Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पॅरोलवरून फरार झालेल्या साजिद पठाणला पकडण्यासाठी काय पावले उचलली ? - उच्च न्यायालय

पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरण
       मुंबई - व्यवसायाने वकील असलेल्या पल्लवी पुरकायस्थच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या साजिद मुगल पठाणला कह्यात (ताब्यात) घेण्यासाठी काय पावले उचलण्यात आली, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला २१ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. गेल्या वर्षी साजिद पठाणला विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. फेब्रुवारी २०१६ मध्ये नाशिक कारागृह प्रशासनाने त्याची पॅरोलवर सुटका केली. कारागृह प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पठाण जम्मू-काश्मीरचा रहिवासी असल्याने त्याने आतापर्यंत देशाची सीमा पार केली असावी. (या घटनेवरून कारागृहांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍न निर्माण होतोे. - संपादक)
       या खटल्यामधील विशेष सरकारी वकील अशोक मुंडरगी यांनी पठाण पॅरोलवर असतांना फरार झाल्याची माहिती न्या. रणजीत मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने मुख्य सरकारी वकील संदीप शिंदे यांना या संदर्भात नाशिक कारागृह प्रशासनाकडून माहिती घेण्याची सूचना केली. त्यावर अधिवक्ता शिंदे यांनी त्याच्यावर एफ्आयआर् नोंदवण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्याला (पठाण) पुन्हा कह्यात घेण्यासाठी काय पावले उचललीत ? केवळ एफ्आयआर् नोंदवणे पुरेसे नाही. हे गंभीर प्रकरण आहे. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यातील दोषीची पॅरोलवर सुटकाच कशी करता ? या खटल्याशी संबंधित सर्व कागदपत्रे आमच्यापुढे सादर करा. आता याचा तपास आमच्या देखरेखीखाली होईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
       मुंबईस्थित वडाळा येथे पल्लवी रहात असलेल्या इमारतीत साजिद पठाण पहारेकरी म्हणून नोकरीला होता. ८ ऑगस्टच्या मध्यरात्री त्याने पल्लवीच्या घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा करताच त्याने तिचा गळा कापला आणि तेथून पळ काढला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn