Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कणकवली (सिंधुदुर्ग) येथे जनकल्याण महायागास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ

कलशयात्रेचा दीपप्रज्वलन करून प्रारंभ करतांना साधू,
संत, महंत यांच्यासह पालकमंत्री दीपक केसरकर आणि अन्य
साधू, संत, महंत, महामंडलेश्‍वर यांच्या वंदनीय उपस्थितीमुळे
कुंभमेळ्याचे स्वरूप कणकवली शहरातून निघाली भव्य कलशयात्रा
      कणकवली - देशातील तिसर्‍या आणि महाराष्ट्र राज्यातील पहिल्या जनकल्याण महायाग अर्थात श्री लक्ष्मीनारायण महायागाचा प्रारंभ देशभरातून आगमन झालेले साधू, संत, महंत, महामंडलेश्‍वर यांच्या वंदनीय उपस्थितीत १९ डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील श्री मुडेश्‍वर मैदानात झाला. संतांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून परमहंस भालचंद्र महाराज मठ ते श्री मुडेश्‍वर मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य कलशयात्रेमुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते. देशभरातील साधू, संतांच्या आगमनामुळे या यागाला कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून २५ डिसेंबरला या महायागाची सांगता होणार आहे. करवीरपिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, प.पू. गावडेकाका महाराज यांची प्रमुख उपस्थिती या जनकल्याण महायागाला लाभली होती.
     
भव्य कलशयात्रेत सहभागी संत आणि मान्यवर
     महायागाचा ध्वजारोहण सोहळा १६ नोव्हेंबरला संतांच्या वंदनीय उपस्थितीत अन् मोठ्या भक्तीमय वातावरणात मुडेश्‍वर मैदानात पार पडला. तेव्हापासून १९ डिसेंबरपर्यंत रामसंकीर्तन (नामस्मरण) आणि धार्मिक विधी चालू होते. १९ नोव्हेंबरला येथील परमहंस भालचंद्र महाराज आश्रमात जनकल्याण महायाग कलशयात्रेचा प्रारंभ श्री श्री १००८ श्री महंत माधवाचार्यजी महाराज गाद्याचार्य मंगलपिठाधिश्‍वर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन अन् षट्दर्शन आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री श्री १००८ महात्यागी गरीबदासजी महाराज, महाराष्ट्र षट्दर्शन साधू समाज अध्यक्ष श्री महंत लक्ष्मणदासजी मौनी महाराज यांच्यासह साधू, संत, महसंत यांच्या वंदनीय उपस्थितीत झाला. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात निघालेल्या कलशयात्रेत १० रथांतून साधू, संत, महंत यांच्यासह २१०० सुवासिनी कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. महायागाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला. २५ डिसेंबरपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.
पोलिसांचे उत्कृष्ट नियोजन !
      कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये; म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली २ पोलीस निरीक्षक, १२ उपनिरीक्षक, १२० कर्मचारी, २ आर्.सी.पी.च्या तुकड्या कणकवली शहरासह महायागस्थळी तैनात ठेवण्यात आल्या होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी महायाग स्थळाची पाहणी करून सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला.
      महायागाच्या ठिकाणी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन अन् विक्री केंद्र लावण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण देणारे आणि क्रांतीकारकांची जीवनगाथा सांगणार्‍या फलकांचे प्रदर्शन महाप्रसादासाठी उभारण्यात आलेल्या प्रतीक्षालयात लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाला प.पू. गावडेकाका महाराज, प.पू. मौनी महाराज यांच्यासह अन्य संत, महंत आणि भाविकांनी भेट दिली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn