Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

म्हणे) ‘मराठीला गोव्याच्या अधिकृत भाषेचा दर्जा देता येणार नाही !’ - मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची स्पष्टोक्ती

गोवा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिकृत भाषेच्या 
संवेदनशील सूत्राला हात घालून राज्याचे मुख्यमंत्री काय साध्य करू पहात आहेत ? 
     पणजी - प्रत्येक राज्याची केवळ एकच अधिकृत भाषा असू शकते आणि तो दर्जा कोकणी भाषेला अगोदरच देण्यात आला आहे. एका राज्याच्या २ अधिकृत भाषा नसतात, हे सत्य आपण स्वीकारले पाहिजे. गोव्याच्या संस्कृतीत कोकणी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे कोकणी भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे; मात्र राज्यात मराठी भाषेलाही तितकेच महत्त्व देण्यात येते. त्यामुळे अधिकृत भाषेच्या सूत्रावरून लोकांनी विनाकारण वाद निर्माण करू नयेत, असे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले. ते पणजी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. 

     पार्सेकर म्हणाले की, गोव्याची स्वत:ची अशी एक विशेष ओळख आहे. या ठिकाणी बोलण्यात येणार्‍या विविध भाषांचा यामध्ये पुष्कळ मोठा वाटा आहे; मात्र गोव्याच्या संस्कृतीमधील कोकणी भाषेचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे अधिकृत भाषेला पाठिंबा देणे हे सरकारसह सर्वांचेच कर्तव्य आहे. 
     गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील काही राजकीय पक्षांनी कोकणी भाषेबरोबर मराठीलाही अधिकृत भाषेचा दर्जा देण्याची मागणी चालू केली आहे. तसेच राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिले जाणारे अनुदान बंद करावे आणि केवळ देशी भाषेतून शिक्षण देणार्‍या शाळांना साहाय्य करावे, अशी भूमिकाही घेण्यात आली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn