Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

समष्टी सेवा करणारी सून आणि मुलगा यांना सेवेचा वेळ घरगुती गोष्टींसाठी द्यावा लागू नये, यासाठी कधीही बाहेरगावी न जाता सेवाभावाने घरी राहून साधना करणारी एक आदर्श साधक-गृहिणी !

    ‘बाहेर जाऊन सेवा करता येत नाही; म्हणून खंत वाटणार्‍या सर्वांसमोर या साधक-गृहिणीने एक आदर्श ठेवला आहे.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     ‘घरातील काही वैयक्तिक अडचणींमुळे मी गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून घरी राहून सेवा करते. घरची कामे आणि सेवा यांमुळे मी केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच बाहेरगावी जाते. माझा मुलगा आणि सून हेही पूर्णवेळ सेवा करतात. त्यामुळे आमचे काही नातेवाईक आणि परिचित यांना वाटते, ‘मलाच कुठे बाहेरगावी जायला आवडत नाही. मला बाहेर पडण्याचा कंटाळा आहे. मी घरातील मायेत पुष्कळ अडकले आहे. त्यामुळे मला घर सोडवत नाही.’ त्यामुळे ते सर्व जण मला नेहमी त्यांच्या घरी रहाण्यास बोलावतात. काही जण म्हणतात, ‘‘चार दिवस तू आमच्याकडे ये. घरातील सर्व सून सांभाळेल.’’
     प्रत्यक्षात सुनेवर घरातील सर्व दायित्व सोपवून जाण्यास मला काहीच अडचण नाही. ४ दिवस बाहेरगावी गेल्यास सर्वांनाच पालट जाणवतो; पण मला त्यासंदर्भात वाटते, ‘मी ४ दिवसांसाठी बाहेरगावी गेल्यास मुलगा आणि सून यांना त्यांचा समष्टी सेवेतील वेळ घरातील कामे करण्यासाठी द्यावा लागेल. त्यामुळे त्यांच्या सेवा प्रलंबित रहातील आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना वेगळा वेळ द्यावा लागेल. सध्या आपत्काळ चालू असल्याने प्रत्येक क्षणाचा वापर साधनेसाठी होणे आवश्यक आहे. असे असतांना माझ्या जाण्यामुळे त्या दोघांचा समष्टी सेवेतील अमूल्य वेळ वाया जाईल. यात माझ्याही साधनेची विनाकारण हानी होईल. तसेच अन्य ठिकाणी जाऊन आनंद मिळवण्यापेक्षा घरात राहून साधनेच्या प्रयत्नांतून, तसेच घरातील कामे सेवाभाव ठेवून केल्यास बाहेरगावी जाऊनही मिळणार नाही, इतका आनंद मिळतो.’ अशी विचारप्रक्रिया होत असल्याने मला घर सोडून कुठेही फिरायला जाणे किंवा विनाकारण कुणा नातेवाइकाकडे जाणे अनावश्यक वाटते.’ - एक साधिका
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn