Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तळमळ आणि कृतज्ञता भाव असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सांगली येथील सौ. विद्या जाखोटिया !

सौ. विद्या जाखोटिया
१. पायाच्या दुखण्यामुळे सेवेसाठी घराबाहेर 
पडू शकत नसल्याने परिस्थिती स्वीकारून स्वभावदोष प्रक्रिया 
आणि भावजागृतीचे प्रयत्न ध्येय ठेऊन करण्यास प्रारंभ करणे 
    सौ. विद्या जाखोटियाभाभी चिपळूण येथे आयुर्वेदिक उपचारांसाठी गेल्या होत्या. उपचारानंतर त्यांच्यामधे बराच पालट जाणवत होता. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या सेवा करू शकत नसत. त्यापूर्वी त्यांच्याकडे वेगवेगळ्या सेवा होत्या. पायाचे दुखणे उद्भवल्यामुळे सेवेसाठी घराबाहेरही पडू शकत नाही, हे त्यांनी पूर्णपणे स्वीकारले होते. या परिस्थितीत काय करू शकतो, याचे चिंतन करून त्यांनी स्वभावदोष प्रक्रिया आणि भावजागृतीचे प्रयत्न ध्येय ठेवून करण्यास प्रारंभ केला.
२. दूरभाषवरून बोलतांना स्वभावदोष प्रक्रियेविषयी अंतर्मुखता 
जाणवून परात्पर गुरु डॉक्टरांविषयी पुष्कळ कृतज्ञता भाव जाणवणे 
      सौ. भाभींकडे दूरध्वनीवरून कधीही बोलले, तरी त्या स्वतःमध्ये कोणते दोष अन् अहं असून ते कोणत्या प्रसंगामुळे लक्षात आले आणि आणखी कोणते स्वभावदोष-अहं यांचे पैलू आहेत, हे सांगत. त्यांच्या बोलण्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता भावही जाणवतो. त्यांचे हे बोलणे वरवरचे नसून आतून आहे, असे जाणवायचे. स्वभावदोष आणि अहं यांचे खोलवर चिंतन केल्यामुळे त्यांना त्यातील अनेक पैलू लक्षात येत होते. इतरांविषयी प्रेमभाव या गुणांमध्ये वृद्धी झाल्याचे जाणवले. 
३. नवरात्रोत्सवात गुडघा दुखत असतांनाही 
ग्रंथ प्रदर्शन लावण्याची सेवा झोकून देऊन करणे 
      नवरात्रीच्या कालावधीत ग्रंथप्रदर्शन लावण्याची सेवा होती. मी सौ. भाभींना विचारले, मला प्रदर्शनासाठी साहाय्य करणार का ? घरात राहून पाठपुरावा करू शकता का ? त्यावर त्यांनी उत्साहाने होकार दिला होता. प्रत्यक्षात त्यांनी बाहेर जाऊन झोकून देऊन सेवा केली. त्यांना एकच ध्यास होता की, सेवा परात्पर गुुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी झाली पाहिजे. त्या अनुषंगाने गुडघा दुखत असूनही सर्व सेवा स्वीकारून झोकून देऊन सेवा केली. त्या भावाच्या स्तरावर सेवा करत होत्या. 
४. भाभींमध्ये असलेल्या तळमळीला भावाची जोड 
मिळाल्याने त्यांच्याशी बोलतांना चांगले वाटणे
      साधनेत आल्यापासूनच त्यांच्यामधे गुरूंचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावे, अशी तळमळ आहे. आता त्यांच्यातील तळमळीला भावाची जोड मिळाल्याचे जाणवले. अलीकडे त्यांच्याशी बोलतांना पुष्कळ चांगले वाटते. त्यांच्यातील कृतज्ञता भावामुळे माझीही कृतज्ञतेमध्ये वाढ होऊन भावजागृती होते. माझ्या मनात नकारात्मक विचार असल्यास ते न्यून होऊन सकारात्मकता येऊन उत्साह वाढतो. सौ. भाभींशी बोलल्यावर आनंद जाणवतो. 
५. इतरांना समजून घेणे आणि इतरांकडून शिकणे या गुणांमध्ये वृद्धी होणे 
     त्यांच्यामध्ये इतरांना समजून घेणे हा गुण पुष्कळ वाढला आहे. ग्रंथप्रदर्शनाच्या वेळी सर्वांना काय हवे, याचा विचार करून त्या साहाय्य करत होत्या. इतरांना आनंद देण्यासाठी स्वतः विचार करत. इतरांकडून शिकणे, हा गुणही त्यांच्यामधे पुष्कळ वाढला आहे. त्या मला ग्रंथ प्रदर्शनावर येणार्‍या साधकांमधील गुण सांगत. इतरांची चूक असल्यास तत्परतेेने सांगून सहजतेने बोलून घेतात. त्यामुळे त्यांच्या मनात अनावश्यक विचार येत नाहीत. 
- सौ. स्मिता माईणकर, गावभाग, सांगली. 
      या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn