Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) ‘देशात आणीबाणी आणणार्‍या मोदी आणि अमित शहा यांचा शिरच्छेद केल्यास योग्य बक्षीस दिले जाईल !’

उत्तरप्रदेश राज्यात समाजवादी पक्षाची सत्ता असतांना हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांना करावे 
लागलेले पलायन, सातत्याने होणार्‍या दंगली आदींसाठी तरुणदेव यादव कोणाला शिक्षा देणार आहेत ?
समाजवादी पक्षाचे नेते तरुणदेव यादव यांची घोषणा
     नवी देहली - नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य माणूस होरपळत आहे, मजुरांना त्यांचे वेतन मिळत नाही. तुम्ही तुमच्या आजोबांच्या वयाच्या व्यक्तीला घंटोन्घंटे बँकेच्या रांगेत उभे राहिलेले पाहिले, तर तुम्हीदेखील मोदी यांना शाप द्याल. ही एकप्रकारची आणीबाणी नाही का ?, हे सरकार सत्तेवरून गेलेच पाहिजे. त्यामुळे जो कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा शिरच्छेद करेल, त्याला मी योग्य बक्षीस देईन, अशी घोषणा समाजवादी पक्षाच्या बागपत येथील युवक संघटनेचे माजी अध्यक्ष तरुणदेव यादव यांनी केली आहे. याविषयी समाजवादी पक्षाने यादव यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
     समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी या मासाच्या आरंभीच उत्तर प्रदेशमध्ये पक्षाच्या जिल्हा स्तरावरील सर्व संघटना विसर्जित केल्या होत्या; मात्र तरीही तरुणदेव यादव यांनी ही घोषणा करण्यासाठी लिहिलेल्या पत्रात स्वत:चा उल्लेख युवजन सभेचा अध्यक्ष म्हणून केला आहे. तसेच सामाजिक माध्यमांमध्ये (‘सोशल मीडिया’मध्ये) तरुणदेव यादव यांची एक चित्रफीतही सध्या प्रसारित होत आहे. यामध्ये यादव यांनी ‘नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बागपत येथे सभा घेऊन दाखवावीच’, असे आव्हान दिले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn