गंधासारखे दिसते.
आ. हाताची मुद्रा : जन्मापासून आतापर्यंत त्याचे हात सतत मुद्रा केलेल्या स्थितीत असतात.
इ. शांत : चि. प्रणव जन्मतःच पुष्कळ शांत आहे. तो सहसा रडत नाही.
ई. हसतमुख : प्रणव सतत हसतमुख असतो. तो झोपेतून उठला, तरीही हसतमुख असतो. त्याच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर आपोआप नामजप चालू होतो. पहिल्या तीन मासांत मी माहेरी असतांना शेजारचे लोक म्हणायचे, या घरी लहान बाळ आहे, असे जाणवतही नाही. प्रणव समोरच्या लोकांना लगेचच आपलेसे करून घेतो. तो अनोळखी व्यक्तींनाही हसून प्रतिसाद देतो.

तीव्र त्रासातही साधकांच्या प्रगतीसाठी धडपडणार्‍या आणि अध्यात्म जगणार्‍या सौ. संगीता घोंगाणेकाकू !

सौ. संगीता घोंगाणे
१. प्रेमभाव
     मी पू. अनुताईंना भेटण्यासाठी ठाणे सेवाकेंद्रात गेले होते. तेव्हा सौ. घोंगाणेकाकूंनी मला पहाताक्षणी पटकन उठून मिठी मारली. त्या मिठीतून प्रेमाचा वर्षाव होत आहे, असे जाणवले आणि काही क्षण मी स्वतःला विसरूनच गेले. ती प्रेमाची मिठी आजही आठवली की, मला आनंद होतो.
२. शारीरिक त्रास होत असतांनाही स्थिर रहाणे
अ. काही दिवस मी ठाणे सेवाकेंद्रात सौ. काकूंच्या सहवासात राहिले. तेव्हा त्यांचा पाय पुष्कळ दुखत होता. त्या वेदना मी पाहू शकत नव्हते; पण तीव्र वेदना होत असतांनाही त्या स्थिर होत्या.

सात्त्विक वेशभूषा परिधान करून प्रसारसेवेला गेल्यावर त्या वेशभूषेचा जिज्ञासूंवर इष्ट परिणाम झाल्याने त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे

     विजयपूर (कर्नाटक) येथील श्री. प्रथमेश पीरापूर हे धर्माभिमान्यांसाठी आयोजित केलेल्या सत्संगात उपस्थित असतात. एका सत्संगात ते म्हणाले, पूर्वी मी टी-शर्ट घालून धर्मप्रसाराच्या सेवेला जायचो; पण आता सदरा-पायजमा घालून जातो. त्यामुळे समाजातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहेे. ती वेशभूषा पाहूनच समोरची व्यक्ती जिज्ञासेने विषय ऐकून घेते.

सात्त्विक वेशभूषा केल्यानंतर साधकाला आलेल्या अनुभूती

१. कपाळावर कुंकवाचा टिळा लावल्यावर 
सेवेची तळमळ वाढून अधिक प्रमाणात आनंद मिळणे
     पूर्वी मी कपाळावर टिळा लावत नसे. लहानपणापासून एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे मला जमत नव्हते, उदा. परीक्षेच्या वेळी किंवा ताण निर्माण करणार्‍या प्रसंगांच्या वेळी. साधारण २ वर्षांपूवी मी सेवेसाठी रामनाथी आश्रमात आलो. तेव्हाही एकाग्रतेने सेवा करणे मला जमत नव्हतेे. एके दिवशी एका साधकाने मला कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यासंदर्भात सांगितले. त्याप्रमाणे मी टिळा लावू लागलो. काही दिवसांनंतर माझी सेवा करण्याची तळमळ वाढून मला अधिक प्रमाणात आनंद मिळत असल्याचे लक्षात आले. एके दिवशी काही कारणास्तव मी कपाळावर कुंकवाचा टिळा लावला नाही. त्या दिवशी मला निरुत्साह जाणवून माझी सेवेतील एकाग्रताही न्यून झाली होती. यावरून मी नियमित कपाळावर कुंकवाचा टिळा लावत असल्याने आनंदी असायचो, हे माझ्या लक्षात आले. तेव्हापासून मी नियमितपणे कपाळावर कुंकवाचा टिळा लावत आहे.

सेवेतील पालट स्वीकारायला शिकवून व्यापक बनवणारे प.पू. डॉक्टर !

कु. वाल्मीक भुकन
१. चित्रीकरण विभागातील सेवेत मन रमू लागल्यावर व्यवस्थापन विभागात सेवेला जाण्यास सांगितले असता मनाचा संघर्ष होऊन तेथे मन न रमणे : मी चित्रीकरणाच्या सेवेला आरंभ केला. या सेवेत माझे मन रमू लागले. या सेवेची आवड निर्माण झाली आणि अचानक एक दिवस उत्तरदायी साधकांनी व्यवस्थापनाच्या सेवेला जाण्यास सांगितले. त्या वेळी मनाचा पुष्कळ संघर्ष झाला. माझी सेवा का पालटली ? माझी काही चूक झाली असेल का ?, असे विचार आले. नंतर मी सेवेला गेलो. आठ दिवस तेथे सेवा केली; पण मन रमत नव्हते, आनंद मिळत नव्हता. ती सेवा झाल्यावर परत चित्रीकरणाची सेवा पुष्कळ आनंदाने केली. पुन्हा पंधरा दिवसांनी व्यवस्थापनाच्या सेवेला जावे लागले.

सनातनचे संत आणि साधक यांच्यामध्ये सर्व आपलेच आहेत, असा व्यापक भाव निर्माण करणारी प.पू. डॉक्टरांची शिकवण !

पू. महेंद्र क्षत्रीय
     दिवाळीच्या सुटीत मी घरी गेले असतांना बाबांच्या (पू. महेंद्र क्षत्रीय यांच्या) दंतचिकित्सेसाठी त्यांच्यासमवेत चिकित्सालयात गेले होते. तेव्हा चिकित्सालयात एका गृहस्थाची भेट झाली. बाबा त्यांच्याशी साधनेविषयी चर्चा करू लागले. तेव्हा त्या गृहस्थाने बाबांना सांगितले, मी स्वाध्यायाची साधना करतो. तेव्हा बाबांना पुष्कळ आनंद झाला. बाबांनी त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि मला म्हणाले, हे तर आपलेच साधक आहेत !

सहस्रचंद्रदर्शन विधीच्या वेळी सनातनच्या संत पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांना आलेल्या अनुभूती

पू. (सौ.) सखदेवआजी
     मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी, म्हणजे १८.१२.२०१५ या दिवशी सनातनच्या पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या वयाला ८० वर्षे पूर्ण होऊन त्यांना ८१ वे वर्ष लागले. १९.१२.२०१५ या दिवशी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात त्यांचा सहस्रचंद्रदर्शन विधी करण्यात आला. (नेहमी हा विधी ७९ वर्ष संपून ८० वे वर्ष लागते, तेव्हा करतात.) त्या वेळी पू. आजींना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. विधीच्या ठिकाणी प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे : विधीसाठी आश्रमाच्या सभागृहात जाताच तेथे सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवले. तेथे मांडलेल्या खुर्च्या प.पू. डॉक्टरांसाठीच आहेत, असे वाटले.

त्रासांविषयी सकारात्मक विचार करून कृतज्ञताभाव वाढवा !

पू. संदीप आळशी
      सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने अनेक साधकांचे त्रास वाढत आहेत. त्रासांविषयी नकारात्मक विचार करण्यापेक्षा पुढीलप्रमाणे सकारात्मक विचार केल्यास कृतज्ञताभाव वाढण्यास साहाय्य होईल.
१. साधकांमध्ये असलेले स्वभावदोष, अहं आणि अन्य दुर्बलता यांचा लाभ घेऊन आसुरी शक्ती साधकांचे त्रास वाढवतात. यामुळे काही वेळा नगण्य स्वरूपातील दोषही विक्राळ स्वरूप धारण करतो; मात्र असे झाल्याने साधकांमध्ये स्वतःतील स्वभावदोष, अहं आणि अन्य दुर्बलता यांविषयी गांभीर्य अन् जागरूकता वाढण्यास साहाय्य होते.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.

प.पू. डॉक्टरांवरील अकाल महामृत्यूयोगाचे संकट म्हणजे एकप्रकारे राष्ट्र आणि धर्म यांवरील संकट अन् हे दर्शवणारे उदाहरण

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना ग्रहमंडलात प.पू. डॉक्टरांच्या अकाल मृत्यूयोगाचे चक्र निर्माण झाले आहे, असे सांगणे आणि बरोबर याच कालावधीत पठाणकोट येथे अतिरेक्यांनी केलेल्या आक्रमणातून हे राष्ट्रसंकटच असल्याचे सिद्ध होणे : २५.१२.२०१५ या दिवशी महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना पहाटे ३.३० वाजता उठवले आणि सांगितले, अवकाशातील ग्रहमंडलात प.पू. डॉक्टरांच्या अकाल मृत्यूयोगाचे चक्र निर्माण झाले आहे. यावर त्वरित उपाय योजण्यासाठी आपल्याला १.१.२०१६ या दिवशी तिरुवण्णामलईला जायचे आहे. त्यानुसार आम्ही पुढच्या प्रवासाचे नियोजन केले. योगायोग पहा, बरोबर याच दिवशी पठाणकोट, पंजाब येथील भारताच्या वायूदलाच्या सैनिकीतळावर अतिरेक्यांनी आक्रमण केले. अतिरेक्यांनी केलेले हे आक्रमण म्हणजे राष्ट्रसंकटच आहे. प.पू. डॉक्टरांवर येणारे मृत्यूसंकट म्हणजे एकप्रकारे राष्ट्रसंकटच असते, हेच यातून लक्षात येते.

शिष्यांना शिकवण्याच्या संदर्भात एका संतांचा अहंभाव !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     एका संतांनी माझ्याशी बोलतांना शिष्यांना बाहेर जायला सांगितले. तेव्हा मला वाटले, त्यांना काहीतरी खाजगी बोलायचे असेल. बोलतांना खाजगी असे काहीच नव्हते. नंतर शिष्य भेटले. तेव्हा त्यांनी सांगितले, गुरूंनी आज खूप छान सांगितले. मी म्हणालो, मला सांगा. मलाही काही शिकता येईल. शिष्यांनी जे सांगितले, ते मी गुरूंशी बोलतांना त्यांना सांगितलेलेच होते ! असे अहंभावी गुरु शिष्यांचे काय भले करणार ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.११.२०१५)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
खरा शिष्य
रंगाच्या जशा अनेक छटा असतात, तशाच
 शिष्यत्वाच्याही अनेक पायर्‍या असतात.
१. मला कोणी शिव्या दिल्या, मारले, माझी कुणी हत्या (खून) केली, तरी त्याच्यावर तुम्ही दया केलीत, तर मी समजेन की, माझ्या गुरूने तुम्हाला सिद्ध (तयार) केले.
भावार्थ : शिव्या देणे, मारणे, हत्या करणे इत्यादी सर्व प्रकृतीतील आहे. हे समजून ते करणार्‍याविषयी राग न येणे, एवढेच नव्हे, तर करुणाकर भगवंताप्रमाणे त्याच्यावर दया करणे, हे शिष्याच्या खर्‍या प्रगतीचे लक्षण होय.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्याविषयी आग्रह करणार्‍या महिलांनी पुढे मंदिरातील देवाच्या मूर्तीवर चढण्याचा उपक्रम राबवायचे ठरवले, तर आश्‍चर्य वाटणार नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.१.२०१६)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे यश !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     स्वतःच्या यशाच्या धुंदीत रहाणार्‍यांपेक्षा जो दीन-दुबळे, दरिद्री आणि गरजू अशा व्यक्तींच्या साहाय्याला धावून जातो अन् यालाच कर्तव्य मानतो, तोच खरा यशस्वी माणूस ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

शिक्षण, राजकारण आणि राममंदिर

संपादकीय
     अरुंधती वशिष्ठ अनुसंधान पीठ या संशोधन संस्थेने देहली विद्यापिठात ९ आणि १० जानेवारी या दिवशी श्रीराम जन्मभूमी मंदिराविषयी आयोजित केलेल्या चर्चासत्राला काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी विरोध केला. प्रकरण इतके वाढले की, विद्यापिठाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवून चर्चासत्र पूर्ण करावे लागले. पुणे येथेही विद्यार्थ्यांच्या संदर्भात असाच प्रकार गत काही मास पहायला मिळत आहे. गजेंद्र चौहान यांची पुणे येथील फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतरही तेथील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि आंदोलने करून शिस्त बिघडवण्याचे प्रकार चालू केले आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn