Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी योग्य दृष्टीकोन ठेवून साधनेचा समन्वय साधावा !

श्री. यशवंत कणगलेकर
१. दैनिक सनातन प्रभातमध्ये वारंवार प्रसिद्ध होणारे दृष्टीकोन
     ‘व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी दैनिक सनातन प्रभातमध्ये वारंवार दृष्टीकोन प्रसिद्ध होतात. त्यापैकी काही सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत. 
अ. काळानुसार व्यष्टी साधनेचे ३० टक्के, तर समष्टी साधनेचे ७० टक्के महत्त्व आहे.
आ. व्यष्टी आणि समष्टी साधना एकमेकांना पूरक आहेत. 
इ. व्यष्टी चांगली नसेल, तर समष्टी साधना नीट होत नाही, उलट हानीच होते.
ई. समष्टी साधना करतांना व्यष्टीकडे लक्ष नसेल, तर साधकाची साधना न होता कार्य होते.
     वरील सूत्रे वाचून अनेक साधकांना संभ्रम निर्माण झाल्याचे माझ्या लक्षात आले; म्हणून व्यष्टी आणि समष्टी म्हणजे नेमके काय अन् ती एकमेकांना कशी पूरक आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.
२. व्यष्टी आणि समष्टी साधना एकमेकांना पूरक असण्याविषयी सुचलेली सूत्रे 
२ अ. व्यष्टी साधना : व्यष्टी साधना म्हणजे वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेले प्रयत्न आणि हे प्रयत्न म्हणजे अहं निर्मूलन (ज्ञानयोग) आणि भावजागृती (भक्तीयोग). या प्रयत्नांमुळे जीव स्वभावदोष आणि अहं यांपासून मुक्त होऊ लागतो. मुक्त जीवच मोक्षाची वाटचाल करू शकतो; म्हणून म्हटले जाते, ‘मुक्तीविना मोक्ष नाही.’
२ आ. समष्टी साधना : समष्टी साधना म्हणजे समाजाचा आध्यात्मिक स्तर वाढण्यासाठी केलेले प्रयत्न. या प्रयत्नांत यशस्वी होण्यासाठी आपण ‘आदर्श असणे’ आवश्यक आहे. आपली व्यष्टी साधना चांगली असणे आवश्यक आहे. समष्टी साधनेत स्वतःपेक्षा इतरांचा विचार अधिक असल्यामुळे जीव व्यापक बनतो. तसेच जिवाचे समाजाशी असलेले प्रारब्ध न्यून होऊ लागल्याने तो मोक्षाकडे वाटचाल करू लागतो; म्हणून म्हटले आहे, ‘व्यापकत्वाविना मोक्ष नाही.’ 
२ इ. व्यष्टी आणि समष्टी साधनेचा समन्वय साधून प्रयत्न करण्याची मुभा असणे : सद्य:स्थितीत आपत्काल असल्याने ‘व्यष्टी साधना चांगली झाल्यावर समष्टी साधना करूया’, हे शक्य नाही. त्यामुळे प.पू. गुरुदेवांनी व्यष्टी समष्टीचा समन्वय साधून साधनेचे प्रयत्न करण्याची मुभा देऊन आपल्यावर अनंत उपकार केले आहेत. त्याचा पुरेपूर लाभ घेऊन गुरुकृपेस पात्र होऊया.’
- श्री. यशवंत कणगलेकर, बेळगाव (९.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn