Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जयललिता यांच्या पार्थिवाला हिंदु धर्मशास्त्रानुसार अग्नी न देता त्यांचे दफन करण्यामागील हास्यास्पद आणि धर्मविरोधी कारणे !

       चेन्नई - इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने तमिळनाडूमधील एका वरिष्ठ सरकारी सचिवांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार जयललिता या आमच्यासाठी (हिंदु) अय्यंगार नव्हत्या. त्या जात अथवा धर्म याच्या पलीकडे होत्या. (धर्मशिक्षणाच्या अभावी असे हास्यास्पद विधान करणारे सचिव ! जयललिता या जात आणि धर्म याच्या पलीकडे होत्या म्हणून पुरले असेल, तर पार्थिव पुरणे हे कुठलीच जात किंवा धर्म यांच्याशी निगडित नाही का ? पार्थिवावर अग्नीसंस्कार करणे हा सर्वांत चांगला अंत्यविधी आहे; म्हणून तरी जयललिता यांच्या पार्थिवावर अग्नीसंस्कार करायचा होता ! - संपादक) याआधी पेरियार, अण्णा दुराई आणि एम्जीआर् यांसारख्या नेत्यांना आम्ही पुरले होते. त्यांच्या स्मारकाच्या माध्यमातून जनतेच्या ते स्मृतीस राहिले आहेत. (अग्नीसंस्कार केल्यानंतरही त्या ठिकाणी स्मारक उभारता येते. - संपादक)
       एका राजकीय विश्‍लेषकाच्या मते, जयललिता या सश्रद्ध महिला होत्या. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्यावर अग्नीसंस्कार होईल, अशी साहजिक अपेक्षा होती; परंतु त्यांना अग्नी देण्यासाठी त्यांचे नातेवाईक उपस्थित असणे अपेक्षित आहे. त्यांची भाची दीपा जयकुमार हीच आता जीवित असल्याने तिलाच अग्नी देण्याचा अधिकार आहे; परंतु राजकीय लाभासाठी जयललिता यांच्या निकटवर्ती असलेल्या शशिकला यांना दीपा यांना अंत्यसंस्काराच्या जवळपासही फिरकू द्यायचे नव्हते. (नेत्याच्या अंत्यसंस्काराचाही राजकीय लाभासाठी वापर करणारे स्वार्थी आणि निर्लज्ज राजकारणी ! - संपादक)
       २२ सप्टेंबरपासून दीपा आणि त्यांचे पती यांना जयललिता यांना भेटू दिले गेले नाही. २ दिवसांपूर्वीही एआयएडीएम्केच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशांनुसार पोलिसांनी त्यांना जयललिता यांची अपोलो दवाखान्यात भेट घेण्यापासून अडवले. (हीच जयललिता यांची त्यांच्या समर्थकांना शिकवण होती, असे समजायचे का ? - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn