Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अमृत महोत्सवाच्या प्रसंगी सिंहासनाधिष्ठित परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राविषयी कु. योगिनी आफळे हिला आलेल्या अनुभूती

कु. योगिनी आफळे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (२९.५.२०१६) या दिवशी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या मार्गदर्शनाखाली परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात साजरा करण्यात आला. त्या वेळी डोक्याला भगवा फेटा आणि गळ्यामध्ये तुळशीचा हार घालून सिंहासनाधिष्ठित झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप नयनमनोहर दिसत होते. ते छायाचित्र प्रतिदिन स्वतःजवळ ठेवल्यावर रामनाथी आश्रमातील साधिका कु. योगिनी आफळे हिला येत असलेल्या अनुभूती पुढे देत आहोत. 

१. छायाचित्र जवळ ठेवल्यावर 
अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सतत माझ्या समवेत आहेत’, असे जाणवते. 
आ. मला पुष्कळ उत्साह वाटतो आणि आनंद मिळतो. 
इ. कधी कधी ते ‘माझ्या समवेतच चालत आहेत’, असे वाटते; म्हणून मी मागे वळून बघते, तर कुणीच नसते. अशा प्रकारे मला त्यांच्या अस्तित्वाची प्रचीती येते. 
ई. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करण्याची आठवण होऊन ‘देवच सर्व करून घेत आहे’, याची सतत जाणीव रहाते. 
२. छायाचित्राकडे पाहिल्यावर 
अ. ‘ते आपल्याकडे पाहून स्मितहास्य करत आहेत’, असे वाटते. 
आ. मी सत्र, प्रार्थना, नामजप, कृतज्ञता आणि आत्मनिवेदन केल्यावर त्यांच्यापर्यंत ते पोचत असल्याचे जाणवते. 
इ. छायाचित्रातील चरणांकडे पाहून सत्र करतांना ‘मी मानसरित्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत बसून त्यांच्या चरणांकडे पहात सत्र करत आहे’, असे मला जाणवते आणि त्यातून आनंद मिळतो. 
ई. आत्मनिवेदन करतांना ‘ते माझ्या समोर बसले आहेत आणि मी त्यांचे चरण घट्ट पकडून माझ्या मनातील विचार त्यांच्या चरणी अर्पण करत आहे’, असा भाव ठेवते. त्यामुळे माझे मन पूर्णतः हलके होते. मला त्यांना भेटल्याचा आनंद मिळतो आणि त्या वेळी वातावरणातही थंडावा जाणवतो. 
उ. मी माझ्या मनातील विचार त्यांना सांगतांना ते मला दृष्टीकोन देतात आणि त्यांना गमती-जमती सांगतांना ‘ते पटकन माझ्याकडे बघून स्मितहास्य करत आहेत’, असे दिसते. 
३. नामजप करतांना 
अ. मी प्रतिदिन नामजपाच्या आरंभी त्यांच्या छायाचित्राला मानस फूल अर्पण करते. तेव्हा माझ्या मनाला पुष्कळ चांगले वाटते. 
आ. पूर्वी मला पुष्कळ एकटे एकटे वाटायचे; परंतु छायाचित्राकडे पहात नामजप करतांना मला अतिशय आनंद मिळतो. 
इ. मला त्रास होत असतांना ‘कुणाशी तरी बोलावे’, असे वाटते; परंतु मी बोलू शकत नाही. त्या वेळी मी त्या छायाचित्राकडे पाहून बोलल्यानंतर मला ‘ते माझ्याशी प्रत्यक्ष बोलत आहेत’, असे जाणवते. 
४. इतर वेळी 
अ. पूर्वी मला सेवेचा पुष्कळ कंटाळा यायचा; परंतु सेवा करतांना ते छायाचित्र जवळ ठेवून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या समवेत आहेत’, असा भाव ठेवते. तेव्हा सेवा पटकन होऊन आनंद मिळू लागला. आ. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण सतत अर्जुनासमवेत राहून त्याला मार्गदर्शन करत होता, त्याचप्रमाणे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्यासमवेत राहून मला मार्गदर्शन करत आहेत आणि माझ्याकडून प्रयत्नही करून घेत आहेत’, असे मला जाणवते. 
इ. ‘आपण भावस्थितीत रहाण्यासाठी भगवंताने आपल्याला किती माध्यमे दिली आहेत ?’ या विचाराने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होते.’ 
- गुरुदेवा, तुमचीच लहान बालिका, 
कु. योगिनी वैभव आफळे (वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०१६) 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn