Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काळा पैसा पांढरा करणार्‍या बँक कर्मचार्‍यांपासून सावध राहा !

       एका परिचित व्यापारी मित्राने त्याच्या नेहमीच्या बँकेत आदल्या दिवशी गोळा झालेली विक्रीची ५० सहस्र रुपयांची रक्कम स्वत:च्या खात्यात भरली. त्याने हे पैसे नवीन चलनातील २ सहस्र रुपयांच्या १५ नोटा आणि १०० रुपयाच्या २०० नोटा अशा स्वरूपात जमा केली. काही वेळाने त्यांच्या भ्रमणभाषवर बँकेकडून लघुसंदेश (एस्.एम्.एस्.) आला की, त्यांच्या खात्यात जुन्या चलनी नोटांत एकंदर २ भागांत ६ सहस्र आणि ४३ सहस्र, असे ५० सहस्र रुपये जमा झाले आहेत. आश्‍चर्यचकित झालेल्या त्या व्यापार्‍याने बँकेशी संपर्क साधला असता त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम ही जुन्या चलनी नोटांत जमा करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. 

      याचाच अर्थ बँक कर्मचार्‍याने कुणाचे तरी काळे धन युक्ती वापरून पांढरे करून दिले आहे. या व्यापार्‍याने ही नोंद रहित करून घेतली आणि प्रत्यक्ष जमा केलेल्या नवीन चलनी नोटांत रक्कम भरल्याची नोंद करवून घेतली. असे केले नसते, तर त्यांना जुन्या चलनात एवढी रक्कम कशी आली, याचा खुलासा आयकर खात्याला करावा लागला असता. 
      या घटनेवरून धडा घेऊन आपण बँकेत जमा करत असलेल्या रकमेच्या पावतीवर, तसेच त्याचा पोच पावतीवर (पे इन स्लीप) नोटांचा तपशील तपासून बघावा. तसेच पावतीचे भ्रमणभाषवर छायाचित्र काढून जपून ठेवावे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn