Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदुत्वाचे सूत्र संसदेत उपस्थित करण्याचे खासदारांचे आश्‍वासन !

ग्रंथ भेट देतांना डावीकडून पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
आणि शिवसेनेचे खासदार श्री. हेमंत गोडसे
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने देहली येथे सनातन संस्था
आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने शिवसेना-भाजप यांच्या खासदारांची सदिच्छा भेट !
     देहली - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथील शिवसेना आणि भाजप यांच्या खासदारांची भेट घेण्यात आली. या भेटीत त्यांना संसदेत हिंदुत्वाची सूत्रे उपस्थित करण्याचे आवाहन करण्यात आले.
     ठाणे येथील खासदार श्री. राजन विचारे, नाशिक येथील खासदार श्री. हेमंत गोडसे, सिंधुदुर्ग येथील खासदार श्री. विनायक राऊत, मुंबई येथील खासदार श्री. गजानन कीर्तिकर, श्री. अरविंद सावंत, मावळ येथील खासदार श्री. श्रीरंग बारणे या शिवसेनेच्या खासदारांसहित कर्नाटकमधील भाजपचे खासदार श्री. प्रल्हाद जोशी, तसेच भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. श्याम जाजू यांची भेट घेण्यात आली. या सर्व खासदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत हिंदुत्वाचे विषय संसदेत मांडण्याचे आश्‍वासन दिले.
या वेळी सर्व खासदारांना ‘सनातन पंचांग २०१७’ आणि सनातनचे ग्रंथ सदिच्छा भेट म्हणून देण्यात आले. या संपर्क भेटीत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक, कु. कृतिका खत्री, समितीचे देहली समन्वयक श्री. कार्तिक साळुंके आणि रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी सहभाग घेतला.      
भाजपचे खासदार श्री. प्रल्हाद जोशी (डावीकडे)
यांना सनातन पंचाग भेट देतांना श्री. अभय वर्तक
खासदारांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये पुढील विषय उपस्थित करण्याची विनंती करण्यात आली.
१. सरकारने सम्राट अकबराचे छायाचित्र रेल्वे स्थानकावर लावण्याचा घेतलेला निर्णय रहित करावा
२. कर्नाटकप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरील सर्व रुग्णालयांच्या दर पत्रकाविषयी नियमावली घोषित करावी, तसेच विविध वैद्यकीय चाचण्यांचे दर निश्‍चित करावेत
३. मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळेतील सरस्वती देवीची मूर्ती लंडन संग्रहालयातून भारतात सन्मानाने परत आणावी
४. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास ‘एन्सीईआर्टी’च्या पाठयपुस्तकात मोठ्या प्रमाणात समाविष्ट करावा
५. पाकचा ‘मोस्ट फेव्हरेट नेशन’चा दर्जा काढून टाकावा
६. देशद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्या प्रतिबंधित ‘पीस टीव्ही’ या दूरचित्रवाहिनीचे संकेतस्थळावरून भारतात होत असलेले प्रक्षेपण बंद करावे आणि संकेतस्थळावरून डॉ. नाईक यांचा चालू असलेला प्रचार त्वरित बंद करावा
७. साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांच्यासह १२ निरपराध हिंदूंना न्याय मिळावा
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn