Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

स्फोट झाल्यावर आतंकवाद्यांना पकडणारे नकोत, तर स्फोट होण्यापूर्वीच आतंकवाद्यांना पकडणारे पोलीस हवेत ! सक्षम आणि राष्ट्रप्रेमी नसलेल्या पोलिसांना आजन्म कारावासात टाका !

     २८ डिसेंबर २०१५ या दिवशी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या गोदामात बॉम्ब बनवतांना स्फोट झाल्याने हन्ना शेख (वय ३० वर्षे) आणि फैजुल शेख (वय ३२ वर्षे) ठार झाले, तर नवीउल शेख (वय ४२ वर्षे) आणि नसीरूल इस्लाम (वय ४० वर्षे) हे गंभीररित्या घायाळ झाले. पोलिसांनी यांना कह्यात घेतले आहे.

पठाणकोट (पंजाब) येथील सैन्याच्या हवाई तळावर जिहादी आतंकवाद्यांचे आक्रमण !

पाकला धडा शिकवण्यासाठी शासन आणखी किती सैनिकांचे प्राण जाऊ देणार आहे ?
 • शासन आतातरी पाकला धडा शिकवेल का ?
 • कडेकोट (?) सुरक्षा व्यवस्था असणार्‍या हवाई तळावर आतंकवादी पोहोचलेच कसे ? जेथे देशातील अतीमहत्त्वाची आणि अतीसंवेदनशील ठिकाणेच सुरक्षित नसतील, तेथे सर्वसामान्यांच्या सुरक्षेची काय स्थिती असेल, याचा विचारच न केलेला बरा ! 
 •  ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

 • ३ सैनिकांना वीरमरण, तर ५ जिहादी आतंकवादी ठार 
 • आतंकवादी पाकचेच सैनिकी वेषात येऊन केले आक्रमण
 • लष्कर-ए-तोयबाने दायित्व स्वीकारले
 • पाच मासांतील दुसरे आक्रमण

त्रिपुराच्या शाळांमध्ये योगाचे शिक्षण अनिवार्य

त्रिपुराचा आदर्श घेऊन देशातील इतर राज्येही त्यांच्या राज्यातील विद्यार्थ्यांना योगाचे शिक्षण देतील, अशी अपेक्षा आहे !
साम्यवादी पक्षा (मार्क्सवादी) चा निर्णय
आगरताळा - साम्यवादी पक्षा (मार्क्सवादी) चे शासन असलेल्या त्रिपुरा राज्यातील शाळांमध्ये योगाचे शिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांमध्ये योग अनिवार्य करणार्‍या गुजरात राज्यानंतर त्रिपुरा हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. शासनाच्या एका आदेशानुसार १ जानेवारीपासून १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना योगाचे शिक्षण देण्यात येत आहे. या निर्णयाला राज्यात मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. येथे मनिक सरकार मुख्यमंत्री आहेत.


हिंदु राष्ट्रातच हिंदूंना योग्य तो न्याय मिळेल ! - श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

 • काशी गाव, मीरा रोड येथे संत संमेलनात संत-महंतांकडून हिंदू बांधवांना धर्मकार्यात सहभागी होण्याचे आवाहन !
 • २० हून अधिक संत-महंतांचे एकाच व्यासपिठावरून प्रबोधन
 • प्रबोधन आणि ग्रंथप्रदर्शन या माध्यमांतून सनातन संस्थेचा सहभाग
संतसंमेलनात विषय मांडतांना श्री. अभय वर्तक (डावीकडे)
मीरा रोड (जिल्हा ठाणे), २ जानेवारी (वार्ता.) - आज आपल्याच देशात हिंदूंना त्यांची बाजू व्यवस्थित मांडायला मिळत नाही. हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे, असे सांगून हिंदूंना गप्प बसवले जाते. जेव्हा हिंदु राष्ट्राची मागणी केली जाते, तेव्हा अनेकांकडून आक्षेप घेतला जातो; पण आपण हिंदू बांधवांनीही तितक्याच प्रखरतेने हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे. हे हिंदु राष्ट्र संतांच्या आशीर्वादानेच येणार आहे. आज देशात इतर पंथियांना एक न्याय, तर हिंदूंना वेगळा न्याय दिला जात आहे. हिंदु राष्ट्र आल्यावरच हिंदूंना योग्य तो न्याय मिळेल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी केले. ते काशी गाव, मीरा रोड (जिल्हा ठाणे) येथे आयोजित संत संमेलनात बोलत होते.

अल्पसंख्यांकांच्या शिक्षणासाठी जागतिक बँकेकडून ५ कोटी डॉलरचे ऋण

नवी देहली - अल्पसंख्यांकांच्या शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षणासाठी ५ कोटी डॉलरचे ऋण जागतिक बँक देणार आहे. भारत शासन आणि जागतिक बँक यांनी अल्पसंख्यांकांचे शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण योजना, नई मंजिलसाठी ५ कोटी डॉलरच्या ऋणावर स्वाक्षरी केली असल्याचे जागतिक बँकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (भारतात शिक्षणासाठी केवळ अल्पसंख्यांकांनाच आर्थिक साहाय्य का ? देशात इतरही घटक शिक्षणापासून वंचीत नाहीत का ? - संपादक)

जनतेच्या हितासाठी राज्यशासन मद्य आणि सिगारेट यांच्यावर बंदी आणू शकते ! - सर्वोच्च न्यायालय

महसुलावर डोळा ठेवून मद्य आणि सिगारेट यांची विक्री होऊ देणारे 
शासन असा जनहितकारी निर्णय घेईल, अशी अपेक्षाच नको !
     नवी देहली - मद्य आणि सिगारेट अशा मादक पदार्थांच्या उत्पादनावर राज्यशासन नियंत्रण आणू शकत नसले, तरी जनतेच्या हितासाठी त्यांच्यावर बंदी घालू शकते, असे मत सर्वोच्च न्यायालयाने केरळ राज्याने मद्य विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळतांना व्यक्त केले आहे. (या निर्णयाचा लाभ उचलून इतर राज्यांची शासने मद्य आणि सिगारेट यांच्यावर बंदी आणून जनतेचे हित साधू शकतील काय ? सर्वोच्च न्यायालयाने समान नागरी कायदा लागू करावा, असेही मत व्यक्त केले आहे; मात्र त्याकडेही दुर्लक्ष करणारे शासन या बाबतीतही काही करेल, अशी अपेक्षा जनता कशी करू शकणार ? - संपादक)

आय.एस्.आय.एस्.च्या आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर म्युनिच (जर्मनी) येथील रेल्वेसेवा बंद

संपूर्ण जगाला अशांत करणारा जिहादी आतंकवाद !
     म्युनिच (जर्मनी) - आय.एस्.आय.एस्.चे ५ ते ७ आतंकवादी नववर्षाच्या रात्री म्युनिचमध्ये आत्मघाती आक्रमण करू शकतात. तेथील रेल्वेस्थानकांना ते लक्ष्य करतील, अशी माहिती फ्रान्सच्या गुप्तचर यंत्रणेतील अधिकार्‍यांनी जर्मनीच्या अधिकार्‍यांना दिली होती. यानंतर तेथील सुरक्षेत वाढ करण्यात आली, तसेच तेथील २ रेल्वेस्थानके रिकामी करून तेथील रेल्वे सेवा बंद करण्यात आली.

धर्मनगरी हरिद्वार येथे अर्धकुंभपर्वास प्रारंभ

हरिद्वार - धर्मनगरी हरिद्वार येथे बैरागी कॅम्पस्थित अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्यात संत-महंतांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणानंतर अर्धकुंभपर्वास आरंभ झाला. अर्धकुंभपर्वाच्या अंतर्गत पहिले राजयोगी (शाही) स्नान १४ जानेवारीला होणार आहे. चैत्र पौर्णिमेला (२२ एप्रिलला) शेवटचे राजयोगी स्नान असेल.

ममता (बानो) बॅनर्जी शाहरूख खानला देणार अडीच कोटी रुपयांची सदनिका !

ममता (बानो) बॅनर्जी शासनाकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी ! 
बॅनर्जी यांनी स्वखर्चाने ही भेट द्यावी !
     बंगालचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर झाल्याचे मानधन म्हणून बंगालच्या मुख्यमंत्री ममता (बानो) बॅनर्जी अभिनेते तथा आय.पी.एल्मधील कोलकाता क्रिकेट संघाचे मालक शाहरूख खान यांना सदनिका देण्याच्या सिद्धतेत असल्याचे बोलले जात आहे.

आंध्रप्रदेशमध्ये शासकीय खर्चातून उभे रहाणार ख्रिस्ती भवन !

हिंदूंनी निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांनी ख्रिस्त्यांचे लांगूलचालन करणे, ही हिंदूंना शिक्षाच होय !
मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी केले भूमीपूजन
     गुंटूर (आंध्रप्रदेश) - मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी गुंटूर शहराजवळील थाक्केल्लापडू या गावात राज्यशासनाकडून उभारण्यात येणार्‍या ख्रिस्ती भवनाचे नुकतेच भूमीपूजन केले. हे भवन २ एकर जागेमध्ये बांधण्यात येणार असून त्यास १० कोटी रुपये व्यय येणार आहे, (पुष्कर यात्रेकरूंच्या प्रवास तिकिटांवर कर आकारणारे शासन ख्रिस्त्यांच्या यात्रेला अनुदान देतात, हे लक्षात घ्या ! - संपादक) तसेच शासन गरीब ख्रिस्त्यांना विवाहासाठी ५० सहस्र रुपयांचे साहाय्य करील.

अयोध्येत मुसलमानांनी उभारली बाबरी मशिदीची थर्मोकॉलची प्रतिकृती !

अयोध्येत केवळ शिळा आणल्या; म्हणून जणू आकाश कोसळल्याप्रमाणे 
ओरड करणारे तथाकथित पुरो(अधो)गामी आता गप्प का ?
     अयोध्या येथील काझियाना भागातील काही स्थानिक मुसलमानांनी बाबरी मशिदीची थर्मोकॉलची प्रतिकृती उभारली होती. जिल्ह्यातील प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सदर प्रतिकृती हस्तगत केली. काही दिवसांपूर्वी विहिंपकडून राममंदिराच्या उभारणीसाठी शिळा आणून ठेवण्यात आल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुसलमान गटाच्या या कृतीकडे पाहिले जात आहे.

केंद्रशासनाकडून एका वर्षात विज्ञापनांवर ८०० कोटी रुपयांहून अधिक व्यय

     जनहिताचे कार्य केले, तर ते लोकांपर्यंत पोहोचतेच, त्यासंदर्भातील विज्ञापनासाठी कोट्यवधी रुपये व्यय करावे लागत नाहीत !
   केंद्र शासनाने २६ मे २०१४ ते २६ मे २०१५ या वर्षभराच्या काळात विज्ञापनांवर ८०० कोटी रुपयांहून अधिक खर्च केले आहेत. (देश आर्थिक संकटात असतांना विज्ञापनांवर कोट्यवधी रुपये खर्च करणे दुर्दैवी आहे ! - संपादक)

जम्मू-काश्मीरचा फुटीरतावादी मसरत आलम याला पुन्हा अटक

मसरत याच्यासारखे फुटीरतावादी सुटल्यावर पुन्हा भारतविरोधी उद्योग करतात ! 
त्यामुळे अशा देशद्रोह्यांना फासावर लटकवा !
     जम्मू - जम्मू-काश्मीरचा फुटीरतावादी नेता मसरत आलम याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिली.
     फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांच्यासाठी आलमने नुकतीच एक सभा आयोजित केली होती. या सभेत आलमने शत्रूराष्ट्र पाकचे झेंडे फडकवले होते. तसेच आलमने त्या सभेत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या शासनावरही टीका केली होती.

आतंकवादी भटकळ बंधूंचे आय.एस्.आय.एस्.शी संधान !

हा जिहादी आतंकवाद वेळीच मोडून काढण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेणे अपेक्षित आहे ! 
अन्यथा हा आतंकवाद उग्र रूप धारण करेल !
     मुंबई - इंडियन मुजाहिदीन या कुख्यात आतंकवादी संघटनेचा संस्थापक सदस्य रियाज शाहबंदरी उपाख्य रियाज भटकळ आणि त्याचा भाऊ इक्बाल भटकळ यांनी जगात उच्छाद मांडलेल्या आय.एस्.आय.एस्. या पाशवी आंतरराष्ट्रीय आंतकवादी संघटनेशी संधान साधले आहे. या दोघा बंधूंनी आणि भारतभरात असलेल्या त्यांच्या संघटनेच्या सदस्यांनी आय.एस्.आय.एस्.च्या सूचनेवरून कार्य चालू केले आहे, अशी माहिती भारतीय गुप्तचर सूत्रांकडून मिळाली आहे.

स्वित्झर्लंडच्या राष्ट्रध्वजावरील क्रॉस काढून टाकण्याची तेथील मुसलमानांची मागणी

स्वित्झर्लंडचा राष्ट्रध्वज जाळतांना
मुसलमान आंदोलक 
      स्वित्झर्लंड देशात केवळ ५ टक्के मुसलमान असतांना ते देशाचा राष्ट्रध्वज पालटण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन उभे करतात, तर भारतातील १३ टक्के मुसलमान उद्या भारताच्या राष्ट्रध्वजावरील केशरी रंग काढून टाका; कारण तो हिंदु धर्माचे प्रतीक आहे, तसेच अशोकचक्रही काढून टाका; कारण ते बुद्ध धर्माचे प्रतीक आहे, अशी मागणी करू लागल्यास नवल वाटणार नाही. यातून भारत शासनाने बोध घेऊन पुढील पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे !

उत्तरप्रदेशच्या पोलीस महासंचालकपदी सैय्यद जावेद अहमद

१५ वरिष्ठ आयपीएस् अधिकार्‍यांना डावलून अखिलेश सिंह यांच्याकडून जावेद यांना पसंती !
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - उत्तरप्रदेशच्या अखिलेश शासनाने १५ वरिष्ठ भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस्) अधिकार्‍यांना डावलून राज्याच्या पोलीस महासंचालकपदावर सैय्यद जावेद अहमद यांची नियुक्ती करून त्यांच्या हाती राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची सूत्रे सोपवली आहेत. जावेद वर्ष १९८४ चे आय.पी.एस् अधिकारी असून त्यांनी जगमोहन यादव यांची जागा घेतली आहे. (अखिलेश यादव शासनाने राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीही १५ वरिष्ठ आणि लायक अधिकार्‍यांना डावलून एका मुसलमान अधिकार्‍यांचीच निवड केली. यातून त्यांचे मुलसानप्रेम उघड होते. असे राज्यकर्ते कधी सर्व जनतेला न्याय देईल का ? - संपादक)

मारुंजी (पुणे) येथे आज शिवशक्ती संगम

पुणे, २ जानेवारी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला बहुप्रतिक्षित शिवशक्ती संगम हा कार्यक्रम ३ जानेवारी या दिवशी मारुंजी येथे दुपारी ३.३० वाजता पार पडणार आहे. संघाच्या गणवेशात उपस्थित असणारे १ लक्ष हून अधिक स्वयंसेवक, विविध किल्ल्यांच्या प्रवेशद्वारांची प्रतिकृती असणारी भव्य अशी १३ प्रवेशद्वारे, भुईकोट किल्ल्याची प्रतिकृतीसदृश उभारण्यात आलेले व्यासपीठ, सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांचे भाषण अशी या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये असणार आहेत. हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत येऊनही काही गोष्टींत होणारा हिंदूंचा हिरमोड, हिंदुत्ववादी संघटनांवर कथित पुरोगाम्यांकडून केली जाणारी टीका या पार्श्‍वभूमीवर संघ स्वयंसेवकांच्या या विराट मेळ्यामध्ये मोहन भागवत काय भूमिका मांडतात, हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

वादग्रस्त पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांना 'व्ही.आय.पी.' सुरक्षेच्या पोलीस महानिरीक्षकपदी बढती !

मुंबई - राज्यातील १७ आयपीएस् अधिकार्‍यांच्या पदोन्नतीवर गृह विभागाने बदल्या केल्या आहेत. यात मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांत कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. या अधिकार्‍यांमध्ये मिरज, नगर यांसह अन्य दंगलींना प्रोत्साहन दिल्याचा, तसेच भ्रष्टाचाराचा आरोप असणारे वादग्रस्त पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांनाही 'व्ही.आय.पी.' सुरक्षेच्या पोलीस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे.

पुणे येथे भ्रमणभाष संच चोरीला जाण्याच्या प्रमाणात वाढ

दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललेले पुणे ! कायदा-सुव्यवस्थेची ही स्थिती अराजकताच दर्शवते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
नोव्हेंबर २०१५ अखेर ३५६ भ्रमणभाष संचांची चोरी
पुणे, २ जानेवारी - पुण्यामध्ये होणार्‍या भ्रमणभाष संच चोरीच्या संदर्भात माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी माहिती मिळवली आहे. त्यानुसार वर्ष २०१३ मध्ये ७६ गुन्हे नोंदवले गेले, त्यात ८२ भ्रमणभाष संच चोरीला गेले होते. गेल्या वर्षी, म्हणजेच वर्ष २०१४ मध्ये १७६ गुन्ह्यांमध्ये २०५ भ्रमणभाष संच चोरीस, तर या वर्षी नोव्हेंबर २०१५ अखेर भ्रमणभाष संच चोरीचे ३१५ गुन्हे नोंदवले आहेत. त्यामध्ये ३५६ भ्रमणभाष संच चोरी झाले. (याचा अर्थ दिवसाला एक भ्रमणभाष संच चोरीला जात आहे. चोरांना कुणाचाच धाक राहिला नसल्याचे उदाहरण आहे. - संपादक) हे चोरीला गेलेले भ्रमणभाष संच परत मिळाल्याची माहितीही दुर्वे यांनी मागितली होती; परंतु त्यांना ती उपलब्ध करून दिली नाही. (ही माहिती उपलब्ध न करून देण्याविषयीचे कारण पोलीस प्रशासनाने स्पष्ट करायला हवे. - संपादक)

कामशेत पोलीस ठाण्याच्या (जिल्हा पुणे) पोलीस निरीक्षकाच्या वेतनवाढीला स्थगिती

असे पोलीस हे पोलीस प्रशासनाला कलंक आहेत. त्यांना पोलीस प्रशासनातून बाजूला करणे अपेक्षित आहे !
पोलीस निरीक्षकांनी महिलेशी अश्‍लील भाषेत वाद घालण्याचे प्रकरण
पुणे, २ जानेवारी - कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एल्.जी. पांडुळे यांनी ८ ऑगस्ट २०१५ या दिवशी एका महिलेशी अश्‍लील भाषेत वाद घातला होता. त्या प्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक संजय वर्मा यांनी पांडुळे यांच्यावर पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे वर्मा यांनी त्यांच्या १ वर्षाच्या वेतनवाढीला स्थगिती दिली आहे. (या प्रकरणी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. - संपादक)
महिलेविषयीची ही घटना घडल्यानंतर लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक ढाकणे यांनी पांडुळे यांना वर्तनाविषयी समज दिली होती; मात्र पांडुळे यांनी त्याकडे डोळेझाक केली. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटिसीलाही पांडुळे यांनी उत्तर दिले नाही. एवढे होऊनही त्यांना समक्ष मुलाखतीसाठी बोलावले असता ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना एकूण प्रकरणाविषयी खुलासा करायचा नसल्याचे गृहित धरून ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.


स्वामी स्वरूपानंद यांच्यामुळे 'राष्ट्रधर्मा'ची खरी जाणीव - डॉ. यशवंत पाठक

सातारा, २ जानेवारी (वार्ता.) - संन्याशाच्या आचरणातून ज्या काही जाणिवा निर्माण होतात त्या जाणिवांच्या परिणामांतून राष्ट्रधर्माची निर्मिती होती. आज हेच कार्य स्वामी स्वरूपानंद अविरतपणे करत आहेत. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्यामुळे राष्ट्रधर्माची खरी जाणीव समाजाला झाली आहे, असे गौरवोद्गार संत ज्ञानेश्‍वर अध्यासन, पुणे विद्यापिठाचेे प्राचार्य डॉ. यशवंत पाठक यांनी काढले.
श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीने समर्थ विचारांचा प्रसार-प्रचार करणार्‍या व्यक्तीस समर्थ संत सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षीचा पुरस्कार फुलगाव (जिल्हा पुणे) येथील समर्थ भक्त स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना देण्यात आला. पुणे येथील उद्यान मंगल कार्यालयात हा सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष पू. गुरुनाथ महाराज कोटणीस, कार्याध्यक्ष अधिवक्ता डी.व्ही. देशपांडे, श्रीक्षेत्र सज्जनगड येथील पू. मारुतीबुवा रामदासी, सज्जनगड मासिकाचे कार्यकारी संपादक श्री. मधु नेने आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले,
१. हा पुरस्कार माझा नाही. एक औपचारीकता म्हणून हा पुरस्कार मी स्वीकारलेला आहे. समर्थ रामदास हे माझे लहानपणापासूनचे श्रद्धास्थान आहे.
२. ही दास परंपरा पहातांना मी याकडे समर्पण भावाने पहातो. कितीही कठोर जीवन असूनही सेवेतून जीवन साध्य करता येते. हे समर्थांकडे पाहून कळते.

३. आमच्या जीवनात आचारधर्माला फार महत्त्व आहे.

४. राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानासाठी आचारधर्माचे अधिष्ठान असले पाहिजे. तेे श्रेष्ठ अशा नीतीमूल्यावर आधारलेले आहे. समर्थांनी हनुमंताची उपासना सांगितली; कारण हनुमंताच्या चरित्रात शक्ती, बुद्धी, युक्ती, श्रद्धा आणि समर्पण हे गुण आपल्याला पहायला मिळतात.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मधु नेने यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. श्रीराम सबनीस यांनी केले.

पनवेल येथे मौलवीकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

मौलवींचे खरे स्वरूप जाणा !
पनवेल - येथील कच्छी मोहल्ला परिसरातील आयशा मशिदीतील मौलवी सोहेल अब्दुल सलाम दिवान (वय ३४ वर्षे) याने १२ वर्षीय मुलाला चॉकलेट, कपडे आणि बाहेर फिरवण्याचे आमिष देऊन त्याला स्वतःच्या घरी नेले अन् त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. याविषयी पीडित मुलाने घरी सांगितल्यावर धर्मांध सोहेलच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रायगड किल्ल्यावरील मातीत गाडल्या गेलेल्या प्रत्येकी १ सहस्र किलो वजनाच्या १७ तोफा बाहेर काढल्या !

जे पुरातत्व विभागाने केले पाहिजे, ते कार्य धारकरी करत आहेत ! सर्व साधनसामग्री 
असतांना ऐतिहासिक तोफा जतन करू न शकणारे पुरातत्व खाते हवे कशाला ?
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मुंबई विभागातील ३२ धारकर्‍यांचा स्तुत्य प्रयत्न
संचारे उत्साह अंगी धारकर्‍यांच्या । मुखी जयघोष शिवछत्रपतींचा ॥ 
तोफांना दिली पुनर्संजीवनी । इतिहास जागवला धारकरीरूपी मावळ्यांनी ॥
मातीत गाडली गेलेली तोफ

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात प्रसादाचे लाडू न मिळाल्याने भाविक अप्रसन्न

 • मंदिरात भाविकांना प्रसादाची मागणी करावी लागणे, हाच आहे मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम !
 • ठेकेदाराच्या विरोधात भाविकांच्या तक्रारी !
     कोल्हापूर, २ जानेवारी (वार्ता.) - १ जानेवारी या दिवशी श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात भाविकांना प्रसादाचे लाडू उपलब्ध न झाल्याने सहस्रो भाविकांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. ठेकेदार प्रसाद देण्यास असमर्थ असेल, तर दुसर्‍या ठेकेदाराचे नियोजन करा, अशी तक्रार भाविकांनी देवस्थान समितीकडे केली आहे.
१. श्री महालक्ष्मी मंदिरात १ आणि २ जानेवारी या दिवशी पुष्कळ गर्दी होती. परगावाहून आलेल्या भाविकांची संख्याही अधिक होती.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    सनातन प्रभात नियतकालिकांमध्ये साधकांचे अनुभव आणि अनुभूती असतात. वर्ष २००९ मध्ये अगदी दिवाळीच्या दिवशी, म्हणजे नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी गोव्यातील मडगाव शहरात नरकासुरदहन स्पर्धेच्या जवळ झालेल्या एका स्फोटात सनातनच्या दोन साधकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सनातनचे साधक दोषी असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि सनातनच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ६ साधकांना बंदी बनवण्यात आले. ४ वर्षे न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सनातनचे हे सहाही साधक निरपराध असल्याचे सिद्ध झाले. ४ वर्षे कारागृहात शारीरिक आणि मानसिक असह्य त्रास सहन केल्यानंतर न्यायालयाने या साधकांची ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष मुक्तता केली.

दैनिक केसरीचे मोहन वाटवे यांची शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड !

मिरज - मिरज शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक केसरीचे श्री. मोहन वाटवे यांची फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून पुण्यनगरीचे श्री. जगदीश धुळुबुळू, तर सचिव म्हणून 'सी न्यू'ज चे श्री. शरद सातपुते यांची फेरनिवड करण्यात आली. मिरज येथे दैनिक प्रतिध्वनीच्या कार्यालयात पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. श्री. वाटवे हे ५ वर्षे केसरीचे मिरज प्रतिनिधी म्हणून काम पहात असून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्‍नांवर वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यांच्या या फेरनिवडीविषयी त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

पठाणकोट आक्रमण ही पंतप्रधान मोदी यांना लाहौर दौर्‍याची मिळालेली भेट ! - शिवसेना

मुंबई - ज्या गोष्टीची आपल्याला भीती होती तेच घडले आहे. केंद्रशासन पाकिस्तानशी संवाद साधून दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असतांना पाककडून मात्र भारतावर आतंकवादी आक्रमणे करण्यात येत आहेत. पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय सैन्याच्या एअरबेसवर केलेले आक्रमण, म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच केलेल्या पाकिस्तान दौर्‍यानंतर आतंकवाद्यांकडून त्यांना नववर्षाची मिळालेली भेट आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. २५ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अचानक भेट दिली होती. मोदी यांनी काबूलवरून थेट लाहोरला जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मोदींच्या या भेटीनंतर त्यांच्या निर्णयाचे जगभर कौतूक झाले होते.


आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याची वेळ ! - निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर

पाकिस्तानवर विश्‍वास ठेेवणे चुकीचेच
     मुंबई, २ जानेवारी - एका मासापूर्वीच संतोष महाडिक हुतात्मा झाले. शत्रू आपल्या भूमीत, आपल्याच लोकांचे प्राण घेत असेल, तर हे कधीपर्यंत सहन करायचे ? या सहनशीलतेला मर्यादा हवी. त्यामुळे शासनाने पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. या आक्रमणाचे उत्तर म्हणून आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले पाहिजेत. सीरिया, अमेरिका, रशिया यांसारख्या प्रमुख राष्ट्रांनी ज्याप्रमाणे एकत्र येऊन आतंकवाद्यांवर आक्रमणे केली, तशी कारवाई आपण करणे आवश्यक आहे, असे परखड मत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले.

इंग्रजीच्या तुलनेत मराठी खरी ज्ञानभाषा ! - प्रा. अनिल गोरे (मराठीकाका)

    इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, असे सांगत मराठी मात्र ज्ञानभाषा आहे कि नाही याविषयी मौन बाळगून नवनिर्वाचित साहित्य संमेलन अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी शिक्षणाचे भाषामाध्यमाविषयीचे स्वत:चे घोर (की अघोरी ?) अज्ञान ३१ डिसेंबरला आकुर्डीमध्ये प्रकट केले आहे. या संदर्भात प्रा. अनिल गोरे मराठीकाका यांनी पुढील सूत्रे मांडली आहेत.
१. १८६० मध्ये इंग्रजी माध्यमातून शालेय आणि उच्चशिक्षण घेण्याची प्रथा इंग्लंडला चालू झाली. इंग्रजीतून शिकण्याचे प्रमाण जसजसे वाढत गेले, तसतसे इंग्लंडमधील विद्यार्थी जगातील अन्य भाषामाध्यमांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडत गेले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये धर्माभिमान्यांनी दिली हिंदु राष्ट्राची हाक !

डावीकडून अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, धर्माभिमानी श्री. सतीश दळवी,
पू. (कु.) स्वाती खाडये, सौ. करुणा दळवी, कु. चैतन्य दळवी आणि श्री. अभिजीत देशमुख
फलटण (जिल्हा सातारा) येथे हिंदु धर्मजागृती सभा !
फलटण, २ जानेवारी (वार्ता.) छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये अर्थात फलटण येथे ५ व्यांदा धर्मजागृती सभा पार पडली. या वेळी उपस्थित धर्माभिमान्यांनी अखंड हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची ललकारी एकमुखाने दिली. येथील मुधोजी क्लब मैदानावर झालेल्या या धर्मसभेत सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी उपस्थित धर्माभिमान्यांचे स्फुल्लिंग चेतवले.
या सभेमध्ये हिंदु धर्माभिमानी आणि अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोधी समितीचे फलटण तालुकाध्यक्ष श्री. सतीश दळवी अन् त्यांच्या पत्नी सौ. करुणा दळवी यांच्या हस्ते पू. (कु.) स्वाती खाडये आणि अन्य वक्ते यांचा विशेष स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. श्री. सतीश दळवी हे गेली ३ वर्षे हिंदु धर्मासाठी अविरतपणे सेवारत असणार्‍या धर्माभिमान्यांचा उत्साह वाढवण्यासाठी असा विशेष सन्मान करत आहेत. या धर्मसभेला १ सहस्र धर्माभिमानी आणि हिंदुत्ववादी उपस्थित होते.

चुनाभट्टी येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त हिंदुत्ववाद्यांनी ग्रामदेवतेचे आशीर्वाद घेतले !

ग्रामदेवतेचे दर्शन घेतांना हिंदुत्ववादी
    मुंबई - चुनाभट्टी येथे १७ जानेवारी या दिवशी होणारी हिंदु धर्मजागृती सभा निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी येथील हिंदुत्ववाद्यांनी ग्रामदेवता श्री मुक्ताईदेवीचा आशीर्वाद घेतला. या वेळी चुनाभट्टी सुधार समितीचे सर्वश्री नवीन सुर्वे, प्रीतम माने आणि प्रशांत शिंदे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. पवन तांडेल, श्री. सुमित सागवेकर, सनातन संस्थेच्या सौ. सुहासिनी परब, सौ. वसुधा गावंड आणि श्रीमती योगिता सावंत यावेळी उपस्थित होत्या.
    हिंदु धर्मजागृती सभेची प्रथम नियोजन बैठक ३ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता श्री ज्ञानेश्‍वर माऊली मंदिर, टाटा नगर, चुनाभट्टी येथे होणार आहे. सर्व हिंदुत्ववाद्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मद्याची अनधिकृत दुकाने बंद करा ! - चंद्रकांत वारघडे, माहिती अधिकार कार्यकर्ते

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ?
श्री. चंद्रकांत वारघडे
वाघोली (जि. पुणे) - वाघोली परिसरात असणारी मद्याची अनधिकृत दुकाने बंद करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य माहिती सेवा समितीचे अध्यक्ष आणि माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्री. चंद्रकांत वारघडे यांनी ग्रामपंचायतीकडे पत्राद्वारे केली. या परिसरात मद्याची अनके अनधिकृत दुकाने असून ग्रामपंचायतीने त्यांना ना हरकत प्रमाणपत्र किंवा संमती दिली नसल्याचेही माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. मद्याच्या दुकानांची जागा गावठाणात असल्याविषयीचा खोटा दाखला तत्कालीन ग्रामसेवकाने दिल्याने गावात अशी अनेक मद्याची अवैध दुकाने बिनबोभाट चालू आहेत. ही दुकाने बंद करण्यात यावी, अशी मागणी वारघडे यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे करूनही उत्पादन शुल्क विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे, तसेच वरील ग्रामसेवकावर कारवाईही झाली होती; परंतु नंतर मात्र प्रशासनाने या दुकानांवर कारवाई केली नाही, असे श्री. वारघडे यांचे म्हणणे आहे.

दोन मासांत श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा पूर्ण करण्याचा प्रयत्न ! - आमदार राजेश क्षीरसागर

     कोल्हापूर, २ जानेवारी (वार्ता.) - सत्तेतील सहकारी पक्ष म्हणून कोल्हापूर शहराचा विकास करण्याचे शिवसेनेचे दायित्व वाढले आहे. श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यता, रंकाळा प्रदूषण प्रश्‍न, पंचगंगा प्रदूषण प्रश्‍न, कोटीतीर्थ तलाव स्वच्छता, पंचगंगा घाट सुशोभीकरण, छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक यांची पूर्तता करणे तसेच गरजूंना आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी एकही रुपया न घेता साहाय्य करण्याचा संकल्प येथील शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, सत्तेतला पक्ष म्हणून शिवसेनेचे दायित्व वाढले असून मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या माध्यमातून येत्या २ मासांत श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शहराच्या विकासासाठी जे जे काही करता येईल, ते करण्याचा प्रयत्न आहे.

२०१६ मध्ये राज्यातील शेतकर्‍यांना १६ घंटे वीज उपलब्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न

मुंबई - शेतकर्‍यांना नववर्षाची भेट म्हणून १६ घंटे वीज उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जा विभाग प्रयत्न करीत आहे. सध्या राज्यात यासाठी आठ घंटेच विजेचे नियोजन असून ते दुपटीने वाढणार आहे. यासाठी अपारंपरिक विजेवर हे नियोजन करण्यात येत आहे. हे लक्ष्य पूर्ण केल्यास महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. येत्या काळात पाच लक्ष कृषी पंप बसवण्याचा राज्यशासनाचा मानस आहे. विदर्भ, मराठवाडा येथे प्रायोगिक तत्त्वावर १० सहस्र सौर कृषीपंपाची योजना राज्यशासनाकडून राबवली जात आहे. पण आगामी काळात सौर कृषी पंपाच्या वाढत्या किमती लक्षात घेता सौर पॅनेल फीडरवरच बसवण्याचा प्रकल्प विचाराधीन आहे. त्यामुळे शेतकर्‍याला स्वस्त आणि हरित ऊर्जा मिळेल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

बेळगाव येथे कूपनलिकेतून आगीच्या ज्वाला !

बेळगाव, २ जानेवारी (वार्ता.) - बेळगावातील एका शेतात पाण्यासाठी काढण्यात आलेल्या कूपनलिकेतून चक्क आगीच्या ज्वाला बाहेर येऊ लागल्याने उपस्थितांना आश्‍चर्याचा धक्का बसला. घटनास्थळी उपस्थित झालेले भूगर्भ अधिकार्‍यांनी हा प्रकार पाहिल्यावर त्यांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. 
सारेगावातील श्री. भिमाप्पा गोलभावी यांच्या शेतात हा विचित्र प्रकार घडला आहे. भिमाप्पांच्या शेतातील कूपनलिका गेल्या काही दिवसांपासून बंद होती. थंडीचा कडाका वाढल्यामुळे काही शेतकरी कूपनलिकेशेजारी शेकोटी करून बसले होते. त्या वेळी अचानक कूपनलिकेतून आगीच्या ज्वाला बाहेर येताना दिसल्या. त्यावर काही जणांनी ज्वारीची कणसे आणि भातही शिजवून पाहिला. त्यानंतर पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय आणि भूगर्भ विभागाला याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी उपस्थित झालेले भूगर्भ विभागाचे अधिकारी कूपनलिकेची पाहणी करीत आहेत. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण लवकरच समोर येईल. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली आहे.

फलक प्रसिद्धीकरता

पाकला धडा शिकवण्यासाठी आम्ही आणखी किती सैनिकांचे प्राण जाऊ देणार आहोत ? 
पाकच्या जिहादी आतंकवाद्यांनी पठाणकोट (पंजाब) येथील सैन्याच्या हवाई तळावर २ जानेवारीला आक्रमण केले. या आक्रमणात ५ आतंकवादी ठार झाले असून ३ सैनिकांना वीरमरण आले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Panjab ke Pathankot ke vayudal kendrapar atanki akraman, 5 atanki mare gaye aur 3 sainik hutatma huye. - kya ab bhi ham pakse mitrata rakhenge ?

जागो : पंजाब के पठानकोट के वायुदल केंद्र पर आतंकी आक्रमण, ५ आतंकी मारे गए और ३ सैनिक हुतात्मा हुए. - क्या अब भी हम पाकसे मित्रता रखेंगे ?

काँग्रेस नेते शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा भूमी घोटाळा उघड !

भ्रष्टाचारात आकंठ बुडालेली काँग्रेस ! जनतेला लुटणार्‍या अशा भ्रष्टाचार्‍यांवर मोदी शासनाने कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! 
 मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी वांद्रे येथील शासनाचा एक लाख चौरस फुटांचा प्लॉट विकासकाला देतांना गैरव्यवहार केल्याची तक्रार भाकपचे सचिव भालचंद्र कांगो यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. त्यावर ६ जानेवारीला सुनावणी होणार आहे. 
१. वर्ष १९८२ मध्ये राज्यशासनाने ही भूमी शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या मराठा मित्र मंडळ या संस्थेला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर एक रुपया प्रतीचौरस मीटर भाड्याने दिली होती. मराठवाड्यातून मुंबईत येणार्‍या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि रहाण्याची सोय व्हावी, या हेतूने हा करार झाला होता. २. त्यानुसार या जागेपैकी १५ टक्के जागेवर व्यावसायिक बांधकाम करण्याची अनुमती संस्थेच्या न्यासाला होती; परंतु पाटील-निलंगेकर यांनी एका खाजगी विकासकाशी केलेल्या करारात जवळपास ६२ टक्के जागा व्यावसायिक बांधकामासाठी देण्यात आल्याचे उघड झाले आहे. 
३. त्यासाठी विकासकाने या संस्थेच्या न्यासाला १७ कोटी रुपये देऊ केले आहेत. या प्लॉटवर ४ लाख चौरस फुटांचे बांधकाम होऊ शकते. या मालमत्तेचे मूल्य साधारण १ सहस्र कोटी रुपयांच्या आसपास आहे. 
४. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी हे आरोप अपकीर्तीच्या हेतूने केल्याचे आणि स्वत: नियमाचा भंग केला नसल्याचे सांगून फेटाळून लावले आहेत.
एम्.आय.एम्.ची नगरपालिका निवडणुकांमध्ये सक्षमतेने उतरण्याची सिद्धता

धर्मांध एम्.आय.एम्.चा धोका ओळखा !
    संभाजीनगर - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एम्.आय.एम्.) पक्षाने विधानसभा आणि महापालिका निवडणुकांनंतर आता राज्यात नगरपालिका अन् नगरपंचायत यांच्या निवडणुकांसाठी पक्ष बांधणीला आरंभ केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
    एम्.आय.एम्.ने नांदेड महापालिका निवडणुकीत ११, तर संभाजीनगर महापालिका निवडणुकीत २५ जागा जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत दोन जागा जिंकून राज्याच्या राजकारणात प्रवेश केला आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचे तेलंगण, आंध्रप्रदेश यानंतर सर्वाधिक लक्ष महाराष्ट्राकडे आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाची समिती सिद्ध केली आहे. मुसलमान आणि दलितबहुल असलेल्या नगरपालिकांकडे पक्षाने लक्ष दिले आहे.
व्हाळशी (तालुका डिचोली, गोवा) येथील महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६१ टक्के पातळीची चि. गार्गी पुष्पराज पराडकर हिचा आज मार्गशीर्ष कृष्ण पक्ष नवमीला पहिला वाढदिवस आहे.

चि. गार्गी पराडकर हिला सनातन परिवाराकडून शुभ आशीर्वाद !

चि. गार्गी हिची तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये उद्याच्या अंकात प्रसिद्ध करत आहोत.

वर्चस्वाच्या लढ्याची जुनीच गोष्ट : संसद आणि सर्वोच्च न्यायालय !

अधिवक्ता
श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर
      अभिनेता सलमान खान यांच्या निर्दोषत्वाने समाज ढवळून निघाला. साधारण तशीच वेदना मालेगाव २००८ च्या पीडितांविषयीही आहे. शिवाय न्यायप्रणालीवर नियंत्रण ठेवू पहाणार्‍या केंद्रशासनाच्या कायद्यावरूनही बरीच चर्चा आणि वादंग निर्माण झालेच आहेत. न्याययंत्रणा स्वत:ची स्वायत्तता ठेवू पहाते, तर विधीमंडळाला त्यावर नियंत्रण हवे आहे. न्याययंत्रणेवर विधीमंडळाचे असे येणारे नियंत्रण खरेतर धोकादायकच आहे; परंतु न्याययंत्रणा वाटते तितकी पारदर्शक आणि स्वच्छ आहे, असे खुद्द न्यायालयांचे किंवा निवृत्त न्यायमूर्तींचेही (अगदी सर्वोच्च न्यायालयाचेसुद्धा) म्हणणे नाही. याविषयीचे काही जुने संदर्भ घेऊन केलेला हा ऊहापोह म्हणजे खरेतर एक तेच ते आणि तेच ते अशी जुनीच चर्चा आहे. आतापर्यंत या विषयावर लिटरवार शाई वापरून लिहिलेली सहस्रो पाने रद्दीतही गेली आहेत; परंतु कारभार आपला तोच तो आणि तोच तो चालू आहे, तरीही काही संदर्भ कळावेत; म्हणून ही तीच ती चर्चा ! वाचकांना कळावे; म्हणून ती साध्या भाषेत लिहिली आहे. संविधानाचे कलम आणि अन्य गोष्टी लेख रटाळ करणार्‍या ठरतील; म्हणून वेगळ्या ठेवल्या आहेत. या नाटकातील पात्रांची नावे लक्षात ठेवणे जरा कठीण वाटेल; परंतु ती लक्ष ठेवून वाचल्यास त्यातली रंगत कळेल.

आपला जो प्रांत नाही, त्या संदर्भात अधिकारवाणीने बोलू नये, एवढेही सामान्यज्ञान नसलेली मोठी (?) मंडळी !

     पिंपरी-चिंचवड येथे होणार्‍या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी आकुर्डी येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या पाकिस्तान भेटीवर टीका केली. यापूर्वी संमेलनाध्यक्षपद भूषवलेल्यांनीही अशा प्रकारची अनेक अभ्यासशून्य विधाने केली आहेत. यावरून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाला जोडून कोणत्याही क्षेत्रात वाट्टेल ती विधाने करण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे, अशी भावना विनामूल्य मिळते कि काय, अशी शंका येते; कारण आजवरचा इतिहास पाहिला, तर संमेलनाध्यक्षांची वक्तव्ये मराठी भाषा, साहित्य संवर्धनाविषयीची अल्प आणि साहित्येतर क्षेत्राशी संबंधितच अधिक असतात, हे लक्षात येते. त्यामुळे आपला जो प्रांत नाही म्हणजेच ज्या क्षेत्रातील आपल्याला ज्ञान नाही, त्या क्षेत्राशी संबंधित कोणतेही वक्तव्य अधिकारवाणीने करण्याचा आपल्याला अधिकार नाही, हे सामान्यज्ञानाचे धडे आता स्वतःला सर्वज्ञानी (?) समजणार्‍यांना देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)चे प्रसारकार्य

१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा
१ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या 
१ आ. संकेतस्थळाला मिळालेले मानांकन
१ आ १. गूगलने दिलेले मानांकन (टीप १) (ऑक्टोबर २०१५ नुसार) :
टीप १ : प्रत्येक संकेतस्थळाला गूगल १ ते १० यांपैकी क्रमांक देते. जेवढा क्रमांक जास्त, तेवढे मानांकन (पेज रँक) चांगले.
१ आ २. अलेक्सा क्रमांक (टीप २) (३१.१०.२०१५ नुसार) : ६३,४२८
टीप २ : एखाद्या संकेतस्थळाचे अलेक्सा मानांकन जितके अल्प, तेवढे ते संकेतस्थळ अधिक लोकप्रिय समजले जाते. अलेक्सा मानांकन १ लक्षहून अल्प असणे, हे संकेतस्थळ अधिक प्रमाणात लोकप्रिय असल्याचे दर्शक असते. 

३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करणार ! - चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री

    जळगाव - संपूर्ण राज्य खड्डेमुक्त करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे. राज्यभरात वर्षानुवर्षे प्रलंबित पूल आणि रस्त्यांच्या कामासाठी ४ सहस्र कोटींच्या निधीचा प्रस्ताव असून याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला १०० कोटी रुपये देण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मदर तेरेसा यांच्या संतपदाला पाठिंबा देणार्‍या अंनिसची निर्मिती विदेशी शक्तींनी केली का ?

     एरव्ही चमत्कारांना कडाडून विरोध करणार्‍या आणि चमत्कार ही गोष्टच अस्तित्वात नाही, असे मानणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिसने) मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याविषयी मात्र चमत्कारिक आणि अंधश्रद्धाळू भूमिका घेतली आहे, 
- श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

सनातन धर्माचा भगवा विश्‍वात फडकवण्यासाठी संघटित व्हा !

     राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीने यासाठी आतापर्यंत १ सहस्रहून अधिक हिंदु धर्मजागृती सभांचे यशस्वी नियोजन केले. सनातन धर्माचा भगवा विश्‍वात फडकवण्यासाठी संघटित व्हावे आणि धर्मावरील आक्रमणे रोखण्यासाठी सज्ज व्हावे. ज्यांची धर्मावर श्रद्धाच नाही, अशांनी आम्हाला धर्म शिकवू नये.- पू. (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्थाहे शासनाला स्वत:ला का कळतनाही ? आंधळं दळतय् आणि कुत्रं पीठ खातय् अशी प्रशासनाची स्थिती आहे !

या भ्रष्टाचारासाठी उत्तरदायींना जनताद्रोह म्हणून आजन्म कारागृहात टाका ! 
     महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक राज्य जल आराखडा न करताच करण्यात आलेल्या १८९ सिंचन प्रकल्पांमधील अनेक प्रकल्पांमध्ये गंभीर अनियमितता असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वर्ष २००७ ते २०१३ या कालावधीतील ५ सहस्र ६०० कोटी रुपयांच्या निधी वितरणातील गैरव्यवहाराची राज्यशासनाने चौकशी करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे न्या. रवींद्र बोर्डे आणि न्या. ए.आय.एस्. चिमा यांनी दिला आहे.

चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने ८ वर्षांनंतर अहवाल सादर करणे, ही दंगलीत होरपळलेल्या हिंदूंची थट्टा आहे !

     वर्ष २००७ मध्ये ओडिशाच्या कंधमल जिल्ह्यात झालेल्या धार्मिक दंगलीच्या मागे ख्रिस्त्यांकडून स्थानिक हिंदूंचे मोठ्या प्रमाणात केले जाणारे धर्मांतर हेच मुख्य कारण होते, असे कंधमल दंगलीची चौकशी करणार्‍या एक सदस्यीय आयोगाचे प्रमुख ओडिशा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बसुदेव पाणिग्रही यांनी येथे पत्रकारांना सांगितले. या दंगलीची चौकशी करण्यासाठी २९ डिसेंबर २००७ या दिवशी पाणिग्रही आयोगाची स्थापना करण्यात आली होती. न्यायमूर्ती पाणिग्रही यांनी याविषयीचा ५६० पानी चौकशी अहवाल ओडिशा शासनाला नुकताच सादर केला.

देशाने माझ्यासाठी काही करण्यापेक्षा मी देशासाठी काय करू शकतो ? असा विचार करा !

     राज्यकर्त्यांची केवळ नावे पालटतात; परंतु परिस्थिती पालटत नाही. त्यांना शिव्याशाप देऊन वेळ घालवण्यापेक्षा आपण काय करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. मी आणि माझे यामध्येच आपण गुरफटत आहोत. यामुळे देश ही संकल्पना लोप पावत आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी बंदूक हातात घेऊन नक्षलवादी होणे किंवा सकारात्मक पालटासाठी प्रयत्न करणे, हे दोनच पर्याय आहेत. - अभिनेते नाना पाटेकर

आसाममध्ये चाँद-तारे, तर अरुणाचल प्रदेशात फक्त तारे

     अरुणाचल प्रदेशात प्रवेश घेतल्यानंतर आपण एखाद्या ख्रिस्ती देशात आलो आहोत कि काय, अशी स्थिती पहावयास मिळते. ख्रिसमसला २० दिवस असतांनाही प्रत्येक घरावर रोषणाई आणि चमकणारे तार्‍यांचे कंदील लटकत होते. गल्लोगल्ली असलेले चर्च तर अगदी उजळून निघाले होते. हीच स्थिती मेघालयातील शिलाँग येथे गेलो असतांना पहायला मिळाली होती. त्यात अगदी उघडपणे रस्त्यावर विकले जाणारे गोमांस पाहून मळमळल्यासारखे होत होते. अरुणाचल प्रदेशातील एका हिंदु धर्माभिमान्याने सांगितले, आसाममध्ये सगळीकडे चाँद-तारे वाढत आहेत; तर आमच्याकडे फक्त तारे वाढत आहेत ! - श्री. रमेश शिंदे, राष्ट्र्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती. महाराष्ट्रातील थोर साहित्यिकांच्या परंपरांचा अवमान केल्याने श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाध्यपदाचे त्यागपत्र द्यावे ! - केदार खाडिलकर, भाजप प्रसिद्धीप्रमुख

    सांगली, २ जानेवारी (वार्ता.) - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्यांचे संमेलनाध्यक्ष यांची परंपरा महान आहे. स्वा. सावरकर, प्र.के. अत्रे यांच्यापासून अनेक दिग्गजांनी हे अध्यक्षपद भूषवले आहे; मात्र देशाच्या पंतप्रधानांचा एकेरी भाषेत उल्लेख करून पिंपरी येथे होणार्‍या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या परंपरांचा अवमान केल्याने त्यांनी त्यागपत्र द्यावे. सबनीस यांच्यासारखी व्यक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी रहाणे योग्य नाही. हेच श्रीपाल सबनीस यांचे पुरागामित्व आहे का ? हीच त्यांची सहिष्णुता आहे का ? केवळ प्रसिद्धीसाठी हपापलेल्या सबनीस यांची ही स्टंटबाजी आहे. अशाप्रकारे देशाच्या पंतप्रधानांचा अवमान करणार्‍या श्रीपाल सबनीस यांच्यावर शासनानेच कठोर कारवाई करावी, असे मत भाजपचे प्रसिद्धीप्रमुख केदार खाडिलकर यांनी व्यक्त केले आहे.

जगभरात हिंदूंना कुणीच वाली नाही !

     पाकिस्तानात प्रतिदिन हिंदु मुलींचे अपहरण केले, तरी त्यांचे वृत्त येत नाही. धर्मांतर वा अत्याचार करून किंवा हिंदूंच्या मंदिरांची नासधूस केली, तरी ती वृत्त येत नाही, तसेच या घटना कोणत्याही वाहिन्या प्रसारित करत नाहीत. काही हिंदु संघटना सोडल्या, तर याच्या विरोधात डावे पक्ष वा अन्य कुणी ब्रही काढत नाहीत. तसेच राजकीय पक्ष याचा निषेधही करत नाहीत. जाऊ दे, सोडून देऊया !
     अन्य धर्मियांच्या वाढत्या संख्येमुळे देशातील धर्मनिहाय लोकसंख्येत असंतुलन निर्माण होत आहे. यामुळे देशाची एकता, एकात्मता आणि सांस्कृतिक ओळख यांना धोका निर्माण झाला आहे. 
- केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह
      सनातन आणि हिंदु जनजागृती समिती तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज बनवण्याचे कार्य करत आहेत ! - आमदार श्री. टी. राजासिंह, भाजप, भाग्यनगर (हैद्राबाद)
    धर्महानीच्या घटनांच्या वेळीच हिंदुत्ववाद्यांना त्याविरोधात लढण्याचा भावनात्मक आवेग येतो. तसे न होता दैनंदिन जीवनात आपण धर्म आचरणात आणला पाहिजे. धर्महानी रोखण्यासाठी आपण निरंतर कार्यरत असायला हवे. - पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती     सारे विश्‍व आय.एस्.आय.एस्.चा आतंकतवाद अनुभवत आहे आणि भारतदेश पुरोगाम्यांचा वैचारिक आतंकवाद अनुभवत आहे ! कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे हे वैचारिक आतंकवादीच होते. - पू. नंदकुमार जाधव, सनातन संस्था वेतनावर हक्क; पण उत्तरदायित्व नसलेले खासदार !

निर्लज्जस्तु सदासुखी ! म्हणजे निर्लज्ज माणूस नेहमी सुखी असतो, ही म्हण सार्थ करणारे खासदार !
      खासदार काम करत नाहीत, मतदारांना दिलेली आश्‍वासने पूर्ण करत नाहीत, राज्यातील लोक सुखी नाहीत, देश आणि राज्य यांची अधोगती चालू आहे. पूर्वीचे राजे प्रत्येक नागरिक जेवल्यावर स्वत: जेवत होते, तर आजचे खासदार जनतेच्या टाळूवरीलही लोणी खाणारे आहेत. असे असूनही या खासदारांचे वेतन २ लाख ८० सहस्र रुपये होणार आहे.

५ वर्षांच्या नोकरीनंतर कोणाला निवृत्तीवेतन मिळत नाही, मग खासदारांनाच का ?

     संसदेतील सर्व खासदारांच्या वेतनवाढीच्या नव्या प्रस्तावानुसार ५ वर्षांहून अधिक काळ खासदार राहिलेल्या सदस्यांना मिळणार्‍या निवृत्तीवेतनाच्या रकमेत वाढ करण्याचा विचार आहे.

देवळात प्रवेश नसतांना विठ्ठलाचे भक्त संत चोखामेळा अमर झाले !

     संत चोखामेळा १३ व्या शतकात होते. त्या वेळी त्यांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता. ते मागासवर्गीय असल्याने त्या वेळी श्री विठ्ठल मंदिर त्यांच्यासाठी खुले नव्हते. त्यासाठी संत चोखामेळा यांनी आंदोलन केले नाही; मात्र विठ्ठल भक्तीत त्यांचे नाव अमर राहिले. संत चोखामेळा यांनी एका अभंगात उंबरठ्याशी कैसे शिवू । आम्ही जातीहीन ॥ असे म्हटले आहे; म्हणून लोकांनी त्यांना डावलले नाही, तर त्यांचा अग्निसंस्कार संत नामदेव यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरासमोर केला. आजही संत चोखामेळा यांची समाधी श्री विठ्ठल मंदिरासमोर आहे. - समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

अब्दुल वाजिद शेखचा आय.एस्.आय.एस्.शी संबंध नाही !

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
कथित कारणांवरून निरपराध हिंदूंना अनेक वर्षे कारागृहात अडकवून ठेवणारे पोलीस 
आतंकवादी बनू पहाणार्‍या धर्मांधांना मात्र निर्दोष ठरवून त्वरित सोडतात !
आतंकवादविरोधी पथकाची माहिती
    आतंकवादविरोधी पथकाने पुणे येथून कह्यात घेतलेल्या मुंबईच्या मालाड-मालवणी येथील अब्दुल वाजीद शेख याचा इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (आय.एस्.आय.एस्.) या आतंकवादी संघटनेशी कोणताही संबंध नाही. त्याचबरोबर तो आय.एस्.आय.एस्.च्या संपर्कात आला नसून त्याला त्याच्या घरी आई-वडिलांकडे सोपवण्यात आले आहे, अशी माहिती आतंकवादविरोधी पथकाच्या पुणे विभागाचे साहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी दिली.

आता आमदार, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत येथील लोकप्रतिनिधींनी पगारवाढ मागितल्यास आश्‍चर्य वाटायला नको !

     संसदेतील सर्व खासदारांच्या वेतनात भरमसाठ वाढ होण्याची शक्यता आहे. या वेतनवाढीच्या नव्या प्रस्तावानुसार प्रत्येक खासदाराचे एका मासाचे वेतन २ लाख ८० सहस्र रुपये इतके असेल. याशिवाय त्यांना निवृत्तीवेतनाचाही लाभ मिळणार आहे. 

महर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी श्रीमद्भागवतामध्ये सांगितलेली कलियुगाची भयानक लक्षणे !

येथे सांगितलेली कलियुगातील स्थिती पालटण्याचा एकच मार्ग आहे आणि तो 
म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! सनातन संस्था यासाठीच प्रयत्नरत आहे.
धनिकांना समाजात अधिक मान मिळणार असणे आणि धर्म अन् न्याय 
यांच्या संदर्भातही त्यांचीच शक्ती प्रभावी ठरणार असणे
                                       वित्तमेव कलौ नॄणां जन्माचारगुणोदयः ।
                                       धर्मन्यायव्यवस्थायां कारणं बलमेव हि ॥
                                                         - श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय २, श्‍लोक २
अर्थ : कलियुगामध्ये ज्याच्याकडे धन-संपत्ती असेल, त्यालाच लोक कुलीन, सदाचारी आणि सद्गुणी मानतील. धर्म आणि न्याय यांच्याबाबतीत शक्ती प्रभावी ठरेल.

लव्ह जिहादची दाहकता स्पष्ट करणारी काही उपरोधिक वाक्ये !

    लव्ह जिहादची दाहकता ज्ञात असूनही अनेक हिंदु मुली वेड्यासारख्या धर्मांधांसमवेत पळून गेल्याच्या आणि नंतर धर्मांतरित झाल्याच्या वार्ता मोठ्या प्रमाणात वाचनात येतात. त्या वेळी मनात आलेली चीड काही उपरोधिक वाक्यांमधून व्यक्त झाली. या अनुषंगाने या मुलींसाठी धर्मांतर करण्याचे लाभच लाभ पुढे देत आहे ! १. नखशिखांत पोशाख घातल्याने कांतीचा रंग उजळेल. (याला वैद्यकीय भाषेत पंडुता, म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता म्हणतात.)
२. शासन अतिशय प्रसन्न होईल आणि इतरही हिंदुद्वेष्ट्या समाजसेवी संघटना तोंड फाटेपर्यंत कौतुक करतील

महर्षींनी डिसेंबर २०१५ आणि जानेवारी २०१६ च्या कालावधीत घडणार्‍या संभाव्य नैसर्गिक आपत्तींविषयी आणि इतर घटनांविषयी भाकीत करणे अन् त्या संदर्भात प.पू. डॉक्टरांना मिळणार्‍या दैवी साक्षीविषयीही सांगणे

टीप - महर्षींनी सांगितल्याप्रमाणे ९.१२.२०१५ या दिवशी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास इंडोनेशिया येथे भूकंप झाला.
     वरील घटनांच्या क्रमावरून असे लक्षात येते की, दिवसेंदिवस आपत्कालाची भीषणता वाढणारच आहे. महर्षी वेळोवेळी आपल्याला पूर्वसूचना देतीलच; परंतु सूचना मिळेपर्यंत गप्प न बसता, सर्वांनीच तीव्र साधना करण्याकडेच लक्ष द्यावे; कारण ही संकटांची मालिका आता चालूच रहाणार आहे.

उरण (रायगड) येथे आज हिंदु धर्मजागृती सभा !

    निधर्मीपणाच्या नावाखाली भारतात अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन होत आहे, तर बहुसंख्यांक हिंदूंवर अन्याय केला जात आहे. धर्मांतर, गोहत्या, हिंदुविरोधी कायदे, लव्ह जिहाद, हिंदु संतांची अपकीर्ती, देवतांची विटंबना, आतंकवाद, दंगली यांसारख्या समस्या वाढत चालल्या आहे. या सर्व समस्यांविषयी जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे.
स्थळ : श्री हनुमान मंदिरासमोर, वशेणी, उरण
वेळ : सायंकाळी ६
भ्रमणभाष क्रमांक : ९१६७७६६१३०
हिंदूंनो, या सभेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा !

प.पू. डॉक्टरांवरील अकाल मृत्यूयोगाचे संकट आणि महर्षी अन् संत यांचे त्यावरील सुतोवाच !

परात्पर गुरु डॉ. आठवले
१. महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना ग्रहमंडलात प.पू. डॉक्टरांच्या अकाल मृत्यूयोगाचे चक्र निर्माण झाले असल्याचे सांगणे आणि यावर उपाय करण्यासाठी तिरुवण्णामलई येथे येण्याचा आदेश देणे      २५.१२.२०१५ या दिवशी महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना पहाटे ३.३० वाजता उठवले आणि सांगितले, अवकाशातील ग्रहमंडलात प.पू. डॉक्टरांच्या अकाल मृत्यूयोगाचे चक्र निर्माण झाले आहे. यावर आपल्याला त्वरित उपाय योजायला हवा. १.१.२०१६ या दिवशी तू कार्तिकपुत्रीला ((पू.) सौ. अंजली गाडगीळ यांना) बंगळुरूला बोलावून घे. दुसर्‍या दिवशी आपल्याला अग्नीक्षेत्राला, म्हणजेच तिरुवण्णामलईला जायचे आहे.

हिंदुत्ववादी संघटनांनो, धर्मशास्त्राचे नियम लक्षात ठेवून त्यांचे काटेकोर पालन केल्यास हिंदूंमध्ये धर्माविषयी आदर निर्माण होईल, हे लक्षात घ्या !

श्री. अभय वर्तक
    एका ठिकाणी एका हिंदुत्ववादी संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आरंभ वेदमंत्रपठणाने झाला. हे वेदमंत्रपठण महिलांनी केले.
    वेदांमध्ये अप्रकट शक्ती असते आणि या शक्तीचा स्त्रियांना त्रास होऊ शकतो. या कारणास्तव स्त्रियांनी वेद मंत्रपठण करू नये, असे धर्मशास्त्र सांगते. असे असतांना हिंदु संघटनांनी धर्मशास्त्राचे नियम लक्षात ठेवून त्यांचे काटेकोर पालन केल्यास त्यांना अनुभूती येतील आणि हिंदूंमध्ये धर्माविषयी आदर निर्माण होईल, तसेच लोक धर्माचरणास प्रवृत्त होतील. - श्री. अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

अग्नीशमन प्रशिक्षण

सनातनची ग्रंथमालिका : भावी
 आपत्काळातील संजीवनी
आगींपासून रक्षण करण्याविषयी 
प्रायोगिक मार्गदर्शन करणारा सनातनचा ग्रंथ
     एका छोट्याशा ठिणगीपासून उद्भवलेल्या आगीचा शेवट हा छोटाच असतो, असे नाही, या आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. केवळ या म्हणीवरून आगीची दाहकता, संहारकता किंवा तिचे भीषण परिणाम यांतील गांभीर्य लक्षात येत नाही; तर आगीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्यांनाच त्याची कल्पना असते.

साधकाने साधक म्हणून कुटुंबात कसे रहावे ?


     साधना करणारी प्रत्येक व्यक्ती ही तिच्या कुटुुंबातील एक प्रमुख घटकही असतेेच. तो घटक म्हणून वावरतांना साधकाची वर्तणूक साधकत्वाची असणे अपेक्षित आहे. साधक म्हणवणारी व्यक्ती अन्य साधकांसमवेत साधक म्हणून वागतेे; पण कुटुुंबात मात्र साधकत्व विसरते. असेे वागणे तिच्या साधनेला घातक आहे. साधकाने साधक म्हणून कुटुंबात कसे रहावे ?, या संदर्भात काही सूत्रे देवाने सुचवली. ती पुढीलप्रमाणे आहेत.
१. सर्व कुटुंब एकाच संस्थेत साधनेत असणे
१ अ. कृतज्ञताभावात रहाणे : कुटुंबातील सर्वांनी एकाच संस्थेच्या छायाछत्राखाली साधनेत येणे, ही केवळ ईश्‍वराची कृपा आहे, याची सतत जाणीव ठेवावी आणि कृतज्ञताभावात रहावे.

वाचकांना विनंती

सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून 
कारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा !
     मागील १ मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव ! या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील. यासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.
पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.
ई-मेल : dspgoa1@gmail.com
फॅक्स : (०८३२) २३१८१०८

सनातनची ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करा !

सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ
 आता SanatanShop.com वरही उपलब्ध !
विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३ १५३१७

अग्नीशमन प्रशिक्षण : आपत्काळात संजीवनी ठरणारा सनातनचा ग्रंथ

 • आग लागण्याची कारणे
 • आग लागल्यावर करायचे उपाय
 • आग विझवण्याच्या पद्धती
 • स्टोव्हचा भडका उडाल्यावर करावयाचे उपाय
 • आगीने घेरल्यास किंवा स्वत:ला आग लागल्यास करायच्या कृती

सनातनच्या सनातन डॉट ऑर्ग (Sanatan.org) या संकेतस्थळाच्या प्रसारकार्याचा नोव्हेंबर २०१५ मधील आढावा

 १. सनातन डॉट ऑर्ग या संकेतस्थळाची नोव्हेंबर २०१५ मधील वाचकसंख्या
टीप
अ. संकेतस्थळाची वाचकसंख्या गूगल अ‍ॅनॅलिटिक्स या ऑनलाईन संगणकीय प्रणालीतून मिळते.
आ. वर देण्यात आलेली सनातन डॉट ऑर्ग या संकेतस्थळाची वाचकसंख्या ही तीनही भाषांतील संकेतस्थळांंची एकत्र करून घेतली आहे.

हिंदुत्ववादी संघटनांनो, अशाने हिंदुसंघटन साध्य होईल का ?

    एका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यक्रमात सनातन संस्थेला निमंत्रित केले होते. तेथील कार्यकर्त्यांना संस्थेचे प्रवक्ते थेट कार्यक्रमाला आल्याने थोडी अस्वस्थता आल्याचे जाणवले. कार्यक्रम चांगला पार पडला. त्यांनी संस्थेला ५ मिनिटे बोलावयासही दिले. सनातनचा कार्यक्रमातील सहभाग मात्र काहींना खटकतोय, हे जाणवत होते.
- श्री. अभय वर्तक, देवद, पनवेल.

घरातील लाकडी कपाटातील अन्य सर्व धार्मिक ग्रंथांना वाळवी लागणे; मात्र सनातनच्या एकाही ग्रंथाला वाळवी लागलेली नसल्याने त्यांतील चैतन्याचे महत्त्व लक्षात येणे

     २९.१०.२०१३ या दिवशी आमच्या संभाजीनगर येथील घरातील लाकडी फर्निचरला वाळवी लागली असल्याचे लक्षात आले. प्रत्यक्षात फर्निचर करून ७ ते ८ मासच (महिनेच) झाले होते, तरी त्याला मोठ्या प्रमाणावर वाळवी लागली. त्यातील कपाटात सर्व प्रकारचे धार्मिक ग्रंथ ठेवण्यात आले होते. त्यामध्ये सनातन संस्थेचेही काही ग्रंथ ठेवले होते. ते कपाट स्वच्छ करत असतांना लक्षात आले की, अन्य सर्व धार्मिक ग्रंथ टाकून द्यावे लागणार आहेत; कारण सर्वांच्या कागदांवरसुद्धा वाळवी पसरली होती; परंतु सनातनच्या एकाही ग्रंथाची हानी झाली नव्हती कि त्याला वाळवी लागली नव्हती. सनातनच्या ग्रंथातील चैतन्यामुळे त्याला वाळवी लागली नाही, असे तीव्रतेने जाणवले. आमच्या घरात, तसेच घरातील सर्वांनाच तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. घरात धार्मिक ग्रंथ असावेत. त्याने घराचे रक्षण होते, असे पूर्वीचे लोक म्हणायचे. सनातनच्या ग्रंथाच्या संदर्भात चैतन्याची अनुभूती घेतल्यावर या वाक्याची प्रचीती आली, तसेच आपल्या पूर्वजांनी वास्तूत चैतन्य टिकून रहावे, याचाही किती बारकाईने विचार केला होता, याचीही साक्ष पटली. - आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.११.२०१५)

मडगाव स्फोटप्रकरणी कारागृहातून निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव वाचून आलेले अभिप्राय

१. सनातनच्या साधकांचे अग्नीदिव्य !
    सत्याची चाड, अन्यायाविषयीची भयंकर चीड, रामराज्याची प्रबळ महत्त्वाकांक्षा आणि सद्गुरूंवरील अतूट श्रद्धा असल्यानेच सनातनचे साधक हे अग्नीदिव्य पार करू शकले.
२. समाजात बोकाळलेली स्वार्थी वृत्ती
२ अ. घराघरांतून केवळ स्वार्थाचाच विचार करायला शिकवले जाणे : आज समाजात सर्वत्र केवळ स्वार्थी आणि कातडी बचाव वृत्ती बोकाळली आहे. आई-वडिलांनाही आपल्या मुलाने सत्याच्या वाटेने जावे, असे वाटत नाही. ते शिकवतात, थोडीफार तडजोड कर. नको त्या फंदात पडू नकोस. आपण बरे आणि आपले आयुष्य बरे. असेच आयुष्य जग.

हिंदु धर्मजागृती सभेच्या विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती .
धर्मनिरपेक्ष लोकशाही नव्हे, तर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र हाच हिंदूंच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवरील एकमेव उपाय आहे. या संदर्भात हिंदूंमध्ये व्यापक जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये धर्मजागृती सभांचे आयोजन केले जात आहे.
सभेच्या माध्यमातून खालील धर्मसेवांमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी सर्वत्रचे वाचक, हितचिंतक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना लाभणार आहे.
१. हिंदु धर्मजागृती सभेसाठी स्वतःचे अथवा परिचितांचे सभागृह किंवा मैदान उपलब्ध करून देणे
२. सभेच्या प्रसारासाठी स्वतःची अथवा परिचितांची बस किंवा चारचाकी वाहन उपलब्ध करून देणे
३. प्रतिदिन, आठवड्यातून काही घंटे, दिवस अथवा सलग काही दिवस सभेच्या प्रसारासाठी स्वतः वेळ देणे
४. बैठकीसाठी स्वतःचे अथवा परिचितांचे सभागृह अथवा तत्सम जागा उपलब्ध करून देणे

ईश्‍वराच्या अत्युच्च प्रीतीची अनुभूती घेऊन कृतकृत्य झालेल्या सौ. श्‍वेता क्लार्क !

सौ. श्‍वेता क्लार्क
     २९ डिसेेंबर २०१५ ते ५ जानेवारी २०१६ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होत असलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने...
१. हिंदु धर्माविषयी अत्यंत कट्टर असणे आणि हिंदु 
धर्मातच देवापर्यंत घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे, असे वाटणे
     माझा जन्म एका हिंदु कुटुंबात झाला आणि मी हिंदु धर्माविषयी अत्यंत कट्टर होते. हिंदु धर्मात जन्माला आल्याबद्दल मला आतून चांगले आणि ईश्‍वराप्रती कृतज्ञता वाटत असे. हिंदु असल्यामुळे मला सुरक्षित वाटत असे. या धर्मातच मला ईश्‍वरापर्यंत घेऊन जाण्याचे सामर्थ्य असून हिंदु धर्मच चिरंतन आणि सनातन, म्हणजे नित्य नूतन आहे, मला वाटत होते.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

तीर्थयात्रा
पंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा आपल्याला परत येण्याची इच्छा होते; म्हणून म्हणतात, इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।
भावार्थ : 'इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।' म्हणजे पंढरपूरला जाणार, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही; कारण तेथे गेल्यावर परत घरी यायची इच्छा होते. तसेच परमेश्‍वराच्या भेटीपेक्षा भेट होणार यात जास्त आनंद आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान


म्हणे सर्वधर्मसमभाव !

परात्पर गुरु डॉ. आठवले
बालवाडीतील मुलगा आणि पदव्युत्तर शिक्षण झालेला तरुण यांचे शिक्षण सारखेच आहे, असे आपण म्हणत नाही. तशीच स्थिती इतर तथाकथित धर्म आणि हिंदु धर्म यांच्यात असतांना सर्वधर्मसमभावाचा घोष करणे, यासारखे दुसरे अज्ञान नाही. ही गोष्ट विविध धर्मांचा अभ्यास केल्यास कोणाच्याही लक्षात येईल; पण अभ्यास नसल्याने प्रकाश आणि अंधार समान आहेत, असे म्हणणार्‍या आंधळ्यासारखे सर्वधर्मसमभावी झाले आहेत.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावर दृढ श्रद्धा ठेवा 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      परमेश्‍वरावरील दृढ श्रद्धा कोणत्याही संकटाशी सामना करण्याचे बळ देते. परमेश्‍वराने कितीही परीक्षा घेतली, तरी श्रद्धा स्थिर असावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

सुसंस्कृत कि असंस्कृत ?

संपादकीय 
     येत्या १५ जानेवारीला पुणे येथे मराठी साहित्य संमेलन भरत आहे. हा प्रतिवर्षाचा मराठी साहित्याविषयीचा कार्यक्रम असून तो मराठी भाषाप्रेमी आणि मराठी साहित्यप्रेमी यांच्यासाठी पर्वणीच असतो. स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी काही राजकारण्यांचा होत असलेला संमेलनाच्या व्यासपिठावरील वावर सोडला, तर सर्वकाही मराठी भाषेच्या चैतन्याचा आविष्कार करणारे असते. साहित्य म्हटले म्हणजे तेथे सुसंस्कृतपणा आला. सर्वांचे हित साधते ते साहित्य. येथे समाजाला पोषक विचारांचे आदान-प्रदान होते. त्यातून सुदृढ समाज निर्माण होण्याची प्रक्रिया चालू होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn