Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

निष्काम कर्मयोगाचा संस्कार रुजवणारे पुणे येथील गीता धर्म मंडळ

गीता जयंतीच्या निमित्ताने
     धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली तो दिवस म्हणजे गीता जयंती. १० डिसेंबर या दिवशी गीता जयंती साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळकांकडून प्रेरणा घेऊन गीतेत सांगितलेले निष्काम कर्मयोगाचे तत्त्वज्ञान जनमानसात रुजवण्यासाठी लोकमान्यांचे नातू पत्रकारमहर्षी श्री. ग.वि. केतकर आणि प्रज्ञाचक्षू श्री. सदाशिवशास्त्री भिडे यांनी २३ जुलै १९२४ या दिवशी पुण्यातील भिडे वाड्यातील सदाशिवशास्त्री यांच्या घरी गीता धर्म मंडळाची स्थापना केली. गेली ९२ वर्षे अव्याहतपणे गीता धर्म मंडळाचे गीतेतील तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्याचे कार्य चालू आहे. 

     गीता धर्म मंडळाचे प्रमुख ध्येय म्हणजे श्रीमद्भगवद्गीतेत सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाचे तत्त्वज्ञान समाजाला समजावून सांगणे ! या जोडीलाच संतांनी सांगितलेल्या तत्त्वांचा अभ्यास, भगवद्गीता आणि तत्वज्ञान यांवरील संशोधनाला प्रेरणा देणे अशीही मंडळाची अन्य उद्दिष्टे आहेत. मंडळाच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांमधून आलेल्या ९० गीतांचे संकलन आणि मराठी भाषांतर करण्यात आले असून आतापर्यंत ३ खंडातून १७ गीतांचे प्रकाशन करण्यात आले आहे. 
     मंडळाच्या वतीने पुण्यात ९० हून अधिक शाखांमधून विनामूल्य गीता संथा वर्ग चालवले जातात. भगवद्गीता, ज्ञानेश्‍वरी आणि तुकाराम गाथा यांचे अध्ययन होण्यासाठी गीताव्रती, ज्ञानेश्‍वरी-प्रबोध आणि तुकोबाराय गाथा-प्रवेश या परीक्षांचे आयोजन केले जाते. विनामूल्य संस्कार वर्ग, तसेच प्रतिवर्षी गीता प्रचार करणारी शाळा, गीता शिकवणारे शिक्षक, उत्कृष्ट वक्ते यांना अनुक्रमे 'आत्माराम करंडक', 'पार्थसखा पुरस्कार', 'श्री व्यास पुरस्कार' असे पुरस्कार दिले जातात. याशिवाय गीतादर्शन मासिक काढणे, संस्कारवर्ग, संस्कृत संभाषणवर्ग चालवणे, अध्यात्मप्रेमी आणि सत्त्वशील लोकांचे संघटन करणे आदी उपक्रमही सातत्याने राबवले जातात. 'दैनंदिन अखंड ज्ञानसत्रा' अंतर्गत गेली २५ वर्षे विविध विषयांवर तज्ञांची मार्गदर्शन होत आहेत. 
     मंडळाच्या वतीने प्रतीवर्षी गीताजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या महोत्सवाच्या कालावधीत गीता ग्रंथाची शोभायात्रा, संपूर्ण गीतापठण, महायज्ञ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षीही ९ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने सनातन प्रभातच्या वार्ताहराने संस्थेच्या कार्यवाह श्रीमती विनया मेहंदळे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी 'भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले कर्मयोगाचे तत्त्वज्ञान समजून घेऊन राष्ट्रार्थ कार्य करण्यासाठी तरुणांनी सिद्ध व्हावे' असे आवाहन केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn