Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

२ सहस्र रुपयांच्या नवीन नोटेची एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

मायावी शक्ती 
१. मायावी शक्तीच्या चक्राकार लहरी नोटेत निर्माण होऊन त्या वातावरणात प्रक्षेपित होणे : त्यामुळे नवीन नोट चांगली असल्याचे लोकांना भासत असून तिच्याविषयी त्यांच्या मनात संभ्रमही आहे.
त्रासदायक शक्ती
२. त्रासदायक शक्तीच्या लहरी ठिणग्यांच्या स्वरूपात प्रक्षेपित होणे : त्यामुळे नोट हाताळणार्‍या व्यक्तींना प्रचंड दाब जाणवण्याची शक्यता आहे.
२ अ. त्रासदायक शक्तीचे कण नोटेतून कार्यरत स्वरूपात वातावरणात प्रक्षेपित होणे 
मारक वाईट शक्ती 
पू. (सौ.) योया वाले
३. मारक वाईट शक्तीचे कण नोटेतून कार्यरत स्वरूपात वातावरणात प्रक्षेपित होणे : परिणामी नोट हातात पकडता क्षणी इतकी उष्णता जाणवते की, व्यक्ती ही नोट हातात पकडू शकत नाही.
इतर सूत्रे
१. लखोट्यात असलेल्या २ सहस्र रुपयाच्या नवीन नोटेचा प्रयोग (हा प्रयोग करतांना लखोट्यात काय आहे, हे मला ठाऊक नव्हते. - (पू.) सौ. योया वाले)
         दोन्ही हातात लखोटा पकडल्यावर मला त्यात प्रचंड उष्णता जाणवली आणि ती माझ्या तळहातातून देहात प्रवाहित होत असल्याचे जाणवले. मला अस्वस्थता जाणवत होती. मला डोक्यावर दाब जाणवून डोके दुखून मळमळू लागले. ‘माझ्यावर उपाय होत आहेत, असे वाटून मला लखोट्यात काहीतरी चांगली वस्तू आहे’, असे वाटले. प्रयोगानंतर मला चांगले वाटल्याने माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे लखोट्यातील वस्तू चांगली आहे कि त्रासदायक याविषयी मला निर्णय घेणे कठीण जात होते. माझ्याभोवती मायावी शक्ती निर्माण झाल्याचे मला जाणवले. लखोट्यात चांगली आणि वाईट शक्ती यांत युद्ध होत असल्याने माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे, असे वाटले. लखोट्यात असलेल्या एका शब्दातून चांगली शक्ती प्रक्षेपित होत असून इतर शब्दांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत होती. त्यामुळेच लखोट्यात युद्ध चालू होते. लखोट्यात तारक आणि मारक अशा दोही प्रकारच्या शक्ती जाणवत होत्या.
         लखोटा उघडल्यावर त्यात २ सहस्र रुपयांची नवीन नोट होती. या नोटेत मायावी स्पंदने असल्यानेच मला माझ्यावर उपाय होत असल्याचे जाणवत होते, असे माझ्या लक्षात आले. नोटेवर असलेल्या भारताच्या (इंडिया) नावातून चांगली तर काही अन्य शब्दांतून त्रासदायक शक्ती प्रक्षेपित होत असल्यानेच नोटेत चांगल्या आणि वाईट शक्तीचे युद्ध होत होते. ‘इंडिया’त सर्वांत अधिक ईश्‍वराचे अस्तित्व असल्याने या नावात अधिक चांगली स्पंदने जाणवतात.
२. प्रयोगातून शिकायला मिळालेले सूत्र
         प्रयोगासाठी लखोटा मला दिल्यावर माझ्या मनात पहिला विचार आला, ‘ही नोट असावी.’ मात्र असे काही नसेल, असा विचार करून मी सूक्ष्मातून परीक्षण करण्यास आरंभ केला. (ही माझी चूक होती. माझ्यातील कर्तेपणा, स्वेच्छा आणि भीती वाटणे, या दोषांमुळे ईश्‍वराकडून मिळालेले ज्ञान लक्षात घेतले नाही. माझ्या मनात आलेला पहिला विचार मला पकडायला हवा होता; कारण पहिला विचार नेहमी ईश्‍वराचा असतो आणि तो योग्यच असतो.
- (पू.) सौ. योया वाले, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय. (१९.११.२०१६)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn