Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

ट्रम्प-शरीफ संभाषणामुळे भारताला चुकीचा संदेश ! - फोर्ब्स नियतकालिक

     वॉशिंग्टन - पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले संभाषण हे भारताला चुकीचा संदेश देणारे आहे आणि ट्रम्प यांचे संभाषण फारच अज्ञानमूलक होते, असे फोर्ब्स नियतकालिकाने म्हटले आहे.
     फोर्ब्स नियतकालिकाने पुढे म्हटले आहे की, ट्रम्प यांनी जे अघळपघळ संभाषण केले आहे, त्यावरून त्यांना अमेरिका, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंधाची काही माहिती नाही असाच संदेश गेला आहे. त्यांचे हे संभाषण त्यांच्या प्रशासनाची प्राथमिक भूमिका म्हणून गणले जात आहे, त्यात त्यांनी पाकचे वर्णन करतांना त्या देशाचे काम चांगले आहे, लोकही चांगले आहेत, त्या देशाची प्रतिमाही चांगली आहे, असे गोडवे गायिले होते. त्यांच्या या संभाषणातून त्यांना अमेरिका-पाकिस्तान आणि भारत यांच्यातील प्रश्‍नांचे किंवा सूत्रांचे ज्ञान नाही हेच दिसून आले. ट्रम्प यांना दक्षिण आशियातील वास्तव माहीत नाही.      ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर हिंदू अमेरिकन फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक सुहाग शुल्ला यांनी म्हटले आहे की, नवनिर्वाचित अध्यक्षांनी पाकच्या आतंकवादविरोधी आणि मानवी हक्क संरक्षणाविषयीच्या कृतींचा आढावा घ्यावा. पाकशी व्यवहार करतांना राजनैतिकता महत्त्वाची आहे, हे खरे असले; तरी ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाने पाकची दुतोंडी भूमिका पहाता सावध असले पाहिजे. जर या संभाषणाचा पाकने दिलेला तपशील खरा असेल, तर ट्रम्प यांनी ‘पाकचे शेजारी देशाशी असलेले वागणे’ आणि ‘आतंकवादी कारवायांना आळा घालण्यासाठी केलेली कामगिरी’ तपासून पहायला हवी.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn