Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

श्रीकृष्णाशी बोलणारा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला यवतमाळ येथील चि. रुद्र चंद्रशेखर गोबाडे (वय ५ वर्षे) !

चि. रुद्र गोबाडे
    चि. रुद्र चंद्रशेखर गोबाडे याचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी (२०.१२.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आजीला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, तसेच दोष देत आहोत.
चि. रुद्र चंद्रशेखर गोबाडे याला
सनातन परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा !
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. रामाचा पाळणा, भजने इत्यादी ऐकत झोपी जाणे आणि हातांची मुद्रा केलेली असणे : रुद्रला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकायला आवडते. तो ८ दिवसांचा असतांना त्याच्या जवळ सतत रामाचा पाळणा, भजने आणि सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन लावलेले असायचे. तो ते ऐकत कधी झोपायचा, हे कळायचे नाही. तो सतत हाताच्या बोटांची मुद्रा करायचा.
१ आ. समंजस : मी नामजप करत असतांना रुद्रला एखादी वस्तू (उदा. दूध) हवी असल्यास तो मला म्हणतो, आजी, तुझा नामजप झाला की, मला दूध दे.
१ इ. साधक घरी आलेले आवडणे : रुद्रला घरी साधक आलेले आवडतात. त्याला केंद्रातील सर्व साधक ठाऊक आहेत. त्याला साधक घरी येतांना दिसल्यास तो धावत येऊन मला सांगतो. तेव्हा त्याच्या मुखावर आनंद जाणवतो.
१ ई. देवाची आवड : रुद्रला श्रीकृष्ण पुष्कळ आवडतो. तो एकटा असतांना देवघरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीशी बोलत असतो. त्याला जेवायला दिल्यावर तो आधी कृष्णाला जेवायला दे, असे सांगतो. रुद्र त्याच्यासाठी आणून दिलेली श्रीकृष्णाची मूर्ती जेवणाच्या ताटासमोर ठेवून श्रीकृष्णाला जेवण भरवतो. कृष्णाला दहीभात अधिक आवडतो, असे तो सांगतो. तो जेवण झाल्यावर श्रीकृष्णाला आपल्यासोबत झोपायला यायला सांगतो.
१ उ. संतांप्रती भाव
१ उ १. संतांशी बोलायचे असणे : एकदा त्याने एका संतांशी भ्रमणभाषवर बोलायचे आहे, असा हट्ट केला. त्याने माझ्या हातात भ्रमणभाष देऊन तू आताच त्यांना संपर्क कर, असे सांगितले. तेव्हा मी एका साधक काकांना भ्रमणभाष करून संतच बोलत आहेत, असे भासवले. तेव्हा तो म्हणाला, हे तर काका आहेत. तू माझ्याशी खोटे बोलतेस. तेव्हा त्याची समजूत घालायला मी अल्प पडले.
१ उ २. रामनाथी आश्रमात जायला आणि संतांना भेटायला उत्सुक असणे : तो आश्रमात जायला उत्सुक असतो. तो मला नेहमी म्हणतो, आजी, आपण आश्रमात केव्हा जायचे ? मला तेथील संतांना भेटायचे आहे. तो भ्रमणभाषमध्ये असलेले रामनाथी आश्रमाचे छायाचित्र सतत पहात असतो.
१ ऊ. प.पू. डॉक्टरांप्रती भाव
झाडावरील फुलांना डॉक्टरबाबांच्या चरणांवर जायचे आहे, असे सांगणे : रुद्रला देवाची पूजा करायला आवडते. झाडाला फुले लागलेली दिसल्यास तो मला म्हणतो, आजी, या फुलांना डॉक्टरबाबांच्या चरणांवर जायचे आहे. मी फुले तोडून आणू का ? नंतर तो एकेक करून फुले चरणांवर वाहतो आणि श्रीकृष्णाच्या चित्राजवळ जाऊन त्याला यांतील मोगर्‍याचे फूल आवडते कि लाल फूल ?, असे विचारतो आणि कृष्ण माझ्याकडे पाहून हसत आहे, असे सांगतो.
१ ए. भावजागृतीस साहाय्य करणे : मी नामजपाला बसले असतांना तो नकळत माझ्या मागे येऊन उभा रहातो आणि म्हणतो, हे बघ, कृष्णाने तुझ्या डोक्यावर हात ठेवला आहे. ते ऐकून माझी भावजागृती होते.
१ ऐ. चुकांची जाणीव करून देणे : रुद्र माझ्या चुका सांगतो. तो ही चूक आताच लिही, नाहीतर तू विसरशील, असे सांगतो.
२. स्वभावदोष
    रुद्रचे मुख्य स्वभावदोष आहेत - ऐकण्याची वृत्ती नसणे, हट्टीपणा आणि अभ्यासाचा कंटाळा करणे.
     हे श्रीकृष्णा, तुझ्याच कृपेने आम्हाला रुद्रसारखा सात्त्विक नातू मिळाला आहे. तेव्हा तूच या जिवाकडून तुला अपेक्षित अशी साधना करवून घे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
    हे गुरुदेवा, तुम्हीच हे लिखाण माझ्याकडून लिहून घेतलेत. मी तुमच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.
- सौ. सुनीता विष्णुपंत खाडे (रुद्रची आजी), यवतमाळ

     यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर यूट्यूबच्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn