Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक नारायण (नंदू) मुळ्ये यांचे अपघाती निधन

नारायण मुळ्ये
          ‘पनवेल सनातन संस्था’ न्यासाचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त आणि ‘सनातन संस्था रायगड’ न्यासाचे विश्‍वस्त नारायण (नंदू) मुळ्ये (वय ५९ वर्षे) यांचे २२ डिसेंबरच्या रात्री अपघाती निधन झाले. मृत्यूसमयी त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती. त्यांच्यावर २३ डिसेंबरला दुपारी १ वाजता पनवेलमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
          मुळ्ये हे वर्ष १९९३ पासून सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होते, तर वर्ष २००१ पासून देवद येथील आश्रमात पूर्णवेळ सेवा करत होते. त्यांच्या पश्‍चात पनवेल येथे नियमितपणे दैनिक वितरण आणि प्रसारसेवा करणार्‍या त्यांच्या पत्नी अनुराधा मुळ्ये, मुलगा श्री. मयुरेश, सून सौ. वेदिका, नातू चि. अथर्व, मुलगी सौ. प्रज्ञा जोशी, जावई श्री. पुष्कराज जोशी, नात चि. दिव्या जोशी असा परिवार आहे. रत्नागिरी येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अण्णा टिकेकर यांचे नारायण मुळ्ये हे जावई होते. सनातन परिवार मुळ्ये, जोशी आणि टिकेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
मृत्यूच्या क्षणी देवाचे नाव मनात असल्याने 
नंदू मुळ्ये यांनी गाठली ६१ टक्के पातळी ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
          ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थेची स्थापना १९९१ या वर्षी झाली. नंतर २ - ३ वर्षांतच पनवेलला सत्संग चालू झाला. तेव्हा सत्संगाला येणार्‍या जिज्ञासूंपैकी पनवेलचे नंदू मुळ्ये हे एक होते. त्यांनी स्थिरपणे गेली २० वर्षे साधना केली. सेवानिवृत्त झाल्यावर ते पूर्णवेळ साधक झाले. त्यांची पातळी ५९ टक्के होती. लवकरच ते ६० टक्के पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटणार होते. प्रत्यक्षात मृत्यूच्या क्षणीही देवाचे नाव मनात असल्याने ते ६१ टक्के पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटले आहेत. त्यामुळे आता त्यांची पुढील प्रगती वेगाने चालू राहील. त्यांचे कुटुंबीयही साधक आहेत. त्यांची प्रगतीही योग्य तर्‍हेने होत आहे.’
मृत्यूसमयी असह्य वेदना होत असतांनाही
 नंदू मुळ्ये यांचा नामजप चालू असणे
          ‘२२.१२.२०१६ ला रात्री नंदू मुळ्ये यांचा अपघात झाल्यावर लगेचच देवद आश्रमातील साधकांनी मला कळवले. तेव्हा मी साधकांकरवी मुळ्येकाका यांना ‘नामजप चालू आहे ना?’, असे विचारले. तेव्हा मुळ्येकाका यांनी ‘नामजप चालू आहे’, असे सांगितले. मृत्यूसमयी असह्य वेदना होत असतांनाही त्यांचा नामजप चालू होता, तसेच तोंडवळ्यावरही वेदना होत असल्याचे जाणवत नव्हते, असेही साधकांकडून समजले. यावरून मुळ्येकाका यांची साधना चांगली चालू होती आणि त्यांची आध्यात्मिक उन्नतीही जलद होत होती, हे लक्षात आले. मुळ्येकाका यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव होता आणि तो त्यांच्या बोलण्यातूनही वेळोवेळी जाणवत असे.’ 
- (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn