Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भ्रष्ट कारभार दिसल्यास नगरपालिका बरखास्त करणार ! - मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांना अशी चेतावणी द्यावी लागणे, ही लोकशाहीची निरर्थकताच !
     नागपूर - नगरपालिका निवडणुकीत जिंकून आल्यानंतर त्याचा आनंद अवश्य साजरा करा; मात्र नगरपालिकेत भ्रष्टाचार अथवा चुकीची कामे केली, तर तेथील नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्यावर कारवाई होईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ज्या नगरपालिकेत भ्रष्ट कारभार दिसेल, ती बरखास्त केली जाईल. भाजप तिथल्या भ्रष्ट नेतृत्वासोबत संबंध ठेवणार नाही, असेही ते म्हणाले. (देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली, तरी अजूनही भ्रष्ट कारभार करू नका, हे लोकप्रतिनिधींना सांगावे लागते, यांसारखी लज्जास्पद गोष्ट कोणती असेल ? - संपादक)      येथे ९ डिसेंबर या दिवशी नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत जिंकून आलेल्या नगरसेवक अन् नगराध्यक्षांच्या सत्कार समारंभात बोलत होते. श्री. फडणवीस म्हणाले की, जनतेने जुन्यांना हटवून भाजपच्या हातात मोठ्या विश्‍वासाने सत्ता दिली आहे. तोे विश्‍वास कायम ठेवा. हा श्री. नरेंद्र मोदी यांचा पक्ष असून इथे अपकारभार खपवून घेतला जाणार नाही. या सत्कार सोहळ्यात भाजपचे सर्व मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn