Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गेल्या ६ वर्षांत देशातील पोलीस कोठडीमध्ये ६०० कच्च्या कैद्यांचा मृत्यू !

पोलीस कोठडीत कैद्यांचा मृत्यू का होतो, ही गोष्ट जगजाहीर आहे;
पण त्यावर कधी पोलिसांना शिक्षा होत नाही !
ही स्थिती हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) अपरिहार्यता दर्शवते !
    नवी देहली - देशात पोलिसांच्या कह्यात असलेल्या कच्च्या कैद्यांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ होत आहे, असे ह्युमन राइट्स वॉचने म्हटले आहे. सरासरी प्रत्येक वर्षाला किमान १०० कच्च्या कैद्यांचे मृत्यू पोलीस कोठडीत होतात. वर्ष २००९ ते २०१५ या काळात एकूण ६०० मृत्यू झाल्याचे मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. न्यायदंडाधिकार्‍यांसमोर उपस्थित करण्यापूर्वीच काही कच्च्या कैद्यांचा मृत्यू होतो; मात्र त्यांची नोंद आत्महत्या किंवा आजारपणामुळे झाली, अशी केली जाते. वरील संख्या पहाता भारत सरकारने लवकरच कठोर पावले उचलावीत, अशी विनंती मानवी अधिकार संघटनेने केली आहे.     वर्ष २०१५ मध्ये ९७ जण मृत्यूमुखी पडले. त्यापैकी ६७ जणांचा अटक झाल्याच्या २४ घंट्यांमध्ये मृत्यू झाला आहे. ज्या पोलिसांनी नियम डावलून कैद्यांना मारहाण केली, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे देखील या अहवालात म्हटले आहे. पोलिसांनी नियम धाब्यावर बसवल्यामुळे हे मृत्यू झाले आहेत. जर त्यांनी नियमांचे पालन केले असते, तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असे या अहवालात म्हटले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn