Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची तलवार तुटलेल्या स्थितीत !

पुरातत्व खात्याचा संतापजनक आणि हलगर्जी कारभार ! ऐतिहासिक
स्मारकांचे जतन करू न शकणारे पुरातत्व खाते विसर्जित करा !
     पोलादपूर - किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तलवार १० डिसेंबर या दिवशी तुटलेल्या स्थितीत आढळून आली आहे. या प्रकरणाची पोलिसांच्या एका पथकाने पाहणी केल्यावर महाड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. त्या पाहणीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरील तलवारीची म्यान तुटलेल्या स्थितीत आढळली आहे. (रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुरेसे संरक्षण नसल्याने विभागाच्या कारभाराविषयीच प्रश्‍नचिन्ह निर्माण होते ! - संपादक)
शिवप्रेमीमुळे चोरी उघड !
     किल्ले रायगडावर होळीचा माळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित, तर दरबार सभागृहातील मेघडंबरीमध्ये बैठक असलेला पुतळा आहे. १० डिसेंबर या दिवशी एक शिवप्रेमी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीतील पुतळ्याची पूजा करण्यास गेला होता. त्या वेळी त्याला पुतळ्याच्या मांडीवर असलेली तलवार मोडलेल्या स्थितीत दिसून आली. (याचा अर्थ शिवप्रेमीच्या हे निदर्शनास आले नसते, तर पुरातत्व खात्याचे हे लक्षात आले नसते ! - संपादक)
रायगडावर वारंवार अशा घटना घडूनही पुरातत्व खाते सुस्त !
१. यापूर्वीही ९ ऑगस्ट २००९ या दिवशी एका अज्ञात व्यक्तीने राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याची समाधीस्थळावरून चोरी केली होती. नंतर त्या ठिकाणी नवीन पुतळा बसवण्यात आला.
२. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळील वाघ्या कुत्र्याची समाधीही तोडण्यात आली होती. (अशा घटना वारंवार घडत असतांना पुरातत्व विभाग आणि शासनकर्ते यांनी ते रोखण्यासाठी काय केले ? ऐतिहासिक वास्तूंविषयी संवेदनशीलता अल्प पडत असल्यामुळेच अशा घटना घडत आहेत ? - संपादक) तुटलेली म्यान दुरुस्तीसाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आली आहे. या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, असे कारण देत पोलिसांनी रायगड येथे पोेचलेल्या शिवप्रेमींना गडावर जाऊ न देता खालीच थांबवून ठेवले आहे. (प्रशासनाने केलेल्या घोडचुकांची शिक्षा शिवप्रेमींना का भोगावी ? छत्रपतींविषयी असलेल्या जनभावना लक्षात घेऊन शासन-प्रशासनाने रायगडाच्या संवर्धनासाठी आधीच पावले का उचलली नाहीत ? - संपादक)
   या पुतळ्याचे कोल्हापूर येथील शिल्पकार सतीश घारगे यांनी सांगितले की, ही तलवार तांब्याच्या धातूची बनवली असून ती अधिक काळ टिकावी, या हेतूने त्यात पुरेसा धातू वापरला होता. त्यामुळे ती तलवार निखळण्याची शक्यता न्यून असून तिच्यावर बळाचा अधिक वापर केल्यानेच तुटलेली आहे. (तलवार चोरून छत्रपतीद्रोह करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! - संपादक)
कोल्हापूर येथे शिवप्रेमींकडून ३ घंटे रस्ता बंद आंदोलन !
     या घटनेमुळे १० डिसेंबर या दिवशी शहरातील शिवप्रेमींतून संतप्त पडसाद उमटले. येथील शिवाजी पुतळा परिसरात शिवप्रेमींनी रात्री ९ वाजल्यानंतर ३ घंटे रस्ता बंद आंदोलन केले. प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी रायगडावरील छत्रपतींच्या पुतळ्याला संरक्षण पुरवण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर रात्री पावणेबाराच्या सुमारास शिवप्रेमींनी आंदोलन मागे घेतले. रायगडावरील घटनेची माहिती सामाजिक संकेतस्थळाद्वारे सायंकाळनंतर वार्‍यासारखी सर्वत्र पसरली. तसेच शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेने धाव घेतली. शिवपुतळ्याची विटंबना करणार्‍यांना तातडीने अटक करा, अशी मागणी करण्यात आली. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह अन्य पुतळ्यांच्या ठिकाणी विद्युत् व्यवस्था करण्यासमवेत तेथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn