Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन

पाश्‍चात्त्य देशात आरक्षण नसल्याने त्या देशांनी मोठी प्रगती 
केली आहे. त्या देशांमध्ये गुणवत्ता, दर्जा याला प्राधान्य देण्यात येते. 
याउलट भारतात आरक्षण लागू केल्यामुळे देशाची अपरिमित हानी झाली 
असून देशाची अधोगती झाली आहे. यासाठी देशातून आरक्षण हद्दपार केले पाहिजे. 
हिंदु राष्ट्रात कोणालाही आरक्षण दिले जाणार नाही. गुणवत्तेलाच प्राधान देण्यात येईल !
मराठा समाजाने काढलेल्या शिस्तबद्ध मोर्च्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक !
     नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात, देशात इतकेच काय विदेशातही मूक मोर्चे काढण्यात आले. या मोर्च्यात लक्षावधींच्या संख्येने लोक सहभागी होते. त्यांच्यात एक प्रकारची शिस्त होती. हे मोर्चे मूक असले, तरी त्याचा आवाज मोठा होता. या मोर्च्यांमुळे शासन हालले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास शासन कटिबद्ध असून ओबीसींना धक्का न लावता हे आरक्षण देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देेवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठा आरक्षणावरील चर्चेला उत्तर देतांना मराठा समाजाने काढलेल्या मूक मोर्च्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ९ डिसेंबरला विधानसभेत कौतुक केले.
अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात फेरपालट करताच येणार नाही ! 
     मराठा समाजाला आरक्षण देणे हा राजकीय विषय नव्हता; मात्र काही लोक याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. एकमेकांना दोष देऊन हा प्रश्‍न सुटणार नाही, मराठ्यांना आरक्षण देतांना अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही फेरपालट करताच येणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय हा आत्ताचा नाही. फार पूर्वीपासूनचा आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
मराठा आरक्षणाच्या विलंबाविषयी तत्कालीन शासनावर पलटवार ! 
     प्रत्येक वेळी काँग्रेसचे शासन सत्तेवर होते. तेव्हाच हे आरक्षण देता आले असते. तुम्ही अध्यादेश काढला. अध्यादेशापेक्षा न्यायालयात कायदा टिकला असता. राणे समितीने चांगले काम केले; मात्र त्याच्यातही काही त्रुटी होत्या. त्या आमच्या शासनाने दूर केल्या. आरक्षण ही संविधानिक गोष्ट आहे. संविधानिक गोष्टी पूर्ण करण्याला आमच्या शासनाने प्राधान्य दिले. राज्यात यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण होते; मात्र वर्ष १९६५ मध्ये कोणतेही कारण न देता मराठा समाजाला आरक्षणातून वगळण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागले, असे ते म्हणाले. 
मूक मोर्च्याने शिस्तीचा नवा पायंडा पाडला ! 
     ते म्हणाले की, मराठा मोर्च्याने राज्यात शिस्तीचा एक नवा पायंडा पाडला आहे. शिस्तीत मोर्चा, कोणाचे बोलणे नाही. भाषणबाजी नाही. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. त्यानंतर परिसराची साफसफाई केली. शिस्तबद्ध निघालेल्या मराठा मोर्च्यांनी शासन, प्रशासन, माध्यम यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मराठा मोर्च्याच्या आयोजकांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn