Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘व्हॉट्स अ‍ॅप’वर हिंदु देवता आणि संत यांच्याविषयी विडंबनात्मक लिखाण करणार्‍याच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून तक्रार

पोलीस उपनिरीक्षक श्री. रामभाऊ खराटे
(मध्यभागी) यांना तक्रार देतांना हिंदुत्वनिष्ठ

        अमरावती - येथील व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप वर हिंदु देवता आणि संत यांच्याविषयी विडंबनात्मक लिखाण करणारा जसवीन लोनारे याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला असून ‘योग्य ती कारवाई केली जाईल’, असेही सांगण्यात आले आहे. (हिंदूंनो, पोलिसांच्या आश्‍वासनावर अवलंबून न रहाता दोषीवर कारवाई होईपर्यंत त्यांचा पाठपुरावा घ्या ! - संपादक)
        या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे, श्री. तुषार वानखडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. महेश लडके आणि कार्यकर्ते, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. वैभव चोरे आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn