Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प.पू. पांडे महाराज यांनी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांच्यासाठी सांगितलेले उपाय !

प.पू. पांडे महाराज
१. दर्भाने दृष्ट काढणे आणि दर्भ पोटाला बांधून मंत्र म्हणणे
    ‘२४.१०.२०१६ या दिवशी प.पू. पांडे महाराजांनी पहिला उपाय सांगितला. दर्भाने दृष्ट काढल्याप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत त्यांनी दिलेला मंत्र म्हणून फिरवण्यास सांगितले होते; पण तो उपाय करता आला नाही. दुसरा उपाय दर्भ पोटाला बांधून मंत्र म्हणण्यास सांगितले होते; परंतु हा उपाय रुग्णालयात असल्याने करता आला नाही. 
२. छायाचित्रासमोर तिळाचा दिवा अखंड लावून ठेवणे
    प.पू. पांडे महाराजांनी सेवाकेंद्रात माझे छायाचित्र ठेवून त्या समोर अखंड
तिळाचा दिवा लावून ठेवण्यास सांगितला होता. तसे २४.१०.२०१६ ते १०.११.२०१६
कु. दीपाली मतकर
पर्यंत, म्हणजे रामनाथीला जाईपर्यंत दिवा लावून ठेवला होता.
३. मंत्र म्हणणे
    वेदना वाढायच्या, त्या वेळी ते भ्रमणभाषवरून मंत्र म्हणायचे. त्या मंत्रांमुळे मला शक्ती मिळायची. प्रतिदिन दिवसभरातून बर्‍याचदा भ्रमणभाष करून त्रासांचा ते आढावा घ्यायचे आणि होत असलेल्या त्रासांवर ते मंत्र म्हणायचे. 
४. ‘त्रास होत आहे का ?’, असे साधकांना 
विचारण्यास सांगणे आणि आधीच उपाय चालू करणे
     त्रासामुळे रात्री झोप लागायची नाही. रात्र झाल्यावर ‘त्रास वाढणार. पुन्हा त्या जीवघेण्या वेदना होणार; म्हणून ‘नको’ वाटायचे.’ त्या वेळी महर्षींनी दिलेला मंत्र कृष्णाच्या प्रतिमेच्या बाजूला लावला होता. तो मी रात्रभर वाचत होते. तेव्हा प.पू. बाबांनी भ्रमणभाष करून ‘काही त्रास होत आहे का ?’ तसे साधकांना विचारण्यास सांगितले. साधकांनी विचारल्यावर होणार्‍या त्रासांविषयी मी सांगितले. तेव्हा कळले, ‘प.पू. बाबांनी हा त्रास होऊ नये, यासाठी आधीच उपाय चालू केले आहेत.’ काही वेळा साधकांकडून त्यांनी सांगितलेला उपाय करायचा राहिला अथवा होणार्‍या त्रासांविषयी काही सांगायचे राहिले, तर प.पू. बाबा त्याविषयीच विचारायचे. तेच स्वतःहून भ्रमणभाष करून साधकांकडून आढावा घ्यायचे.
५. तुळशीपत्र आणि पेल्यात पाणी घेऊन कु. दीपालीचे छायाचित्र आसंदीत ठेवून प्रार्थना 
करून प्रदक्षिणा घालण्यास सांगणे अन् ते पाणी छायाचित्रावर शिंपडून नंतर ते पिण्यास देणे
     ५ पाने असलेले तुळशीपत्र आणि पेल्यात पाणी घेऊन माझे छायाचित्र आसंदीत ठेवून प्रार्थना करून त्याला ७ वेळा प्रदक्षिणा घालायला सांगितल्या. (रुग्णालयात असेपर्यंत हे उपाय माझ्या बाबांनी आणि भावाने केले. कोल्हापूरला त्रास होऊ लागल्यावर श्री. वेसणेकरकाकांनी केले.) त्यानंतर ते पाणी तुळशीपत्राने छायाचित्रावर शिंपडायला सांगितले. असे दिवसातून ३ वेळा करून ते पाणी मला पिण्यासाठी देण्यास सांगितले. त्याप्रमाणे उपाय केले. ते पाणी प्यायल्यावर मला हलके वाटायचे. ते पाणी उपायांचे तीर्थ आहे, हे मला ठाऊक नव्हते. नंतर त्याविषयी कळल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली. 
६. ‘गुरूंची कृपा आहे; म्हणून तुला बरे वाटले’, असे प.पू. पांडे महाराजांनी सांगणे
     ५.११.२०१६ या दिवशी प.पू. पांडे महाराजांना भ्रमणभाष करून मला बरे वाटत असल्याचे सांगितल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी सांगितले, ‘‘तुझ्यावर गुरूंची कृपा आहेे; म्हणून तुला बरे वाटले.’’ 
७. त्रास होत असतांना प.पू. पांडे महाराज यांचा भ्रमणभाष येणे आणि त्यांनी मंत्र म्हटल्यावर त्रास 
उणावणे अन् रामनाथी आश्रमात आल्यावर प.पू. पांडे महाराज यांनी व्यवस्थित पोचल्याचे विचारणे
     दुसर्‍या दिवशी मला पूर्ण थकवा होता. त्यामुळे माझ्या हालचालींचे प्रमाण अल्प झाले होते. श्‍वास घेण्यासही त्रास होत होता. मी मिरज आश्रमातील ध्यानमंदिरात बसले होते. पुन्हा पुष्कळ धाप लागू लागली. त्याच वेळी प.पू. पांडे महाराजांचा भ्रमणभाष आला आणि म्हणाले, ‘‘प्राणशक्ती वाढण्यासाठी मंत्र म्हणतो.’’ त्यांनी मंत्र म्हटल्यावर पुन्हा श्‍वास घेता येऊ लागला. मी त्यांना ‘त्रास होतो’, असे सांगितले नव्हते. त्यांनी स्वतःहून भ्रमणभाष करून मंत्र म्हटला. रामनाथीला आल्यावर प.पू. पांडे महाराजांनी विचारले, ‘‘व्यवस्थित पोचलीस का ?, काही त्रास होत नाही ना ?’’ तेव्हा ‘संतांची प्रीती कशी आहे ?, ते आपल्यासाठी किती करतात ?’, हे अनुभवायला मिळाले. गुरुमाऊली मला अखंड त्यांच्या कृपेच्या छत्रछायेखाली ठेवत होती, हे अनुभवण्यास येऊन कृतज्ञता वाटत होती.’
- कु. दीपाली मतकर, सोलापूर
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn