Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

स्वीकारण्याची वृत्ती आणि श्रीकृष्ण अन् संत यांप्रती भाव असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा ठाणे येथील कु. मल्हार अरविंद कौसडीकर (वय ९ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन
धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. मल्हार कौसडीकर एक दैवी बालक आहे !
कु. मल्हार कौसडीकर
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
१. देवाची आवड असणे
    ‘मल्हार नियमितपणे शुभंकरोती, रामरक्षा आणि मारुतीस्तोत्र म्हणतो. तो सतत प्रार्थना करतो आणि कधी देवासमोर बसून नामजपही करतो.
२. स्वीकारण्याची वृत्ती
     मल्हारला त्याची चूक सांगितल्यावर तो लगेच ती स्वीकारतो आणि श्रीकृष्णाच्या चरणी क्षमा मागतो. त्याला झालेल्या चुकीविषयी खंत वाटते.
३. संतांप्रती भाव
     पू. अनुताई (सनातनच्या संत सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) घरी आल्या असतांना त्याला पुष्कळ आनंद झाला.
त्या घरून निघत असतांना मल्हारचा भाव जागृत होऊन त्याला रडू येत होते.
४. श्रीकृष्णाप्रती भाव
     त्याला एखादी हरवलेली वस्तू सापडली किंवा चूक घडण्याआधीच त्याच्या लक्षात आल्यावर हे ‘श्रीकृष्णाच्या कृपेमुळे झाले’, असा त्याचा भाव असतो आणि तो कृतज्ञता व्यक्त करतो.’
- सौ. प्राची कौसडीकर (मल्हारची आई), कोलशेत केंद्र, ठाणे. (१५.५.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn