Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हुपरी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून ५७ लक्ष ८३ सहस्र रुपयांचा निधी वसूल करणार ! - राज्यमंत्री भुसे

      नागपूर - कोल्हापूूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी ग्रामपंचायतमध्ये १९९९-२००० ते २०११-२०१२ या कालावधीतील लेखापरीक्षणानुसार १ कोटी ६६ लक्ष ६ सहस्र ३०५ रुपयांचा निधी आक्षेपार्ह आढळून आला आहे. त्यापैकी संबंधित सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी यांच्याकडून १ कोटी ८ लक्ष २३ सहस्र १२ रुपये इतका निधी वसूल केला आहे. उर्वरित ५७ लक्ष ८३ सहस्र २९३ रुपये इतका निधी वसूल करण्यात येईल. त्यासाठी तत्कालीन ९ सरपंच, ७६ ग्रामपंचायत सदस्य आणि १९ ग्रामविकास अधिकारी यांना ऑक्टोबर २०१६ मध्ये नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. भविष्यात असे प्रकार न होण्यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जाईल, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी ९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत प्रश्‍नोत्तरात दिली.
     इचलकरंजी येथील आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला होता. या वेळी इतर आमदारांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा आणण्याची मागणी केली; मात्र ही मागणी श्री. दादाजी भुसे यांनी फेटाळून लावली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn