Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प्रेमळ, मनमिळाऊ आणि धार्मिक ग्रंथ वाचण्याची आवड असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली वॉशिंग्टन येथील कु. पूर्वी अरविंद (वय ९ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र 
(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. पूर्वी अरविंद एक दैवी बालक आहे !
कु. पूर्वी अरविंद
     अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे रहाणारी कु. पूर्वी अरविंद हिचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वितीया (१५.१२.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
कु. पूर्वी अरविंद हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. कु. पूर्वीच्या जन्माअगोदर
१ अ. गरोदरपणात आनंद आणि शांती जाणवणे : ‘गरोदरपणाच्या काळात मला सतत उलट्या होत असल्यामुळे मला औषधे चालू होती, तरीही मला आनंदी, शांत आणि सकारात्मक वाटत होते. 
१ आ. सासूबाईंविषयी प्रेम वाटणे : माझ्या गरोदरपणाच्या ८ व्या आणि ९ व्या मासात (महिन्यात) माझे सासू-सासरे आमच्याकडे आले होते. त्या वेळी मला त्यांच्याविषयी पुष्कळ काळजी आणि प्रेम जाणवत होते. 
२. जन्मानंतर 
२ अ. प्रेमळ 
१. कु. पूर्वीचा स्वभावही प्रेमळ आहे. माझ्या टाचांना जराशा भेगा पडलेल्या तिला दिसल्या, तरी ती लगेच त्यांना मलम लावते. मलम लावतांना तिच्या मृदू स्पर्शाने माझा कृतज्ञताभाव जागृत होतो.
२. जुलै २०१६ मध्ये आम्ही बेंगळुरू येथील माझ्या बहिणीकडे गेलो होतो. एकदा तिच्या मुलीचा पाय मुरगळला. त्या वेळी पूर्वीने तिला आधुनिक वैद्यांकडे घेऊन जातांना तिचे केस विंचरून दिले आणि जिना उतरतांना तिचा हात पकडून साहाय्य केले. तिच्यासमवेत पूर्वीही आधुनिक वैद्यांकडे गेली आणि क्ष-किरण (एक्स-रे) काढण्याची प्रक्रिया साध्या भाषेत समजावून सांगून तिने जियाच्या मनातील त्याची भीती काढून टाकली.
३. इतरांची काळजी घेण्याची पूर्वीची ही वृत्ती इतर प्रसंगांतूनही दिसते. तिचा लहान भाऊ कल्याण खेळतांना पडला आणि त्याला लागले, तर ती त्याची प्रेमाने काळजी घेते. ती त्याची जखम धुऊन त्याला मलमपट्टी करते आणि त्याला आराम वाटावा; म्हणून त्याच्या पायाखाली उशी ठेवते. त्याचे मन गुंतवण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन एखादे गोष्टीचे पुस्तक वाचून दाखवते. ‘इतरांच्या दुःखाविषयी असलेली तिची संवेदनाशीलता हा एक दैवी गुणच आहे’, असे मला वाटते. 
२ आ. मनमिळाऊ : पूर्वी इतरांमध्ये पटकन मिसळते. ती सगळ्यांशी बोलते आणि त्यांच्याशी वर्षानुवर्षे ओळख असल्याप्रमाणे पटकन मैत्री करते. 
     पूर्वी साडेचार वर्षांची असतांना आम्ही भारतात आलो होतो. त्या वेळी आम्ही माझ्या मावस सासूबाईंकडे गेलो होतो. मावस सासूबाई आणि पूर्वी यांची भेट अल्पकाळासाठी झाली असली, तरी त्यांच्या घरून निघतांना पूर्वी रडू लागली. त्यांच्याशी जवळीक साधल्याने त्यांच्या घरून निघतांना तिच्या आणि मावस सासूबाईंच्या डोळ्यांत पाणी आले. पूर्वी लहान असतांना आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना अधिक काळापर्यंत रहाण्याचा आग्रह करून पूर्वी रडत असे. त्यामुळे त्यांना निरोप देणे आम्हाला कठीण जात असे. त्या वेळी तिच्यातील ‘प्रीती’ हा गुण आमच्या लक्षात आला नसला, तरी आता तो आम्हाला जाणवतो. 
२ इ. वाचनाची, विशेषतः धार्मिक ग्रंथांची आवड असणे : पूर्वी चार वर्षांची असल्यापासून महाभारतासारखे धार्मिक ग्रंथ वाचत आहे. ती न कंटाळता ते पुनःपुन्हा वाचते. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांनी तिला महाभारतामधील विचारलेल्या प्रश्‍नांना तिने सहजतेने आणि आत्मविश्‍वासाने दिलेली उत्तरे पाहून त्यांना पुष्कळ आश्‍चर्य वाटत असे. ती विविध विषयांचे वाचन करते. तिला काल्पनिकतेपेक्षा वास्तववादी लिखाण वाचायला अधिक आवडते. तिच्यात पुष्कळ जिज्ञासा आहे. आम्ही ग्रंथालयातून वाचायला आणलेले १० ग्रंथ ती केवळ दोन घंट्यांत वाचून संपवते. 
२ ई. लिखाणाची आवड असणे : पूर्वी लहान असल्यापासून लिखाण करतेे. ती ४ वर्षांची असतांना तिला ‘संपूर्ण वाक्य कसे लिहायचे’, हेही ठाऊक नसतांना ती चि. कल्याणच्या जन्म छायाचित्र संग्रहात (बाळाच्या जन्मापासून ते बाळ मोठे होईपर्यंत त्याच्या संदर्भातील सर्व माहिती, उदा. पहिला ड्रेस किंवा बूट इत्यादींविषयी लिहिलेले एक पुस्तक असते. - संकलक) वाक्ये लिहीत असे. ती एका खोलीत बसून लक्षपूर्वक प्रश्‍न वाचून त्या प्रश्‍नांची न घाबरता अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असे. 
२ उ. पूर्वीला इतरांविषयी वाटणारे प्रेम लघुसंदेशाद्वारे व्यक्त करणे
१. पूर्वी तिच्या इतरांविषयीच्या भावना लिखाणाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवते. 
२. ‘बॅडमिन्टन्’ खेळतांना तिच्या वडिलांना झालेल्या अपघातानंतर त्यांच्यावर शस्त्रकर्म करण्यात आले होते. त्या वेळी ती त्यांना लवकर बरे होण्याविषयीचे शुभेच्छापत्र करून पाठवत असे. तिचे वडील कामानिमित्त इतर देशात जात असतांना ती त्यांच्या सामानात विचारपूर्वक लिखाण केलेले शुभेच्छापत्र ठेवते. 
३. ती माझ्यावरचे तिचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि तिच्यासाठी मी जे काही करते त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणारे वेगवेगळे संदेश न कंटाळता लिहिते. ते वाचून मला मुलांसाठी आणि कुटुंबियांसाठी सतत काहीतरी करत रहाण्याची प्रेरणा मिळते. 
२ ऊ. ती श्रीकृष्णाला पत्र लिहून तिच्या साधनेतील उद्दिष्टे सांगते. ते वाचून मलाही साधनेसाठी प्रेरणा मिळते.
२ ए. संगीत आणि भरतनाट्यम् नृत्याची आवड असणे : पूर्वीला कर्नाटक संगीत आणि भरतनाट्यम् हा नृत्याचा प्रकार आवडतोे. ती आमच्या देवघरात देवासमोर देवीच्या भजनांवर भावपूर्ण नृत्य करते. तिला भजने म्हणायला आवडतात. उपजतच तिच्यात कवितांना चाल लावायची कला आहे. 
२ ऐ. नियोजनकौशल्य : प्रवासाच्या वेळी स्वतःला आवश्यक असलेल्या गोष्टींचे नियोजन करून त्यानुसार स्वतःच सामान भरते. तिच्या सामानात पुस्तके, चित्रकलेची वही आणि रंगीत खडू असतात. २ ओ. पूर्वी सतत उत्साही असल्यामुळे तिच्यासमवेत काम करायला इतरांनाही प्रेरणा मिळते.
२ औ. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता 
१. काही वेळा पूर्वी पावसाचे कोणतेही चिन्ह नसतांना ‘पाऊस पडणार’, असे सांगते आणि खरोखरच तेव्हा पाऊस पडतो.
२. एकदा आम्ही सगळेजण जलतरण तलावात (‘स्विमिंग पूल’मध्ये) पोहायला गेलो होतो. त्या वेळी पूर्वीने मला तलावाच्या खोलगट भागात न जाण्याविषयी सांगितले; मात्र माझ्या मनातील पाण्याची भीती घालवण्यासाठी मला खोल पाण्यात जायचे होते. त्यामुळे पूर्वी तिच्या मैत्रिणीसमवेत तलावात खेळत असतांना मी पोहायला साहाय्यभूत ठरणार्‍या ‘बोर्डा’च्या आधारेे खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केल्यावर मला पुष्कळ अडचणी आल्या. त्या वेळी ‘पूर्वी मला आधीच तिथे जाण्यापासून का थांबवत होती ?’ हे माझ्या लक्षात आले. 
३. कु. पूर्वीत असणारे स्वभावदोष 
अ. पूर्वीला कोणत्याही गोष्टीला ‘नाही’ म्हटलेले आवडत नाही. 
आ. तिला हव्या असलेल्या वस्तू ती ‘भावाला हव्या आहेत’, असे दाखवून त्याच्याकडून मिळवते. ती खोटे बोलते. ती पुष्कळ वाद घालते आणि उलट उत्तरे देते.
इ. तिला घरी कोणत्याही खेळात हरायचे नसल्यामुळे ती खेळतांना लबाडी करते. 
ई. तिच्यात मनाप्रमाणे वागण्याचा दोष पुष्कळ असल्याने ती माझे ऐकत नाही. शाळेतून आल्यावर गृहपाठ करण्याऐवजी शुभेच्छापत्र सिद्ध करणे वा शेजारच्या मुलांशी खेळण्यात वेळ वाया घालवते. 
उ. मी तिला हाक मारत असतांना ती ऐकून न ऐकल्यासारखे करते आणि प्रतिसाद देत नाही. 
ऊ. तिला एखादी गोष्ट करायला सांगितली की, ती त्यासंदर्भातील सूचना लक्षात ठेवत नाही. जे करायचे आहे, ते सोडून काहीतरी वेगळेच करते. 
४. कु. पूर्वी करत असलेले साधनेचे प्रयत्न
      कु. पूर्वी शाळेत गेल्यावर दिवसभर गणकयंत्राच्या साहाय्याने दत्ताचा आणि कृष्णाचा जप करते. ती एक-दिवसा-आड मीठ-पाण्याचे उपाय करते. महिन्यातून एकदा ती सत्संगाला उपस्थित रहाते. तिला स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेविषयी ठाऊक असून दोषांच्या मुळाशी जाण्याचा ती प्रयत्न करते. तिला आध्यात्मिक त्रास होत असतांना ती खोके, कापूर आणि उदबत्ती यांचे उपाय अन् न्यास करते.
- सौ. प्रितू अरविंद, अमेरिका (३१.८.२०१६) (कु. पूर्वीची आई)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn