Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

धुळे जिल्ह्यातील भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर !

राज्यात पुरातत्व विभाग सक्षमपणे कार्यरत नसल्याचे उदाहरण ! 
छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्गरूपी अनमोल ठेवा जपण्यासाठी शासन काही करेल का ?
     धुळे, १७ डिसेंबर - येथील शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावातील भुईकोट किल्ल्याची स्थिती बिकट झाली असून ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेला हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आला आहे. 
  • किल्ल्यामध्ये संरक्षण तटबंदी, पुरातन विहिरी, कारंजी, हौद आणि धान्य साठवणीचे रांजण असे अवशेष पहायला मिळतात. 
  • थाळनेर गावातील काही नागरिकांनी हा किल्ला अक्षरशः पोखरून काढला आहे. अनेक लोकांनी किल्ल्यातील मोठमोठे दगड, माती आणि विटा हे बांधकामासाठी घेऊन जात आहेत. त्यामुळे या किल्ल्याचे हनन मोठ्या प्रमाणावर होत आहे. किल्ल्याचे बुरूज ढासळले असून भींतीही पडल्या आहेत.
  • इतिहासतज्ञ डॉ. टी.टी. महाजन यांनी सांगितले की, भुईकोट किल्ल्याची बांधणी शासनाने केली पाहिजे, तरच त्याला पुनर्वैभव प्राप्त होईल.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn