Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. गुळवणी महाराज जयंती

कोटी कोटी प्रणाम !

आज श्री संत सोपानदेव समाधीदिन
शनिशिंगणापूर येथे धार्मिक प्रथा मोडू पहाणार्‍या नास्तिकतावाद्यांचा प्रयत्न हाणून पाडणार !

नगर येथील हिंदुत्ववाद्यांचा निर्धार !
हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना
 यांच्या वतीने हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळीचा आरंभ
शनिशिंगणापूर येथील मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीचे प्रकरण !
डावीकडून ह.भ.प. प्रभाताई भोंग, श्री. बाळकृष्ण महाराज पंढरपूरकर,
श्री. सुनील घनवट, कु. प्रियांका लोणे, श्री. संदीप खामकर, सौ. मनीषा कावरे
 नगर - शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर जाण्यास महिलांना बंदी आहे. देशभरातील अनेक मंदिरांमध्येही धर्मशास्त्राने घालून दिलेले, तसेच पूर्वापार चालत आलेले मंदिरप्रवेशाच्या संदर्भातील नियम आहेत; मात्र तथाकथित पुरोगामी स्त्रीमुक्तीचा ढोल बडवत या परंपरा मोडू पहात आहेत. २६ जानेवारी या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या वतीने कथित स्त्रीमुक्तीचा बागुलबुवा करत धार्मिक जनता, तसेच स्थानिक नागरिक यांच्या विरोधालाही न जुमानता शनीच्या चौथर्‍यावर चढण्याचा आततायीपणा केला जाणार आहे (केवळ प्रसिद्धीसाठी आणि विरोधासाठी विरोध म्हणून धार्मिक परंपरा मोडणार्‍या स्त्रीवादी संघटना धर्मद्रोहीच होत ! अध्यात्मशास्त्र जाणून घेण्याची जिज्ञासा दाखवल्यास धर्मपरंपरा मोडू पहाणार्‍या तथाकथित स्त्रीवादी या पापापासून वाचतील ! - संपादक); मात्र शनिशिंगणापूर येथे धार्मिक प्रथा मोडू पहाणार्‍या नास्तिकतावाद्यांचा प्रयत्न हाणून पाडणार, तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळ व्यापक स्तरावर राबवणार, असा निर्धार नगर येथील हिंदुत्ववाद्यांनी व्यक्त केला आहे.

सनातनची भूमिका

शनिशिंगणापूरच्या शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी का ?
     महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानस्थित असलेल्या शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी असतांना काही दिवसांपूर्वी एका महिलेने चौथरा चढून शनिदेवाला तेलार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत स्त्रीमुक्तीचा कांगावा करत धर्मशास्त्राचा अभ्यास नसणार्‍या काही महिलांकडून या चौथर्‍यावर प्रवेश करण्याविषयी चेतावण्या दिल्या जात आहेत. या सर्व घटनांविषयी दूरचित्रवाहिन्या आणि इतर माध्यमे यांवर स्त्रीमुक्ती, पुरुषसत्ताक संस्कृती, मंदिरसंस्कृतीचा प्रतिगामीपणा, बुरसटलेली विचारसरणी आदी दृष्टीकोनांतून चर्चा चालू आहे. हा विषय धार्मिक दृष्टीकोनातून अधिक महत्त्वाचा आहे; म्हणून सनातनचा दृष्टीकोन येथे दिला आहे.

हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळीसाठी कृतीशील योगदान देण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

नगर येथे धर्मशास्त्रविरोधी चळवळीच्या अनुषंगाने बैठक
धर्मरक्षणार्थ संघटित झालेले धर्माभिमानी हिंदू
     नगर - शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर चढण्याची धर्मविरोधी कृती प्रसिद्धीची हौस भागवणार्‍या धर्मविरोधक मंडळींकडून येत्या २६ जानेवारीला चौथर्‍यावर चढण्याची धर्मशास्त्रविरोधी मोहीम राबवली जाणार आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा मोडून हिंदूंच्या धर्मश्रद्धांचे भंजन करण्याच्या पुरोगाम्यांच्या या प्रकाराच्या विरोधात स्थानिक नागरिक, तसेच श्रद्धावान हिंदू, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यांच्या मनात रोष आहे; म्हणूनच धर्मविरोधकांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी, तसेच धार्मिक प्रथा, परंपरा यांच्या रक्षणासाठी कृतीशील होण्याचा निर्धार ६ जानेवारीला खाकीदास महाराज मठात झालेल्या बैठकीत हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला.
     २६ जानेवारी या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा शनिमंदिराच्या चौथर्‍यावर चढण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाविक आणि भक्त मंदिराला सुरक्षाकडे करणार आहेत. या अभियानात अधिकाधिक हिंदू भाविक सहभागी होतील, यासाठी प्रयत्न करण्याचे या वेळी उत्स्फूर्तपणे ठरवण्यात आले.

वसंतपंचमीला पूर्ण दिवस भोजशाळेत पूजा करण्याचा हिंदूंचा निर्धार !

यंदाच्या वसंतपंचमीला धार (मध्यप्रदेश) येथील हिंदूंच्या भोजशाळेत 
हिंदू आणि मुसलमान पुन्हा समोरासमोर !
     भारत हा एक पराक्रमी विरांचा, ज्ञानी-तपस्वींचा प्राचीन देश म्हणून ओळख करून देत असतांना, आपल्या निकटच्या परिसराचा इतिहासही आपल्याला ज्ञात नसतो. हा ठेवा दडवण्याचे; तसेच मुसलमान-ख्रिस्ती आक्रमकांनी छळ-बळाने तो बळकावल्याचे, विकृत केल्याचे आपल्यापासून लपवण्याचेच काम या देशातील तथाकथित इतिहासकारांनी केले आहे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी, मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी, काशीतील श्री काशीविश्‍वेश्‍वर इत्यादी हिंदूंच्या प्रसिद्ध ठेव्यांवर जसे आक्रमण झाले आहे, तसेच आक्रमण श्री सरस्वतीमातेचे प्रकटस्थान असलेल्या धार, मध्यप्रदेशातील राजा भोजच्या भोजशाळा मंदिरावरही झाले आहे. मंदिराचे सर्व पुरावे उपलब्ध असतांनाही मुसलमान आता या मंदिराला कमाल मौलानाची मशीद म्हणून बळकावू पहात आहेत.

हिंदु आहे आणि हिंदुत्वासाठी उभा रहाणार ! - राज ठाकरे

     मुंबई - मी हिंदु आहे आणि हिंदुत्वासाठी उभा राहणार, अशी भूमिका मनसेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी स्पष्ट केली. रुईया महाविद्यालयातील विज्ञापन आणि पत्रकारिता विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कलाकारण या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. या वेळी श्री. राज यांनी कलेपासून ते राजकारणापर्यंत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना सविस्तर उत्तरे दिली.
     विद्यार्थ्यांनी ठाकरे यांना मनसेच्या झेंड्यातील हिरव्या रंगाविषयी विचारले असता ते म्हणाले, तो रंग भारताला मानणार्‍या मुसलमानांसाठी आहे. अमजद अली खान यांच्या सरोदसाठी आणि झाकीर हुसेन यांच्या तबल्यासाठी आहे. भिवंडी आणि बेहरामपाड्यासाठी नाही. आझाद मैदानातील त्यांच्या मोर्च्याविरोधात मी रस्त्यावर उतरलो होतो.

(म्हणे) सनातनचे अधिवक्ता पुनाळेकरांना अटक करा !

एखाद्या विधानाचा विपर्यस्त अर्थ काढून नाहक कांगावा करणारी राष्ट्रवादी काँग्रेस !
ज्या पक्षाच्या नेत्यांवरच भ्रष्टाचार आणि खून यांच्यासारखे गंभीर आरोप आहेत, त्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी अशी मागणी करणे हास्यास्पद ! हिंदूंना संपवण्याची भाषा करणारे एम्.आय.एम्.चे ओवैसी यांना, तसेच देशभरात दंगली घडवणार्‍या धर्मांधांना अटक करण्याची मागणी कधी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे का ?
     मुंबई - श्रीपाल सबनीस तुम्ही सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जात चला, असे ट्विट करणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव श्री. संजीव पुनाळेकर यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. पुनाळेकर यांच्यावर भा.दं.वि.च्या ५०६ कलमाखाली अटक व्हावी, अशी मागणी मलिक यांनी या पत्रात केली आहे.

राजकारण्यांच्या मांडीवर बसणार्‍या पुरोगाम्यांनी मला समानता आणि सहिष्णुता शिकवू नये ! - अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांचे बाणेदार प्रतिपादन

डावीकडून राजेंद्र होजगे, (वरील रांगेत) 
अधिवक्ता असिम सरोदे, मंदार फणसे, 
(खालील रांगेत) मेधा पानसरे, 
अधिवक्ता संजीव पुनाळेकर
चर्चासत्र
     संभाजी ब्रिगेड किंवा मराठा सेवा संघ यांचे आशिष मेटे यांनी ट्विट केले आहे, बाजीराव आणि शिवाजी महाराज यांची तुलना झाली आणि कोणाचे हात पाय मोडले, तर आम्हाला उत्तरदायी धरू नका. हे ट्विट सबनीसांनी रिट्विट केले आहे. यावरून त्यांची पातळी दिसते. ते वारंवार सनातनचे या प्रकरणात नाव घेत आहेत. यांच्या प्रचारयंत्रणेला बळी पडून मी माझे विचारस्वातंत्र्य घालवावे का ? याच राज्यात विजय तेंडुलकर म्हणाले, बंदूक द्या, मोदींना गोळ्या घालतो. याच राज्यात पानसरे जे ग्रंथ विकत होते, त्यात त्यांनी म्हटले होते, पुण्याच्या ब्राह्मणांनी २६/११ चे आक्रमण केले. त्यामुळे द्वेष वाढला नाही का ? संभाजी ब्रिगेडचे रिट्विट स्वतः सबनीस करतात, त्याविषयी चर्चा नाही. एक थट्टेचा उल्लेख आलेला आहे, त्याचे माझ्या मनातील स्पष्टीकरण मी देत आहे. यामध्ये काही गैर असेल, तर खटला अवश्य भरा. त्याला मी सामोरे जाईन.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा प्रविष्ट

देशाच्या पंतप्रधानांचा अवमान करणेही कायद्याच्या दृष्टीने अदखलपात्रच !
     मुंबई - आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात पंतप्रधान मोदी यांचा अवमान केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सबनीस यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मोदी यांनी तडकाफडकी केलेल्या पाक दौर्‍याविषयी आक्षेपार्ह विधाने केली होती. पाकमध्ये मोदी यांच्यावर आक्रमण होऊन त्यात जर मोदी यांचा मृत्यू झाला असता, तर पाडगावर यांच्यापूर्वी मोदी यांचीच शोकसभा घ्यावी लागली असती, अशा आशयाची विधाने त्यांनी करत मोदी यांचा एकेरी उल्लेख केला होता. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर थोरात यांनी तक्रार प्रविष्ट केली.
सबनीसांच्या विरोधात प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढू ! - भाजपचे खासदार साबळे
     सबनीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भात जी अवमानकारक विधाने केली आहेत, ती अत्यंत निषेधार्ह आहेत. आम्ही सबनीस यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करणार असून त्यांत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड काढणे, त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणे अशा विविध आंदोलनांचा समावेश असेल.
     आग्रा - पठाणकोट येथील आक्रमणानंतर चर्चा न करता थेट पाकिस्तानवर आक्रमण करावे, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली. परिषदेच्या धर्मप्रचार विभागाचे अध्यक्ष चौहान यांच्या नेतृत्वाखाली येथील जिल्हाधिकारी पंकज कुमार यांच्याकडे सोपवलेल्या निवेदनात पठाणकोट आक्रमणात ठार झालेल्या जिहादी आतंकवाद्यांना भारताच्या भूमीत दफन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

राज्यातील ५ प्रमुख शहरांत १ मासात मद्याच्या २ सहस्र ९०४ मेजवान्या

पाश्‍चात्त्यांच्या संस्कृतीच्या अंधानुकरणाचा परिणाम !
     मुंबई - राज्यातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नाशिक आणि नागपूर या पाच प्रमुख शहरांत डिसेंबर २०१५ मध्ये मद्याच्या २ सहस्र ९०४ मेजवान्या करण्यात आल्या, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून मिळाली आहे. (वाढत्या मद्याच्या मेजवान्या म्हणजे समाज रसातळाला जात असल्याचेच द्योतक आहे, हे लक्षात शासन यावर निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न करेल का ? - संपादक)      या शहरांपैकी सर्वाधिक मेजवान्या मुंबईच्या उपनगरांत झाल्याचे समजते. पूर्व आणि पश्‍चिम उपनगरांत डिसेंबर २०१५ मध्ये पाच महानगरांच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक मेजवान्या झाल्या. मुंबई शहर आणि उपनगरे यांतील आकडेवारी एकत्र केल्यास ही टक्केवारी ८० टक्क्यांहून अधिक आहे. येथे विनाअनुमतीही अनेक मेजवान्या झाल्या.

धार्मिक प्रथा मोडण्यासाठी शनिशिंगणापूर येथे येणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना अटकाव करा !

हिंदुत्वनिष्ठांची निवेदनाद्वारे मागणी 
निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     नगर, ७ जानेवारी (वार्ता.) - पुरोगामित्व आणि स्त्रीमुक्तीच्या नावाखाली आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी २६ जानेवारी या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, तसेच अन्य महिला शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर प्रवेशबंदी असतांनाही त्या ठिकाणी चढून श्रद्धाभंजन करण्याचा प्रकार करणार आहेत. वास्तविक मंदिर व्यवस्थापनाने काही वर्षांपूर्वीच चौथर्‍यावर चढून शनिदेवाला तेलार्पण करण्यास बंदी घातली होती. सध्या तेथे सर्वच जाती-धर्माचे स्त्री-पुरुष श्री शनिदेवाचे दूरवरून दर्शन घेतात. त्यामुळे तेथे केवळ स्त्रियांना बंदी आहे, असे म्हणणे अयोग्य आहे. जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना नगर जिल्ह्यात येण्यास अटकाव करावा, अशा मागणीचे निवेदन नगर येथील पोलीस आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. 

छेडछाडीचा विरोध करणार्‍या शिक्षकाला तरुणांकडून मारहाण

     धाराशिव - महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या छेडछाडीचा विरोध करणार्‍या शिक्षकाला तरुणांनी पुष्कळ मारहाण केली. याप्रकरणी ४ जणांसह धर्मांध मोहमद यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. (राज्यात कायदा-सुव्यवस्था नसल्याचा हा परिणाम ! संपादक)

जव्हारमध्ये (पालघर) कुपोषणामुळे गेल्या ९ महिन्यांत ३७ बालकांचा मृत्यू

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही कुपोषणाचा प्रश्‍न सोडवू न शकणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते !
     पालघर - २३ वर्षे उलटूनही जव्हार परिसरातल्या आदिवासी भागात कुपोषणाचा प्रश्‍न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. गेल्या ९ मासांत ३७ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे.
१. जव्हार परिसरात गेल्या ९ मासांच्या कालावधीत १,४३३ बाळांंचा जन्म झाला. या नवजात बाळांपैकी १,२३३ बालके सरासरीपेक्षा कमी वजनाची आहेत, अशी माहिती जव्हार उपजिल्हा रुग्णालयाने दिली आहे.
२. तसेच गेल्या ९ महिन्यांच्या कालावधीत जन्मलेल्या याच कुपोषित बालकांपैकी आतापर्यंत ३७ बालकांचा मृत्यू झाला आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरांचा हा मतदारसंघ आहे.
३. सकस आहाराचा अभाव, बालविवाह, गरोदरपणात करावे लागणारे शारीरिक कष्ट, दोन मुलांमध्ये कमी अंतर अशी कुपोषणाची अनेक कारणे असल्याचे आधुनिक वैद्यांनी म्हटले आहे.

गजेंद्र चौहान यांच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन, ४० जणांना अटक

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे अध्यक्ष अभिनेता गजेंद्र चौहान यांची पुणे भेट 
     संस्थेच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या झालेल्या निवडीला 
विद्यार्थ्यांनी आक्षेप घेऊन केलेले आंदोलन हे केवळ सवंग लोकप्रियतेसाठीचेच आहे, 
असे म्हटल्यास वावगे काय ? गजेंद्र चौहान यांच्या पात्रतेविषयीचे सूत्र उपस्थित करणारे 
आंदोलक हे 'विद्यार्थी' म्हणवण्याच्या योग्यतेेचे आहेत का, याचा आंदोलकांनी विचार करावा ! 
पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार 
     पुणे, ७ जानेवारी - भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआयचे) अध्यक्ष अभिनेता गजेंद्र चौहान यांनी ७ जानेवारी या दिवशी पुणे येथील संस्थेला भेट दिली. चौहान यांची भेट होण्याआधीच त्यांना विरोध करणार्‍या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन केले. आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत सौम्य लाठीमार केला आणि ४० विद्यार्थ्यांना अटक केली. 

आत्महत्या करू नका, हत्या करा ! - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आवाहन

     सांगली - आत्महत्या करू नका, हत्या करा, असे प्रक्षोभक आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांना केले आहे. (पुरो(अधो)गाम्यांना अशी विधाने चालतात का - संपादक) ज्या सावकारांकडून कर्जवसुलीसाठी बळजोरी करण्यात येते, त्यांची प्रसंगी हत्या करा, असे प्रक्षोभक आव्हान करत स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी जनजागृतीसाठी अभियान राबवले जात आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वासुंबे या गावातून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी सदाभाऊ खोत यांच्या हस्ते वासुंबे येथील एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक साहाय्य करण्यात आले. 

धुळे येथील ६ विद्यार्थी आय.एस्.आय.एस्.च्या संपर्कात !

आय.एस्.आय.एस्.ला सामोरे जायला शासन आणि जनता यांनी काय सिद्धता केली आहे ? 
     धुळे - येथील ६ विद्यार्थी आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांच्या संपर्कात आल्याचे लक्षात आल्यावर आतंकवादविरोधी पथकाने त्यांची चौकशी केली. (आय.एस्.आय.एस्.च्या संपर्कात येणार्‍यांच्या वाढत्या संख्येवर कठोर निर्बंध घालण्यासाठी शासनाने तत्परतेने पावले उचलावीत, ही अपेक्षा ! - संपादक) 
१. धुळे येथील महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे, तसेच तांत्रिक अभ्यासक्रम यांसाठी प्रवेश घेतलेले १८ ते २१ या वयोगटांतील एकूण ६ विद्यार्थी काही मासांपासून आय.एस्.आय.एस्.च्या प्रभावाखाली आहेत. त्यांनी 'व्हॉटस् अ‍ॅप'सारख्या सामाजिक संकेतस्थळांवर आक्षेपार्ह लिखाण ठेवले आहे. 

आयुर्वेदतज्ञ डॉ. बालाजी तांबे यांनी पुत्रप्राप्तीचा प्रसार केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता

या तक्रारीवरून 'हिंदु धर्मशास्त्रानुसार पुत्रप्राप्तीसाठी सुचवलेले उपाय 
(पुंसवन विधी) हेच चुकीचे आहेत', असा संदेश जातो. पुंसवन विधीवर बंदी 
घालणारा नव्हे, तर त्याचा चुकीचा वापर होणार नाही, यासाठी कायदा असणे आवश्यक आहे ! 
     मुंबई - आयुर्वेदात इच्छेनुरूप संतती होण्यासाठी विशेष उपाय सुचवलेले असतात. गर्भधारणा झाल्यानंतर पुंसवन विधी करायचा असतो. पुंसवन विधीचे निरनिराळे योग सांगितलेले सापडतात. 'आयुर्वेदीय गर्भसंस्कार ' या पुस्तकातून पुत्रप्राप्तीसाठीचे हे उपाय सुचवून त्याचा प्रचार आणि प्रसार करून गर्भधारणापूर्व अन् प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएन्डीटीचा) भंग केल्याचा ठपका ठेवत प्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ डॉ. बालाजी तांबे यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे.

अनंतनाग येथील सीआर्पीएफ् तळावर आतंकवाद्यांचे आक्रमण, ३ सैनिक घायाळ

देशाचे सैनिक केवळ आतंकवाद्यांच्या हातून मरण्यासाठी आणि घायाळ होण्यासाठी आहेत
 का ? अजून किती आक्रमणांच्या नंतर आम्ही आतंकवाद्यांच्या मुसक्या आवळणार आहोत ?
     श्रीनगर - जिहादी आतंकवाद्यांनी अनंतनाग येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआर्पीएफ्च्या) तळावर ७ जानेवारी या दिवशी आक्रमण केले. या आक्रमणात ३ भारतीय सैनिक घायाळ झाले आहेत. भारतीय सुरक्षादलाचे सैनिक या भागात आतंकवाद्यांचा शोध घेत आहेत. श्रीनगर विमानतळाच्या भागात ५ अफगाणी आतंकवादी असल्याची सूचना गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर या भागात अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली असून या भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

फलक प्रसिद्धीकरता

केरळ आणि बंगाल राज्यकर्त्यांचा देशद्रोह जाणा !
     पाकिस्तानी गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाचे केरळमध्ये १५ आणि १६ जानेवारीला आयोजन करण्यात आले असून केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी त्यांचे स्वागत करणार आहेत, तसेच बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडूनही अली यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Pakistani gayak Gulam Ali ke karyakramonka Keral aur Bangal me ayojan.
     Inko shatrurashtra Pak se itna lagav kyo ?
जागो !
     पाकिस्तानी गायक गुलाम अली के कार्यक्रमोंका केरल और बंगाल में आयोजन.
     इनको शत्रूराष्ट्र पाक से इतना लगाव क्यो ?

ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

विषय - १. छत्रपति शिवरायांचा अवमान करणारा एन्.सी.ई.आर्.टी.चा अभ्यासक्रम रहित करा 
२. विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे 
३. शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थान यांची धार्मिक परंपरा मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करा या मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
दिनांक : ९ जानेवारी २०१६, वेळ - सायं. ५ ते ७ 
स्थळ : रेल्वे स्थानकाबाहेर, ठाणे (प.) 
संपर्क क्र. : ९३२४८६८९०६ 
हिंदूंनो, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

हिंदु धर्मजागृती समितीच्या वतीने सभेच्या प्रचारार्थ विशाल पदफेरी !

 हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमले शहर     नंदुरबार - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० जानेवारी या दिवशी आयोजित केलेल्या धर्मजागृती सभेच्या प्रचारार्थ ७ जानेवारी या दिवशी काढण्यात आलेल्या भव्य पदफेरीत देण्यात आलेल्या विविध घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले. भगवे ध्वज आणि धर्मसभेत सहभागी होण्याचे आवाहन करणारे फलक हाती घेत सहभागी युवकांनी लक्ष वेधून घेतले. या फेरीला १५० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. 
१. दुपारी ३.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे फेरीला प्रारंभ होण्याच्या आधीच नंदुरबार येथील व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित धर्मप्रेमी श्री. मोतीलाल ओस्तवाल यांच्या हस्ते सपत्नीक धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. 

संमेलनाला उपस्थित रहाणार नाही, सबनीसांनी क्षमा मागावी ! - खासदार साबळे

सबनीस यांचे पंतप्रधान मोदी यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण 
     पिंपरी (पुणे), ७ जानेवारी - साहित्य संमेलन हे या देशातील साहित्य, संस्कती आणि प्रज्ञावंत यांचे पवित्र व्यासपीठ आहे. त्या व्यासपिठावर असहिष्णु वृत्तीच्या अपवित्र व्यक्तीचे पाऊल पडू नये आणि ते व्यासपीठ कलंकित होऊ नये. सबनीस यांच्यासारखी व्यक्ती त्या व्यासपिठावर उपस्थित रहाणे, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील अवमानकारक वक्तव्याला मान्यता दिल्यासारखे होईल. त्यामुळे सबनीस यांनी क्षमा मागितली पाहिजे. सबनीस हे जोपर्यंत क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्र येथे प्रतिकात्मक आंदोलन चालूच राहील. त्यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याने ते अध्यक्ष असलेल्या साहित्य संमेलनालाही मी उपस्थित रहाणार नाही, असे भाजपचे खासदार अमर साबळे यांनी सांगितले. 

शनि शिंगणापूरच्या रूढी-परंपरांचे जतन करण्यासाठी महिला आणि ग्रामस्थ यांनी वेळोवेळी घेतलेला पुढाकार !

शनि शिंगणापूर येथील पावित्र्यरक्षणासाठी सनातन संस्था 
करत असलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने...
श्री. मिलिंद चवंडके
       संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीत सांगितलेल्या नेवासा तालुक्यामध्ये श्री क्षेत्र शनि शिंगणापूर हे जागृत देवस्थान आहे. संपूर्ण देशातून, तसेच देशाबाहेरूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात. आजच्या संगणक युगातही या गावाने गावपण, तसेच परंपरेने चालत आलेल्या रूढी-परंपरा मोठ्या श्रद्धेने जतन केल्या आहेत. या परंपरांना धक्का देण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा गावातील ग्रामस्थांसह महिला, भगिनी आणि भाविक श्रद्धेने एकत्र येऊन लढा देण्यास सज्ज होतात. प्रत्येक वेळी श्रद्धेचा विजय होतो, हे शिंगणापूरने दाखवून दिले आहे. नुकतेच एका महिलेने शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून देवाला तेल वाहिले. त्यामुळे सर्वत्र गदारोळही झाला. आता देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळावर दोन महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने श्री शनैश्‍वर देवस्थानचा इतिहास, पूर्वीचे निष्ठावंत विश्‍वस्त आणि राजकीय हस्तक्षेपामुळे झालेली हानी यांसंदर्भात नगर येथील मढी देवस्थानचे विश्‍वस्त श्री. मिलिंद सदाशिव चवंडके यांनी लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.

हिंदूूंचे सण म्हणजे अंधश्रद्धा; मात्र अन्य धर्मियांची अंधश्रद्धा म्हणजे धार्मिकता समजणे, हीच पुरोगाम्यांची भोंदूगिरी !

     हिंदु धर्मातील रुढी, परंपरा यांवर टीका करण्यासाठी टपून बसलेले पुरा(अधो)गामी स्वतःला मानवतावादी म्हणत सर्व धर्मांतील अंधश्रद्धा वाईटच असतात, असे सांगतात; मात्र ते किती पोकळ आहे, हे नाताळच्या निमित्ताने पहायला मिळाले. त्याचे कारण म्हणजे रात्रीच्या वेळी लहान मुलांसाठी त्यांच्या झोळीमध्ये भेटवस्तू टाकणार्‍या (?) सांताक्लॉज या कपोलकल्पित व्यक्तीरेखाविषयी पुरोगाम्यांनी बाळगलेली आळीमिळी गुपचिळी !

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 

पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाजवळील कार्यक्रमाच्या निमित्ताने होणारा ब्राह्मणद्वेषी प्रचार रोखण्यात यश !

श्री. दिलीप अलोनी
       पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते; पण ब्रिगेड, बामसेफ आणि काही मुसलमान राष्ट्रद्रोही संघटना तेथे कार्यरत असल्यामुळे ते हिंदु धर्मविरोधी प्रचार आणि ब्राह्मणद्वेषाचे मुख्य केंद्र बनले आहे. या प्रचाराचे मुख्य लक्ष्य दलित आणि मुसलमान तरुण हे असतात आणि त्यांना जाळ्यात ओढून हिंदू/ब्राह्मण द्वेषाचे पाठ पढविले जातात. प्रत्येक वर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगाव या पुण्याजवळील छोट्या खेड्याच्या बाहेरील डोंगराळ प्रदेशात दलित समाजाची १ लक्षहून अधिक माणसे जमतात; कारण तेथे ब्रिटिशांनी महार फलटणीच्या गौरवाकरिता विजयस्तंभ उभारला आहे. अशी आख्यायिका आहे की, १ जानेवारी १८१८ ला ब्रिटीश आणि पेशवे यांच्यात भीमा कोरेगावला युद्ध झाले. त्यात ब्रिटिशांच्या बाजूने महार फलटण लढली आणि ब्रिटिशांचा विजय झाला. त्या लढाईत हौतात्म्य पत्करलेल्या महार फलटणीच्या सैनिकांच्या गौरवाखातर ब्रिटिशांनी हा विजयस्तंभ उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याबद्दल गौरवोद्गार काढल्यावर दलित तेथे प्रत्येक वर्षी १ जानेवारीला जमू लागले.

पुरातत्व विभागाकडून अत्यंत दुर्लक्षिले गेलेले महाबळेश्‍वर येथील श्रीकृष्णामाईचे देवालय !

हिंदूंनो, देवालयाच्या रक्षणासाठी संघटित व्हा !
महाबळेश्‍वर येथील दुर्लक्षित 
राहिलेले श्रीकृष्णामाईचे देवालय 
(छायाचित्रकार : श्री. स्वप्नील देवळे, 
डोंबिवली)
       सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण, तसेच पर्यटनस्थळ आहे. तेथील जुने महाबळेश्‍वर हे क्षेत्र महाबळेश्‍वर या नावानेही ओळखले जाते. क्षेत्र महाबळेश्‍वर येथे अति प्राचीन असे श्री महाबळेश्‍वर, श्री पंचगंगा आणि श्री कृष्णादेवी यांचे भव्य देवालय आहे. महाबळेश्‍वराला पर्यटनासाठी येणारा प्रत्येक हिंदू श्री महाबळेश्‍वर, श्री पंचगंगा देवालयाला भेट देतात; परंतु श्री महाबळेश्‍वर देवालयाच्या मागच्या भागात असलेल्या श्रीकृष्णामाईच्या देवालयात मात्र अल्प प्रमाणात भाविक/पर्यटक जातात. तेथे काही अंतर पायी गेल्यावर पोहोचता येते. कामानिमित्ताने महाबळेश्‍वर येथे जाण्याचा योग आला असता श्री कृष्णामाईच्या दर्शनास गेल्यावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.
देवालयाचा इतिहास आणि वैशिष्ट्ये 
१. श्री कृष्णामाईचे देवालय म्हणजे कृष्णानदीचे उगमस्थान आहे. हे देवालय पवित्र आणि चैतन्यमय असून ते एकप्रकारे जागृत तीर्थस्थानही आहे. जवळजवळ पाच सहस्र वर्षांपूर्वी पांडवांनी या देवालयाची निर्मिती केली आहे. संपूर्ण देवालय दगडांपासून निर्मित केलेले आहे.

श्री शनि मंदिराच्या विरोधात बंड करणारे भक्त नसून बंडखोर !

      जे लोक बंड करून दर्शनाला जातात, त्यांची भक्ती अल्प आणि अहंकार अधिक आहे. त्यात त्यांना भक्तीऐवजी अहंकार सिद्ध करायचा आहे. त्यांना श्री शनिदेवाच्या दर्शनासाठी काही देणे-घेणे नाही. खरा शनिभक्त असे कधीच करणार नाही. ते भक्त नसून बंडखोर आहेत. भगवद्गीतेतील १६ व्या अध्यायात अद्रोह हे दैवी संपत्तीचे लक्षण म्हटले आहे. हे सर्व लोक द्रोह किंवा विद्रोह करतात, ती असुरी संपत्ती आहे. 
- समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

राष्ट्रगीताला विरोध करणारे आणि त्याला मूर्खपणा म्हणणारे धर्मांध लोकप्रतिनिधी यांना सणसणीत चपराक !

     राष्ट्रगीत हे जगातील सर्वांत सुंदर गीत आहे. ते म्हणावे कि नाही, याविषयी चर्चा होते आणि आपण निर्लज्जपणाने ती चर्चा ऐकतो. इतके आपण कोडगे झालो आहोत. अशा कोडगे झालेल्या लोकांच्या देशासाठी सैनिकांनी का मरावे ?
- चित्रपट अभिनेते नाना पाटेकर
वाचकांना निवेदन : 'धर्मसंकटाची तीन तोंडे !' या लेखाचा पुढील भाग आज ऐवजी लवकरच प्रसिद्ध करत आहोत. - संपादक

पू. दिव्य जीवनदासजी महाराज द्वारा हिन्दुआें के लिए काव्यसंदेश

पू. दिव्य जीवनदासजी
महाराज
सालों से मस्जिद में घुट रहा, तुम्हारा भोलेनाथ हूं,
हिन्दुओ, मैं ही तुम्हारा वाराणसी का काशी विश्‍वनाथ हूं ।

अयोध्या के फटे तंबू में पडा तुम्हारी नामर्दी का प्रमाण हूं,
हिन्दुआें में वही बुराई का वध करनेवाला दशरथ पुत्र राम हूं ।

दुष्ट कंश का संहारक मैं ही, मैं ही गीता का ज्ञान हूं,
हिन्दुआें मथुरा की मस्जिद में पडा मैं कृष्ण भगवान हूं ।

सालों पहले लोग कहते थे मैंे हिन्दुत्व के सिर का मुकुट (ताज) हूं,
आज अकबर के किले से घिरा हुआ मैं तीर्थ प्रयाग हूं ।

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
      मागील १ मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
       यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

कार्यकर्त्यांनो, सेवेत झालेल्या अक्षम्य चुकांमुळे होणारी हानी लक्षात घ्या आणि प्रत्येक सेवा परिपूर्ण होण्यासाठी पुनर्पडताळणीची कार्यपद्धत निश्‍चित करा !

१. आंदोलनाच्या प्रसिद्धीपत्रकात एक महत्त्वाचे वाक्य 
चुकीचे छापले गेल्याने ती चूक सुधारण्यासाठी वेळ द्यावा लागणे
     काही दिवसांपूर्वी भाग्यनगर (आंध्रप्रदेश) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. त्याच्या प्रसिद्धीपत्रकाचे (प्रेसनोटचे) तेलुगूमध्ये भाषांतर केल्यानंतर ते पडताळून न पहाताच कु. तेजस्वी माडभूषी यांनी त्याच्या झेरॉक्स प्रती काढल्या. त्यामुळे एक संत आणि त्यांची लहान मुले यांच्यावर लाठीमार झाला, हे वाक्य एका संतांसारख्या लहान मुलांवर लाठीमार झाला, असे चुकीचे प्रसिद्ध झाले. एका साधकाने ही अक्षम्य चूक लक्षात आणून दिल्यावर ती सुधारण्यासाठी वेळ द्यावा लागला.

देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात काही दिवस सेवेसाठी आल्यावर कु. माधवी भोईटे (वय १३ वषेर्र्) हिला तिच्यामध्ये जाणवलेले पालट

कु. माधवी भोईटे
१. पुणे येथे घरी असतांना माझ्याकडून नामजप आणि देवाशी अनुसंधान अल्प होत होते; पण देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात काही दिवस सेवेसाठी आल्यावर तेथील चैतन्यमय वातावरणामुळे माझ्याकडून नामजप आणि अनुसंधान अधिक प्रमाणात होऊ लागले.
२. देवाच्या कृपेने झोप आणि थकवा न्यून (कमी) झाला, तसेच सुट्टीच्या काळात माझ्या क्षमतेनुसार अधिकाधिक सेवा करता येऊ लागली.
३. घरी असतांना व्यष्टी साधनेचे लिखाण नियमित होत नव्हते. आश्रमात आल्यापासून माझे व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढले. त्यामुळे लिखाण नियमित होऊ लागले.

स्वतः मोठेपणी संत होणार, असे सांगणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. कृष्णराज अमोल जगताप (वय ३ वर्षे) !

चि. कृष्णराज जगताप
१. गर्भारपण
     गर्भधारणेनंतर मी मनाचे श्‍लोक, पसायदान, तसेच ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने आणि श्री गजानन महाराजांची पोथी वाचत असे. गर्भारपणात मला कोणताच त्रास झाला नाही.
२. जन्मानंतर
२ अ. जन्माच्या वेळी शांतपणे प.पू. भक्तराज महाराजांची भजने ऐकणे : मार्गशीर्ष कृष्ण पक्ष पंचमी (२.१.२०१३) या दिवशी शस्त्रकर्म केल्यावर बाळाचा (चि. कृष्णराजचा, म्हणजेच कृष्णाचा) जन्म झाला. त्या वेळी कृष्णा शांत असून प्रार्थना, नामजप आणि प.पू. भक्तराज महाराजांची भजने ऐकत होता.
२ आ. जन्मापासून त्याचा तोंडवळा पुष्कळ तेजस्वी दिसतो.
- सौ. प्रियांका अमोल जगताप (चि. कृष्णाची आई), सातारा रोड, पुणे.

तळमळीने साधनेचे प्रयत्न करणार्‍या सौ. लक्ष्मी राऊत आणि पुरुषी अहं बाजूला सारून पत्नीकडून शिकण्याचा प्रयत्न करणारे श्री. वैभव राऊत !

      नालासोपारा (मुंबई) येथील श्री. वैभव राऊत आणि त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी राऊत या समितीच्या वतीने घेतल्या जाणार्‍या धर्माभिमान्यांच्या सत्संगात उपस्थित असतात.
     काही दिवसांपूर्वीच्या सत्संगात कृतज्ञताभाव वाढवण्यासाठी साधक-धर्माभिमान्यांना प्रयत्न करण्यास सांगितले होते. त्यानंतर सौ. राऊत यांनी कोणकोणत्या व्यक्ती आणि वस्तू यांच्या संदर्भात कृतज्ञताभाव वाढवू शकतो ? याचे चिंतन करून व्याप्ती काढली अन् त्यासाठी प्रत्येक १५ मिनिटांनी भ्रमणभाषवर गजर लावला. त्यामुळे अगदी अल्प कालावधीतच त्यांना पती, मुले, सासू-सासरे, आई-वडील यांच्याविषयी, तसेच विविध वस्तूंविषयी कृतज्ञता वाटू लागली.
    सौ. राऊत यांनी त्यांचे वरील प्रयत्न सत्संगात सांगितल्यानंतर या संदर्भात इतरांना काय वाटले ? असे विचारण्यात आले. तेव्हा श्री. राऊत म्हणाले, पूर्वी ती दैनिक सनातन प्रभात वाचायची नाही; पण आता नित्यनेमाने वाचते. अगोदर मी तिला साधना सांगायचो; परंतु आता ती मला सांगतेे ! त्या वेळी ती माझी पत्नी आहे. ही मला काय सांगणार ? असे वाटत असल्याने माझा अहं आड येतो. साधनेमुळे तिच्यात पुष्कळ पालट झाले असल्याने ती माझ्यापेक्षा अगोदर साधनेत पुढे जाणार, असे वाटते.

साधनेच्या संदर्भात पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली यांनी केलेले मार्गदर्शन

पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली
      जानेवारी २०१५ मध्ये पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली या शिबिरासाठी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी त्यांना संत म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यांना संत म्हणून घोषित करण्यापूर्वी आणि नंतरही काही प्रसंगांविषयी त्यांच्याशी बोलण्याची संधी मला लाभली होती. एका प्रसंगाविषयी माझे त्यांच्याशी बोलणे झाले असता त्या वेळी त्यांची मार्गदर्शन करण्याची पद्धत, तसेच त्यांचा सकारात्मक आणि धीर देणारा दृष्टीकोन मला अनुभवायला मिळाला. त्याविषयीची माहिती पुढे देत आहे.
१. मनामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक 
      अशा दोन तीव्र स्वरूपातील इच्छा असणे
     काही दिवसांपूर्वी मी माझे पती श्री. अरविंद ठक्कर यांच्यासमवेत असतांना माझ्या मनात दोन तीव्र इच्छा असल्याची जाणीव झाली. त्यांपैकी पहिली घरात घडलेल्या दोन क्षुल्लक घटनांविषयी माझ्या मनात असमाधानकारक किंवा नकारात्मक विचार होते, तर दुसरी साधनेच्या संदर्भात काहीतरी बोलण्याची किंवा ऐकण्याची, जेणेकरून माझ्यामध्ये उत्साह निर्माण होईल. पहिल्या इच्छेला मी असात्त्विक किंवा नकारात्मक, असे नाव दिले, तर दुसर्‍या इच्छेला मी सात्त्विक किंवा सकारात्मक असे नाव दिले.

तमिळ भाषेत एका शब्दाला दुसरा पर्यायी शब्द नसल्याने नाडीपट्टीची भाषा तमिळच आहे, असे महर्षींनी सांगणे; कारण यामुळे नाडीपट्टीतील माहितीचा अर्थ पालटण्याची शक्यता अत्यंत न्यून होणे

     तमिळ भाषेत एका शब्दाला पर्याय म्हणून दुसरा शब्द नाही. त्यामुळे कुणीही वाक्याचा अर्थ लावतांना नाडीपट्टीत उपयोगात आणलेल्या शब्दासाठी वेगळा शब्द उपयोगात आणू शकत नाही आणि याचा लाभ असा होतो की, यामुळे वाक्याचा अर्थही पालटत नाही. नाडीपट्टीत दिलेल्या माहितीचे वाचन करतांना महर्षींना अपेक्षित असणार्‍या अर्थाचा कुणी अनर्थ करू नये, यासाठीच महर्षींनी तमिळ भाषेचा आधार घेतला आहे.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, बेंगळुरू, कर्नाटक. (२.१२.२०१५, सकाळी १०.१६)

श्री. मिलुटीनदादा संत होणार आणि अन्य काही साधक ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणार, असा विचार मनात येणे अन् पू. सौरभदादांनीही याला दुजोरा देणे

      रामनाथी आश्रमात २९.१२.२०१५ ते ५.१.२०१६ या कालावधीत विदेशी साधकांची कार्यशाळा होती. या कार्यशाळेत १ साधक संत होतील आणि अन्य काहीजण ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठतील, असा विचार प.पू. गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मनात येत होता. त्यानंतर मी याविषयी पू. सौरभदादांना विचारल्यावर त्यांनीही होकार दिला.
१. पू. सौरभदादांनीही श्री. मिलुटिनदादा संत होतील, या विचाराला दुजोरा देणे
     मी श्री. मिलुटिन पांक्रात्स यांना आश्रमात पाहिले, तेव्हा प.पू. गुरुदेवांनी मनात दिलेल्या विचारानुसार श्री. मिलुटिनदादा संत होतील, असे मला वाटू लागले. खोलीत आल्यावर मी पू. सौरभदादांना माझ्या मनातील वरील विचार सांगितला, तेव्हा ते त्वरित हो म्हणाले. कार्यशाळा चालू झाल्यापासून पू. सौरभदादा फारच आनंदात आहेत.

साधकांसाठी सूचना

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक
 सनातन प्रभातच्या ११,३५० वाचकांचे शेष नूतनीकरण १५.१.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !
     दैनिक सनातन प्रभात म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव नियतकालिक ! या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्यात्माविषयीची ज्ञानतृष्णा भागवली जाते, तसेच राष्ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळते. अंतरंगात अंकुरलेल्या साधनारूपी बिजाचे वटवृक्षात रूपांतर करणारेे, तसेच अंतरातील हिंदुत्वाची मशाल पेटती ठेवणारे हे नियतकालिक सर्व वाचकांना नियमितपणे मिळणे आवश्यक आहे. असे असतांनाही काही राज्ये आणि जिल्हे यांमधील साधकांकडून या नियतकालिकांचे नूतनीकरण वेळेत होत नाही. त्यामुळे वाचकांना त्यातील अमूल्य ज्ञानापासून वंचित रहावे लागते.

साधकांनो, फलकावर चुका लिहिणे, या अहं-निर्मूलनाच्या माध्यमाचा लाभ करवून घ्या आणि शिकायला मिळालेली सूत्रे नियमितपणे लिहून शिकण्याच्या स्थितीत रहा !

पू. अशोक पात्रीकर
     नवीन चिंतनसारणीत घरी किंवा आश्रमात फलकावर चुका लिहिणे आणि शिकायला मिळालेली सूत्रे ही सूत्रे अंतर्भूत नाहीत; म्हणून काही साधक या सूत्रांकडे दुर्लक्ष करतात. साधकांच्या अहं-निर्मूलन प्रक्रियेतील एक प्रभावी माध्यम म्हणून फलकावर चुका लिहिणे आणि सतत शिकण्याच्या स्थितीत रहाण्यासाठी शिकायला मिळालेली सूत्रे लिहिणे आवश्यक आहे. साधकांनी स्वतःच्या व्यष्टी साधनेतील गतीसाठी या सूत्रांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. 
- (पू.) श्री. अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१२.२०१५)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्दशी/अमावास्या (९.१.२०१६) सकाळी ७.५४ वाजता
समाप्ती - पौष शुक्ल पक्ष प्रतिपदा (१०.१.२०१६) सकाळी ७.०१ वाजता
उद्या अमावास्या आहे.

स्वराज्य मिळवले कोणी ? आणि त्याचा लाभ करून घेतला कोणी ?

देशभक्त गेले फासावर आणि स्वराज्य उपभोगले काँग्रेसवाल्यांनी ।
हे स्वराज्य उपभोगताहेत असुर आणि २५ कोटी अल्पसंख्यांकही ॥
- पुष्पांजली (२.२.२०१५)

पू. सिरियाकदादांनी दाखवलेला जर्मन भाषेतील ग्रंथ हातात घेऊन पू. सौरभदादांनी नाईस म्हणून आनंद व्यक्त करणे आणि पू. मिलुटिनदादांची हॅलो म्हणून विचारपूस करणे

पू. सौरभदादा यांनी ग्रंथ हातात घेऊन नाईस 
म्हटल्यावर आनंदाने पहाणारे पू. सिरियाकदादा
पू. सौरभदादा यांना नमस्कार करणारे पू. मिलुटिनदादा
     ३.१.२०१६ या दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून पू. सौरभदादा दादा, दादा, असे म्हणत होते. त्या वेळी मी सेवेसाठी दैनिक विभागात गेलो होतो. पू. सौरभदादा यांच्या सेवेसाठी एक साधिका आल्या होत्या. त्यानंतर मी विभागातून सेवा करून दुपारी ४.१५ वाजता पू. सौरभदादांसाठी अल्पाहार घेऊन खोलीत आलो. तेव्हा त्या साधिका मला म्हणाल्या, पू. सौरभदादा सारखे दादा, दादा, असे म्हणत होते. पू. सौरभदादांना मी काही साधकांची नावे घेऊन विचारले. तेव्हा ते नाही म्हणाले; मात्र मी पू. संदीपदादा आणि पू. सिरियाकदादा यांची नावे घेतल्यावर ते हो म्हणाले.

मनोविकार कायमचे बरे करायचे असल्यास प्रथम साधनेने मन आणि बुद्धी सात्त्विक करा किंवा मनोलय आणि बुद्धीलय करा !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     मनोविकारांसाठी जे उपाय केले जातात, ते रोगाच्या मुळावर उपाय न करता वरवरचे उपाय करण्यासारखे आहे. (म्हणूनच मी मनोरुग्णांवर उपाय करणे बंद करून साधना शिकवू लागलो.) मनोविकारांना कारणीभूत असलेल्या रज-तमप्रधान मनाला आणि बुद्धीला साधनेने सात्त्विक न बनवता किंवा मनोलय आणि बुद्धीलय न करता, म्हणजे मुळावर उपाय न करता केलेले वरवरचे उपाय हास्यास्पद आहेत. क्षयरोग झालेल्याला क्षयरोगाची औषधे न देता केवळ त्याला येणार्‍या खोकल्यासाठी औषध देण्यासारखे आहे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.१२.२०१५)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आनेवालेको कहना नहीं, जानेवालेको
 रोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं ।
भावार्थ : आनेवालेको कहना नहीं मधे कहना हे विचारणे या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला तू जन्माला का आलास ? असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. जानेवालेको, म्हणजे मृत्यू पावणार्‍याला रोकना नहीं, म्हणजे आपण थांबवू शकत नाही. पूछे बिगर रहना नहीं, म्हणजे तू खरोखर कोण आहेस ? हे स्वतःला विचारल्याविना राहू नये. या प्रश्‍नाने तरी तो स्वतःच्या खर्‍या रूपाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न करील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सर्वकाही परमेश्‍वराच्या इच्छेने होते ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
       या पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्र अन् मानव यांचा जन्म आणि त्यांचे प्राप्तकार्य हे परमेश्‍वरी इच्छेनेच नियंत्रित आहे, हा विश्‍वास असला की, कुणाचाही द्वेष वाटत नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

केरळ आणि बंगाल यांचा देशद्रोह !

संपादकीय
     पाकचे गायक गुलाम अली यांच्या गायनाचे कार्यक्रम केरळ आणि बंगाल या दोन राज्यांनी आयोजित केले आहेत, असे वृत्त नुकतेच प्रकाशित झाले. काही दिवसांपूर्वी गुलाम अली यांचे मुंबई आणि पुणे येथील कार्यक्रम रहित झाल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे आता प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमुळे वाचकांच्या मनात खळबळ निर्माण झाली असेल, तर त्यात नाविन्य नाही. देशातील एका राज्यात पाकच्या गायकाच्या कार्यक्रमाला विरोध होतो आणि दुसरी दोन राज्ये त्या गायकासाठी पायघड्या घालतात, हा विरोधाभास सहन करावा लागतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn