Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनावर शोक प्रस्ताव सादर करून विधानसभा आणि विधान परिषदेचे दिवसभराचे कामकाज स्थगित !

      नागपूर, ६ डिसेंबर (वार्ता.) - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे ५ डिसेंबरला निधन झाल्याने केंद्र शासनाने ६ डिसेंबरला राष्ट्रीय दुखवटा घोषित केला. या पार्श्‍वभूमीवर ६ डिसेंबर या दिवशी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत जयललिता यांना आदरांजली वाहण्यात आली. शोक प्रस्तावानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. (दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यापेक्षा कामकाम चालू ठेवून राज्याच्या हिताचे निर्णय घेतले असते, तर ती खरी श्रद्धांजली ठरली असती ! - संपादक)
      विधानसभेमध्ये मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी जयललिता यांचे निधन झाल्याचा शोकप्रस्ताव सभागृहात मांडला. त्यानंतर विरोधी पक्षातील काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदींनी शोक प्रस्तावावर आपले विचार व्यक्त केले. बागडे यांनी दुखवटा पाळण्यासाठी दिवसभर विधानसभेचे कामकाज स्थगित केले. विधान परिषदेत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शोकप्रस्ताव सादर केला. त्यावर विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांनी जयललिता यांच्याविषयीचे विचार मांडून आदरांजली वाहिली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn