Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बंगालमधील हिंदू !

संपादकीय
      बंगालमधील हावडा जिल्ह्यात महंमद पैगंबर जयंती साजरी झाली. धुलागडजवळील बानिजोपोला या गावात मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या ६० घरांना आग लावली. ५ घंटे येथे लूटमार करून हैदोस घालण्यात येत होता. आक्रमणाची मालिका ३ दिवस चालू होती. याचे दूरगामी परिणाम तेथील हिंदूंच्या जीवनमानावर झाले आहेत. गेली काही वर्षे बंगालमधील वातावरण चिघळले आहे. धर्मांधांची बहुसंख्या आणि कट्टरता यांमुळे भारतात अनेक छोटे पाकिस्तान निर्माण झाले आहेत. बंगाल हा त्यापैकी सर्वाधिक भीषण परिस्थिती असलेला भाग आहे. राजरोसपणे होणारी धर्मांधांची आक्रमणे हिंदूंना जगणे नको करतात. सण कुणाचेही असोत, हिंदूंची दुर्गापूजा असो वा मुसलमानांची ईद असो, दंगल, दगडफेक, हिंदूंवरील आक्रमणे ठरलेलीच असतात. यामध्ये मदरसे, मशिदी यांमधून हिंदूंवर होणारी सशस्त्र आक्रमणेही लक्षणीय असतात. फटाक्यांप्रमाणे होणारा गावठी बॉम्बचा वापर, जाळपोळ, हिंदूंना धमकावणे, यांतून बंगालमधील जंगलराजच दिसून येते.
धर्मांधांवर कारवाई का नाही ? 
      ‘राजा कालस्य कारणम्’ असे म्हटले जाते. बंगालमध्ये गेल्या अनेक दशकांपासून डाव्या विचारसरणीचे पक्ष सत्तास्थानी आहेत. या काळात साम्यवादी, धर्मांध वरचढ झाले. हिंदूंवरील आक्रमणे वाढली. बंगालमधील आतंकवाद्यांच्या कारखान्यांना चालना मिळाली. पोलीसयंत्रणा राज्यकर्त्यांच्या ताटाखालचे मांजर झाली अन् त्याच्या परिणामस्वरूप आज बंगालमध्ये अक्षरशः अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे. नक्षलवादाचा उगमही बंगालमध्येच झाला आहे. आताच्या प्रकरणातही सलग ३ दिवस हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाविषयी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. सैन्याने बंगालच्या रस्त्यांवर त्यांची नियमित तपासणी केली, तरी थयथयाट करणार्‍या ममता बानो यांना या आक्रमणाच्या प्रकरणी अवाक्षर काढावे वाटत नाही, यावरून त्यांना धर्मांधांच्या हिंसाचाराच्या कचाट्यात सापडलेल्या हिंदूंविषयी किती आस्था आहे, हेच दिसून येते.
      धर्मांध हिंसाचारीच असतात. ते ज्या भागात बहुसंख्येने असतात, तेथे ते अन्य अल्पसंख्यांकांवर प्रामुख्याने हिंदूंवर आक्रमणे करतातच. जेथे अल्पसंख्य असतात, तेथे हिंदूंच्या कुरापती काढून त्रस्त करतात. त्यांचे शेपूट कधी सरळ होईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे; मात्र जनतेच्या संरक्षणाचे दायित्व असलेली सरकारे अशा वेळी निरपराध हिंदूंच्या बाजूने का उभी रहात नाहीत ? १३ डिसेंबरच्या पैगंबर जयंतीला बंगाल, महाराष्ट्र आणि कर्नाटक या सर्वच राज्यांमध्ये धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमणे केली. या धर्मांधांच्या विरोधात शासनाने तात्काळ कारवाई करून अन्य आक्रमणकर्त्यांवर वचक बसेल, अशा प्रकारे कारवाई करायला हवी. या तिन्ही राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्थेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित होईल, अशा घटना घडलेल्या असतांना राज्यसरकारांनी मौन बाळगणे संतापजनक आहे.
ढोंगी पुरोगाम्यांचे मौन !
      तथाकथित पुरोगाम्यांकडून देशभर हिंदूंवर असहिष्णूतेचा आरोप होत असतांना वास्तविकता अशी आहे की, देशभर हिंदू धर्मांधांच्या कट्टरतेमुळे त्रस्त आहेत. एखादे दादरीसारखे प्रकरण झाले की, पुरोगामी कंपूने लगेच पुरस्कारवापसीचे नाटक चालू केले. आता गेले तीन दिवस येथे हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मोठ्या प्रमाणावर जाळपोळ, गावठी बॉम्बचा मारा, ६० हिंदूंनी गावातून पलायन करेपर्यंत परिस्थिती चिघळली आहे. तेव्हा कुणी पुरस्कार परत करण्यासाठी पुढे आलेले नाहीत कि असहिष्णुता म्हणून धर्मांधांवर आरोपही केलेले नाहीत. हे आक्रमण १३ डिसेंबरपासून चालू असूनही बहुतांश प्रसारमाध्यमांनीही त्याची दखल घेतलेली नाही. एरव्ही ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली सुमार बातम्या दर्शकांच्या माथ्यावर मारणार्‍या वाहिन्यांना हिंदूंवरील अत्याचारांची ‘न्यूज ब्रेकिंग’ वाटली नाही. त्यामुळेच हिंदूंवर वारंवार आक्रमणे होत असतांना त्यांना ना सरकार वाली आहे, ना माध्यमे...!
हिंदूंनो, साधना करा !
      या अनाचारापासून रक्षण होण्यासाठी आता हिंदूंनी स्वतःच पुढाकार घेणे आवश्यक आहे. स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण घेणे, अन्य कोणी आपल्यावर आक्रमणे करणार नाहीत, असे संघटन निर्माण करणे यांसमवेतच व्यक्तीगत साधना वाढवणे, हीच काळाची आवश्यकता आहे. ‘धर्मो रक्षति रक्षितः’; म्हणजेच जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म म्हणजेच ईश्‍वर करतो. बंगालमध्ये डाव्या विचारसरणीच्या साम्यवाद्यांचे शासन असण्याला त्यांना मते देणारे हिंदूही कारणीभूत आहेत. प्रदीर्घकाळ असलेल्या डाव्यांच्या प्रभावामुळे बंगालमधील हिंदूही आता साम्यवादी विचारसरणीचे झाले आहेत. ते धर्म आणि उपासना विसरले आहेत. ईश्‍वरोपासनेपासून दूर गेलेल्या या हिंदूंना आता मोठ्या प्रमाणावर अराजकाला सामोरे जावे लागत आहे. सरकार, संघटना, प्रसिद्धीमाध्यमे अशा कुणाचाच आधार नसतांना या हिंदूंचे रक्षण भगवंतच करणार आहे. त्यासाठी हिंदूंनी साधना करून भगवंताची कृपा संपादन करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या हिंदु बांधवांना शुभेच्छा !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn