Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देशातील हवाई दलाच्या तळावरील आक्रमण ३ दिवस परतवू न शकणारे सैन्य
 कधी पाकमध्ये जाऊन आक्रमण करू शकेल का ? आतंकवाद्यांनी हेच आक्रमण 
नागरी वस्तीवर केले असते, तर एव्हाना सहस्रावधी हिंदू ठार झाले असते !
 आता देशाच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हा केवळ एकच मार्ग आहे !
 • आतंकवादी आणि सैनिक यांच्यात ६० घंट्यांनंतरही धुमश्‍चक्री चालूच !
 • आतापर्यंत एकूण ७ सैनिक हुतात्मा, ५ आतंकवादी ठार !
 •  अद्यापही २ आतंकवादी लपलेलेच !
      पठाणकोट (पंजाब) - पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर आक्रमण करून तेथेच लपून बसलेल्या दोघा जिहादी आतंकवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणा ३ दिवसांनंतरही अपयशी ठरल्या आहेत.

मथुरा आणि वृंदावन येथील हिंदूंची मंदिरे आतंकवाद्यांचे लक्ष्य ! - गुप्तचर यंत्रणा

हिंदूंची श्रद्धास्थाने जिहादी आतंकवादापासून सदाची मुक्त ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
     मथुरा - पठाणकोट येथील जिहादी आक्रमणानंतर मथुरा आणि वृंदावन येथील प्रमुख मंदिरे आतंकवाद्यांचे लक्ष्य असल्याची चेतावणी गुप्तचर यंत्रणांनी उत्तरप्रदेश शासनाला दिली आहे. बांकेबिहारी आणि इस्कॉन मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यास सांगण्यात आले आहे. द्रुतगती महामार्गावरील अतीमहत्त्वाच्या व्यक्ती वा विदेशी प्रवासी यांची वाहने आतंकवाद्यांकडून कह्यात घेतली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतंकवाद्यांकडून मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीपेक्षाही अधिक धोका वृंदावनला असल्याचीही चेतावणी देण्यात आली आहे.

भूकंपाच्या धक्क्याने ईशान्य भारत हादरला !

८ ठार, तर १०० हून अधिक घायाळ !
     मणिपूर - ईशान्य भारतात ४ जानेवारीच्या पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास जोरदार भूकंप झाला. या भूकंपाचा सर्वाधिक फटका मणिपूरला बसला असून इम्फाळमध्ये ८ जण ठार झाले, तर अनुमाने १०० जण घायाळ झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल इतकी होती. राजधानी इम्फाळपासून ३३ कि.मी.वरील तमेंगलाँग येथे भूकंपाचे केंद्र असून ते भूमीत १७ कि.मी. खोल असल्याचे सांगण्यात आले. मणिपूरसह मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, बंगाल, झारखंड आणि बिहार या ११ राज्यांना भूकंपाचे धक्के जाणवले. बांगलादेशातही या भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे.

धर्मांधांचा भर रस्त्यात तब्बल ६ घंटे हैदोस !

कुठल्याही घटनेत हिंदूंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून
 दिवसभर चर्चासत्रे घेणार्‍या वृत्तवाहिन्या, मुसलमानांच्या या
 हैदोसाविषयी साधे एका ओळीचेही वृत्त दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या !
 • बंगालमध्ये शासन नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का ?
 • बंगालमध्ये अडीच लाख मुसलमानांचा मोर्चा भररस्त्यात गोळीबार आणि बॉम्बफेक !
 • पोलीस ठाणे पेटवले, पोलिसांना प्रचंड मारहाण : पोलीस जीव मुठीत धरून पळाले !
 • प्रवासी बस, तसेच सैनिकांच्या वाहनावर आक्रमण, २५ वाहने पेटवली !
 • सर्वसामान्य नागरिकांच्या घरांत घुसून लुटालूट !
      मालडा (बंगाल) - हिंदु महासभेचे नेते कमलेश तिवारी यांनी मुसलमानांच्या श्रद्धास्थानाविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ ३ जानेवारी या दिवशी मालडा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ३४ वर सुमारे अडीच लाख मुसलमानांनी मोर्चा काढला.

(म्हणे) देशातील अनेक आतंकवादी कारवायांत रा.स्व.संघ आणि सनातन यांचा थेट सहभाग !

केवळ जातीय तेढ निर्माण करण्यासाठी ब्राह्मणी आतंकवाद असा वारंवार उल्लेख
करून धर्मांध, जातीयवादी आणि पुरोगामी (अधोगामी) संघटना देशात फूट पाडण्याचे
काम करत आहेत ! अशांना भाजप शासनाने वेळीच रोखावे, अशी जनतेची अपेक्षा आहे ! 
 • डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. एम्.एम्. कलबुर्गी आणि कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करणारा म्हणे ब्राह्मणी आतंकवाद !
 • श्रीमंत कोकाटे यांचा वैचारिक आतंकवाद !
     कोल्हापूर - देशाला हिंदु नव्हे, तर ब्राह्मणी आतंकवादाचा धोका आहे. देशातील अनेक आतंकवादी कारवायामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सनातन यांचा थेटपणे सहभाग आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. एम्.एम्. कलबुर्गी आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या करणारा हा ब्राह्मणी आतंकवाद आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ख्रिस्त्यांसाठी ईसाई संघाची स्थापना करणार ?

     नवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापूर्वी मुसलमानांसाठी मुस्लिम राष्ट्रीय मंचाची स्थापना करून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आता ख्रिस्त्यांच्या संदर्भातही तसाच प्रयत्न करण्यासाठी संघाकडून नवीन संघटना स्थापन करण्याचे प्रयत्न चालू झाले असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रीय ईसाई संघ असे या संघटनेचे नाव ठेवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
     या संदर्भात देहलीत संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली १७ डिसेंबर २०१५ या दिवशी एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. तिला भारत भूमीवर प्रेम, शांती आणि सुसंवादा रहावा, यासाठी नाताळनिमित्त शुभेच्छा भेटीचे नाव देण्यात आले होते. या बैठकीला चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे महासचिव ए. मसीह, १० हून अधिक राज्यांचे आर्चबिशप आणि ४० ते ५० रेवरेंड बिशप, ख्रिस्ती धर्मगुरु यांच्यासह विश्‍व हिंदु परिषदचे चिन्मयानंद स्वामी देखील उपस्थित होते.

एस्.एस्.आर्.एफ्.चे युरोपमधील श्री. मिलुटिन पांक्रात्स झाले संतपदी विराजमान !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून व्लादीमीर सिर्कोविच 
आणि सौ. रश्मी नल्लादारू झाले जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !
डावीकडून एस्.एस्.आर्.एफ्.चे पू. सिरियाक वाले एस्.एस्.आर्.एफ्.चे
 युरोपमधील पू. मिलुटिन पांक्रात्स (वय ४३ वर्षे) यांचा सन्मान करतांना

वाराणसीतील शासकीय परिसरात उभ्या रहात असलेल्या अनधिकृत मशिदीवर कारवाई करा !

शासकीय परिसरात उभ्या रहात असलेल्या अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्याची 
मागणी का करावी लागते ? शासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? या अनधिकृत 
मशिदीत आतंकवादी येऊन राहिल्यास आणि उद्या वाराणसीचे पठाणकोट झाल्यास 
त्याचे दायित्व प्रशासन घेणार का ?
 • अधिवक्ता कमलेश चंद्र त्रिपाठी यांची प्रशासन आणि पोलीस यांच्याकडे मागणी 
 • प्रशासनाचे दुर्लक्ष, पोलिसांचाही कारवाई करण्यास नकार !
अधिवक्ता
कमलेश चंद्र त्रिपाठी
     वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमध्ये विश्रामगृहाचा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील समजला जातो. या विश्रामगृहाच्या पूर्वेकडील दाराजवळ आणि परिसराच्या आतच अनधिकृतपणे आणि शासकीय कर्मचार्‍यांना धाकदपटशा दाखवून मशिदीचे बांधकाम करण्यात येत आहे. या बरोबरच या परिसरात अवैधपणे वाहनतळही बनवण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर त्यावर ध्वनीक्षेपक बसवून अजानही दिली जात आहे; परंतु या सर्व बाबींकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. या संदर्भात येथील धर्माभिमानी अधिवक्ता कमलेश चंद्र त्रिपाठी यांनी जिल्हाधिकार्‍यांना कारवाईसाठी निवेदन दिले; परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान करागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासावर आक्रमण

२ आतंकवादी ठार
     मजार शरीफ/ नवी देहली- पठाणकोटमधील आतंकवाद्यांच्या आक्रमणाचे वृत्त ताजे असतांनाच अफगाणिस्तानच्या मजार-ए-शरीफमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासावर आतंकवाद्यांनी आक्रमण केले. ३ जानेवारीच्या रात्री झालेल्या या आक्रमणाला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिले आणि २ आतंकवाद्यांना ठार केले. आतंकवाद्यांची नेमकी संख्या कळू शकली नाही. या आक्रमणाचे दायित्व कोणत्याही आतंकवादी गटाने स्वीकारले नसले, तरी हक्कानी नेटवर्क या आतंकवादी संघटनेचा यामागे हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आक्रमणानंतर या परिसराचा ताबा इंडो-तिबेट पोलीस दलाच्या रक्षकांनी घेतला.

कुठे आतंकवादाचा तात्काळ प्रतिकार करणारे अमेरिकी नागरिक, तर कुठे ६८ वर्षे कृती न करणारे मृतवत् हिंदू !

     कॅलिफोर्नियात झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर अमेरिकेतील मुसलमान नागरिक, तसेच मशिदी यांवरील आक्रमणांत ३ पटींनी वाढ झाली आहे. कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधन करणार्‍या गटाने केलेल्या संशोधनात ही गोष्ट उघड झाली.

अशा प्रसंगी हिंदु विद्यार्थी एक शब्दही का बोलत नाहीत ?

     देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २२व्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ वेदांता या कार्यक्रमास योगऋषी रामदेवबाबा यांना बोलावण्यास या विद्यापिठातील धर्मांध विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला. विद्यापिठाच्या व्यवस्थापनाने योगऋषी रामदेवबाबा यांना बोलावण्याचा निर्णय घेतला होता. व्यवस्थापनाने त्यांचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अथवा होणार्‍या विरोधाला सामोरे जावे, अशी धमकीवजा चेतावणी या विद्यार्थ्यांनी दिली.

हिंदु धर्मावर टीका करणारे पुरोगामी म्हणजे नरकगामी ! - पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते, संस्थापक-अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी सेना

वडाळा (मुंबई) येथे श्री वारकरी प्रबोधन 
महासमितीच्या वतीने भव्य पालखी सोहळा आणि संतसंमेलन 
डावीकडून श्री वारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष
ह.प.भ. रामेश्‍वर महाराज शास्त्री, पुरस्कार हातात घेतलेले महामंडलेश्‍वर
ह.भ.प. डॉ. रामकृष्ण महाराज लहवीतकर, ह.भ.प. जयरामबाबा गोंडेगावकर आणि
पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते आणि खासदार श्री. राहुल शेवाळे अन् इतर मान्यवर

     मुंबई, ४ जानेवारी (वार्ता.) - 'राम मद्य पितो, मांस खातोे', असे म्हणून हिंदु धर्मावर टीका करणारे पुरोमागी नसून हिंदु धर्मबुडवे आहेत. अशा पुरोगामी लोकांना धडा शिकवण्यासाठी मी अजून जिवंत आहे. हे पुरोगामी म्हणजे नरकगामी असून त्यांना शेवटी नरकातच जागा मिळणार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते यांनी केले. ते मुंबईतील पाच उद्यान (फाईव्ह गार्डन) येथे श्री वारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रामेश्‍वर महाराज शास्त्री यांच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणारा पालखी सोहळा आणि संत संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. 

ठाणे येथे दत्त जयंतीच्या दिवशी पोलिसांकडून भगवा ध्वज लावण्यास हिंदूंना मज्जाव !

हिंदूंना भगवा ध्वज लावू देण्यास विरोध करायला हा भारत आहे कि पाक ? 
हाजुरी (ठाणे) - येथील स्वामी समर्थ चौकात हिंदूंनी भगव्या धर्मध्वजाची स्थापना केली होती. २३ डिसेंबरच्या रात्री तेथील धर्मांधांनी ईदनिमित्त सजावट करतांना भगवा ध्वज काढून इस्लामचा ध्वज लावला. (आज हिंदू असंघटित असल्यानेच धर्मांध असा उद्दामपणा करण्यास धजावतात ! - संपादक) या विरोधात स्थानिक हिंदूंनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर त्यांनी मुसलमानांची समजूत काढून त्यांना त्यांचा ध्वज काढायला लावला.

मध्यप्रदेशात प्रतिदिन १ शासकीय अधिकारी भ्रष्टाचार करतांना पकडला जातो !

भ्रष्टाचारात देश अग्रेसर ! भ्रष्टाचार्‍यांकडून अवैध संपत्ती जप्त करून ती शासनाच्या कोषात जमा करा !
मध्यप्रदेशातील विशेष पोलीस विभाग आणि लोकायुक्त यांनी उघड केलेले भयानक वास्तव
     भोपाळ - मध्यप्रदेशातील विशेष पोलीस विभाग आणि लोकायुक्त यांनी अधिकृतरित्या घोषित केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात वर्ष २०१५ मध्ये प्रतिदिन किमान १ तरी अधिकारी भ्रष्टाचार करतांना पकडला गेल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ही शृंखला गेल्या ३ वर्षांपासून अशीच चालू आहे. अधिकृत माहितीनुसार वर्ष २०१५ मध्ये एकूण ४११ अधिकारी भ्रष्टाचार करतांना विशेष पोलीस विभाग आणि लोकायुक्त यांनी पकडले आहेत. वर्ष २०१४ मध्ये पकडल्या गेलेल्या अधिकार्‍यांच्या संख्येच्या म्हणजेच ३९० पेक्षा हा आकडा ५ टक्क्यांनी अधिक आहे. वर्ष २०१३ मध्ये पकडल्या गेलेल्या अधिकार्‍यांची संख्या ३५९ होती. अशा रीतीने ३ वर्षांत एकूण १ सहस्र १६० अधिकारी भ्रष्टाचार करतांना रंगेहात पकडले गेले आहेत. या व्यतिरिक्त वर्ष २०१४ च्या तुलनेत ४७ टक्के अधिक अधिकारी त्यांच्या पदाचा अपलाभ घेतांना उघड झाल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

कोलकाता येथे गोसंवर्धनाचे महत्त्व पटवण्यासाठी गायीसह सेल्फी काढा स्पर्धा !

अशाने कधीतरी गोसंवर्धन होईल का ? 
अशा मोहिमा केवळ सवंग लोकप्रियतेसाठी राबवल्या जातात, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?
     कोलकाता - येथील गोसेवा परिवार या स्वयंसेवी संघटनेने लोकांना गोसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गायीसह सेल्फी (भ्रमणभाषवरून स्वतःचे छायाचित्र काढणे) काढा (काऊफी) स्पर्धा चालू केली होती. या स्वयंसेवी संघटनेने नोव्हेंबर मासात राबवलेल्या ऑनलाईन मोहिमेच्या अंतर्गत गायीसह सेल्फी काढा स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन केले होते. गोमातेचे रक्षण हे धार्मिक किंवा राजकीय सूत्र नसून त्यामागे वैज्ञानिक कारण आहे. गायीपासून मिळणारे प्रत्येक उत्पादन मग ते दूध असो किंवा गोमूत्र त्याला वैज्ञानिक गुणधर्म आहे ते आपल्याला आवश्यक आहे, असे गोसेवा परिवार संघटनेच्या एका अधिकार्‍याने सांगितले. गोहत्येच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी या स्वयंसेवी संघटनेने गायीच्या दूधाचे मोफत वाटप केले. गोहत्या आणि गोमांस भक्षण या सूत्रांवर राजकीय क्षेत्रात वाद निर्माण झाला असतांना गायीसह सेल्फी काढा स्पर्धेला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. गोमांसामुळे मिळणार्‍या लाभापेक्षा गायीच्या उत्पादनांपासून मिळणारा आर्थिक आणि औषधी लाभ कितीतरी पटीने अधिक आहे, हे लोकांना पटवून देण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे या अधिकार्‍याने सांगितले.

पाकमधून भारतात आलेल्या हिंदु शरणार्थ्यांची व्यथा

अदनान सामीला भारताचे नागरिकत्व, मग आम्हाला का नाही ?
     अमृतसर - पाकिस्तानी गायक अदनान सामीला नुकतेच भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे; परंतु पाकिस्तानातून आलेल्या शेकडो हिंदूंना जवळपास २० ते २५ वर्षे भारतात येऊनही नागरिकत्व मिळालेले नाही. त्यामुळे शासन अदनान सामीला भारताचे नागरिकत्व देते, मग आम्हाला का नाही ? असा प्रश्‍न या शरणार्थ्यांनी विचारला आहे. शासन दरबारी गरिबांना कुणी वाली नसल्याची खंतही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. 
    एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार जालंधर आणि पठाणकोट या शहरांमध्ये पाकमधून अनेक वर्षांपूर्वी आलेले सुमारे ३०० हिंदू रहातात. त्यांनी भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये पूर्वीपासून आवेदने दिली आहेत; मात्र त्यांना अधिकार्‍यांकडून नेहमीच्या पठडीतील उत्तरे देण्यात येतात. अनेकांचे पाकिस्तानी पासपोर्ट संपलेले आहेत, आणि व्हिसाची मर्यादा केवळ वाढवली जाते. अदनान सामीला विशेष वागणूक देणारे भारत शासन आमच्यावर कधी प्रसन्न होणार ?, असा प्रश्‍न हे स्थलांतरीत विचारत आहेत.


श्रीपाल सबनीस यांच्या संरक्षणाचे दायित्व राज्यशासनाचे ! - प्रा. राम शिंदे

     पुणे - श्रीपाल सबनीस यांना धमकी देणार्‍यांवर गुन्हा प्रविष्ट झाला असून त्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल. श्रीपाल सबनीस यांच्या संरक्षणाचे संपूर्ण दायित्व राज्य शासनाचे आहे. त्यामुळे श्रीपाल सबनीस यांना संरक्षण देण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमानंतर सबनीस यांना येणार्‍या धमक्यांविषयी पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता ते बोलत होते.

पडताळणीच्या नावाखाली परराज्यांतील साईभक्तांची लूट !

वाहन पडताळणीच्या नावाखाली वाहतूक पोलिसांकडून 
साईभक्तांची केली जाणारी लूट, हे एक प्रकारचे 'जिझिया कर' 
आकारल्यासारखेच आहे. पोलीस अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी असे करतील का ? 
 शिर्डीतील वाहतूक शाखेच्या पोलिसांवर माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांचा आरोप 
     शिर्डी, ४ जानेवारी - येथील वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी हे परराज्यांतील साईभक्तांच्या वाहनांना अडवून वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करतात. त्या नावाखाली वाहनधारकांकडून रक्कम मागून लूट करण्यात येते. त्या वेळी पोलिसांना पैसे न दिल्यास ते कारवाईची धमकी देऊन ते वाहन पोलीस ठाण्यातच उभे केले जाते. त्याद्वारे भक्तांना विनाकारण त्रास दिला जातो. वाहतूक पोलीस हे श्री साईबाबा रुग्णालयामध्ये येणार्‍या रुग्णांच्या नातेवाइकांची दुचाकी वाहने शासनाधीन (जप्त) करणे अथवा गाड्या 'क्रेन'च्या साहाय्याने ओढून नेतात. त्याउलट नगरपंचायतीसमोर नेहमी उभ्या असणार्‍या खाजगी बसेस, अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने यांच्यावर वाहतूक पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. (वाहतूक पोलिसांकडून साईभक्तांना दिल्या जाणार्‍या त्रासाविषयी आवाज उठवणार्‍या कैलास कोते यांचे अभिनंदन ! - संपादक) 

सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत 'ज्ञानेश्‍वरी' ग्रंथ पोहोचवण्याचा प्रभावी प्रयत्न करणार ! - मुख्यमंत्र्यांची ग्वाही

या स्तुत्य प्रयत्नासाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन ! 
     आळंदी (जिल्हा पुणे), ४ जानेवारी - श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांनी 'ज्ञानेश्‍वरी'त समष्टीचा विचार दिला आहे. वारकर्‍यांनी तो ७२५ वर्षांपासून जपला आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी निर्मिलेला 'ज्ञानेश्‍वरी' ग्रंथ हा राज्यातील महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आणि वैभव आहे. तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अखिल भारतीय वारकरी मंडळ, आळंदी ग्रामस्थ आणि श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान, आळंदी प्रेरित 'ज्ञानेश्‍वरी'च्या ७२५ व्या वर्षानिमित्त महापारायण आयोजित केले होते. त्याच्या सांगताप्रसंगी ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त डॉ. अजित कुलकर्णी आणि अन्य मान्यवर यांसह सहस्रो वारकरी उपस्थित होते. प्रमुख विश्‍वस्त डॉ. अजित कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. 

देशाच्या शत्रूला धाक वाटण्यासाठी प्रत्येकाने शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घ्यावे ! - विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेता

देशातील भयावह परिस्थिती जी एका 
अभिनेत्याला जाणवते, ती शासनाला का जाणवत नाही ? 
     अमरावती, ४ जानेवारी - तरुणांनी स्वत:ला ओळखायला शिकले पाहिजे. आपल्याला देशासाठी काय करता येईल, याचा प्रथम विचार केला पाहिजे. 'व्हॉट्स अ‍ॅप', 'फेसबूक', अशा सामाजिक संकेतस्थळावर वेळ वाया घालवू नका. आपल्या देशाला चारही बाजूंनी शत्रूंनी वेढले आहे. सैनिक अहोरात्र सीमेवर पहारा देत असतांना आतंकवाद्यांची आक्रमणेही वाढतच आहेत. आपल्या विरोधात शत्रूला शस्त्र उगारण्यास धाक वाटला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घ्या, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेता आणि जागतिक मराठी अकादमीच्या शोध मराठी मनाचा संमेलनाचे अध्यक्ष विक्रम गोखले यांनी दिला. 

पूर्जाअर्चेच्या अधिकारासाठी महंतांची न्यायालयात याचिका प्रविष्ट

हिंदूंची मंदिरे भक्तांच्या स्वाधीन होण्यासाठी आणि त्यांचे पावित्र्य 
टिकवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
 • काशी विश्‍वनाथ मंदिर प्रकरण
 • उत्तरप्रदेश शासनाला न्यायालयाची नोटीस
     लक्ष्मणपुरी - काशी विश्‍वनाथ मंदिर अधिग्रहणाच्या ३२ वर्षांनंतर येथील पूर्जाअर्चा करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी महंत डॉ. कुलपती तिवारी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. महंतांनी याचिकेत काशी विश्‍वनाथ मंदिर अधिनियमाच्या अंतर्गत शासनाला केवळ मंदिराचे व्यवस्थापन पहाण्याचा अधिकार आहे, पूजाअर्चा करण्याचा नाही, असे स्पष्ट केले; तसेच मंदिरातील पूजा-अर्चेसह पुजार्‍यांची नियुक्ती करण्याचा अधिकारही महंतांना असतो आणि त्यांना हा अधिकारही मिळाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. या संदर्भात न्या. दिलीप गुप्ता आणि न्या. व्ही.के. श्रीवास्तव यांच्या खंडपिठाने उत्तरप्रदेश शासनासह इतर चार विभागांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ जानेवारीला होणार आहे.

भारतीय कारागृहातील १८९ पाक कैदी बेपत्ता असल्याचा पाकचा कांगावा !

     नवी देहली - वर्ष २००८ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारानुसार परस्परांच्या कारागृहांत असलेल्या एकमेकांचे नागरिक आणि मच्छीमार यांची सूची एकमेकांना देण्याचा करार झाला होता. त्याप्रमाणे दोन्ही देशांनी तशा सूची दिल्या; मात्र भारताने दिलेल्या सूचीत १८९ पाकिस्तानी कैदी बेपत्ता असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

माहिम येथील नया नगरमध्ये घराला भीषण आग

     मुंबई - माहिमच्या नया नगर परिसरातील एका घराला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. घरगुती सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
     घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ बंबांसह पाण्याचे ५ टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. आगीतील नुकसानाविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या विरोधात चर्चासत्र घेणार्‍या वृत्तवाहिन्या या
 हैदोसाविषयी एक ओळही दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या !
     हिंदु महासभेचे नेते कमलेश तिवारी यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ मालडा (बंगाल) येथे राष्ट्रीय महामार्गावर उतरून धर्मांधांनी तब्बल ६ घंटे हैदोस घातला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Bangalke Maldame mahamarg par utare dharmandhone kiya hinsachar.
     Ab puri Media chup kyo ?
जागो !
     बंगाल के मालदा में महामार्ग पर उतरे धर्मांधो ने किया हिंसाचार !
     अब पूरी मीडिया चूप क्यो ?

     मुंबई - येथील परळच्या महात्मा गांधी मेमोरिअल रुग्णालयात आग लागली. रुग्णालयाच्या तळ मजल्यावर ही आग लागल्याने परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ बंबांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. रुग्णालयातील सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. आगीचे कारण कळू शकलेले नाही; मात्र आगीमुळे रुग्णालय परिसरात भीतीचे वातावरण होते.

कारंजा येथे हिंदु धर्मजागृती सभा


डावीकडून कु. प्रतिक्षा कोरगावकर, दीपप्रज्वलन
करतांना पू. नंदकुमार जाधव आणि श्री. सुनील घनवट
     कारंजा (जिल्हा वाशिम) - येथील मूलजीजेठा शाळेच्या पटांगणात ३ जानेवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. सनातनचे पू. नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. सुनील घनवट आणि रणरागिणीच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर हे सर्वजण वक्ते म्हणून सहभागी झाले होते. सभेला तरुणांची ८० टक्के उपस्थिती होती. या सभेला २ सहस्र ५०० हून अधिक हिंदुत्ववादी उपस्थित होते. 
 (सभेचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.) 

बीड शहरातील श्री हनुमान मंदिरात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अधिवक्त्या हेमा पिंपळे यांच्यासह काही महिलांचा प्रवेश करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न

धर्माभिमानी हिंदूंनो, महिलांना न्याय देण्याच्या नावाखाली हिंदु धर्मावर 
हेतुपुरस्सर वारंवार आघात करण्याचा निधर्मी (अधर्मी) राजकीय पक्षांचा डाव ओळखा ! 
राष्ट्रवादी काँग्रेसकडे आंदोलन करण्यास कोणतेही सूत्र नसल्यामुळेच अशा प्रकारचे
धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठीचे आंदोलन केले जाते, असे म्हटल्यास वावगे काय ? 
हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे दर्शवणारी घटना ! 
     बीड, ४ जानेवारी - श्री शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन महिलांनी दर्शन घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शहरातील क्रांतीनगर भागातील श्री हनुमान मंदिर येथे 'महिलांना प्रवेश बंदी' असा फलक आहे. ते मंदिर महिलांसाठी खुले करावे, यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अधिवक्त्या हेमा पिंपळे यांनी ३ जानेवारी या दिवशी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधत आंदोलन केले. या वेळी अधिवक्त्या पिंपळे आणि काही महिला यांनी एकत्र येऊन मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. (मशिदीमध्ये महिलांना प्रवेश करण्यास बंदी आहे, तर तेथेही महिलांना प्रवेश मिळण्यासाठी असेच आंदोलन अधिवक्त्या हेमा पिंपळे करतील का ? - संपादक) त्या वेळी स्थानिक नागरिक आणि मंदिर व्यवस्थापन यांनी महिलांना प्रवेश नाकारल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस आणि व्यवस्थापन समिती यांनी मध्यस्थी केल्याने महिलांनी ते आंदोलन मागे घेतले. 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकर्‍यांचा हुतात्मा म्हणून सन्मान

अकाली दलचे नेतेही कार्यक्रमाला उपस्थित !
     नवी देहली - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकर्‍यांना पंजाबमध्ये भाजपचा सहकारी पक्ष अकाली दलाच्या नेत्यांच्या उपस्थितीत हुतात्मा असा सन्मान देण्यात आला, तसेच याप्रसंगी त्यांच्या नातेवाईकांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी शिरोमणी आकाली दलाचे परमिंदर पाल सिंह म्हणाले, जर हिंदू महासभा नथूराम गोडसे यांनी जयंती साजरी करू शकते, तर शीख या तिघांची पुण्यतिथी का साजरी करू शकत नाही ?, असे लोकांचे मत आहे.
     येथील मोती बाग गुरुद्वारामध्ये शीख विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्रीमती गांधी यांचे मारेकरी केहर सिंह, सतवंत सिंह आणि बेअंत सिंह यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात त्यांना शीख पंथाचे हुतात्मा संबोधण्यात आले. या संघटनेचे अध्यक्ष गुरमीत सिंह यांनी सांगितले की, शिखांची सर्वोच्च धार्मिक संस्था अकाल तख्त यांनी या तिघांना यापूर्वीच हुतात्मा घोषित केेले आहे. आम्ही केवळ त्यांची पुण्यतिथी साजरी केली आहे. मनजित सिंह यांनी सांगितले की, न्यायालयाने या तिघांना मृत्यूदंड दिला असेल; परंतु शीख समाज वर्ष १९८४ च्या शीख दंगलीसाठी अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.

कोडुंगल्लूर (केरळ) येथील सरस्वती विद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव

     चेन्नई - हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच सेवा भारती संस्थेच्या वतीने केरळ राज्यातील कोडुंगल्लूर येथे चालवण्यात येणार्‍या सरस्वती विद्यालयाला भेट देऊन शाळेचे व्यवस्थापक, प्राचार्य आणि शिक्षक यांच्याशी चर्चा केली. या वेळी सरस्वती विद्यालयाच्या व्यवस्थापनाने हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव केला. विद्यालयाच्या व्यवस्थापनाने प्रत्येक महिन्याला संस्कारवर्ग घेण्याची विनंती समितीच्या कार्यकर्त्यांकडे केली. सरस्वती विद्यालयाचे शिक्षक आणि व्यवस्थापन सेवाभावी वृत्तीने कार्य करतात. शिक्षक शालेय विषय शिकवण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. उत्साही शिक्षक, तसेच अन्य कर्मचारी आणि प्रसन्न वातावरण, अशी या विद्यालयाची वैशिष्ट्ये आहेत.

गोव्यात हरसाहेबसिंह बडेजा या युवकाचा मृत्यू अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे झाल्याचे प्रथमदर्शनी उघड !

पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे जीव गमावणारे युवक !
     प्रत्येक वर्षी अमली पदार्थांच्या अतीसेवनाने युवकांच्या मृत्यूच्या घटना गोव्यात घडत आहेत. इशा मंत्री, मेहा बहुगुणा या युवतींचा मृत्यू अमली पदार्थांच्या अतीसेवनाने झाल्याचा संशय होता. अशा प्रकारे किती युवकांचा मृत्यू झाल्यानंतर आपण हे अपप्रकार थांबवणार आहोत ? ही परिस्थिती पालटण्यासाठी धर्माचरणाशिवाय पर्याय नाही !
   पणजी, ४ जानेवारी (वार्ता.) गोव्यात ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यासाठी आलेला नागपूर येथील हरसाहेबसिंह बडेजा (वय २४ वर्षे) याचा हरमल, पेडणे येथे जंगलात झालेला मृत्यू अमली पदार्थांच्या अतीसेवनाने झाला असल्याचे समोर येत आहे. बडेजा यांच्यासोबत गोव्यात आलेल्या मित्रांकडून अमली पदार्थांचे अतीसेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. पेडणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्र गाड यांनी याला दुजोरा दिला आहे; मात्र या संदर्भातील शवविच्छेदन अहवाल डॉक्टरांनी राखून ठेवला आहे.

कोकणच्या विकासासाठी स्वतंत्र कोकण राज्याची आवश्यकता ! - प्रा. महेंद्र नाटेकर

अशा फुटीरतावादातून देश एकसंध कसा रहाणार ? 
     कणकवली - धरणे, पाटबंधारे झाले, चौपदरी महामार्ग झाला, अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये झाली, उद्योगधंदे आले; मात्र कोकणी माणसाला वंचित ठेवून बाहेरच्या माणसांनीच त्याचा लाभ उठवला. त्यामुळे कोकणचा विकास झाला, असे म्हणता येणार नाही. कोकणचा विकास म्हणजे कोकणी माणसांचा विकास आणि असा विकास स्वतंत्र कोकण राज्यातच होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले.

काश्मिरी विस्थापितांचे मानवाधिकार !

१. वर्ष १९४७ नंतर पाकिस्तानातून जीव 
वाचवून आलेल्या जवळजवळ २५ सहस्र 
कुटुंबांना आजही पश्‍चिम पाकिस्तानी 
आणि शरणार्थी म्हणून संबोधले जाणे
     या वर्षीही मानवाधिकारदिनानिमित्त जम्मू-काश्मीरातील फुटीरतावाद्यांनी आपण पीडित आणि अन्यायग्रस्त असल्याचे ढोल बडवून घेतले. त्यांच्या सुरात स्वयंघोषित मानवाधिकारवादी आणि कथित बुद्धीजीवींनीही आपला सूर मिळवला. विडंबन हे आहे की, ज्या विस्थापितांची आणि शरणार्थींच्या मानवाधिकारांची खरी चिंता वाहणे आवश्यक होते, त्याची साधी दखलही हे स्वयंघोषित मानवाधिकारवादी कधीच घेत नाहीत. देशाच्या रक्तरंजित फाळणीच्या वेळी जवळजवळ दोन लाख हिंदू आणि शीख पाकिस्तानातून पळून जम्मूत येऊन स्थायिक झाले होते; मात्र त्यांना आजही नागरिकत्वाचे अधिकार मिळालेले नाहीत. हे नागरिक लोकसभेसाठी तर मतदान करू शकतात; मात्र त्यांना जम्मू-कश्मीर विधानसभेसाठी मतदान करण्याचा अधिकार नाही. ते येथे संपत्ती खरेदी करू शकत नाहीत. शासकीय नोकरीपासून त्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. त्यांना तांत्रिक आणि व्यावसायिक वा उच्चशिक्षण घेण्याचा अधिकार नाही. वर्ष १९४७ नंतर पाकिस्तानातून जीव वाचवून आलेल्या जवळजवळ २५ सहस्र कुटुंबांना आजही पश्‍चिम पाकिस्तानी आणि शरणार्थी म्हणून संबोधले जाते.

भारतीय संस्कृती आणि विज्ञान

१. सहस्रो वर्षांची संस्कृती आणि विज्ञान कायम टिकविणारी विद्यापिठे 
     प्राचीन काळी निरनिराळे ऋषि, संत आणि गुरु यांचे आश्रम अन् मंदिरे ही सर्व प्रकारच्या विद्या, कला आणि शास्त्रे शिकवण्याची स्थाने होती. त्याचबरोबर वेदकाळापासून आजपावेतो भारतात ठिकठिकाणी मोठमोठी विद्यापिठे स्थापन करण्यात आली. त्यात शास्त्रे, विद्या, कला, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादी सर्व विषय शिकवले जात असत. या विद्यापिठांमुळेच सहस्रो वर्षांची संस्कृती आणि विज्ञान कायम राहिले. अनेक सत्ता आल्या आणि गेल्या; पण ज्ञानप्राप्तीचे विविध मार्ग अन् ज्ञानोपासना चालूच राहिली.

भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालणार्‍या कर्नाटकातील शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणाचे फलित !

    स्वातंत्र्य सुराज्यात परिवर्तित होण्याऐवजी पुन्हा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक पारतंत्र्याकडे वाटचाल करू लागले आहे. या चंगळवादाने तरुणपिढी नीतीभ्रष्ट, विवेकभ्रष्ट आणि संस्कारभ्रष्ट होत आहे, हा या देशाला निर्माण झालेला प्रचंड धोका आहे. कर्नाटक राज्यातील पुढील उदाहरणांवरून हे लक्षात येईल.
      कर्नाटक राज्यात वर्ष १९९४ पासून आजतागायत (जून २००० पर्यंत) लोकायुक्त पोलिसांनी १०३ अधिकार्‍यांच्या घरावर धाडी घातल्या. त्या अधिकार्‍यांच्या विरुद्ध असलेल्या गोष्टींची शासनाने चौकशी केली आणि त्यानुसार आतापर्यंत १० अधिकार्‍यांचे अहवाल बनवले असून तीन अधिकार्‍यांना बडतर्फ केले आहे, तर १३ अधिकार्‍यांविरुद्ध बडतर्फीची शिफारस केली आहे. २३ अधिकार्‍यांची चौकशी चालू आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सर्व आरोपींची नावे, पद (हुद्दा) आणि त्यांनी मिळवलेली भ्रष्टाचारी मालमत्ता यांचा तपशील विधान भवनात मांडला.

प्रसारमाध्यमांचे अयोग्य आदर्श

     २७ डिसेंबर या दिवशी अभिनेता सलमान खान याचा ५० वा वाढदिवस होता. एका वृत्तवाहिनीवर दिवसभर सलमान खान याच्याविषयीचे वृत्त दाखवले जात होते. यामध्ये त्याचे प्रसिद्ध चित्रपट कोणते, त्याचा पहिला टेक कोणता, तो काय बोलला, कसा बोलला इत्यादी...तसेच भाईजानला शुभेच्छा ! सलमानचे ब्रेसलेट हीच त्याची ओळख, असेही दाखवले जायचे. 
     प्रत्यक्षात सलमान खानची पार्श्‍वभूमी पाहिली असता त्याच्यावर काळवीटाच्या शिकार केल्याचा आणि मद्याच्या नशेमध्ये पदपथावर झोपलेल्यांच्या अंगावरून गाडी घालून ५ जणांची हत्या केली होती. तसेच चित्रपटांमधून हिंदु देवतांचे विडंबन करणे, काडीमात्रही राष्ट्राभिमान नसणे, असे व्यक्तीमत्त्व ५० वा वाढदिवस साजरा करत आहे आणि प्रसारमाध्यमे तो दिवसभर चवीने दाखवत आहेत, याला काय म्हणायचे ? प्रसारमाध्यमांना जणू देशामध्ये रामराज्य असल्यामुळे दुसर्‍या कोणत्या बातम्याच नाहीत कि काय ?

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

    रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो. 
     स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत.

राष्ट्र कसे आणि कोण निर्माण करतो ?

       भद्रमिच्छन्त ऋषयः स्वर्विदः तपो दीक्षामुपनिषेेदुरग्रे ।
       ततो राष्ट्रं बलमोजश्‍च जातं तदस्मै देवा उपसन्नमन्तु ॥ - अथर्ववेद, कांड १९, सूक्त ४१, खंड १ 
शब्दशः अर्थ
स्वर्विदः : परमेश्‍वरी ज्ञानाचा साक्षात्कार झालेले 
ऋषयः : ऋषि 
भद्रम् इच्छन्तः : विश्‍वाचे कल्याण व्हावे, ही इच्छा बाळगणारे होते. 
तपः दीक्षाम् उपनिषेदुः अग्रे । : त्यांनी अगोदर दीक्षा आणि तप यांचे आचरण केले. 
ततः राष्ट्रं बलम् ओजः च जातम् : त्यापासून राष्ट्र, बल आणि ओज निर्माण झाले. 
तद् देवाः अपि अस्मै उपसन्नमन्तु ॥ : म्हणून अशा राष्ट्राविषयी देवांनीसुद्धा अनुकूल वृत्ती ठेवावी. 
     राष्ट्राची निर्मिती ऋषींच्या तपश्‍चर्येतून आणि दीक्षेतून झाली. ऋषि राष्ट्रनिर्माते आहेत. शासनकर्ते राष्ट्रनिर्माते नव्हते. आपल्या तपाने आणि दीक्षेने निर्माण केलेले बल राष्ट्ररक्षण आणि संवर्धन यांसाठी ऋषि शक्तीच्या स्वाधीन करतात. 
(संदर्भ : प्रज्ञालोक, जानेवारी १९७९)

मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्याचा नोव्हेंबर २०१५ मधील आढावा

१. मुंबई जिल्हा 
    वृत्तवाहिन्यांवर आयोजित चर्चासत्रांत समितीचा सहभाग : हिंदी चित्रपट अभिनेते आमिर खान यांच्या देश सोडून जाण्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे आणि श्री. नरेंद्र सुर्वे यांनी अनुक्रमे यांनी मी मराठी अन् साम टीव्ही या वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांत सहभाग घेतला.
२. ठाणे जिल्हा
     प्रांतीय हिंदू अधिवेशन : समितीच्या वतीने ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत उल्हासनगर, जि. ठाणे येथे मुंबई, ठाणे आणि रायगड येथील धर्माभिमानी हिंदूंसाठी प्रांतीय हिंदू अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात सनातनच्या पू. (कु.) अनुराधा वाडेकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे, हिंदुत्ववादी लेखक श्री. दुर्गेश परुळकर यांनी धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले. यात ३६ हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ४ संप्रदाय यांचे प्रतिनिधी, अधिवक्ते अन् पत्रकार उपस्थित होते. अधिवेशनामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे आपल्या भागामध्ये हिंदु धर्मजागृती सभा आणि राष्ट्रीय हिंदू आंदोलने यांचे नियोजन केले.

निधर्मी (अधर्मी) लोकशाहीतील निःपक्षपाती (?) व्यवस्थेचे उदाहरण !

श्री. नंदू मुळ्ये
१. मोठा अधिवक्ता म्हणून प्रसिद्धी मिळण्याविषयी 
ऐकिवात आलेले निकष खरे ठरले ?
     आता देशात सहिष्णुतेचे वातावरण सिद्ध व्हायला साहाय्य होईल; कारण शेवटी जे व्हायचे होते आणि अशा लोकांच्या दाव्यांमध्ये (केसेस्मध्ये) होते, तेच झाले. एक खान सबळ पुराव्याच्या अभावी निर्दोष सुटला ! म्हणजे जो कायद्यातील पळवाटांचा अभ्यास करतो आणि तू काहीपण करून ये, मी तुला सोडवतो, अशी हमी आपल्या अशिलाला देतो. तो अधिवक्ता मोठा असे आम्ही ऐकले होते; पण ते आता खरे वाटायला लागले आहे.
    जेव्हा पुराव्याच्या धारिका (फाईल्स) जळल्या (कि जाळल्या ?), हरवल्या (कि गायब केल्या ?), तेव्हाच या निकालाची निश्‍चिती झाली. गंमत म्हणजे अशा लोकांची निर्दोष मुक्तता व्हावी, यासाठी म्हणे, समाजातील कित्येक जण नवस इत्यादीपण बोलतात ! या देशात सर्वच मोठ्या व्यक्तींच्या संदर्भात हेच घडते. कुणी मोठा नेता असो, अभिनेता असो, राजकारणी असो, उद्योगपती असो, गुन्हेगार असो कि आतंकवादी असो; सर्वांना न्याय सारखाच, म्हणजे जो या खानाला मिळाला तो !

तेजोमहालयच्या (ताजमहालच्या) चौथ्या माळ्यावर शाहजहान आणि मुमताझ यांची कबर असल्याचे सांगण्यात येत असलेली खोली ही तेथे कबर नसून शिवलिंग असल्याच्या खुणा बुजवल्या आहेत, याची साक्ष असणे

     शाहजहान आणि मुमताझ या दोघांची कबर असलेली खोली ताजमहालच्या चौथ्या माळ्यावर आहे. मुसलमानांची अंत्यक्रिया मातीत केली पाहिजे. ती कोणत्याही दगडावर किंवा माळ्यावर करत नाहीत, असे कुराणातच सांगितले आहे. म्हणजे तेथे शाहजहान आणि मुमताझ यांपैकी कुणाचीही कबर नाही. याचा अर्थ कबरीच्या नावावर तेथील शिवलिंग किंवा शिवलिंग असलेल्या खुणा बुजवून टाकल्या आहेत, असा आहे.
(संदर्भ : मासिक मेरू, नोव्हेंबर २०१५) 

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
    मागील १ मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.
     यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

निर्भीड आणि जिज्ञासू वृत्तीची ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली आणि उच्च स्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेली गोवा येथील कु. साक्षी संगम बोरकर (वय १० वर्षे) !

कु. साक्षी संगम बोरकर हिचा ५.१.२०१५ या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे.
 त्यानिमित्त तिची तिच्या वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. साक्षी हिला सनातन परिवाराकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
कु. साक्षी बोरकर
१. प्रेमभाव
     साक्षी स्वतःपेक्षा इतरांचा विचार अधिक करते. तिला एखादा पदार्थ आणला, तर तो प्रथम सर्वांना देऊन नंतर स्वतः खाते. नातेवाइकांनी सणांनिमित्त तिला दिलेले पैसेे तिने स्वतःसाठी खर्च न करता त्यातून मला आणि तिच्या आईला आवडणार्‍या वस्तू आणल्या.
२. प्रामाणिकपणा
अ. कु. साक्षी स्वतःकडून झालेली चूक स्वतःहून सांगते, तसेच एखादी कृती तिने केली नसेल आणि तिने केली, असे कोणी सांगितले, तरीही ती तत्परतेने सत्य परिस्थिती सांगते.

समजूतदार, सहनशील आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेला बडोदा, गुजरात येथील चि. अद्वैत रवींद्र पोत्रेकर (वय २ वर्षे) !

     मार्गशीर्ष कृष्ण पक्ष एकादशी (५.१.२०१६) या दिवशी चि. अद्वैत रवींद्र पोत्रेकर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि साधकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. अद्वैत रवींद्र पोत्रेकर याला 
वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !
चि. अद्वैत पोत्रेकर
१. जन्मापूर्वी
१ अ. बाळाच्या आगमनाविषयी सर्वप्रथम संतांनाच सांगितले जाणे : मे २०१३ मध्ये आम्ही ऑस्ट्रेलियात असतांना मला गर्भधारणा झाल्याचे समजले. माझी पहिली प्रसूती दीड वर्षांपूर्वी शस्त्रकर्म करून झाली होती. त्यानंतर लगेच माझे भगंदरचे (Sistula) शस्त्रकर्मही झाले होते. माझ्या शरिरात लोहाचे प्रमाण अल्प असल्यामुळे शारीरिक त्रास चालूच होते. या स्थितीत गर्भधारणा झाल्याचे अकस्मात् कळल्यामुळे आम्हाला काही सुचत नव्हते. आम्ही पू. सिरीयाकदादांना काय करावे ?, असे विचारले. तेव्हा त्यांनी आधुनिक वैद्य सांगतील, त्याप्रमाणे करण्यास सांगितले. अशा प्रकारे बाळाच्या आगमनाविषयी सर्वप्रथम संतांनाच कळवले गेले. त्यानंतर वैद्यांनी मूल होऊ देण्यास अडचण नसल्याचे सांगितले.

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिल्यावर तेथील चैतन्याची ठायी ठायी अनुभूती घेणारे परझान नल्लादारू !

१. आश्रमदर्शन करतांना
परझान नल्लादारू
१ अ. महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या तुलनेत आश्रमात चांगली शक्ती आणि तेजस्वी प्रकाश जाणवणे : २.४.२०१५ या दिवशी प्रथमच सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात जाण्याची संधी मिळाली. आश्रमाच्या प्रांगणात प्रवेश करताक्षणी माझ्या मनावरील ओझे न्यून होऊन मला हलके वाटू लागले. मनात काळजी आणि भीती यांचा लवलेशही उरला नाही. आश्रमातील चैतन्याने मी न्हाऊन निघालो आहे, असे वाटले, तसेच माझे मन निर्विचार झाले. मी रहात असलेल्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात दारू पिणे आणि सिगारेट ओढणे यांसारख्या अयोग्य गोष्टींमुळे, तसेच आवारात पुष्कळ अव्यवस्थितपणा असल्यामुळे तेथे काळ्या शक्तीचे आवरण आहे, असेे जाणवते. आश्रमात मला चांगली शक्ती, तसेच तेजस्वी प्रकाश जाणवला. त्यामुळे आश्रमात मला स्वतःच्या घरी आल्यासारखे वाटले. अगदी अकस्मात् आलेली ही अनुभूती अतिशय सुंदर आणि वस्तुस्थितीची जाणीव करून देणारी होती.

नकारात्मक स्थितीत असतांना सहसाधक आणि संत यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांचे प्रेम अनुभवायला मिळणे

श्री. नीलेश शिरोडकर
     अष्टांग साधनेच्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या संदर्भात एस्.एस्.आर्.एफ्.च्या (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊन्डेशनच्या) साधकांसाठी जानेवारी २०१५ मध्ये कार्यशाळा घेण्यात आली होती. त्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. नीलेश शिरोडकर यांचे अनुभव त्यांच्याच शब्दांत देत आहोत.
१. कार्यशाळेतील एका सत्रामध्ये स्वतःचा अहंभाव वाढल्याची आणि साधनेविषयी गांभीर्याचा अभाव असल्याची जाणीव करून दिल्यावर नकारात्मक स्थितीत जाणे
    कार्यशाळेच्या ७ व्या दिवशी, म्हणजे ९.१.२०१५ या दिवशी एका सत्रामध्ये माझा अहंभाव वाढल्याची आणि साधनेविषयी माझ्यामध्येे गांभीर्याचा अभाव असल्याची जाणीव करून देण्यात आली. परिणामी भीती आणि काळजी यांमुळे मला त्या रात्री व्यवस्थित झोप लागली नाही. माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येऊन मी नकारात्मक स्थितीत गेलो. माझ्यामध्ये पालट होणे शक्य नाही. मी संत आणि इतर साधक यांचा वेळ वाया घालवत आहे. साधना करणे अत्यंत कठीण असून मला ते जमणार नाही, असे मला वाटू लागले.

सौ. रश्मी नल्लादारू यांना आश्रमातील एका खोलीविषयी आलेली अनुभूती

     खोली निर्वात पोेकळी असल्याचे जाणवून आत गेल्यावर शांत वाटणे : सनातनच्या रामनाथी आश्रमातील खोली क्र. २२७ मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेचे नियोजन लावण्यासाठी गेले होते. खोलीचे दार उघडता क्षणी खोलीत निर्वात पोेकळी असून त्यात मी ओढली जात आहे, असे जाणवले. खोलीत प्रवेश केल्यावर संपूर्ण खोली पांढर्‍या प्रकाशाने व्यापली आहे, असे दिसले. खोलीत पुष्कळ शांत वाटत होते. त्यामुळे मला खोलीतून बाहेर पडू नये, असे वाटले. दिवसभर माझ्या मनात ही अनुभूती घोळत होती, तसेच ज्या ज्या वेळी मला या अनुभूतीचे स्मरण होत होते, प्रत्येक वेळी मला आतून शांत वाटत होते.
- डॉ (सौ.) रश्मी नल्लादारू, एशिया पॅसिफिक

प्रेमभाव, नेतृत्व गुण आदी विविध गुणांचा समुच्चय असणारे युरोपमधील श्री. मिलुटिन पांक्रात्स झाले संतपदी विराजमान !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून व्लादीमीर सिर्कोविच 
आणि सौ. रश्मी नल्लादारू झाले जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त ! 
श्री. व्लादीमीर सिर्कोविच यांचा सत्कार करतांना पू. मिलुटिन पांक्रात्स
सौ. रश्मी नल्लादारू यांचा सत्कार करतांना पू. मिलुटिन पांक्रात्स
---------------------------------------
आनंदाचे डोही आनंद तरंग । याची प्रचीती देणारा भावसोहळा !
रामनाथी आश्रमी एस्.एस्.आर्.एफ्.चे शिबीर हो चालले ।
२ साधकांनी जन्म-मृत्यूचे फेरेच ओलांडिले ।
आणखी एक गुपित गुरुदेवांनी उलगडले ।
आमुचे मिलुटिनदादा संतपदी हो विसावले ॥
ऐकूनिया आनंदवार्ता सारे हर्षाने चिंब-चिंब भिजले ॥
---------------------------------------
     फोंडा, ४ जानेवारी (वार्ता.) - गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात प्रतिवर्षी प्रसारसेवा करणार्‍या साधकांसाठी स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) कार्यशाळेचे आयोजन केले जाते. या कार्यशाळेच्या आरंभी साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी सर्वांना साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीची सुवार्ता दिली जाते. यावर्षी मात्र कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी असे काही झाले नाही. त्यामुळे साधकांच्या प्रगतीची सुवार्ता कधी मिळणार ?, याविषयी साधकांमध्ये उत्सुकता होती. अंतिमतः ३ जानेवारी या दिवशी एका विशेष कार्यक्रमात एस्.एस्.आर्.एफ्.चे युरोपमधील श्री. मिलुटिन पांक्रात्स (वय ४३ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याचे, तसेच युरोपमधील श्री. व्लादीमीर सिर्कोविच (वय ३५ वर्षे) आणि एशिया पॅसिफिकच्या सौ. रश्मी नल्लादारू (वय ४९ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाल्याची आनंदवार्ता सर्वांना मिळाली. संपूर्ण कार्यक्रमात साधक भाव आणि चैतन्य यांमध्ये न्हाऊन निघाले. येत्या मकरसंक्रातीला एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाने साधकांना ही अमूल्य भेट दिली !

॥ हरि ॐ तत्सत् ॥

http://3.bp.blogspot.com/-Bxr1aa6dw8Y/VEKfV71E93I/AAAAAAABYMo/0powwbuSasQ/s1600/Baba.jpg
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान


प्रेम
कोणतीही गोष्ट जगात दिसली पाहिजे, उदा. प्रेम हे जगात दिसले
 पाहिजे, दाखविले पाहिजे, मग त्यात वास्तविकता असो वा नसो.
भावार्थ : जग आणि प्रेम हे प्रकृतीतील आहे. प्रेम कृतीतून दाखविता आले पाहिजे, नाहीतर दुसर्‍याला ते कळणार नाही. एकदा एका शिष्याकडे गेले असता, बाबांनी तेथे हातात माळ घेऊन जप केला. मग त्याच्या घरातील त्रासदायक स्पंदने नाहीशी झाली. वास्तविक बाबांच्या केवळ अस्तित्वानेच तसे झाले असते; पण अस्तित्वाचा परिणाम लोकांना दिसत नाही, तर हातात माळ धरून केलेला जप दिसतो, म्हणून बाबांनी तसे केले. या प्रसंगाच्या आधी जवळजवळ वीस वर्षे बाबांनी हातात माळ घेऊन जप केल्याचे कुणी पाहिले नव्हते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     पाश्‍चात्त्य संस्कृती स्वेच्छेला प्रोत्साहन देणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करते आणि दुःखाला निमंत्रण देते, तर हिंदु संस्कृती स्वेच्छा नष्ट करून सत्-चित्-आनंदावस्था कशी प्राप्त करायची, हे शिकवते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

नेहमी सत्संगात रहावे
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     व्यक्तीचा मित्रपरिवार कसा आहे, यावरून त्याची ओळख ठरते; म्हणूनच आपल्याभोवती सात्त्विक वृत्तीच्या व्यक्तींचा वावर असेल, याची दक्षता कटाक्षाने घ्यावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

सुरक्षा यंत्रणांचे सक्षमीकरण आणि घरभेद्यांवर कारवाई कधी ?

संपादकीय 
      २७जुलै २०१५ या दिवशी आतंकवाद्यांनी आक्रमण केल्यावर केवळ सहा मासांच्या अंतराने आतंकवाद्यांनी पठाणकोट-गुरदासपूर या भागातच दुसरे आक्रमण केले. त्या वेळी एका पोलीस अधीक्षकांसह १० लोकांचा मृत्यू झाला होता आणि आताही ७ सैनिक हुतात्मा झाले आहेत. देशासाठी ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, सहा मासांत दुसरे आतंकवादी आक्रमण रोखू न शकणार्‍या आपल्या सुरक्षा यंत्रणा नेमक्या काय करत आहेत ? दोन मासांपूर्वी पंजाबमध्ये पवित्र गुरुग्रंथसाहेब ग्रंथांच्या विटंबनेने पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता आणि संपूर्ण राज्यात अस्थिरता निर्माण झाली होती. पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात येणार्‍या अमली पदार्थांचे मोठे रॅकेट पंजाबमध्ये निर्माण झाले असून या अमली पदार्थांच्या आहारी गेलेले युवकच आतंकवाद्यांसाठी काम करत आहेत, अशी शक्यता सुरक्षा यंत्रणा व्यक्त करत आहेत. अशा घरभेदी राष्ट्रद्रोह्यांच्या नांग्या आताच न ठेचल्यास भारतातील अन्य राज्यांतही त्यांची पाळेमुळे खोलवर जातील, हे शासनाच्या कधी लक्षात येणार आहे ? 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn