Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जागतिक अपंग दिनानिमित्त प्रकाश अधिक दिवस १० डिसेंबरला साजरा करणार !

वेद वासुदेव प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम !
      अकोला, ८ डिसेंबर - ३ डिसेंबर २०१६ या दिवशी झालेल्या जागतिक अपंग दिनाचे औचित्त्य साधून वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या वतीने अकोला येथील सावरकर सभागृहात १० डिसेंबरला प्रकाश अधिक दिवस साजरा करण्यात येणार आहे. 
१. कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. श्री.जी. श्रीकांत, जिल्हा विधी प्राधिकरण, अकोला येथील सदस्यसचिव मा. श्री. पी.एम. बाडगी आणि अकोल्याचे प्रथितशय उद्योजक श्री. दीपकजी भारतीया यांची उपस्थिती रहाणार आहे. 
२. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुण्याच्या वेद वासुदेव प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. अजितदादा तुकदेव भूषवणार आहेत.
३. सकाळी १० वाजता संवाद या विषयावर मा. श्री. विशाल कोरडे यांचे व्याख्यान आणि १०.३० वाजता मी आणि समाज या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. श्री. मनोज चांडक परीक्षक आहेत. 
४. सकाळी ११.३० वाजता अपंग कायदा आणि त्याची व्याप्ती या विषयावर नॅब इंडियाचे महासचिव मा. श्री. एस.के. सिंग त्यांचे विचार मांडतील. Persons with Disabilities Act (PWA) या विषयावर बार असोशिएशन ऑफ इंडियाचे उपमहासचिव मा. श्री. उदय वारूंजीकर यांचे भाषण होईल. बाल मानसोपचार तज्ञ डॉ. देव साहेब यांचे मार्गदर्शन होईल. डिक्की व कोकण विभाग स्टँडअप इंडिया स्किमचे साहाय्यक अधिकारी श्री. सुगतजी वाघमारे यांचे मार्गदर्शन, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर श्री. गिरीश गंग्रास स्टेट बँक ऑफ इंडियाची भूमिका या विषयावर बोलतील. विदर्भ डिक्की नागपूरचे अध्यक्ष श्री. निश्‍चयजी शेळके यांचे व्यावसायिक अर्थसाहाय्य आणि संधी या विषयांवर मार्गदर्शन होईल. 
५. दुपारी १.३० ते २.३० वर वेळेत भोजन आणि सायंकाळी ४.३० ते ५ या वेळेत पारितोषिक वितरण आणि समारोप होईल. आभारप्रदर्शन श्री. संजयजी सेंगर करणार आहेत.
     संघटित प्रयत्नांनी अपंगत्वावर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन पुण्याच्या वेद वासुदेव प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. अजितदादा तुकदेव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
संपर्क 
वेद वासुदेव प्रतिष्ठान, ए-७, श्रीपूजा सोसायटी, 
गुजरात कॉलनी, प्लॉट नं. १, पौड रोड, कोथरूड, पुणे - ४११०३८ 
     उत्तरोत्तर जाणिवेच्या प्रकाशमार्गावर वाटचाल करायची आहे. तुमची साथ, मार्गदर्शनाची गरज - संघशक्तीने राष्ट्रशरीर सबल दृष्टीसंपन्न करावयचे आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद ! राष्ट्र सद्गुरुरूपात सर्वोच्च स्थानी आहे. सेवा-साधनेचे शिखर आहे. - अजित कृष्ण तुकदेव, अध्यक्ष, वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे. (भ्रमणभाष क्र. ९५६११४२२०४)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn