Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांंचे मानधन ऑनलाईन पद्धतीने देणार ! - महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे

विधान सभेतील प्रश्‍नोत्तरे...
     नागपूर - राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना त्यांचे मानधन देण्यास विलंब होऊ नये, यासाठी त्यांचे आधारकार्ड लिंक करून ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल. मूर्तिजापूर (जिल्हा अकोला) येथील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन देण्यास विलंब करणार्‍या लिपिकास निलंबित करण्यात आले आहे. अधिक चौकशीत तो दोषी आढळल्यास त्यास बडतर्फ करू, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री सौ. पंकजा मुंडे यांनी १६ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली. हा प्रश्‍न सदस्य श्री. गोवर्धन शर्मा यांनी विचारला होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn