Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

खोटा इतिहास शिकवणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.च्या अभ्यासक्रमात पालट करण्याची मागणी !

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांना सनातन संस्थेकडून निवेदन
     नवी देहली - भारतीय संस्कृतीविषयी खोटा आणि अवमानकारक इतिहास शिकवणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.च्या ७ वी, १० वी आणि १२ वी इयत्तांच्या अभ्यासक्रमात पालट करण्याच्या मागणीचे निवेदन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांना सनातन संस्थेकडून देण्यात आले. सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी या अभ्यासक्रमातील चुका श्री. जावडेकर यांच्या लक्षात आणून देऊन त्याविषयी त्वरित निर्णय घेण्याची विनंती केली. यावर भाष्य करतांना श्री. जावडेकर म्हणाले, हा विषय आमच्या विचाराधीन आहे. आम्ही लवकरच यावर निर्णय घेऊ. या वेळी सनातन पंचांग २०१७ त्यांना भेट देण्यात आले.
इयत्ता १२ वीच्या पुस्तकातील चुका
१. इयत्ता १२ वीच्या भारतीय इतिहासातील मूलभूत संकल्पना (थीम्स अ‍ॅाफ इंडियन हिस्ट्री) या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ५८ वरील परिच्छेदात म्हटले आहे की, या साहित्यातील ब्राह्मण लेखक असा दावा करत आहेत की, त्यांचा दृष्टीकोन पूर्ण विश्‍वातील सर्वांना मान्य आहे, त्यांची आज्ञा सर्वत्र मानली जावी, असा त्यांचा आग्रह असायचा. (अभ्यासक्रमात जातीवाचक उल्लेख करून समाजात फूट पाडणारी एन्.सी.ई.आर्.टी. ! जात्यंध काँग्रेसी राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यानंतर समाज एकसंघ राखण्याऐवजी अशा प्रकारे फूट पाडण्याचीच कारस्थाने अधिक केली. प्रत्यक्षात ब्राह्मण लेखकांनी अजूनपर्यंत असा दावा कधीच केलेला नाही. - संपादक) २. पृष्ठ क्रमांक ६१ वर व्यक्तीचा स्तर (वर्ण) त्याच्या जन्मानुसार निश्‍चित केला जात होता, असे लिहिले आहे. (प्रत्यक्षात हिंदु संस्कृतीमध्ये व्यक्तीचा वर्ण त्याच्या जन्मानुसार नाही, तर कर्मानुसार निश्‍चित केला जातो. - संपादक)
इयत्ता ७ वी आणि १० वीच्या पुस्तकांतील चुकीचा भाग
     इयत्ता ७ वीच्या आमचा भूतकाळ-२ या इतिहासाच्या पुस्तकातील १५४ पानांंपैकी अधिकाधिक पाने भारतावर आक्रमण करणार्‍या क्रूर आणि आक्रमणकारी मोगल बादशहांची माहिती देण्यासाठी खर्ची घातली आहेत; पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांशी लढून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यांचा इतिहास केवळ ६ ओळींमध्ये दिला गेला आहे. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांना नगण्य स्थान देऊन अपमान केला गेला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रही छापलेले नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn