Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मेक्सिकोमधील फटाका बाजारात भीषण आगीमध्ये २६ जणांचा मृत्यू !

फटाक्यांवर केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात बंदी घातली पाहिजे !
      मेक्सिको सिटी - येथून ३२ कि.मी. अंतरावर असणार्‍या सेन पल्बिटो या सर्वात मोठ्या फटाका बाजारात झालेल्या स्फोटात २६ जणांचा मृत्यू झाला, तर ७० हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. येथे मोकळ्या मैदानात हा बाजार भरवला जातो. नाताळ आणि नववर्ष साजरा करण्यासाठी लोकांची फटाके घेण्यासाठी गर्दी झालेली असतांनाच ही दुर्घटना घडली. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्नीशमन दलाला ३ घंटे लागले. आग इतकी भीषण होती की, जवळ असणारी घरे आणि गाड्याही जळून खाक झाल्या आहेत. सेन पल्बिटो बाजारात याआधीही २००५ आणि २००६ मध्ये अशीच भीषण आग लागली होती.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn