Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

वाळूमाफियाने हप्त्याविषयी उघडपणे प्रश्‍न केलेल्या तहसील कार्यालयातील भ्रष्ट अधिकार्‍याच्या चौकशीचे आदेश !

      जळगाव - एका वाळूमाफियाने २९ नोव्हेंबर या दिवशी ‘मी नियमित हफ्ते देऊनही माझे डंपर का पकडतात ?’, अशी मोठ्याने विचारणा तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांना केली होती. तहसील कार्यालयातील या भ्रष्टाचारी अधिकार्‍यांच्या चौकशीचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेश काढले आहेत.
    वरील अचनाक घडलेल्या प्रसंगामुळे वाळूमाफिया आणि अधिकारी यांचे आर्थिक संबंध उघड झाले होते. यानंतर भाजपचे शहर उपाध्यक्ष यांनी हफ्ते घेणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना दिले होते. जळगावचे नायब तहसीलदार डी.एस्.भालेराव हे तर जळगाव तालुक्यातील एका वाळू ठेक्यात भागीदार असल्याचे वाळूमाफियांकडून उघडपणे सांगितले जात आहे. तहसीलदारांच्या भ्रष्टाचाराविषयी अनेक तक्रारी आल्या आहेत, असे समजते. (अनेक तक्रारी आल्या होत्या, तर पूर्वीच्या त्यांच्यावर कारवाई का झाली नाही ? - संपादक)धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn