Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

स्वतःला पालटण्याची तळमळ आणि देशाभिमान असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळी आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला संभाजीनगर येथील कु. अवधूत गोविंद जोशी (वय ९ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अवधूत जोशी एक दैवी बालक आहे !
कु. अवधूत जोशी
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
    यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर यूट्यूबच्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
१. समंजसपणा
    अवधूत पूर्वी फार हट्टी होता. या वर्षभरात त्याचा हट्टीपणा अल्प झाला असून त्याच्यातील समंजसपणा वाढला आहे. तो त्याच्या लहान बहिणीवरही पुष्कळ प्रेम करतो.
२. इतरांचा विचार करणे
    एकदा माझा दुसरा नातू शेजारी कोणाकडेतरी जाऊन दूरदर्शनवरील कार्यक्रम पहात होता. तो कुठे गेला, ते आम्हाला समजत नव्हते. त्या वेळी अवधूत स्वत: त्याला शोधण्यासाठी वसाहतीत सर्वत्र जाऊन आला.
३. प्रेमभाव 
३ अ. खाऊ इतर भावंडांनाही देणे : अवधूतला आणलेला खाऊ तो त्याच्या भावंडांनाही देतो. तो आई-बाबांचीही काळजी घेतो. आई सर्वांचे करते; परंतु वेळ नाही म्हणून न खाताच नोकरीवर जाते, असे तो मला सांगतो.
- सौ. सुलभा सुरडकर (अवधूतची आजी), संभाजीनगर
३ आ. अवधूत प्रत्येक वेळी माझ्यासमवेत साप्तााहिक सनातन प्रभात वितरण करायला येतो आणि गाडीवरून उतरून तो स्वतः त्याचे वितरण करतो. 
४. स्वतःत पालट करण्याची तळमळ
     एक मासापूर्वी अवधूत मित्रांकडून शिट्टी वाजवायला शिकला. मी त्याला ही सवय चांगली नाही, असे सांगितले. नंतर त्याने एकदा शिट्टी वाजवल्यावर त्याला चूक लक्षात येऊन त्याने स्वतःच्या गालावर थप्पड मारून घेेण्याची शिक्षा घेतली. आता ८ दिवसांपासून त्याचे घरात शिट्टी वाजवणे बंद झाले आहे.
५. देशाभिमान
     अवधूतला भारताविषयी अभिमान आहे. त्याला देशात जे काही अयोग्य घडते, त्याविषयी चीड आहे.
- सौ. रोहिणी गोविंद जोशी (अवधूतची आई)
६. देवाप्रती भाव
    अवधूतला देवाविषयी पुष्कळ प्रेम आहे. ते त्याच्या बोलण्यातून जाणवते. तो नियमितपणे रामरक्षा आणि मारुतीस्तोत्र म्हणतो. तो शाळेत जातांनाही न चुकता कपाळावर नाम लावतो.- सौ. सुलभा सुरडकर
७. अवधूतमध्ये असलेले स्वभावदोष
अ. राग येणे : अवधूतला त्याची चूक २ - ३ वेळा सांगितली की, त्याला राग येतो. त्याला दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहू नकोस, असे म्हटल्यावर पुष्कळ राग येतो. एकदा हिंदु धर्मजागृती सभा असतांना तो बालसंस्कार वर्गाच्या सेवेत होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त आणलेली शेष (शिल्लक) चॉकलेट त्याला न विचारता मी सर्वांना दिली; म्हणून तो अतिशय चिडला. त्या वेळी त्याने घोषणा द्यायची सेवा अर्धवट सोडून दिली. त्याला समजावून सांगूनही तो आला नाही.
आ. तो आळशी आहे.
इ. त्याला एखादी वस्तू हवी असल्यास ती मिळेपर्यंत तो हट्ट करतो.
८. अवधूतला असलेला त्रास
      त्याला भीती वाटते. त्याला कुठेही एकटे जायला भीती वाटते.
- सौ. रोहिणी गोविंद जोशी (८.५.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn