Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

समीर गायकवाड यांच्यावरील आरोप निश्‍चितीची पुढील सुनावणी १९ डिसेंबरला !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण ! 
     कोल्हापूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावर कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आरोप निश्‍चित करण्याच्या विषयीची पुढील सुनावणी १९ डिसेंबरला होईल. येथील जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणाची सुनावणी चालू आहे. श्री. समीर गायकवाड यांच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन हे उपस्थित होते. आरोप निश्‍चिती प्रकरणात अद्याप उच्च न्यायालयात स्थगिती असून तेथील सुनावणी १५ डिसेंबर या दिवशी होण्याची शक्यता आहे.
श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या जामिनासाठी प्रयत्न करणार ! 
- अधिवक्ता समीर पटवर्धन
     या संदर्भात पत्रकारांना अधिक माहिती देतांना अधिवक्ता समीर पटवर्धन म्हणाले, ९ डिसेंबर या दिवशी याच प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना न्यायालयात उपस्थित करणार आहेत. यापुढे त्यांचा खटला जिल्हा न्यायालयाकडे वर्ग होईल, तसेच आरोप स्थगितीची सुनावणी उच्च न्यायालयात १५ डिसेंबरला झाल्यास दोन्ही गोष्टींचा विचार करून श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे या दोघांच्याही जामिनासाठी परत एकदा अर्ज दाखल करण्याचा विचार आम्ही करत आहोत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn